Saturday, September 16, 2023

ग्रीस

    (हेलास किंवा एलास). यूरोपच्या बाल्कन द्वीपकल्पातील दक्षिणेचा प्राचीन देश क्षेत्रफळ १,३१,९८६ चौ.किमी. लोकसंख्या ८७,६८,६४१ (१९७१). विस्तार ३४°४८’०२’’उ. ते ४१°४४’५९’’उ. आणि १९°२२’४१’’पू. ते २९°३८’२७’’पू. यादरम्यान. याच्या दक्षिणेस भूमध्य, पूर्वेस इजीअन व पश्चिमेस आयोनियन समुद्र असून वायव्येस अल्बेनिया, उत्तरेस यूगोस्लाव्हिया व बल्गेरिया आणि ईशान्येस व पूर्वेस तुर्कस्तान आहे. याचा सु. २५,२o५ चौ.किमी. भाग बेटांनी व्यापलेला असून त्यांत सिक्लाडीझ, डोडेकानीझ, स्पॉरडीझ व आयोनियन हे द्वीपसमूह व क्रीट (८,३३१ चौ.किमी.), यूबीआ, लेझ्बॉस, रोड्झ, कीऑस, सेफालोनिया, कॉर्फ्यू व सेमॉस ही मोठी बेटे समाविष्ट आहेत. अथेन्स ही राजधानी असून ग्रेटर अथेन्सची लोकसंख्या २५,४o,२४१ (१९७१) आहे.

ग्रीस स्थानदर्शक नकाशा
ग्रीस देश
ग्रीसमधील राज्ये
ग्रीस भौगोलिक नकाशा
ग्रीस गावे आणि पर्यटन स्थळे
भूवर्णन : डोंगराळ प्रदेश, दंतुर किनारा व त्याभोवती असंख्य बेटे हे ग्रीसचे वैशिष्ट्य आहे. पिंडस, ऑलिंपस इ. पर्वतरांगा आणि त्यांची ऑलिंपस २,९७२ मी. व इतर २,४६o मी. पर्यंत उंचीची शिखरे विख्यात असून सर्वत्र पसरलेल्या पर्वतराजींमधून बिओशियातील सपाट्या किंवा आर्केदीआतील खोरी यांसारखे बंदिस्त खोलगट भाग आहेत. सलग मैदानी मुलूख फक्त थेसाली, मॅसिडोनिया आणि थ्रेस या प्रांतांत आढळतो. पश्चिम ग्रीसमध्ये पिंडस पर्वत किनाऱ्याला समांतर असल्याने तो किनारा काहीसा एकसंध व सलग आहे. उलट पूर्वभागात डोंगरांच्या रांगा किनाऱ्याशी काटकोन करीत असल्याने हा किनारा इतका ठिकठिकाणी तुटलेला व बेटांनी वेढलेला आहे, की असा किनारा यूरोपमध्ये अन्यत्र कोठेही नाही. सर्व महत्त्वाची बंदरे याच किनाऱ्याला आहेत आणि या बाजूच्या इजीअन समुद्रात यूरोप-आशिया दरम्यान सु. २,ooo बेटे विखुरलेली आहेत. थेसाली आणि मॅसिडोनियाचे काही भाग वगळल्यास ग्रीसचा कोणताही प्रदेश समुद्रापासून ११२ किमी.हून दूर नाही. देशाचे नैसर्गिक विभाग थ्रेस, मॅसिडोनिया, ईपायरस, थेसाली, मध्य ग्रीस, पेलोपनीसस आणि बेटे हे आहेत. ईशान्येकडील थ्रेस आणि उत्तरेचा मॅसिडोनिया हे जवळजवळ सर्वस्वी डोंगराळ प्रदेश त्यातून अल्बेनिया, यूगोस्लाव्हिया व बल्गेरियात जाणाऱ्या डोंगराच्या रांगांत वार्दर, स्त्रूमा, नेस्तॉस व मरित्स या चार मोठ्या नद्यांची खोरी आहेत. या नद्यांच्या मुखांशी विस्तृत सपाट प्रदेश आहेत. मुख्य बंदरे तुर्कस्तानच्या सीमेपाशी ॲलेक्झँड्रूपलिस, इजीअनच्या उत्तर किनाऱ्याच्या मध्यावर कव्हाल आणि वार्दर नदीमुखाशी बाल्कन पार्श्वप्रदेशातील मालवाहतुकीचे महाद्वार सलॉनिक (थेसालोनायकी) ही होत. ईपायरस विभाग पिंडस पर्वताच्या पश्चिमेला आहे. ईपायरसच्या आयोनियन किनाऱ्यावर अनेक लहानलहान सपाट भूभाग आणि अंतर्भागात योआनीना भोवतालच्यासारखे काही पर्वतवेष्टित सुपीक खोलगट भूभाग आहेत. तथापि बहुतेक प्रदेश खडकाळ, रस्ते फार थोडे व देशाच्या इतर भागाला जोडणारे लोहमार्गही नाहीत. थेसाली हा पर्वतवेष्टित प्रदेश देशाच्या पूर्वमध्य विभागात इजीअन समुद्राकाठी येतो. पिंडस पर्वताने ईपायरसपासून आणि ऑलिंपस पर्वताने थ्रेसपासून थेसाली विभक्त केला आहे. मॅसिडोनियाप्रमाणेच सुपीक व विस्तृत अशा थेसालीच्या मैदानी प्रदेशात देशातल्या अन्य कोणत्याही भागापेक्षा अधिक प्रमाणात शेती चालते. पिनीअस नदीवरचे लारीस हे प्रदेशातले प्रमुख शहर आणि व्हॉलॉस हे मुख्य बंदर आहे. थेसाली आणि ईपायरसच्या दक्षिणेस आणि कॉरिंथ आखाताच्या उत्तरेस मध्य ग्रीस हा विभाग आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स व तिचे बंदर पायरिअस या विभागात आहे. थीब्झ, लेव्हादीअ आणि लेमीअ यांची सपाट भूमी चिंचोळ्या पर्वतराजींनी विलग झालेली असून छोट्या घाटरस्त्यांनी जोडलेली आहे. देशातील या प्रदेशाची हवा सर्वांत कोरडी आहे. दक्षिणेचा पेलोपनीसस प्रदेश पूर्वी ५-६ किमी. रुंदीच्या कॉरिंथ संयोगभूमीने मुख्य भूमीला जोडलेला होता, तो १८९३ साली कॉरींथचा कालवा पुरा झाल्यावर वेगळा होऊन मोठे बेट बनला. आर्थिक दृष्ट्या यातील सर्वांत निर्मितिक्षम भाग ईशान्येस आहे. प्रदेशाचा पूर्वभाग खडबडीत दगडगोट्यांचा आणि तुरळक उथळ मातीचा असून दक्षिणेतील मेसीन भूशिरभाग मात्र सौम्य हवामानाचा आहे. याचे पट्रॅस हे बंदर वायव्येस आहे. ग्रीस बेटांपैकी सर्वांत दाट वस्ती आयोनियन बेटांवर आहे. त्यांचे हवामान सौम्य व सागरी आहे. बेटांच्या मध्यवर्ती स्थानामुळे लोकांना दर्यावर्दी व व्यापारी जीवनाची प्रेरणा मिळते. क्रीट हे सर्वांत मोठे ८,३३१ चौ. किमी. २५६ किमी. लांब व ९ ते ५६ किमी. रुंद असून त्याची लोकसंख्या ४,५६,६४२ (१९७१) आहे. कँडिया व कानीया ही क्रीटची दोन प्रमुख शहरे असून भूमी डोंगराळ व खडकाळ, ओबडधोबड पर्वतांचे उंच कडे सरळ समुद्रात तुटलेले, तर कुठे दोन उंच डोंगररांगांमध्ये लहान सपाट गाळजमिनी, शिखरे बहुधा हिमाच्छादित असे क्रीटचे एकंदर दृश्य भव्य व कठोर निसर्गाचे आहे. बहुतेक इजीअन बेटे अन्नाबाबत स्वावलंबी नाहीत. पुष्कळसे रहिवासी समुद्रावर मच्छीमारी करून किंवा खलाशी म्हणून उपजीविका करतात इतर निर्वाहासाठी मुख्य भूमीकडे किंवा परदेशी स्थलांतर करतात. देशातील केवळ चतुर्थांश भूमी शेतीच्या उपयोगी, षष्ठांश वनभूमी आणि बाकीची खडकाळ आहे. खोलगट प्रदेशात व नदीमुखांपाशी गाळमाती, उंचीवर चुनखडीमिश्रित, काही भागात ज्वालामुखीजन्य शिलारसावशेषांची व काही बेटांवर जीर्ण सिकता शिलांची माती आहे.

प्राचीन काळात लॉरियम भागातील चांदी, शिसे व जस्त यांच्या धातुकांनी अथेन्सला वैभव मिळवून दिले होते. तुर्की अंमलात खनिजांची उपेक्षा झाली. एकोणिसाव्या शतकात ग्रीसने स्वातंत्र्य मिळविल्यानंतर सहज सापडणाऱ्या खनिजांचे थोडेबहुत उत्पादन झाले, तथापि खनिज संपत्तीची पद्धतशीर पाहणी झाली नव्हती. १९५१ साली ग्रीसच्या प्रदेशाची भूवैज्ञानिक दृष्ट्या शास्त्रीय पाहणी करण्यास सुरुवात झाली. ज्ञात खनिजांचे साठे : सिक्लायडीझ, मध्य ग्रीस व क्रीटमध्ये लोहधातुक यूबीआ व मध्य उत्तर ग्रीसमध्ये क्रोमाइट मध्य ग्रीस, यूबीआ व आमॉर्गस (सिक्लाडीझ)मध्ये बॉक्साइट नॅक्सॉस (सिक्लाडीझ)मध्ये लोह पायराइट व एमेरी मीलॉसमध्ये बॅराइट मध्य ग्रीस व थर्मासमध्ये शिसे आणि जस्त यूबीआ व लेझ्बॉसमध्ये मॅग्नेसाइट मीलॉस व नीसिरॉसमध्ये गंधक उत्तर ग्रीस व कीऑसमध्ये अँटिमनी व मँगॅनीज आणि यूबीआ, पेलोपनीसस व टॉलेमेइसमध्ये लिग्नाइट कोळसा. अमेरिकन तंत्रज्ञांच्या साहाय्याने मेसीना, झँटी, कार्दीत्सा चिक्कला आणि थ्रेस या विभागांत खाणी चालू करण्यासारखी तेलक्षेत्रे आढळली आहेत. कमीजास्त प्रमाणात ॲस्बेस्टॉस, संगमरवर, चुनखडी, तांबे व सोने ही खनिजेही ग्रीसमध्ये आहेत.
नद्या, सरोवरे, समुद्र वगैरे : मर्यादित क्षेत्रफळ व अनियमित पर्जन्य या कारणांनी ग्रीसमधील लहानलहान नद्यांच्या पाण्याची शाश्वती नसते. त्यातल्यात्यात जास्त पाणी वर्षभर असणाऱ्या नद्या वार्दर व स्त्रूमा असून त्यांच्या पाणलोटांची विस्तीर्ण क्षेत्रे मध्य बाल्कन प्रदेशात आणि मुखाकडचे भाग तेवढे ग्रीसमध्ये आहेत. इजीअन समुद्राला ग्रीसमधून मिळणाऱ्या इतर नद्या नेस्तॉस, आलीआक्‌मॉन, पिनीअस व स्पेर्खीऑस, पेलोपनीससमधील सर्वात मोटी नदी युरोतस, कॉर्फ्यू बेटावर मेगॉसी आणि आयोनियन समुद्राला मिळणाऱ्या ॲकिलोअस, आराख्थॉस आणि थीअमिस. चुनखडी प्रदेशातून वाहणारे प्रवाह प्रसंगी विवरांतून लुप्त होतात आणि पाऊस जास्त झाल्यास काही दिवस तळ्यांच्या रूपाने टिकतात. पर्वतप्रदेशात कित्येक लहान सरोवरे आहेत. उत्तरेखेरीज तिन्ही दिशांना समुद्राने वेढलेल्या या देशाला क्षेत्रफळाच्या मानाने सर्वांत जास्त किनारा लाभला आहे आणि स्त्रूमा, सलॉनिक, कॉरिंथ, मेसीनीया, कीपारिसीया, पागासे, वानित्सा अशा अनेक आखातांनी त्याला विविधता आणली आहे.

हवामान : देशाच्या बहुतेक भागात उन्हाळा कडक आणि हवा कोरडी असून समुद्रसपाटीला सरासरी तपमान २७° से. असते. समुद्रकिनाऱ्याला दुपारच्या वाऱ्यामुळे हवा काहीशी सुसह्य होते. उत्तरेकडील पर्वतप्रदेशात हवा कमी उष्ण असून उन्हाळ्यात व नंतर पाऊस पडतो. अन्यत्र उत्तरेकडून उबदार कोरडे वारे वाहतात. सप्टेंबरच्या द्वितीयार्धात पावसाळ्याला सुरुवात होते. सामान्यतः भूमध्यसागरी हवामान असते. हिवाळ्यात पूर्वेकडे जाणारी चक्री वादळे असतात. पर्वतप्रदेशात थंडी कडक, प्रसंगी सलॉनिक येथे तपमान १०° से. पर्यंत पश्चिम किनाऱ्याचे दक्षिणेकडील हवामान कमी थंडीचे, कारण उत्तरेकडच्या थंड, ‘बोरा’वाऱ्यांना दक्षिणेचे उबदार ‘शिलॉक’ वारे तेथे भिडतात. उत्तर दक्षिण भागांच्या थंडीच्या तपमानात मोठा फरक आढळतो. पाऊस पूर्व किनाऱ्याला कमी व पश्चिम किनाऱ्याला अधिक पडतो. थेसालीच्या मैदानात ३८ सेंमी. व अथेन्सला ३९ सेंमी. पाऊस पडतो, तर कॉर्फ्यू येथे १२८ सेंमी. पाऊस पडतो. तपमान दक्षिणेत किमान १·७° से., कमाल ४१·१° से. उत्तरेत किमान ८·९° से., कमाल ३५° से. सरासरी वार्षिकपर्जन्य दक्षिणेत ३७·५o ते ८०सेंमी., उत्तरेत ५० ते १२०सेंमी. असतो.






वनस्पती व प्राणी : दक्षिण व मध्य देशात भूमध्यसागरी वनस्पती, पर्वतभागात व उत्तरेत मध्य यूरोपीय खुरटी झुडपे, पानगळ व सदाहरित वृक्ष आहेत. ओक, चेस्टनट, फर, पाइन हे मुख्यतः दिसतात. वसंत ऋतूत खडकाळ भागात विविधरंगी फुलझाडांना बहर येतो. डोंगराळ प्रदेशात मध्य यूरोपीय लांडगे, रानडुक्कर, लिंक्स, रानमांजर, मोर्टेन-पिंगट अस्वल, हरिण, पश्चिम व दक्षिण प्रदेशांत खोकड, रानबकरा, साळू हे प्राणी आढळतात. पेलिकन बगळे, करकोचे, ठिपक्यांचा कोकीळ हे पक्षी असून उत्तर यूरोपमधले अनेक जातींचे पक्षी हिवाळ्यात ग्रीसमध्ये येतात. समुद्रात मासे, कवची जलचर, कासव, स्पंज इ. सापडतात.
इतिहास : प्राचीन काळी म्हणजे इ.स.पू. ३ooo ते इ.स.पू. १४६ पर्यंत ग्रीसमध्ये एक समृद्ध संस्कृती नांदत होती. रोमनांच्या आक्रमणाने ती संपुष्टात आली. ही संस्कृती कला, वाङ्‌मय, तत्त्वज्ञान वगैरे बाबतींत अत्यंत समृद्ध होती 
रोमन अंमल : (इ.स.पू. १४६–इ.स. ३३o). रोमन साम्राज्यात ग्रीस समाविष्ट झाल्यावर त्याची पुनर्घटना करण्याचे काम रोमन सम्राटांनी हाती घेतले. प्रथम त्यांनी कॉरिंथ शहर उद्‌ध्वस्त करून तेथील रहिवाशांना गुलाम म्हणून विकले. मॅसिडोनियाच्या गव्हर्नरला केवळ देखरेखीचे अधिकार देण्यात आले. सीझरनंतर अँटोनीच्या कारकीर्दीत त्याने युद्धखर्च भागविण्यासाठी ग्रीसवर जबरदस्त कर लादले. संपूर्ण ग्रीस रोमन साम्राज्याचा एक भाग करण्यात आला व त्याला ‘अकेइआ’ हे नाव देण्यात आले. त्याची व्यवस्था सीनेटऐवजी बादशाहाकडे सुपूर्द करण्यात आली. नंतरच्या काही रोमन सम्राटांनी ग्रीसचे वैभव वाढविण्याचे यत्न केले आणि अथेन्स येथे एक काँग्रेस (अकादमी) स्थापन केली. रोमन सत्तेच्या अवनतीच्या काळात गॉथ वगैरे रानटी टोळ्यांनी ग्रीसवर हल्ले केले. त्यांचे पारिपत्य कधी रोमन फौजांनी, तर कधी स्थानिक लोकांनी केले.

बायझंटिन अंमल : (३३o–१४५२). पहिल्या कॉन्स्टंटीनच्या अमदानीत ग्रीसचे हेलास, पेलोपनीसस, निकॉपलिस व इतर बेटे असे तुकडे पाडण्यात आले आणि कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) येथे नवी राजधानी स्थापण्यात आली. पण हे सर्व ३७५ च्या भूकंपाने आणि ३९५-९६ च्या व्हीसीगॉथ टोळ्यांच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झाले. काही राजांनी पेगन धर्मावरील ग्रीकांची निष्ठा कमी व्हावी म्हणून यत्न केले. कॉन्स्टंटीन व इतर बहुतेक राजांनी रोमन सुधारणा रुजविण्याचे धोरण आखले. व्हीसीगॉथ, ऑस्ट्रोगॉथ, हूण तसेच स्लाव्ह, बल्गर, व्हँडॉल वगैरे रानटी टोळ्यांनी पाचव्या ते सातव्या शतकांत ग्रीसमध्ये प्रवेश केला. त्यांपैकी काहींनी तेथेच ठाण मांडले. त्यांचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न बायझंटिन राजांनी केले, पण काही टोळ्या दहाव्या शतकाअखेर ग्रीसमध्ये राहिल्या. सहाव्या शतकात जस्टिनियन हा एक थोर राजा होऊन गेला. त्याने ग्रीसचा पूर्वीचा रोमन साम्राज्यात गेलेला प्रदेश परत मिळविण्याचा प्रयत्न केला. बायझंटिन कलेचे पुनरुज्जीवन याच वेळी झाले [→ बायझंटिन संस्कृति]. या काळात पूर्वापार चालत आलेल्या नगरराज्यांत फारसा फरक पडला नाही. मात्र सर्व सत्ता केंद्रशासित होती, फक्त पूर्वीच्या अथेनियन राज्यपद्धतीऐवजी नोकरशाही पद्धत अस्तित्वात आली. बाराव्या शतकात ग्रीसवर सेल्जुक तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. पुढे चौथ्या धर्मयुद्धाच्या (क्रूसेड्स) काळात पाश्चिमात्यांनी कॉन्स्टँटिनोपल उद्ध्वस्त करण्यात पुढाकार घेतला (१२o४–६१). त्यांचा अंमल ग्रीसवर प्रस्थापित होऊन ग्रीसची एकता नष्ट झाली.

ग्रीक अंमल : (१४५३–१८५१). १४५३ मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल घेतले व बायझंटिन साम्राज्यावर आपला अंमल प्रस्थापित केला. या काळात ग्रीकांना फक्त त्यांच्या चर्चद्वारे स्थानिक स्वराज्याचे अधिकार मिळाले. चर्चच्या व्यवहारात त्यांनी हस्तक्षेप केला नाही. परंतु त्यांचे त्यावर नियंत्रण मात्र होते. ग्रीसमधील बहुतेक शहरांचे त्यांनी लष्करी ठाण्यांमध्ये रूपांतर केले. त्यामुळे ग्रीसचे प्राचीन सौंदर्य नष्ट झाले. खेड्यातील अनेक शेतकरी स्वतंत्रपणे वागू लागले. काही ग्रीक व्यापाऱ्यांचे वर्चस्व वाढले, कारण ग्रीक जहाजे भूमध्य समुद्रात व्यापार करीत असत. कॉन्स्टँटिनोपल तुर्की अंमलाखालीसुद्धा ग्रीक संस्कृतीचे केंद्रस्थान होते.
ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा 
खूप पूर्वी पृथ्वीवर एक राजा रहात होता. राजाला ३ मुली होत्या. सर्वात जी धाकटी होती ती अत्यंत मोहक होती. तिचे नाव होते साइक. ती इतकी सुंदर होती की दूरदूरुन तिला पहाण्यासाठी लोकं येत आणि तिच्या सौंदर्याची स्तुती करत. ते म्हणत की साईक ही प्रत्यक्ष सौंदर्याची देवता अ‍ॅफ्रोडाइट पेक्षाही सुंदर आहे. अ‍ॅफ्रोडाइट ची साइकशी काय तुलना? अ‍ॅफ्रोडाइटचे दुसरे नाव व्हिनस.
यामुळे झाले काय, अ‍ॅफ्रोडाइट ची मंदिरे ओस पडू लागली, लोक तिची पूजा करेनासे झाले. अ‍ॅफ्रोडाइट ची झोप उडाली, तिला साइकचा दुस्वास वाटू लागला. मनातल्या मनात ती साइकविरुद्ध कट-कारस्थान रचू लागली.
अ‍ॅफ्रोडाइट चा मुलगा होता प्रत्यक्ष तीव्र कामवासनेचा देव. त्याचे नाव होते ईरॉस, ज्याला क्युपिड म्हणुन देखिल संबोधतात. ईरॉस हा सोनेरी, कुरळ्या केसांचा , सदैव बाणांचा भाता व धनुष्य घेऊन सुसज्ज असलेला देव जेव्हा कोणावर शरसंधान करीत असे ती त्याच्या बाणाने विद्ध व्यक्ती/प्राणी/पक्षी तत्काळ प्रेमात पडत असे.
अ‍ॅफ्रोडाइट ने एरॉसची मदत घेऊन , साइकचा काटा काढण्याचे ठरविले. तिने ईरॉसला साइक झोपेत असताना विद्ध करण्याचा हुकूम केला. इरॉसने विचारले पण झोपेत विद्ध करुन काय फायदा त्यावर अ‍ॅफ्रोडाइट उत्तरली की ती अशी व्यवस्था करेल की जेव्हा साइक जागी होईल तेव्हा तिची नजर अतिशय कुरुप, खुज्या, व्यंग असलेल्या व्यक्तीवर पडेल.
आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एरॉस रात्री साइकपाशी गेला. पण योगायोगाने त्याचा बाण त्यालाच टोचला आणि तो साइकच्या प्रेमात पडला.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLX9v_xHaga2o_xFC3gSmrimZDJ05QEkTrtS4c34QBN3tnMOVpT7zBHOfLwhKKcXcd4n5Sk15u7QS7eyV7UyoZhXBSz-7XzGCqT2Vfed10mv6j8W2aOcYOiw8KP_SfAH7W7yIzJeDMQiKmWGDoIHtzv68A=w783-h625-no?authuser=0
आता साइक ही एरॉसला, जगातील सर्वात मौल्यवान व्यक्ती वाटू लागली. आणि आईच्या हुकमाचे पालन न करण्याचे त्याने ठरविले. तो तीव्र कामवासनेचा देव असल्याने, तो अन्य कोणालाही साइकच्या प्रेमात पडू देई ना. आता साइकच्या प्रेमात कोणी मर्त्य व्यक्ती पडेचना. सर्व लोक फक्त दूरदूरुन तिच्या सौंदर्याची स्तुती करुन जाऊ लागले. साइकच्या अन्य बहीणी फारशा सुंदर नसूनही त्यांची लग्ने झाली पण साइक मात्र एकटी कुढू लागली.
शेवटी साइकचा पिता , राजा हा भविष्यवेत्त्या अपोलो कडे गेला. अपोलोने भयंकर भविष्य वर्तविले की साइकचा होणारा नवरा हा देवांपेक्षाही शक्तीशाली असा एक पंख असलेला सर्प असून तो तिला एका पर्वताच्या शिखरावरुन उडवून घेऊन जाइल तेव्हा तिला काळा वेश परीधान करण्यास सांगावा आणि शिखरावर एकटे सोडावे. साइकचे कुटुंबिय दु:खाच्या समुद्रात बुडून गेले. त्यांनी अपोलोने सांगीतल्याप्रमाणे साइकला शिखरावर एकटे सोडले.
साइक शोक करत होणार्‍या नवर्‍याची वाट पाहू लागली. ती अशीच एका रात्री रडत असतेवेळी पश्चिमेचा वारा, झेफायर तिच्यापाशी आला आणि तिला उडवून हिरव्या सुंदर गालीच्यावर, फुलांच्या राशीत , सुंदर वनराईने नटलेल्या प्रदेशात घेऊन गेला. त्याने तिचे दु:ख हलके करण्याचा खूप प्रयत्न केला आणि ती निद्राधीन झाल्यावर तो तिला देवनगरीत घेऊन गेला.
या नगरीत एरॉसने तिचे मधुर शब्दात, प्रेमाने स्वागत केले व स्वतःची ओळख दिली. तिला नाना तर्‍हेने खूष केले. पण एकच कमतरता होती ती ही की स्वतःच्या आईच्या भीतीमुळे एरॉस तिच्यापुढे कधीच प्रकट झाला नाही. त्याने तिला आनंद दिला, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला पण स्वतःला लपविले. साइक फार फार आनंदात होती आणि असेच दिवस जात होते. ती या ज्ञानावरच खूष होती की तिचा नवरा कोणी दुष्ट सर्प नाही.
पण नशीबाला हे सुख मान्य झाले नाही आणि झेफायर बरोबर एकदा तिच्या बहीणी आल्या. त्यांनी तिचे कान भरले की तिचा नवरा कोणीतरी कुरुप अथवा रोगट व्यक्ती असावा व त्यामुळे तो स्वतःला लपवित असावा. साइकने अनेक दिवस अस्वस्थतेत घालविले. शेवटी न राहवून एका रात्री तिने मेणबत्तीच्या प्रकाशात नवर्‍याला पहायचे ठरविले. पण त्याचा सुंदर मुखचंद्रमा पहात असतेवेळी चुकून थोडेसे मेण त्याच्यावर अर्थात इरॉसवर पडून, इरॉस जागा झाला. त्याने अवाक्षर न बोलता अंधार्‍या आकाशात झेप घेतली. आता पश्चात्तपदग्ध साइक त्याच्याकडे धावली पण अंधारात तिला एवढेच शब्द ऐकू आले की "जेथे अविश्वास असतो तेथे प्रेम नसते."
व्याकुळ साइकने ठरविले की काहीही झाले तरी ती त्याचे प्रेम परत मिळवणारच. ती अ‍ॅफ्रोडाईट कडे गेली व तिने तिला मदतीची विनंती केली. अ‍ॅफ्रोडाइटला सूड घेण्याची आयतीच संधी चालून आली. ती साइकला म्हणाली की "मी तुला ३ कामे सांगीन. ती जर तू यशस्वीरीत्या पार पाडलीस तर तुला एरॉस प्राप्त होईल मात्र एकही काम चुकले तर तू त्याच्या प्रेमाला कायमची मुकशील". साइकने मान्य केले.
पहीले काम - अ‍ॅफ्रोडाइटने बर्‍याच लहान धान्याचा सकाळी एकत्र ढीग बनविला. जसे नाचणी, मोहरी, तीळ,गहू वगैरे एकत्र केलेआ ढीग तिने साइकपुढे ठेवला व तिला ते धान्य दुपारच्या आत वेगळे करावयास फर्मावले. साइक चिंतातुर मनस्थितीत बसली असताना तेथून काही मुंग्या जात होत्या. त्यांना साइकचे मन कळले व त्यांनी तिची मदत करावयाचे ठरविले.दुपारच्या आत सर्व धान्य वेगळे वेगळे झाले.
दुसरे काम - सोनेरी दोरे बनविण्याकरता, साइकने एका महाभयंकर व नरभक्षक प्राण्याच्या अंगावरील लोकर काढून आणावेत. हे काम फक्त जोखमीचे नव्हे तर प्राणघातक असल्याने, अशक्यच होते. परंतु त्या जाळीतल्या, एका पोपटी तजेलदार रोपाच्या सांगण्यानुसार, सायंकाळ होइपर्यंत साईक थांबली. व सायंकाळी जेव्हा थकून भागून, तो प्राणी झोपला, तेव्हा तिने पटापट लोकर गोळा केली. अशा रीतीने, दुसरे काम साध्य झाले.
तिसरे काम - आता अ‍ॅफ्रोडाइट चिदली व तिने साइकला अधिक अवघड काम देण्याचा निश्चय केला. तिने साइकला "एस्टीज" या डोंगरदरीतून बेफाम वहाणार्‍या नदीचे पाणी आणन्यास फर्मावले. साइक पाणी आणन्यास निघाली. लवकरच तिला कळून चुकले की काम अवघडच नाही तर अतिशय धोकादायक आहे. निसरड्या दगडांवरुन घसरुन कपाळमोक्ष होण्याची संभावना पुरेपूर आहे. केवळ पंखधारी व्यक्ती अथवा प्राणी हे काम करु शकेल. तेथून एक गरुड जात होता त्याला साइकची दया आली व त्याने तिला एका कुपीत पाणी भरुन आणून दिले. अशा रीतीने साइक दुसर्‍या कामातही यशस्वी झाली.
चवथे काम - आता अ‍ॅफ्रोडाइटच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली व तिने अजून अवघड काम देण्याचा घाट घातला. तिने एक कुपी साइकला दिली व पाताळाच्या पर्सिफन राणीचे थोडे सौंदर्य त्या आणायची आज्ञा केली. साइक या कामगिरीवर निघाली असता तिला मृत लोकांचा अंधारा प्रदेश लागला. साइकने एका नावाड्याला विनंती केली आणि नवल म्हणजे त्या नावाड्याने मोठ्या कौशल्याने तिला पर्सिफन राणीच्या राजवाड्यापर्यंत पोचविले. साइक न घाबरता पर्सिफन राणीपाशी गेली व तिला थेंबभर सौंदर्य कुपीत टाकायची विनंती केली. आश्चर्य म्हणजे पर्सिफन राणीने ती मान्य केली व साइक ती कुपी अ‍ॅफ्रोडाइट कडे घेऊन आली.
आता मात्र अ‍ॅफ्रोडाइट रागाने वेडीपिशी झाली व किंचाळत म्हणाली "तू कशी इरॉस ला भेटते ते मी बघतेच. तुला जन्मभर माझी दासी बनावे लागेल." इतका वेळ अन्य देव हा अन्याय पहात होते ते आता साइकच्या मदतीस धावले व त्यांनी इरॉसला सर्व कहाणी सांगीतली. इरॉस चे हृदय द्रवले आणि तो तत्काळ साइकला भेटला. देवांचा राजा झिअस याने साइकला अमृत दिले व साइक आता तिच्या प्रियकरासमवेत आकाशात राहू लागली. लवकरच पृथ्वीवरील लोक तिला विसरले व परत पूर्ववत अ‍ॅफ्रोडाइट्ची पूजा करु लागले. अशा रीतीने सारे काही आलबेल झाले.
वेडात मराठे वीर दौडले सात
कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात प्रतापराव गुजर आणि त्यांच्या साथीदारांना मानाचे पान दिलेले आहे. इतिहासात मात्र पावनखिंडीला जे स्थान आहे ते नेसरीच्या खिंडीला नाही असे दिसते. महाराजांचा शब्द पाळण्यात सरसेनापती चुकले. त्यांनी भावनेच्या भरात आपले प्राण खर्ची घातले. राज्याभिषेकाआधी काही थोडक्या दिवसांत राज्याला सेनापती नाही अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. असे नेमके काय झाले होते प्रतापरावांकडून, याविषयी सर्वश्रुत असणारी कहाणी पुढीलप्रमाणे -
   सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की "खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. ”
महा  राजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला. वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन द्रवले. खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी वकिलाच्या प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.
   या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून "सला काय निमित्य केला? ” असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.
   महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, “हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. ” महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले. खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे केवळ अशक्य होते आणि परिणामी धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दु:खी झाले. राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते परंतु भावनेच्या भरात प्रतापरावांसारखा निधड्या छातीचा वीर दुसरी चूक करून बसला.
  प्रतापरावांच्या मृत्यूचे मराठाशाहीवर नेमके परिणाम कसे झाले याबाबत मला फारसे वाचायला मिळाले नाही परंतु सर्वसामान्य अंदाज लावायचा झाला तर राज्याचा सरसेनापती अशा रितीने मृत्यूला कवटाळतो तेव्हा सैन्यात बेबंदशाही माजण्याची शक्यता असते. राजा, प्रजा, राज्य आणि सैन्य यांचे खच्चीकरण होण्याची शक्यताही असते. २४ फेब्रुवारी १६७४ ला प्रतापरावांना वीरमरण आले आणि १६ जूनला राजांना राज्याभिषेक झाला. शिवराज्याभिषेक जवळ आला असता सरसेनापतीचा मृत्यू होणे ही घटना राज्यस्थापनेसाठी नक्कीच पूरक नसावी. निश्चलपुरी महाराजांनी अपशकुन म्हणून प्रतापरावांच्या मृत्यूचे कारण दाखवल्याची घटनाही वाचनात येते.
   उतावळा, भावनाप्रधान स्वभाव आणि दूरदृष्टीचा अभाव ही कारणे राज्याचा सरसेनापती हिरावून घेण्यास कारणीभूत ठरली. इतके सर्व असूनही, प्रतापरावांच्या अतुलनीय धाडसाचे कोठेतरी कौतुक करावेसे वाटते. गैरजबाबदार कृत्य हातातून घडले तरी त्यांची स्वामीनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. खुद्द महाराजांना त्याविषयी शंका असावी असे वाटत नाही. आपल्या जिवाचा, घरादाराचा, कुटुंबाचा विचार न करता केवळ स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून स्वामीनिष्ठेपायी आपला जीव ओतून टाकणाऱ्या या वीरांच्या धमन्यांतील रक्तात असा कोणता गुण असावा की कोणताही इतर विचार न करता त्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला; यामागील नेमकी मानसिकता समजून घेणे कठिण वाटते.
    तरीही, नेसरीच्या खिंडीला पावनखिंडीचे महत्त्व नाही याचे कारण प्राणार्पण कोणी, कधी आणि नेमके कशासाठी केले याला इतिहासात महत्त्व आहे. बाजीप्रभूंचे प्राणार्पण आणि प्रतापरावांचे प्राणार्पण यांत फरक दिसून येतो. युद्धात बरेचदा हार-जीत यांच्यापेक्षाही मागाहून होणारे परिणाम महत्त्वाचे ठरतात. बाजीप्रभूंचे बलिदान महाराजांना सुखरूप ठेवण्याकामी आले. बहुधा, मूठभर सैनिकांसह बाजीप्रभू मागे राहिले तेव्हाच त्यांचा मृत्यू अटळ आहे हे सर्वांना माहित असावे. प्रतापरावांच्या बाबत तसे होत नाही. कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेने मात्र प्रतापरावांच्या प्राणार्पणाचे उदात्तीकरण झाले. या कथेसारखी भासणारी पाश्चात्य इतिहासातील एक प्रचलित कथा पुढे देता येईल. ती म्हणजे थर्मापलैयच्या लढाईची.
     प्राचीन ग्रीकमधील अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रसिद्ध शहर-राज्ये गणली जातात. अथेन्स आणि स्पार्टा एकमेकांपासून फार लांब नाहीत परंतु या दोन्ही राज्यांचे नीतिनियम, कायदे भिन्न होते. अथेन्स हे समुद्राजवळ असल्याने समुद्र व्यापारात हे राज्य अग्रेसर होते. व्यापाराच्या निमित्ताने अनेकविध संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अथेन्सवासीयांचा सामाजिक, राजकीय दृष्टीकोण पुरोगामी होता. या उलट, स्पार्टा हे ग्रीक प्रदेशात आतवर वसलेले शहर-राज्य. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले. शत्रूराज्यांमुळे सतत सावध असलेले आणि त्यामुळे सांस्कृतिक बाबींमध्ये संकुचित राहिलेले. स्पार्टाचे कायदे आणि नीतिनियम हे अथेन्सपेक्षा क्रूर होते. केवळ सुदृढ मुलांना येथे वाचवले जाई. अशक्त आणि अपंग बालकांना मारले जाई. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे होते. दोन्ही शहरांत गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. यापैकी, स्पार्टातील गुलामांना हेलॉट असे संबोधले जाई. इतर राज्यांतील गुलामांपेक्षा हेलॉटांना थोड्या अधिक सवलती होत्या. त्यांना जमीन कसता येई पण इतर नागरिकांपेक्षा अधिक शेतसारा भरावा लागे. स्पार्टाच्या नागरिकांकडून हेलॉटचा मृत्यू हा दखलपात्र गुन्हा नसे. प्रामुख्याने हेलॉट हे कामगार किंवा कलाकार असत. सैन्यातही त्यांची भरणा होई. आपले स्वातंत्र्य त्यांना विकत घेण्याची मुभा होती.
     अथेन्स आणि स्पार्टाप्रमाणेच ग्रीसमध्ये इतर अनेक लहान-मोठी राज्ये होती. ग्रीसच्या जवळचे प्रबळ राष्ट्र पर्शियाचे. पर्शियाचा सम्राट झेरेक्सिस याने इ.स.पूर्व ४८३ पासून सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि इ.स.पूर्व. ४८० मध्ये ग्रीसवर भूमार्गे आणि समुद्रमार्गे लाखोंच्या सैन्यानिशी हल्ला चढवला. झेरेक्सिसने हल्ल्याची वेळ ऑलिंपिक्सचे खेळ आणि कार्निया या ग्रीक सणाच्या सुमारास ठरवली होती. याचे कारण या काळात ग्रीक शस्त्रे उचलत नसत. कार्नियाच्या दिवसांत शस्त्र उचलणे दैवी कोपास कारण होऊ शकते अशी प्रचलित श्रद्धाही होती. ग्रीकांना झेरेक्सिसच्या स्वारीचा सुगावा लागताच त्यांनी आपापसांतील वैर बाजूला ठेवून एकत्रित होऊन लढायचे ठरवले. त्यानुसार समुद्रमार्गे येणारा पर्शियन सैन्याचा ताफा रोखण्यास ग्रीक सेना आर्टेमिसिअमच्या सामुद्रधुनीत एकत्रित झाल्या. स्पार्टावर या काळात लिओनायडस या राजाचे राज्य होते. त्याची सेनाही मित्र ग्रीक सेनेत सहभागी होती. असे म्हणतात की स्वारीपूर्वी लिओनायडस डेल्फायच्या पुजारीणीचा सल्ला घेण्यास गेला असता तिने त्याला भविष्य सांगितले होते की "पर्शियन युद्धात एकतर स्पार्टाचा विनाश होईल आणि तसे न होता राज्य वाचले तर राजाचा विनाश नक्की होईल. " झेरेक्सिसचे खरे शत्रू होते अथेन्स आणि स्पार्टा. अथेन्सवर स्वारी करायची झाली तर त्याच्या भूमार्गावरील सैन्याला दक्षिणेकडे अथेन्स गाठण्यासाठी थर्मापलैची अरुंद वाट पार करून येणे क्रमप्राप्त होते. डोंगरातून जाणाऱ्या या अरुंद वाटेच्या एका बाजूस समुद्र होता तर दुसऱ्या बाजूस कपारी. ही वाट इतकी अरुंद होती की एकावेळेस एक रथ कसाबसा जाऊ शके. पर्शियन सैन्याला खिंडीत गाठण्यास यापेक्षा बरी जागा मिळाली नसती. सुमारे २ लाखांचे सैन्य घेऊन झेरेक्सिस येत होता. स्पार्टाचा राजा लिओनायडसच्या नेतृत्वाखाली पर्शियन सेनेवर हल्ला करण्याचे मित्र ग्रीक सेनेने ठरवले. परंतु स्पार्टाचे मुख्य सैन्य आर्टेमिसियमच्या सामुद्रधुनीत गुंतले होते.

