अरुणाचल
प्रदेश हे ईशान्य भारतातील राज्यामध्ये आकाराने सर्वात सर्वात मोठे राज्य
असुन त्याचे क्षेत्रफळ ८३७४३ चौरास किलोमिटर इतके आहे. हे राज्य म्हणजे
भारताची संरक्षक भिंत असुन याच्या पश्चिमेस भुतान, उत्तरेस नेपाळ, इशान्येस
चीन आणी पुर्वेला बर्मा हे देश आहेत. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सीमेनी
(१६८० कि.मि) वेढलेले असे हे राज्य आहे. १९७२ पर्यंत या भुभागास (NEFA)
North East Frontier Agency असे संभोधण्यात येत असे. २०/०१/१९७२ ला यास
केन्द्र शासीत प्रदेश म्हणुन मान्यता मिळाली व २०/०२/१९८७ रोजी हे भारताचे
स्वयंपुर्ण राज्य म्हणुन अस्तित्वात आले.
इथे अनेक धार्मीक स्थळे आहेत. मोठ्या संख्येने यात्रेकरु येथील तवांग मधील बुध्दधर्मीयांसाठी सर्वोच्च असलेल्या मठापैकी एक असलेल्या मठात येत असतात. त्याच प्रमाणे लोहीत जिल्यातील परशुरामकुंड, दिबांग जिल्यातील रुक्मीणीचे जन्मस्थान असलेले भिष्मक नगर, पश्चिम सियांग जिल्ह्यातील मालिनिथान व इटानगर ही अरुणाचल ची राजधानी असलेल्या शहरातील इटाफोर्ट येथे यात्रेकरु व पर्यटक नियमीत येत असतात. झिरो जिल्यात नुकतेच २८ फुट उंच व २२ फुट व्यास असलेले विशाल शिवलिंग सापडले असुन तेथे ही पर्यटकांचा ओघ सुरु झाला आहे.
परशुरामकुंडात स्नान करण्यासाठी मकर संक्रांतीला इथे भाविकांची मोठि गर्दी उसळते. गेल्या वर्षी ही संख्य ६०००० होती. बहुतेक यात्रेकरु मणिपुर, महाराष्ट, राजस्थान, बिहार, आसाम, अरुणाचल, उत्तर प्रदेश या राज्यातुन आले होते.
कालीका पुराणात व महाभारतात देखिल अरुणाचल चा उल्लेख आहे. पुराणातील प्रभु पर्वत म्हणजे आजचे अरुणाचल. येथे व्यास मुनींनि ध्यान धारणा केली. परशुरामाने आपले पाप क्षालन केले तेही येथेच व कृष्णाचे रुक्मीणीशी लग्न झाले तेही येथेच.
प्रशासनीय दृष्ट्या या राज्याचे १६ जिल्हे आहेत. सगळ्या जिल्ह्याची नावे ही येथील नद्यांच्या नावाने दिली गेली आहेत. ति जिल्हे खालील प्रमाणे:- १) तिराप २) चांगलांग ३)लोहीत ४) आन्जॉ ५) दिबांग व्हैली ६) लोअर दिबांग व्हैली ७) ईस्ट सियांग ८)अप्पर सियांग ९) वेस्ट सियांग १०) अप्पर सुबानसिरि ११) लोअर सुबानसिरी १२) कुरुंग कुम्ये १३) पापुम्पारे १४) ईस्ट कामेंन्ग १५) वेस्ट कामेंन्ग व १६) तवान्ग
२००१ च्या लोकगणनेनुसार या राज्याची लोकसंख्या १० लाख ९७ हजार ९६८ इतकी होती. येथे २० उप-विभागीय केन्द्रे, १०८ सर्कल्स, २० मुख्य शहरे व ३८६३ गावे आहेत. येथील साक्षरतेचे प्रमाण ५४.७४% आहे.
अरुणाचलचे लोक
