कोणार्क :-
कोणार्क हे ओदिशातील पुरी जिल्ह्यातले एक लहानसे शहर. कोन्यातील म्हणजे कोपर्यातील सूर्य (अर्क = सूर्य) असा कोणार्क याचा अर्थ आहे. १३व्या शतकात इथले सूर्यमंदीर बांधलेले आहे. यालाच ब्लॅक पॅगोडा असेही म्हणतात. पूर्व किनार्यावरील अनंतवर्मन चोडगंगदेव याने आपल्या गंग वंशाची सत्ता भारताच्या या पूर्व किनार्यावर स्थापन केली. या गंग वंशाच्या नरसिंहदेव (इ.स. १२३६ ते १२६४) या राजाने हे वालुकाश्मातले मंदीर बांधले. जालावर काही ठिकाणी याला लंगूल नरसिंह देव असे देखील म्हटलेले आहे. असो. जगातील सर्वांत आश्चर्यकारक अशा धार्मिक पुराणवास्तूंपैकी एक असलेले हे मंदीर हा ओदिशामधील मंदीरस्थापत्यातील शिरपेच आहे.
ऋग्वेदकालापासून सूर्य ही भारतीयांची लोकप्रिय देवता आहे. कोणार्क इथे धर्म आणि विज्ञान यांची अप्रतिम सांगड शिल्पकलेशी घातलेली आहे आणि त्यामुळे ही एक अजोड अशी शिल्पवास्तू ठरली आहे. किंवा असं देखील म्हणता येईल की विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हिंदु धर्मातील अप्रतिम अशी लोकप्रिय प्रतीके इथे शिल्पाकृतीतून वापरलेली आहेत. सूर्याची ही प्रतिमा आर्यांबरोबर भारतात आली. प्राचीन बाबिलोनियन आणि इराणी संस्कृतीतून ही सूर्यप्रतिमा भारतीय संस्कृतीत रुजली असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. परंतु रथाच्या आकाराचे मंदीर बांधण्याची विलक्षण कल्पना मात्र पूर्णपणे अभिनव आणि अलौकिक सृजनाचा स्पर्श असलेली अशी आहे. आणि म्हणूनच हा जागतिक सांस्कृतिक ठेवा आहे असे युनेस्कोने जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर मंदीरस्थापत्य हा देखील एक मनोरंजक आणि आनंददायी विषय आहे.
नारदाच्या खोडकर, कळी लावण्याच्या स्वभावामुळे एकदा श्रीकृष्णपुत्र सांब याला आपल्या पित्याचे कोपभाजन व्हावे लागले. सांबाने आपल्या स्वभावानुसार एकदा नारदाची खोडी काढली. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून नारदमुनी त्याला एका ठिकाणी घेवून गेले. नेमके ती जागा श्रीकृष्णाच्या बायकांची स्नान करण्याची जागा होती. सांबाला तिथे सोडून नारद त्याच्या नकळत कृष्णाला तिथे घेवून आले. आपल्या बायकांच्या स्नानाच्या ठिकाणी सांबाला पाहून संतप्त झालेल्या कृष्णाने त्यास कुष्ठरोग होइल असा शाप दिला. नंतर सांबाने आपले निर्दोषत्व सिद्ध केले पण एकदा दिलेला शाप परत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णांनी त्यास सुर्यदेवांची आराधना करण्यास सुचवले. त्यानुसार बारा वर्षे सुर्याची आराधना केल्यावर सांबास आपले आरोग्य आणि सौंदर्य पुनश्च प्राप्त झाले.
"पुत्रा, गुन्हाच तसा घडला होता तुझ्याकडून. भलेही नारदमुनींनी मुद्दाम कळ लावून हे घडवून आणलय. पण चुकून का होइना तू श्रीकृष्णमहाराजांचा गुन्हा केलास आणि त्यांच्या तोंडून शापवाणी निघाली. आणि तूला कुष्ठरोग झाला."
"अगदी योग्य बोललीस माते, पण माझं निर्दोष असणं सिद्ध झाल्यावर तातांनीच त्यावर उ:शाप म्हणून सुर्यपुजेचा उपाय सांगितला. सुर्यदेव जे सर्व त्वचाविकारांचे नाशक मानले जातात त्यांची साधना."
"आणि गेल्या बारा वर्षाच्या अथक साधनेनंतर आज तू त्या महाभयंकर व्याधीतून मुक्त झालास. आता पुढे काय करायचे ठरवले आहेत. सुर्यपुजा अशीच चालू ठेवणार?"
"माते, गेली बारा वर्षे चंद्रभागेच्या तीरी मित्रवनातील या पवित्र जागी सुर्यदेवांची उपासना करत आलोय. त्यांच्या कृपेने या व्याधीतून मुक्त झालोय. त्या सुर्यदेवांचं भव्य मंदीर या ठिकाणी उभे करायची माझी इच्छा आहे."
"अगदी माझ्या मनातले बोललास पुत्रा, पण आधी या आनंदाच्या क्षणी श्रीकृष्ण महाराजांचे दर्शन घेवून त्यांचे आशीर्वाद घेवूया. या मंदीर उभारणीबद्दलही त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यकच आहे, नाही?"
"चल माते, आधी तातांचे आशीर्वाद घेवून त्यांच्यासमोर ही मनीषा व्यक्त करू."
आणि श्रीकृष्णपुत्र सांब आपली माता जांबुवंतीसह पित्याच्या महालाकडे, त्या सर्व शक्तिमान, पुर्ण पुरूषाच्या, देवोत्तमाच्या, श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी निघाला.......!
