Tuesday, September 21, 2021

गुजरातची भ्रमंती ( भाग ७ )

 जर आपण पर्यटनासाठी एका वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल आणि जिथे नैसर्गिक सौंदर्य्,शांतता आणि निवांतपणा मिळेल अश्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर दमन हा एक उत्तम पर्याय आहे. आज आपण दमन परिसराची माहिती घेउया.
    दमणचे नाव आपण नेहमी एकले असते.एका बाजुने समुद्र तर तिन्ही बाजुने गुजरात राज्याने वेढलेला हा प्रदेश आहे.या भागाला सुरवातीला पोर्तुगीज एन्क्लेव्ह म्हणले जाई. या प्रदेशाच्या उत्तरेला व दक्षिणेला कलेम आणि भगवान अश्या दोन नद्या आहेत.जवळपास ४५० वर्ष दमन्,गोवा,दादरा नगर हवेली हा प्रदेश पोर्तुगीज साम्राज्याचा भाग होता. १९ डिसेंबर १९६१ ला हा भुप्रदेश भारतात सामील झाला. अर्थात तरीसुध्दा १९७४ पर्यंत पोर्तुगीज हा आपलाच भाग मानत होते. पुढे १९८७ पर्यंत गोवा,दादरा नगर हवेली,दमन हा परिसर केंद्रशासित प्रदेश होता.गोवा ८७ साली स्वतंत्र राज्य म्हणून घोषीत झाले,मात्र दमण आज देखील केंद्रशासित प्रदेश आहे.दमण आणि दीव असे एकत्र म्हणले जात असले तरी प्रत्यक्षात दमण आणि दीवमध्ये ४०० कि.मी. अंतर आहे.दमण हा नेहमीच विवीध जातीच्या आणि धर्माच्या संस्कृतीचा मिलाफ असलेला प्रदेश आहे.ज्यांना शांत वातावरणात आनंदात काही काळ घालवायचा आहे, असे पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतात.या शहराचे दमनगंगा नदीमुळे दोन भाग झालेले आहेत, मोती दमन ( बडा दमण) आणि नानी दमण ( छोटा दमण ) .शांत किनार्‍यामुळे दमण एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द होत आहे.  
History of Daman Diu |  History of Daman Diu
दमन दीव का इतिहास | History of Daman Diu
   वापी हे शहर मुंबईस जवळ असणाय्रा गुजरातमधल्या इतर सुरत,वलसाड,नवसारीप्रमाणेच औद्योगिक शहर ही ओळख बाळगून आहे. पण त्याची आणखी एक ओळख म्हणजे पश्चिमेकडे असणारे दमण, पुर्वेकडचे असणारे दादरा नगरहवेली या केंद्रशासीत भागांसाठी जवळचे रेल्वे स्टेशन. त्र्यंबकेश्वरच्या थोड्या पुर्वेकडच्या डोंगरांतून उगम पाऊन पश्चिमेकडे वाहात जाणारी दमणगंगा नदी समुद्राला मिळते ते दमण. या भागाचे समुद्री महत्व ओळखून सोळाव्या शतकापासून पोर्तुगिज लोकांनी इथे येऊन व्यापारानिमित्त किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दमणचे महत्त्व एका वेगळ्याच कारणासाठी वाढले. तर पुर्वेकडच्या दादरा नगरहवेलीत पर्यटनाचा व्यवसाय हॅाटेलवाल्यांनी वाढवला. सिल्वास,खानवेल हे ते भाग. दमणगंगेवर झालेल्या मोठ्या मधुबन तलावाने पाण्याची सोय झाली. दादरा इथले वनगंगा गार्डन ( वापी - दादरा १२ किमि) बोटिंगमुळे पर्यटकांचे आकर्षण आहे.पंधरा वर्षांपुर्वी बोर्डी, दादरा,खानवेल,सिल्वास हे भाग फिरलो होतो. त्यावेळी रेल्वेतल्या प्रवाशांनी माहिती दिली तसे गेलो. "दमणला जाऊ नका तिथे तुमच्या कामाचे काही नाही" हा सल्ला मानून दमण वगळले होते. आता दमणची जुनी प्रसिद्धी ( दारु पिण्यासाठीची) अशी काही विशेष उरली नाही.

