प्राप्य ऐतिहासिक साधनानुसार बडोद्याचा इतिहास २००० वर्षापर्यंत मागे नेता येतो, अंकोटक (सध्याचे अकोटा ) ह्याच्या पूर्वेला असलेली हि मुळात व्यापारी लोकांनी वसवलेली छोटीशी वसाहत. आजूबाजूला वडाची भरपूर झाडे असल्याने नाव पडले वटपत्रक!! कालांतराने ह्या नावात वटपत्रक- वतपत्तन - वटोदर- बडोदे- वडोदरा असे बदल होऊन आजचे वडोदरा अस्तित्वात आले . वडोदरा हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ वटवृक्ष होतो.राजपुत राजानंतर राजा चंदन याने वडोदरा जिंकून घेतले. सुरवातील जैन शासकांनी याचे नाव चंदनवती ठेवले मात्र नंतर वडोदरा असे केले गेले. दहाव्या शतकात गुप्त आणि चालुक्य राजवटींच्या भाग असलेल्या बडोद्यावर काही काळ सोळंकी राजे आणि त्यानंतर मोगलांनी प्रदीर्घ काळ शासन केले, या राजवटींच्या खुणा आजही बडोद्यात ठिकठिकाणी दिसू शकतात. १६व्या व १७व्या शतकांमध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली मराठ्यांना येथून मुघलांना हुसकावून लावण्यात यश आले. १७२१ साली येथे गायकवाड घराण्याने बडोदा संस्थान स्थापन केले.आता याच बडोदे संस्थानाविषयी जाणून घेउया.
Ⓘ बडोदा संस्थान
बडोद्याचा कायापालट करणारे पुण्यश्लोक श्रीमंत महाराजा सयाजी राव गायकवाड तिसरे, यांचे एक स्वप्न होते की बडोदे शहर एक शैक्षणिक, औद्योगिक व व्यापारी केंद्र बनावे, आणि त्यांनी आपले स्वप्न सत्यात येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज अहमदाबाद आणि सूरत नंतर बडोदा हे पश्चिम भारतातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. वडोदरा हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे आणि राजधानी गांधीनगर येथून 139 कि.मी. (86 मैल) विश्वामित्री नदीच्या काठावर स्थित आहे.
-> लोक आणि संस्कृती
बडोदा भारतातील महानगरीय शहरांपैकी एक आहे.गायकवाड राजवटीत कला साहित्य स्थापत्य यांना मिळालेला उदार राजाश्रय आणि नंतरच्या काळातील औद्योगिकीकरण, शैक्षणिक विकास यामुळे बडोदा एक विकसनशील शहर बनले आहे . संपूर्ण जगभरातून तसेच देशातून विविध प्रकारचे लोक बडोद्याला नेहमी भेट देत असतात. येथे गुजराती, उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राबाहेर बहुसंख्य मराठी लोकवस्ती असणारे बडोदे हे बहुधा एकमेव शहर असावे.
समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा सांगणारे बडोदे , गुजराथ ची "संस्कार नगरी" म्हणून प्रसिद्ध आहे. दिवाळी, मकरसंक्रांती , होळी, गुढी पाडवा आणि गणेश चतुर्थी हे उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. संपूर्ण देशात नवरात्रातील गरबा नृत्यासाठी वडोदरा प्रसिद्ध आहे. मकरसंक्रांतीच्या पतंगबाजी आणि आतिषबाजीसाठी बडोदा प्रसिद्ध आहे ..
-> शिक्षण आणि साहित्य
शिक्षण आणि साहित्य दोन्हीमध्ये बडोद्याच्या लक्षणीय प्रगती केलेली आहे .”महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा” हे विद्यापीठ, गुजरातमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. विद्यापीठातील “हंसा मेहता वाचनालय” हे आशिया खंडातील सर्व विद्यापीठात सर्वात मोठे वाचनालय आहे. महाराष्ट्र शारदेची सेवा करणाऱ्या किती तरी साहित्यिकांचा संबंध बडोद्याशी आला आहे, राजकवी यशवंत , माधव ज्युलियन, ची वि जोशी, हि काही ठळक नावे.
साहित्य प्रेमी लोकांसाठी येथे वडोदरा मध्यवर्ती वाचनालय , जयसिंहराव वाचनालय , प्राच्यविद्या मंदिर या सारखी ठिकाणे आहेत.
-> कला आणि स्थापत्य
वडोदरा आपल्या कला आणि स्थापत्यासाठी देखील ओळखले जाते. गायकवाड राजवटीत कला साहित्य स्थापत्य यांस उदार राजाश्रय मिळाल्याने बडोद्यास “ कला नगरी' असेही म्हटले जाते..प्रेक्षणीय स्थळांमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदा संग्रहालय आणि चित्र गॅलरी, सयाजी बाग ,महाराजा सयाजीराव विद्यापीठ, कीर्ती मंदिर, किर्ती स्तम्भ, न्याय मंदिर, खंडेराव बाजार, अरबिंदो आश्रम, ईएमई मंदिर (दक्षिणामूर्ती मंदिर), हजिरा मकबरा, काळा घोडा, मैराळ गणपती मंदिर, भद्र कचेरी, चार दरवाजा, सुरसागर तलाव, इत्यादी ऐतिहासिक स्थळे आहेत.
कला रसिकांसाठी प्रख्यात म्युजिक कॉलेज, फाईन आर्ट्स कॉलेज इत्यादी आवर्जून भेट देण्यासारख्या संस्था आहेत.
-> उद्योग आणि अर्थव्यवस्था
पश्चिम भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र हे या शहराचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक महत्त्व आहे. प्रमुख उद्योगांमध्ये पेट्रोकेमिकल्स, अभियांत्रिकी, रसायने, औषधी, प्लास्टिक, आयटी आणि विदेशी विनिमय सेवा यांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांबरोबरच खाजगी क्षेत्रातील इतर मोठ्या प्रमाणावरील उद्योगांची संख्या पण वाढली आहे. विविध प्रकारच्या बँकिंग तसेच आर्थिक सेवा पुरविणाऱ्या अनेक संस्था बडोद्यात कार्यरत आहे.
-> वाहतूक


वडोदरा शहराचे पर्यटन करण्यासाठी सर्वात योग्य कालावधी हिवाळा ऋतु हाच आहे.इथे थंडी सुखद असते.तापमान साधारण १६ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते.याशिवाय ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी फिरण्यासाठी योग्य मानता येईल.याच काळात येणारे पर्यटक इथल्या नवरात्र उत्सवात सहभागी होउ शकतात.मात्र उन्हाळ्यात वडोदर्याला येण्याचा चुकूनही विचार करु नका.त्याकाळात इथले तापमान जवळपास ४२ अंश डिग्री से.असते.