सांबाने कोणार्कला येऊन सुर्याची आराधना केली आणि त्याचा त्वचारोग बरा झाला. म्हणून त्याने येथे सूर्याचे मंदिर बांधले. पुढे नरसिंगदेव या कलिंगाच्या राजाने इ. स. तेराव्या शतकात सध्याचं सूर्यमंदिर बांधलं.
सांबपुराणानुसार श्रीकृष्णपुत्र सांबाने आपल्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून त्याकाळी चंद्रभागेच्या तीरी (सद्ध्याची चिनाब त्याकाळी चंद्रभागा या नामे ओळखली जात असे म्हणे) पुढे सांबाच्या नंतर मुळ-सांबपुर म्हणुन ओळखल्या गेलेल्या नगरी (सद्ध्याचे पाकिस्तानमधील मुलतान) एक विशाल सुर्यमंदीर बांधले. साधारण सातव्या शतकात भारताला भेट दिलेल्या चिनी प्रवासी ह्यु-एन त्संग याच्या लिखाणात मुलतानच्या या पुरातन सुर्यमंदीराचे उल्लेख येतात. नंतर हे मंदीर जिथे सांबाने प्रत्यक्ष सुर्याची आराधना केली होती तिथे हलवण्यात आले. यामागे देखील एक दंतकथा आपल्या पुराणात तसेच कपिल संहितेत आढळते. उडीया भाषेतील मदला पंजी या स्थानिक ग्रंथातदेखील अशाच प्रकारची दंतकथा सापडते.
आपली तपश्चर्या पुर्ण केल्यावर सांबाने चंद्रभागेत ( हे चंद्रभागा म्हणजे एक छोटेसे सरोवर आहे कोणार्कपासुन काही किमी अंतरावर) स्नान करण्यासाठी म्हणून एक डुबकी मारली, तेव्हा त्याला पाण्यात एक मुर्ती सापडली. जी विश्वकर्म्याने घडवलेली सुर्याची मुर्ती होती. त्या मुर्तीची सांबाने तिथुन जवळच असलेल्या मित्रवनात एक छोटेसे मंदीर बांधून तिथे प्रतिष्ठापना केली. बहुदा आताचे कोणार्क आणि त्यावेळचे मित्रवन या जागा एकच असाव्यात, म्हणूनच सांबाने सांबपूरात बांधलेले भव्य सुर्यमंदीर पुन्हा इथे स्थलांतरीत करण्यात आले.
(दंतकथा संदर्भ : श्री सांब पुराण)
दुसर्या एका दंतकथेनुसार पुढे कधीतरी केसरी राजवंशाच्या पुरंदरकेसरी नामक राजाने कोनार्क देवाचे एक मंदीर उभे केले. कोनार्क हा शब्द बहुदा कोना भारताच्या एका कोपर्यातच ओरिसातील हे जगदविख्यात सुर्यमंदीर वसलेले आहे) आणि अर्क (सुर्य) यांच्या संधीतून निर्माण झाला असावा. त्याला त्याकाळी कोनादित्य या नावाने संबोधले जात असे. त्यानंतर तिथे गंगा राजवंशाच्या राजवटीत राजा नरसिंहदेव (१२३८-६४) याने या मंदीरासमोरच दुसरे एक भव्य मंदीर उभे केले. राजा नरसिंहदेवाचा पिता राजा अनंगभिम याने पुरीच्या जगन्नाथासमोर या मंदीराचे एका भव्य मंदीरात रुपांतर करण्याचे कबुल केले होते. हे मंदीर एका रथाच्या आकाराचे होते. मध्यभागी अतिषय देखणे असे भव्य मंदीर (रथ) ज्याला सात अश्व आणि चक्रांच्या (चाकांच्या) १२ जोड्या म्हणजे रथाला अतिशय सुक्ष्म आणि सुंदर कोरीवकाम केलेली एकुण २४ चाके आहेत.
काळाच्या ओघात कोणार्क, तिथली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांभोवती असलेले कीर्ती आणि समृद्धीचे वलय लोपले. या वास्तूची समृद्धी आणि हे वलय किती काळ होते आणि नक्की केव्हा ते लयाला गेले याबद्दल नक्की काहीही सांगता येत नाही. मंदिराची अशी दुर्दशा कशी काय झाली याला १०० टक्के विश्वासार्ह असा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. याबाबत इतिहास मूक आहे. काळाच्या गडद धुक्यात हे गूढ दडलेले आहे. परतु या अप्रतिम मंदिराच्या पतनाबद्दल इतिहासकारांनी विविध तर्काधिष्ठित मते मांडलेली आहेत. सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाटेल अशी दंतकथा आहे धर्मपादाची.

गंग वंशाचा राजा नरसिंह देव - १ याने आपल्या राजवंशाच्या राजकीय सर्वश्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून हे मंदीर बांधायला आदेश दिला. बाराशे स्थापत्यशास्त्रज्ञ आणि कुशल कारागीर यांनी आपल्या आयुष्यभराची प्रतिभा, आपले अविश्रांत श्रम आणि पूर्ण कसब तब्बल बारा वर्षे पणाला लावले. तेवढाच काल राजाने जमा झालेली करसंपत्ती खर्च केली. तरीही पूर्णत्वाचे चिन्हही कुठे दिसेना. मग ठरलेल्या दिवशी काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा सर्व शिल्पकारांना देहदंड होईल असा अंतिम आदेश त्याने काढला. सिबेई सामंतराय या प्रमुख सूत्रधाराने म्हणजे स्थापत्यकाराने असमर्थता दर्शवली. तेव्हां बिशू महाराणा या स्थापत्यशास्त्रज्ञाने ते पूर्ण केले. परंतु मर्मशिला आणि कळस बसवायचे काम मात्र अजून जमले नव्हते. सगळ्या स्थापत्यचमूने आता हात टेकले होते. ही मर्मशिला योग्य रीतीने बसवली की वास्तूच्या वरील भागाचा भार पेलणार्या खांब, तुळया वगैरे घटकांवर पडणारा भार योग्य दिशेने, भारपेलक घटकांना पेलता येईल अशा योग्य प्रमाणात विभागला जातो आणि मगच वास्तू दीर्घकाल टिकू शकते. नाहीतर ती कोसळण्याचा धोका वाढतो.