कसे जावे
दमण
मुंबई अहमदाबाद वेएवे रस्त्याने वापीला (१६० किमि) डावीकडे वळल्यास दहा किमिवर दमण आहे. जाताना पोलुशन फार वाटले तरी दमणला अजिबात नाही. वेस्टर्न रेल्वेच्या सर्वच गाड्या वापीला थांबतात. स्टेशनच्या पश्चिमेस टॅक्सी,ओटोरिक्षा आणि बसेस दमणला (१० किमि.) तर पुर्वेच्या दादरा,नगरहवेली ,खानवेलसाठी. वापी बस स्टँड पश्चिमेला पाचसे मिटर्सवर आहे.

नदीच्या उत्तर भागाला 'नानी दमण' - फक्त दमण म्हणतात. इथून एका पुलाने दक्षिणेकडचे 'मोटी दमण' ( याच नावाने ओळखतात) जोडले आहे. एक वेगळा पादचारी पूल आहे. दमण स्टँडवरून जांपोरे बीच (६ किमि )जाण्यासाठी बस ,ओटो मिळतात. दोन किमिवर फोर्ट आहे, पण स्टँडवरून अर्धा तासात पुलावरून चालतही जाता येते.

कसे जावे :-
१) Pune - Dadar - Dadar West - Vapi - Daman (Two Days )
बुधवारी 11096 Pune Ahmedabad Ahimsa Express १९:५० ला पुण्यातून निघून रात्री १:४५ ला वापीला पोहोचते, टॅक्सी रात्री सुद्धा मिळते
वापी मधून टॅक्सी आहेत ३० ते ५० रुपये पर सीट दमण साठी. दमण मध्ये हॉटेल सहज उपलब्ध असतात (सुट्ट्या सोडून) . जेवण चांगले मिळेल व्हेज नॉन व्हेज असे पाहिजे तसे. मराठी येते बऱ्याच लोकांना पण हिंदी जास्त चालते
२) Mumbai - Vapi - Daman One Day
मुंबई वरून एका दिवसात दमण होऊ शकते 22953 Gujarat Super fast Express सकाळी ५:४५ ला निघून ८:४५ पर्यंत वापी ला पोहोचते. reservation ची गरज पण नाही लवकर गेलात तर छान विंडो सीट मिळते
वापीमधून दमण साठी टॅक्सी लगेच मिळते GSRTC CNG बसेस पण आहेत.
वापीवरून मुंबई ला येताना १७:०० ला 59046 Valsad - Bandra Passenger मिळते, बोरिवली मध्ये लोकल पकडावी पुढे ...

डहाणू: स्वतःची गाडी असेल तर समुद्रकिनाऱ्यावरून मस्त रस्ता आहे तिथे बीच आणि काही हॉटेल्स आहेत. डहाणू पासून २५ किमी वर NH८ चारोटी ला वर Mahalaxmi Mandir आहे. आता इथून पुढे मुंबई किंवा वापी / सिल्वासा असे कुठेही जाता येईल.

पुणे स्टेशन वरून ट्रॅव्हल्स असतात सुरत साठी सेमी स्लीपर / स्लीपर ५००/- / ७००/- त्या वापी ला भल्या पहाटे सोडतात. तिथून ऑटो करावी लागते वापी स्टेशन किंवा बस स्टॅण्ड पर्यंत .. पुढे वरील प्रमाणे 

सिल्वासा ४० किमी साठी - वापी ला जावे लागेल तिथून सिल्वासा साठी बस आहेत सिल्वासा मध्ये मराठी जास्त चालत. सिल्वासा मधून मधुबन साठी बस मिळते धरण साठी स्टॉप आहे तिथे लायन सफारी पण आहे. तिथे दमण गंगा चे पात्र खूप खोल आणि मोठे आहे