 लिओनायडसने त्याचे ३०० शूर अंगरक्षक आणि स्पार्टातील दुय्यम सेना, ज्यांत हेलॉटसही सामील होते यांच्यासह थर्मापलैकडे कूच केले. वाटेत त्यांना इतर सैन्येही मिळत गेली परंतु त्यांची एकूण संख्या ५-७ हजारांच्या घरात होती. पर्शियाच्या प्रचंड सेनेसमोर लिओनायडसच्या लहानशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्य होते. तरीही तीन दिवस प्राणांची बाजी लढवत ग्रीक सैन्य लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेला सळो की पळो करून सोडले. तिसऱ्या दिवशी फितुरी होऊन पर्शियन सैन्याला डोंगरातून ग्रीक सेनेला गाठण्याचा दुसरा मार्ग दाखवला गेला आणि ग्रीक सेना पुढून आणि मागून पर्शियन सेनेच्या तावडीत सापडली. लिओनायडसला आपला पराभव दिसू लागल्यावर त्याने इतर ग्रीक राज्यांच्या सेनेला परतायचा हुकूम दिला. त्याच्या हुकुमानुसार इतर ग्रीक सेना माघारी फिरली. लिओनायडस स्वत: मात्र त्याच्या तीनशे अंगरक्षकांसह पर्शियन सैन्याला तोंड देण्यास मागे राहिला. यानंतरची कहाणी लिओनायडसच्या आणि त्याच्या तीनशे वीरांच्या अतुलनीय कामगिरीची आहे. पहाटे देवतांना अर्ध्य वाहून लिओनायडस आणि त्याचे तीनशे वीर लाखोंच्या पर्शियन सैन्याला सरळ सामोरे गेले. वाटेत येणाऱ्या एकेकाला कापून काढत, प्रत्येक वीर त्याच्या हातातील भाल्याचे तुकडे होईपर्यंत लढला. भाल्यांचे झालेले तुकडे घेऊनही ते पर्शियन सैन्यावर वार करत राहिले. लढाईत लिओनायडसचा मृत्यू झाला हे कळून आले तरी ते ३०० वीर मागे फिरले नाहीत. त्याच्या मृत शरीराला तुडवत लढाई सुरूच राहीली. शेवटी पर्शियन सैन्याने बाणांचा वर्षाव करून सर्वांना कंठस्नान घातले. एकही वीर मागे उरला नाही. संतप्त झेरेक्सिसने लिओनायडसच्या मृत शरीराचे मुंडके कापून धड क्रूसावर चढवले आणि विजय साजरा केला. या लढाईनंतर आर्टेमिसियमलाही ग्रीकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आणि त्यांनी माघार घेतली. येथून पर्शियन सेना अथेन्सवर चालून गेली परंतु लिओनायडसच्या तीनशे वीरांनी पर्शियन सेनेचा मार्ग आठवड्याभरापेक्षा जास्त रोखून धरल्याने अथेन्सवासियांना शहर रिकामे करण्याची संधी मिळाली. झेरेक्सिसने अथेन्सला आग लावून बेचिराख केले पण नगरवासीयांचे प्राण लिओनायडसच्या पराक्रमाने वाचले. लिओनायडसच्या पराक्रमामुळे नंतर झालेल्या सलामिस येथील युद्धात मित्र-ग्रीक सैन्य निकराने लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेवर विजय मिळवला. पाश्चात्य इतिहासात या कथेला फार मोठे महत्त्व आहे. या कथेवरून साहित्यात काव्य, चित्रपट यांची निर्मिती झाली आहे. “तीनशेंची लढाई" (battle of 300) या नावाने हे युद्ध अनेक वर्षे सर्वांना प्रेरणा देत आले आहे. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातही या लढाईवर एक पाठ अवश्य दिसतो. प्रत्यक्षात २ लाखांच्या सेनेसमोर स्पार्टाच्या राजाने आपले प्राणार्पण करण्यात फार मोठे डावपेच दिसत नाहीत. या तीनशेंसह मागे राहिलेल्या सुमारे १००० हेलॉटांचा आणि थेस्पियन सैन्याचा उल्लेखही सहसा दिसत नाही. या लढाईत पर्शियन सैन्याचा मार्ग रोखून धरल्याने सलामिस येथे सैन्याची जमवाजमव करण्याची संधी मिळाली असाही गैरसमज अनेकांचा दिसतो. त्यात फारसे तथ्य नाही. स्पार्टाच्या राजाने अशाप्रकारे मागचा-पुढचा विचार न करता किंवा दुसरी युद्धनीती न आखता शत्रूवर सरळ चाल करणे कितपत शहाणपणाचे होते हे सांगता येत नाही. येथे या वीरांचे स्पार्टात मिळालेले खडतर प्रशिक्षण आड आले किंवा डेल्फायच्या भविष्यकर्तीवर असलेला अवास्तव विश्वास लिओनायडला असा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरला असे सांगितले जाते. परंतु, लिओनायडसचे प्राणार्पण शत्रूसमोर माघार न घेता त्वेषाने लढण्यास अनेकांना पुढे प्रेरणादायी ठरले हे खरेच. पावनखिंडीची लढाई, नेसरीची लढाई आणि थर्मापलैच्या लढाईत मला साम्य दिसल्याने आमचा त्यांचा इतिहास या सदरात या लेखाची भरती केली आहे. पूरक माहिती: तीनशेंच्या लढाईवर ३०० नावाचा एक सुप्रसिद्ध परंतु बंडल चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. चित्रपटातील पात्रांचे, विशेषतः झेरेक्सिसचे विपर्यस्त चित्रण उबगवाणे आहे. तरीही पूरक माहिती म्हणून चित्रपट पाहण्यासारखा आहे.
आधुनिक ग्रीस : (१८२१–पुढे). फ्रान्सची राज्यक्रांती, कमजोर तुर्की सत्ता व एकोणिसाव्या शतकातील जागतिक घडामोडी यांचा परिणाम होऊन ग्रीसमध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. २५ मार्च १८२१ रोजी ग्रीकांनी तुर्कांविरुद्ध उठाव केला आणि काही दिवसांतच स्वातंत्र्य जाहीर केले. पुढे सु. आठ वर्षे ते सतत तुर्कांविरुद्ध लढत होते. अनेक यूरोपीय देशांनी ग्रीसच्या लढ्यास सहानुभूती दर्शविली व ग्रेट ब्रिटन, रशिया, फ्रान्स वगैरे देशांनी लष्करी मदतही दिली. त्याच्या सीमाही ठरविण्यात आल्या. पुन्हा स्वतंत्र ग्रीक राज्य निर्माण झाले. बव्हेरियाचा प्रिन्स ऑथो याची या देशांनी राजा म्हणून निवड केली. तो पहिला ऑटो म्हणून १८३२ पासून राज्यकारभार पाहू लागला. १८४३ मध्ये एकतंत्री ऑटोविरूद्ध बंड झाले व १८४४ मध्ये ग्रीसला संविधानीय राजसत्तेची घटना देणे त्याला भाग पडले. पुढे १८६२ मध्ये त्याला राज्यत्याग करावा लागला. संविधानात्मक राजेशाही अस्तित्वात येऊन प्रिन्स जॉर्ज (डेन्मार्क) हा राजा म्हणून स्वीकारण्यात आला. १८६४ मध्ये ब्रिटनने आयोनियन बेटे ग्रीसला दिली. १८८१ मध्ये ग्रीसने बर्लिन काँग्रेसच्या ठरावाप्रमाणे तुर्कांकडून थेसाली मिळविले. क्रीट मिळविण्याचा ग्रीसचा प्रयत्न मात्र अयशस्वी झाला.
१९१२ च्या बाल्कन युद्धात ग्रीसने तुर्कस्तानविरुद्ध बल्गेरिया, सर्बीया, माँटनीग्रो वगैरेंची युती केली. त्यांनी तुर्कस्तानचा पराभव केला. ग्रीसला सलॉनिक बेट, मॅसिडोनियाचा काही भाग व क्रीटसह काही इजीअन बेटे मिळाली. या सुमारास पहिल्या जॉर्जचा खून झाला व त्याचा मुलगा पहिला कॉन्स्टंटीन गादीवर आला (१९१३).
पहिल्या महायुद्धाच्या (१९१४–१९) काळात ग्रीसने प्रथम तटस्थतेचे धोरण स्वीकारले, पण पंतप्रधान व्हेन्यिझेलॉस यास दोस्त राष्ट्रांतर्फे युद्धात सहभागी व्हावे, असे वाटत होते. यामुळे दोन गट पडले. व्हेन्यिझेलॉसच्या गटाने कॉन्स्टंटीनला बडतर्फ करून त्याचा मुलगा अलेक्झांडर यास गादीवर बसविले (१९१७). व्हेन्यिझेलॉस पंतप्रधान झाला. त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेतला. १९१९ च्या तहान्वये ग्रीसला स्मर्ना मिळाले. १९२o मध्ये अलेक्झांडर मृत्यू पावला आणि पुन्हा कॉन्स्टंटीन गादीवर आला. पुन्हा युद्ध सुरू झाले. तुर्कस्तानमध्ये केमाल अतातुर्क आला व त्याने ग्रीसकडून स्मर्ना परत मिळविले. १९२३ च्या लोझॅनच्या तहाने ग्रीसला तुर्कस्तानमधील सर्व प्रदेश सोडावा लागला. तसेच ग्रीसने तुर्कस्तानातील सु. पंधरा लाख ग्रीकांना ग्रीसमध्ये सामावून घेतले आणि तेवढेच तुर्की ग्रीस सोडून तुर्कस्तानात गेले. हे सर्व राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली झाले. दोन्ही देशांच्या सीमा ठरविण्यात आल्या.
महायुद्धानंतर संविधानात्मक राजेशाही असावी, की पूर्ण संसदीय लोकशाही असावी, असा प्रश्न निर्माण झाला. जनतेत दोन तट पडले. १९२४ मध्ये प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९२४ ते ३३ च्या दरम्यान ग्रीसच्या राजकीय क्षेत्रात सशस्त्र क्रांत्या, प्रतिक्रांत्या वगैरे उलाढाली होत राहिल्या. व्हेन्यिझेलॉस १९२८ मध्ये पंतप्रधान झाला. त्याने तुर्कस्तान, बाल्कन राष्ट्रे यांबरोबर मैत्री संपादण्याचा प्रयत्न केला.१९३३ च्या निवडणुकांनी पुन्हा मॉनर्किस्ट पक्ष सत्तारूढ झाला. व्हेन्यिझेलॉसच्या बंडखोर पक्षाचा १९३५ मध्ये पराभव होऊन दुसरा जॉर्ज पुन्हा गादीवर आला. मिटॅक्सस पंतप्रधान झाला आणि तोच सर्व राज्यकारभार पाहू लागला (१९३८).
दुसऱ्या महायुद्धाच्या (१९३९–४५) काळात ग्रीसने तटस्थता जाहीर केली. मुसोलिनीने ग्रीसचा युध्दतळासाठी उपयोग करणार म्हणून कळविले. याला मिटॅक्ससने नकार दिला. त्यामुळे इटलीने आक्रमण केले परंतु ग्रीसच्या फौजांची इटलीच्या फौजांना अल्बेनियात हुसकून लावले, तेव्हा जर्मनीने आक्रमण करून ग्रीसचा कबजा घेतला. ब्रिटिशांनी ग्रीसला मदत केली. तथापि जर्मन, इटालियन व बल्गेरियन फौजांनी ग्रीस पादाक्रांत केला. जर्मनीने तेथे कळसूत्री सरकार स्थापन केले. दोस्त राष्ट्रांनी ग्रीसमधून जर्मन फौजांना अखेर बाहेर पिटाळले. व्हर्सायच्या तहात ग्रीसला आणखी काही मुलूख मिळाला. दरम्यान ग्रीसमध्ये ई.एल्.ए.एस्. हा कम्युनिस्ट पक्ष व ई.डी.ई.एस्. हा रॉयलिस्ट पक्ष स्थापन झाले. ई.एल्.ए.एस्.ची सूत्रे रशियातून हलविली जाऊ लागली, तर ग्रीसचे पुनरूज्जीवन करण्याचे काम ई.डी.ई.एस्. या पक्षाने हाती घेतले. या दोन पक्षांमुळे देशात यादवी युद्धाचे वातावरण निर्माण झाले. ब्रिटनने आर्थिक साहाय्य देण्यास सुरुवात केली व १९४५ नंतर कम्युनिस्ट देशांना शह देण्याकरिता कम्युनिस्टेतर देशांना अमेरिका सढळ हाताने मदत करू लागली. ग्रीसला इतर दोस्त राष्ट्रांकडूनही आर्थिक साहाय्य होऊ लागले. १९४६ मध्ये निवडणुका झाल्या. कम्युनिस्टांना बेकायदेशीर ठरविण्यात आले. मॉनर्किस्ट पक्षास बहुमत मिळाले. १९४७ मध्ये दुसरा जार्ज मरण पावल्यामुळे पहिला पॉल राजा झाला. कम्युनिस्टांनी वेगळे तात्पुरते सरकार मार्कोस व्हफिएडस याच्या नेतृत्वाखाली स्थापन केले होते. १९४९ मध्ये कम्युनिस्ट बंड संपूर्णपणे चिरडण्यात यश आले. १९५२ च्या निवडणुकांत पॅपॅगोसच्या पक्षास बहुमत मिळून तो पंतप्रधान झाला. त्या वेळी स्त्रियांना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला. ग्रीस नाटो या संघटनेचा सभासद झाला. १९५४ मध्ये सायप्रसने ग्रीसमध्ये विलीन करण्याची मागणी सायप्रसमधील ग्रीकांना केली. परंतु सायप्रसमधील तुर्की अल्पसंख्याकांनी त्याला विरोध केला. त्याचे ग्रीसमध्ये सामीलीकरण झाले नाही त्यामुळे दंगे वाढले आणि अखेर १९५९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सायप्रसचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. १९५५ मध्ये ग्रीसचा पंतप्रधान कारामानलिस झाला. या वेळी सर्व देशभर विद्युत्‌शक्तीचा प्रसार झाला. १९५८ मध्ये संसदेने कारामानलिसचा कार्यक्रम मान्य केला. राजाने जॉर्जांकोपौलॉस याची पंतप्रधान म्हणून निवड केली. परंतु नॅशनल रॅडिकल पक्षाच्या विजयानंतर कारामानलिस पंतप्रधान झाला. तो १९६१ पर्यंत पंतप्रधान होता. त्याने पंचवार्षिक योजना सुरू केली आणि ग्रीस यूरोपियन कॉमन मार्केटचा सभासदही झाला (१९६२).
१९६२ मध्ये पाँपेद्रूने सरकारवर टीकेची झोड उठविली. कारामानलिसने १९६३ मध्ये राजीनामा दिला. काळजीवाहू सरकार स्थापन होऊन पाँपेद्रू पंतप्रधान झाला, परंतु संसदेचा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यास राजीनामा द्यावा लागला. १९६४ मध्ये निवडणुका होऊन तो पंतप्रधान झाला पण राजा व त्याच्या पक्षातील लोक यांमध्ये वाद होऊन पाँपेद्रूला पदच्युत करण्यात आले. याचा फायदा घेऊन काही लष्करी अधिकाऱ्यांनी अवचित सत्ता काबीज केली. तीन उच्च लष्करी अधिकाऱ्यांच्या त्रिकुटात सर्व सत्ता समाविष्ट झाली. १९६८ मध्ये पॅपॅडोपोलॉस यास पंतप्रधान करण्यात आले. काही अनुच्छेद वगळून त्याने नवीन संविधान अंमलात आणावे असे ठरले. १९७१ मध्ये मंत्रिमंडळात फेरफार झाले आणि ग्रीसचे सात प्रशासकीय विभाग पाडण्यात आले. प्रत्येकावर एक गव्हर्नर नेमण्यात आला.
लष्करशाहीच्या काळातच राजे कॉन्स्टंटीन यांनी दोन वेळा उठावाचा प्रयत्न केल्यामुळे १ जून १९७३ रोजी ग्रीसचे प्रजासत्ताक जाहीर करण्यात आले. नंतर जुलै १९७३ मध्ये सार्वमत घेण्यात येऊन प्रजासत्ताक अध्यक्षीय प्रणालीला लोकांची मान्यता असल्याचे जाहीर करण्यात आले.
परंतु हे सार्वमत कायदेशीर नव्हते अशी टीका करण्यात आली होती म्हणून कारामानलिस यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ८ डिसेंबर १९७४ रोजी सार्वमत घेण्याचे आश्वासन दिले होते आणि त्याप्रमाणे सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतात संविधानीय राजेशाहीविरुद्ध प्रजासत्ताक असे मतदान होऊन ६९% मते प्रजासत्ताकाला मिळाली. राजेशाहीचा संपूर्ण आणि कायमचा अस्त झाला. डिसेंबर १९७४ मध्ये झालेल्या सार्वमताने राजेशाहीचा प्रश्न कायमचा निकालात काढल्यामुळे ग्रीस संपूर्णपणे प्रजासत्ताक राष्ट्र झाले. जनतेची इच्छा सार्वभौम ठरली.
१७ नोव्हेंबर १९७४ रोजी ग्रीक पार्लमेंटच्या पहिल्या अधिवेशनापुढे भाषण करताना पंतप्रधान कारामानलिस यांनी नवे संविधान ही राष्ट्रीय आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. सरकारचे धोरण स्पष्ट करताना नव्या संविधानाची काही मूलभूत तत्त्वे त्यांनी सुचविली. नवे संविधान संपूर्णतया लोकशाही स्वरूपाचे असावे मात्र शासनाला त्वरित आणि फलदायक कार्यवाही करता येईल इतके अधिकार दिले जावेत, असे एक सूत्र कारामानलिस यांनी मांडले. या सूत्रानुसार शासकीय सत्ता मजबूत केली जाईल. मात्र त्यामुळे शासनाचे पार्लमेंटला असलेले उत्तरदायित्व किंचितही कमी होणार नाही, अशी खबरदारी घेतली जाईल.
या सूत्राशी सुसंगत असलेला व आतापर्यंतच्या राष्ट्रीय अनुभवातील धडे लक्षात घेऊन तयार केलेला नव्या संविधानाचा आराखडा पार्लमेंटला सादर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
ही नवी घटना अद्यापि तयार झालेली नाही. म्हणून १९५२ च्या संविधानानुसार राज्यकारभार चालविला जात आहे.
राजकीय स्थिती : जानेवारी १८२२ मध्ये ग्रीसने तुर्कांकडून स्वातंत्र्य मिळविले. त्या वेळेपासून ग्रीसला स्वतंत्र देश म्हणून आधुनिक युगात राजकीय अस्तित्व प्राप्त झाले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत ग्रीस दोस्त राष्ट्रांच्या साहाय्याने कसाबसा टिकून राहिला. दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीसमध्ये गनिमी काव्याने लढणारे कम्युनिस्ट व राजनिष्ठ असे दोन गट पडले आणि यादवी युद्घास प्रारंम झाला. कम्युनिस्टांनी प्रतिसरकार स्थापन केले. प्रथम ब्रिटन व नंतर अमेरिका या राष्ट्रांच्या मदतीने देशभक्तांनी कम्युनिस्टांचा पाडाव केला आणि १९४९ मध्ये यादवी युद्ध संपले. १९४६ च्या सार्वमतानुसार राजा दुसरा जॉर्ज राज्यावर आला. तो वारल्यावर त्याचा भाऊ पहिला पॉल गादीवर आला. त्याच्यानंतर १९६४ मध्ये राजा झालेल्या कॉन्स्टंटीनला मंत्रिमंडळाशी मतभेद झाल्यामुळे देशत्याग करावा लागला. १९५o पासून १९६५ पर्यंत नऊ वेळा निवडणुका होऊनही ग्रीसला स्थिर सरकार लाभू शकले नाही व राज्यकारभार सेनाधिकाऱ्यांनाच चालवावा लागला. तथापि १९५o पासून देशाची आर्थिक स्थिती सुधारली. नांटो संघटनेचे पाठबळ मिळाले. तथापि अवचित सत्तांतरण, कम्युनिस्टांच्या कारवाया, सायप्रस प्रकरण, विद्यार्थ्यांची दंगल यांमुळे स्थिर सरकार लाभले नाही. तीन लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात सत्ता गेली व लष्करी अध्यक्ष प्रत्यक्ष कारभार पाहू लागला. राजा नामधारी राहिला. या लष्करी हुकूमशाहीला ग्रीसमधील राजकीय पक्षाचे पुढारी, विद्यार्थी व चर्च नेते यांचा विरोध होता. अथेन्सच्या आर्च बिशपने राजीनामा दिला. माजी पंतप्रधान कारामानलिस यांनी स्वेच्छेने देशांतर करून पॅरिस येथे आश्रय घेतला. विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सक्तीच्या लष्करी सेवेविरुद्ध उग्र निदर्शने केली पण ती निर्घृणतेने दडपून टाकण्यात आली. यामुळे जनतेतील असंतोष वाढला.
ज्यावेळी लष्करी क्रांती झाली त्यावेळी ग्रीसचे राजे कॉन्स्टंटीन हे रोममध्ये होते. लष्करी हुकूमशाही उलथून पाडण्याचे दोन अयशस्वी प्रयत्न काही आरमारी गटांनी केले, या प्रयत्नांमागे राजाची प्रेरणा आहे, असे लष्करी सत्ताधाऱ्यांना वाटले. त्यांनी ग्रीसचे प्रजासत्ताक जाहीर केले. मग १ जुलै १९७३ रोजी सार्वमत घेऊन या घोषणेला जनतेचे समर्थन आहे, असे दाखविले.
लष्करी सत्तेला खरा धक्का बसला तो सायप्रसमधील घटनांनी. १५ जुलै १९७४ या दिवशी सायप्रस नॅशनल गार्ड्‌सच्या ग्रीक अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष आर्च बिशप मॅकारीऑस यांना पदच्युत करून सत्ता काबीज केली आणि मिनोकोस सॅम्पसन यांना अध्यक्ष नेमले. सॅम्पसन हे सायप्रसच्या ग्रीसशी विलीनीकरणासाठी लढणारे बंडखोर होते. ते अधिकारावर आल्यामुळे सायप्रसचे स्वातंत्र्य नष्ट होऊन तेथील तुर्की अल्पसंख्याकांवर ग्रीकांची अधिसत्ता स्थापन होईल व सायप्रस बेटही ग्रीसलाच जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शक्यता निर्माण झाली. सायप्रसच्या प्रश्नावर ग्रीस व तुर्कस्तानचा संघर्ष होता म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सायप्रस वेगळे, स्वतंत्र व तटस्थ राष्ट्र बनविण्यात आले होते. मॅकारीऑसच्या उचलबांगडीमुळे या तटस्थतेला धोका निर्माण होताच तुर्की सैन्याने सायप्रसवर आकमण केले. कायरेनिया हे सायप्रसचे एकमेव बंदर आणि कायरेनिया व निकोशिया यांच्या दरम्यान तुर्की लोकवस्तीचा प्रदेश व्याप्त केला. अखेर १६ ऑगस्टला संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार युद्धविराम झाला. मिकॉस सायमन यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला व सायप्रसच्या लोकसभेचे अध्यक्ष क्लेराइडस यांना नवे सरकार बनविण्यास सांगण्यात आले. सायप्रसवरील तुर्की आक्रमणामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत ग्रीक सेनादलाच्या प्रमुखांनी त्यांनीच निर्माण केलेले ॲड्र्यूसोपुलोस सरकार बरखास्त करून नऊ प्रमुख नेत्यांनी राष्ट्रीय आणीबाणीचे राष्ट्रीय सरकार बनवावे, असे आव्हान केले. राष्ट्राध्यक्ष गिझिकिस यांनी देशांतर करून पॅरिसला स्थायिक झालेले माजी पंतप्रधान कारामानलिस यांनाही स्वदेशी परत येण्याचे आमंत्रण पाठविले. त्याप्रमाणे कारामानलिस परत आले व २५ जुलैला त्यांनी आपले नवीन सरकार बनविले. अशा रीतीने सात वर्षांच्या लष्करी राजवटीनंतर ग्रीसमध्ये पुन्हा एकदा नागरिकांचे म्हणजे जनतेच्या पसंतीचे सरकार स्थापन झाले. या प्रसंगी अथेन्समध्ये ग्रीक जनतेची जी प्रचंड निदर्शने झाली, ती १९४४ मध्ये नाझी गुलामीतून ग्रीस स्वतंत्र झाला, त्याप्रसंगी झालेल्या निदर्शनाइतकी मोठी होती. 
कारामानलिस यांच्या सरकारचे ग्रीसचे माजी राजे कॉन्स्टंटीन यांनी आणि त्यावेळचे तुर्की पंतप्रधान एकेविट यांनीही स्वागत केले. ग्रीस व तुर्कस्तान यांचे संबंध पुन्हा सुधारतील अशी आशा एकेविट यांनी व्यक्त केली.
नवीन सरकारने तत्काल लोकशाही अधिकार जाहीर केले. राजबंद्यांची सुटका केली. लष्करी राजवटीने स्थापन केलेल्या कैद्यांच्या छावण्या बंद केल्या. ज्यांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले होते, त्यांना ते परत देण्यात आले. लष्कराने बराकीत परत जावे व राज्यकारभारात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये, या दोन अटी कारामानलिस यांनी परत येताना घातल्या होत्या. लष्कराने या दोन्ही अटी पूर्णपणे पाळल्या.
कारामानलिस यांनी लष्करी राजवटीने लागू केलेली १९६७ ची संविधानात्मक व्यवस्था रद्द केली व नवी राज्यघटना तयार होईपर्यंत १९५२ चे संविधान पुन्हा लागू केले. लष्करशाहीने १९७३ साली राजसत्ता बरखास्त केली होती. हा निर्णय त्यांनी तात्पुरता स्थगित केला. मात्र ग्रीक जनतेकडून या प्रश्नावर अंतिम निर्णय मिळेपर्यंत राष्ट्रप्रमुखाच्या जागी राजाऐवजी राष्ट्राध्यक्षच राहतील, अशी तरतूद केली.
१९६७ मध्ये पक्षीय राजकीय कार्याला बंदी घालण्यात आली होती, ती २३ सप्टेंबर १९७४ पासून उठविण्यात आली. १९४७ पासून कम्युनिस्ट पक्ष बेकायदा होता. त्याच्यावरील बंदीही उठविण्यात आली. मात्र हिंसात्मक मार्गाने प्रस्थापित लोकशाही राजवट उलथून सत्ता काबीज करण्याचा उद्देश कोणत्याही पक्षाच्या घटनेत नसावा, अशी अट घालण्यात आली.
ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान सेनादलातील व अन्य सुरक्षा दलांतील अनेक अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले. लष्करी राजवटीने नेमलेल्या अनेक मुलकी अधिकाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले. अशा रीतीने लष्करशाही स्थापन करणारे लोक सत्तास्थानावर राहणार नाहीत, अशी खबरदारी कारामानलिस यांनी घेतली.
नोव्हेंबर १९७४ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. १९६४ नंतर म्हणजे दहा वर्षांनंतर झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत एकंदर सहा पक्षांनी भाग घेतला : (१) सेंटर युनियन-न्यू फोर्सेस हा लोकशाही समाजवादाचा पुरस्कार करणारा आणि राष्ट्रीय एकतेवर भर देणारा पक्ष आहे. (२) न्यू डेमॉक्रसी हा पंतप्रधान कारामानलिस यांचा पक्ष असून ग्रीसमध्ये निरोगी व कार्यक्षम लोकशाही स्थापन करणे हे या पक्षाचे ध्येय आहे. (३) पाँपेद्रू यांचा पान-हेलेनिक सोशॅलिस्ट मुव्हमेंट अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाचा पुरस्कार करणारा पक्ष असून संपत्तीचे व उत्पादन साधनांचे सामाजीकरण करण्यात यावे, अशी या पक्षाची भूमिका आहे. (४) युनायटेड लेफ्ट हा मॉस्कोला मानणाऱ्या व पाश्चिमात्य दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या जहालांचा संयुक्त पक्ष आहे. (५) नॅशनल डेमोक्रॅटिक युनियन हा पक्ष माजी संरक्षण मंत्री पेट्रास गेरू फाईलास यांनी स्थापन केलेला आहे. लष्करी सत्तेविरुद्ध मे १९७३ मध्ये जे आरमारी बंड करण्याचा प्रयत्न झाला, त्यात त्यांचा भाग होता, असा त्यांच्यावर आरोप होता. (६) नॅशनल रॉयलिस्ट युनियन हा सेनापती झेनेटिस यांचा पक्ष आहे. राजे कॉन्स्टंटीन यांना तत्काळ परत बोलावण्यात यावे असा प्रचार त्यांनी केला होता. कारामानलिस यांच्या पक्षाला जागा आणि मतदान या दोन्ही कसोटींवर निर्णायक बहुमत मिळाले. एकूण ३oo जागांपैकी कारामानलिस यांच्या न्यू डेमॉक्रसी पार्टीला २२o जागा व एकूण मतांच्या ५४·३७% मते मिळाली. त्यांच्या खालोखाल सेंटर युनियन-न्यू फोर्सेस या पक्षाला ६o जागा व २o·४२% मते पडली. २१ नोव्हेंबरला कारामानलिस यांनी आपले नवे सरकार स्थापन केले.
या नवीन सरकारने अधिकारावर आल्याबरोबर राजसत्तेच्या भवितव्यासंबंधी सार्वमत घेण्याचा निर्णय जाहीर केला. ८ डिसेंबरला हे सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतात एकंदर मतदात्यांपैकी ७५·५ टक्के मतदारांनी भाग घेतला. ६९·२ टक्के मतदारांनी राजपदविरहित लोकशाहीच्या व ३o·८ टक्के मतदारांनी राजपदसहित लोकशाहीच्या बाजूने मतदान केले. अशा रीतीने ग्रीसच्या राजेशाहीची अखेर झाली. माजी राजे कॉन्स्टंटीन यांनीही लंडन येथून पत्रक काढून देशात शांतता, सुबत्ता व राष्ट्रीय एकता नांदण्याची आवश्यकता आहे, असे निवेदन करून लोकमताने झालेल्या निर्णयाचा स्वीकार केला.
कारामानलिस यांनी लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात राजसत्तेचे निर्मूलन झाल्यामुळे आता खरीखुरी राज्यघटना प्रसृत करणे आवश्यक आहे, या नव्या राज्यघटनेने सरकारचे लोकसभेला असलेले उत्तरदायित्व अबाधित राखूनही त्वरित व फलदायक निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारी शाखेला देण्यात येतील, असे आश्वासन दिले. 
आपल्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाची रूपरेषाही त्यांनी स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वातंत्र्य, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर परराष्ट्र धोरणाची आखणी केली जाईल. भौगोलिक, राजकीय व वैचारिक दृष्ट्या ग्रीस हा पाश्चिमात्य देश आहे. संरक्षण व भौतिक सुबत्ता या दोन्ही उद्देशांसाठी ग्रीस पश्चिमी देशांबरोबर सहकार्य करू इच्छितो. नाटो कराराच्या लष्करी भागातून बाहेर पडण्याचा आणि ग्रीसमधील अमेरिकन तळ काढून घेण्याबद्दलचा निर्णय घेतला असला, तरी ग्रीस पश्चिमी देशांशी असलेले राजकीय, सांस्कृतिक व अन्य संबंध तोडू इच्छित नाही. यूरोपियन आर्थिक संघटनेत सहभागी होण्याची ग्रीसची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
सायप्रसच्या प्रश्नावर तुर्कांशी ग्रीसचा गंभीर संघर्ष आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. सायप्रसमध्ये लादलेली कोणतीही स्थिती ग्रीस मान्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्राध्यक्ष गिझिकिस यांनी राजीनामा दिल्यामुळे रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून स्टासिनोपोलुस हे बहुमताने निवडून आले. विरोधी पक्षांनी त्यांच्या निवडणुकीला विरोध केला कारण ते पंतप्रधानाच्या पक्षाचे होते. आपल्याच पक्षाचा अध्यक्ष निवडून वेगळ्या प्रकारे एकपक्षीय सत्ता रूढ करण्याचा प्रयत्न कारामानलिस करीत आहेत, असा त्यांचा आरोप होता.
२८ नोव्हेंबर १९७४ रोजी यूरोपीय समितीत (कौन्सिल ऑफ यूरोप) ग्रीसला पुन्हा प्रवेश देण्यात आला. १९६९ मध्ये यूरोपियन समितीने ग्रीसच्या लष्करी राजवटीवर मानवी हक्क दडपून टाकल्याबद्दल वारंवार टीका झाली, म्हणून ग्रीसने यूरोपियन संघटनेशी संबंघ तोडला होता.
कारामानलिस यांच्या सरकारने लष्करी उठाव व लष्करशाही स्थापन करण्याचे कारस्थान केल्याबद्दल माजी पंतप्रधान पापाद्रूपोलीस व त्याचे चौदा सहकारी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले.
ग्रीस-तुर्कस्तान यांच्यात इजीअन समुद्रातील तेलसंशोधनाच्या हक्काबद्दलही संघर्ष आहे. ग्रीस व तुर्कस्तान हे दोन्ही देश हा हक्क आपला आहे असे मानतात. हा वाद वाटाघाटीने सुटण्याची शक्यता नाही, असे वाटल्यावरून ग्रीस पंतप्रधान कारामानलिस यांनी विरोधी पक्षांची अनुमती घेऊन हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे हा वाद सोपवावा, अशी सूचना २७ जानेवारी १९७५ रोजी केली.
ग्रीसमध्ये आता लोकशाही व्यवस्था स्थिर झाल्यासारखी वाटते. अंतर्गत राजकीय अशांतता कमी झाली असून ग्रीसचे मुख्य प्रश्न आर्थिक व आंतरराष्ट्रीय संबंधाचे आहेत. चलनफुगवटा, भाववाढ व तेलाच्या भाववाढीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हे आर्थिक प्रश्न व तुर्कस्तानच्या आक्रमणानंतर सायप्रसमध्ये निर्माण झालेली परिस्थिती व इजीअन समुद्रातील तेलसंशोधनाच्या हक्काबद्दल तुर्कस्तानशी असलेला तंटा, हेच मुख्यतः ग्रीसचे आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत. १ डिसेंबर १९७४ रोजी सार्वमताने राजेशाही नष्ट होऊन ग्रीस प्रजासत्ताक राष्ट्र बनले. तथापि नवे संविधान तयार झालेले नाही. तोपर्यंत १९५२ च्या ११२ कलमी संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार चालविण्यात येत आहे. त्यातील मुख्य तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत : सर्वांना समान कायदा, आरोपीस न्यायालयासमोर दाखल होण्याचा हक्क, बेकायदा अटकेपासून बचाव, सभा व संघटनास्वातंत्र्य, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, राजपद वंशपरंपरागत, पहिल्या जॉर्जच्या पुरुष-संततीला अग्रहक्क, राजा सर्वसंमत धर्मसंस्थेचा अनुयायी असला पाहिजे, त्याच्या गैरहजेरीत त्याचे अधिकार युवराजाकडे आणि युवराज अल्पवयीन असल्यास राणीकडे राहतील.
स्थानिक स्वराज्यसंस्था : या संविधानानुसार ग्रीसचे ५१ विभागांत (नोमॉई) विभाजन केले असून प्रत्येकावर नोमॉर्क नावाचा अधिकारी प्रमुख असतो. गृहमंत्री त्यांची नियुक्ती करतो.
स्थानिक कारभार : हा बव्हंशी फ्रेंच पद्धतीवर आधारलेला आहे. गृहखात्याच्या अनुज्ञेने काही कर बसविण्याचे अधिकार नगरपालिकेला असतात पण प्रांतिक सेवांचा एकंदर खर्च राष्ट्रीय गृहखात्याच्या अंदाजपत्रकातूनच भागवला जातो. पालिकांच्या व नोमॉईच्या निवडणुका दर चार वर्षांनी होतात.
भाषा व साहित्य : ग्रीक ही इंडो-यूरोपीय कुटुबांतील एक अत्यंत महत्वाची भाषा. ‘मायसीनियन ग्रीक’ ह्या नावाने ओळखले जाणारे, ग्रीक भाषेचे इ.स.पू. १४५o ते १२oo च्या दरम्यानचे रूप संशोधकांस उपलब्ध झाले आहे. हा ग्रीकचा जुन्यातला जुना पुरावा. त्यावरून ग्रीक भाषा ही ३,ooo हून अधिक वर्षांपूर्वींची आहे, असे दिसून येते. आयोनियन, ॲटिक, एओलियन, डोरिक ह्या ग्रीक भाषेच्या काही महत्त्वाच्या बोली. इ.स.पू. चौथ्या शतकापासून ‘कोइनेऽ’ ह्या ग्रीक भाषारूपाला सर्वमान्यता प्राप्त झाली. कोइनेऽ ही अथेन्सच्या बोलीवर आधारलेली होती व आयोनियनचा तिच्यावर प्रभाव होता. ग्रीकांनी सेमिटिक लिपी आत्मसात करून तिचा विकास केला. ग्रीक लिपी हे सेमिटिक लिपीचेच अधिक रेखीव रूप होय. ग्रीक ही सर्व यूरोपीय लिपींची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जननी होय. एकोणिसाव्या शतकात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्राचीन ग्रीक भाषेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नात कथार्युऔसा ही कृत्रिम भाषा तयार झाली, ती सरकारी व बौद्धिक लेखनासाठी वापरण्यात येते पण सामान्य लोकांना कळण्याइतकी ती सुबोध नाही. 
ग्रीक साहित्याचा इतिहास जवळजवळ ३,ooo वर्षांचा आहे. महाकाव्ये, भावकविता, नाट्यकृती, इतिहासग्रंथ तसेच तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ ह्यांनी प्राचीन ग्रीक साहित्य संपन्न असून पुढील पिढ्यांना अनुकरणीय वाटावेत, असे अभिजात वाङ्‌मयीन आदर्श त्यातून निर्माण झाले. महाकवी होमरकृत इलिअड  आणि ओडिसी  ही महाकाव्ये जगद्विख्यात आहेत. स्टिसिकोरस, बकिलिडीझ, पिंडर, आनाक्रेऑन, सॅफो, कोरिना ही प्राचीन ग्रीक भावकवी-कवयित्रींची नावे. एस्किलस, सॉफोल्कीझ युरिपिडीझ ह्यांनी श्रेष्ठ शोकात्मिका दिल्या. बायझंटिन किंवा पूर्व रोमन साम्राज्याच्या कालखंडात निर्माण झालेल्या ग्रीक साहित्यावर ख्रिस्ती धर्मप्रेरणांचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटलेला आहे. १४५३ नंतरचा काळ आधुनिक ग्रीक साहित्याचा. कोस्टिस पालामास, इथोआन्निस, सायकारीस, निकोस काझांटझाकीस, येऑर्यिऑस सेफेरीस, अलेक्झांड्रॉस पापाडिॲमॅटिस हे आधुनिक ग्रीक साहित्यिकांपैकी काही नामवंत. येऑर्यिऑस सेफेरीसला १९६३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. 
ग्रीसमधील ९५ दैनिकांपैकी अथेन्सची अक्रॉपलिसता नियाकॅथिमेरिनी  व ॲथिनैकी  ही प्रमुख असून त्यांचा खप प्रत्येकी ३५,ooo वर आहे. सलॉनिकच्या एलिनिकॉस वोरास  या मध्यपक्षीय पत्रालाही चांगला खप आहे. बहुसंख्य वृत्तपत्रे हुजूरपक्षीय किंवा उदारमतवादी, समाजवादी फार थोडी व बेताच्या खपाची. इतर नियतकालिकांत चिनाइका  हे देशातील सर्वाधिक (१,१o,ooo) खपाचे स्त्रियांचे पाक्षिक, ॲक्तिनेस  हे ख्रिस्ती संस्कृती-प्रचारार्थ विविध विषयांचे पाक्षिक आणि टेक्निका क्रॉनिका  हे तंत्रसंबंधी व आर्थिक प्रश्नांना वाहिलेले पाक्षिक यांचा अंतर्भाव होतो.
नगरपालिकांची, ग्रामीण व विविध समाजीयांची ग्रंथालये ग्रीसभर पसरलेली. शिक्षण मंत्रालयाची सहा फिरती पुस्तकालये व चित्रप्रदर्शक विभाग दूरदूरच्या भागात संचार करतात. त्याच मंत्रालयावर सार्वजनिक शासकीय ग्रंथालयांची जबाबदारी आहे, पैकी सर्वांत महत्त्वाचे अथेन्स येथील बॅलिॲनेऑज राष्ट्रीय ग्रंथालय असून सर्वांत मोठे लोकसभेचे आहे. विद्यापीठांच्या ग्रंथालयांखेरीज इतर शिक्षणसंस्था, मंत्रालये, संघटना इत्यादिकांच्या संग्रहांपैकी कृषिसंस्थेची व रसायनज्ञांची ग्रंथालये उल्लेखनीय आहेत.
कला, क्रीडा : ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षे ज्या वास्तुशिल्पाच्या आणि मूर्तिशिल्पाच्या कृती झाल्या, त्या पाश्चात्त्यांच्या शिल्पकलांना आजही प्रमाणभूत आहेत. ग्रीक शिल्पावर सुरुवातीस आधीच्या पुरातन ईजिप्शियन शिल्पकलेची छाया होती पण लवकरच ग्रीसची स्वतंत्र प्रतिभा विकसित झाली. प्राचीन नगरराज्यांच्या काळातील शिल्पाचे परिपूर्ण सौंदर्य अलेक्झांड्रियन युगातून मग रोमन प्रभुत्वाच्या दिवसातून, नंतर बायझंटिन कालखंडातून आणि अखेर तुर्की जमान्यातून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत कायम राहिले. चित्रकला प्राचीन काळच्या कॉरिंथ प्रदेशातील मृत्तिकापात्र-नक्षीकामापासून परिणत होऊन भित्तिचित्रांतून विकसित होत बायझंटिन कालखंडात वैभवपूर्ण स्वरूपात अवतरली. तुर्की अंमलात ग्रीक चित्रकला धार्मिक विषयात टिकून राहिली. स्वातंत्र्योत्तर तिच्यावर पाश्चात्त्य शैलीचा पगडा बसला. ग्रीसच्या भौगोलिक स्थानाचा परिणाम तेथील पाश्चात्त्य व पौर्वात्य कलांचा संगम, हा होय. विशेषतः संगीतात हा दोन प्रवृत्तींचा समन्वय व विरोधही दिसून येतो. संगीताचे हे दुहेरी स्वरूप प्राचीन काळापासून आढळते. या ऐतिहासिक द्वंद्वांचा परिणाम दिसून येतो. आजचे ग्रीक संगीत लोकांचे धार्मिक व अभिजात संगीत मिळून बनले आहे. प्राचीन ग्रीक विद्या-कलांच्या अधिदेवतांत तर्प्सिकोरी या नृत्याच्या अधिष्ठात्री देवतेचा समावेश आहे. प्राचीन ग्रीक नाटकांतील समूहगीतांबरोबर समूहनृत्यांचा भागही महत्त्वाचा होता. त्यातील नृत्य-नर्तकी देवतांचे मुखवटे घालून करीत. अभिजात नृत्यकला लोकनृत्यात अजूनही टिकून आहे. मात्र तिच्यावर शेजारच्या देशांची छाप आहे.