बिशू महाराणाचा बारा वर्षांचा मुलगा धर्मपाद हा तिथे सहज मंदीर बांधायचे काम कसे काय चालते ते बघायला आला. स्थापत्यशास्त्रज्ञांना भेडसावणारी चिंता त्याला जाणवली. मंदीर बांधण्याचा तसा त्याला अनुभव नव्हता. तरीही मंदीर बांधण्याच्या स्थापत्यशास्त्राचे सखोल ज्ञान मात्र त्याला होते. मंदिराच्या शिरोभागी स्थापन करायची मर्मशिला बसवायचे कठीण असे गणिती सूत्र सोडवायचे आव्हान त्याने स्वीकारले आणि ते काम स्वतःच करून त्याने सर्वांना चकित केले. कळसाचा शेवटचा दगड त्याने स्वतःच्या हाताने बसवला, आणि कळस पुर्ण झाला. पण हा शेवटचा दगड काही वेगळ्याच प्रकारचा होता. तो नक्की दगडच होता की......?परंतु ही कामगिरी केल्यानंतर थोड्या दिवसातच त्या बालबृहस्पतीचे कलेवर समुद्रकिनारी मंदिरापाशीच आढळून आले. (तेव्हा समुद्रकिनारा मंदिराला लागूनच होता. आता तो २ किमी दूरवर गेला आहे.) आत्महत्त्या किंवा खून! बारा वर्षाच्या धर्मपादाने आपल्या वास्तु रचनाकार समाजासाठी स्वतःचे प्राण वेचले असेच ही दंतकथा सांगते. धर्मपदाने आपल्या योगशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरातील सर्व उर्जा त्या दगडात ओतून त्याचे एका महा - शक्तिशाली चुंबकात रुपांतर केले होते. त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. पण त्याची पुर्ण ज्ञाती त्याच्या या त्यागामुळे राजाच्या कोपाला बळी जाण्यापासून वाचली..एकापेक्षा एक असे श्रेष्ठ स्थापत्यशास्त्रज्ञ असतांना एक बारा वशांचा मुलगा हे काम करून दाखवतो हे त्या ढुढ्ढाचार्यांना सहन झाले नसावे. त्यामुळे त्यांनी कामात त्रुटी ठेवली असावी आणि नंतर धर्मपादाचाही काटा काढला. याच त्रुटीमुळे नंतर मंदीर पडले. हे सत्य जर मानले तरी याला स्वीकारार्ह असा ऐतिहासिक पुरावा मात्र नाही. सत्य आणि कल्पिताची एकजिनसी सरमिसळ, दुसरे काय?
दुसर्या एका मतानुसार धर्मांध मुस्लिम सेनापती काळापहाड याने इतर अनेक मंदिरांबरोबरच हे कोणार्कचे मंदीर देखील पाडले. भुवनेश्वरमध्ये त्याने पाडलेल्या अनेक मंदिरांचे भग्नावशेष अजूनही आहेत. वैतल मंदिराच्या प्रकाशचित्रात असे एक शिखराचा काही भाग उडवलेले मंदीर आहे. हिंदु इतिहासात व्यक्ती किंवा मंदीर बाटवले जाणे हा एक प्रकार आहे. मंदीर बाटल्यामुळे अपवित्र झाले म्हणून देखील सोडून दिले असू शकते. आणि सोडून दिल्यामुळे नंतर ओसाड होऊन पडझड झाली असावी. ऐतिहासिक पुरावा नसला तरी यात मात्र विश्वास न ठेवण्यासारखे काही दिसत नाही.
मूळ मंदिराची रचना, पिवळ्या रंगात चिन्हांकित केलेले क्षेत्र आजही शिल्लक आहे [२००४, गेराल्ड अनफोसी / सीसी बाय-एसए ( http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ ) ]
हे एकमेव दस्तऐवज आहे ज्यात संपूर्ण मंदिर कसे दिसते याचे संपूर्ण चित्र बघायला मिळते. हे चित्र 17 व्या शतकाच्या सुरुवातीला मंदिराचे कसे होते याचे संपूर्ण रेखाटन दाखवते. मधोमध असलेला खांब अरुणास्तंभ आहे, जो नंतर अवशेषांमधून परत मिळवला गेला आणि पुरीच्या जगनाथ मंदिरात स्थलांतरित झाला.
यातील उंच शिखराचा (बुरुज) चक्काचूर झाला आहे आणि हा कधी आणि कसा झाला याबद्दल परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. मंदिराचे शिखर थोड्या प्रमाणात उभे होते, 1847 मध्ये जेम्स फर्ग्युसन यांचे रेखाटले आहे.मात्र तोपर्यंत मंदिराचा हा भाग डागडुजी करण्याजोगा राहिला नाही.