अरुणाचलमध्ये २६ मुख्य जनजाति तर १०७ पोट जमाति आहेत. मुख्य जनजातित ठळक अशा जनजाती म्हणजे मोन्पा, शेर्दुक्पेन, आका, मिजि, निशी, अपातानी, पहाडी मिरि, तागिन, गालो, आदि, मेम्बा, कम्बा, इदु, मिश्मि, दिगारु मिश्मि, मिजो मिश्मि , तन्ग्सा, तुसा, वान्चो, नोक्टे, खाम्प्ति, सिन्ग्पो इत्यादि. यातील मोन्पा, शेर्दुक्पेन, खाम्प्ति, सिन्ग्पो व मेम्बा या जमाती बुध्दिस्ट आहेत. हिनायना व महायना सारखे प्रवाह निरनिराळ्या जमातीत प्रबळ आहेत. आणि ते प्रामुक्याने तवान्ग, वेस्ट कामेन्ग , अप्पर सुभानसिरि, वेस्ट सियांग, अप्पर सियान्ग आणि लोहित व चान्गलन्ग जिल्ह्यातील काही भागात वसलेले आहेत. नेफा च्या काळापासुन ज्या चकमा जमातिचे पुनर्वसन तात्पुरते चान्ग्लान्ग जिल्ह्यात केले गेले होते ते बुध्द धर्मिय आहेत. तानी हे स्वत:ला आबोतानी चे वंशज मानतात व आबोतानी हे पृथ्वीवरिल प्रथम मानव होते असा त्यांचा विश्वास आहे. निशि, गालो, आदि, तागिन, पहाडी मिरी व आपातानी हे देखिल स्वतःला याच वंशावळीचे मानतात.
तानी जमातिचे लोक "दोनी" व "पोलो" म्हणजे सुर्य व चंद्र यांना सर्वोच्च देव मानतात.
तिरप जिल्ह्यातील वानजिल्ह्यातील, तुत्सा तर चांगलांग जिल्ह्यातील तांगसा, सिंग्फो या जनजातीत रंगफ्राईजम चळ्वळ जोरात सुरु आहे. रंगफ्रा हा त्यांचा सर्वोच्च निर्माता.. 'रंग' म्हणजे पृथ्वीचे संचालन करणारी शक्ती आणि 'फ्रा' म्हणजे विश्वास, शांती, त्याग, श्रध्दा. बुध्दाला मानणारे सोडले तर सर्वच जनजातींमध्ये पशुबळी हा धार्मीक विधिचा एक भाग आहे. घरातील आजारी व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्याच्या स्थानीक दैवतेला साकडे घालण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी त्यांच्या स्थानिक देवतेला संतुष्ट करण्यासाठी पशु बळी देणे ही सर्वच जनजातीमध्ये नियमीत प्रथा आहे.
प्रत्येक जनजातीमध्ये त्याचा स्वतंत्र धर्मगुरु असतो. आणी तो विशिष्ठ संप्रदाय त्या धर्मगुरुचा आदर करतो कारण त्याच्यामध्ये जन्मतःच काही दैवी शक्ती आहेत अशी त्यांची श्रध्दा असते. हे धर्मगुरु दैवी शक्ती असलेले, विशुध्द अंतःकरणाचे, आणि स्वर्गीय मनाचे असतात. ते कुठलेही लेखी साहित्या च्या आधारा शिवाय मंत्र पठण करु शकतात. आपल्या दैनंदिन समस्यासाठी या समुदायाचा मोठा वर्ग या धर्मगुरुंचा सल्ला घेतो.
येथील लोक शेतीशी संबंधीत सण हे उत्साहाने साजरे करतात. हे उत्सव ते देवाला भविष्यातील भरभराटीसाठी आणी भरघोस पिकासाठी आशिर्वाद मागण्यासाठी व आभार मानण्यासाठी असतात. या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत. जसे मोपीन, सोलुन्ग, लोस्सर, द्री, सि-डोनी, न्योकुम, रेह. इ. संपुर्ण जनजाति हे उत्सव साजरे करण्यासाठी येतात. यात पारंपारिक वेषभुशा करुन केलेले नृत्य, पशु बळी देणे, घरी बनविलेले पारंपारिक मद्य प्राशन, व सर्व समुदायाला जेवण ह्याचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.
धर्मांतरण