प्राचीन अभिजात ग्रीक नाटक अजूनही जगाचे डोळे दिपवीत असता एकोणिसाव्या शतकात नवस्वतंत्र ग्रीकांनी नाट्यकलेचे पुनरुज्जीवन करून असामान्य श्रेणीचे नाट्यप्रयोग सादर केले. रशियातील ओडेसा, रूमानियातील बूकारेस्ट, आयोनियन बेटे व प्रत्यक्ष ग्रीसची भूमी येथे नाट्यकलेसाठी वेगवेगळ्या समूहांनी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती उच्च प्रतीच्या नाट्यनिर्मितीत झाली. या कलेत ग्रीस आजही आघाडीवर आहे. चित्रपटनिर्मितीला ग्रीसमध्ये सुरुवात झाली असून १९६४ मध्ये संपूर्ण लांबीचे शंभरहून अधिक चित्रपट निघाले आणि ते सु. ७oo कायम व ९oo हंगामी प्रेक्षागृहांत ६ कोटी लोकांनी पाहिले. ग्रीसमध्ये १,४oo चित्रपटगृहे आहेत.
ख्रि.पू. ७७६ मध्ये सुरू झालेल्या मैदानी शर्यतींचे चतुर्वार्षिक फड ऑलिंपिक गेम्स, ही ग्रीसची क्रीडाजगताला थोर देणगी आहे. या शारीरिक पटुत्वाच्या चढाओढी चौथ्या शतकात रोमन बादशाह थिओडिसिअस याने थांबवल्या. फ्रान्समधील एका उमरावाच्या प्रयत्नांनी १८९८ मध्ये त्या पुन्हा चालू करण्यात आल्या. सुरुवातीस झ्यूस या प्रमुख ग्रीक देवाच्या उत्सवाप्रीत्यर्थ फक्त ग्रीक नागरिकांसाठी असलेल्या या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. तेव्हापासून मात्र जगातील सर्व लोकांना त्या खुल्या राहिल्या. आधुनिक ग्रीक या चढाओढीतून चमकत नसले तरी शरीरबळ कसोटीचे विविध खेळ ते हौसेने खेळतात. सर्वसामान्य लोकांत विविध धार्मिक सण व उत्सव हेच मनोरंजनाचे मुख्य कार्यक्रम असतात. अशा प्रसंगी समूहनृत्ये, समूहगायन, मिरवणुका इ. प्रकारांनी शहरांना व खेड्यांना जत्रांचे स्वरूप येते आणि उल्हसित नागरिकांच्या झुंडींनी रस्ते फुलून जातात.
ग्रामदैवत
ग्रामदैवत या संज्ञेचा विचार केला असता माझ्या तुटपुंज्या ज्ञानाने मला असे आठवते की गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो. अशा दैवताला ग्रामदैवताचा मान का मिळाला याबाबतही अनेकदा विविध कथा, आख्यायिका ऐकण्यास मिळतात. उदा.



ग्रीस

 म्यानातून उसळे तरवारीची पात


तथापि १९६७ च्या क्रांतीने शासनव्यवस्थेत बराच बदल झाला. राज्यसत्ता लष्करी अंमलदाराच्या हाती गेली. नवीन शासन व्यवस्थेत (अ) राष्ट्रीय सभा (नॅशनल कौन्सिल), (ब) संसदीय सभा, (क) राष्ट्रीय शैक्षणिक सभा या संस्था निर्माण करण्यात आल्या. परिणामी शासनव्यवस्था संसदीय स्वरूपाची असली, तरी व्यवहारात लष्करी गटाचा एकछत्री अधिकार चालू आहे.

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. अर्थात, या लेखाचा हेतू कुलाचाराबद्दल नाही.
रामायणातील सुंदरकांडात हनुमान लंकानगरीत प्रवेश करताना त्याची भेट साक्षात लंकादेवीशी होते. ती हनुमानाचा मार्ग अडवून उभी असल्याने हनुमान तिला आपली ओळख विचारतो. त्यावेळेस ती त्याला पुढील उत्तर देते.
अहं राक्षसराजस्य् रावणस्य् महात्मन:
आज्ञाप्रतीक्षा दुर्धर्षा रक्षामि नगरीमिमाम्॥ ५-३-२८
श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की मी राक्षसराज रावणाच्या आज्ञा पाळते आणि या नगराचे पराजित होण्यापासून संरक्षण करते. यापुढील श्लोकांवरून असे दिसते की मुष्टीप्रहार करून हनुमान लंकादेवीचा पराभव करतो आणि त्यावर दु:खी होऊन लंकादेवी सांगते की ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की ज्या दिवशी एक वानर तुझा पराभव करेल त्यानंतर लंकानगरी आणि राक्षसांचा पराभव अटळ आहे.

पौराणिक कथा सोडून इतिहासात पाहायचे झाल्यास ग्रामदैवताची अनेक उदाहरणे मिळतात. जसे, पुणे गाव नव्याने वसवताना जिजाबाईंनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना केली. मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी ही मूळ कोळी समाजाची देवता. मुंबादेवीचे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेल्याचा पुरावा सापडतो.(नक्की काळाबद्दल अनेक मतप्रवाह दिसले. हे मंदिर सुमारे ६०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचेही वाचण्यास मिळते.) मुंबा हे महाअंबा या नावाचे भ्रष्ट स्वरूप असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची स्थापना मुंबा नावाच्या स्त्रीने केल्याने त्याला मुंबादेवी असे नाव पडल्याची गोष्टही ऐकवली जाते.
   एका आख्यायिकेनुसार मुंबारक नावाचा राक्षस गावातील नागरिकांना त्रास देत असे. त्याचा धुमाकूळ वाढत चालल्याने त्रस्त नागरिकांनी ब्रह्मदेवाची उपासना केली. प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आपल्या दिव्यशक्तीने एका आठ भुजांच्या देवीची निर्मिती केली. या देवीने मुंबारकाचा नि:पात केला. पश्चात्तापदग्ध मुंबारकाने देवीला शरण जाऊन आपल्या नावाने तिचे मंदिर उभारण्याचा पण केला, आणि अशा रीतीने मुंबादेवी हे नाव आणि मंदिर अस्तित्वात आले.
  शहरे वगळून जर लहान गावांकडे किंवा खेड्यांकडे वळले, तर ग्रामदैवताची संकल्पना थोडी बदलते. बरेच ठिकाणी अकाली आणि अनैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे, नागाचे किंवा ज्या मूळ पुरुषामुळे गाव अस्तित्वात आले अशा व्यक्तीचे मंदिर स्थापले जाते. बर्‍याचदा अशी मंदिरे एखाद्या झाडाच्या पारावर, दगडांना शेंदूर लावून बनवलेलीही आढळतात.
     प्रकार कसेही असोत, बाह्य आणि अंतर्गत दुष्ट शक्तींपासून त्या गावाचे किंवा नगराचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूच्या किंवा ग्रामस्थांच्या मनात एका प्रकारचे आदरयुक्त भय निर्माण व्हावे या हेतूने ग्रामदैवताची स्थापना केली जात असे. याच पार्श्वभूमीवर इतर संस्कृतींत ही प्रथा होती का याचा शोध घेतला असता, आग्नेय आशियातील बौद्ध संस्कृतीत ती होतीच, असे दिसते. याखेरीज पाश्चिमात्य संस्कृतींतही ती असल्याचे आढळते. या लेखात ग्रीक संस्कृतीतील एका ग्रामदैवताबद्दल थोडीफार माहिती लिहीत आहे.
   अथेना ही बुद्धीचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराची ग्रामदेवता आहे. या शहराला अथेन्स हे नाव या देवतेवरूनच पडल्याचे सांगितले जाते. प्राचीन अथेन्समध्ये ख्रि.पू.५०० च्या सुमारास पार्थेनॉन या अथेनाच्या देवळाची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते.
  ग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. पार्थेनॉनची रचना आयताकृती असून ८ स्तंभ x १७ स्तंभ अशा रचनेवर संपूर्ण मंदिर उभे आहे. हे मंदिर पूर्ण करण्यास सुमारे १६ वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. फिडिअस नावाच्या शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केल्याचे कळते.