जेम्स फर्ग्युसन लिखित "कोणार्कचे मंदिर",या १८४७ साली छापलेल्या पुस्तकात जगमोहनाच्या मागे दिसणारे शिखराचे अवशेष दिसून येतात
मुख्यमंदीरालाच लागून असलेल्या या भव्य मंदीरालाच (सभामंडप) जगमोहन म्हणूनच संबोधले जात असावे. कारण तिथले गाईडलोक त्याचा उल्लेख जगमोहन असाच करीत होते. साधारण ३० चौरस मिटर आकारमान आणि तेवढीच उंची लाभलेल्या जगमोहन नामक या वास्तुला लागुनच मुख्य सुर्यमंदीर कळासासहीत उभे आहे (साधारण ६८ मिटर उंच). पुढच्या काळात कधीतरी शिखराचा भाग ढासळला गेला... (त्याची कारणे आजही अज्ञात आहेत)
यासंदर्भात इथे गाईडकडून एक विलक्षण दंतकथा ऐकायला मिळाते. त्यानुसार त्यावेळी जगमोहनाचे शिखर बांधताना त्यात एक विलक्षण शक्तीशाली असा चुंबक बसवण्यात आला होता. तो चुंबक सर्व वास्तुचा (कळस) भार सावरून धरत असे. परंतू मध्ये काही शतकांपुर्वी मंदीरावर वीज कोसळली आणि त्यावेळी तो चुंबक निखळून पडला आणि त्या नंतर मंदीराचे शिखर ढासळायला सुरूवात झाली. ही कथा जर खरी असेल तर त्यावेळचे आपले वास्तुशास्त्र किती प्रगत असेल याची कल्पनाच केलेली बरी. नंतर शिखर कोसळायला सुरूवात झाल्यावर मंदीरात आत, गाभार्यात भर घालून लोकांना जाण्यास मनाई करण्यात आली. तिन्ही बाजुला असलेली दारे आता सुरक्षेच्या कारणास्तव काँक्रीटने बंद करण्यात आलेली आहेत. त्यापुर्वी वर सांगितल्याप्रमाणे आतली जगमोहनाची मुर्ती काढून बाहेरील नटमंदीरात स्थापीत करण्यात आली. जगमोहनाचे छत तीन विभीन्न स्तरात विभाजीत करण्यात आले आहे. या तिन्ही स्तरांवर अतिशय सुंदर आणि सुक्ष्म नक्षीकाम केलेली विविध शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.
जगमोहनाला लागूनच मुख्य सुर्यमंदीर आहे. इथे बाहेरच्या बाजुने, चौकटीमधून तीन सुर्यप्रतिमा स्थापीत करण्यात आलेल्या आहेत. जे काही समोर होते ते विलक्षण भारावून टाकणारे आहे. या तिन्ही सुर्यप्रतिमा शैशव, तारुण्य आणि वार्धक्य या मानवी जीवनाच्या तीन कालावधीनुसार बसवलेल्या आहेत. काळ्या पत्थरात (क्लोराईट) कोरलेल्या या सुर्यप्रतिमा अतिषय देखण्या आणि भव्य आहेत. आपल्याकडे वैदिक काळापासून सुर्यपुजेची पद्धत आहे. पण सुर्य हा आपला देव नाही. सुर्य हा आर्यांचा देव. शेकडो युगांपूर्वी आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर आपले देवही आणले. त्यात सुर्य हा प्रमुख देव होता. त्यामुळेच आपल्या इतर देवांपेक्षा वेगळी एक गोष्ट सुर्याच्या प्रतिमेत आढळते ती म्हणजे सुर्यदेवाच्या पायात घोट्याच्याही वर येणारे बुट आहेत.कारण सूर्य हा इराणी (झरतुष्ट्राच्या अगोदरचे) देव आहे त्यामुळे "खरी सूर्यप्रतिमा" ओळखायची खूण ही असते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराशी दोन सिंह पहारा देतात. दोन्ही सिंह युद्धातील एकेका हत्तीचा संहार करतांना दाखवले आहेत. सिंह हे हिंदु धर्माचे तर हत्ती हे बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. म्हणजे हिंदु धर्माने बौद्ध धर्मावर विजय मिळवला. हे दोन्ही हत्ती योद्ध्यांच्या एकेका शरीरावर उभे आहेत. सिंह हे शौर्याचे तर हत्ती हे संपत्तीचे देखील प्रतीक आहे. गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग आपण ऐकलेला, वाचलेला आहे. म्हणजे संपत्तीने अगोदर मानवता धुळीला मिळवली नंतर शौर्याने संपत्तीवर विजय मिळवला असा देखील यातून अर्थ काढता येतो.
राजा नरसिंह देव याला खगोलशास्त्रावर अतीव स्वारस्य होते. सात घोडे हे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आणि बारा चाके हे बारा महिन्यांचे प्रतीक समजले जाते. चाके अप्रतिम कोरीव कामाने नटलेली आहेत. प्रत्येक चाकाला आठ अर्या आहेत. दिवसाला आठ प्रहर असतात म्हणजे आठ अर्या हे आठ प्रहरांचे प्रतीक आहे.
मंदिरासमोर दोन्ही बाजूला सिंह, त्याखाली हत्ती आणि त्याहीखाली माणूस, अशी शिल्पं आहेत. सिंह हे संपत्तीचं आणि हत्ती हे सत्तेचं प्रतीक आहे. सत्ता आणि संपत्ती माणसाला चिरडते असं दाखवणारी ही शिल्पं आहेत.
गाभार्यावरचे आणि नटमंदिरावरचे छत पडलेले आहे.
