गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पालीताना जैन धर्मियांचे प्रमुख स्थळ आहे. जैनधर्मियांच्या मान्यतेनुसार प्रत्येकाला जन्मभरात किमान एकदा शत्रुंजय तीर्थाचे दर्शन होणे आवश्यक आहे. पालीताना भावनगरपासून नैऋत्येला ५० कि.मी.वर आहे.पालीताना शंत्रुजंय नदीच्या तीरावर शत्रुंजय पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. पालीतानाच्या जैन मंदिरांना टक्स असे देखील म्हणतात.
पालीतानाला शंत्रुजंय पर्वतावर जवळपास ३००० मंदिर आहेत्,यातील प्रमुख मंदीर भगवान आदिनाथ यांचे आहे. या मंदिर समुहाचे निर्माण अकराव्या आणि बाराव्या शतकात केले गेले. या मंदिरांंची उभारणी ९०० वर्ष सुरु होती. या ठिकाणी पहिले मंदिर उभारले ते जैन शासक कुमारपाल सोळंकी या राजाने.इ.स. १३११ मध्ये तुर्क आक्रमणात या मंदिरांची नासधुस झाली.मात्र संत जीनप्रभुसुरी यांनी त्याचे पुर्ननिर्माण केले.इथल्या इतिहासानुसार मुघलांच्या शासनकाळात राजा उनाडजीने सीहोरवर आक्रमण केले होते. त्याला विरोध करण्यासाठी भावनगरचा राजा गोहिल वाखटसिंधी याने आक्रमण केले. पण पराक्रमाची शर्थ करुन उनाडजीने भावनगरच्या राजाला पराभुत केले.
सौराष्ट्र म्हणजेच काठियावाड आणि गुजरातचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला खंभातचे आखात म्हणतात. इंग्रजीत या आखाताचे नाव Gulf of Cambay असे आहे.मुंबईच्या उत्तरकिना-यास काठेवाडपासून वेगळें पाडणा-या एका समुद्राच्या त्रिकोनी आकृतीस हें नांव आहे. येथें पूर्वीं अरब व्यापारी फार येत असत. आखाताच्या मुखाच्या पूर्वेस सुरत असून पश्चिमेस पोर्तुगीज लोकांचें दीव नांवाचें ठाणें आहे. खंबायत शहर उत्तर भागांत वसलेलें आहे.
मराठी भाषेत काठियावाडला काठेवाड आणि खंभातला खंबायत म्हणतात. अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत खंबायतच्या आखाताची हद्द समजण्यात येते. सुमारे २०० किमी. लांब, २४ ते २०० किमी. रुंद व सरासरी ८ ते १२ मीटर खोल असलेल्या या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान लहान नद्या मिळतात. नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत, भावनगर या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व पुढे कमी कमी होत गेले. खंबायतच्या आखातात पाण्याखाली एक शहर सापडले आहे. हे शहर ९,५०० वर्षे जुने असावे. असे असेल तर हे जगातले सर्वात जुने शहर असले पाहिजे.
आखात : समुद्राचा किनाऱ्यापासून जमिनीकडे आत घुसलेला, सामान्यत: खोल, चिंचोळा भाग. हा उपसागराच्या मानाने लहान असतो. उपसागर हा लहानसा समुद्रच असतो. तो बराचसा रुंद असतो. उदा., कच्छचे, खंबायतचे किंवा मानारचे आखात व बंगालचा उपसागर. तथापि मेक्सिकोचे आखात व फंडीचा उपसागर यांच्या बाबतीत हे अर्थ उलट झालेले दिसतात. कारण इंग्रजीतील ‘गल्फ’ (आखात) याचा अर्थ ‘समुद्राचा जमिनीत गेलेला मोठा भाग’ आणि ‘बे’ (उपसागर) याचा अर्थ ‘लहान भाग’ असा आहे. यामुळे इराणचे आखात, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेचे कार्पेंटेरियाचे आखात, गिनीचे आखात, अलास्काचे आखात, मार्ताबानचे आखात, सयामचे आखात इ. आखाते समुद्राचे विस्तृत भागच आहेत. तथापि गल्फ आणि बे यांतील हा फरकही निश्चित स्वरूपाचा दिसत नाही कारण हडसनचा उपसागर, बॅफिनचा उपसागर, बिस्केचा उपसागर हेसुद्धा समुद्राचे मोठमोठे विभागच आहेत आणि कॅलिफोर्नियाचे आखात, सुएझचे आखात, अकाबाचे आखात हे मात्र सुरुवातीस दिलेल्या ‘आखात’ याच्या अर्थाशी जुळणारे समुद्रविभाग आहेत.