अमेरिकेत टेनसी राज्यातील नॅशविल या शहरात पार्थेनॉनच्या मंदिराची पूर्णाकृती प्रतिकृती १८९७ साली बनवली गेली. या वास्तूला भेट देण्याचा हल्लीच योग आला. टेनसी राज्याच्या शताब्दीप्रीत्यर्थ या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या इमारतीचा कलादालन म्हणून उपयोग केला जातो. अनेक ग्रीक शिल्पांच्या अप्रतिम प्रतिकृतींनी या इमारतीतील दालने सजलेली आहेत. सर्वात भव्य मूर्ती अर्थातच अथेनाची. पाश्चिमात्य जगतातील बंदिस्त आवारातील ही सर्वात मोठी मूर्ती गणली जाते.
नॅशविलचे पार्थेनॉन
नॅशविलचे पार्थेनॉन


मूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक अभ्यासावरून १९९० साली नॅशविलच्या प्रतिकृती मंदिरात सुमारे ४२ फुटांची अथेनाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि २००२ साली तिला सुवर्णवर्खाने सजवण्यात आले.
अथेना
अथेना


मूर्तीचे सर्वसाधारण वर्णन करायचे झाल्यास या मूर्तीच्या उजव्या हातात अथेनाची सहकारी ग्रीक देवता नाइकी (Nike) अथेनाच्या डोक्यावर चढवण्यासाठी विजयी मुगुट घेऊन उभी आहे. अथेनाच्या डाव्या हातात प्रचंड आकाराची ढाल असून त्यावर ग्रीक देव आणि दानव यांच्यातील युद्धाची चित्रे कोरलेली आहेत. तिच्या डाव्या खांद्यावर रेललेला भाला आणि पायाशी सर्प आहे. हा सर्प म्हणजे एरिकथोनिअस हा अथेनाचा मानसपुत्र. आपल्या ढालीमागे त्याला दडवून ती एरिकथोनिअसचे रक्षण करते असे सांगितले जाते. अथेनाच्या चिलखतावर मेडुसा या राक्षसीचे मुंडके लावलेले आढळते. ग्रीक पुराणांनुसार पर्सिअस या योद्ध्याला अथेनाने मेडुसाचा नि:पात करण्यात मदत केली होती. विजयी झाल्यावर पर्सिअसने ते मुंडके अथेनाला भेट दिल्याचे सांगितले जाते. अथेनाच्या ढालीवरही मध्यभागी हे मुंडके दाखवले आहे.
    मूर्तीची वस्त्रे आणि आभूषणे सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. भाला, ढाल, सर्प आणि नाइकी देखील सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. अथेनाचा चेहरा त्यामानाने बराच भडक रंगवलेला दिसतो. याचे स्पष्टीकरण जवळच वाचता येते. अनेक पौराणिक कथा आणि पुराव्यांच्या आधारे मूर्तिकाराने मूर्तीला असे स्वरूप दिल्याचे सांगितले जाते.
   अमेरिकेतील रहिवाशांना नॅशविलला जाण्याची संधी मिळाल्यास या अप्रतिम कलादालनाला जरूर भेट द्यावी.
   अवांतर: या कलादालनात एका छायाचित्रकाराने काश्गर, चीन येथे काढलेली काही अप्रतिम प्रकाशचित्रे पाहण्यास मिळाली. पिवळ्या कांतीच्या आणि नाजूक शरीरयष्टीच्या चिनी लोकांपेक्षा बरेच वेगळे दिसणारे हे लोक, त्यांच्या भटक्या जमाती, जत्रा, गाढवांचा बाजार इ. ची अप्रतिम प्रकाश/छायाचित्रे येथे लावली होती. भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते. याशिवाय या कलादालनात अतिशय अप्रतिम तैलचित्रांचा समावेश आहे.
  खुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.

चलन

1 जानेवारी 2002 रोजी, युरोपने 6 व्या शतकापासून अथेन्समध्ये जन्मलेल्या ग्रीक ड्रॅचमा या सर्वात जुन्या चलनाचा निरोप घेतला. युरोपियन मॉनेटरी युनियनच्या इतर सदस्यांबरोबर नवीन चलन - युरो (EURO) ने ग्रीसला एकत्रित केले. 1 युरो = 100 युरो सेंट. चलनात 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 ​​युरो मूल्यांच्या नोटा आहेत.

प्लास्टिक कार्ड

व्हिसा क्लासिक, अमेरिकन एक्सप्रेस, मास्टरकार्ड या आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टमचे क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. एटीएमची संख्या बरीच जास्त आहे. परंतु कार्डद्वारे पैसे देणे नेहमीच शक्य होत नाही.तेव्हा रोख पैसे बाळगणे चांगले आहे.

उघडण्याची वेळ

सर्व बँका सकाळपासून  दुपारी दोन वाजेपर्यंत खुल्या असतात,तर काही जास्तीत जास्त तीनपर्यंत. शनिवार आणि रविवारी बंद असतात. शहरांमधील विमान तिकीट कार्यालये चार वाजेपर्यंत सुरू असतात.
  दुकाने स्वताची वेळ ठरवून उघडी असतात. सोमवार आणि बुधवार हे फार खरेदी-विक्री नसलेले दिवस मानले जातात: बहुतेक दुकाने हिवाळ्यात सकाळी 9:00 ते दुपारी 3:00 पर्यंत आणि उन्हाळ्यात दुपारी 2:00 पर्यंत उघडी असतात. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे व्यापारी दिवस आहेत: दुकाने सकाळपासून दोन वाजेपर्यंत उघडी असतात आणि नंतर पाच वाजता पुन्हा उघडतात आणि हिवाळ्यात आठ वाजेपर्यंत आणि उन्हाळ्यात नउ वाजेपर्यंत व्यापार करतात. शनिवारी, खरेदी विक्री सकाळपासून तीन ते चार वाजेपर्यंत चालते. अलीकडे, अधिकाधिक दुकाने कामाचा वेळ वाढवण्याच्या प्रयत्न करत आहेत. ते रविवारी पर्यटकाच्या सोयीसाठी दुकाने उघडी ठेवतात.
सुपरमार्केटच्या सुरु रहाण्याच्या स्वतःच्या वेळा असतात: ते हिवाळ्यात सहा ते नउ ते रात्री आठ आणि उन्हाळ्यात रात्री नउ पर्यंत खुले असतात. ख्रिसमस आणि इस्टरच्या शेवटच्या आठवड्यात, प्रत्येकजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो. पर्यटकांच्या सोयीसाठी दुकाने पर्यटन हंगामात खुप वेळ खुली असतात.
  बहुतेक संग्रहालये आणि पुरातत्व स्थळे तीन वाजता बंद होतात. उन्हाळ्यातील दोन सर्वात महत्वाची पर्यटन आकर्षणे उशीरापर्यंत सुरु असतात: एक्रोपोलिस ७.३० पर्यंत खुले असते आणि राष्ट्रीय संग्रहालय संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु असते. काही संग्रहालये संध्याकाळी उघडी असतात: बेनाकी संग्रहालय गुरुवारी बारा वाजेपर्यंत, ग्रीक वाद्य यंत्रांचे संग्रहालय बुधवारी अकरापर्यंत खुले असते.
  औषधाची दुकाने बराच वेळ सुरु असतात.

व्हिसा

ग्रीसमध्ये प्रवेश करण्यासाठी शेंजेन व्हिसा आवश्यक आहे. नवीनतम माहितीसाठी, कृपया ग्रीक दूतावासाच्या कॉन्सुलर आणि कायदेशीर विभागाशी किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधा.

सीमाशुल्क नियम आणि निर्बंध

ग्रीक  नियमांनुसार, सर्व वैयक्तिक वस्तू (कपडे, कॅम्पिंग उपकरणे इ.), 10 किलो वजनाचे अन्न आणि पेये, सिगारेट (300 नग ) किंवा समान प्रमाणात तंबाखू, तीव्र अल्कोहोलयुक्त पेये (1, 5 लिटर ) किंवा वाइन (2 लिटर ); खेळायचे पत्ते (2 कॅटपेक्षा जास्त नाही). पत्ते खेळण्यावर तसेच सामन्यांवर ग्रीसमध्ये राज्याची मक्तेदारी सुरू करण्यात आली आहे. कॅमेरा आणि फोटोग्राफिक फिल्म किंवा व्हिडिओ कॅमेरा आणि फिल्म, दुर्बीण, संगीत वाद्य छोटा आकार, ऑडिओ आणि व्हिडिओ उपकरणे, सायकली, क्रीडा उपकरणे आयात करण्याची परवानगी आहे, औषधे, औषधे (डॉक्टरांनी लिहून दिलेली मर्यादित औषधे वगळता), पुरातन वस्तू, स्फोटके, शस्त्रे आयात करण्यास मनाई आहे.
     सुरक्षा उपाय कडक केल्यामुळे, सर्व  धातूच्या तीक्ष्ण वस्तू ( नख कापण्याची कात्री, पेपर कटर, पॉकेट चाकू इ.) फक्त चेक केलेल्या बॅगेजमध्ये नेले जाऊ शकतात. द्रवपदार्थांसाठीही तेच आहे. हातातील सामान नियंत्रण कक्षातून तपासणी करुन पास केल्यानंतर ड्युटी फ्री मध्ये खरेदी केलेल्या अपवाद वगळता द्रव वाहतूक करण्यास मनाई आहे. अन्यथा, विशेष नियंत्रण आणि तपासणी दरम्यान, ते जप्त केले जातात. 
          पुरातत्व उत्खननातील दगड, तसेच समुद्राच्या तळाशी सापडलेल्या वस्तूंसह ग्रीसमधील पुरातन वस्तूंची निर्यात प्रतिबंधित आहे. सामानात आढळल्यास ते जप्त केले जाते आणि गुन्हेगारी कलमा अंतर्गत कारवाई केली जाते. सर्वत्र विकल्या जाणार्‍या पुरातन वस्तूं मोफत निर्यात करण्यास परवानगी आहे. वैयक्तिक गरजांसाठी खरेदी केलेल्या वस्तूंची निर्यात निर्बंधांशिवाय (नवीन कार वगळता) केली जाते. काही वस्तूंसाठी आपल्याला हे सिद्ध करावे लागेल की ते वैयक्तिक वापरासाठी निर्यात केले जात आहेत: 


महत्त्वाची स्थळे : ग्रीस भूमीवरील व भोवतालच्या बेटांवरील प्राचीन शिल्पावशेष, सुंदर निसर्गदृश्ये व सुखद हवामान यांकडे आकृष्ट होऊन अनेक यूरोपीय व अमेरिकन हौशी प्रवासी तेथे दरसाल हिवाळ्यात येत असतात. त्यांच्या सोयीसाठी विमानाने, समुद्रातून, रेल्वेने आणि रस्त्यांवरून वाहतूक सुलभ करण्याची ग्रीक सरकार पराकाष्ठा करीत आहे. हॉटेले व अन्य निवासव्यवस्था, माहिती कचेऱ्या आणि मार्गदर्शक याही तरतुदी तयार असतात. अथेन्सखेरीज प्रमुख शहरे सलॉनिक, पायरीअस, पट्रॅस व कॉरिंथ ही असून ती बंदरेही आहेत. प्रेक्षणीय प्राचीन शिल्पावशेष अथेन्सप्रमाणेच डेल्फाय, कॉरिंथ, एपिडॉरस, स्पार्टा, ऑलिंपिया या ठिकाणी आणि क्रीट, यूबीआ, कीऑस इ. बेटांवर आहेत. कॉर्फ्यू बेट विश्राम निवासाच्या दृष्टीने रमणीय आहे. ग्रीसच्या भूमिवर व बेटांवरून अनेक स्थळे, विशेषतः धार्मिक वास्तू, बायझंटिन कलाकौशल्याची साक्ष देतात. ईशान्य ग्रीसच्या थेसाली प्रांतात कॅल्सिडिसी द्वीपकल्पाच्या एका टोकाला ॲथॉस पर्वतावरील मठांतून मध्ययुगीन ग्रीक सनातन ख्रिस्ती धर्मसंस्थेचे स्वरूप जसेच्या तसेच कायम टिकून राहिलेले दिसते.

पाश्चात्त्य संस्कृतीची मूलभूमी यूरोपीयांच्या विद्या, कला, विज्ञान, तत्त्वज्ञानादी सर्व वैचारिक अंगांचे उगमस्थान व जगातील मानवजीवनावर जास्तीत परिणाम घडवून आणण्याच्या शक्तींचे आद्यपीठ, असे ग्रीसचे वर्णन करता येईल. सारे जग समृद्ध करणारा अडीच-तीन हजार वर्षांपूर्वींच्या ऐश्वर्याचा वारसा अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतर एकोणिसाव्या शतकात पुन्हा मिळवून ग्रीक राष्ट्र नव्या दमाने आधुनिक काळात इतर देशांच्या बरोबरीला आले आहे. 

सर्वात सुम्दर ग्रीसची दहा बेटे :-

     ग्रीक बेटे केवळ त्यांच्या अतिशय सुंदर निसर्गरम्यता, असामान्यपणे निळ्या रंगाच्या समुद्रासाठीच नव्हे तर त्यांच्या पर्यटनदृष्ट्या सोयीने देखील आकर्षक आहेत. आज ग्रीसमध्ये आपण आपल्या सुट्ट्या या बेटांवर स्वस्त आणि मस्तपणे घालवू शकता.
    या आधीच ग्रीसला गेलेल्या पर्यटकांचा अनुभव हाच आहे कि इथे सर्वच पर्यटन स्थळे उत्तम राखली गेली आहेत. तसेच इथला समुद्र इतका चमकदार निळा आहे कि जरी तो एखाद्या सामान्य दिसणार्‍या दगडाच्या बेटाभोवती पसरला असला तरीही ते दृष्य छान दिसते.
 सिमी बेट :-
   या बेटावरील घरे चित्रांसारखी आहेत, त्यावरुन आपली दृष्टी वळवणे अशक्य आहे इथे सुरवातीला सर्व घरे पांढर्या रंगात होती, पण नंतर स्थानिक लोकांनी त्यांना रंगबीरंगी रंगवायचे ठरवले. इथले वैशिष्ट्य म्हणजे सुम्दर रचनेची घरे, सुंदर समुद्रकिनारे, स्वादिष्ट पाककृती आणि मैत्रीपूर्ण यजमान असे हे ठिकाण आवर्जून जावे असेच आहे.

 पॉक्सोस बेट

आयोनियन समुद्रातील सात मुख्य बेटांपैकी सर्वात लहान असे हे बेट. पॅक्सोस लहान आहे परंतु खूप सुंदर आहे - स्वच्छ, उबदार पाण्याचे सुंदर समुद्रकिनारे, हिरवळ आणि शांतता हे या बेटाचे मुख्य आकर्षण आहे.हे बेट कॉर्फूच्या  थोडे पुढे दक्षिणेकडे स्थित आहे. तेथे जाण्याचा जवळचा मार्ग कॉर्फू येथून फेरीने आहे.

स्कियाथोस बेट


    स्कियाथोस बेट हे एक लहान बेट असून एजियन समुद्रातील नॉर्दर्न स्पोरेड्स द्वीपसमूहाचा भाग आहे. सुंदर खाडी आणि समुद्रकिनारे, भरपूर हिरवळ आणि नयनरम्य गावे आहेत. विकसित पायाभूत सुविधा, आदरातिथ्य करणारे लोक आणि उत्तम नाइटलाइफ या बेटाला ग्रीसच्या पूर्वेकडील बेटांपैकी सर्वात लोकप्रिय बेट मानतात. ज्यांनी "मम्मा, मिया!" हा चित्रपट पाहिला असेल त्यांनी कदाचित त्याचे चित्रीकरण कोठे केले आहे असा प्रश्न पडला असेल तर उत्तर  ते इथे केले हे आहे.
  येथे तुम्हाला हिरव्यागार टेकड्या दिसतील पाइन जंगले, फुलांच्या बागा आणि उद्याने या जवळजवळ संपूर्ण बेटावर आहेत. तुमची सुट्टी एजियन समुद्राच्या किनाऱ्यावर घालवायची असेल तर  ती इथल्या आलिशान बीचशिवाय नक्कीच पूर्ण होणार नाही. या बेटाच्या आकर्षणांपैकी अनेक मध्ययुगीन मठ, कॅस्ट्रो किल्ल्याचे प्राचीन अवशेष, दगडी रस्ते आणि इतर पर्यटक आकर्षणे आहेत.

झाकिन्थॉस बेट :-


    हे एक लहान पण अतिशय देखणे आणि मस्त बेट आहे. येथे प्रसिद्ध नवागिओ बीच आहे, जो ग्रीसच्या प्रत्येक दुसर्‍या पोस्टकार्डवर (प्रथम - सॅंटोरिनी) छापलेला दिसतो. झाकिन्थॉसचे प्रतीक म्हणजे भव्य कारेटा करेटा कासव, जे फक्त येथेच सापडतत आणि स्थानिक लोक त्यांची चांगली काळजी घेतात आणि प्रत्येक मार्गाने त्यांचे संरक्षण करतात. इथे समुद्री कासवआणि जमिनीवर तुम्हाला २५०० वर्षांहून जुने ऑलिव्हचे झाड बघायला मिळेल. हे बेट एक रहस्य आहे. खडकाळ किनारा, समुद्रकिनारे , एक प्रकारची बांधकाम शैली - हे सर्व झाकिन्थॉसचे वैशिष्ट्य आहे. याला "ग्रीक व्हेनिस", असेही म्हणतात, अर्थात इथे व्हेनीससारखे कालवे नाहीत, परंतु शहरातील इमारतीच्या शैली समान असल्यामुळे हे नाव पडले आहे. नॅवागिओ बे हे बेटाचे ट्रेडमार्क बनले आहे. हे ठिकाण डायव्हिंगचा आनंद घेणार्या उत्साही लोकांसाठी अगदी योग्य आहे .याचा आनंद घेताना आपण खोल पाण्याखालील गुहा आणि असंख्य सागरी जीव पाहू शकता, त्यात तुम्हाला डॉल्फिन, केरेटा कासव, समुद्री सील आणि सुंदर उष्णकटिबंधीय मासे दिसु शकतात. 

 मायकोनोस बेट

      मायकोनोस बेट जवळजवळ सायक्लेड बेटांच्या समूहाच्या मध्यभागी आहे, म्हणजे टिनोस आणि नॅक्सोस दरम्यान. एजियन समुद्राच्या पाण्याने  मायकोनोस वेढले गेले आहे. जवळचे बेट म्हणजे बेटडेलोस.मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत इथे वर्दळ थांबत नाही. क्लब, बार आणि डिस्को रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत खुले असतात. अनेक लोक इथे फक्त यासाठी येतात.मायकोनोस हे ग्रीसमधील सर्वात उत्तम बोहेमियन रिसॉर्ट मानले जाते, जेथे सेलिब्रिटी आणि सर्वात श्रीमंत लोक येतात. हे बेट सुरवातीला सॅंटोरिनीच्या बेटासारखे दिसते, परंतु येथे फक्त दोन तास राहिल्यानंतर, काहीही साम्य  नाही हे लक्षात येते. 1950 च्या दशकाच्या सुरुवातीस प्रथम पर्यटक बेटावर येऊ लागले. आणि 70 आणि 90 च्या दशकात, मायकोनोस हे फॅशनेबल रिसॉर्ट आणि सतत मनोरंजनाचे ठिकाण म्हणून लोकप्रिय बनले. राजकारणी, कलाकार आणि शो बिझनेस स्टार यांना येथे आराम करायला आवडते. स्थापत्य आणि इतिहासात रस असणाऱ्यांनी मायकोनोस शहरालाच भेट द्यावी असे वाटते.इथे  बर्फाच्छादित घरे आणि अरुंद, वळणदार रस्ते पवनचक्क्या यानी प्रवाशांना आकर्षीत करते.  मायकोनोस शहरापासून 3.5 किमी अंतरावर प्लॅटिस यियालोस आहे. हे एक आकर्षक कौटुंबिक रिसॉर्ट आहे. येथे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या आवडीनुसार मनोरंजन मिळेल. ज्यांना सर्फिंगची आवड आहे त्यांच्यासाठी, Panoramos Bay या प्रकारच्या वॉटर स्पोर्टचा सराव करण्यासाठी उत्कृष्ट सोय आहे. रहिवासी स्वतःच मायकोनोसला वाऱ्यांचे बेट म्हणतात.  येथे तुम्ही विंडसर्फ करू शकता, पर्वत भटकू शकता, आरामदायी गावांना भेट देऊ शकता आणि वॉटरफ्रंट टेव्हर्नमध्ये पाककृतीचा आनंद घेऊ शकता. मायकोनोस प्रामुख्याने त्याच्या समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते. त्यापैकी सर्वोत्तम किनारे दक्षिणेकडे आहेत. Platis Yialos बीच कुटुंबांसाठी आदर्श आहे. आणि इथेही अनेक न्युड बीच आहेत  त्यापैकी  काही आहेत - इल्या, स्वर्ग, परंगा.
  .मायकोनोस शहरात, बंदराला भेट देणे तसेच उल्लेखनीय म्हणजे चर्च - पॅरापोर्टियानी, ते प्रभुच्या आईला मेरीला समर्पित आहेत. पुरातत्व संग्रहालये, एजियन सी म्युझियम आणि मॉनेस्ट्री ऑफ अवर लेडी ऑफ टुर्लियानी हि आकर्षणे आहेत. तीनशे वर्षांपूर्वी  एक मोठे धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाणार्या शेजारी असलेल्या निर्जन बेटाला देखील भेट देता येईल

केफलोनिया

केफलोनिया हे आयोनियन समुद्रातील सर्वात मोठे, सुंदर बेट आहे.हे बेट सर्वात दक्षिणेकडे आहे. चालीरीती आणि स्वभाव, अन्न आणि वास्तुकला यांचा विचार केला तर उर्वरित ग्रीसपेक्षा हे वेगळे आहे.प्राचीन ग्रीक आख्यायिकेनुसार, झ्यूसचा जन्म येथे झाला होता. आणि त्याच्या जन्माचे ठिकाणही जतन केले आहे. येथे तुम्हाला केवळ महागड्या आलिशान खोल्या असलेली लक्झरी हॉटेलच नाही तर दर्जेदार सेवेसह परवडणारी हॉटेल्स देखील मिळतील.क्रीट मधील किनारे लांब, बारीक वाळू  आणि उबदार 

 पाणी असलेले आहेत.जर कोणाल निवांत आराम करायचा असेल किंवा  शहराच्या गजबजाटापासून दूर शांतपणे रहायचे असेल तर केफलोनिया हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे.

ऑलिव्ह बेट क्रेट

क्रेट हे सर्वात मोठे ग्रीक बेट आहे. अर्थातच सुंदर किनारे. इथे आहेतच पण येथील द्राक्षे इतकी चांगली आहेत की त्यापासून  चर्चच्या पोपसाठी वाईन बनवतात आणि क्रेट हे लहान चेरी टोमॅटोचे जन्मस्थान देखील आहे.या बेटासंबंधी अनेक मिथका आहेत.प्राचीन ग्रीस.ग्रीसच्या  या मुख्य बेटाच्या हेराक्लिओन शहराला हे नाव योद्धा इराक्लिस (हरक्यूलिस) च्या सन्मानार्थ मिळाले आहे. बेटाच्या पश्चिमेस, आपण व्हेनेशियन काळातील स्मारकांसह क्रेटची प्राचीन राजधानी चनियाला भेट देऊ शकता. उत्तम बंदर आणि प्राचीन इमारती असलेले रेथिमनो हे शहर पाहण्यासारखे आहे.
    ऐतिहासिक वैशीष्ट्या व्यतिरिक्त, क्रेट त्याच्या असंख्य समुद्रकिनारे आणि रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. बहुतेक प्रसिद्ध रिसॉर्ट- शहराच्या मध्यभागी आहेत. इथे मोठमोठ्या लाटां नसतात आणि समुद्राला सौम्य उतार असल्यामुळे वॉटर स्कीइंगच्या प्रेमींसाठी क्रिसी योग्य बीच आहे. क्रेटमध्ये इतकी आकर्षणे आहेत की प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहेच. विविध समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि मनोरंजन स्थळे कोणत्याही पर्यटकाची सुट्टी अविस्मरणीय करतील. 

रोड्स

आकार आणि महत्त्वाच्या दृष्टीने ग्रीसमधील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक. हे तुर्कस्तानच्या किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे, बेटाचे प्रतीक हरण आहे.बंदरात हरणांच्या पुतळ्यांसह दोन स्तंभ आहेत जे समुद्रमार्गे बेटावर येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करतात. हे चौथ्या क्रमांकाचे ग्रीक बेट ग्रीसच्या आग्नेयेला आहे. हे बेट डोडेकेनीज बेटांच्या समुहात आहे. रोड्सला अनेकदा भूमध्यसागरीय मोती म्हणतात.प्राचीन पुराव्याप्रमाणे प्राचीन ग्रीक दंतकथानुसार, रोड्स बेट समुद्राच्या बाहेर आल्र.हे बेट  झ्यूसने सूर्यदेवाला (हेलिओस) भेट म्हणून दिले असे मानले जाते.. रोड्स अधिकृतपणे युरोपमधील सर्वात सुर्यप्रकाश असलेले ठिकाणांपैकी एक मानले जाते. सूर्य, समुद्र आणि वालुकामय सोनेरी किनारे यामुळे हे बेट पर्यटकांना आकर्षित करते.  इतिहास आणि पुरातत्व प्रेमींसाठी नंदनवन असण्याव्यतिरिक्त, हे बेट ऐतिहासिक वास्तूंनी अत्यंत समृद्ध आहे. इथे अपोलोचे प्राचीन मंदिर, मोनोलिथ किल्ला, लिंडोसचे प्रसिद्ध एक्रोपोलिस, संपूर्ण कमिरोस शहर अशी आकर्षणे आहेत. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला कोलोसस ऑफ रोड्सचा कांस्य पुतळा, ज्यामुळे या बेटाला जगभरात प्रसिद्धी मिळाली  हेलिओस देवाच्या सन्मानार्थ 37-मीटर-उंची पुतळा ईस.पूर्व 3ऱ्या शतकाच्या सुरूवातीस उभारण्यात आला होता, परंतु भूकंपाने तो नष्ट केला.

कॉर्फू

आयोनियन बेटांपैकी सर्वात हिरवेगार आणि अनेक युरोपियन राजघराण्यांचे विश्रांतीचे हे  ठिकाण. सौम्य हवामान आणि समृद्ध वनस्पती आणि प्राणी यामुळे, ग्रीक लोक कॉर्फूला त्यांचे तब्येतीसाठी हवापालट करण्याचे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानतात. कॉर्फू, सात आयोनियन बेटांपैकी सर्वात प्रसिद्ध, वायव्य किनारपट्टीजवळ स्थित आहे.इतर आयोनियन बेटांपेक्षा कॉर्फूचा विचार केला तर समृद्ध इतिहास आहे, एक मोठी आणि बऱ्यापैकी कॉस्मोपॉलिटन राजधानी, अनेक संग्रहालये आणि आकर्षणे आहेत. या सर्वांव्यतिरिक्त, कॉर्फू त्याच्या लहान, परंतु स्वच्छ पाणी आणि अनेक रंगीबेरंगी माशांसह अतिशय नयनरम्य समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध आहे. ग्रीक भाषेत या बेटाला केर्कायरा म्हणतात. रॉयल्स आणि स्क्रीन स्टार विश्रांतीसाठी येथे येतात. युरोपियन आणि अरब श्रीमंत लोकांनी येथे व्हिला विकत घेतले आहेत.   एकेकाळी ऑस्कर वाइल्ड, नेपोलियन, गोएथे, गेराल्ड आणि लॉरेन्स डॅरेली, ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथ, कॉर्फूला भेट दिली आणि त्याच्या प्रेमात पडले. असंख्य वॉटर पार्क आणि बोटी, हायकिंग ट्रेल्सपर्वत आणि दऱ्यांवर. आणि कोणत्याही शिखरावरून डोंगराच्या लँडस्केप्स, ऑलिव्ह ग्रोव्हची झाडी आणि निळ्या-निळ्या समुद्राचा अविश्वसनीय पॅनोरामा पाहू शकतो.आणि इटली इथून फार दूर नाही,कॉर्फू इटलीच्या अगदी जवळ स्थित आहे, म्हणून येथे तुम्हाला इटालियन वास्तुकला, पाककृती आणि रहिवाशांच्या सवयी यावर प्रभाव दिसतो. अर्थातच ग्रीसच्या इतर प्रदेशांच्या तुलनेत इथे रहाणे महगडे आहे.

कॉर्फू बेटावरील सर्वात थंड महिने जानेवारी आणि फेब्रुवारी हे सरासरी तापमान 16 से., उष्णतेचे शिखर जुलै-ऑगस्टमध्ये असते, जेव्हा सरासरी तापमान 28 अंशांपर्यंत पोहोचते. कॉर्फू बेट अक्षरशः ऑलिव्ह ग्रोव्ह आणि लिंबूवर्गीय बागांनी वेढलेले आहे. बेटावर 40 पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पती आहेत. तर, निसर्ग आणि सुंदर लँडस्केप्सच्या प्रेमींसाठी, कॉर्फूमध्ये एक नंदनवन आहे. याव्यतिरिक्त, कॉर्फूमध्ये सुंदर वालुकामय आणि खडकाळ किनारे आहेत. इथे येउन सिदरे शहरातील लव्हर्स चॅनल जरूर पहा. केर्किरा शहरातील बायझंटाईन चर्च आणि व्हेनेशियन क्वार्टर हे एक महत्वाचे आकर्षण आहे.

 सॅंटोरिनी



सॅंटोरिनी हे सायक्लेड्स समूहातील सर्वात सुंदर बेटांपैकी एक आहे. 1500 ईसापूर्व ज्वालामुखीच्या उद्रेकापासून सॅंटोरिनीची उत्पत्ती झाली असे मानले जाते. 300 मीटर उंचीवर असलेल्या सॅंटोरिनीला स्वर्ग म्हणतात. ग्रीक पौराणिक कथेनुसार, सॅंटोरिनी हे एक लहान बेट आहे जे लोकांना समुद्र देव ट्रायटनने दिले होते. इतर पौराणिक कथांनुसार, हे बेट बुडलेले आणि सुंदर अटलांटिस आहे. सॅंटोरिनी हे एक बेट आहे असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात हा बेटांचा एक लहान समूह आहे जो सुमारे 10 किमी व्यासाच्या वर्तुळात पसरलेला आहे. सर्व बेटांवर वस्ती विखुरलेली आहे. या वस्त्या बस मार्गाने जोडल्या गेल्या आहेत आणि एका बेटावरून दुसऱ्या बेटावर तुम्ही फेरीने सहज जाऊ शकता. सॅंटोरिनी हे निवांतपणा आणि सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.बेटावरील नाईटलाइफ, त्याचे बार आणि रेस्टॉरंटमधील विविधतेमुळे पर्यटक देखील मोठ्या संख्येने येतात.हे बेट भव्य पाषाण, वालुकामय काळा आणि लाल समुद्रकिनारे, उत्कृष्ट निसर्ग आणि निळा समुद्र असे याचे वर्णन करता येईल. या परीकथेच्या वाटणार्या परिसराला अधीक आकर्षक केले आहे ते पांढरी घरे आणि निळे घुमट यांनी. इतिहासाच्या जाणकारांसाठी, इथे अक्रोटिरी आणि पुरातत्व संग्रहालय, कॉन्व्हेंट आणि प्रेषित एलियाचा मठ आहे.3,500 वर्षांहून अधिक काळ, स्थानिक लोक सॅंटोरिनी (थिरा)वर द्राक्षे पिकवत आहेत आणि त्यापासून विशिष्ट चव असलेली वाइन बनवत आहेत.या बेटावरील सूर्यास्त हा एक न विसरणारा अनुभव आहे.
 प्रचंड लोक येथे येतात. समुद्रपर्यटनामुळे  सॅंटोरिनीमध्ये नेहमी भरपूर पर्यटक असतात. येथे राहणे हा एक सुंदर अनुभव आहे, परंतु हे बेट खूप महागडे आहे. तुम्ही हिवाळ्यातही बेटाला भेट देऊ शकता, जेव्हा हवामान सौम्य असते आणि पर्यटक कमी असतात.


थासोस

एजियन बेटांच्या सर्वात उत्तरेकडील भाग. हिरव्यागार वनस्पतींनी झाकलेले हे बेट ग्रीक सुंदर ठिकाणापैकी एक आहे. येथे पांढर्या संगमरवराचे उत्खनन केले जाते. यामुळे  इथला परिसर पांढऱ्या रंगाच्या लहान-मोठ्या खडकांनी झाकला गेला आहेत.  येथील शांत समुद्रकिनारे आपल्याला ताजेतवाने करतात. येथे उन्हाळा गरम नसतो आणि हिवाळा खूप कडक नसतो. इथल्या हवामानाची प्रशंसा स्वतः हिप्पोक्रेट्सने केली होती, जे येथे अनेक वर्षे वास्तव्य करीत होते.