"गाभार्याला तीन बाजूंनी पुढे आलेल्या सूर्यदेवाच्या तीन सुंदर मूर्तींमुळे शोभा आली आहे. पूर्वाभिमुख मंदिरात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट या मूर्तीपर्यंत पोहोचतात. दररोज या तीन सूर्यमूर्तींपैकी किमान एका तरी सूर्यमूर्तीवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडावीत अशी योजना स्थापत्यकारांनी केलेली आहे." असे वर्णन महाजालावर मिळते. परंतु या सूर्यमूर्ती आता गायब आहेत असे वाचले होते.गाभारा आणि जगमोहन एकाच चौथर्यावर आहेत. मुख्य मंदिरावर सर्व बाजूंनी नक्षीदार वेलबुट्ट्या आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत तसेच नर्तकांच्या, यक्षांच्या तसेच देवदेवतांचा भावविभोर नृत्याकृती आहेत.
कोणार्कबद्दल आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे असलेल्या कामुक कोरीव शिल्पांची संख्या, काहींच्या अंदाजानुसार कोणार्कच्या सर्व नक्षीकामांपैकी 40% कामुशिल्प किंवा काम दृश्ये आहेत. अशा गोष्टींसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे अर्थातच खजुराहो हे आहे , मात्र कोणार्क येथे अशा कलेचे प्रमाण अधिक प्रचलित असून येथील कोरीव काम थोडे चांगले जतन केले गेले आहे. काही नृत्याकृतीत कामसूत्रातून घेतलेली कामुक हावभाव करणारी जोडपी आहेत. कालौघात वातावरणामुळे शिल्पे झिजली आहेत परंतु मूळ शिल्पातल्या कोरीवकामाचे सौंदर्य लपत नाही.
येथील आकृतिबंध प्रचंड वैविध्यपूर्ण आहेत; कामुक जोडपे, विविध पोझ, नाग, व्याला, सैनिक, हत्ती, दरबारातील देखावे, पण दैनंदिन जीवनातील प्रथा आणि विधी यांचे चित्रण करणार्या शिल्पांमध्ये एका तरुणीचे शिल्प थक्क करणारे आहे. एक स्त्री अग्नीवर पाय ठेवत असल्याचे दिसते, याचा अर्थ तज्ज्ञांच्या मते बाळंतपणानंतर योनीतून बरे होण्याची प्रक्रिया दर्शवते. ओडिशातील बोंडा जमात आजही ही प्रथा आहे.
इतिहासात मानवाने मह्त्वाच्या विविध घटनांची नोंद करणे, भविष्यातील लोकांसाठी संदेश देणे, आपल्या भावना, आपले तत्वज्ञान याची नोंद करणे यासाठी वाङ्मयातून, दस्तावेजामधून आणि चित्रे, शिल्पे आदि कलाकृतीमधून जागोजाग प्रतीकांचा वापर केलेला आहे. रामायण, महाभारत, ओडिसी इलियड इ. प्राचीन महाकाव्यापासून आधुनिक काळातील साहित्यिकांपर्यंत कित्येकांनी नी आपापल्या साहित्यात विविध प्रतीकांचा अप्रतिम असा सौंदर्यपूर्ण वापर केलेला आहे तर काही अभिनव प्रतीके स्वतःच निर्मिलेली आहेत. विविध वास्तूत, शिल्पात देखील अशाच विविध प्रतीकांचा वापर केलेला आहे.
रथाचे घोडे मात्र आता भंगून गेलेले आहेत. चाकंही काही सगळी सुस्थितीत नाहीतच. ही चाकं पूर्वपश्चिम दिशेने आहेत आणि रोचक बाब म्हणजे ही चाकं वापरून आपल्याला दिवसाची वेळ सांगता येते. एखादी सरळ काठी चाकाच्या मध्यबिंदूकडे रोखून धरली, की तिची सावली कुठे पडते यावरून अचूकपणे वेळ कळते. कोणार्कमधे सर्वात जास्त बघन्यालायक काय असेल तर ते रथाची चोवीस चक्रे. प्रत्येक चक्रावर वेगळ्या मूर्ती. वेगळी थीम. आणि त्या चक्रावर पडणार्या सावलीवरून अचूक वेळदेखील सांगता येते.
रथाच्या चाकात आर्या (स्पोकस ) मधे जे गोल आहेत . त्यात नायिकेची पूर्ण दिनचर्या दाखविणार्या मुद्रा आहेत.चित्र मोठे करून पाहिल्यास थोडी कल्पना येते.
उत्तरायणात उत्तर बाजूच्या चाकांवर सूर्यप्रकाश पडतो, दक्षिणायनात दक्षिण बाजूच्या चाकांवर. प्रत्येक चाकावर सुरेख नक्षीकाम आहे. मंदिराला पूर्वेच्या बाजूला तीन दरवाजे आहेत. सूर्य जेव्हा मकरवृत्तावर जातो (उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस), तेव्हा सकाळी सूर्य उगवल्यावर त्याचे किरण मुख्य दरवाज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या दरवाजातून आत शिरतात. याउलट जेव्हा सूर्य कर्कवृत्तापर्यंत जातो, (उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस) तेव्हा मुख्य दरवाज्याच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजातून सूर्यकिरण आत शिरतात. जेव्हा दिवस-रात्र समसमान असते, म्हणजेच ज्या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तेव्हा सकाळी पहिले सूर्यकिरण मधल्या मुख्य दरवाजातून आत शिरतात. इ. स. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं आहे. पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वरचं लिंगराज मंदिरही याच सुमारास बांधलं गेलेलं आहे.
सूर्यमंदिरावरची शिल्पकला अतिशय सुंदर आहे. अनेक कथा, प्रसंग त्या दगडी शिल्पांमधून जिवंत केलेले आहेत. मंदिराच्या पाठीमागे उषा आणि छाया (सूर्यदेवाची मंदिरे) आहेत.