हे भाग वापीच्या पुर्वेस/आग्नेय दिशेस आहेत.
सिल्वास - वापीअगोदरच्या भिलाड स्टेशनपासून उजवीकडे १८ किमि.
खानवेल याहीपुढे.
वापी - सिल्वास २४.
३) रेल्वेने :-
   जर रेल्वेने दमणला जायचे असेल तर जवळचे स्टेशन वापी आहे. वापी फक्त १० कि.मी. आहे.इथून २० मिनीटात बसने आपण दमणला पोहचु शकतो.
४) विमानाने :-
  दमणला विमानतळ नाही.मात्र जवळचा विमानतळ मुंबई आहे.
   दमणला मुंबईतून जायचे असेल तर अंतर आहे १९३ कि.मी. तर अहमदाबादपासून ३६७ कि.मी. आहे.वडोदर्‍यापासून हे अंतर ३०० कि.मी आहे.
कधी जावे: Aug to Nov (बाकी ३१DEC ला खूप गर्दी असते). सुरत १२० किमी - वापी तो सुरत ट्रेन बेस्ट (सुरत मध्ये Textile Market ला खरेदी करा Bombay Market ला नको)

काय पाहावे
दमण स्टँडपासून दमण जेट्टी/ दरिया पाचशे मिटर्स अंतरावर आहे. उत्तरेस ६ किमिवर देवका बीच, मिरासोल वाटरपार्क आहे. दक्षिणेस पुल ओलांडल्यावर अर्धा किमीवर फोर्ट मोटी दमण भागात आहे. किल्ल्याच्या भिंती चांगल्या स्थितीत आहेत. याच भागात सचिवालय,परगोला गार्डन,नगरपालिका इमारत,दोन चर्चेस जवळच आहेत. एन्ट्री फी नाही. फक्त सकाळी साडेसहाला एक मास/सर्विस असते. दिवसभरात कुणी येत नाही चर्चमध्ये. इमारती पाहात फोर्टात रस्त्याने फिरायला मजा वाटते. स्वच्छता आणि शांतता आहे. पाच किमिच्या जांपोरे बीचला जाता येईल. इथले बीच काळपट वाळूचे आहेत. चांगले नाहीत. जांपोरे किनाय्राला सुरुची झाडे आहेत, खाण्याच्या टपर्‍या आहेत. दमणमध्येच नेव्हीचा एअरपोर्ट आहे. मोटी दमण भाग टापटीप आहे.दमण बस डेपो जवळ टुरिस्ट मदत केंद्र आहे.तिथे रोज संध्याकाळी मिनी बस सुटते. सगळी ठिकाणं माणसी ३५ रुपयांत फिरवतात.इकडच्या भागात गाव, वस्त्यांची नावं ***वाड, ***फालिया अथवा ***पारडी अशी बरीच असतात.

दमण आणि सिल्वास हॅाटेल्स लिस्ट 

 

  दमण हॅाटेल्स लिस्ट ( प्रसिद्धि पुस्तिकेतून )

 

 दमण हॅाटेल्स लिस्ट ( प्रसिद्धि पुस्तिकेतून )
मधील हॉटेल उमेश टॅक्सी स्टॅन्ड च्या अगदी जवळ आहे (पोलीस स्टेशन समोर) तिथे जेवण चांगले आहे
५००/- पासून रूम्स होत्या (२०११)
Gurukripa, Sovereign पण जवळ आहेत एकदम छान लोकेशन ला आहेत rooms above ५०००/-

जेवण चांगले मिळते. Sovereign ला बहुतेक Pure Veg पण मिळते

बाकीची थोडी जास्त महाग आहेत दमण ला ७स्टार का ५ स्टार हॉटेल पण आहे (The Deltin, Daman https://www.deltin.com/the-deltin/)
ढाबा; वीरा दा ढाबा Veera Da Dhaba, Daman

राहाणे हॅाटेल्स, खाणे
सर्व हॅाटेल्स दमण स्टँड ते दरिया या रस्त्यावर आहेत. बार आणि रेस्टॅारंट्स बरेच आहेत पण ते खरेतर बारच असावेत. दुपारचे वातावरण अर्थातच सुस्त होते. 