लक्ष्मी विलास पॅलेस :-




प्रताप विलास पॅलेस :-


मकरपुरा पॅलेस :-
उन्हाळ्याच्या कालावधीत राजपरिवाराला रहाण्यासाठी मकरपुरा पॅलेसची उभारणी करण्यात आली. इ.स. १८७० मध्ये याची उभारणी करण्यात आली.महाराजा खंडेराव यांनी याची उभारणी केली.याच्या वास्तुरचतेन इटालियन शैली वापरण्यात आली.सुरवातीला बडोद्याचे राजघराणे उष्माकाळात तामिलनाडुतील निलगिरी पर्वतावर असलेल्या निवासस्थानात रहायला जात असल्यामुळे याचा फार वापर होत नव्हता.,मात्र या वास्तुची पुढे पुर्निमिती केली गेली.सध्या मात्र या महालाचा वापर भारतीय वायु सेनेकडून प्रक्षिशण शाळा म्हणून केला जातो. याला १७ टेट्रा स्कुल असे सध्या म्हणले जाते.सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा पॅलेस पर्यटकांसाठी खुला असतो.
महाराजा फतेहसिंह संग्रहालय:-
राजघराण्यातील मुलांसाठी शाळा म्हणूनच या राजवाड्याची निर्मिती करण्यात आली. सध्या इथे महाराज फत्तेसिंग यांच्या संग्रहातील वस्तुंचे प्रदर्शन आहे.यामध्ये शाही परिवाराची चित्र, हिंदु पुराणकथांवर आधारीत चित्र आणि संगमरवर व काश्यात बनवलेल्या मुर्तींचा खजिना आहे.
वडोदरा म्यूझियम आणि आर्ट गॅलेरी :-
वडोदरा संग्रहालयाच्या वेळा:-
सोमवार – शुक्रवार: सकाळी 9.30 – संध्याकाळी 6.00
शनिवार – रविवार: सकाळी 9.30 – संध्याकाळी 6.00
इथे भारतीय नागरिकांसाठी प्रवेश फि १०/- तर परदेशी नागरिकांसाठी प्रवेश फि - २००/- आहे.


सयाजी गार्डन, वडोदरा
ईएमई मंदिर



मंदीर रविवारी बंद असते.आठवड्यातील इतर दिवशी सकाळी ६.३० ते संध्याकाळी ८.३० पर्यंत सर्वांसाठी खुले असते.
पत्ता: एनआर। ईएमई मंदिर, फतेहगंज, गुजरात 390002
लाल बाग

सूर्य नारायण मंदिर, वडोदरा

श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर
कीर्ति मंदिर :-
पत्ता :-कीर्ति मंदिर, कोठी रोड, डाक बंगला, सयाजीगंज, वडोदरा, गुजरात 390001
वेळ :- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
काशी विश्वनाथ महादेव मंदिर :-
पत्ता :-जवाहर लाल नेहरू मार्ग, नवापुरा, वडोदरा, गुजरात 390001

तपोवन मंदिर :-

कायवरोहन मंदिर :-

धुंडीराज गणपति मंदिर:-

अरबिंदो आश्रम :-

सुर सागर झील, वडोदरा
वडोदरा शहराच्या मध्यभागी सुरसागर हा कृत्रिम तलाव हे शहरातील एक प्रमुख आकर्षण आहे.हा पुर्ण वर्षभर पाण्याने भरलेला असतो.पर्यटकांसाठी इथे नौकानयनाची व्यवस्था केलेली असते.गणेश चतुर्थीला याच तलावात गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन केले जाते. परिसरात रमणीय हिरवळ आणि वनराई आहे.तलावाच्या शांत वातावरणात हरवून जायला होते. तलावाच्या मधोमध भगवान शंकराची १२० फुट उंच मुर्ती आहे.
महाराजा सयाजीराव विद्यापीठ :-
गुजरातमधील बडोदा येथील एक विद्यापीठ. १८८१ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड (१८६३−१९३९) यांनी बडोदा महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचेच पुढे १९४९ साली विद्यापीठात रूपांतर झाले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठास त्यांचे नाव देण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप एकात्म व निवासी असून विद्यापीठ-परिसर ८०४ चौ.किमी. पर्यंत पसरला आहे. कला, विज्ञान, विधी, शिक्षण आणि मानसशास्त्र, वैद्यक, वाणिज्य तसेच तंत्रविद्या व अभियांत्रिकी या विद्याशाखांस शासकीय मान्यता लाभली असून ललित कला, गृहविज्ञान आणि समाजकार्य या तीन विद्याशाखा नंतर नव्याने उघडण्यात आल्या. विद्यापीठात बडोदा संस्कृत महाविद्यालय; भारतीय संगीत, नृत्य व नाट्यकला महाविद्यालय तसेच इतर सात संस्था आहेत. विद्यापीठाच्या शिक्षण व मानसशास्त्र या विद्याशाखेत विस्तार अध्ययनकेंद्राची सोय असून तेथे संशोधन कार्य, शोधनिबंधाचे प्रकाशन व चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तुत विद्याशाखेस मान्यता दिली आहे.
काळा घोडा
न्याय मंदिर :-
सुरवातीला हि वास्तु भाजीमंडई म्हणून बांधली होती. वडोदर्याचे महाराज सयाजीराव तिसरे यांनी आपल्या धर्मपत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ हि वास्तु उभारली. याचे आरेखन रॉबर्ट चिशोल्मने केले. हि वास्तु उभारताना इथे मंडई बांधावी अशी कल्पना असली तरी बांधकाम पुर्ण होताना याचा उपयोग टाउन हॉल म्हणून व्हावा अशी कल्पना पुढे आली. नंतर ३० नोव्हेंबर १८९६ ला व्हॉइसरॉय लॉर्ड एल्गिन याच्या हस्ते या इमारतीचे रुपांतर न्यायमंदीरात झाले.दोन मजली आणि ६००० स्क्वेअर फुट जागेत पसरलेली या वास्तुला उभारण्यासाठी ७ लाख रुपये खर्च झाले.मधोमध मोझाईल टाईल्स लावलेले प्रशस्त सभागृह तसेच महाराणी चिमणाबाई ज्या सयाजीरावांच्या पत्नी होत्या,त्यांचा पुतळा आहे.
पत्ता :- राष्ट्रीय महामार्ग ८, G.N.F.C कॉर्नर, झाडेश्वर्,भडोच ,गुजरात, 392011
नीलकंठ धाम मंदिर :-

