उदयगिरी, खंडागिरी लेण्या :-
ओडिशा राज्याचाला पाचशे किलोमीटरचे समुद्रे किनारा लाभला असून अनेक सुंदर समुद्र किनारे आणि अनेक प्रेक्षणीय स्थळांकरिता जगभर प्रसिद्ध आहे. तसेच आशियातील सर्वात मोठे खार पाण्याचे तलाव 'चिलका तलाव' देखील या राज्यात आहे. याशिवाय प्राचीन, ऐतिहासिक आणि पवित्र जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिर असे प्रसिध्द पर्यटन स्थळ आहेत. त्याच सोबत ओडिशामध्ये अजून एक पर्यटन स्थळात उदयगिरी आणि खंडागिरीच्या लेण्या आहेत. निसर्गरम्य ओडिशा म्हटले की कोणार्क, जगन्नाथपुरी आणि भुवनेश्वरची मंदिरे डोळ्यासमोर येतात. परंतु याच ओडिशा म्हणजेच प्राचीन कलिंग देशात जैन धर्माचेसुद्धा अस्तित्व होते. त्याच्या पाऊलखुणा आपल्याला त्यांच्या लयनस्थापत्यातून म्हणजेच कोरीव लेणींमधून आजही दिसून येतात.
ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्येच जैन लेणींचा एक मोठा समूह आहे. उदयगिरी आणि खंडगिरी लेणी.उदयगिरी म्हणजे सुर्याचा उदय होणारी जागा तर खंडगिरी म्हणजे तुटलेली टेकडी. अतिशय सुंदर, देखण्या आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या लेणी आहेत. पर्यटकांसाठी तर हे एक सुंदर ठिकाण आहेच, परंतु अभ्यासकांसाठीसुद्धा हे महत्त्वाचे केंद्र आहे.भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक लेण्यांमध्ये यांचा समावेश होत असून हजारो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात.
उदयगिरी लेणी
उदयगिरी लेणी डोंगराच्या उजव्या बाजूला आहे. ही लेणी खंडागिरीपेक्षा सुंदर आणि उत्तम आहे. उदयगिरी लेणी जैन भिक्षूंच्या गुरूंचे निवासस्थान असायची. उदयगिरी लेणीमध्ये एकूण 18 लेण्या आहेत, त्यापैकी राणी गुंफा आणि बाजघर गुंफा सर्वात सुंदर परंतु पवित्र मानली जाते. याशिवाय छोटा हाथी गुंपा, अलकापुरी गुंढा, पणसा गुंपा आणि गणेश गुंफा आदी गुंफा प्रसिद्ध आहेत.
खंडागिरी लेणी
खंडागिरीची गुहा डोंगराच्या डाव्या बाजूला असून गुहेभोवती हिरवेगार वातावर आहे. हे वातावर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. खंडागिरी लेणीबद्दल असे म्हटले जाते की जैन धर्माचे शिष्य येथे राहत होते. खंडागिरी लेण्यामध्ये एकूण १५ गुंफा असून त्यामध्ये टाटोवा गुंपा, अनंत गुंपा, ध्यान गुंफा, अंबिका गुंपा आणि नव मुनी गुंफा आदी प्रमुख आहेत. या गुहेत 24 जैन तीर्थंकरांचे पुतळे देखील आहेत.
भेट देण्यासाठी ही आहे योग्य वेळ
इथे जाण्यासाठी तीन ते सहा संध्याकाळी उत्तम वेळ. पिकनिक स्पॅाटच होतो. NH 5 रस्त्यावर बरमन्डा चौकपाशी मोठा आंतरराज्य बस स्टँड आहे. तिथून दीड किमीवर खंडगिरी चौक सिग्नल लागेल. या आतल्या रस्त्यावर दोनशे मिटरसवर डावीकडे खंडगिरी आणि उजवीकडे उदयगिरी डोंगर आहे.