ब्रिटिश राजवटित हे राज्य इतर इशान्यभारतातील राज्याच्या विपरित, ख्रिश्चन धर्मप्रचारकाच्या धर्मांतरण कारवायां पासुन पुर्णपणे मुक्त होते. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर धर्मप्रचारकांनी या पहाडी प्रदेशांतिल काही कप्प्यांना आपल्या कारवायांचे लक्ष्य बनविले. लगेच येथील जनजातींना आपल्या वेगळ्या संस्कृति वर व शांत सामाजिक जिवनावर धर्मप्रसारकांच्या होत असलेल्या आक्रमणाची जाणीव होउ लागली. त्यांनी या विरुध्द १९७४ मध्ये लढा उभारला आणि धर्मप्रसारकांना राज्यापासुन दुर ठेवण्यात पुढील २ दशके तरी यशस्वी झाले.
राज्याच्या पश्चिम व मध्य भागात ख्रिश्चन मिशनर्यांचे अस्तित्व व धर्मांतरणाचा वेग हा या लढ्यामुळे नाममात्र राहीला. मिशनर्यांनी मग आपल्या या कामाच्या व्युहरचनेमध्ये बदल करुन अरुणाचल - आसाम या सिमावर्ती भागात अरुणाचली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक संस्था स्थापन करण्याचा सपाटा लावला. त्यांनी ओडलगुडी जिल्ह्यातजिल्ह्यातील, नॉर्थ लखिमपुर जिल्ह्यातील हरमोती, सोनित्पुर जिल्ह्यातील बालिपारा , धेमाजी जिल्ह्यातील सिलापथार, तिन्सुखीया व दिब्रुगढ इत्यादी ठीकाणी वस्तिगृहाची स्थापना करुन विध्यार्थ्यांना त्यांच्या रानटी परंपरेपासुन तुम्ही कसे वेगळे आहात हे बिंबविण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांचा धर्म आधुनीकतेच्या नावाखाली बदलविण्यास भाग पाडले. मग या सुशिक्षीत झालेल्या नव ख्रिश्चनांनी येथील राजकारणी नेते व सरकारी अधिकार्यांवर प्रभाव टाकुन त्यांना ख्रिश्चन धर्मप्रचारकांच्या कारवायांबद्दल अनुकुल मत तयार केले.
यानंतर ख्रिश्चन मिशनर्यांना जरी राज्यात प्रवेश बंदी होती तरी देखील परिस्थीती इतकी बदलली कि राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी मदर टेरेसा यांना याचुली येथे चर्च संस्था उघडण्यास १९९८ मध्ये परवानगी दिली. आज अरुणाचल्या प्रत्येक कानाकोपर्यात ख्रिश्चन मिशनर्यांचा वावर आहे. आज येथे धर्मांतरणाचा वेग वाढतो आहे. २००१ च्या जनगणनेनुसार ख्रिश्चनांचे प्रमाण हे राज्याच्या लोकसंख्येच्या २२% इतके आहे व ते आज सुमारे २५% पर्यंत पोचले आहे.
चर्च चे मुख्य लक्ष्य हे प्रामुख्याने येथील जनजातीचे धर्मगुरु हे असतात कारण त्यांचा जनजातिवर प्रभाव असतो. काही धर्मगुरुअ हे त्यांना दिल्या गेलेल्या आमिषाला बळी पडतात. धर्मांतरणाचा येथील वाढता वेग ही येथील गंभीर बाब आहे आणि हे असेच चालु राहीले तर हे राज्य ख्रिश्चन राज्य होण्यास विलंब राहणार नाही आणि तसे झाल्यास तो देशाच्या एकात्मतेला धोका होउ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.