Evia (Evia)


हे बेट क्रेट नंतर ग्रीसचे दुसरे बेट. मुख्य भूमीपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. ते जुने आणि नवीन अशा दोन पुलांद्वारे नंतरचे जोडलेले आहे. ओहोटीच्या वेळी इथल्या प्रवाहामुळे मोठमोठ्या लाटा तयार होतात.  बेटावर खडक, धबधबे, हिरवीगार झाडी, सुंदर परिसर पाहायला मिळतो. इथे असलेल्या उष्ण पाण्याच्या झर्यामुळे आणि स्पा मुळे हिवाळ्यात इथे भेट देणे आनंददायी आहेत. ग्रीसमध्ये आणि संपूर्ण जगात सर्वात जुने रिसॉर्ट्सपैकी एक इथे आहे . ते 120 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे.


किफिरा

पेलोपोनीजच्या ग्रीसच्या अगदी दक्षिणेस स्थित आहे. ज्यांना थोड्या हटके जागा हव्यात अश्या व्यक्तीसाठी हि उत्तम जागा आहे.पौराणिक कथेनुसार अडीच हजार वर्षापुर्वी ऍफ्रोडाइटचा जन्म येथे झाला.त्याच्या स्मृती स्वरूपात व्हेनेशियन किल्ला आजही उभा आहे. जॉन द इव्हँजेलिस्ट बेटावर राहत होता, त्याच्या गुहा आजपर्यंत टिकून आहेत.

कोस

हिपोक्रेट्सचा जन्म कोसवर झाला. कदाचित म्हणूनच येथे निरोगी जीवनशैली खूप लोकप्रिय आहे. बेटावरील जवळजवळ प्रत्येकजण सायकल वापरतो.

पटमोस

अनेक धार्मिक ग्रीस लोक जॉन द थिओलॉजियनला दैवी साक्षात्कार दिलेले स्थान पाहण्यासाठी येथे येतात. त्या काळात कोरलेली Apocalypse लेणी आजपर्यंत टिकून आहेत.

पारोस :-

पारोस हे ग्रीसचे नयनरम्य  बेट आहे, जे एजियन समुद्रातील सायक्लेड्सचा भाग आहे. ग्रीसमधील क्रेट किंवा इतर लोकप्रिय बेटांपेक्षा येथे पर्यटन क्षेत्र खूपच कमी विकसित आहे. कारण पारोसमध्ये पर्यटन आकर्षणे आणि निसर्गरम्य जागा नाहीत, याचे कारण म्हणजे पारोसमध्ये संगमरवर उत्खनन चालते, अर्थातच यामुळे या बेटाला आर्थिक फायदा भरपुर होतो. स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.
 परंतु तरीही जे पर्यटक त्यांची सुट्टी घालवण्यासाठी हे ठिकाण निवडतात त्यांच्यासाठी या बेट निर्जन वालुकामय किनारे, फुललेल्या बोगनविलेच्या बाग, ऑलिव्ह ग्रोव्ह आणि काही आकर्षणे आहेत. जारच्या बेटावरील जवळजवळ सर्व तरुण त्यांचे शनिवार व रविवार येथे घालवतात, स्थानिक क्लबमध्ये पार्ट्यांचे आयोजन करतात.

 डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग प्रेमींसाठी समोस बेट आदर्श  मानले जाते . भरपुर सुर्यप्रकाश आणि स्वच्छ पाण्याचे समुद्र किनारे यामुळे हे बेट त्याच्या शेजारी बेटांपेक्षा वेगळे आहे. तुम्हाला डायव्हिंगची कला शिकवण्यासाठी आणि तुम्हाला सर्व कौशल्य दाखवण्यासाठी असंख्य डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र येथे आहेत.इथे आपण पाण्याखालील जगत पाहु शकतो. या बेटाचे किनारे बहुतेक पांढर्या वाळूचे आहेत, प्राचीन मंदिर देवी हेरा, राहते प्राचीन शहर,  अनेक उत्कृष्ट अभियांत्रिकी पायथागोरियन उदाहरण असणार्या वास्तु आपण इथे पाहु शकतो. 


करमणूक आणि मनोरंजनबेटांची नावे
सुंदर निसर्गचित्रेसर्वत्र
उत्तम समुद्रकिनारेक्रेते (चानिया, रेथिमनो), झाकिन्थॉस, मायकोनोस, स्कियाथोस, पारोस, कार्पाथोस
फॅशनेबल विश्रांतीक्रेते (एलाउंडा), कॉर्फू, सॅंटोरिनी, मायकोनोस
आर्थिक सुट्टीक्रेट (हर्सोनिसोस, जॉर्जिओपोलिस, मालिया), रोड्स, कोस, आयओएस
नाइटलाइफरोड्स (फलिराकी), कॉर्फू, मायकोनोस, स्कियाथोस, सामोस, आयओएस
पुरातन अवशेषक्रेट (नॉसोस), कोस, पारोस, कार्पाथोस
प्रेमींसाठी प्रणयरोड्स, कॉर्फू, थॅसोस, झाकिन्थॉस, किफिरा, मायकोनोस, सॅंटोरिनी, कोस, पारोस, नॅक्सोस, सामोस
प्राचीन ग्रीक दंतकथाक्रेते, किफिरा, कोस, लेस्वोस, इथाका, पारोस, नॅक्सोस
ऐतिहासिक वास्तूस्पिनलोंगा, रोड्स, झाकिन्थॉस, किफिरा, कोस, चिओस,
असामान्य नैसर्गिक घटनामिनोस, थिरा (सँटोरिनी), थासोस, स्कियाथोस,
मध्ययुगीन शहरेक्रीट (रेथिमनो), रोड्स, कॉर्फू, झाकिन्थॉस. किफिरा, कोस, पारोस
ऑर्थोडॉक्स देवस्थानक्रीट, कॉर्फू, पॅटमॉस
खरेदीरोड्स, कॉर्फू, मायकोनोस, स्कियाथोस,
SPA रिसॉर्ट्सइव्हिया (इव्हिया), कोस,
उष्णकटिबंधीय स्वर्गक्रिसी, झॅकिन्थॉस
डायव्हिंगक्रेट, कॉर्फू, सॅंटोरिनी, थॅसोस
विंडसर्फिंगमायकोनोस, पश्चिम क्रीट

ग्रीसची बेटे तुम्हाला आयुष्यभराचा अविस्मरणीय अनुभव देईल.

सफर ग्रीसची

 स्वातंत्र्य किंवा मरण! जगाला लोकशाही, पाश्चिमात्य साहित्य आणि तत्त्वज्ञान देणा-या ग्रीसला साजेसं हे ब्रीदवाक्य! ग्रीस म्हटलं कि आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस, एजिअन समुद्राचं निळाशार पाणी आणि सान्टोरिनीची निळीपांढरी घरं. ग्रीसला भेट देण्याची आणि विशेषतः तेथील पुरावशेष बघण्याची आम्हा उभयतांची खूप दिवसांपासून इच्छा होती. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ग्रीसच्या भटकंतीबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रवासाचे नियोजन

अथेन्स विमानतळावर २१ डिसेंबरला दुपारी आगमन आणि तिथूनच ३० डिसेंबरला संध्याकाळी प्रस्थान ठरले. ग्रीसला प्रथमच जाणा-या इतर अनेक पर्यटकांप्रमाणे आमचाही अथेन्सला अग्रक्रम होता. त्याशिवाय डेल्फी, मेटेओरा, ऑलिंपिया, स्पार्टा आणि जमल्यास सान्टोरिनी सारखी बेटं अशी wishlist बरीच मोठी होती. हाती असलेल्या आठ पूर्ण आणि दोन अर्ध्या दिवसांत कुठेकुठे आणि कसं जायचं, याचं नियोजन सुरू झालं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथेन्समध्ये चांगली असली तरी देशाच्या अंतर्गत भागात सुधारणेला पुष्कळ वाव आहे. मग अथेन्स सोडून बाकी प्रवासासाठी गाडी भाड्याने घ्यायचे ठरविले. डिसेंबर महिन्यात उष्म्याचा त्रास नसेल आणि पर्यटक कमी व पर्यायाने हॉटेल्स स्वस्त असतील, असा अंदाज होता. अर्थात मधेच २५, २६ तारखांना सुट्टीमुळे बहुतेक पर्यटनस्थळे बंद असायची शक्यता होती.

या सगळ्या दृष्टीने इंटरनेटवर माहिती गोळा करायला लागल्यावर लक्षात आले कि डिसेंबरमधे जाण्यासाठी दक्षिण ग्रीसचा पेलोपोनिझं (Peloponnese) प्रांत योग्य आहे. २५, २६ ला म्युझिअम्स वगैरे बंद होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूर्याची कृपा असलेल्या ग्रीसमध्ये (जुन्या ग्रीकमध्ये ग्रीसला 'Hellas' अर्थात 'सूर्याची कृपा असलेला' म्हणतात.) सांस्कृतिक अखत्यारीतील बहुतेक पुरातन स्थळे हिवाळ्यात दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली होती! (त्याशिवाय सरकारी कर्मचारी अचानक संपावर जाऊ शकतात, हे वाचलं होतं; पण त्याचा फटका बसेल, असं वाटलं नव्हतं.)

ठिकाणांमधील अंतरं आणि दुपारी ३ ची डेडलाईन या अडथळ्यांच्या शर्यतीत आमचे 'कालामाटाहून सकाळी निघून मीस्ट्रास आणि स्पार्टा एका दिवसात बघू' असे इमले ढासळू लागले. शेवटी अथेन्स, डेल्फी आणि पेलोपोनिझं प्रांतातील कोरिन्थ व आर्गोलिस हा विभाग (नाफ्प्लिओ व जवळपासची स्थळं) बघायचं ठरवलं. पेलोपोनिझं (Peloponnese) हा दक्षिणकडील प्रांत (एक बोट नसलेल्या) हाताच्या पंजाच्या आकाराचा असून कोरिंथचा कालवा त्याला ग्रीक मुख्यभूमीपासून वेगळा करतो.

प्रवासाची रूपरेषा

२१ डिसेंबर: दुपारी अथेन्स (Athens) आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन - गाडी भाड्याने घेणे - केप सूनिअन (Cape Sounion) - कोरिंथ (Corinth)
२२ डिसेंबर: कोरिंथ - मिकेने (Mycenae) - नाफ्प्लिओ (Nafplio)
२३ डिसेंबर ते २५ डिसेंबर: नाफ्प्लिओ स्थलदर्शन आणि एपिडाउरोस (Epidaurus)
२६ डिसेंबर: नाफ्प्लिओ - कोरिंथ कालवा - अथेन्स विमानतळ - गाडी परत करणे - अथेन्स शहर
२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर ची दुपार: अथेन्स स्थलदर्शन आणि एक दिवसाची डेल्फी सहल
३० डिसेंबर: संध्याकाळी अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळाहून प्रस्थान

दिवस पहिला: आगमन आणि केप सूनिअन

अथेन्सला विमान पोहोचायला तासभर उशिर झाला. जेवणासाठी फारसे पर्याय दिसत नव्हते. मग सँड्विच खाऊन घेतलं आणि थोडा आराम केला. कॅफेमध्ये संत्र्याच्या चवीचा रवा केक होता. तो खाऊन कडक ग्रीक कॉफी पिऊन मस्त तरतरी आली. भाड्याची गाडी एका स्थानिक एजंसीकडे जालावरून आरक्षित केली होती. तिथे कागदपत्र बनवून किल्ली घेतली. विमानतळाहून बाहेर पडायचा योग्य रस्ताही विचारला. गाडी पार्किंगमध्ये शोधून तिची अवस्था तपासून निघालो एकदाचे अथेन्सहून! साधारण ५० किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला सूर्यास्ताच्या शक्य तितक्या आधी केप सूनिअनला पोहोचायचं होतं.

केप सूनिअनवरून संध्याकाळी दिसणारा नजारा

विमानतळाचा परिसर मागे पडल्यावर डोंगराळ भाग सुरू झाला. अधूनमधून छोटीमोठी गावं लागत होती. रस्त्यावर बहुतेक पाट्या ग्रीकमध्ये होत्या. नेविगेटरवर भरोसा ठेवून चाललो होतो. पण सूनिअनची कुठे निशाणी दिसेना. मग शाळाकॉलेजात वापरलेली ग्रीक α, β, γ आठवून आठवून गावांची नावं वाचायचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा गंमत वाटत होती, पण सहलीत नंतर याचा खूप उपयोग झाला. पण पुढच्या एकदोन दिवसांत आपल्याला ग्रीक शब्द कळत नसले तरी थोडेफार वाचता येत आहेत, असा फाजील आत्मविश्वास वाटायला लागला की बरोब्बर एखाद्या शब्दात ग्रीक Ρ किंवा ρ येऊन दांडी गूल करायचा! तो ग्रीक -हो म्हणजे 'र' आहे, इंग्रजी 'पी' नाही, हे कळत असूनही वळायचं नाही.

थोड्या वेळाने रस्त्याच्या डाव्या हाताला समुद्राचं अस्तित्व जाणवायला लागलं. एका गावी छोटं बंदर दिसत होतं, हिवाळ्यामुळे फारशी हालचाल नसावी. काही मिनिटं रस्ता उन्हात चमकणा-या पाण्याशेजारून गेला.

साडेचार वाजता केप सूनिअनला पोहोचलो. प्रवेशाचं तिकिट काढतानाच ताकीद मिळाली कि सव्वापाचला परिसर बंद होतो. केप सूनिअन हे समुद्रात शिरलेलं भूशिर असून अट्टिका द्वीपकल्पाचं (Attica peninsula) दक्षिण टोक आहे. तीन बाजूंना एजिअन समुद्र (Aegean Sea) असलेल्या टेकडीवर ग्रीक मिथकांमधील समुद्रदेव पोसायडनच्या (Poseidon) देवळाचे अवशेष आहेत. हे संगमरवरी देऊळ ख्रिस्तपूर्व ४४० च्या दरम्यान त्याही आधीच्या देवळाच्या जागी बांधले गेले.

सूर्य अस्ताला जायची वेळ जवळ येऊ लागली तसं देऊळही सोनेरीपिवळ्या प्रकाशात न्हाऊन निघालं.

ग्रीक मिथकांतील हा समुद्राचा देव त्याच्या हातातील त्रिशूळाने समुद्रात वादळे निर्माण करतो. पोसायडनची कृपा होण्यासाठी नाविक इथे प्रार्थना करत. पोसायडनला शांत करण्यासाठी प्राण्यांचे बळी देत असत. आता देवळाच्या कोलोनेडचे काही खांबच शिल्लक आहेत. परंतु पूर्वी बाहेरच्या बाजूने डोरिक पद्धतीचे खांब आणि आत गर्भगृह (Naos) अशी रचना होती. गर्भगृहात बहुधा ब्राँझचा पोसायडनचा पुतळा असावा.

इथून एजिअन समुद्रात होणारा सूर्यास्त आणि संधिप्रकाशात उजळून निघणारे अवशेष बघण्यासाठी अथेन्सहून खूप पर्यटक येतात.

मंदिराच्या पायाच्या दगडांवर आधुनिक मानवाचंही कोरिवकाम दिसलं. इंग्रज कवी लॉर्ड बायरनचं नाव इथे कोरलेलं आहे, असं वाचलं होतं. ते मात्र कुठे दिसलं नाही.

एक ग्रीक मिथक म्हणतं कि अथेन्सचा राजा एजिअसचा (Aegeus) मुलगा थेसेअस (Theseus) हा मिनोटाउरस (Minotaur) या दैत्याचा वध करायला क्रिटी बेटावर गेला असताना एजिअस हा केप सूनिअन येथे त्याची वाट पाहत होता. विजयी होऊन परत येताना थेसेअस विजयाचे चिह्न असलेले बोटीला पांढरे शीड लावायला विसरला. परत येणा-या बोटीचं काळं शीड पाहून पुत्रशोकाने एजिअसने केप सूनिअन येथे समुद्रात उडी मारून मरण पत्करले. तेव्हापासून ह्या समुद्राला एजिअन समुद्र हे नाव पडले.

समोरचं दृश्य डोळ्यात भरून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आजूबाजूलाही कुणीच बोलत नव्हतं. जणू आम्हाला सगळ्यांना त्या प्रकाशाने आणि पाण्यावरच्या मंद लाटांनी भारलं होतं. पण कातरवेळी वाटणारी हूरहूर नव्हती. सूर्य अस्ताला गेला होता; पण चंद्र त्याचा शीतल प्रकाश घेऊन आला होता!

काही प्रॅक्टिकल प्रश्न -

१. ट्रिपचा खर्च किती आला हे वर्गीकरण करून सांगता येईल का -

* व्हिसा
* विमान प्रवास
* तिथले लोकल ट्रान्सपोर्ट
* हॉटेल रहाणे
* खाणे
* म्युझिअमच्या एंट्री फिया

२. साधारण किती लोकल करन्सी सोबत नेली? इथले एटीएम कार्ड तिथे वापरताना काही अडचण आली का?

3. तुम्ही शाकाहारी आहेत का, असाल तर तिथे खाताना काही अडचण झाली का?

4. तिथले कोणते खाद्यपदार्थ आवडले?

युरोपातील शेंगेन करारात सहभागी देशांचा मिळून शेंगेन (Schengen) विजा आहे. यात ग्रीससह अनेक देश येतात. मी शेंगेन मध्ये राहत असल्याने मला ग्रीसला जायला विजा काढावा लागला नाही. पर्यटकांसाठी वेगळा शेंगेन विजा असतो. ग्रीसबरोबर शेंगेनमधील इतर देशांतही (जसे इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रांस) फिरायचे असल्यास एकाच विजाने काम होते. अर्थात पर्यटकाच्या नागरिकत्वाप्रमाणे नियम बदलतात. (उ.दा. अमेरिकन नागरिकांसाठी भारतीयांपेक्षा वेगळे नियम आहेत.) ही शेंगेनची ढोबळ माहिती झाली. आंतरजालावर अधिक माहिती मिळू शकेल. परंतु ज्या देशात जायचे त्या देशाच्या वकिलातीकडून (किंवा तिच्या साईटवरून) अधिकृत माहिती मिळविणे उत्तम!

मी युरोपियन युनिअनच्या अंतर्गत प्रवास केल्याने भारतातून ग्रीसला जायचा विमानप्रवास, तसेच स्थानिक चलन (युरो) किती न्यायचं किंवा एटिएम कार्ड वापर याबद्दल विशेष सांगू शकणार नाही. मी इथल्या एटिएम आणि क्रेडिट कार्डांचा वापर केला; त्यांचे दर आणि नियम भारतीय कार्डांपेक्षा वेगळे असावेत. अश्या बर्‍याच गोष्टींची माहिती तुम्हाला Tripadvisor सारख्या फोरमवर किंवा मिपावरील युरोपात भटकंती केलेल्या इतर सदस्यांकडून मिळू शकेल.

शाकाहारी नसल्याने काहीही अडचण आली नाही. शाकाहार आणि बाकी प्रश्नांची उत्तरे लगेच देता येणार नाहीत. थोडी शोधाशोध करावी लागेल. पण सवड मिळाली की नक्की देईन.

हॉटेल्स: एका डबल रूमचा सकाळच्या न्याहारीसह खर्च युरोत

कोरिंथ (साधं b&b): €५०
नाफ्प्लिओ (बुटिक हॉटेल): €६२.९०
अथेन्स (मोठं हॉटेल, उत्तम दर्जा व न्याहारी): €९९. हे हॉटेल ओमोनिया चौकापाशी (फिरायला मध्यवर्ती) होतं. तिथून पाच मिनिटांवर भारतीय उपखंडातील लोकांची दुकाने, उपहारगृहे आहेत; घेट्टोही म्हणता येईल. आम्हाला वाईट अनुभव आला नाही, पण हा भाग बर्‍याच लोकांना असुरक्षित वाटतो. अथेन्समधे हॉटेल्स महाग आहेत आणि दर्जाही सुमार असू शकतो. त्यामुळे ऑनलाईन रिव्यूज वाचणे आवश्यक.

हिवाळा हा लो सीझन आहे, इतर वेळी दर जास्त असू शकतात.

पर्यटनस्थळांचे प्रवेशदर

माणशी €४ ते €१२ असे वेगवेगळे दर होते. यात बर्‍याच ठिकाणी साईट आणि तिथलं संग्रहालय मिळून एक दर होता.

वाहतूक

भाड्याच्या गाडीचे ५ दिवसांचे €१३५ अधिक इंधनाचा खर्च. अथेन्स-ट्रिपोली महामार्ग नवीन असून टोल आहे.
अथेन्समधे पब्लिक ट्रान्स्पोर्ट (मुख्यत्वे मेट्रो)आणि एअरपोर्ट बस वापरली. तिकिटांचे बरेच प्रकार आहेत. डेल्फीला जायला बस आहे. (KTEL ही ग्रीसची बस कंपनी आहे.) परतीचं तिकिट माणशी साधारण ३२ युरो होतं.

खाद्यपदार्थ

ग्रीक खाण्याबद्दल चार ओळीत लिहिणं कठिण आहे. पण शाकाहारात फेटा चीझ घातलेलं सॅलड, वांगं किंवा झुकिनीची भजी, भाताचं मिश्रण भरलेली द्राक्षाची पानं, घट्ट दही किंवा चीझ वापरून केलेली डिप्स असं बरंच काही आहे. शिवाय टोमॅटो किंवा भाज्या घालून भात, कडधान्याचे स्ट्यू, बटाट्याचे काप, वांग्याचं भरितही बनवितात.

मांसाहारातही सुव्लाकी, मीट बॉल्स, ग्रिल्ड मासे, स्ट्यू असे प्रकार आहे. गोमांस एकंदर कमी खातात.

मध आणि अक्रोड घालून घट्ट दही, रव्याचा केक, संत्र्याचा केक, नानकटाईसारखी बिस्किटं हे गोड पदार्थ झाले.

प्राचीन कोरिंथ

केप सूनिअनचा सूर्यास्त मनात साठवून पहिल्या दिवशी मुक्कामासाठी कोरिंथला आलो. हे खरं तर नवं कोरिंथ. साधारण साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असलेलं प्राचीन कोरिंथ (ग्रीकमध्ये Archaia Korinthos) १८५८ साली भूकंपामुळे उध्वस्त झाल्यावर जुन्या शहरापासून दूर नवं कोरिंथ वसविण्यात आलं.

नव्या कोरिंथमध्ये एका न्याहारी आणि निवासात राहिलो. तिथल्या मालकिणबाईंशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांच्यामते अथेन्स खूप गर्दी असलेलं, अस्ताव्यस्त आणि कुरूप (ugly) शहर आहे! तिथे दोन दिवसांपेक्षा जास्त राहू नये!! अथेन्सहून अधिक वेळ आम्ही त्यांच्या भागात फिरणार आहोत, हे कळल्यावर त्यांचं थोडं समाधान झालं. मग त्यांनी आम्ही जाणार असलेल्या भागाचा नकाशा आणि काही पत्रकंही दिली. बहुधा त्या खुंटा हलवून बघत असाव्यात कि आम्हाला खरोखर त्या जागांबद्दल माहिती आहे कि नाही.

पेलोपोनिझं प्रांताच्या सफरीची सुरुवात कोरिंथपासून होणार होती. हा भूभाग म्हणजे भौगोलिकदृष्ट्या एक प्रचंड मोठं द्वीपकल्प आहे. ख्रिस्तपूर्व सुमारे १,००,००० वर्षांपासून मानवाने या भागात वास्तव्य केलेलं आहे. पेलोपोनिझं प्रांताचं प्राचीन तसेच आधुनिक ग्रीसच्या इतिहासात स्थान खूप महत्त्वाचं. पंधराव्या शतकाच्या मध्यापासून ग्रीस हा ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. जवळजवळ चारशे वर्षांची ही गुलामी संपविणारं ग्रीसचं स्वातंत्र्ययुद्ध १८२१ साली पेलोपोनिझं प्रांतात सुरू झालं; बरीचशी लढाईही इथेच लढली गेली. १८२७ मध्ये स्वतंत्र होणारा पेलोपोनिझं हा ग्रीसचा पहिला भाग. १८२८ ते १८३४ या काळात इथलं नाफ्प्लिओ हे शहर स्वतंत्र ग्रीसची पहिली राजधानी होतं.

इलियड या होमरच्या जगप्रसिद्ध महाकाव्यातील एक मुख्य पात्र म्हणजे मिकेने किंवा मायसिनिचा (Mycenae) राजा अगामेम्नॉन (Agamemnon). अगामेम्नॉनचे आजोबा पेलोप्सचे (Pelops) बेट ते पेलोपोनिझं! इलियडमध्ये उल्लेख असलेली मिकेने, स्पार्टा, आर्गोस इत्यादी प्राचीन ग्रीक राज्ये पेलोपोनिझं भूभागात होती. त्यातील मायसिनिअन संस्कृतीविषयी पुढच्या भागात अधिक माहिती येईल. ऑलिंपिक खेळ सुरू झाले ते ऑलिंपियाही या प्रांतात येतं.

अक्रोकोरिंथ किल्ल्यावर


अक्रोकोरिंथचा पहिला दरवाजा

अक्रोपोलिस म्हटलं की आपल्याला आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस. परंतु अक्रोपोलिस शब्दाचा अर्थ होतो एखाद्या टेकडीसारख्या उंच जागी असलेली गढी किंवा कोट. प्राचीन कोरिंथला पायथ्याशी घेऊन असलेलं कोरिंथचं अक्रोपोलिस, म्हणजेच अक्रोकोरिंथ (ग्रीक Akrokorinthos), ५७५ मीटर उंच डोंगरावर आहे. याठिकाणी ख्रिस्तपूर्व सातव्या शतकातही छोटा कोट होता. तेव्हापासून अनेक शत्रूंनी किल्ल्यावर स्वार्‍या केल्या, किल्ला जिंकून नवीन बांधकामे केली. बायझंटाइन, तुर्की, वेनिशिअन अंमलाच्या खुणा इथे दिसतात.

सुपीक जमिनीबरोबरच सागरी आणि खुष्कीचे मार्ग कोरिंथवरून जात असल्यामुळे कोरिंथला महत्त्व मिळालं. दरवाज्यातून आत गेल्यावर तटावरून दिसणारा दूरवरचा परिसर बघून पटतं की संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याची जागा किती योग्य आहे.

सकाळी न्याहारीच्या वेळी निवासाच्या मालकिणबाईंशी पुन्हा बोलणं झालं होतं. अक्रोकोरिंथला जातोय कळल्यावर आम्ही पायात कसले बूट घातले आहेत हे त्यांनी स्वतः जातीने पाहून खात्री केली होती. त्याचं कारण आता कळत होतं. शेकडो वर्षांच्या वर्दळीने घासून गुळगुळित झालेल्या दगडांवरून ट्रेकिंगचे शूज असूनही पाय घसरत होते!


मागे वळून पाहिल्यावर

किल्ल्याच्या एकात एक अश्या तीन तटबंद्या आहेत. दुसर्‍या दरवाज्यातून आत गेल्यावर कोरिंथचं आखात आणि दूर डोंगररांगा दिसत होत्या.


इथे उभं राहून कुण्या ग्रीक युवतीने पर्शियाशी लढायला गेलेल्या तिच्या प्रियकराची वाट पाहिली असेल...

एक जुनंपुराणं चर्च दिसलं. किल्ल्यावर कोणी राहत नाही. पण चर्चमध्ये नियमित प्रार्थना होत असावी. आतमधली रचना अगदी साधी होती. भिंतींवर संतांच्या तसबिरी मात्र खूप होत्या.

किल्ल्याच्या वरच्या भागात चॅपेल, तुर्कांनी बांधलेल्या मशिदी, अफ्रोडाइट देवीचं देऊळ अश्या अनेक इमारतींचे भग्नावशेष विखुरलेले आहेत. पण कुठेही दिशादर्शक नव्हते; कुणाला विचारायची सोय नव्हती. मग ६० एकर पसरलेल्या किल्ल्यावर भटकत न बसता प्राचीन कोरिंथकडे मोर्चा वळवला.


विस्तीर्ण पसरलेला अक्रोकोरिंथ

प्राचीन कोरिंथचे अवशेष


अक्रोकोरिंथच्या पार्श्वभूमीवर अपोलोचं देऊळ


ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात बांधलेलं डोरिक पद्धतीचं अपोलोचं देऊळ

कोरिंथमध्ये झालेल्या उत्खननानुसार इथे किमान साडेआठ हजार वर्षांपासून मानवी वस्ती आहे. परंतु ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात भरभराटीला सुरुवात झाली. अडिच हजार वर्षांपूर्वी कोरिंथ हे ग्रीसमधील एक मोठं आणि अथेन्सपेक्षाही महत्त्वाचं राज्य होतं. तेव्हा येथे खेळांसाठी बांधण्यात आलेल्या मुख्य थिएटरमध्ये १५,००० प्रेक्षक बसू शकत. आता एके काळच्या वैभवाची साक्ष द्यायला फक्त काही अवशेष उरले आहेत.


दोन हजार वर्षांपूर्वीची काव्य आणि संगीताच्या स्पर्धांची जागा (Roman Odeum). आसनक्षमता ३,०००!


एका संगमरवरी रस्त्याचे भग्नावशेष. खालील रेखाटनात या रस्त्याचे मूळ स्वरूप कसे असेल, हे कळते.

प्राचीन कोरिंथची बर्‍यापैकी टिकून असलेली एक वास्तू म्हणजे पिरेनं (Peirene fountain) हा पाण्याचा स्रोत. ग्रीसच्या भूमितीय कालखंडात (Geometric Period, ख्रिस्तपूर्व नववे ते सातवे शतक) किंवा त्याआधी इथे पाण्याच्या साठवणीची आणि नियोजनाची सुरुवात झाली असावी. ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात जवळच्या झर्‍यांचं पाणी चार तळ्यांत साठवत असत. पाणी भरण्यासाठी तीन खोल हौद आणि आजूबाजूला सहा दालने होती. रोमन काळात येथे मोठी आवारं, कोलोनेड असलेलं दुमजली बांधकाम करण्यात आलं. सध्या दिसणारे अवशेष रोमन आणि त्यानंतरच्या बायझंटाइन काळातील आहेत.

 . 

पोसायडनची प्रेयसी पिरेनंचं नाव असलेल्या या वास्तूसह आम्ही प्राचीन कोरिंथचाही निरोप घेतला.
पुढिल भागात कोरिंथचं वस्तुसंग्रहालय आणि मायसिनी.