उदयगिरी, खंडागिरी लेणी परिसराचा नकाशा
भुवनेश्वर शहरापासून सुमारे सात कि.मी. अंतरावर टेकड्यांवर वसलेल्या या लेण्या आहे. भुवनेश्वरपासून ईशान्येकडे 95 किमी अंतरात असलेली उदयगिरी, रत्नागिरी आणि ललितगिरी हे बौद्धधर्मिय स्थळांचे संकुल "डायमंड ट्रँगल" बनले आहे.या सर्व एकाच दिवसात भेट देता येते.यातील ओडिशातील उदयगिरी हे सर्वात मोठे बौद्ध संकुल आहे.चला तर मग जाणून घेऊया प्राचिन लेण्यांबद्दल.
इतिहास :-
भुवनेश्वर शहराजवळच अस्तित्त्वात असलेल्या या लेण्यांचा इतिहास गुप्त काळापासूनचा आहे. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात इथे खारवेल या बलाढय़ सम्राटाची सत्ता होती. त्या खारवेलाचा इतिहास, त्याचे कर्तृत्व आणि त्याचे सामर्थ्य पल्याला इथे त्यानेच कोरून ठेवलेल्या शिलालेखातून समजून येते. हे शिलालेख म्हणजे तत्कालीन इतिहास आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करणारा एक चित्रपटच होऊन जातो. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात या शिलालेखांना म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
भुवनेश्वरला लागूनच उदयगिरी आणि खंडगिरी या जुळ्या टेकडय़ांवरील जैन लेणी ही यासाठीच महत्त्वाची ठरतात. ही लेणी मुख्यत्वे जैन मुनींच्या निवासासाठी, तसेच प्रार्थना आणि ध्यानधारणेसाठी खोदली गेल्याचे जाणवते. लेण्यांच्या दालनांच्या दरवाज्यावर तोरणे तसेच जैन शुभचिन्हे कोरलेली दिसतात. तसेच राजदरबारातील प्रसंग, राजाची विजयी मिरवणूक, शिकारीचे प्रसंग अशी काही कथन शिल्पे या दालनांच्या दरवाज्यांवर विपुल प्रमाणात कोरलेली आहेत. इथे या जुळ्या डोंगरांवर खोदलेली विविध वैशिष्टय़पूर्ण लेणी आणि या ठिकाणी असलेला तत्कालीन राजा खारवेल याचा शिलालेख या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिलालेखाची सुरुवात ‘नमो अरिहंतनं.. नमो सव सिधानं’ या जैन नमोकार मंत्रांनी केलेली आहे. १७ ओळींच्या ब्राह्मी लिपीमधील या शिलालेखात अनेक ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे.
सम्राट खारवेल आणि लेण्यांचा इतिहास –
इ.स.पूर्व दुसरे शतक (अंदाजे इ.स.पू १७४) हा सम्राट खारवेलाचा काळ समजला जातो. मगधच्या बलाढय़ मौर्य राजवंशाचा हा अवनतीचा काळ आहे. महाराष्ट्रात याच काळात सातवाहन राजवंशाचे राज्य होते. त्याच सुमारास ओडिशामध्ये चेदी राजवंश उदयाला आला. त्यांचे मूळस्थान चेदी जनपद म्हणजेच आताचे बुंदेलखंड हे होते. खारवेल हा याच राजवंशातला कर्तृत्ववान राजा. त्याला कलिंगचक्रवर्ती असे संबोधले जात असे.