यात समुद्रमंथनाचा देखावा आहे.
यात श्रावणबाळाची कथा आहे.
हे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. यात कलिंगाचा राजा हत्तीवर बसलेला दाखवला आहे आणि त्याला भेट म्हणून एक जिराफ नजर केलेला दाखवला आहे. जिराफ या आफ्रिकन प्राण्याचा जुन्या भारतीय शिल्पकलेतला हा एकमेव उल्लेख आहे. अरबी व्यापार्यांनी आफ्रिकेतून हा जिराफ आणून कलिंगाच्या राजाला नजर केला असावा.
जगमोहन प्रवेशद्वार (हा फोटो आहे - 1890,)
तर हा फोटो आहे २०२० चा
हे मंदिर दगडी असलं तरी दगड एकत्र ठेवण्यासाठी आत लोखंडी कांबींचा वापर केलेला आहे.
जगमोहनाचे जतन आणि स्थिरीकरण करण्याच्या प्रयत्नात, हॉलचा आतील भाग खूप पूर्वी विटांनी बांधला गेला आणि वाळूने भरला गेला, जी छतावरून छिद्र करून पोकळीत ओतली गेली. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी असलेल्या एका मोठ्या दगडावर असे शब्द कोरलेले आहेत:
' जुन्या भारतीय वास्तुकलेचा हा उत्कृष्ट नमुना जतन करण्यासाठी 1903 मध्ये बंगालचे आयएसओ लेफ्टनंट गव्हर्नर माननीय जेए बोर्डिलॉन यांच्या आदेशाने आतील भाग भरण्यात आला होता '
कोसळलेल्या मंदिरातली काही शिल्पं कोणार्कमधल्याच संग्रहालयात ठेवलेली आहेत.
काही मोठे दगडी भाग मंदिराच्या आवारात ठेवलेले आहेत. प्रचंड अवजड अशा लोखंडी कांबीही आहेत.
कोणार्कला जायचे कसे?
ट्रेन अथवा विमानाने भुवनेश्वर आणि तिथून मग बस (खाजगी बसेस सुटतात भुवनेश्वरहून). पुरी, कोनार्क एका दिवसात सहज होण्यासारखे आहे. भुवनेश्वर आणि पुरी इथे चांगली होवू शकेल. कोनार्कमध्ये काही विशेष हॉटेल्स नाहीत. भुवनेश्वरला राहणे उत्तम.
कोणार्कवरून पुरीला जाणारा रस्ता मात्र खूप सुंदर आहे. पूर्ण समुद्रकिनार्याच्या बाजूने हा रस्ता जातो. इथे वाटेमधे एका देवीच्या देउळ लागते. देवळाच्या आवारामधे एक डोल्फिनचा सांगाडा ठेवलाय. उग्र अशी कालीची मूर्ती आहे.हि कोळ्याची देवी आहे. त्यामुळे इथे देवीला प्रसाद म्हणून तळलेले मासे दाखवले जातात.
दरवर्षी डिसेंबरमध्ये इथे अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्याचा समारोह होतो. यात ओडिसी शैलीचीही नृत्ये असतात. कोणार्क इथला नृत्य महोत्सवसुद्धा पाच दिवसात भरवला जातो. नृत्य महोत्सव आणि त्याच्याच बरोबर होणारा हा सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल या दोन्ही उत्सवांची जगभरात नोंद घेतली जाते. भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकसुद्धा याकाळात इथे आवर्जून उपस्थित राहतात. नृत्य महोत्सव बघायला आलेल्या रसिकांना तिथून दोनच किलोमीटरवर असलेला सॅण्ड आर्ट फेस्टिवलसुद्धा बघता येतो. दुपारपासून वाळूशिल्पे करण्याचे काम सुरु होते आणि ते जवळजवळ सूर्यास्तापर्यंत पूर्ण होते. या कलाकारांची कला मनसोक्त अनुभवून आपण तिथेच २ कि. मी. वर असलेल्या डान्स फेस्टिवलला जाऊ शकतो, नव्हे जायचेच असते. हे दोन्ही उत्सव हाच तर ओडीशाच्या कलेचा मोठा खजिना आहे. नृत्य महोत्सव हा संध्याकाळी ६ वाजता सुरु होतो. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव केला जातो. मोठ्या हिरवळीवर रंगमंच उभारलेला असतो आणि त्याच्यासमोर स्टेडीयम सारखी बसण्याची व्यवस्था केलेली असते. देशभरातून कलाकार या उत्सवात आपली नृत्यकला सदर करण्यासाठी येत असतात. शिवाय खास ओडिसी नृत्याचा कार्यक्रम तर ठरलेला असतोच. या कार्यक्रमासाठी तिकीट आहे. ही तिकिटे अनेक हॉटेल्समध्येही मिळतात नाहीतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतातच. संपूर्ण अंधार आणि दिव्यांच्या रचनेमुळे उजळत जाणारे सूर्यमंदिर आणि त्याच्यासमोर होत असलेला हा नृत्य महोत्सव पाहून डोळ्याचे पारणे फिटते. ड्रोनद्वारे त्याचे होणारे चित्रीकरण आणि बाजूलाच असलेल्या दोन मोठ्या पडद्यावर दिसणारे त्याचे चित्रण फारच देखणे असते.