गुजरातची सांस्कृतिक राजधानी असणार्या वडोदरा शहरात अनेक मंदीर आहेत.पण या सर्वांमध्ये नीलकंठधाम हे एक खर्या अर्थाने वेगळे मंदीर आहे.भडोच शहरापासून ८० कि.मी. तर वडोदर्यापासून ६० कि.मी.वर असलेल्या पॉईचा गावात विस्तृत आवारात पसरलेले हे नीळकंठ मंदीर स्वामीनारायण गुरुकुल ,राजकोट यांनी निर्माण केलेले आहे.भगवान स्वामीनारायण यांना समर्पित केलेले हे मंदीर नर्मदा नदीच्या किनार्यावर आहे.मंदीरावर उत्कृष्ट दर्जाची शिल्पकला आहे.प्रचंड परिसरात पसरलेल्या मंदीरात भव्य शिल्पांच्या माध्यमातून पौराणिक कथा दाखवल्या आहेत.या मंदीर परिसरात रहाण्याची सोय देखील आहे.जगभरातून पर्यटक या मंदीराला भेट देतात.
पत्ता : नीलकंठधाम रोड, पोइचा, गुजरात 393145
वेळ : सकाळी ९.३० ते संध्याकाळी ८.३०

कुबेर भंडारी शिव मंदिर :-

जारवानी धबधबा :-
हाथनी धबधबा :-
पावागडपासून ३० कि.मी.वर हा धबधबा गर्द जंगलाने वेढलेला आहे.इथे अनेक वनस्पती व प्राणी पहायला मिळतात. हा परिसर सर्व वयोगटातील पर्यटकांना आवडतो. मात्र तरुणवर्ग इथे मोठ्या प्रमाणात येतो. या धबधब्याचे नाव हथनी पडण्यामागे एक कथा आहे.ती अशी, खुप वर्षापुर्वी इथे रहाणार्या आदिवासी लोकांनी हत्तीच्या पिल्लाच्या आकाराची एक शिळा या परिसरात पाहिली.आजही आपण या धबधब्याच्या परिसरात गेलो तर फुले आणि कापड अर्पण केलेली हि शिळा पाहु शकतो. इथल्या आदिवासींची हथनी माता हि प्रमुख देवता आहे.यामुळेच या धबधब्याला हथनी धबधबा असे नाव पडले.
कड़िया डूंगर लेणी :-
भडोचजवळ असलेल्या हि लेणी इ.स.पहिल्या आणि दुसर्या शतकात कोरलेली आहेत असे मानले जाते.या लेणी समुहात सात विहार आणि एक स्तुप आहे.इथे सिंहप्रतिमा असलेला स्तंभ आहे.
अजवा निमेता डॅम गार्डन :-
वडोदरा शहराजवळ वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उभारलेल्या आणि १३० एकर परिसरात पसरलेल्या या बागेचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे.इथे संध्याकाळी असणारा लाईट आणि साउंड शो आवर्जून बघावा असाच आहे.म्युझीकल फाउंटन हे इथले मुख्य आकर्षण.
शाही सूरत
सुरत.... सूरत जिल्ह्यातील एक मुख्य शहर. भारतातील गुजरात जवळील तापी नदीच्या किनार्यावर निवांतपणे वसलेले हे एक समृद्ध शहर..... हें शहर तापी नदीच्या दक्षिण तीरावर असून समुद्रापासून जलमार्गानें साधारण २५ किमी व खुष्कीच्या मार्गानें साधारण २० किमी अंतरावर आहे. मुंबईवरून सूरत साधारण २७० किमी, तसेच गुजरातच्या राजधानीपासून म्हणजेच गांधीनगर पासून सुमारे २८५ किमी, अहमदाबादपासून २९० किमी अंतरावर आहे.
तापी नदी, सूरत
कोणे एके काळीं सूरत हें हिंदुस्थानांतील व्यापाराचें मुख्य ठिकाण असून येथे आजही बर्याच मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. सूरत शहर हे येथील जेवणासाठी, कपड्यांसाठी आणि उत्तम प्रतीच्या हीर्यांसाठी (सॉलिटेर) आजही खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की जगातील ९०% कच्च्या हीर्यांना येथे पैलू पाडले जातात, तसेच यांना उत्तमरित्या पॉलिश केले जाते. अमेरिकेतली मोठ्या शहरांतील १० पैकी ९ हीरे सुरतेवरूनच पॉलिश करवून नेले जातात. हीर्यांना पॉलिश करणारा मुख्य कारखाना सुरतेतील वराछा आणि कटारग्राम येथे असून, सूरत हे संपूर्ण दुनियेतील सर्वात मोठे हीर्यांचे व्यापारी शहर आहे. हीर्यांप्रमाणेच येथील सूती, रेशमी, किमख्वाबाचे कापड (किनखापाचे कापड, एक प्रकारचे जरतारी वस्त्र ), तसेच सोन्याचांदीच्या वैविध्यपूर्ण वस्तूंसाठी खूप प्रसिद्ध आहे, म्हणूनच सुरतेला ‘सिल्क सिटी’ तसेच ‘डायमंड सिटी’ म्हणून सुद्धा ओळखले जाते
सुरतेचे वर्णन सर्वात आधी महाभारतात सापडते.. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण मथुरेवरून द्वारकेला जात होते, त्यासुमारास विश्रांतीसाठी ते इथल्या रमणीय स्थानी विसावले होते, असा उल्लेख ‘महाभारत’, तथा ‘सारथी सर्वांचा’ ह्या दोन्ही पुस्तकात केलेले आढळतो. तापी नदी ज्या ठिकाणी समुद्रात विसावण्यासाठी अचानकच पश्चिमेच्या दिशेने वळते, त्याच वळणावर सूरत वसलेले आहे. हिंदुस्थानातील ज्या ठिकाणांशी यूरोपियन लोकांचा सर्वात आधी संबंध आला, त्यातील एक ठिकाण म्हणजे सूरत. टॉलेमी ( इ. स. १५०) या प्रसिद्ध ग्रीक भूगोलतज्ञानें, पुलिपुल (म्हणजे कदाचित् सुरत शहरांतील फुलपाद हा पवित्र भाग असावा) या व्यापारी ठाण्याविषयी लिहिलेलें आहे. तेराव्या शतकांत, कुतुबुद्दीनने अन्हिलवाड़चा रजपूत राजा भीमदेव याचा पराभव करून रांदेड व सुरत गावापर्यंत चाल केली असें मुसुलमान इतिहासकार लिहितात. १३४७ मध्ये, महंमद बिन तुघलखाच्या कारकीर्दीमध्यें गुजराथेंत बंड झालें असतां राजपूतांच्या सैन्यानें सुरत शहर लुटून नेलें. भिल्लांपासून संरक्षण करण्याकरितां फेरोझ तुघलखानानें येथें १३७३ मध्ये किल्ला बांधला.
अर्वाचीन सुरत शहराच्या स्थापनेबाबतीत काही दंतकथा आहेत... ११व्या शतकात शहराचे नाव ‘सूर्यपुर’ (भगवान सूर्याचे शहर ) होते. त्यानंतर १२व्या शतकात सुरतेत पारसी लोक येऊन राहू लागले. त्यांनंतर कुतुबुद्दीन ऐबकने हल्ला केल्यावर हे सूरत शहर पश्चिमी चालुक्य साम्राज्याचा एक भाग झाले. १५ शतकात सुरतेतील शाही राजवटीत गोपी नावाचा एक सरदार होता, त्याने १५व्या शतकाच्या सुरूवातीला ब्राम्हणाद्वारे विविवत पूजा करून पुन्हा ह्या शहराची रचना केली आणि कालांतराने त्यांत आवश्यकतेनुसार अनेक सुधारणा केल्या. कालांतराने १५१२ ते १५३१ या सालांत पोर्तुगिज लोकांनीं हें सूर्यपुर शहर जाळून त्याचे खूप नुकसान केले, त्यावर कबजा करण्याचा प्रयत्न केला, १५१३ मध्ये इथे आलेल्या पोर्तुगिज व्यापारी ‘ड्युरटे बार्बारोस’ याने लिहून ठेवलेल्या नोंदीनुसार त्याकाळी सुरतेला अतिशय समृद्ध आणि महत्वाचे बंदर बांधलेले होते, जिथे जगाच्या कानाकोपर्यातून अनेक जहाजे येत – जात असत. सुरतेच्या राजाकडे मोठ्या प्रमाणात कमाई करणारे एक अतिशय महत्वाचे बंदर तसेच ह्या बंदरात व्यापार्यांनिमित्त देशभरातून येणारी जहाजे, याचा पोर्तुगीज सत्ताधीशांना लोभ असावा, आणि म्हणूनच त्यांनी सूरत शहराला अनेक वेळेस जाळले असल्याचे म्हटले जाते.
सुरतेचा किल्ला
सूरत येथील जुना किल्ला १५२० पर्यंत या शहराला ‘सूरत’ म्हणून चांगल्या प्रकारे ओळखले जाऊ लागले होते. पुढे सुमारें १५५६पर्यंत अहमदाबादच्या राजांनीं येथील जुना किल्ला चांगला मजबूत केला. अहमदाबादचा राजा सुलतान महमुद शाह तिसरा (१५३८ – १५५४), जो सूरतच्या वारंवार विनाशाने फारच नाराज होता, त्याने एक अतिशय मजबूत किल्ला बांधण्याचे आदेश दिले आणि त्याने किल्ला बांधायचे काम सैन्यातील एका तुर्की माणसाकडे सुपूर्द केले, त्यांना मोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदी देण्यात आल्या आणि त्यांना एक मजबूत किल्ला तयार करण्याची आणि बांधणी करण्याचे आदेश देण्यात आले. सुलतानाच्या मनाजोगता भक्कम किल्ला बांधलेला पाहून त्याने त्या तुर्की माणसाला भरपूर बक्षिशी दिली आणि त्याचे नाव बदलले. सुरतेच्या किल्ला बांधणार्या तुर्की माणसाचे आता नाव झाले ‘खुदावंतखान’.... सूरत कॅसल, किंवा सूरत किल्ला ही इमारत म्हणजे १६व्या शतकाची रचना आहे.




सूरत कॅसल
सूरत कॅसल दरवाजा १५७३मध्ये मुघल सम्राट अकबरानें हे सूरत शहर काबीज केलें;
व तेव्हांपासून सुरत शहर व जिल्हा पुढे १६० वर्षेपर्यंत मोंगलांच्या
ताब्यांत होता. १६व्या शतकाच्या अंतापर्यंत सुरतलगतच्या समुद्रांत,
सुमुद्रामार्गे होणार्या व्यापारावर पोर्तुगीज लोकांचें पूर्णपणें वर्चस्व
स्थापन होऊन त्यांना कोणीच प्रतिस्पर्धी उरला नव्हता.


पुढे १६१२ मध्ये गुजराथच्या सुभेदारानें इंग्रज व्यापार्यांशी तह करून त्यांना सुरत, खंबायत, गोध्रा व अहमदाबाद येथें व्यापार करण्याची परवानगी दिली. त्यानंतर इंग्रज व्यापार्यांनी पोर्तुगीज लोकांचा पराभव करून, बादशहाकडून लवकरच फर्मान मिळविलें व हिंदुस्थानांत आपली पहिली वखार स्थापन केली. डच लोकांनीही सुरतमध्यें वसाहत करून, तेथें वखार घालण्याची परवानगी मिळविली.