भारतात कच्छच्या आखातावर गुजरातची मांडवी, कांडला व ओखा ही प्रसिद्ध बंदरे आहेत. मार्च ते ऑक्टोबर या काळात पुष्कळदा येथील पाणी कच्छच्या छोट्या रणात शिरते. खंबायतच्या आखातावर खंबायत व भावनगर ही प्रसिद्ध बंदरे असून नर्मदेच्या मुखाजवळ भडोच व तापीच्या मुखाजवळ सुरत ही प्रसिद्ध शहरे आहेत. साबरमती व मही या नद्याही याच आखाताला मिळतात. अंकलेश्वरजवळ तेल सापडले आहे व या आखातातही तेलाचे संशोधन चालू आहे. मानारच्या आखातावर तमिळनाडूची तिरुचेंडूर व तुतिकोरिन ही प्रसिद्ध बंदरे, रामेश्वरम् व धनुष्कोडी ही धार्मिक महत्त्वाची स्थळे, रामाचा सेतू, श्रीलंकेची तलाईमानार व पुट्टालम् ही बंदरे आहेत. या आखातात मोत्याचे शिंपले सापडतात. काही आखाते विशिष्ट गोष्ठींसाठी प्रसिद्ध असतात. उदा.,मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेची सर्वांत मोठी नदी मिसिसिपी मिळते व तिच्या मुखाशी न्यू ऑर्लीअन्स हे मोठे बंदर आहे. या आखातामुळे तेथून जाणाऱ्या उष्ण समुद्रप्रवाहाला ‘गल्फस्ट्रीम’ हे नाव मिळाले. माराकायव्होच्या आखातात मिळणारे तेल व्हेनेझुएलाची प्रमुख निर्यात आहे. गिनीच्या आखातावर आयव्हरी कोस्टपासून गाबाँपर्यंत आठ देश असून ॲक्रा व लागोस ही प्रसिद्ध बंदरे आहेत. सुएझच्या आखातापासून सुएझ कालव्याने भूमध्य समुद्रात जाता येते. इराणचे आखात इराण, इराक, कुवेत, कॉटार इ. तेलसंपन्न प्रदेशांनी वेढलेले आहे. फिनलंजवडळील बॉथनियाचे आखात सर्वांत कमी क्षारतेच्या (२ ‰) पाण्याबद्दल प्रसिद्ध आहे, तर अकाबाचे आखात अरब व इझ्राएल यांचे संघर्षक्षेत्र बनले आहे.

अकराव्या व बाराव्या शतकामध्यें खंबायत हें अनहिलवाडच्या राज्याचें मुख्य बंदर होतें. मुसुलमानांनी जेव्हां १२९८ सालीं हें राज्य काबीज केलें तेव्हां खंबायत हें एक हिंदुस्थानांत फार धनसंपन्न शहर होतें असें म्हणतात.
गुजराथच्या राज्याची भरभराट झाल्यावर खंबायतलाहि चांगले दिवस आले व १५ व्या शतकाच्या प्रारंभीं पश्चिम हिंदुस्थानांत हें शहर व्यापाराचें केंद्र होतें. सन १५३८ मध्यें पोर्तुगीज लोकांनी हें शहर लुटलें व तदनंतर १५७३ पावेतों एकंदर प्रांतांत अव्यवस्था माजली होती. पण अकबरानें तो प्रांत काबीज केला. पुढें सुरतेस व्यापाराच्या दृष्टीनें महत्व मिळूं लागल्यामुळें खंबायत अगदींची मागें पडलें. पण तेथें जुने कारखाने असल्यामुळें १६१५ त इंग्रजांनीं व १६१७ त डच लोकांनीं येथें वसाहती स्थापिल्या. औरंगझेबाच्या मरणानंतर जेव्हां मोंगल सत्तेस उतरती कळा लागली तेव्हां मराठयांनीं ह्या प्रांतावर स्वा-या करून लोकांकडून बराच पैसा नेला. १७३० सालीं खंबायत हें एक वेगळें स्वतंत्र संस्थान बनलें. सध्यां राज्याधिकार हातीं असलेला राजा गुजराथच्या मोमिनखानचा वंशज आहे. ज्या वेळीं मोमिनखान गुजराथच्या गादीवर होता तेव्हां त्याचा जावई निझामखान ह्याच्या हाती खंबायतचें राज्य होतें. परंतु मोमिनखानचा पुत्र मुफ्ताखीर ह्यानें निझामखानास ठार मारून खंबायतचें राज्य बळकाविलें. वसईच्या तहामुळें खंबायत इंग्रजांच्या हातीं गेलें. येथील राजा शिया जातीचा एक मुसलमान आहे. तो सरकारास २१,९२४ रु. खंडणी देतो. मुसलमानी कायद्यान्वयें त्याला दत्तक घेण्याची किंवा कायदेशीर वारसहि नेमण्याची सनद मिळाली आहे.