The National Socialist Council of Nagalim (NSCN) या संघटनेने अरुणाचलच्या अर्ध्यी भागावर तो ग्रेटर नागालीम चा भाग असल्याचा दावा केला आहे. बंडखोर गटांनी तयार केलेल्या नकाशात अरुणाचलचे सहा जिल्हे हे त्याचे असल्याचे दर्शविले आहे. ही तीच सघटना आहे जीचे घोष वाक्य "Nagaland for Christ" आहे. त्यांना सभोवतालचा प्रदेश हा त्यांच्या राज्यात सामील करावयाचा आहे. या संघटनेने तिराप व चांगलांग जिल्ह्यातील बर्याच तरुणांना आपल्या संघटनेत भरती करुन घेतले आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ही काळजी करण्यासारखी आहे.
अरुणाचल प्रदेशाचे पहिले लेफ्ट. गवर्नर हे के.ए.ए.राजा हे होते. त्यांनी ख्रिश्चन मिशनर्यांपासुन या भुभागाचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच काळात येथे District Art and Curture Officer(DACO) चे पद निर्माण करण्यात आले आणि प्रत्येक जनजातीचे वेगळे सांस्कृतिक मंडळ निर्माण केले. या द्वारे प्रत्येक जमातिचा वैशिष्ट्यपुर्ण सांस्कृतीक वारसा जतन व विकसित करण्याला प्रोत्साहन मिळाले. त्यांनी रामकृष्ण मिशन व विवेकानंद केन्द्रांना अरुणाचलात आमंत्रित केले व त्यांना येथिल निरनिराळ्या भागात शाळा व वैद्यकिय प्रकल्प सुरु करण्यास प्रोत्साहीत केले.
"स्त्री सक्षम झाली तर घर सक्षम होईल" या विचाराने विवेकानंद केंद्र आज अरुणाचलमध्ये चार ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षण केंन्द्र चालवित आहे. शिवणकाम, विणकाम, लोणची, सॉस - जैम बनवणे, कापड विणने हे शिकवलं जाते. कोवळ्या बांबूचलोण्ण्चं इथे खुप प्रसिध्द आहे. या चार केन्द्रामधुन सुमारे ५०० च्या वर मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे.
दिवंगत तालोम रुक्बो
श्री तालोम रुक्बो हे येथील एक महान द्र्ष्टे व्यक्तिमत्व होते. त्याची येथील बदलत्या वातावरणावर बारीक नजर होती व येथील धर्मांतरणाच्या कार्यकलापाला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय करण्यात प्रयत्नशील होते. त्यांनी 'तानी' जनजाती मानत असलेली 'दोनी-पोलो' ही धर्मश्रध्दा लोकप्रिय करण्याचा निश्चय केला.त्यांनी जर्मनी येथे १९८६ मध्ये झालेल्या धर्मसभेत 'दोनी-पोलो" धर्माचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी पासीघाट येथे १९८९ मध्ये 'गांगीन' (प्रार्थना केंन्द्र) स्थापन केले व आपल्या भाषेत प्रार्थना गीताची रचना केली. त्यांनी 'आदि' जनजातीच्या स्थानीक श्रध्दा व संस्कृती जपण्यासाठी 'दोनी-पोलो' येलम केबान्ग' या' संस्थेची स्थापना केली.
अरुणाचलातील चांगलांग व तिरप या जिल्ह्याचे स्थान वैशिष्ट्यपुर्ण आहे. आसाम व नागालैंड या राज्यांमधील हा चिचोळा भूप्रदेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांवर नागा भुमीगत संघटना दावा सांगत आहेत. तो प्रत्यक्षात यावा म्हणुन बंदूकीच्या जोरावर या जिल्ह्यातील जमातीचे पाश्चात्यीकरण करण्याचा विडाच, या भूमीगत संघटनेने उचलला आहे. या पाश्चात्यीकरणाचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने 'रंगफ्रा' चळवळीद्वारे होतो. या दोन्ही जिल्ह्यात रंगफ्रा' देवतेची ६२ मंदिरे उभारली गेली आहेत. ७० हजार नागरिक या चळवळीत सामील आहेत. रंगफ्रा मंदिरामध्ये दर रविवारी प्रार्थना होते, त्याचप्रमाणे घरोघरी पूज व रंगफ्रा देवतेच्या प्रतिमेपुढे आपल्या प्रथेप्रमाणे दिवाही लावला जातो. २००४ मध्ये एन.