सुरतेत कीम व तापी याखेरीज जिल्ह्यांत दुसर्या मोठ्या नद्या नाहीत; परंतु दक्षिणेकडे खोल व होड्या चालण्यायोग्य खाड्या असून जिल्ह्यांतील माल बाहेर पाठविण्याकरिता व किनार्यानेच जाणार्या लहान लहान होड्यांना आश्रय घेण्याकरिता त्यांचा फार उपयोग होतो. सीन, तेन, व कनई या मुख्य खाड्या होत. सर्व जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणांत खजुराचीं झाडें आढळतात; व गावांत आंबा, चिंच, वड, पिंपळ वगैरे फळें व छाया देणारी झाडें सामान्यपणें दृष्टीस पडतात. सुरतेच्या आंब्यांचा स्वाद व गोडी हीं मुंबईच्या हापूस किंवा पायरीच्या आंब्यासारखीं असतात. सुरतच्या जंगलांत वाघ, चित्ते, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, तरस, हरिण, काळवीट वगैरे रानटी श्वापदें आहेत.
मध्ययुगीन काळात सूरतची ओळख पटविण्याच्या संदर्भात विभिन्न इतिहासकारांनी अनेक मते व्यक्त केली असली तरी, सर्व ऐतिहासिक गोष्टींमध्ये सूरत जागतिक व्यापारांच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण बंदरांपैकी एक म्हणून उभे आहे. सुरतेच्या राजाकडे मोठ्या प्रमाणात कमाई करून देणारे एक अतिशय महत्वाचे बंदर म्हणून सूरतच्या बंदराची ख्याती होती. पूर्वी सुरतची किनखाब प्रसिद्ध होती; व सुरतेस जाडें भरडे रंगीत, सुती कापड आणि भडोच येथें मलमल होत असे. आफ्रिकेंतून गेंड्याचें कातडें आणून सुरत येथें त्याच्या सुंदर ढाली तयार केल्या जात. एके काळीं, येथें जहाजें बांधण्याचें काम पारशी लोक करीत असत. हल्लीं सुती व रेशमी कापड विणणें हाच जिल्ह्यांतील मुख्य उद्योग-धंदा आहे. सुरत शहरीं गिरण्या आहेत. रेशमी किनखाबीचें व कशिद्याचें काम अद्यापही या शहरीं होत असतें. या जिल्ह्यांत एक मिठागर आहे. धान्य, कापूस, मोडाचीं फुलें, इमारती लाकूड व बांबू हे मुख्य निर्गत जिन्नस असून तंबाखू, सरकी, लोखंड, नारळ व विलायती कापड हे मुख्य आयात केले जाणारे जिन्नस आहेत.
पारशी अग्यारी, सुरत
निरनिराळ्या राजांच्या अमलाखालील इतिहास जिल्ह्याच्या वर्णनांत दिला आहे. मोंगलकालीन सुरत शहरांत लोकवस्ती बरीच असून संपत्तीही पुष्कळ होती व घरें सुंदर असून व्यापार बराच मोठा होता, असें जुने प्रवासी वर्णन करतात. इंग्रज व डच यांच्या वसाहतींपासून औरंगजेब गादीवर बसेपर्यंतचा काळ तर फारच भरभराटीचा गेला. संपत्तीबरोबर शहराच्या शोभिवंतपणातही भर पडली. हिंवाळ्यांत, कामाच्या हंगामाच्या वेळीं बाहेरून बरेच लोक गांवांत आल्यामुळे सर्वांनां रहावयास पुरेशी जागा मिळणें कठिण पडत असे. सुरत आणि गोवळकोंडें, आग्रा, दिल्ली व लाहोर यांच्या दरम्यान उंटांचे तांडे जात येत असत. कोंकण व मलबार किनार्यावरून जहाजें येत, यूरोपियन व्यापाराखेरीज अरबस्थान, इराणचें आखात, सिलोन व सुमात्रा येथूनहि व्यापारी येत असत. सुती व रेशमी कापड मुख्यतः बाहेर पाठविलें जाई. यूरोपियन लोक आपल्या सर्व मालाची चढउतार सुरत येथें न करतां फक्त कांहीं माल उतरून येथून नीळ व दुसरे जिन्नस बरोबर घेऊन जात व निळीखेरीज सर्व माल सुमात्रा, जावा, वगैरे बेटांत उतरून तेथून मसाल्याचे जिन्नस यूरोपांत नेत. डच लोकांची हिंदुस्थानांतील मुख्य वखार सुरत येथें होती, व फ्रेंचांनींहि तेथें रहाण्यास सुरवात केली होती. खंबायतच्या आखातांत सांचलेला गाळ, उत्तर गुजराथेंतील अस्वस्थता, व मस्कतच्या अरबांनीं दीवचा केलेला नाश, या कारणांमुळें सर्व प्रांतांचा व्यापार सुरत शहरीं एकवटला होता. शिवाय तें ''मक्केचें द्वार'' असल्यामुळें त्याचें महत्त्व बरेंच वाढलें होतें.
पत्ता-तापी नदीच्या किनार्यावर
प्रवेश फि :-मोफत
सूरत बंदर
मराठ्यांच्या उत्कर्षाबरोबर येथील भरभराटीला कांहीं काळपर्यंत आळा बसला. सुरतवर मराठ्यांचा पहिला हल्ला १६६४ त झाला. त्यावेळीं शिवाजी महाराजांनी तीन दिवसपर्यंत शहर लुटून सुमारें १ कोट रुपये नेले. मराठ्यांशीं गोडीगुलाबीनें राहून यूरोपियन लोक आपलें नुकसान होऊं देत नसत. १६६९ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतवर दुसरी स्वारी केली व पुन्हां शहर लुटलें. तथापि सतराव्या शतकाच्या अखेरच्या धामधुमीच्या काळांत सुरत शहराची भरभराट परमावधीस पोंचली होती. जगांतील सर्व व्यापारी राष्ट्रें येथें व्यापार करीत होतीं. हिंदी महासागरांतून जाणारें कोणतेंहि व्यापारी जहाज सुरतेस माल विकत घेतल्याशिवाय, विकल्याशिवाय अथवा भरल्याशिवाय सहसा जात नसे. परंतु औरंगझेबाच्या कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षांत, अंशतः मुंबईचें महत्त्व वाढूं लागल्यामुळें व अंशतः खुद्द सुरतेस अव्यवस्था माजल्यामुळें या शहराचें महत्त्व इंग्रजांच्या दृष्टीनें बरेंच कमी झालें होते. म्हणून १६८७ त त्यांनीं आपलें व्यापारी ठाणें मुंबईस नेलें.