शिलालेखात एक महत्त्वाची नोंद सापडते ती म्हणजे, पूर्वी मगध नरेश नंद याने कलिंगावर विजय मिळवून तिथली जिनमूर्ती विजयचिन्ह म्हणून मगधाला नेली होती. मगधावरील विजयानंतर खारवेलाने ती बृहस्पती मित्राकडून पुन्हा हस्तगत केली. आणि तिची कलिंगात पुन्हा प्रतिष्ठापना केली. भारतीय इतिहासात मूर्तीचा हा सर्वात प्राचीन प्रस्तरलेखीय पुरावा आहे. सम्राट अशोकाच्या कलिंग विजयानंतर प्रथमच खारवेलाने कलिंगला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. त्याच्या काळात कलिंगचा समुद्रमार्गे व्यापारसुद्धा खूपच बहरला होता. भारतभरातल्या अनेक जैन मुनींना पंडितांना बोलावून त्याने एक धर्मसंमेलन भरवले होते. त्या प्रसंगी जैनसंघाने खारवेलाला खेमराजा, भिखुराजा व धर्मराजा अशा पदव्या बहाल केल्या.मेघवाहन राजवंशाच्या काळातील या गुंफा असाव्यात असे मानले जाते.या राजघराण्याने इ.स.दुसरे शतक ते पाचवे शतक असे कलिंग म्हणजे सध्याच्या ओडीशावर राज्य केले.या प्राचीन लेण्यांचा शोध १९ व्या शतकात प्रथम ब्रिटीश अधिकारी एंड्रयू स्टर्लिंगने लावला.
लेणी दर्शन :-
उदयगिरी आणि खंडगिरी या शेजारीशेजारी असलेल्या टेकडय़ा आहेत. उदयगिरी लेणीमध्ये 18 लेणी / गुंफा आहेत तर दुसरीकडे खंडागिरी लेणीमध्ये सुमारे १५ गुंफा आहेत.त्यातल्या उदयगिरीवर असलेल्या राणीगुंफा, हाथीगुंफा आणि गणेशगुंफा या लेणी महत्त्वाच्या आहेत. सम्राट खारवेलाचा प्रसिद्ध शिलालेख हाथीगुंफेवरील मोठय़ा खडकावर कोरलेला आहे.
राणीगुंफा म्हणजे एक सुंदर दुमजली दालन आहे. जैन मुनींसाठी बांधलेले हे वसतीगृहच आहे. प्रशस्त व्हरांडा आणि बाजूला असलेल्या लहान लहान खोल्या. इथे बऱ्याच दालनांना बाहेर द्वारपाल दिसतात. मध्यवर्ती विभाग जिथे इतर दोन विभागांशी जोडला गेलेला आहे त्या कोनावर शिल्पपट पाहायला मिळतात. यामधे पशुपक्षी, फळांनी डवरलेली झाडे, आनंदानी बागडणारे हत्ती, वाद्य वाजवणाऱ्या सुंदरी इत्यादी शिल्पे फारच प्रभावशाली कोरलेली आहेत.या दुमजली लेण्यात एकुण ३२ कक्ष आहेत.खालच्या मजल्यावरील कक्षाच्या बाह्य भिंतीवर राजा खारवेलने युध्दात विजय मिळवल्यावर काढलेली मिरवणुक व ती मिरवणुक बघण्यासाठी आपआपल्या घरातून बाहेर डोकावणारे लोक दाखवले आहेत.
उदयगिरी टेकडीसमोरच आहे खंडगिरी टेकडी. भुवनेश्वरकडून आल्यावर ही टेकडी डाव्या हाताला आहे. इथे वरती चढून जाण्यासाठी मोठय़ा पायऱ्या खोदलेल्या दिसतात. एका ठरावीक उंचीवर गेल्यावर मग इथे गुहा खोदलेल्या दिसतात. खंडगिरीला एकूण १५ लेणी आहेत. खंडगिरी टेकडीची उंची १२३ फूट एवढी असून एका शिलालेखात याचा उल्लेख ‘खंडित गिरी’ असा आला आहे. तिथे एक इंद्रकेसरी गुहा असून त्याच्या मागे असलेल्या गुहेत २४ र्तीथकरांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. उदयगिरीच्या तुलनेत खंडगिरीवरील लेणी या काहीशा कमी शिल्पकाम असलेल्या आणि काहीशा ओबडधोबड वाटतात. इथे असलेल्या गुंफांचे आकारसुद्धा लहान आहेत. याशिवाय इथे असलेल्या व्याघ्र आणि सर्प गुंफा या त्यांच्या विशिष्ट आकारामुळे प्रसिद्ध आहेत. या टेकडीच्या माथ्यावरून भुवनेश्वरचा सगळा परिसर नजरेस पडतो. पुरातत्त्व खात्याने हा सगळा परिसर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. ओडिशाच्या भटकंतीमध्ये उदयगिरी-खंडगिरी लेण्यांना भेट देऊन प्राचीन इतिहास आणि एका समृद्ध वारशाची ओळख करून घेणे अनिवार्य आहे.