१५ व्या शंतकांत त्यापूर्वींच्या दोन शतकांत खंबायतची व्यापारी दृष्टीनें फार ख्याति होती. आणि १६ व्या शतकाच्या आरंभीं तर हिंदुस्थान, इराण, अरबस्तान आणि पूर्व आफ्रिका इत्यादि देशांचे खंबायतशीं व्यापारी दळणवळण होते. नंतर मात्र सुरतेची भरभराट होऊं लागल्यानें इकडे उतरती कळा लागली व १८०२ सालीं खंबायत एक सर्वसामान्य शहर बनलें. ५० टनांपेक्षां जास्ती वहनशक्तीचीं जहाजें धक्क्याला लागत नाहींत. १९०७ सालीं सर्व संस्थानांत एकच पोष्ट व एक टेलिग्राफ आफिस होतें. नबाबाला राज्यव्यवस्थेचा व न्याय करण्याचा सर्व अधिकार आहे. पण संस्थानांतील गोरे लोकांचा इनसाफ पोलिटिकल एजन्टच्या परवानगीशिवाय करण्याचा अधिकार नाहीं. अक्टोबर १९२२ सालीं विजेचा पुरवठा करण्यांत आल्यामुळें खंबायत संस्थानांतील औद्योगिक व्यापारास मोठी चालना मिळाली. तेथील विजेचा पुरवठा करणा-या कंपनीनें व औद्योगिक कंपनीनें, तीन पिठाच्या गिरण्यास व एका विणकाम कारखान्यास विद्युतशक्ति पुरविण्याचें काम घेतलें असून १९२३ सालीं विजेनें चालणारा बर्फाचा कारखाना व काडयाच्या पेटीचा कारखाना सुरू करण्यांत आला. अगेट व कॉर्नोलियन नांवांच्या दगड-कामांमुळें हजारों मजुरांस साधारणतः नेहमीं वेतन मिळें. परंतु १९२२ मध्यें हा कारखाना बंद करावा लागला; कारण वरील दगड-कामांस बाहेरून मागणी येण्याचें बंद झाले.
आखाताच्या चिंचोळ्या भागांत मुखाशीं समुद्राच्या भरती ओहोटीनें त्याचप्रमाणें नद्यांच्या जोराच्या प्रवाहानें, वाळू जमल्यामुळें मालाची जहाजें बंदरांत येण्यास अडचण पडू लागली व हळूहळू ह्या बंदराचें महत्व कमी झालें. खंबायत येथें सुंदर रंगीत दगडावरचें काम फार सुंदर होतें. किना-यावर असलेल्या भडोच व सुरत ह्या प्रसिद्ध बंदरांत आतां परदेशांतून माल येणे बंद झालें आहे.
वादळी व विषम हवामानासाठी आखात प्रसिद्ध असले, तरी येथे सापडलेल्या तेलाच्या साठ्यामुळे खंबायत आखाताला ऊर्जितावस्था येईल असे दिसते.
तरणेतर मेला :-
त्याचवेळी तरुणी आपल्या पारंपारिक पोषाखात नटूनथटून मेळाब्यात येतात आणि आपआपला जीवनसाथी निवडतात. युवतींना आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा असल्यामुळे त्या खुपच सजलेल्या असतात.सोबत त्यांचे कुटूंबीयही असतात. ज्या युवतीला एखादा युवक पसंद पडेल त्याच्या छत्रीच्या खाली त्या थांबतात.त्यानंतर दोघांच्या घरचे लग्नाची तारीख निश्चित करतात.युवक्,युवती आणि त्यांच्या कुटूंबाचे सदस्य सोडून इतरही लोक या मेळाव्यात सामिल होतात.







No comments:
Post a Comment