अगामेम्नॉनच्या राज्यात

कोरिंथचे वस्तूसंग्रहालय

कोरिंथच्या अवशेषांजवळ तिथे झालेल्या उत्खननांमधून मिळालेल्या वस्तू, पुतळे, मातीची भांडी वगैरेंचं एक छोटेखानी संग्रहालय आहे. तिथल्या दालनांमधे ग्रीक संस्कृतीतील वेगवेगळ्या कालखंडांप्रमाणे वस्तू मांडून ठेवल्या आहेत. या संग्रहालयाचे काही फोटो:

संग्रहालयाच्या आवारात

थिएटरच्या इमारतीवर कोरलेली ग्रीक्स आणि अ‍ॅमेझॉन्सची लढाई

अठराशे वर्षे जुन्या दगडी शवपेटीवर (Sarcophagus) कोरलेला 'Seven Against Thebes' या नाटकातील सात सरदार लढाईसाठी निघतात तो प्रसंग

ग्रीक गोपाळ

आणखी एक सुंदर मोझाइक; मध्यभागी डायोनिअस हा द्राक्ष, वाइनची निर्मिती, नाट्यकला इत्यादींचा देव

हे अठराशे वर्षे जुनं मोझाइक एका घराच्या भोजनगृहातील जमिनीवर होतं. खालच्या फोटोत त्या घराचा आराखडा आणि मोझाइकविषयी माहिती आहे. ५x९ मीटर आकाराच्या या मोझाइकच्या मध्यभागी तीन चौकोनांत फळंफुलं, पक्षी आणि बाजूने वेली व जंगली प्राणी अशी नक्षी होती. कडेने असलेल्या वेलबुट्टीवर भोजनासाठी आसने असत.

.

शेवटच्या फोटोतील मातीचा घडा चौतीसशे वर्षे जुना (खि.पू. १४०० ते १३०० वर्षे) आहे! ग्रीक इतिहासाच्या ज्या कालखंडात हा घडा बनविला गेला, त्याला मायसिनिअन संस्कृती (Mycenaean civilization) म्हणतात. ज्या राज्यावरून हे नाव पडलं, ते मायसिनी (Mycenae, ग्रीक मिकेने) बघण्याची उत्सुकता होती. मग कोरिंथहून ५० किमीवर असलेल्या मायसिनीकडे मोर्चा वळविला.

अगामेम्नॉनच्या राज्यात (मायसिनी)

इलियड या होमरच्या काव्यातील अगामेम्नॉनचा उल्लेख मागच्या लेखात आला होता. या अगामेम्नॉननं राज्य केलं ते मायसिनी हे पुरातन स्थळ पर्यटकांच्या रडारवर फारसं नसलं तरी त्याला ग्रीसच्या आणि जगाच्याही संस्कृतींच्या (civilization याअर्थी) अभ्यासात महत्त्वाचं स्थान आहे. कांस्य युगाच्या शेवटच्या टप्पात (खि. पू. १६०० ते ११०० वर्षे) ग्रीसमध्ये मायसिनीअन संस्कृती होती. या काळात ग्रीसमध्ये नागरीकरण झालं.

मायसिनी किल्ल्याच्या अवशेषांचा आराखडा

मायसिनी हे या संस्कृतीचं मुख्य केंद्र होतं, त्याशिवाय टिरिन्स (Tiryns), पायलोस (Pylos), थिब्स (Thebes), आर्गोस (Argos), स्पार्टा (Sparta) अशी अनेक palace states होती. एजिअन समुद्रातील बेटं, मॅसेडोनिआ याठिकाणीही ही संस्कृती होती.

सिंहद्वार (Lion Gate): ख्रिस्तपूर्व १२५० दरम्यान घडविलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा

या काळात स्थापत्य, कला, धातूकाम अश्या अनेक अंगांनी विकास झाला. कांस्य युगातील इतर भूमध्यसागरीय ठिकाणांबरोबर व्यापार सुरू झाला. ग्रीक भाषेची सगळ्यात जुनी लिपीसुद्धा या काळातील. भरभराटीबरोबरच आर्थि़क व धार्मिक व्यवस्था आणि एकसंधता आली. शस्त्र व युद्धकला यांना खूप महत्त्व होतं. भक्कम तटबंदी असलेले कोटकिल्ले आणि कोटाच्या आत राजाचा प्रासाद आणि इतर इमारती असत.

किल्ल्यातील भग्नावशेष

या संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजघराण्यातील लोकांची दफनभूमी. दफनाच्या ठिकाणी सोन्याचांदीचे दागिने, मुखवटे आणि इतर मौल्यवान वस्तू मिळाल्या आहेत. त्यावरून मायसिनीची संपन्नता तसेच ग्रीसबाहेरील जगाशी असलेले व्यापारी संबंध दिसून येतात.

मायसिनी येथील २७मी. व्यासाची एक वर्तुळाकार दफनभूमी (Grave Circle), खि.पू. सोळावे शतक

या प्रकारच्या Grave Circle शिवाय थोलोस प्रकाराच्या थडग्यांसाठी (Tholos Tomb) मायसिनी प्रसिद्ध आहे. त्यातील विशेष महत्त्वाचं थडगं म्हणजे ख्रिस्तपूर्व १३५० ते १२५० या काळातील एट्रिअसचा खजिना (Treasury of Atreus). अगामेम्नॉनच्या पित्याचं, एट्रिअसचं नाव या जागेला मिळालं असलं तरी हे एट्रिअसचं थडगं असण्याचा काहीही पुरावा नाही.

 थोलोसची ३५ मी. लांब आणि ६ मी. रुंद मार्गिका (dromos) आपल्याला ५.५ मी. उंच दरवाज्याशी आणून सोडते.

दरवाज्याचा दर्शनी भाग एकेकाळी असा असावा.

थोलोसच्या मुख्य दालनाची उंची १३ मी. आणि व्यास १४.५ मी. आहे. दगडांच्या ३३ समकेंद्रीय वर्तुळांनी हे दालन बनविलेलं आहे. या वर्तुळांची त्रिज्या छताकडे कमीकमी होते. एट्रिअसच्या खजिन्याची भव्यता, त्याकाळातील स्थापत्यशास्त्रातील प्रगती यांनी आपण स्तिमित होवून जातो.

मुख्य दालनाचे छत

अंतर्भागाचा आराखडा

सगळ्यात आतील दफनाची जागा

मायसिनीत उत्खननातून मिळालेल्या बर्‍याच गोष्टी अथेन्सच्या National Archaeological Museum मध्ये आहेत. परंतु मायसिनीतही एक लहान म्युझिअम आहे. तिथे आपल्याला मायसिनीअन काळाबद्दल अधिक माहिती मिळते.

मायसिनीअन कलेचा उत्तम नमुना असलेलं भित्तीचित्र (Fresco)

खि.पू. १३०० ते १२५० मधील पाटावरवंटा आणि भांडी

थडग्यांमधे मिळालेले मुखवटे, दागिने, शस्त्रे

.

अगामेम्नॉनच्या राज्यावरील लेखाचा शेवट करू या अथेन्सच्या National Archaeological Museum मधील अगामेम्नॉनच्या मुखवट्याने (Mask of Agamemnon). वर दाखविलेल्या Grave Circle मध्ये हा मुखवटा मिळाला. सुरुवातीला अगामेम्नॉनचा मुखवटा म्हणून प्रसिद्ध झालेला हा मुखवटा अगामेम्नॉनच्या काळापेक्षाही जुना आहे, हे नंतरच्या संशोधनातून लक्षात आले.

 ट्रॉयच्या शोधासाठी प्रसिद्ध असलेल्या हाइनरिश श्लीमानने ट्रॉयनंतर २ वर्षांनी १८७६ मध्ये मायसिनीत उत्खनन केले. त्यावेळी (फोटोत दाखविलेल्या) Grave Circle मध्ये मिळालेल्या ५ मुखवट्यांपैकी हा एक मुखवटा आहे. बहुधा श्लीमान आणि ट्रॉयच्या प्रसिद्धीमुळे या मुखवट्याचा संबंध अगामेम्नॉनशी जोडला गेला असावा. स्वतः श्लीमानने असे म्हटल्याचा लिखित पुरावा नाही. नवीन संशोधनानुसार हा मुखवटा खिस्तपूर्व १५८० ते १५५० या काळातील, म्हणजेच अगामेम्नॉनच्या कालखंडापेक्षा सुमारे ३०० वर्षे जुना असावा.

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत असलेल्या मायसिनीतून पाय निघत नव्हता. पण ३ वाजून गेल्यावर तिथल्या रखवालदारांनी हाकलण्याआधी निघालो. बाहेर मस्त उन पडलं होतं. निळंशार आकाश आणि समोर ऑलिवच्या झाडांना घेवून उभे असलेले डोंगर! आणखी दोनतीन तास सहज उजेड असणार होता. ३ वाजता साइट बंद करण्याच्या आळशीपणाला नावं ठेवत बाहेर सावलीत गप्पा मारत बसलो. तिथे काम करणार्‍यांच्या गाड्या एकेक करून निघू लागल्या. आम्हाला तिथे बघून एकदोघांनी चौकशी केली. मग त्यांच्यामागोमाग आम्हीही नाफ्प्लिओच्या दिशेने निघालो.

पुढचे चार दिवस नाफ्प्लिओला (Nafplio) मुक्काम होता. ग्रीसमधील सगळ्यात सुंदर आणि रोमँटिक शहरांमध्ये हे शहर गणलं जातं. त्याशिवाय ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यात या शहराला अनन्यसाधारण स्थान आहे. त्याविषयी अधिक माहिती पुढच्या भागात येईलच. पायाशी समुद्र आणी उशाशी पालामिडी किल्ला असलेलं नाफ्प्लिओ हे अथेन्सवासीयांचं सुट्ट्यांसाठी आवडतं ठिकाण. २२ डिसेंबरला फारशी गर्दी नव्हती, पण पुढच्या दोन दिवसात पर्यटक यायला लागले आणि मस्त उत्सवी वातावरण तयार झालं.

हॉटेल जुन्या शहराच्या मागच्या बाजूला उंचावर होतं. गाडी थोडी दूर पार्क करून सामान घेवून चालत गेलो. हॉटेल छोटंसं असलं तरी छान सजवलं होतं. गावात जाण्यासाठी रस्त्याने वळसा घेवून जाण्यापेक्षा समोरच पायर्‍या होत्या. खिडक्यांतून खाली पसरलेल्या जुन्या पद्धतीच्या इमारती, समुद्र आणि त्याच्या पलीकडे डोंगररांगा दिसत होत्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी तयार होवून न्याहारीला गेल्यावर कळले, हॉटेलमध्ये जास्त पाहुणे नसल्याने आज बुफे नाही आणि आम्हाला हवी ती न्याहारी बनवून मिळेल. अंड्याचा पोळा, चीजटोस्ट आणि चक्क्यासारखं ग्रीक दही अशी मस्त पोटपूजा झाली.

.न्याहारीची जागा

फोटोतल्या काचेतून मध्यभागी दिसणारी वेनिशिअन्सच्या राज्यात १७१३ साली बांधलेली इमारत कालपासून खुणावत होती. त्या इमारतीत आता आर्गोलिस या भागात सापडलेल्या पुराणवस्तूंचे संग्रहालय आहे. तिकडे जाण्याआधी गावात थोडा फेरफटका मारला. सगळीकडे डोळ्यात भरेल अशी स्वच्छता. एकदोन मोठे रस्ते सोडले तर सगळे गल्लीबोळ किंवा पायर्‍या. त्या गल्ल्यांमध्येही गाड्या चालविणारे शूरवीर होते! अलीकडेच गावाचं नूतनीकरण झालं असावं. पण कुठेही जुन्या बांधकामाशी विसंगत असं काही नव्हतं.

नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय

संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही इमारत ग्रीसमधील वेनिशिअन स्थापत्याचं उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला शस्त्रागार म्हणून बांधलेली ही इमारत नंतर सैनिकांना राहायला, तसेच दुसर्‍या महायुद्धात जर्मन इंटरोगेशन सेंटर म्हणून वापरली गेली. नाफ्प्लिओचा मुख्य चौक असलेल्या सिंटाग्मा (राज्यघटना) चौकाची एक बाजू म्हणजे ही इमारत.

तिकिट काढून गेलो तर आतमध्ये जास्त कोणी पर्यटक नव्हते. दुमजली संग्रहालयात वेगवेगळ्या कालखंडांनुसार वस्तू आणि अवशेष मांडून ठेवले आहेत. सुमारे तीस हजार वर्षं जुन्या दगडी वेदिका (Paleolithic altars किंवा hearths) इथे बघता येतात.

आर्गोलिसच्या आग्नेय दिशेला समुद्रकिनारी असलेल्या फ्राग्थी (Fragthi किंवा Franchthi) नावाच्या गुहेत सापडलेले अवशेष हे या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे. सुमारे चाळीस हजार वर्षांपासून पाच हजार वर्षांपर्यंत म्हणजेच पॅलिओलिथिक, मेसोलिथिक ते निओलिथिक (नवपाषाण युग, पाषाण युगाचा शेवटचा काळ) काळापर्यंत या गुहेत मानवाने निवास केला होता. त्यामुळे मानवी विकासातील विविध टप्प्यांच्या (जसे hunter-gatherer ते शेतकरी) अभ्यासात या गुहेला विशेष महत्त्व आहे. पर्यटकांना या गुहेला भेट देता येत नाही; परंतु संग्रहालयात ही गुहा, ग्रीसच्या या भागातील मानवी अस्तित्व आणि विकास यांवर एक माहितीपूर्ण चित्रफित बघायला मिळाली.

.

पहिल्या फोटोत ख्रिस्तपूर्व ६८०० ते ३२०० या काळातील बाणांची टोके, धारदार पाती, हाडांपासून बनविलेली हत्यारे, पाटावरवंटा दिसत आहेत. दुसर्‍या फोटोत ख्रिस्तपूर्व ५८०० ते ५३०० मधील एका नवजात बाळाचे अवशेष आहेत. गुहेत दफन करताना बरोबर छोटा संगमरवरी वाडगा आणि एक मातीचं भांडं ही दफन केलं होतं. इतर दफनांच्या ठिकाणीही हत्यारे, भांडीकुंडी मिळाली आहेत, त्यांवरून दफन केलेल्या व्यक्तीच्या पेशाबद्दल अंदाज बांधता येतो आणि त्याकाळच्या समाजजीवनाची ओळखही होते.

१९५२-५३ साली मायसिनीला झालेले उत्खनन

पाषाणयुगानंतरच्या कांस्ययुगातील वेगेवेगळ्या दफनभूमीत सापडलेल्या काही वस्तू (ख्रिस्तपूर्व १९०० ते १६००) पुढच्या फोटोत दिसतात. यात एक सोन्याचा मुकुटही आहे. भांड्यांचे आकार, घडण, रंगसंगती वगैरेतील वैविध्य बघून थक्क व्हायला होत होतं. दाभण, चाकूसुरे, कुर्‍हाडीची व भाल्याची पाती, मासेमारीचे हूक अशी हत्यारं ते शिक्के, धातूचे वा काचेचे मणी, दागिने, हस्तिदंताच्या वस्तू असं बरंच काही मांडून ठेवलं होतं. चांगली प्रकाशयोजना आणि ग्रीकबरोबर इंग्रजीतही व्यवस्थित दिलेली माहिती यामुळे हे संग्रहालय आवडून गेलं.

मायसिनिअन संस्कृतीच्या वेगवेगळ्या केंद्रांमधील थडग्यामध्ये मिळालेल्या वस्तूंचे काही फोटो:

कांस्य हत्यारे

वाईन आणि पाणी एकत्र करण्यासाठी मोठी सिरॅमिक भांडी वापरत असत. ख्रिस्तपूर्व तेराव्या ते अकराव्या शतकातील अश्या घड्यांचे तुकडे पाहायला मिळतात. या घड्यांवर रथारूढ योद्धे दाखविले आहेत.

इथल्या संग्रहातील सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे ख्रिस्तपूर्व पंधराव्या शतकातील म्हणजे सुमारे साडेतीन हजार वर्षे जुने कांस्य चिलखत. एका मायसिनिअन कबरीत हे चिलखत आणि हातापायांसाठीच्या संरक्षक प्लेट्स सापडल्या. बरोबरच्या शिरस्त्राणात रानडुक्कराच्या सुळ्यांचे तुकडे बसविलेले आहेत.

.

चिलखतापेक्षा बराच नवीन तरीही कारागिरीचा उत्तम नमुना असलेला हा खि.पू. पाचव्या शतकात बनविलेला काश्याचा आरसा:

खालील फोटोतला खि.पू. दुसर्‍या शतकातील शिलालेख हा एर्मिओनी (Hermione) आणि एपिडाउरोस (Epidaurus) या शहरांच्या सीमांविषयी आहे. या शहरांमधील सीमावाद सोडविण्यासाठी र्‍होड्स आणि मिलेटोस या ठिकाणांहून पंच बोलविण्यात आले. पंचांनी दिलेल्या निर्णयाचे शिलालेख एर्मिओनी आणि एपिडाउरोसला बसविण्यात आले, त्यातील एर्मिओनीचा हा शिलालेख आहे.
संग्रहालय पाहताना कर्नाटकाबरोबरचा सीमावाद आठवला होता. आत्ता लिहिताना कावेरीचं पाणीही जोडीला आहे!

एर्मिओनी त्याकाळी आणि अजूनही बंदरासाठी प्रसिद्ध आहे. तर एपिडाउरोस तिथल्या अस्क्लिपिअसच्या आश्रयस्थानासाठी. संग्रहालय पाहून ३० किलोमीटर अंतरावरील एपिडाउरोसकडे मोर्चा वळविला.

एपिडाउरोस

प्राचीन ग्रीकांचा सूर्यदेव अपोलोच्या अनेक मुलांपैकी एक अस्क्लिपिअसच्या (Asclepius) जन्माची गोष्ट अद्भुतरम्य आहे. त्याचा जन्म एपिडाउरोसला झाला, असे समजले जाते. अपोलो हा धन्वंतरी म्हणूनही ओळखला जातो आणि अस्क्लिपिअसकरवी तो लोकांवर उपचार करतो, असा समज प्रचलित होता. एपिडाउरोसपासून थोडं दूर अस्क्लिपिअन हे आश्रयस्थान किंवा उपचारकेंद्र (sanctuary) होते. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या आणि चौथ्या शत़कात या ठिकाणाची भरभराट झाली. रुग्णांसाठी निवास, चिकित्सागृह, क्रीडांगण, नाट्यगृह अश्या अनेक सुविधा होत्या. तिथे शल्यकर्मही होत असत. क्रीडांगण आणि इतर अवशेषः

एपिडाउरोसच्या छोटेखानी संग्रहालयात अस्क्लिपिअसच्या कल्टबद्दल तसेच औषधोपचार, शल्यक्रिया, त्याकाळी वापरली जाणारी साधने याविषयी माहिती मिळते. का कुणास ठावुक, तिथे कॅमेरा वापरायला मात्र बंदी आहे.

अस्क्लिपिअनचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांत असून इथलं नाट्यगृह (Theatre) हे ग्रीसमधील एक उत्तम स्थितीतील प्राचीन नाट्यगृह आहे. १४००० प्रेक्षकक्षमता असलेल्या नाट्यगृहाचं acoustics हे एक वैशिष्टय आहे. नाट्य आणि संगीताचा आरोग्यावर परिणाम होतो, असे मानले जात असे. नाट्यगृहात रुग्णांच्या संगीत आणि नाट्यस्पर्धाही होत असत.

अजूनही दरवर्षी उन्हाळ्यात इथे नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो. या पायर्‍यांवर बसून प्राचीन नाटकांचे प्रयोग पाहताना प्रेक्षकांनाही मधल्या दोन हजार वर्षांचा नक्कीच विसर पडत असेल!

त्या भारलेल्या वातावरणातून वर्तमानात आल्यावर कुठेतरी शांत बसून राहावंसं वाटत होतं. मग नवीन एपिडाउरोसच्या समुद्रकिनारी गेलो.

भावी दर्याचा राजा

पालामिडी किल्ला

 ग्रीसच्या आर्गोलिस भागात इतके किल्ल्यांचे अवशेष दिसतात कि आपल्या सह्याद्रीची आणि गडकिल्ल्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरंतर नाफ्प्लिओच्या आसपास पर्वत असे नाहीतच, फक्त विखुरलेल्या टेकड्या, काही डोंगररांगा आणि छोटी बेटं. पण त्यांवर कुठे छोट्या गढ्या तर कुठे अवाढव्य किल्ले. त्यातील पालामिडी या महत्त्वाच्या किल्ल्याला भेट द्यायचा २४ डिसेंबरचा कार्यक्रम होता. या एककलमी कार्यक्रमाचं कारण होतं क्रिसमस ईव्हची अर्ध्या दिवसाची सुट्टी. बाकीचा दिवस मोकळा ठेवला होता.

.बुर्ट्झीला बेटावर जाताना दिसणारं नाफ्प्लिओ शहर आणि पालामिडी किल्ला

थोडं नाफ्प्लिओ शहराविषयी

ग्रीक देव पोसायडनचा मुलगा नाफ्प्लिओसचं नाव दिलेलं नाउप्लिआ प्राचीन काळीही अस्तित्वात होतं. पण ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात एका युद्धाच्या वेळी आर्गोलिस राज्याऐवजी स्पार्टाची बाजू घेतल्यामुळे आर्गोलिसच्या राजाने नाउप्लिआचा विध्वंस केला. त्यामुळे अक्रोनाउप्लिआ या गढीची थोडी तटबंदी वगळता प्राचीन नाउप्लिआच्या खाणाखुणा दिसत नाहीत. नंतरच्या काळात बायझंटाईन, फ्रँक्स, तुर्की, वेनिशिअन अश्या अनेक सत्तांनी इथे राज्य केलं. व्यापार आणि आयातनिर्यातीमुळे या शहराला महत्त्व होतं. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात वेनिशिअन्सनी नवीन तटबंदी, बंदराची डागडुजी, बंदराहून जवळच असलेल्या बेटावर बुर्ट्झी (Bourtzi) ही गढी अशी बांधकामे केली. त्यानंतर एका तहाअन्वये नाफ्प्लिओ पुन्हा एकदा तुर्कांच्या हाती गेले. सुमारे शंभर वर्षांनी वेनिशिअन्स, जर्मन्स आणि पोलिश सैन्यांनी मिळून नाफ्प्लिओवर विजय मिळवला. यावेळी वेनिशिअन्सची सत्ता तीस वर्षं टिकली. याच कालावधीत पालामिडी किल्ला बांधण्यात आला.

.किल्ल्यावरून दिसणारा शहराचा काही भाग

.किल्ल्यावरून दिसणारं अक्रोनाउप्लिआ आणि समुद्रातील छोटंसं बुर्ट्झी बेट

सोळाव्या शतकापासूनच ग्रीसचा बराचसा भाग ऑटोमान तुर्कांच्या आधिपत्याखाली होता. तेव्हापासून तुर्की राजवटीविरोधी उठावाचे काही प्रयत्न झाले होते. परंतु ग्रीसच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात १८२१ मध्ये पेलोपोनिझं प्रांतातील उठावाने झाली. हळूहळू हे लोण बाकी ग्रीसमध्ये पसरले. नोव्हेंबर १८२२ मध्ये एका वर्षाच्या वेढ्यानंतर ग्रीकांनी नाफ्प्लिओ शहर आणि पालामिडी किल्ला जिंकला. या विजयानंतर नाफ्प्लिओला ग्रीसची अस्थायी राजधानी बनविण्यात आले आणि ते ग्रीक स्वातंत्र्यसंग्राम आणि राष्ट्रनिर्माणाच्या केंद्रभागी राहिले. इ.स. १८२९ मध्ये नाफ्प्लिओ स्वतंत्र ग्रीसची अधिकृत राजधानी झाले. १८३४ साली राजधानी अथेन्सला हलविण्यात आली.

.पालामिडीवर फडकणारा ग्रीसचा झेंडा

पालामिडी किल्ला

ट्रोजन युद्धातील एक योद्धा पालामिडीसवरून नाफ्प्लिओ जवळच्या एका टेकडीला पालामिडी हे नाव पडलं होतं. या टेकडीवर वेनिशिअन्सनी इसवीसन १७११ ते १७१४ दरम्यान किल्ला बांधला. आठ बुरूज आणि त्यांना जोडणारी तटबंदी असा किल्ल्याचा आराखडा होता. किल्ल्याचं काम पूर्ण होत आलं आणि पुन्हा नाफ्प्लिओ तुर्कांच्या हाती गेलं. पालामिडीच्या उरलेल्या दोन बुरुजांचं बांधकाम तुर्कांनी पूर्ण केलं. या बुरुजांना वेनिशिअन्सनी दिलेली नावे तुर्कांनी बदलली. ग्रीस स्वतंत्र झाल्यावर बुरुजांची तुर्की नावे बदलून अकिलीस, लिओनिडस, मिल्टायडीस, थेमिस्टक्लीस अशी प्राचीन ग्रीक हिरोंची नावे देण्यात आली.

.किल्ल्याचं प्रवेशद्वार

किल्ल्याच्या बुरुजांचे आणि अंतर्भागाचे फोटो:

.
.
.
.
..
...
.
...

जाताजाता नाफ्प्लिओतून रात्री दिसणारं पालामिडीचं हे रूपः

.

असिनीचे अवशेष आणि टोलो

पालामिडी किल्ला फिरून होईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. पूर्ण दिवस मोकळा होता. होटेलला जाऊन थोडा वेळ घालवला. पण itchy feet शांत बसू देईनात. मग नाफ्प्लिओपासून जवळच टोलो हे लोकप्रिय बीच रिझॉर्ट आहे. तिकडे थोडं फिरू आणि दुपारचं जेवण करू असा विचार करून निघालो. तिथे पोहोचायला गाडीने जेमतेम दहा मिनीटे लागली. गावातून जाणारा मुख्य रस्ता आणि समुद्र यांच्यामध्ये एकमेकांना खेटून होटेल्सची पलटण उभी होती. गावात शिरताना लागलेली एकदोन उपहारगृहं सोडली तर सगळा शुकशुकाट दिसत होता. इकडे यायची अभिनव कल्पना नक्की कोणाची होती आणि/किंवा त्या कल्पनेचं खापर दुसर्‍यावर कसं फोडता येईल, हा विचार दोन्ही डोक्यांत सुरू झाला होता. आणखी थोडं पुढे जाऊन बघू असं म्हणतम्हणत आम्ही गावाबाहेर पडलोही! फळांनी लगडलेल्या संत्र्याच्या बागा दिसू लागल्या. आणि अचानक रस्त्याच्या कडेला कोणी ग्रीक गॉड/गॉडेस ने (take your pick) मंद स्मित करत वगैरे... पण असं काहीही झालं नाही...

तर रस्त्याच्या कडेला प्राचीन असिनीची (Ancient Asine) दिशा दाखविणारा बाण दिसला आणि पुढेच असिनीची टेकडीही. असिनी टोलोच्या इतकं जवळ आहे, हे ठाऊक नव्हतं. असिनीला पाहण्यासारखं काही विशेष नाही, म्हणून ते आमच्या यादीत नव्हतं. ईथवर आलो आहोत तर जाऊन बघू असा विचार केला. थोडं चढून गेल्यावर एक नवीनच बांधलेलं ऑफिस लागलं आणि त्यात एक वयस्कर रखवालदारही होते. त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता, पण आम्हाला बघून त्यांना झालेला आनंद कळायला भाषेची गरज नव्हती. तसेही डिसेंबरमध्ये असे किती पर्यटक इकडे फिरकत असतील!

प्राचीन असिनी

असिनीचे अवशेष तीन वाजेपर्यंत उघडे होते आणि प्रवेशशुल्क नव्हतं. माहितीपत्रक घेऊन आत गेलो.

समुद्रकिनारी कास्ट्राकी नावाच्या टेकडीवर असिनी या प्राचीन अक्रोपोलिसचे अवशेष आहेत. सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून इथे मानवाची वस्ती होती. असिनीचा उल्लेख होमरच्या ट्रोजन युद्धातही येतो. त्याकाळी असिनी हे आर्गोस (Argos) या राज्याचा भाग होतं. आर्गोसचा राजा डायोमिडसच्या ट्रॉयला जाणार्‍या नौका टोलो बंदरातून निघाल्या होत्या.

ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात आर्गोस आणि स्पार्टाच्या युद्धात स्पार्टाची बाजू घेतल्याने नाफ्प्लिओसारखं असिनीसुद्धा आर्गोसच्या राजाने उद्ध्वस्त केलं. त्यानंतर असिनीच्या लोकांनी असिनी नावाचंच दुसरं शहर स्पार्टाच्या राज्यात वसवलं. आता अस्तित्वात असलेलं बरंचसं बांधकाम ख्रिस्तपूर्व ३०० सालादरम्यान मॅसेडोनियाच्या डेमेट्रिअस राजाने केलेले आहे.

.

पूर्वेच्या बुरुजाचे पत्थर आणि तिथून दिसणारा नजारा

रखवालदारबाबांकडून कुठे काय पाहायचं वगैरे काहीच माहिती मिळाली नव्हती. इतस्ततः पसरलेल्या दगडधोंड्यांतून फिरत एकेकाळचं समृद्ध अक्रोपोलिस डोळ्यांसमोर उभं करायला कल्पनाशक्ती पणाला लागत होती. पण हे Acropolis with a view असणार, एवढं मात्र नक्की!

एका ठिकाणी वाईन बनवायची Press Installation दिसली. तिथे दिलेल्या माहितीनुसार पायांनी दाबून द्राक्षांचा लगदा बनवून मग लाकूड, वजनासाठी दगड इत्यादी वापरून बनविलेल्या प्रेसने रस काढला जात असावा. जमिनीत गोल किंवा चौकोनी टाक्या बसविलेल्या असत, ज्यात द्राक्षांचा रस किंवा इतर द्रवपदार्थ गोळा होत असे.

टेकडीला अर्धीअधिक प्रदक्षिणा घातल्यावर आधी लांब दिसणारी समुद्रातील बेटं बरीच जवळ वाटायला लागली. उजवीकडे टोलोचा किनारा दिसत होता.

टोलोला परत जाईपर्यंत ग्रीकांची दुपारच्या जेवणाची वेळ झाली असावी. थोडा पोटोबा करून बीचवर मस्त भटकलो. निळंशार शांत पाणी बघून डोळे निवत होते. पण पाणी इतकं थंड की त्यात पाऊल टाकणं शक्य नव्हतं.

नाफ्प्लिओला संध्याकाळपर्यंत बरेच ग्रीक पर्यटक येवून पोहोचले होते. 'आमच्या' निवांत नाफ्प्लिओलाच ही माणसं गर्दी करायला का आली, असं वाटून गेलं. समुद्रतीरी असलेले कॅफे आणि पब्ज गजबजले होते. तो गलबला नको म्हणून पहिल्या दिवशी जेवलेल्या एका छोट्या टॅवर्नात रात्री जेवायला गेलो.

एका कुटुंबाने चालविलेल्या त्या टॅवर्नात पारंपारिक जेवण मिळायचं. आम्ही दुसर्‍यांदा तिथे गेल्याने जवळचे मित्र वगैरे असल्यासारखं आमचं स्वागत झालं! त्या कुटुंबातले आजोबा हीटरजवळच्या टेबलवरून उठून आम्हाला तिथे बसायला सांगत होते. फक्त त्यांनाच आठदहा शब्द इंग्रजी बोलता येत होतं; त्यांनी बहुधा खलाश्याचं काम केलेलं असावं. त्यांच्याशी हातवार्‍यांनी थोड्या गप्पा मारल्या. हाउस वाईन, झुकिनीची भजी, चिकन सुवलाकी आणि बाळकांदे घातलेला सश्याचा स्ट्यू असं मस्त जेवण झालं. डेझर्ट नको म्हटल्यावर आग्रहाने फळं समोर ठेवण्यात आली.