उदयगिरी लेणी :-
इथे आल्यावर पार्किंगमधून लेण्यांच्या दिशेने चालल्यावर एक संग्रहालय लागते.इथे काही शिल्प प्रदर्शित केली आहेत.इथून डावीकडे थोड्या अंतरावर एक बारव किंवा पायर्याची विहीर आहे. त्यावर असलेल्या शिलालेखाच्या उल्लेखाप्रमाणे हि विहीर इ.स.१० व्या शतकात बांधली गेली आहे. या विहिरीतील पाणी कधीच आटले नसल्याचा येथील स्थानिकांचा दावा आहे. इथून डावीकडे जाणारा रस्ता खंडगिरी लेण्यांकडे जातो तर सरळ जाणारा रस्ता उदयगिरी लेण्यांकडे जातो.
हि गुंफा आता बरीचशी उद्ध्वस्त झालेली आहे.
हाथी गुंफा :-
या लेण्याला हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या लेण्याचा प्रचंड आकार. या गुहेत विशेष कोरीवकाम नाही ,मात्र इथे शिलालेख पहायला मिळतात. या शिलालेखांमुळे आपल्याला राजा खारवेलची माहिती मिळते.शिलालेखांची सुरवातच नमोकार मंत्राने होते. यातुन असा निष्कर्श निघतो कि राजा खारवेलच्या काळात जैन धर्मच या राज्याचा प्रमुख धर्म होता.
खंडागिरीची गुहा डोंगराच्या डाव्या बाजूला असून गुहेभोवती हिरवेगार झाडी आणि आल्हादायक वातावरण आहे. यामुळे पर्यटकां इथे भेट देतात. खंडागिरी लेणीबद्दल असे म्हटले जाते की जैन धर्माचे शिष्य येथे राहत होते. हा लेणीसमुह उदयगिरी लेण्यांच्या अगदी समोर आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या या खंडगिरी लेणीमध्ये एकूण १५ लेणी आहेत आणि असे मानले जाते की येथे उत्खनन उदयगिरीपेक्षा थोडे अधिक केले गेले आहे. तसेच या लेणीसमुहामध्ये वावर देखील उदयगिरीच्या तुलनेत बराच काळ होता. उदयगिरी येथील शेवटचा शिलालेख इसवी सन १२ व्या शतकातील आहे, परंतु खंडगिरी लेणींना जैन तीर्थ म्हणून महत्त्व प्राप्त झाले, जे आजही आहे. इसवी सन ११ व्या शतकात सोमवंशी घराण्यातील उद्योतकेशरी यांच्या कारकिर्दीत या लेण्यांचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आले. खंडगिरी म्हणजे “तुटलेली टेकडी”, जे सध्यातरी या परिसरासाठी अतिशय योग्य नाव आहे. खंडगिरी आणि उदयगिरी या दोन लेणीसमुहांना एकाच दिवशी भेट देणार्या कोणत्याही व्यक्तीला हि दोन्ही ठिकाणे किती वेगळे आहेत ते लगेच लक्षात येईल. जरी तुम्ही उदयगिरीसाठी तिकीट खरेदी केलेले असेल तर तेच खंडगिरी लेण्यांना भेट देण्यासाठी देखील वापरता येते. मात्र खंडगिरी येथे तुमचे तिकीट तपासले जात नाही
जेव्हा या परिसरात 1997 आणि 2000 च्या दरम्यान उत्खनन झाले, त्यामध्ये 13 कक्षांनी वेढलेले मध्यवर्ती अंगण असलेले दुमजली विटांनी बांधलेली वास्तु दिसून आली.