एस.सी.ए. च्या बंडखोरांनी २ रंगफ्र मंदिरे उध्वस्त केली. परंतु स्थानिक जनतेने दहशतीचे वातावरण असुनसुध्दा त्या मंदिरांची पुनर्बांधणी केली.
अरुणाचलमध्ये निशी जनजाती ही प्रमुख असुन ख्रिश्चन मिशनृयांची ती प्रथम लक्ष्य बनली . आज या जनजातीचे ५०% लोक हे ख्रिश्चन झालेले आहेत मात्र जनजागृती च्या विविध चळवळीने यांच्या मध्येही अस्तित्व गमावल्याची भावना निर्माण होत आहे. व त्यांचा परतिचा प्रवास सुरु झाल्याच्या बातम्या येत असतात. चर्च चा प्रयत्न अर्थात च याला मोडता घालण्याचा दिसुन येतो. त्या साठी ते कोणताही मार्ग अवलंबण्यास तयार असतात.
पंतप्रधान श्री मनमोहन सिंह यांची भेट या राज्याला झाल्यानंतर बराच विश्वास येथे निर्माण झाला आहे. पण ह्या भेटी वारंवार झाल्यास येथील लोकांच्या मनात भारत आपल्या पाठीशी आहे ही भावना दृढ होइल व येथील स्थानिक चळवळीला बळ मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री श्री दोरजी खन्डु यांनी देखिल पर्यटकाना मोठ्या प्रमाणात या सुंदर राज्याला भेट देण्याचे आव्हान केले आहे. भारतातील पर्यटकांचा ओघ जसजसा वाढेल तसतसा येथे सुरु असलेल्या चोरट्या कारवाया देखील पितळ उघडे पडण्याच्या भितीने कमी होतिल यात शंका नाही.
अरुणाचलची राजधानी इटानगर होण्याआधी १० कि.मी. आधी नहरलगुन येथे शासकीय कार्यालये होती. त्यामुळे हे शहर मुख्य आहे. येथे हेलीपैड असुन केन्द्रीय मंत्री किंवा अन्य उच्चाधिकारि प्रथम येथे येतात. येथुन बोमडीला येथे जाण्यासाठी लहान बसेस जातात. संपुर्ण प्रवास हा रात्रीचा असतो. सकाळी ६ वाजता निघणारी बस ही बोमडीला येथे दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता पोचते. अरुणाचल सिमेतुन निघुन ही बस आसाम च्या सखल प्रदेशात प्रवास करुन पुन्हा अरुणाचल सीमेत प्रवेश करते. त्यामुळे रात्री दोनदा चेकींग होते. अरुणाचल सीमेतुन पापेनपारे जिल्ह्यातुन बाहेर निघुन आसाम मधील सखल प्रदेशातील प्रवास केल्यानंतर पुन्हा बस वेस्ट कामेंग जिल्ह्यात प्रवेश करते. बुलढाण्याचे वन अधिकारी श्री बेडेकर यांचे अपहरण याच जिल्ह्यात झाले होते. हा जिल्हा पुर्ण पहाडी आहे. एका बाजुला कडा आणी दुसर्या बाजुला नदी यामधील लहानशा रस्त्यातुन बस मार्ग आक्रमण करीत असतांना झोप लागणे शक्य नसते. त्यात रस्त्यावर २-३ फुट चिखलात बस बरेचदा अडकते व चिखल साफ होत पर्यंत थांबुन राहते त्यामुळे संपुर्ण प्रवास हा थरारक असतो.
वाटेत दिसणारी झुम