 

 अहमदाबाद हायवेने १६०~ किमि वापी - पश्चिमेस दहा किमि दमण आहे.

 

दमण ते जांपोरे बीच पाच किमि.


सचिवालय इमारत

पादचारी नवीन पुलावरून पश्चिमेकडे दिसणारे दमणगंगा नदीचे मुख, उजवीकडे दमण( नानी दमण), डावीकडे मोटी दमण आणि जेट्टी.

दमण बीच :-
  दमण बीचला इकडे बोंबील बीचहि म्हणतात.. फोटोतही बोंबील सुकवायचे खांब आणि दोऱ्या दिसत आहेत.  Daman Beach दमन


 

दमण बीच

जांपोरे बीच :-
दमण टॅक्सी स्टॅन्ड - पोलीस स्टेशन - साई बाबा मंदीर - पादचारी पूल - मोटी दमण असे पायी जावे (१. ५ किमी) तिथे गार्डन पाहा, फोर्ट पहा आणि फोर्ट च्या पलीकडे जाऊन मग ऑटो Jampore Beach साठी करावी वाटेमध्ये भाजी मार्केट आणि चर्च आहे तिथे चहा छान मिळतो. जंपोर बीच हा शांत समुद्रकिनारा असून मोती दमणच्या दक्षिण बाजुला आहे. इथेच लाईट हाउस आहे. तसेच बीचवर उंट आणि घोडेस्वारी देखील करता येते.  
 दमण ते जांपोरे बीच पाच किमि. 
जंपोर बीच
 

 

 दमणचे लाईट हाउसः-
दमनगंगेच्या किनार्‍यावर असलेले हे लाईटहाउस म्हणजे दमनमधील एक महत्वाचे ठिकाण मानले जाते.

​दमन का लाइटहाउस

मीरासोल लेक गार्डन
    मिरासोल लेक रिसॉर्ट्मध्ये मिरासोल वॉटर पार्क आहे. विशेषतः उन्हाळ्यात इथे वॉटर स्पोर्ट्चा आनंद घेता येतो. हे एक थीम पार्क आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे सुरु असते.  इथे २ किंवा ५ रुपये एन्ट्री फी आहे. आतमध्ये महागडे रेस्टॉरंट आहे काहीही ना घेता भरपूर फोटो सेशन करा.

​मीरासोल लेक गार्डन

 फोर्ट झीरॉम किल्ला :-
   दमनगंगा नदीच्या उत्तर किनार्‍यावर उभारलेल्या या किल्ल्याला सेंट झीरॉम याच्या नावावरुन फोर्ट झिरॉम हे नाव देण्यात आले आहे. या किल्ल्यातच 'अवर लेडी ऑफ दी सी' हे चर्च आहे.याची वास्तुरचना पोर्तुगीज शैलीची आहे. पोर्तुगीज काळात झालेला संघर्षाच्या स्मृती इथे असलेल्या ख्रिश्चन स्मशानभुमीच्या रुपाने दिसतात. 

मोती दमन किल्ला-
 पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात.या किल्ल्यातून समुद्रांच्या लाटांचे दृष्य दिसते. गतकाळच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या किल्ल्याला जरुर भेट द्या. 

 

मोटी दमण किल्ला, दक्षिण दरवाजा

 

 दमण नगरपालिका इमारत

​फोर्ट जीरोम

 

 रोझारिओ चर्चमधला एक सज्जा

 

रोझारियो फरशीवरील नोंद

 

रोझारियो चर्च पाटी

 

 बॅाम जेझस चर्चमधला एक सज्जा

कई और भी हैं घूमने की जगहें

 

 बॅाम जेझस चर्चमध्ये

 

 बॅाम जिझस चर्च पाटी

 

टेक्निकल स्कूल प्रवेशद्वार

 परगोला गार्डन

किल्ल्यातला एक रस्ता.