समुद्रावर वाळूत किल्ला करणे किंवा घर बांधणे हा प्रत्येकाचा अगदी आवडीचा खेळ असतो. केव्हा ना केव्हा आपण हा सुंदर खेळ वाळूत खेळलेला असेलही. पण याच खेळाचे शास्त्रोक्त आणि भव्य स्वरूप आपल्याला ओडिशा इथे या सँड आर्ट फेस्टिवल मध्ये बघायला मिळते. वाळूशिल्प ही कला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर गेलेली दिसते. ओडिशा सरकारच्या या उपक्रमामुळे कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले जाते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज एक संकल्पना घेऊन वाळूचे शिल्प करायचे असते. गेल्या वर्षी भुवनेश्वरमध्ये विश्वचषक हॉकीचे सामने खेळले गेले. त्यामुळे तिथे वारसा, महिला सक्षमीकरण, प्लास्टिकचा भस्मासुर यासोबत हॉकी ही सुद्धा संकल्पना ठेवलेली होती. प्रत्येक कलाकाराने या संकल्पनेनुसार शिल्प करायचे असते. त्यांना त्याच्यासाठी पाच तासांचा वेळ दिला जातो. वाळूशिल्पे करताना ती भुसभुशीत होऊ नयेत म्हणून मधून मधून त्याच्यावरती पाणी शिंपडले जाते. याकामी अनेक स्वयंसेवक कलाकारांना मदत करत असतात. पर्यटकांना सुद्धा वाळूशिल्पे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक तिथे पाहता येते.
सॅण्ड आर्ट म्हणजे वाळू शिल्पकला हळूहळू भारताच्या विविध प्रांतात आता प्रसिद्ध होऊ लागली आहे. दरवर्षी इथल्या उत्सवामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ इथल्या कलाकारांचा सहभाग असतो. त्याचसोबत श्रीलंका, जपान, इटली, जर्मनी, स्पेन, नॉर्वे या देशातील कलाकार सुद्धा इथे हजेरी लावतात आणि आपली वाळूशिल्प कला सादर करतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील काही कलाकार सुद्धा इथे आपली वाळूशिल्प कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. आपल्याकडे कोकण पर्यटनात वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर इथल्या समुद्र किनाऱ्यावरसुद्धा वाळूशिल्पे साकारली जाऊ शकतात. मात्र आपल्याकडे सर्वथरात असलेली कमालीची उदासीनता याच्या मुळावर आलेली दिसते. ओडिशा सारखे छोटेसे राज्य आपल्याकडे असलेल्या वारशाचे इतके सुंदर मार्केटिंग करत असताना आपले राज्य मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसते.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे एका खग्रास सूर्यग्रहणाचा मार्ग कोणार्कवरून गेला होता.
मायादेवी मंदिर
हे ओडियाच्या शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत आणि यांच्यावर एकेकाळी प्लॅस्टर केलेले होते तसेच या पुतळ्यांना गडद लाल रंगात रंगवलेले होते असे मानले जाते.
विष्णू मंदिर
विष्णु मंदिर मुख्य सुर्य मंदीराच्या परिसराच्या दक्षिण-पश्चिम कोपर्यात आहे.हे छोटे मंदिर 1956 मध्येच सापडले. मंदिरात भगवान विष्णूची मुर्ती आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की कोणार्क येथे केवळ सूर्याचीच पूजा केली जात नव्हती. आज या मंदिराचे थोडे अवशेष दिसतात.
नवग्रह मंदिर (नऊ ग्रह मंदिर)
कोणार्क मंदिराच्या आवारातच हे एक नवग्रह मंदिर आहे. इथे अजून पूजा चालते. मात्र इथे जर गेलं तर खास ओरिसाच्या पंड्याचा अनुभव येतो. आठवड्यातून कधीही जा..आज अमुक वार है, अमुक ग्रहका वार. पूजा कराईये बस्स पाचसो रूपयेमे, आप दान धरम करेंगे तो गरीब ब्राह्मण भोजन करेगा.. " असे सांगून पैसे उलळले जातात. ओरिसामधे फिरताना या पंड्यापासून फार जपून फिरावे लागते. हातोहात लुटत जातात ते.

नवग्रह मंदिर ६ मीटर लांब, १.२ मीटर उंच आणि २ मीटर आकाराचे असून येथे एक प्रचंड दगडी शिळा ठेवण्यासाठी हे बांधले गेले. काळ्या क्लोराईट दगडात नऊ ग्रहांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत; सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू. नवग्रहदेवता कोरलेल्या एका प्रचंड आडव्या तुळईसारख्या शिळेला नवग्रहशिळा म्हणतात. ही नवग्रहशिळा मंदिराचे रक्षण करते असे मध्ययुगीन स्थापत्यात मानले जात होते ओदिशातील बहुतेक मंदिरात प्रवेशद्वारापाशीच अशी नवग्रहशिळा दिसून येते. मुख्यशाळेच्या म्हणजेच जगमोहनच्या समोरील दरवाज्यावर सुमारे १८ फुटांवर एक सजलेली नवग्रहशिळा बसवलेली होती. क्लोराईटची ही शिळा १९ फूट १० इंच लांब, ४ फूट ९ इंच रुंद आणि ३ फूट ९ इंच उंच आहे आणि हिचे मूळ वजन २६.२७ टन होते. इ. स. १६२८ मध्ये खुर्दाच्या तत्कालीन मांडलिक राजाने (याचे नाव देखील नरसिंह देव असे होते) ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता.
"नवग्रहशिळेवरील प्रतिमा कोरण्याचे काम मात्र नीट केलेलं नाही. बर्याच प्रतिमा समूहाने एकाच आकारात बनवलेल्या वाटतात. बहुतेक मूर्तींच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून उंच टोकदार मुकुट घालून कमळावर बसलेल्या दिसतात. पुराणात याचे स्पष्टीकरण सापडते.