उत्तराभिमुख मंदिरात एक मोठा आसनस्थ बुद्ध आहे.आता असलेला मंदिराचा दरवाजा हा पुनर्बांधणी करुन नवीन बसवला आहे, मूळ दरवाजा जो उदयगिरी मधील दरवाजासारखा आहे तो पाटणा संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
उदयगिरी २ येथील तटबंदीच्या स्तूपाच्या पूर्वेला १०० मीटर अंतरावर एका छोट्या निवासी संकुलाचे अवशेष आहेत.
कार पार्ककडे परत जाताना उजवीकडे एक खडबडीत रस्ता उत्खनन झालेल्या भागात जातो. अर्थात इथे जांभा दगड खोदून त्यापासून चिरे बनवल्याच्या खुणा दिसतात.यापेक्षा अधिक इथे काही नाही.
सन १९१२ मध्ये या परिसराला संरक्षित जागा म्हणून घोषित करण्यात आले आणि तीन वर्षांनंतर १९१५ मध्ये ओरिसाचे आयुक्त हे इथले एकमेव अधिक्षक बनले. पण पुढील ३२ वर्षे हिंदू आणि जैन या दोघांकडूनही अनेक आंदोलने झाली. १९४७ मध्ये परिस्थिती आणखी चिघळली जेव्हा ASI ने जमीन संपादित करण्याची प्रयत्न केला आणि टेकडीच्या पायथ्याशी पूर्वीपासून अस्तित्वात असलेले हिंदू मठ बंद केले. ही टेकडी हिंदू आणि जैन यांच्यासाठी तितकीच पवित्र आहे आणि कदाचित ओडिशातील जैन समुदायासाठी हे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हा परिसर जवळपासच्या गावातील आणि शहरांतील हिंदू समुदायामध्ये देखील अत्यंत लोकप्रिय असल्याचे दिसते.

उदयगिरी लेण्यांकडे चालायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम आपण एका स्तुपाजवळ पोहचतो. याला महास्तुप म्हणतात. हा पाच मीटर उंच आहे.इथे मधोमध बुद्धाशी संबधीत वस्तु ठेवतात. येथे उत्खननादरम्यान "श्री माधवपुरा महाविहारिया आर्यभिक्षु संघस्य" असा शिलालेख असलेले अनेक टेराकोटा खंड सापडला , त्यामुळे या वस्तीचे मूळ नाव माधवपुरा महाविहारिया असल्याचे जवळपास निश्चित झाले.
दरवाज्यांच्या कमानींवर पोपटांच्या कोरीव कामावरून या गुहेला हे नाव मिळालेले आहे.या गुंफेत दोन प्रवेशद्वारांसह एकच कक्ष आहे. गुहेच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत.
या गुहेत सापडलेला एक शिलालेख असा आहे:
" कुसुमाची गुहा, पदमुलिकाची रहिवासी "
या गुंफेच्या द्वारावर देखील पोपटांच्या प्रतिमा कोरलेल्या असल्याने, गुहा 2 हे नाव दिलेले आहे. ही गुहा मोठी आहे आणि अधिक सुशोभित केलेली आहे. दरवाजाच्या चौकटी आणि वरील तोरण यातील जागा कोरीवकाम केलेली असून बाकीच्या लेण्यापेक्षा हि रचना वेगळी आहे. येथे बाहेरील दरवाजांवर कमळाच्या माळा दिसतात, मध्यवर्ती प्रवेशद्वार मधमाश्यांच्या पोळ्यासारखे कोरीवकाम दिसते.