  किल्ल्यातला एक रस्ता.

 

 

किल्ला, नदीकडचा उत्तरेचा दरवाजा.


पादचारी नवीन पुलावरून पुर्वेकडचा दिसणारा दमणगंगा नदीवरचा वाहनांसाठीचा राजीव गांधी सेतू.

 सोमनाथ महादेव मंदीर :-
   दमणला येउन बीच फिरुन झाल्यावर मनाला शांती देणार्‍या आणखी एका ठिकाणाला जरुर भेट द्यावी ते म्हणजे सोमनाथ महादेव मंदीर. दमणमधील हे एक प्राचीन मंदीर आहे. एका साधूच्या स्वप्नातील उल्लेखामुळे या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.स्थानिक लोकांमध्ये हे शिवस्थान फार महत्वाचे आहे. 

डोमनिकन मठाचे अवशेष :-
   डॉमनिकन मठ हा कॅथोलिक पंथाचा उपासना स्थळ म्हणता येईल. इथल्या भुतकाळाचे प्रतिनिधीत्व करणारे हे एतिहासिक स्थळ आहे. 


जेट्टी गार्डन :-
  दमण असलेली सुंदर बाग म्हणजे हि जेट्टी गार्डन! इथे आपण कारंजांचा आनंद घेउ शकतो. सहकुटूंब सुट्टी व्यतित करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. हि बाग सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु असते.

​देवका बीच

 नगोआ बीच :-
   पर्यटकांमध्ये हा बीच खुप लोकप्रिय आहे. इथे पाणी स्वच्छ निळ्या रंगाचे आहे. दमणमध्ये एक संध्याकाळ घालवण्यासाठी हि एक आदर्श जागा आहे. परंतु इथे समुद्रात पोहणे मात्र धोकादायक आहे, कारण समुद्राचा तळ खडकाळ आहे. 

नागोआ बीच


देवका बीच :-
   दमणमधील हा समुद्रकिनारा देखील पर्यटकात लोकप्रिय आहे. मात्र इथेही पोहणे सुरक्षित नाही, तसेच वॉटर स्पोर्ट नाहीत.कारण हा समुद्रकिनारा देखील खडकाळ आहे.

काही उपयोगी गुजराती वाक्ये

*बस डेपो/एटीएम/सिनेमाघर क्यां छे?
- बस डेपो कुठे आहे?

!! डेपोमाटे आ रस्ताथी आगळ जाओ।
- डेपोसाठी या रस्त्याने पुढे जा.
!! सामे छे एटीएम.
- समोरच आहे एटीएम.
!! डेपोनी पाछळ सिनेमा छे।
- डेपोच्या मागे सिनेमा आहे.

* म्यूजियम आजे खुलु रहेशे?
- आज म्यूजियम उघडे असेल?
!! ना। काले सवारे नव वागे खुलशे।
- उद्या सकाळी नऊ वाजता उघडेल.
!! बपोरे बे थी त्रण वाग्यासुधी बंध रहे छे।
- दुपारी दोन ते तीन बंद असते.
!! आवतिकाले पब्लिक हॅालिडेमाटे बंध रहेशे। तमे काले'ज जुओ।
- परवा पब्लिक हॅालिडेमुळे बंद असेल. तुम्ही उद्दयाच पाहा.

!! बीचउपर सांजे जाओ तो सारु थशे ।
- बीचवर संध्याकाळी गेलात तर बरं होईल.
* डेपो केटला दूर छे?
- डेपो किती दूर आहे?
!! आ तो पाछळच छे।
-हा तो मागेच आहे.
!! दसेक मिनिट दूर छे।
- दहाएक मिनिटांवर आहे.