सुरतेतील खजीना
सूरत शहराला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. मुगल राजवटीदरम्यान मुस्लिमांना तीर्थक्षेत्र म्हणून हे शहर ‘मक्का प्रवेशद्वार’ म्हणून वापरण्यात आले. पोर्तुगीजांनी शहरांचे नियंत्रण राखण्याच्या प्रयत्नात शहराचा नाश केला आणि ईस्ट इंडिया कंपनीने ते व्यापार केंद्र म्हणून वापरले. या ऐतिहासिक शहराला बर्याच अडथळ्यांना तोंड द्यावे लागले आहे आणि तरीही गुजरात राज्यातील व्यापाराचे केंद्र म्हणून आणि जागतिक डायमंड सेंटर म्हणून उभं राहिलं आहे.
सद्यस्थितीत मात्र सुरतेच्या किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे, पर्यटकांना किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी नाही. बाहेर जर नशिबाने कोणी किल्ल्याविषयी मनोभावे माहिती देणारे भेटलेच ( जे भरपूर कठीण आहे ), तर किल्ल्याची थोडीफार माहिती मिळते. किल्ल्याच्या आत बघण्यासारखे आता काहीच उरलेले नाही..... किल्ल्याचे महाद्वार म्हणजे मुतारी बनलेली आहे.... जर किल्ल्याच्या कोपर्यावर पोलिसांचा पहारा नसेल, तर तापी नदीच्या दिशेने म्हणजे किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याचे फोटो काढता येतात, पण बघायला काहीच मिळत नाही. काही दिवसापूर्वी मात्र, सुरतची महानगर पालिका, आता ह्या किल्ल्याला पुन्हा पूर्वेचे रूप देणार आहे, अशी बातमी वाचली होती.....
तापी नदी ,सुरत