हिमालयाच्या पर्वत रांगा

बोमडीला च्या ८ हजार फुट उंचीचा चढ चढत असतांना बसचा वेग १० कि.मी इतका असतो

बोमडिला सभोवतालची गावे व तेथे जाणारे वळणदार रस्ते


गावात जाणारे वळणदार रस्ते

विलोभनीय बोमडीला

एकी कडे खोल नदी व दुसरीकडे पहाड त्यात पाउस आणि वारंवार रस्त्यावर साचणारा चिखल यातुन मार्गक्रमण म्हणजे चालकाची कमाल होती.


मठावरुन दिसणारी मनमोहक दृश्ये

मठधिपती व तेथील भिख्खुंचे निवास स्थान

महाराष्ट्राचे लाडके गायक सुधिर फडके यांचे मानस पुत्र दिपकजी यांची भेट बोमडिला येथे होणे हा एक दुग्ध सर्करा योग. त्यांच्या घरी जेवण व अण्णा(बाबुजी) यांच्या प्रतिभा आणि प्रतीमा मध्ये झालेल्या कार्यक्रमाची १ तासाची बैठक पहावयाला मिळाली ही तर मला मेजवानी च होती. दिपक जी हे शुध्द मराठी बोलतात हे वेगळे सांगणे न लगे. ते बोमडिला येथे राज्याच्या उद्योग विभागात जॉइंट डायरेक्टर आहेत् दोन वर्षानंतर ते त्यांच्या मुळ गावी तवांग येथे राहणार आहेत.

त्यांच्याच घरी पुण्याचा ह्रुषिकेश दिवेकर या तरुणाची भेट झाली. हा तिथे गेल्या ३ वर्शांपासुन हिन्दी शिकवतो व ९ आणि १० वि च्या विद्यार्थ्यांचे निषुल्क गणिताचे वर्ग घेतो हृषीकेश दिवेकर हा तेथील शाळेत प्राचार्य पदाचीही जवाबदारी सांभाळतो.