* दमणनी बस क्यां मळशे?
- दमणची बस कुठे मिळेल?
!! त्यां सात नंबरउपर।
- त्या सात नंबर वर.
* दमण जवामाटे बस क्यारे मळशे?
- दमणला जाणारी बस केव्हा मिळेल?
* बस क्यारे आवशे?
- बस केव्हा येईल?
!! वार छे।
- थोडा वेळ लागेल. थोड्या वेळाने येईल.
!! हमणाज् आवशे।
- येईल आताच.
!! घणी बधी बस्सो छे । पाँचपाँच मिनिटमां उपडे छे।
- खूप बस असतात. पाचपाच मिनिटाला सुटतात.
*अहियाँ जोवामाटे शूशू छे?
- इथे बघण्यासारखे कायकाय आहे?
!! घणीबधी जग्याए छे।
- खूपसाय्रा जागा आहेत.
!! सामे जाओ तो दमणनो दरियो छे।
- समोर गेलात तर दमणचा समुद्र आहे.
!! चाररस्ताथी डाबी बाजू निकळो तो जेट्टी अने नानो किलो देखाय।
- चाररस्त्यावरून डावीकडे गेलात तर जेट्टी आणि छोटा किल्ला दिसेल.
!! पुल पार करिने मोटी दमणना किलामां जई शकाय। पंधरवीस मिनिट लागशे।
- पुल पार करून मोटी दमणमधल्या किल्ल्यात जाता येते. पंधरा वीस मिनिटे लागतील.
!! बे चर्चो किलामां'ज छे।
- दोन चर्च किल्ल्यातच आहेत.

रेस्टारोंमा
रेस्तरांमध्ये

!! अहिया टेबल खाली छे।उपर फैम्ली रुमपण छे।
- इथे टेबल रिकामे आहे. वरती फैम्लीरुम आहे.
* नाश्तो'मा शु छे?
- नाशत्यासाठी काय आहे?
!! आ लो मेन्यु।
- हा घ्या मेन्यु.
!! चा केवी जोईए तमने/आपणे?
- चहा कसा हवाय?
* तीन नॅार्मल,दोन कमी साखरेचा,एक बिनासाखरेचा.
- त्रण नॅार्मल,बे मोळो अने एक बिनाशक्करवाळो।
* कार्ड पेमेंट'नी सगवड छे केम?
- कार्ड पेमेंटची सोय आहे का?
!! तमारी ए नोट बिजी आपो ने।
- तुमची ही नोट दुसरी द्या ना.
* नाश्तो झाझो स्पाइसी ना बनावो।
- नाश्ता फार तिखट नको.
* आ आइसक्रिम ढिल्लो पडी गयु छे केम?
- हे आइसक्रिम वितळलं आहे.
!! आजे चार कलाक पावर बंध हती एटले एम थयु ।
- आज चार तास वीज नव्हती म्हणून असं झालं.
* पावरनो प्राब्लेम छे केम?
- पावरचा प्राब्लेम आहे का?
!! अवारनवार पावर जती नही पण बहु दिवसपछी एम थयु।
-सारखीसारखी पावर जात नाही पण आज बय्राच दिवसांनी असं झालं.

हॅाटेलवर

* रुम मळशे केम?
* रुम खाली छे?
- रुम मिळेल?
- रुम रिकामी आहे?

!!केवी रुम जोईए?
- कशी हवीय रुम?
!! डिलक्स/सादी/एसीवाळी?
- डिलक्स/सादी/एसीवाली?
!! एसीवाळी बे रुमो छे।
- एसीच्या दोन आहेत.
!! एक रोडनी सामे ने बीजी दरियासामे।
- एक रस्त्याकडची आणि दुसरी समुद्राकडची.
!!एसीरुमनो टॅक्स वधु छे।
- एसीरुमचा टॅक्स जास्ती आहे.
* मारामाटे एक अंग्रेजी छापो सवारे मळशे केम?
- मला सकाळी एक इंग्रजी पेपर मिळेल का?
* अमे नॅानवेज खाता नथी। सेपरेट वेज रेस्तरां छे?
* शु पालिश करवानु छे।
- शुपालिश करायचं आहे.
* आम्ही नानवेज खात नाही, वेगळं वेज रेस्तरां। आहे का?
-अमे नानवेज खाता नथी । वेज रेस्तरां छे केम?
!! छे ना!! जुदाजुदा छे।
- आहे ना वेगवेगळं.