गुजरातमधलं एकमेव हिल स्टेशन सापुतारा
भारत हा परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक लोकं देवावर श्रद्धा ठेवतात त्याचप्रमाणे काही लोकं निसर्गावरही प्रेम करतात. निसर्गातील झाडं, प्राणी यांना ते देव मानतात. यांपैकी अनेक ठिकाणी प्राण्यांची पूजा करण्यात येते. आज आपण जाणून घेऊयात अशा एका ठिकाणाबाबत जे आपल्या सौंदर्यासोबतच तेथील परंपरा आणि प्रथांसाठीही ओळखले जातं. हे ठिकाण भारतातीलगुजरात राज्यामध्ये स्थित असून तेथील हिल्स स्टेशनपैकी एक आहे. सापुतारा हिल्स हे गुजरातमधील असं ठिकाण आहे. जिथे नागाला देव मानल जातं. दरवर्षी लाखो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.
निखरे यौवन सा यह ज्वारा
नाम है इसका सापुतारा ।
अपनी डगमगसे इतराता
‘भु’ को यु दिठीनी दिखलाता
मानो नि:शेष रमणीयतासे
प्रकृतिने इसका रुप संवारा ॥ ”
अरे... हो... आश्चर्य वाटले ना ! पण ही कोणा प्रेयसीवर लिहिलेली कविता नाही. ही कविता आहे एका नयनरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणजे सापुतारावर खुश होऊन लिहिलेली एका निसर्गप्रेमी कवीची कविता आहे. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर पर्वतांमध्ये वसलेल्या सापुताराला गुजरातचे रत्नजडित मुकूट किंवा ‘क्राऊनिंग ग्लोरी’ ची उपमा दिली तरी त्यात अतिशयोक्ती नाही.
दोन्ही बाजूंनी दाट जंगलांमधून चाललेल्या बसमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेत आपण सापुतारा येथे पोहोचतो. सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्ता असा आहे.
साप - उतार, म्हणजेच सापाचे निवासस्थान. वृद्धलोक येथील इतिहास सांगताना म्हणतात की, प्राचीन काळात येथे सर्पगंगानदी वाहत होती. ज्याला बांध घालून तळे बांधण्यात आले. उत्सवाच्या दिवशी अद्यापही आदिवासी लोक या तळ्यावर येऊन सापाची पूजा करतात.
डांगी लोकनृत्याने येथील लोक सणांची रंगत वाढवतात व त्यांची नृत्यकला जिवंत ठेवतात. पर्यटकांची शहरी संस्कृतीने उबलेली मनं आणि शरिराचा थकवा दूर करण्याचे पूर्ण सामर्थ्य सापुताऱ्यामध्ये आहे. नाशिकपासून 80 कि.मी. अंतरावर व मुंबईपासून 250 कि.मी.वर महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्यादी पर्वताच्या रांगांमध्ये सापुतारा समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर आहे.प्रत्येक ऋतुत सापुतारा तितकंच मनमोहन रूप धारण करतं. सनसेट पॉइण्टपासून ते रोझ गार्डनपर्यंत अनेक पॉइण्टस् इथे आहेत. तसंच सापुतार्याहून जवळपास असलेली इतर काही ठिकाणंही पर्यटकांना भावतील अशी आहेत. गुजरातचं एकमेव आणि प्रसिद्ध हिलस्टेशन म्हणजे सापुतारा. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि उत्तम पॅनोरॅमिक व्हू साइट्स असल्याने वर्षभरात पर्यटक तिथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात. उन्हाळा असो, थंडीचे दिवस असो किंवा अगदी पावसाळा, प्रत्येक सीझनमध्ये पर्यटकांना इथलं वाइल्ड लाइफही प्रसिद्ध आहे. द्राक्षं-स्ट्रॉबेरीची शेती असल्याने ही फळं इथे उत्तम मिळतात. बांबूपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करायलाही तिथे एकच झुंबड उडते.
सापुताऱ्यात काय पहाल
सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी सनराईज व सनसेट पॉईंट ही दोन मुख्य आकर्षणं आहेत. सूर्योदय बघण्यासाठी सनराईज पॉईंटवर पहाटे उठून जावे लागते. येथून उगवत्या सूर्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय दिसते. तसेच संध्याकाळी सनसेटपॉईंटवर असंख्य पर्यटक गर्दी करतात.
काही मिनिटांतच सूर्य क्षितिजाला टेकतो आणि पर्यटकांचे कॅमेरे धडाधड चालू होतात. काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या फ्लॅशच्या लाईटमध्ये सूर्यास्त केव्हा होतो हे समजत नाही. सनसेटपॉईंटपासून समोरच्या डोंगरावर वैती हॉटेल असून या हॉटेलची दिमाखदार वास्तू चटकन नजरेत भरते.
या दोन्ही डोंगरांना जोडणारा रोप-वे या हॉटेलने बसविलेला आहे. हा रोप-वे म्हणजे दोन्ही टोकांना जोडणारी एक जाड लोखंडी दोरी असून या दोरीवर चार माणसं बसतील अशा छोट्या-छोट्या केबीन आहेत. या केबीनमध्ये बसून तरंगताना अनोखा अनुभव येतो.
केवळ चित्रपटांत पहावयास मिळणाऱ्या या रोप-वेमध्ये बसण्याचा अनुभव पर्यटकांना वैती हॉटेलने उपलब्ध करुन दिला आहे. हा रोप-वे सापुताऱ्याचे मुख्य आकर्षण आहे. गुजरात टुरिझमने येथे बोट क्लब चालू केला असून सापुताऱ्याच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या भव्य जलाशयात नौकाविहाराचा आनंद आपल्याला लुटता येतो. संथ पाण्यावर नौकेत बसून सफर करत आजूबाजूस सृष्टीसौंदर्य न्याहाळण्याचे सुख काही औरच असते.
याशिवाय स्टेपगार्डन, बॉटनिकल गार्डन, गुलाब उद्यान इत्याची बगीचे आहेत. सणावारास व सिझनमध्ये येथील आदिवासींचे नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतात. त्यासाठी खुले नाट्यगृह आहे. सापुताऱ्याच्या मध्यभागी म्युझियम असून अनेक दुर्मिळ वस्तू पहावयास मिळतात. सापाच्या काही जाती, अजगर वगैरे जिवंत प्राणी येथे असून त्यांची विविध प्रात्यक्षिके दाखविली जातात. मधमाश्या पाळण्याचे केंद्र येथे असून शुद्ध मध व मधाची चिक्की येथे विकत मिळते.
‘लॉगहट’ हे संपूर्ण लाकडात बांधलेले गेस्ट हाऊस उंच डोंगरावर असून वनविभागाच्या अखत्यारित आहे. तेथून संपूर्ण सापुताऱ्याचे विलोभनीय दर्शन घडते. याशिवाय नागेश्वर मंदिर, स्वामी नारायण मंदिर, इको पॉईंट, स्टेपगार्डन, मत्स्यालय, डांगव्हॅली, ऋतुंबरा विश्वविद्यालय, वनस्पती उद्यान इ. पर्यटनस्थळे सापुतारा येथे आहेत.
स्थळ दर्शनासाठी येथे खाजगी वाहने (कार,जीप इ.) भाड्याने उपलब्ध आहेत. सापुताऱ्याचं आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे टेबल लॅण्ड पॉईंट.