शशीधर भावे यांची भेट ही माझी नुकतीच पुण्यात झाली होती व त्यांचेसोबत मुंबई ला मी इशान्य भारतातील विध्यार्थ्यांच्या वस्तिगृहाच्या व्यवस्थापकांच्या बैठकी साठी गेलो होतो व परत बसने येतांना त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. पंचाहत्तरीला पोचलेला हा उत्साही तरुण मला पाहताक्षणीच भावला. अरुणाचलला त्यांचा इतका प्रवास झाला होता की ते म्हणजे अरुणाचलचे चालते बोलते माहितीचे आगार.
नहरलगुन ला पोचल्या नंतर मी प्रदिपजींना वर्णेकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी स्वत; तिकडे आपण जाउ म्हणुन मान्यता दिली. माझे तेथील काम आटोपल्यानंतर मी त्यांना वर्णेकरांना भेटण्याबद्दल मी मोकळा असल्याबद्दल सांगितले. त्यांनी लगेचच तेथील एक कार्यकर्ते, चंद्रपुरचे उत्तम इंगळे यांना मला घेउन येण्यास सांगीतले.व ते स्वतः पुढे गेले.
नहरलगुन येथुन पार्वतीपुर ला जातांना लागणारी ब्रम्हपुत्रेचे उपनदी 'डिक्राम'
नहरलगुन हुन १० कि.मी.वर आसाम सीमेचे ठाणे आहे तेथुन १ कि.मी वर पार्वतीपुर गाव आहे तेथे श्री अशोक वर्णेकर यांची भेट झाली. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपण खुप जुने मित्र असल्याची माझी भावना झाली. आश्चर्य म्हणजे ते मुळचे नागपुरचे व त्यात ही मी जेथे १० वर्षे काढली त्या अभ्यंकर नगर मधील. मग काय बरीच मंडळि हि त्यांची व माझी कॉमन ओळखीची निघाली व गप्पा खुप रंगल्या. त्यात कळलेली माहिति रोचक तर होतीच पण ध्येयाने पछाडलेला माणुस काय करु शकतो ह्याचे मुर्तिमंत उदाहरण माझ्या समोर होते.
सुमारे वीस वर्षापुर्वी वर्णेकर दांपत्य मुंबईला एका॑ चांगल्या पगाराच्या प्राध्यापकाच्या पदावर कार्यरत होते. नुकतेच लग्न झालेले त्यामुळे संसार ही छान चालला होता. पण ध्येय वादी माणुस हा चाकोरीतील नोकरीत कायम अस्वस्थ असतो. तसेच हेही होते. त्यावेळी विवेकानंद केंन्द्राची अरुणाचल मध्ये काम करण्याची इच्छा असलेल्यांना नोकरी साठी अर्ज करण्याबद्दल जाहिरात पेपर मध्ये त्यांनी वाचली आणि दोघांनीही चांगल्या पगाराचि नोकरी सोडुन देण्याची तयारी दाखवित अर्ज केला. त्यांना लगेच नियुक्तीबाबत पत्र आले व दोघेही नहरलगुन ला रुजु झाले. २-३ वर्षातच त्यांना मनासारखे करता येत नसल्याची जाणीव झाली व स्वत; शाळा सुरु करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. लगेच त्या अनुषंगाने जागेचा शोध सुरु झाला व सुदैवाने त्यांना हवी असलेली जागा त्यांना भाड्याने मिळाली. विवेकानंद केन्द्राची नोकरी सोडुन त्यांनी शाळा सुरु केली. शाळा मनासारखी सुरु झाली होती लोकांचा प्रतिसाद ही उत्तम होता पण २-३ वर्षानी जागा मालकांनी ती जागा चांगली ऑफर आल्याने विकायचा निर्णय घेतला. या दांपत्याने धीर सोडला नाही. त्यावेळी म्हणजे १३-१४ वर्षापुर्वी त्यांनी थोडे बहुत पैसे जमा केले होते. त्यांनी स्वत्;ची जागा घेण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या जागेचा शोध पुनः सुरु झाला. अरुणाचल सीमेपार आसाममध्ये पार्वतीपुर या छोट्या खेड्यात त्यांना मनासारखी १ एकर जागा नजरेत आली ती त्यांनि विकत घेतलि दहा हजार रुपयात. व तेथे राहण्यासाठी व शाळेसाठी अशी एक लांब लचक झोपडी शाकारली. विध्यार्थ्यांचा प्रश्न होता कारण ते एक लहानशे खेडे होते. त्यांच्या शाळेतील आज असलेल्या विध्यार्थ्याबाबत हि एक ईतिहास आहे.
ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांना आसाम मध्ये चहाचे मळे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता लागली. त्यांनी भारताच्या निरनिराळ्या आदिवासि भागातुन मजुर गोळा करुन त्यांना मळ्याच्या कामासाठी लावले. हे मजुर, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार उत्तरप्रदेश आदि राज्यातुन आणले गेले. त्यांना तेथेच वसवले गेले. कालांतराने अनेक वर्षे एकत्र राहिल्याने त्यांचे संक्रमण झाले. या संक्रमणातुन निर्माण झालेली आजची ही जमात 'समदी' म्हणुन ओळखली जाते. आजही हे चहाच्या मळ्यात काम करतात तसेच इतरही तत्सम काम करुन आपली उपजिवीका करतात.
वर्णेकरा दांपत्यानी या मुलांना शिक्षण देण्याचे ठरविले. आज या शाळेत १५०-२०० इतके विद्यार्थि असुन येथील शिक्षक देखील याच शाळेतुन शिकुन शिक्षक झाले आहेत. आज येथे त्यानी मुलासाठी निरनिराळे वर्गासाठी वेगळे कक्ष बांधले आहेत. शिक्षकांसाठी कक्ष, त्यांच्या श्रध्दास्थानाचे मंदीर वगैरे सुविधा केलेल्या आहेत.
त्यांची मुले देखील याच शाळेत शिकली. पुढील शिक्षण देखील इटानगर येथे पण इथुन जाउन येउन पुर्ण केले राहुनच त्यानी घेतले. त्यांची एक मुलगी पायलट असुन मुलगा हा बेंगलोरल इंजिनीअर त्यांची वृध्द आई नागपुर ला असते तीची सेवा व्हावी या उद्देशाने दोघांपैकी एक आलटुन पालटुन नागपुरला तिच्या जवळ राहतात. त्यावेळि शाळेचि व्यवस्था दोघांपैकी एक सांभाळतात. मी गेलो तेंव्हा सौ. वर्णेकर या पाहुण्यांसोबत गुवाहाटी ला गेल्या होत्या त्यामुळे त्यांची भेट होउ शकलि नाही.
श्री अशोक वर्णेकर आपल्या स्वप्नपुर्ती चे स्वरुप पहातांना
अशोक वर्णेकर व मागे त्यांचे कार्यालय व घर
सनदी मुले मधल्या सुट्टीत
शिक्षकांसाठी खोली
येथील लोक शिवाला मानतात त्यामुळे शाळेतील शिवमंदिर. विध्यार्थी या मदिराकडे तोंड करुन प्रार्थना म्हणतात.
या शाळेत शिकुनच तयार झालेला शिक्षक वर्ग.
पासीघाट चे फोटो.