गुहा 3 : अनंता गुंफा
या लेणीसमुहातील एक आकर्षक गुंफा. लेणी बघायला फार वेळ आपल्याकडे नसेल तर किमान या लेण्याला भेट द्यायला हवी.
आतील कक्षाला मुळात चार दरवाजे होते, परंतु यापैकी दोन आता अस्तित्वात नाहीत.मात्र ही एक खंत करावी अशी गोष्ट आहे कारण या गुहेतील शिल्पकाम लक्षणीय आहे. कक्षाच्या मागील भिंतीवर एका जैन तीर्थंकरचे शिल्प आणि काही चिन्ह दिसतात, हे सर्व मध्ययुगीन काळातील आहेत.

कक्षाच्या दरवाज्यावर एकमेकांत गुंफलेल्या नागाच्या शेपटींनी शिल्प कोरलेले आहेत, ज्यामुळे कमानी तयार होतात. नागाला तीन डोकी कोरलेली आहेत ज्यामुळे या गुहेला हे नाव मिळाले आहे. गुहा २ प्रमाणे, दरवाज्याच्या वरच्या भागाच्या कमानीच्या खाली असलेली जागा विविध शिल्पांनी कोरलेली आहे.
पुढे निघालो कि पुढील शिल्पपट देखील भग्नावस्थेत असल्याचे दिसते. यात पगडी घातलेला एक माणूस आणि त्याच्यावर छत्र दाखवले आहे. तो चार घोडे असलेल्या रथावर बसलेला दिसतो. त्याच्या वर आणि आजूबाजूला सूर्य, चंद्र आणि एक तारा कोरण्यात आला आहे. पुरुषाला दोन स्त्रिया आहेत.काही अभ्यासकांच्या मते हे शिल्प सूर्य (सूर्य देव) असावे असे मानले आहे, ज्यात त्याच्या दोन पत्नी, छाया आणि संध्या दाखवल्या आहेत. पण येथे प्रश्न असा आहे की जर हा सूर्य असेल तर रथाला सात ऐवजी चार घोडे का आहेत?
याच्या पुढील शिल्पपटात गजांतलक्ष्मी दाखवलेली आहे. यात लक्ष्मी मध्यभागी कमळावर उभी असलेली, तिच्या दोन्ही हातात कमळाचे फूल धरलेले दिसते.तिच्या पाठीमागे दोन हत्ती आहेत जे तिच्यावर पाणी ओतताना दिसतात आणि दोन्ही हत्तींच्या मागे पोपट कोरलेले आहेत. जे गजांतलक्ष्मीचे शिल्प अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध लेण्यांमध्ये दिसते.
गुहा ४ : तेंतुली गुंफा
या गुहेचे नाव एका चिंचेच्या झाडावरून ठेवले गेले आहे.हे झाड एके काळी याच गुंफेजवळ उभे होते परंतु आता ते अस्तित्वात नाही. यात दोन प्रवेशद्वारांसह एक लहान कक्ष आहे,इथे एक शिल्प असून त्यात मधोमध एक स्त्री हातात कमळ धारण करुन उभी आहे तर बाजुला हत्ती आणि सिंह दाखवले आहेत.
भग्नावस्थेत असल्यामुळे या गुहेला हे नाव दिलेले आहे. ही दुमजली गुहा असून आपण फक्त तळमजलाच बघु शकतो.वरच्या मजल्यावर जाणे सोपे नाही.तसेही इथे फार प्रेक्षणीय काही नाही.
इथल्या मुळ गुंफेची रचना वेगळी होती असे दिसते. आधीच्या खोदकामात इथे खांब आणि व्हरांडा होता.मात्र नंतरच्या कोरीवकामात त्यात बदल करुन इथे प्रशस्त सभामंडपात रुपांतरीत केलेला दिसतो.