!! ए लो तमारी ३०१नी चाबी।
- ही घ्या तुमची ३०१ ची चावी.
!! तमारा लान्ड्रीना कपडा सवारे आठ पेला आपजो।
- तुमचे लाँन्ड्रीचे कपडे सकाळी आठच्या आत द्या.
!! सांजे सातवागे रुमउपर पाछळ आवशे।
-संध्याकाळी सातला रुमवर परत येतील.
* रुमवर पाणी येत नाही.
- पाणी आवतो नदी।
* फॅन चालतू नथी।
- फॅन चालत नाही.
* आ गिझर केविरिते चालू करवानू?
- हा गिजर कसा चालू करायचा?
!! आ तो ओटोमॅटिक छे, पाणी चालू करशो तो थोडीवार पछी गरम पाणी आवशे।
- हा ओटोमॅटीक आहे. पाणी चालू केल्यावर थोड्यावेळाने गरम पाणी येईल.
* नळ/टेप खोलवा आवडतू नदी।बहु टाइट छे।
- नळ उघडता येत नाही. फार घट्ट आहे.

!! अहिंथी फरवामाटे टॅक्सी बोलावी शकाय। टॅक्सी जोईए केम?
- फिरण्यासाठी टॅक्सी बोलावता येते. टॅक्सी हवी आहे का?
!! अमारी सर्विस केम लाग्यु?
- आमची सर्विस कशी वाटली?
!! अने नाश्तो अने जमण गम्यु केम?
- नाश्ता आणि जेवण आवडलं का?
!! फरी आवजो!
- पुन्हा या!
* नक्की येउच
-अमे चौक्कस आवशो।
* तमारु दमण बहु गम्यु।
- तुमचे दमण फार आवडले.

बिना शक्कर वाडो , ह्यांच्यापेक्षा 'एक चा नॉर्मल, बे ओछु खांड नाखीने, अने एक बद्धी मोरी चा आपो' म्हणावे (नेमक्या गुजरातीत)

अर्थ - एक नॉर्मल चहा, दोन कमी साखरेचे आणि एक बिन साखरेचा चहा द्या

दमणमध्ये काय खरेदी कराल ?
   इथे आपल्याला हस्तकलेच्या वस्तु, चामड्यापासून केलेल्या वस्तु तसेच स्मृतीचिन्ह खरेदी करता येतील.

दमण मध्ये मुक्काम असेल तर
वलसाड ३० किमी - सकाळी वलसाड साठी GSRTC बस पकडावी एका तासामध्ये वलसाड, एकदम सोप्पं आहे, वलसाड मध्ये स्वामीनारायण मंदिर जे तिथलं बीच (Tithal Beach) वर आहे अप्रतिम लोकेशन. २-३ किमी चा बीच आहे. साई बाबा मंदिर आहे. वलसाड मध्ये जेवण चांगले मिळेल आणि कपडे छान स्वस्त मिळतात (अर्थात बस आणि रेल्वे स्टेशन पासून दूर गेलात तरच)
(वलसाड मधून थेट मुंबई किंवा पुणे साठी ट्रेन मिळेल त्यामुळे दमण मधून चेक आऊट करून वलसाड केले तरी चालेल)

इतर ठिकाणे: अतुल, आनंद (गावाची नवे आहेत हो), Atul, Anand, Umbergaon Beach, Vrindavan Studio हि नवे अशीच शोधा
जवळची मोठी गावे (Railway Station) : Vapi, Valsad, Surat, Dahanu (रोड)

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...