हा पॉईंट वैती रोप वे रिसॉर्टच्या वरती असून हे प्रचंड मोठे मैदान सापुताऱ्यात सर्वात उंच ठिकाणावर आहे. येथून सनसेट अतिशय सुरेख दिसतो. त्यामुळे दुपारनंतर या पॉईंटवर पर्यटकांची खूप गर्दी होते. येथे घोडेस्वारी, उंटसवारी, एटीव्ही कार्स, घोडागाडी इ. सुविधा पर्यटकांना आकर्षित करतात. विविध स्टॉल्स असल्याने एकप्रकारचा पिकनीक स्पॉट म्हणून हे स्थळ लोकप्रिय आहे.
सापुताऱ्याच्याजवळ ‘उन्हाई’ हे गरम पाण्याचे झरे असून याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ‘उन्हाई’ या गुजराथी शब्दाचा अर्थ मी स्नान केले असा असून राम, लक्ष्मण व सीतामाई वनवासाच्या काळात या जंगलात आले असता, येथील ऋषी व साधूंना कोडासारख्या त्वचारोगाची लागण झालेली त्यांना दिसली.
हा रोग नाहीसा करावा असे सीतामाईने रामास सांगितले. तेव्हा रामाने लक्ष्मणास एक बाण मारण्यास सांगितले. त्याने जेथे बाण मारला तेथे एक झरा उत्पन्न झाला. हा झरा गरम पाण्याचा होता. ह्या झऱ्यात ह्या तिघांनी स्नान केले नंतर त्या साधू व ऋषींना आंघोळ करण्यास सांगितले. तेथे स्नान केल्यावर सर्वांचा त्वचारोग नाहीसा झाला. अशी आख्यायिका आहे. या परिसरात कोणालाही त्वचेचा रोग होत नाही असे सांगतात.
ह्या झऱ्यातून बाराही महिने गरम पाणी येते व त्याचे तापमान 100 सें.ग्रे. इतके असते. सापुताऱ्यापासून जवळच 6 कि.मी. अंतरावर शिवाजी महाराजांनी बांधलेला हातगड किल्ला आहे. नाशिक मार्गे सापुताऱ्याला जाताना पन्नास कि.मी. अलीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचे स्थान लागते. या गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गडावर जाऊन देवीचे दर्शन घेता येते.
सापुतार्याहून 50 किलोमीटर्सवर असलेलं बोटॅनिकल गार्डन 24 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. या गार्डनमध्ये भारतभरातली 1400हून अधिक प्रकारच्या वेली आहेत. बांबूचेही अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. चायनीज बांबू, सोनेरी बांबू, बीअर बॉटल बांबू ही इथल्या खास बांबूंची काही उदाहरणं. सापुतारा-वाघाई रोडवर असलेला गिरा वॉटरफॉल अनुभवण्यासाठी जून ते नोव्हेंबर या काळात जायला हवं. त्याच्याजवळ असलेल्या आंबापाडा गावात बांबूच्या विविध वस्तू बनवण्याचं काम चालतं. सापुतार्याहून 70 किलोमीटर्सवर असलेल्या महल जंगलात वन्यजीवन अनुभवता येतं. वर्षातून ठराविक काळच जाता येऊ शकत असलेल्या या जंगलात जाण्यासाठी वनखात्याची विशेष परवानगी लागते. सापुतार्याहून 6 किलोमीटर्स अंतरावर नाशिक रोडवर असलेला हतगड किल्ला प्रसिद्ध आहे. वणीच्या सप्तश्रृंगी मंदिर इथून अवघ्या 50 किलोमीटर्स अंतरावर आहे.
कोठे रहाल
सापुतारा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी बजेट हॉटेल्सपासून थ्रीस्टार हॉटेलपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. विविध सुखसुविधांनीयुक्त हॉटेल्स व धर्मशाळा येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गुजरात टुरीझमद्वारा सापुतारा येथे तोरण व सह्याद्री ही हॉटेल उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वैती रिसॉर्ट, चित्रकुट, पतंग, लॉर्डस्, लेक व्ह्यू, शिल्पी, स्टार हॉलिेडे होम यासारखी अनेक खाजगी हॉटेल्स वाजवी दरात उपलब्ध आहेत.
होटल आनंदो, सापुतारा (Hotel Anando , Saputara)
मानस होमस्टे (Manas Homestay by Sky Stays)
होटल लेक व्यू (Hotel Lake View)
क्लब महिंद्रा हातगड (Club Mahindra Hatgad)
होटल कांसर पैलेस (Hotel Kansar Palace)
या पर्यटन केंद्रास जाण्यासाठी मुंबई, पुणे, शिर्डी, नाशिक, बलसाड, बिल्लीमोरा, सुरत येथून थेट बसेस आहेत. रेल्वेने येण्यासाठी नाशिकरोड (82 कि.मी.) व बिल्लीमोरा (112 कि.मी.) ही जवळची रेल्वे स्टेशन्स आहेत.
रेल्वे मार्गाने :-
सापुतार्याला थेट विमानसेवा नाही.मात्र १२० कि.मी.वर सुरत विमानतळ आहे,जिथून आपण सापुतार्याला येउ शकतो.शिवाय मुंबई एअरपोर्ट २५० कि.मी.वर आहे.
सापुताऱ्यास कधी जाल
सापुतारा हे जरी थंड हवेचे ठिकाण असले तरी येथील वातावरण संपूर्ण वर्षभर आल्हाददायक असते. म्हणून वर्षभरात केव्हाही येथे जाता येते. एप्रिल ते जुलै या दरम्यान पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त असते. होळी, रंगपंचमी, दिवाळी, नाताळ, संक्रांत इ. सणांना येथे खास उत्सव साजरे केले जातात.
पावसाळ्याचा सिझन तर सापुताऱ्यातील सर्वात नयनरम्य सिझन असतो. ढग, पाऊस व धुक्याचा अनोखा व अदभूत अनुभव तेथे पर्यटकांना अनुभवयास मिळतो.
काश्मिरसारखा अदभूत अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. याशिवाय ट्रेकिंगसाठी अनेक गड व किल्ले आहेत. म्हणून साहसी पर्यटनालाही येथे मोठा वाव आहे.
त्याच-त्याच पर्यटन स्थळांना भेटी देवून कंटाळलेल्या पर्यटकांना सापुतारा निश्चितच नवा अनुभव देईल.
सापुतारा' म्हणजे नागांचं निवासस्थान
सापुताराचा अर्थ आहे नागांचं निवास स्थान. सापुताराच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे नाग आढळून येतात. त्यांना पाहायला अनेक पर्यटक आणि सर्पमित्र सापुताराला भेट देतात. येथील सर्पगंगा नदीच्या किनाऱ्यावर एक मोठी सापाची प्रतिमा तयार करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात असतं सापुतारा मान्सुन फेस्टिव्हल
मान्सूनमध्ये सापुताराचं सौंदर्य आणखी बहरतं. येथे होणाऱ्या पावसामुळे सापुताराच्या सौंदर्यात भर पडते. या फेस्टिव्हलमध्ये तुम्ही गीत-संगीत, लोककला आणि अॅडव्हेंचर अॅक्टिव्हीटीचा आनंद घेऊ शकता.
90 टक्के आदिवासी
निसर्ग आणि हिरवळ यांमध्ये तुमचं मन रमत असले तर सापुतारा तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. डांग वनमध्ये असेलेल्या सापुतारामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये 90 टक्के लोकं ही आदिवासी आहेत.
पेंडल बोट ४ सिटर, ३००/-
६ सीटर ४५०/-
रो-जनरल बोट
रुपये ५० /- हाफ राउंड