गुहा ७ : नवमुनी गुंफा
गुहा ६ प्रमाणेच, ही गुहा मूळ स्वरुपातून रुपांतरीत केलेली दिसते.यात मध्ये असलेली भिंत काढून टाकून दोन कक्ष आणि समोर ओसरी कोरलेली दिसते.बहुधा जैन तीर्थंकरांच्या असंख्य मुर्ती कोरण्यासाठी जागा हवी असल्यामुळे हा बदल केला गेला असावा. या गुंफेच्या मागील आणि बाजूच्या भिंतींवर नव म्हणजे नउ मुनींच्या प्रतिमा कोरल्या आहेत.त्यामुळे गुहेला नवमुनी गुंफा हे नाव दिले गेले आहे.
गुहा ८ : बाराभुजी गुंफा
गुहे क्र.७ सारख्या इथेही अनेक जैन प्रतिमा कोरलेल्या आहेत.या गुहेला हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या गुंफेत बारा देवींच्या प्रतिमा कोरल्या आहेत.
गुहा ९ : ट्रुसुला गुंफा
या गुहेत काही जैन कोरीव शिल्पे दिसतात, जी कदाचित इसवी सनाच्या १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात कोरली असावीत असे मानले जाते.
या गुहेत काही जैन शिल्पकाम आहे.
गुहा १२ आणि १३ : नाव दिलेले नाही
इथे विशेष प्रेक्षणीय काही नाही.
गुहा १४ : एकादशी गुंफा
हि गुंफासुध्दा भग्नावस्थेत असून इथे पहाण्यासारखे काही नाही.
गुहा १५ :
या गुंफेच्या जवळ पाण्याचा एक छोटासा तलाव आहे.
धौली :-
शांती स्तूपामध्ये भगवान बुद्धांच्या विविध आसनांमध्ये चार भव्य मूर्ती आहेत, तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंगांची मालिका दगडी शिल्पपटात कोरलेल्या आहेत . यामध्ये धौली परिसरातील युध्दभुमीवर झालेल्या लढाईनंतरचे आणि अशोकाच्या हिंसक मार्गापासून दूर जाण्याचे प्रसंग कोरले आहेत.
तिथे बुद्धाची एक सुंदरशी मुख्य मूर्ती आहे आणि चारी बाजूंना अजून लहान लहान बुद्धमूर्ती आहेत. समोरच्या बाजूला दोन ऐटदार सिंह आहेत. ( एकूणच तिथे सगळीकडे सिंहाची शिल्पं खूप दिसली) एखाद्या ठिकाणी घडलेला इतिहास त्या ठिकाणाला वेगळंच महत्त्व प्राप्त करून देतो. हा स्तूप काही ऐतिहासिक नाही. अगदीच अलीकडचा, आधुनिक काळातला. पण त्याच्या पार्श्वभूमीमुळे आपली दृष्टी पूर्णपणे बदलते. इथेच एक अशोकस्तंभ उभारला आहे.मात्र याची कारागिरी सामान्य वाटते.
ही मुख्य बुद्धमूर्ती
शांतीस्तूप
हा फोटोग्राफीचा एक प्रयत्न
त्याच स्तूपाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कृष्ट दृकश्राव्य शो तिथे असतो. तोही पाहण्यासारखा आहे.ओम पुरीच्या घनगंभीर आवाजातलं निवेदन असलेला तो शो पाहणं हा अतिशय संस्मरणीय अनुभव असतो.
धौलीमध्ये पाहण्यासारखी इतर ठिकाणे आहेत , विशेषत: अशोकन रॉक एडिट , परंतु आणखी एक ठिकाण म्हणजे भैरंगेश्वर मंदिर ज्याला खुप कमी लोक भेट देतात . तुम्हाला भुवनेश्वर शहरापासून जवळच एक कमी वेळाची सहल करायची असल्यास धौली हा एक चांगला पर्याय आहे.