.

जेवल्यावर पाय मोकळे करणं भाग होतं. रात्री भटकायला मला आवडतंच. त्यात नाफ्प्लिओसारखं रोमँटिक शहर चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालं असेल तर क्या कहने!

आर्गोसचे अक्रोपोलिस

२५ डिसेंबर २०१५, ग्रीसमधील पाचवा दिवस. ख्रिसमसची सुट्टी, त्यात आदल्या दिवशी खूप फिरणं झालं होतं; त्यामुळे सावकाश उठून निवांतपणे न्याहारी केली. आमची न्याहारी सुरू असताना होटेलच्या छोट्याश्या गल्लीत गावाचं बँडपथक आलं होतं. गावातल्या किमान तीन पिढ्या त्या पथकात असतील. होटेलच्या बाहेर त्यांनी थोडा वेळ वादन केलं. त्या इवल्याश्या गल्लीत होटेलच्या अगदी समोर एक घर होतं. पण त्या घराबाहेरही ख्रिसमसची गाणी वाजवण्यात आली. घरमालक स्वखुशीने पथकासाठी देणगी देत होते. आपल्याकडील दिवाळीच्या पोस्तासारखा हा प्रकार होता. गावातील लोकांच्या सहभागातून चालणार्‍या उपक्रमांसाठी पैसे उभे करण्याचा तो परंपरागत मार्ग होता.

आज नाफ्प्लिओतील शेवटचा दिवस. बुर्ट्झी बेटावर जायला इतके दिवस बोट मिळाली नव्हती. कालपासून बरेच पर्यटक आले होते. त्यामुळे आज बोट असेल तर बुर्ट्झीला अर्ध्या तासाची भेट आणि संध्याकाळी नाफ्प्लिओच्या प्रोमंनाडवर फेरफटका एवढाच कार्यक्रम होता. बाकीचा दिवस मोकळा होता.

आल्या दिवसापासून समुद्रापलीकडे दूर एका डोंगरावर असलेला किल्ला आम्हाला खुणावत होता. नाफ्प्लिओच्या किल्ल्यावरून, समुद्रतीरावरून, होटेलच्या खिडकीतून तो वाकुल्या दाखवित असे. मायसिनीहून नाफ्प्लिओला येतानाही उजवीकडे त्याचं दर्शन झालं होतं. गूगल अर्थच्या कृपेने तो किल्ला आर्गोस शहराबाहेर आहे, हे समजलं. ट्रिपअ‍ॅडवायझरवर या किल्ल्याविषयी काही माहिती नव्हती. थोडं खोदकाम केल्यावर किल्ल्यावर जाता येतं एवढं कळलं. तिकीट किंवा उघडण्याची वेळ वगैरे माहिती मिळाली नाही. होटेलच्या मालकांनाही त्याबद्दल ठाऊक नव्हतं. ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे तसंही किल्ला पाहायला मिळेल, असं वाटत नव्हतं. पण वेळ आहे तर किमान पायथ्यापर्यंत जाऊन येऊ, असा विचार करून निघालो.

लारिस्सा किल्ला: आर्गोसचे अक्रोपोलिस

नाफ्प्लिओहून बारा किलोमीटरवर आर्गोस हे ग्रीसच्या सगळ्यांत जुन्या शहरांपैकी एक शहर आहे. सुपीक जमीन असलेली ही जागा मायसिनीअन काळात अधिक विकसित झाली. २०,००० आसनक्षमता असलेल्या प्राचीन थिएटरचे अवशेष इथे आहेत. महाकवी होमरच्या इलियडमधील एक योद्धा डायोमीडचं हे राज्य. शहराबाहेरील एका डोंगरावर लारिस्सा हे आर्गोसचे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील अक्रोपोलिस आहे.

किल्ल्यावरून दिसणारं नेटकं आर्गोस

नाफ्प्लिओहून निघाल्यावर आर्गोस येण्याआधी डावीकडे किल्ला दिसायला लागला. पण किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ला मागे टाकून शहरात शिरून दुसर्‍या बाजूला बाहेर पडलो. मग अर्ध्या डोंगराला वळसा घालावा लागला. थोडा चढ चढल्यावर एक ख्रिश्चन मोनॅस्टरी दिसली. गाडीने किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचलो. तिथे आणखी एकदोन गाड्या होत्या. पण मनुष्यप्राणी कोणी नव्हते. किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असावं. मोठं लोखंडी गेट हल्लीच लावलेलं असावं. आतमध्ये बरंच सामान पडलेलं दिसत होतं. आता काय करावं या विचारात पडेपर्यंत आणखी एक गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या लोकांतील एक माणूस स्थानिक असावा. त्याच्याकडून किल्ला बघायला तिकीट नाही, एवढं कळलं. गेट बंद असताना आत कसं जायचं, हे विचारायची वेळच आली नाही. गेटच्या एका टोकाला गेट आणि किल्ल्याचा तट यांच्यामध्ये एकावेळी एक माणूस जाऊ शकेल एवढी फट होती. त्या फटीतून त्या लोकांच्या मागून आम्हीही एकदाचे किल्ल्यात शिरलो.

वेगवेगळ्या कालखंडांत झालेल्या बांधकामांच्या खुणा तटबंदीवर दिसत होत्या.




किल्ल्यावरची विहीर पाहून आतल्या आणखी एका भव्य तटबंदीतून आत गेलो.


या तटाच्या आत खूप बांधकाम आहे. हा बालेकिल्ला असावा. अवशेषांची डागडुजी, माहितीचे फलक लावणे असं काम सुरू असावं. बरंच सामान पडलेलं होतं. काही भिंतींचं काम पूर्ण झालेलं असावं. ते पाहून तिथल्या अनेक शत़कांच्या खुणा पुसून टाकून एक मेकअप केलेला कोराकरकरीत किल्ला तिथे शिल्लक राहील कि काय असं वाटलं.




.

या किल्ल्यात बघण्यासारखं एवढं असेल याची येण्याआधी अजिबात कल्पना नव्हती. कोरिंथचं अक्रोपोलिस किंवा पालामिडी किल्ल्यासारखा हा किल्ला प्रसिद्ध का नसावा हे एक कोडंच आहे. पण इथवर येण्याचं सार्थक झालं हे मात्र नक्की. आणि नाफ्प्लिओतून क्षितिजावर दिसणार्‍या किल्ल्याचं लारिस्सा हे सुंदर नावही कळलं!

 बुर्ट्झी आणि नाफ्प्लिओ प्रोमंनाड

लारिस्सा किल्ला बघून नाफ्प्लिओला परत आल्यावर बंदरावरील एका कॅफेत बसून थोडा आराम केला. दोनतीन दिवसांच्या सुट्टीसाठी अथेन्सहून मोठ्या प्रमाणात ग्रीक पर्यटक नाफ्प्लिओला येतात. आजूबाजूला सगळी मोठमोठी कुटुंबं दिसत होती. त्यांचं निरीक्षण करण्यात आणि त्यांची आपापसातील नाती ओळखण्यात आमचा मस्त वेळ गेला.

नाफ्प्लिओ वॉटरफ्रंट

बुर्ट्झी बेटावर सोडणाऱ्या बोटीच्या फेऱ्या सुरू होत्या. बेटापर्यंत जाऊन परत यायला दहा मिनिटं लागतात आणि बेटावरची छोटी गढी बघायला वीसएक मिनिटं वेळ दिला जातो. प्रत्येकी चार युरो देऊन आम्हीही पुढच्या बोटीत बसलो.

बुर्ट्झी (Bourtzi )

बुर्ट्झी हा बुरूज शब्दाचा एक अवतार. नाफ्प्लिओ बंदराच्या रक्षणासाठी १४७३ साली व्हेनिशिअन्सनी बंदराच्या जवळील छोट्या बेटावर गढी बांधली. नंतरच्या काळात आणखी बांधकामे झाली. या गढीचा वापर काही काळासाठी तुरुंग म्हणूनही करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात पालामिडी किल्ल्यातील तुरुंगात देहदंड देण्याचं काम करणाऱ्याना शहरात राहता येत नसे, ते बुर्ट्झी बेटावर राहत.

 

गढीचा मुख्य दरवाजा

नाफ्प्लिओ प्रोमंनाड

नाफ्प्लिओच्या वॉटरफ्रंटपासून पालामिडीच्या पायथ्याशी असलेल्या बीचपर्यंत समुद्रालगत एक दगडी पदपथ जातो. जॉगर्स असोत की रमतगमत जाणारे आमच्यासारखे पर्यटक, सगळ्यांना हा सुंदर रस्ता भुरळ घालतो. त्याची सूर्यास्ताला घेतलेली काही प्रकाशचित्रे:

परतीच्या मार्गावरः

अथेन्सला जाताना: कोरिंथ कालवा

नाफ्प्लिओचा निरोप घेण्याची वेळ आली होती. नाफ्प्लिओ सोडून जाण्याची इच्छा नव्हती, पण अथेन्स बोलावत होतं.
२६ डिसेम्बरला सकाळी नाफ्प्लिओहून निघून अथेन्सला जाताना वाटेत कोरिंथच्या कालव्यापाशी थांबलो. कोरिंथच्या आखाताला एजियन समुद्राशी जोडणारा हा जगप्रसिद्ध कालवा काढण्याचे अनेक प्रयत्न प्राचीन काळातही झाले होते. अखेर ग्रीस स्वतंत्र झाल्यावर कालवा बांधायचा विचार मूळ धरू लागला. इ.स. १८८२ ते १८९३ अशी अकरा वर्षे कालव्याचे काम चालले. आता या कालव्याचा उपयोग फक्त पर्यटनासाठी होतो.

इतके दिवस सांगाती असलेला हा महामार्ग आम्हाला अथेन्सला नेवून सोडणार होता...

 कोरिंथ कालवा अरुंद असल्याने औद्योगिक वाहतुकीसाठी वापरला जात नाही. परंतु पर्यटकांसाठी नौकानयन, बंजी जंपिंग वगैरे सोयी आहेत.

अर्थातच ग्रीस बेटांसाठीही प्रसिद्ध आहे. पण बेटांपेक्षा प्राचीन संस्कृती आणि वास्तू बघण्यात जास्त रस असल्याने दोनदा ग्रीसला जाऊनही अजून कुठल्याच बेटांवर जाणं झालेलं नाही. शिवाय अप्रसिद्ध जागा किंवा समुद्रकिनारेही तितकेच सुंदर असू शकतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी असलेल्या जागा टाळून वेगळी ठिकाणं शोधायला जास्त आवडतं.

मात्र Island hopping कधीतरी नक्की करणार.

 अथेन्समधील पहिला दिवस

२७ डिसेंबर, २०१५ अथेन्समधील पहिला दिवस. आजचा दिवस धरून ग्रीसमध्ये साडेतीन दिवस उरले होते. आज सकाळी लवकर निघून डेल्फीची सहल करून यायचं, असं ठरवलं होतं. आम्ही टूर वगैरे बुक केली नव्हती, पब्लिक बसने जाणार होतो. पहाटे गजर व्हायच्या आधीच मला जाग आली. पण झोपही अनावर येत होती. मग आज अथेन्स पाहू आणि डेल्फीला उद्या जाऊ असं मनात म्हणून गजर बंद करून टाकला. झोपा काढणं कधीकधी किती फायद्याचं ठरतं हे नंतर कळणार होतं!

सकाळी उठायला अर्थातच उशिर झाला. ख्रिसमसच्या दोन दिवसांच्या सुट्टीत सगळी पर्यटनस्थळं बंद असतात. त्यामुळे आज अथेन्समध्ये सगळीकडे गर्दी असणार हे नक्की होतं. आता निघायला उशिर झालाच आहे तर आधी सिंटाग्मा चौकातील 'चेंज ऑफ गार्डस्' सोहळा बघू आणि मग अक्रोपोलिसला जाऊ असं ठरवलं.

सिंटाग्मा चौकातील युद्धस्मारक आणि 'चेंज ऑफ गार्डस्'

सिंटाग्मा (Syntagma Square) हा ग्रीस राज्यघटनेचं नाव दिलेला चौक म्हणजे अथेन्समधील मध्यवर्ती ठिकाण आहे. या भागात राजमहालाची इमारत आहे, जिथे आता ग्रीसची पार्लमेंट भरते. चौकात Tomb of the Unknown Soldier हे युद्धस्मारक आहे. हे स्मारक तसेच राष्ट्रपतीभवनाचे रक्षण एव्झोन (Evzone) नावाच्या विशिष्ट सैनिकांची तुकडी करते. हे उंचपुरे Evzoni त्यांच्या पारंपारिक पोषाखामुळे (यात किल्ट, रुंद बाह्या, गोंडे लावलेली आणि खिळे ठोकलेली पादत्राणे येतात) व्हॅटिकनच्या स्विस गार्ड सारखेच पर्यटकांना आकर्षित करतात.

युद्धस्मारक आणि रक्षणास उभे एव्झोनी

युद्धस्मारकापाशी उभ्या Evzoni ची जोडी दर तासाला बदलते. हे 'चेंजिंग ऑफ गार्डस्' बघायला अनेक पर्यटक जातात. त्यादिवशी रविवार असल्याने सकाळी अकरा वाजता नेहमीच्या 'चेंज ऑफ गार्डस्' पेक्षा मोठा सोहळा होता. यात जवळजवळ सगळे गार्डस् त्यांच्या बँडपथक आणि अधिकार्‍यांसमवेत स्मारकापाशी येऊन सलामी देतात.

.

.

.

.

कवायत पाहत असताना सैनिकांना सरावाची खूप गरज आहे असं वाटत होतं. 'चेंज ऑफ गार्डस्' संपल्यावर अक्रोपोलिसला जाण्यासाठी अथेन्सच्या मेट्रोकडे वळलो. मेट्रोच्या लाल रंगाच्या मार्गावर पुढचंच स्टेशन अक्रोपोली आहे.

रोम, अथेन्स सारख्या शहरांनाच पुराणवस्तूंची संग्रहालये म्हणणं अतिशयोक्ती ठरू नये. अथेन्सच्या मेट्रोचं काम सुरू असताना खोदकामात मिळालेले अनेक अवशेष हे मेट्रोच्या स्टेशनांमध्ये पाहता येतात. त्यामुळे मेट्रोने प्रवास करतानाही बर्‍याचदा काहीतरी लक्षवेधक पाहायला मिळतं.

.

.

एका स्टेशनला पाहिलेला ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील पाणी वाहून नेणारा टेराकोटा पाइप

अक्रोपोलिसच्या परिसरात

अक्रोपोलिस असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी मेट्रो स्टेशनच्या बाहेरच अक्रोपोलिस म्युझिअम आहे. रविवार असल्याने हे म्युझिअम रात्री आठ वाजेपर्यंत पाहता येणार होतं. त्यामुळे आधी अक्रोपोलिस आणि मग म्युझिअम असा बेत होता. पण म्युझिअमच्या बाहेर आधी एक फेरफटका मारला. म्युझिअमच्या प्रवेशासाठी पर्यटकांची लांबलचक रांग लागली होती. अक्रोपोलिसकडे जाणार्‍या लोकांचीही उन्हाळ्यात असावी तशी गर्दी होती. सकाळी लवकर यायला हवं होतं वगैरे म्हणण्याला आता काही अर्थ नव्हता. पण प्रवेशद्वाराशी पोहोचेपर्यंत लक्षात आले की लोक उलट पावली परत फिरत होते. संप असल्यामुळे अक्रोपोलिस चक्क बंद होतं! तोपर्यंत आम्हांला संपाची कुणकुणही लागली नव्हती. पण अक्रोपोलिस म्युझिअम तर सुरू होतं! हा काय प्रकार आहे, नक्की कोणती ठिकाणं बंद आहेत हे विचारायला जवळच असलेल्या पर्यटन माहितीकेंद्रात गेलो. तिथली रांग थोडी ओसरल्यावर चौकशी केली तर कळलं की ग्रीक सरकारच्या सांस्कृतिक खात्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी सकाळी एक दिवसाचा संप पुकारला होता. २५, २६ डिसेंबर नाताळची सुट्टी आणि २७ डिसेंबरला संप! असं सुट्टीला जोडून संपावर जाणं तिथे नवीन नाही, हे नंतर कळलं. उरलेल्या सुट्टीत सकाळी संपाची माहिती काढल्यावर बाहेर पडायचं असं ठरवून टाकलं.

ग्रीसमधील बहुतेक म्युझिअम्स आणि प्राचीन अवशेष सांस्कृतिक खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने ते बघायला आलेल्या आमच्यासह देशभरातील सगळ्याच पर्यटकांची गैरसोय होणार होती. दु:खात सुख एवढंच की पहाटे उठून आम्ही डेल्फीला गेलो नव्हतो! नाहीतर एवढा प्रवास करून एक दिवस वाया घालवून हात हलवत परत यावं लागलं असतं. अथेन्समध्ये निदान अक्रोपोलिस म्युझिअम तरी पाहता येणार होतं. (या म्युझिअमचा कारभार सां. खात्याच्या अंतर्गत येणारी एक वेगळी संस्था बघते.)

पर्यटन केंद्रात काही माहितीपत्रकं होती. त्यातील प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानाच्या एका प्रदर्शनाचं पत्रक घेतलं आणि तिथे कसं जायचं वगैरे विचारून घेतलं.

केंद्राच्या आवारात बसायला कट्टे होते. जवळच मस्त फुललेला जाईचा वेल होता. आम्हाला आता काही घाई नसल्याने आरामात बसलो. अथेन्समधील एकदोन जागांवर वेळेअभावी फुली मारणं भाग होतं. आज प्राचीन तंत्रज्ञानाचं प्रदर्शन, अक्रोपोलिस म्युझिअम आणि लायकाबेटस (Lycabettus) टेकडी पाहू आणि उरलेल्या दिवसांत (सरकारी कर्मचार्‍यांच्या युनिअन्सनी कृपादृष्टी ठेवल्यास) अक्रोपोलिस, डेल्फी आणि नॅशनल आर्किओलोजी म्युझिअम पाहू असा बेत ठरला.

आमचं बोलणं ऐकून आम्ही भारतीय वाटल्याने जवळ बसलेल्या एक वयस्कर बाई आमच्याशी बोलायला आल्या. मूळच्या श्रीलंकेच्या असाव्या. त्या लंडनहून एकट्याच २५ ते २७ अथेन्स बघायला आल्या होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी परत जाणार होत्या. त्यांनी बुकिंग वगैरे कुणाकडून तरी करून घेतलं होतं. २५, २६ ला पर्यटनस्थळं बंद हे त्यांना अथेन्सला आल्यावर समजलं. त्यात २७ ला संप. अक्रोपोलिस पाहण्याच्या इच्छेपोटी त्या आल्या होत्या. पुन्हा कधी ग्रीसला येणंही जमणार नव्हतं. त्यांच्याजागी मला प्रचंड राग आला असता. पण त्यांच्या बोलण्यात फक्त निराशा होती. त्यांना उरलेल्या अर्ध्या दिवसात काय करता येईल याची माहिती हवी होती. पण पर्यटकांना तोंड देताना वैतागलेल्या (पर्यटन खातं संपावर नव्हतं ना!) तिथल्या कर्मचार्‍यांनी काही धड सांगितलं नव्हतं.

लायकाबेटस टेकडीवरून अक्रोपोलिस दिसतं असं आम्ही सांगितलं. पण त्या तिथे गेल्या असताना smog मुळे काही खास दिसलं नव्हतं. त्यांच्याकडे केप सूनिअन आणि बोटीने तीन बेटं पाहणे अश्या दोन सहलींची पत्रकं होती. सूनिअन संपामुळे बंद असणार आणि बेटांची सहल दिवसभराची असल्याने करता येणार नाही, हे सगळं त्यांना समजावलं. अक्रोपोलिस पाहायचं होतं तर अक्रोपोलिस म्युझिअमला महत्त्वाचे अवशेष आहेत ते पाहिले का असं विचारलं. तर इतर म्युझिअम्ससारखं ते म्युझिअम बंद नाही हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना झालेल्या आनंदाने आम्हालाही खूप बरं वाटलं. त्यांच्यामागोमाग आम्हीही तिथून निघालो.

प्राचीन तंत्रज्ञानात कितीही रस असला तरी त्यावेळी उत्साह नव्हता. डोकं शांत करण्यासाठी भर दुपार असली तरी लायकाबेटस टेकडी चढू असा विचार केला.

लायकाबेटस टेकडी

अथेन्सच्या अनेक टेकड्यांपैकी लायकाबेटस टेकडी हे एक पर्यटनस्थळ आहे. या टेकडीवर जायला funicular रेल्वे आहे. पण funicular च्या पायथ्याशी पोहोचायला अर्धीअधिक टेकडी चढणे किंवा टॅक्सी हे दोनच पर्याय आहेत. मेट्रोने टेकडीपाशी जाऊन पायर्‍या चढायला सुरूवात केली. या भागात उच्चभ्रू वस्ती आहे. पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना इमारती, ठराविक अंतरावर पायर्‍यांना भेदून जाणारे रस्ते आणि काही दुकाने, कॅफे वगैरे आहेत. परत येताना पोटपूजा करायला एक जागा हेरून ठेवली. थोडं चढून झाल्यावर पायर्‍यांच्या बाजूच्या कट्ट्यावर थोडं बसलो. आज बहुतेक कॉलेज कट्ट्याची आठवण काढायचा दिवस होता. तेवढ्यात एक हायफाय तरुणी बाजूच्या कट्ट्यावर येऊन बसली. तिच्याजवळच्या भल्यामोठ्या पर्समधून तिने एक पिशवी काढून बाजूला ठेवली. आजूबाजूच्या लोकांकडे तिचं लक्षही नव्हतं. कॉलेजकट्ट्यावर डबा खायचो तसा ही डबाबिबा पिशवीतून काढणार की काय याकडे आमचं लक्ष लागलं होतं. पण त्या मुलीने चक्क पायांतील stiletto heel चे शूज काढले. पिशवीतून सपाट तळ असलेली पायताणं काढून पायांत घातली. stilettos पिशवीत आणि पिशवी पर्समध्ये ठेवून ती पायर्‍या चढायलाही लागली. तिच्या फॅशनप्रति असलेल्या निष्ठेला मनोमन हात जोडले! एकीकडे पावसाळ्यात मुंबईत लोकलने प्रवास करताना छत्री प्लास्टिकच्या पिशवीत आणि पिशवी बॅगेत ठेवणंही आठवलं.

एकदाचं funicular चं तिकिट काढून काही मिनिटांचा प्रवास करून माथ्यावर पोहोचलो. पर्यटक आणि फेरीवाल्यांची गर्दी उसळली होती. वर एक चॅपेल आणि अ‍ॅम्फीथिएटर आहे. पण ही टेकडी प्रसिद्ध आहे ती इथून दिसणार्‍या अथेन्स आणि अक्रोपोलिसच्या नजार्‍यासाठी.

.

लायकाबेटसवरून दिसणारं अक्रोपोलिस

सहलीत आतापर्यंत पाहिलेल्या दृश्यांच्या तुलनेत लायकाबेटसवरून दिसणारं अथेन्स काही विशेष वाटलं नाही. हवासुद्धा स्वच्छ नव्हती. इथून रात्री दिव्यांच्या रोषणाईत अक्रोपोलिस छान दिसतं. आम्ही थोडा वेळ वर थांबून परत निघालो.

त्या दिवशी संध्याकाळी म्युझिअमला जाताना मात्र अक्रोपोलिसने पुन्हा दर्शन दिलं.

.

प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय

 लायकाबेटस टेकडीवरून उतरल्यावर थोडं खाऊन घेतलं आणि प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानासाठी सज्ज झालो.

प्राचीन ग्रीक तंत्रज्ञान प्रदर्शन

प्रदर्शनात The Kotsanas Museum of Ancient Greek Technology या संग्रहालयातील काही प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. या संग्रहालयांतर्गत ऑलिंपिक खेळांमुळे प्रसिद्ध असलेल्या ऑलिंपिया शहरात Archimedes' Museum, जवळच काटाकोलोन या गावी Museum of Ancient Greek Technology आणि पिर्गोस येथे Museum of Ancient Greek Musical Instruments and Toys अशी तीन संग्रहालये चालविण्यात येतात. ही संग्रहालये श्री. कोस्टास कोट्सानास या एका व्यक्तीच्या अभ्यासातून आणि प्रयत्नांतून उभी राहिली आहेत. ग्रीक, लॅटिन आणि अरबी भाषांमधील उपलब्ध साहित्य तसेच प्राचीन अवशेषांचा आधार घेऊन बनविलेल्या प्रतिकृती या संग्रहालयांत आहेत.

हा लेख लिहित असताना श्री. कोट्सानास यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी संग्रहालयाविषयी माहिती तसेच काही फोटो पाठविले, त्यासाठी त्यांचे अनेक आभार! त्यांनी पाठविलेल्या फोटोंबरोबर मी काढलेले काही फोटो लेखासाठी वापरले आहेत.

ग्रीसच्या सहलीची आखणी करत असताना या संग्रहाविषयी वाचलं होतं. एखाद्यातरी संग्रहालयाला भेट देण्याची इच्छा होती. या सहलीत ऑलिंपियाला जाणं होणार नव्हतं. पण निवडक प्रतिकृतींची फिरती प्रदर्शने जगभर भरत असतात, तसंच एक प्रदर्शन अथेन्समध्ये भरलं होतं आणि आमच्या हातात वेळही होता.

हे प्रदर्शन दुसर्‍या एका संग्रहालयाच्या जागेत भरलं होतं. इमारतीच्या आत गेल्यागेल्या हा इ. स. पूर्व सहाव्या शतकातील चिकणमातीचा प्रचंड votive plaque दिसला. सूनिअनच्या अथीनाच्या देवळात मिळालेला हा फलक एखाद्या दर्यावर्दीने नवस फेडायला लावला असावा.

.

प्रदर्शनात प्रतिकृतींची ग्रीक आणि इंग्रजीत सविस्तर माहिती दिलेली होती. संग्रहालयाच्या वेबसाइटवरही अशी माहिती आहे. शक्य तिथे माहितीची लिंक देत आहे, तिथे प्रतिकृतीमागच्या तंत्राबद्दल आणि माहितीच्या स्त्रोताबद्दल वाचता येईल. प्रदर्शनातील काही प्रतिकृती पाहायला सुरुवात करू या ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकातील पुनर्प्रक्षेपण करणार्‍या catapult पासून.

.
The repeating ("polybolos") catapult of Dionysios of Alexandria.
एकामागोमाग एक बाण सोडण्यासाठी याचा उपयोग होत असे.

.
विशिष्ट नाणं टाकल्यावर तीर्थ देणारं vending machine

.
हातात पेला ठेवल्यावर त्यात वाइन किंवा वाइन व पाण्याचे मिश्रण भरणारी सेविका.
पेला मधेच हातातून काढून घेतल्यास वाइन किंवा पाण्यचा प्रवाह थांबतो.

.
आरेखनाची तंतोतंत, लहान वा मोठी नक्कल करणारा अलेक्झांड्रियाच्या हेरोनचा पेंटोग्राफ

.
गुप्त संदेश पाठविण्याची साधने.
फोटोत डाव्या बाजूला वर दाखविलेल्या प्रकाराच्या चामड्याच्या पट्टीचा उपयोग लॅकोनियन लोकांनी युद्धात हरल्यावर स्पार्टाला निरोप द्यायला केला होता.
पर्शियाचा झर्क्सिस ग्रीसवर हल्ला करणार आहे अशी खबर एका स्पार्टनने उजव्या बाजूच्या पाटीसारख्या साधनाने दिली होती.

.
खोक्यात वरच्या बाजूला चौदा भागांनी बनलेला एक चौरस आहे. हे भाग वापरून वेगवेगळे आकार बनविण्याचा खेळ खेळता येतो. त्याचबरोबर हा चौरस म्हणजे आर्किमिडीजने मांडलेली एक गणिती समस्याही आहे.
खालच्या बाजूला "The Polis" (नगर) या नावाचा प्याद्यांनी खेळायचा बुद्धीबळांसारखा खेळ आहे.

..
अँटिकिथिरा मेकॅनिझमची प्रतिकृती

१९०० साली अँटिकिथिरा बेटाजवळ समुद्रात बोटीच्या अवशेषांमध्ये इ.स.पूर्व १२० दरम्यानच्या एका यंत्राचे भाग सापडले होते. अभ्यासाअंती ते एक प्रकारचे गणकयंत्र होते असे लक्षात आले. अँटिकिथिरा मेकॅनिझमविषयी मंदार कात्रे यांचा मिपावर हा धागा आहे.


.
spherical astrolabe of Ptolemy
या दोन हजार वर्षे जुन्या खगोलशास्त्रीय उपकरणाने अक्षांश आणि रेखांश मोजता येत.

.
वजन उचलण्यासाठी ट्रायपॉड क्रेन

.
Hydraulics चा उपयोग करून स्वयंचलन. (इ.स.पूर्व तिसरं शतक)
घुबडाने पाठ फिरवली कि पक्षी किलबिल करतात आणि घुबड पक्ष्यांकडे वळलं कि किलबिल थांबते. या क्रिया सतत न थांबता होत राहतात.

.
Ktesibios चे hydraulic घड्याळ (इ.स.पूर्व तिसरं शतक)
घड्याळावरील छोटी मूर्ती दिवस आणि तास दर्शविते.

.
टिकटिक करणारे आर्किमिडिजचे hydraulic घड्याळ (इ.स.पूर्व तिसरं शतक)

याशिवाय स्वयंचलित नाट्यप्रयोग, अग्निशमनासाठी पाण्याचा पंप, स्वयंचलित कारंजे अश्या अनेक मजेदार गोष्टी होत्या. आम्ही सावकाश एकेक प्रतिकृती बघत होतो. लहानमोठ्या सगळ्यांनाच आवडेल असं प्रदर्शन होतं. आमच्या आगेमागे एक सातआठ वर्षांची फ्रेंच मुलगी आणि तिची आई होती. त्या मायलेकींचं खूप कौतुक वाटलं. ती मुलगी अक्षर लावून हळूहळू इंग्रजी वाचायची. तिला एखादा शब्द अडला तर आई त्या शब्दाचा अर्थ फ्रेंचमध्ये सांगे. तरी कळलं नाही तरच फ्रेंचमधून माहिती सांगत असे.

इमारतीतील छतांवर उत्तम कलाकुसर होती. त्यामुळे छताचे फोटो काढण्याचा मोह होणं स्वाभाविक होतं.

.

.

.

.

प्रदर्शन बघून बाहेर येईपर्यंत अंधार पडायला लागला होता. रस्ता पर्यटकांनी आणि स्मरणवस्तूंच्या विक्रेत्यांनी फुलला होता. अक्रोपोलिसच्या टेकडीला वळसा घालून चालत आम्ही अक्रोपोलिस संग्रहालयाकडे निघालो.