कठोर काळाच्या फेर्यातून मात्र नवग्रहशिळा देखील काही सुटली नाही आणि फार काळ ती आपल्या जागी स्थिर राहू शकली नाही. १९व्या शतकाच्या शेवटी बंगाल एशियाटिक सोसायटीच्या सभेच्या वेळी समुद्रतीरापर्यंत ट्रामगाडीची सेवा सुरू करताना बंगाल सरकारने शिळा कलकत्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमतेम २०० फूट ती वाहून नेल्यावर त्यांच्याकडील निधी संपून गेला. नंतर पुन्हा काही वर्षांनी तसाच प्रयत्न झाला. वाहून नेणे सोपे जावे म्हणून शिळेचे दोन भाग करण्यात आले. तरीही प्रचंड वजनामुळे आणि वालुकामय मार्गामुळे ती काही हालवता आली नाही. शेवटी दोन फर्लांगावर ती सोडावी लागली. इथे ती साठ वर्षांपेक्षा जास्त काळ पडून होती. अगदी अलीकडे भारत सरकारने कोणार्क मंदिराच्या आवाराजवळच एका मंडपात तिची स्थापना केली. सध्या शिळेचा मोठा भाग आवाराबाहेर आग्नेय दिशेला आहे. आतां दर शनिवारी तसेच मकरसंक्रातीला अनेक लोक या शिळेची म्हणजे नवग्रहांची होमहवनादी पूजा करून नैवेद्य अर्पण करायला कोणार्कला जमतात. " अशी माहिती मिळते .
कोणार्कला भेट देणार्यांपैकी ९९% लोक नवग्रह मंदिर हे मंदिर भेट देत नाहीत.सुर्य मंदीर संकुलाच्या अगदी उत्तरेला हे मंदीर आहे.मुख्य आवारातून बाहेर पडल्यानंतर लगेच डावीकडे वळून इथे पोहोचू शकता.
कुशभद्रा नदीच्या किनार्यावर हे रामचंडी मंदिर आहे. या मंदीरात रामचंडी देवीची मुर्ती असून ती कोणार्क क्षेत्राची रक्षक देवता मानली जाते.
भृंगेश्वर मंदिर, बजरकोट, ओडिशा
भृंगेश्वर मंदिर भारत के ओडिशा में अंगुल जिले के रेंगाली दमसाइट ब्लॉक के बजरकोट गांव में स्थित भगवान शिव को समर्पित एक हिंदू मंदिर है । मंदिर ब्राह्मणी नदी के दाहिने किनारे पर स्थित है। यह मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा राष्ट्रीय महत्व के स्मारकों के रूप में संरक्षित है।
इतिहास
माना जाता है कि इस मंदिर का निर्माण 9वीं शताब्दी ईस्वी में भौमकरों के सामंत कोडालका मंडल के सुल्कियों द्वारा किया गया था। यह मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा राष्ट्रीय महत्व के स्मारकों के रूप में संरक्षित है।
मंदिर
यह मंदिर पूर्व की ओर मुख किए हुए है और एक कम ऊंचे चबूतरे पर खड़ा है। यह मंदिर वास्तुकला की पंचायतन शैली का अनुसरण करता है। पंचायतन एक स्थापत्य शैली है जहां मुख्य मंदिर एक ऊंचे मंच पर बनाया गया है जिसके चारों कोनों पर चार छोटे सहायक मंदिर हैं और इसे कुल पांच मंदिर बनाते हैं। मुख्य मंदिर योजना पर त्रिरथ और ऊंचाई में त्रिंगाबाड़ा है।
मुख्य मंदिर में रेखा विमान और पीठा जगमोहन हैं। योजना पर विमान वर्गाकार है जबकि योजना पर जगमोहन आयताकार था। मंदिर के सहायक मंदिर भी योजना पर वर्गाकार हैं। जगमोहन के स्तंभों और सहायक मंदिरों के पभाग मोल्डिंग के कुछ हिस्सों को छोड़कर जगमोहन और कोने के मंदिर पूरी तरह से खो गए हैं।
गर्भगृह पीठासीन देवता, भृंगेश्वर को एक गोलाकार योनिपीठ के भीतर शिव लिंग के रूप में स्थापित करता है। मंदिर के बाहरी हिस्से को लकुलिसा, अर्धनारीश्वर, पार्वती, अजा एकपाद, विभिन्न देवताओं, कामुक जोड़ों, कामुक दृश्यों, स्क्रॉल वर्क के साथ उकेरे गए पायलटों के डिजाइन, स्क्रॉल वर्क, कनिका पागा में वज्रमुंडी आलों, पुष्प रूपांकनों और ज्यामितीय पैटर्न से सजाया गया है।
समारोह
सीतलसस्ती, शिवरात्रि, कार्तिक पूर्णिमा और बड़ा उषा यहाँ मनाए जाने वाले त्यौहार हैं।
कनेक्टिविटी
मंदिर रेंगाली प्रोजेक्ट टाउन न्यू बस स्टैंड से लगभग 8 किलोमीटर, रेंगाली प्रोजेक्ट टाउन से 8 किलोमीटर, रेंगाली बस स्टैंड से 8 किलोमीटर, रेंगाली बांध से 10 किलोमीटर, तालचेर से 47 किलोमीटर, तालचेर रेलवे स्टेशन से 51 किलोमीटर, 53 किलोमीटर की दूरी पर स्थित है। अंगुल रेलवे स्टेशन से, अंगुल से 59 किलोमीटर, भुवनेश्वर से 169 किलोमीटर और भुवनेश्वर हवाई अड्डे से 175 किलोमीटर। मंदिर तालचेर से रेंगाली बांध पर स्थित है।