![]() |
Gira water falls |
गिरा वॉटरफॉल :-
सापुतार्यापासून ५० कि.मी.दुर वाघाई कसब्यात ( आंबावाडा व्हिलेज ) इथे हा धबधबा आहे.वासंदा नॅशनल पार्क इथून केवळ ३ कि.मी. आहे.घनदाट जंगल आणि डोंगराने वेढलेल्या दरीत हा धबधबा आहे.पावसाळ्यात हा धबधबा एन भरात असतो.सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आपण या परिसराला भेट देउ शकतो.इथे वाहनाच्या पार्किंगची सोयही आहे आणि प्रति वाहन ५०/- रुपये भाडे द्यावे लागते.
![]() |
EcoSite camp ![]() |
पूर्णा वन्यजीव अभयारण्य सापुतारा :-
वेळः- सकाळी ६ ते संध्याकाळी ५
प्रवेश फि- 20 रूपये प्रति व्यक्ति
नागेश्वर महादेव मंदिर सापुतारा :-
वेळः- सकाळी ६ ते संध्याकाळी ६
प्रवेश शुल्कः- निशुल्क

इको पॉइंट - Eco point
सापुतार्याच्या मेन सर्कलपासून साधारण दिड कि.मी.वर एक मोठा डोंगर आहे.इथे खड्कांची नैसर्गिक रचना अशी आहे कि आपण मोठ्याने ओरडलो कि त्याचा प्रतिध्वनी आपल्याला एकु येतो. सहाजिकच इथे जो कोणी येतो तो ओरडून आपली हौस पुर्ण करतोच. सापुतार्याच्या सहलीत आपण हा एको पॉईंट, लुइसा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट या सर्व पॉईंटची सैर करु शकता.
वेळः सकाळी ९ ते संध्याकाळी ७
प्रवेश फि- मोफत