सियांग नदिवरील राजीव गांधी पुलावरुन दिसणारे दृश्य




पासीघाट येथील आमचे यजमान एक अरुणाचली कुटुंब

अविनाशजी बिनीवाले नहरलगुन येथे मुलांचे इंग्लीश स्पिकींग चे वर्ग घेत असत. नहरलगुन ला दोन ठीकाणचे १५ दिवसांचे वर्ग आटोपुन ते पासीघाट व झ्रिरो ला जाणार होते. नहरलगुन चे मुक्कामात त्यांच्याशी त्यांच्या अनुभवांच्यास गप्पा ऐकणे हा एक सुखद व माहितीपुर्ण कार्यक्रम असावयाचा. दरम्यान च्या काळात मी ५ दिवसासाठी झिरो येथे विद्याभारतीच्या शाळेच्या कामासाठी जाउन आलो. झिरो म्हणजे सभोवती डोंगरांच्या रांगा व त्यात वसलेले हे शहर भाताच्या पेरण्या नुकत्याच आटोपल्या असल्याने निळ्या डोंगरांच्या प्रुष्टभागावर हे धानाची हिरवी गार शेते म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती.
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबानसिरी जिल्ह्यातील अत्यंत सुरेख थंड हवेच्या ठीकाणापैकी एक असलेले शहर म्हणजे "झिरो" समुद्र सपाटी पासुन सुमारे ५७०० फुटावर हे ठीकाण आहे. हे शहर ओल्ड व न्यु झीरो अशा दोन भागात विभागले असुन या दोन ठीकाणामधील अंतर ५ कि.मी इतके आहे.आपातानी जमातीचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जात असलेले हे शहर पाइन व बांबुंच्या जंगलानी वेढलेले असुन धानाच्या शेतांनी सुशोभित केलेले दिसते. कृषि व मासेमारी हे येथील प्रमुख उपजीविकेचे साधन असल्याने धानाची शेते व मासेमारीसाठी ठिकठीकाणी तळे हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपातानी या जनजातीचे वैशिष्ट्य असलेल्या खास डिझाइन असलेल्या शाली तयार करणे हे देखीलयेथील प्रमुख आकर्षण आहे.
झिरो येथील फोटो.



झिरो येथील शाळेची इमारत

शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत अस्मादीक.

२००४ मध्ये एका स्थानीक ट्रायबलला एक विशाल झाड तोडत असतांना त्या झाडाच्या पलिकडे एक विशाल शिवलीगाच्या आकाराचा खडक दिसला तेथेच बाजुला गणपतीची आक्रुती असलेला एक लहान खडक आढळला. लगेचे ही बातमी वार्यासारखी सर्वदुर पोचली. मला देखील तेथे जाउन फोटो काढण्याची इच्छा होती. मी शाळेच्या मुख्याध्यापकासोबत मोटारसायकल्ने त्या दुर्गम भागाला भेट दिली व तेथील फोटो घेतले. अरुणाचलच्या बहुतेक वरिष्ठ अधिकायांनी येथे भेट दिली असुन येथे नित्य पुजा होत असते. हा भाग विकसीत करुन येथे एक विशाल शिवमंदिर बांधावयाचा मानस असुन त्या संबधात स्थानीक बाहेरच्या धनिकांनी देणग्या देण्यास सुरुवात ही केली आहे. २ वर्षात येथे विशाल मंदिर होईल यात शंका नाही. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सिमेंटच्या पायर्या करुन हा प्रवास सोपा केल्या गेला आहे.
विशाल शिवलींग व परिसर



गणपतीचा आकार असलेला खडक


शिवलींगाकडे जाणारी वाट