अक्रोपोलिस संग्रहालय

पूर्वी अक्रोपोलिसवरच तिथल्या अवशेषांचं संग्रहालय होतं. पण तिथे जागा अपुरी पडायला लागल्याने पायथ्याशी नवीन इमारत बांधण्यात आली. २००९ साली या आधुनिक इमारतीत संग्रहालय सुरू झालं.

.

नैसर्गिक प्रकाशासाठी इमारत बांधताना काचेचा भरपूर वापर केलेला आहे. इमारतीखालीही प्राचीन वास्तूंचे अवशेष आहेत. त्यामुळे तळमजल्यावर बर्‍याच ठिकाणी खालचे अवशेष दिसतील अशी व्यवस्था आहे.

.

सगळ्यात वरच्या मजल्यावर पार्थेनॉन या मुख्य देवळातील अवशेष आहेत. पार्थेनॉनसारखी या कक्षाची रचना आहे. देवळाच्या खांबांचा आकार आणि त्यांच्यातील अंतर मूळ रचनेबरहुकूम आहे. त्याखालच्या मजल्यावर अक्रोपोलिसच्या इतर महत्त्वाच्या देवळांत आणि इमारतींत मिळालेले अवशेष आहेत. त्याखालच्या मजल्याला उतार दिलेला असून तिथे अक्रोपोलिस टेकडीवर मिळालेल्या वस्तू बघता येतात. या मजल्यावरचे बरेच अवशेष उंचावर असल्याने नीट बघता आले नाहीत. (मी युरोपियनांच्या मानानेही बुटकी नाही. बर्‍याच लोकांना हा त्रास होत असणार.) पार्थेनॉनच्या मजल्यावरही प्रकाशयोजना आवडली नाही. संग्रहालयाऐवजी एखाद्या आर्ट गॅलरीत असल्यासारखं वाटत होतं. एकंदर या संग्रहालयाने थोडी निराशा केली. कदाचित आमच्या मूळ योजनेनुसार आधी अक्रोपोलिस पाहून मग इथे आलो असतो तर जास्त प्रभाव पडला असता.

आम्ही गेलो तेव्हा फारसे पर्यटक नव्हते. त्यामुळे रांग वगैरे न लावता ५ युरोचे तिकिट काढून लगेच आत जाता आले. सुरूवातीलाच अक्रोपोलिसची वेगवेगळ्या कालखंडांतील रचना दाखविणारी मॉडेल्स आहेत. त्यावरून ख्रिस्तपूर्व बाराव्या शतकातील तटबंदी आणि थोडं बांधकाम असं स्वरूप असलेलं अक्रोपोलिस पुढच्या पंधराशे वर्षांत कसं बदलत गेलं हे पाहता येतं.

.इ.स.पूर्व बाराव्या शतकातील अक्रोपोलिस

.इ.स.पूर्व पाचव्या शतकातील अक्रोपोलिस

.इसवीसनाच्या दुसर्‍या ते तिसर्‍या शतकातील अक्रोपोलिस. खालील फोटोत विविध इमारती आणि त्यांची स्थाने दिली आहेत.

.

म्युझिअमच्या मुख्य भागात फोटो काढायला परवानगी नाही. त्याशिवाय पार्थेनॉनचे अनेक महत्त्वाचे अवशेष (Parthenon Marbles) ग्रीसबाहेर, मुख्यत्वे लंडनच्या ब्रिटिश म्युझिअममधे आहेत. त्यामुळे इथे अधिक माहिती देण्यापेक्षा पार्थेनॉनची रचना तसेच अवशेष पाहण्यासाठी The Parthenon Frieze हे ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन बघणे उपयुक्त ठरेल. तिथे खालच्या बाजूच्या उजव्या कोपर्‍यात इंग्रजी भाषा निवडता येईल. जगभर पसरलेल्या अवशेषांचे फोटो तसेच सतराव्या शतकात नष्ट झालेल्या काही शिल्पांची रेखाटने एकत्र करून बनविलेले हे आभासी अ‍ॅप आपल्याला त्रिमितीत वेगवेगळ्या कोनांतून पार्थेनॉन दाखविते.

अथेन्समधील पहिला दिवस संपला होता. आज नाही पण उद्यातरी डेल्फीचं दर्शन होणार का, हे बघायचं होतं!

गूढरम्य डेल्फी १

 प्राचीन काळी ग्रीक संस्कृतीत जगाचं केंद्र मानण्यात आलेली डेल्फी (Delphi)! ग्रीक देव झ्यूसने पृथ्वीचं नाभीस्थान शोधण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशांहून सोडलेले दोन गरूड ज्या ठिकाणी भेटले ती ही जागा. प्राचीन ग्रीकांचं हे सगळ्यांत महत्त्वाचं धर्मस्थळ अथेन्सपासून १८० किमीवर पार्नासस पर्वताच्या (Mount Parnassus) उतारावर वसलेलं होतं. ग्रीसमधील पुरावशेष पाहण्यात रस असेल तर अथेन्स आणि ऑलिंपिया बरोबर डेल्फीची वारी करणे भाग आहे.

अथेन्सहून एका दिवसात डेल्फीची सहल घडविणार्‍या अनेक टूर कंपन्या आहेत. आपल्या डोक्याला त्रास न देता फिरायचं असेल तर तो पर्याय उत्तम आहे. पण या सहलींत डेल्फीजवळच्या एका स्की रिझॉर्टला भेट, तिथे दुपारचं जेवण अश्या गोष्टींत वेळ वाया जातो आणि प्रत्यक्ष डेल्फी बघायला कमी वेळ मिळतो. शिवाय माणशी किमान ९० युरो किंमत. त्यापेक्षा स्वस्तात सार्वजनिक बसने ही सहल करायची असं ठरवलं होतं. आदल्या दिवशीचा संपाचा अनुभव होता, त्यामुळे सकाळी उठून आधी इंटरनेटवर संपाची बातमी वगैरे आहे का बघितलं. बस साडेसात वाजता होती. तयार होऊन पावणेसातला आम्ही निघालो. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टलाही संपाबद्दल विचारलं. तिने संपाची सूचना अजूनतरी मिळालेली नाही म्हटल्यावर जीव थोडा भांड्यात पडला. न्याहारी सातपासून सुरू होणार होती. पण आम्ही डेल्फीला जातोय कळल्यावर रिसेप्शनिस्टने किचनला कळवून आमची खाण्याची सोय केली. तिला दुवा देत थोडंसं खाऊन घेतलं.

हॉटेलबाहेरच टॅक्सी स्टँड होता. टॅक्सी ड्रायव्हरला मात्र आम्हाला कुठे जायचंय ते कळे ना. ग्रीक भाषेत लिहिलेलं बस स्टँडचं नाव आणि पत्ता दाखवला. नकाशा दाखवूनही उपयोग होईना. पुन्हा आत जाऊन रिसेप्शनिस्टशी बोलले. तिलाही तो बस स्टँड माहित नव्हता. तिने इंटरनेटवर शोधल्यावर सगळा उलगडा झाला. कुर्ला टर्मिनस माहित्येय पण लोकमान्य टिळक टर्मिनस माहित नाही असा प्रकार होता. एकदाचे टॅक्सीत बसून स्टँडवर पोहोचलो. संप असेल तर लगेच परत फिरू असा विचार करून बसचं एकेरी तिकिट काढलं आणि डेल्फीचा प्रवास सुरू झाला. साधारण तीन तासाचा प्रवास. बाहेर तसा अंधारच होता. मग मस्त झोप काढली. दोन तासांनी एक छोटा ब्रेक होता. थोडे पाय मोकळे केले. तिथून पुढे डेल्फीपर्यंत डोंगररांगेतून रस्ता जात होता. बाहेरचं दृश्य पाहण्यात छान वेळ गेला.

.

बसमधून उतरायच्या आधी उजवीकडे अवशेषांचं दर्शन झालं. संप वगैरे नव्हता. डेल्फी म्हणजे छोटंसं गावठाण आहे. स्टॉपसमोरच्या कॅफेत बसचं तिकिट मिळतं. लगेच परतीचं तिकिट काढलं. भूक लागली होती, दिवसभरात खूप चालणंही होणार होतं. मग कॅफेतच अंड्याचा पोळा, पाव आणि कॉफी अशी पोटपूजा केली आणि डेल्फी बघायला सज्ज झालो.

तिथून चालत दहा मिनिटांवर प्रवेशद्वार होतं. आजूबाजूला पर्वतराजी आणि दूर समुद्राचं पाणी असा नजारा पाहून प्रसन्न वाटत होतं.

.

इसवीसनपूर्व आठव्या शतकात डेल्फीला महत्त्व प्राप्त व्हायला सुरूवात झाली. इ.स.पूर्व सातव्या शतकात इथे अपोलो आणि अथेना (Athena Pronaia) या मुख्य देवतांची मंदिरे बांधली गेली. डोंगराच्या मध्यभागी बांधलेल्या अपोलोच्या देवळात जाण्यासाठी डेल्फीच्या प्रवेशद्वारापासून Sacred Way नावाचा मार्ग होता. देवळाच्या मागच्या बाजूला नाट्यगृह (theatre) आणि त्याच्या मागे आणखी उंचावर क्रीडांगण (stadium) होते. या दोन ठिकाणी ऑलिंपिक खेळांसारखे Pythian Games भरवले जात असत.

.संग्रहालयातील अपोलोच्या देवस्थानाचा आराखडा

अपोलोच्या देवळातील मुख्य पुजारिणीला (High Priestess) पिथिया (Pythia) म्हणत असत. भविष्यवेत्ती (Oracle of Delphi) म्हणून पिथियाची हळूहळू ख्याती होत गेली. अपोलो पिथियाच्या माध्यमातून दैवी संकेत देतो अशी श्रद्धा होती. या ओरॅकलचा सल्ला घेण्यासाठी भेटवस्तू घेऊन सर्वसामान्य लोक येत तसेच वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधीही येत असत. धार्मिक आणि राजकीय महत्त्व वाढत गेले तशीच अपोलोच्या देवस्थानाची संपत्तीही. अनेक नगरराज्यांनी इथे porticoes बांधले, पुतळे उभारले. देवाला समर्पित केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा युद्धातील विजयाचे प्रतिक म्हणून treasuries बांधल्या. ओरॅकलची कीर्ती या काळात सर्वदूर पसरली होती. वैभवाच्या शिखरावर असताना डेल्फीतील अपोलोच्या देवळाचा परिसर कसा दिसत असेल याची कल्पना या चित्रावरून येते.

.

त्या २,७०० वर्षे पुराण्या वैभवाच्या खुणा काही इमारतींच्या आणि वस्तूविशेषांच्या रूपात अजूनही शिल्लक आहेत. जिथे फक्त इतस्ततः विखुरलेले दगडधोंडेच उरले आहेत तिथेही गतवैभवाचं चित्र डोळ्यांसमोर सहज उभं राहतं. डेल्फीचे अवशेष दोन भागांत आहेत. एका बाजूला डोंगरउतारावर मुख्य अवशेष आणि वस्तुसंग्रहालय आहे. हा भाग आम्ही आधी पाहणार होतो. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला दूर डोंगराच्या पायथ्याशी अथेनाच्या sanctaury चे आणि इतर इमारतींचे अवशेष अस्पष्ट दिसत होते.

.

प्रवेशद्वारातून आत जाऊन थोडं चालल्यावर अपोलोच्या sanctaury च्या परिसर समोर आला.

.

अपोलोच्या sanctaury त एक फेरफटका मारून येवू!

.Treasury of the Athenians: सुस्थितीत असलेली डेल्फीतील महत्त्वाची इमारत

.

.इ.स.पूर्व सहाव्या शतकात अपोलोच्या देवळाला आधार देण्यासाठी बांधलेली polygonal भिंत. मागे देवळाचे खांब आणि पुढे Stoa of the Athenians चे अवशेष आहेत. अथेनियन्सनी युद्धात, विशेषतः पर्शियन्सकडून, लूटलेल्या आणि देवाला अर्पण केलेल्या वस्तू Stoa या इमारतीत ठेवत असत. पर्शियाच्या झर्क्सिसला एका लढाईत हरवल्यावर अथेनियन्सनी ही इमारत बांधली.

.

.देवळाचा परिसर

.

.

.परिसरातील एका खांबावरील लेख

.मुख्य देऊळ

.उंचावरून दिसणारं पार्नासस पर्वताच्या कुशीत वसलेलं अपोलोचं देऊळ

.

.थिएटर आणि त्याखाली देवळाचे अवशेष

थिएटर बघून एक चढण चढल्यावर स्टेडियमपाशी आलो. इ.स. पूर्व पाचव्या शतकात इथे एक racing track बनविण्यात आला, प्रेक्षकांना जमिनीवर बसावे लागे. दुसर्‍या शतकात रोमन सम्राट हाड्रियनच्या कार्यकाळात बांधलेलं तीन arches असलेलं प्रवेशद्वार (क्र. २) आणि संगमरवरी आसने अजूनही आहेत.

.स्टेडियमची रचना

.शर्यतीचा १७८.३५ मीटरचा track आणि उजवीकडे arched entrance. साधारण मध्यभागी परीक्षकांची विशेष आसने दिसत आहेत.

.शर्यत संपते ते स्टेडियमचं टोक

आमचीही डेल्फीची अर्धी शर्यत झाली होती. वस्तूसंग्रहालय आणि डोंगर उतरून अथेनाचं देऊळ पाहण्याआधी थोडा श्रमपरिहार केला. समोर दिसणारं डेल्फीचं विहंगम दृश्य साथीला होतंच!

.

गूढरम्य डेल्फी २

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या डेल्फीच्या अवशेषांतील अपोलोच्या मंदिराचा परिसर पाहून झाल्यावर अथेनाच्या मंदिराकडे निघालो. दोनअडिच हजार वर्षांपूर्वी इथे अपोलो आणि अथेना या मुख्य देवतांबरोबर इतर काही देवांचीही देवळे होती. ग्रीक संस्कृतीत नाट्यकला, क्रीडा यांनाही खूप महत्त्वाचं स्थान असल्याने डेल्फीत देवळे आणि त्यांच्याशी संलग्न इतर बांधकामांशिवाय खेळ आणि नाट्यकलेशी संबंधित इमारतीही होत्या.

Gymnasium आणि अथेनाची sanctuary

मागच्या भागात बघीतलेल्या थिएटर आणि स्टेडियमबरोबर डेल्फीत खेळाडूंसाठी राहायला जागा, gymnasium, baths अश्या अनेक सुविधा होत्या. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या अथेनाच्या देवळाकडे जाताना आधी gymnasium दिसले. इ.स.पूर्व चौथ्या शतकात याजागी प्रथम जिम बांधण्यात आले. नंतर इथे नवनवीन सुविधा झाल्या, पुनर्बांधणी करण्यात आली. या जिममध्ये Track and field, कुस्ती, मुष्टियुद्ध यांचा सराव करता येत असे. तरणतलावही होता. वाईट हवामानामुळे बाहेर सराव करणे शक्य नसेल तर बंदिस्त portico ची सोय होती.

.


.

जिम्नॅशियम लांबूनच पाहून डोंगर उतरून अथेनाच्या sanctuary पाशी आलो. प्राचीन काळी अथेन्सहून डेल्फीला येणारे प्रथम अथेनाच्या देवळाशी येऊन पोहोचत. त्यामुळे Athena Pronaia म्हणजे (अपोलोच्या देवळाच्या) आधी असलेली अथेना असं नाव पडलं असावं. या परिसरात असलेले थोलोस (Tholos) प्रकारच्या इमारतीचे दुरूनही दिसणारे तीन खांब हे डेल्फीचे प्रतीक म्हणावे इतके प्रसिद्ध झाले आहेत.

.

.

थोलोस म्हणजे वर्तुळाकार बांधलेली इमारत. ही इमारती जमिनीपासून थोड्या उंचावर असलेल्या गोलाकार पीठिकेवर (podium) बांधलेली असून, पीठिकेवर चढायला काही पायर्‍या असत. डेल्फीच्या थोलोसला पीठिकेवर बाहेरच्या बाजूने बारा डोरिक पद्धतीचे आणि त्यांच्या आत दहा कोरिंथियन पद्धतीचे खांब होते. इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात बांधलेली ही इमारत डेल्फीतील सगळ्यांत वैशिष्ट्यपूर्ण इमारत असली तरी तिचे प्रयोजन काय असावे याबद्दल काहीही माहिती नाही.

.

थोलोसव्यतिरिक्त या परिसरात अथेनाची विविध कालखंडांत बांधलेली देवळे, treasuries, इतर देवतांच्या वेदी होत्या. आता या इमारतींचे विशेष अवशेष उरलेले नाहीत. खाली दिलेल्या दोन चित्रांवरून या परिसराची रचना लक्षात येते.

.देवळाच्या परिसराचे कल्पनाचित्र

.अथेनाच्या sanctuary चा आराखडा
१) इ.स.पूर्व सातव्या आणि पाचव्या शतकातील डोरिक पद्धतीच्या देवळांचा पाया. २) नंतरचे इ.स.पूर्व चौथ्या शतकातील देऊळ. ३) डोरिक पद्धतीने बांधलेली Treasury. ४) Treasury of Massalia; Massalia अर्थात आताचे फ्रांसमधील Marseille येथे त्याकाळी ग्रीक कॉलनी होती.
५) Tholos प्रकाराची इमारत

.अथेनाच्या sanctuary चा परिसर

sanctuary पासून थोड्या उंचावर असलेल्या एका viewpoint वरून हा सगळा परिसर व्यवस्थित दिसतो. निळसर डोंगरांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे अवशेष पाहत तिथे थोडा वेळ रेंगाळलो. मग चढण चढून रस्त्यापाशी आलो. आता जायचं होतं वस्तुसंग्रहालय बघायला.

डेल्फी पुराणवस्तुसंग्रहालय

ग्रीसमधील मुख्य पुरावशेषांच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू जवळच एखाद्या संग्रहालयात मांडून ठेवलेल्या असतात. त्याशिवाय अथेन्सला ग्रीसचं राष्ट्रीय पुराणवस्तुसंग्रहालय आहे, तिथे विशेष महत्त्वाच्या वस्तू पाहता येतात. डेल्फीच्या संग्रहालयातही मंदिरांचे काही अवशेष, पुतळे, देवाला दान केलेल्या किंवा नवस फेडताना दिलेल्या वस्तू इत्यादी ठेवल्या आहेत. त्यातील निवडक संग्रह पाहू.

.
नवसपूर्तीची इ.स.पूर्व आठव्या शतकातील कांश्याची ढाल

.
नवसपूर्तीचं इ.स.पूर्व सातव्या शतकातील कांश्याचं प्राणी कोरलेलं शिरस्त्राण

..
Naxos बेटावरील लोकांनी दिलेली ही संगमवरी Sphinx एका उंच खांबावर असे. खांब आणि स्फिन्क्स मिळून उंची साडेबारा मीटर होती.

.Siphnian Treasury ची इमारत. सिफ्नोस या एका सोन्याचांदीच्या खाणी असलेल्या संपन्न बेटाची ही Treasury

.
Siphnian Treasury मधील एक पुतळा

.सिफ्नियन ट्रेझरी वरील frieze

.सिफ्नियन ट्रेझरी वरील frieze

.सिफ्नियन ट्रेझरीच्या पूर्वेचं ट्रोजन युद्धाचं मुख्य frieze. यात डावीकडे ट्रोजन्सचं रक्षण करणार्‍या आर्टेमिस, अपोलो, झ्यूस इत्यादी पाच देवता आहेत. झ्यूसची प्रार्थना करणार्‍या अकिलिसच्या आईची आकृती नष्ट झाली असून Achaeans च्या रक्षक देवता अथेना, हेरा, डेमेटर त्यानंतर आहेत. इतर भागात युद्धाचं चित्रण आहे.

.
आर्गोसचं जुळं म्हणून प्रसिद्ध असलेले दोन भावांचे इ.स.पूर्व सहाव्या शतकातील पुतळे

.
लाकूड, सोन आणि हस्तिदंत वापरून बनविलेली, बहुधा अपोलोची, मूर्ती

.अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडच्या शिल्पांचं कल्पनाचित्र. पुढच्या दोन फोटोत काही शिल्पांचे अवशेष दिसतात.

.अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडची शिल्पं

.अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडची शिल्पं

.एका भांड्यावर चितारलेला वाद्य वाजवणारा अपोलो

.
तीन नर्तकींचा खांब

.
'Melancholy roman' या नावाने प्रसिद्ध पुतळा

.
'The Charioteer' या नावाने प्रसिद्ध असलेला कांश्याचा १.८२ मीटर उंच पुतळा. हा सारथी चार घोड्यांच्या रथावर आरूढ असावा. पिथियन खेळात रथांच्या शर्यतीच्या एका विजेत्याने या सारथ्यासह रथ अर्पण केला होता.

शेवटी बघू या डेल्फीच्या एका तत्त्वज्ञाने त्याच्या कुटुंबाच्या वतीने अर्पण केलेल्या पुतळ्यांचा समूह. त्यातील वयस्क तत्त्वज्ञाचा पुतळा पूर्ण आहे. बरोबर त्याची मुलगी आणि पत्नी आहे.

.

संग्रहालयात ठेवलेल्या देवाला अर्पण केलेल्या वस्तू, पुतळे, शिल्पांचे अवशेष यांवरून तत्कालीन डेल्फीच्या संपत्तीची आणि प्रभावाची कल्पना येते. दुरून कष्टप्रद प्रवास करून आलेले भाविक ते वैभव पाहून ओरॅकलला भेटण्याआधीच मंत्रमुग्ध होत असतील का, असा विचार डेल्फीचा निरोप घेताना मनात येत होता.

अक्रोपोलिस

प्राचीन कोरिंथच्या भागात लिहिल्याप्रमाणे अक्रोपोलिस म्हणजे खरंतर उंचावर बांधलेली गढी किंवा नगर. त्याअर्थाने अथेन्सचं अक्रोपोलिस एकमेव नसलं तरीही अक्रोपोलिस म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस आणि तिथलं पार्थेनॉन. अथेन्समध्ये फिरत असताना ते आपल्याला कायम खुणावत राहतं आणि अथेन्सच्या गतवैभवाची सतत आठवण करून देत असतं.

आदल्या दिवशी डेल्फीचा प्रवास आणि दिवसभर फिरणं झाल्याने २९ डिसेंबरला सकाळी सावकाश उठून अक्रोपोलिस पाहायचं आणि नंतर निरुद्देश भटकायचं एवढाच कार्यक्रम ठेवला होता. मेट्रोने अक्रोपोलिस स्टेशनपर्यंत आलो. तिथे आमच्याबरोबर मेट्रोतली यच्चयावत जनता उतरली. सगळ्यांना आमच्यासारखंच अक्रोपोलिस बघायचं होतं! त्यात परदेशी पर्यटकांपेक्षा सुट्टीत सहकुटुंब अथेन्सला आलेले ग्रीक्स जास्त होते. दर चारपाच मिनिटांनी मेट्रोने येणार्‍या लोढ्यांमुळे गर्दीत भर पडत होती. ग्रीसमध्ये फिरताना एवढी गर्दी तोपर्यंत पाहिली नव्हती. त्यात अक्रोपोलिसचं एकच, दक्षिणेकडचं प्रवेशद्वार खुलं होतं, सामान ठेवायची सोय बंद केली होती. त्यामुळे गोंधळात भर पडत होती. एकंदर अक्रोपोलिस व्यवस्थित नाही बघता आलं तरी मनोरंजन नक्की होणार असं वाटायला लागलं.

इ.स.पूर्व पाचव्या शतकाच्या सुमारास अक्रोपोलिसमधील महत्त्वाच्या इमारतींचं बांधकाम सुरू झालं. अक्रोपोलिस संग्रहालयात ठेवलेल्या या मॉडेलवरून इसवीसनाच्या दुसर्‍या ते तिसर्‍या शतकात अक्रोपोलिस कसे असेल, याचा अंदाज येतो.

.

दक्षिणेकडून अक्रोपोलिस पाहायला सुरूवात केली की प्रथम लागतं वरच्या फोटोत उजवीकडे असलेलं Theatre of Dionysus. ते पाहून डावीकडे वळून टेकडीला वळसा घालत आपण डावीकडे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या Odeon या दुसर्‍या थिएटरपाशी येतो. त्यानंतर अक्रोपोलिसच्या मुख्य मार्गावर येऊन टेकडी चढली की Propylaea या अक्रोपोलिसच्या प्राचीन द्वारातून अक्रोपोलिसमध्ये प्रवेश करता येतो. अक्रोपोलिस आणि आजूबाजूच्या परिसराची ही चित्रमय झलक.

.इ.स.पूर्व चौथ्या शतकात बांधण्यात आलेलं Theatre of Dionysus

.Odeon of Herodes Atticus हे दुसर्‍या शतकात बांधलेलं बंदिस्त नाट्यगृह. ५ हजार आसनक्षमता असलेल्या या थिएटरची दर्शनी भिंत तिमजली होती. १९५० साली या इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि तेव्हापासून इथे पुन्हा सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. एपिडाउरोससारखंच इथेही एखादा कार्यक्रम बघायला मजा येईल.

.

.अक्रोपोलिसवरून दिसणारं Odeon

.टेकडी चढताना दिसलेलं Temple of Hephaestus आणि खालच्या बाजूला उजवीकडे प्राचीन अगोराचे अवशेष. हे देऊळ पाहायचं मात्र राहून गेलं.

.अक्रोपोलिसच्या संरक्षणासाठी असलेल्या तटबंदीत पश्चिमेला असलेला दरवाजा. याखेरीज नैऋत्येला आणखी एक दरवाजा होता.

.आतल्या बाजूने तट आणि दरवाजा

.तटातून किल्ल्यात शिरल्यावर दिसणारं Propylaea हे महाद्वार. संगमरवरी पायर्‍या चढून आलं की प्रोपिलाइयातून अक्रोपोलिसमध्ये प्रवेश करता येत असे. उजवीकडे उंचावर बांधलेलं अथेना नायकीचं देऊळ, Temple of Athena Nike.

.

.तीनदा कोन्सुल बनलेल्या अग्रिप्पा या प्राचीन काळातील राजकारण्याच्या स्मारकाचे अवशेष. प्रोपिलाइयाच्या डावीकडे असलेल्या या पीठिकेवर काश्याचा चार घोड्यांचा रथ (quadriga) होता. अग्रिप्पाच्या आधी तिथे युमेनसचे स्मारक असावे.

.प्रोपिलाइयाचा दर्शनी भाग

.प्रोपिलाइयाचा दर्शनी भाग

.अथेन्स शहराची देवता (Patron) मानण्यात आलेल्या अथीना पार्थेनॉस (Athena Parthenos) देवीचे Parthenon हे प्रसिद्ध मंदिर.

.पार्थेनॉनच्या दुरुस्तीचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. काम संपल्यावर एकदम नवंकोरं पांढरंशुभ्र पार्थेनॉन दिसेल कि काय, अशी शंका मनात आली.

.इ.स.पूर्व ४४० च्या दरम्यान बांधलेल्या पार्थेनॉनच्या गाभार्‍यात सोनं आणि हस्तिदंतात घडविलेली अथीना देवीची मूर्ती होती. युद्धाच्या वेषात असलेली देवी अथेन्सवासियांसाठी उजव्या हातात Nike म्हणजे विजयश्री घेऊन आली आहे असे मूर्तीचे स्वरूप होते. डोरिक पद्धतीने बांधलेलं पार्थेनॉन नंतरच्या काळात चर्च आणि मशिद म्हणूनही वापरण्यात आलं.

.अक्रोपोलिसवरून दिसणारं सुरुवातीला पाहिलेलं Theatre of Dionysus

.अथेन्समधील आणखी एका देवळाचे अवशेष. इ.स.पूर्व सहाव्या शतकात बांधायला सुरुवात केलेलं Temple of Olympian Zeus हे देऊळ सुमारे साडेसहाशे वर्षांनंतर रोमन सम्राट हाड्रियनच्या काळात बांधून पूर्ण झालं. फोटोत खालच्या भागात रस्त्याच्या शेवटी Arch of Hadrian दिसत आहे. तर वरच्या बाजूला डावीकडे Panathenaic Stadium चा काही भाग दिसत आहे. इ.स.पूर्व ३३० च्या आसपास त्याजागी स्टेडियम बांधण्यात आले. इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात जुन्या स्टेडियमची संगमरवरात पुनर्बांधणी करण्यात आली. एकोणिसाव्या शतकात स्टेडियमची दुरुस्ती करण्यात येऊन १८९६ सालच्या पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचा उद्घाटन आणि समारोप सोहळा तिथे साजरा झाला. अजूनही ग्रीसमधील ऑलिंपियाला प्रज्वलित केलेली ऑलिंपिक ज्योत ऑलिंपिक्सच्या यजमान देशाकडे सुपूर्द करण्याचा समारंभ या स्टेडियममध्ये होतो. अथेन्समधील या काही जागा अक्रोपोलिसवरून पाहण्यात समाधान मानावे लागले.

.टेकड्यांमधे पसरलेलं महानगर. मध्यभागी लायकाबेटस टेकडी दिसत आहे.

.अक्रोपोलिसचा परिसर, उजवीकडे Erechtheion हे देऊळ

.Erechtheion

.अथीनाचं Erechtheion हे देऊळ आधीच्या जुन्या देवळाच्या जागी इ.स.पूर्व ४१० च्या दरम्यान बांधण्यात आले.

.इतर ग्रीक देवळांपेक्षा वेगळं दिसणारं हे देऊळ एका बाजूच्या Karyatides नावाच्या सहा नर्तकींच्या पुतळ्यांमुळे लक्ष वेधून घेतं. मूळचे पुतळे संग्रहालयात असले तरी इथे ठेवलेलेही सुंदर आहेत. या नर्तकींबरोबरच आम्ही अक्रोपोलिसचाही निरोप घेतला.

राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालय

अथेन्स आणि ग्रीसचा निरोप घ्यायची वेळ आली होती. शेवटच्या दिवशी विमानतळाकडे जाण्याआधी सकाळी मोकळा वेळ होता. त्या वेळात काय पाहायचं हा प्रश्नच आला नाही. अथेन्सच्या इतर पुरातन वास्तू आणि अवशेष किंवा बेनाकी संग्रहालय वगैरे बघण्यात रस होता. पण ग्रीसच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाला (National Archaeological Museum, अर्थात NAM) अग्रक्रम होता. डेल्फी वा मायसिनी सारख्या प्रसिद्ध पुरावशेषांजवळही संग्रहालये आहेत, तिथे मिळालेल्या काही वस्तू या संग्रहालयांमध्ये पाहता येतात. परंतु सगळ्यांत महत्त्वाचे पुतळे, भांडी, धातूकाम, दागिने हे राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयात मांडून ठेवलेले आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या संग्रहालयाची निओक्लासिकल शैलीतील इमारत लक्ष वेधून घेते.



 प्रागैतिहसिक, मायसिनिअन, मिनोअन अश्या अनेक विभागांमध्ये पसरलेल्या या संग्रहालयातील काही वस्तूविशेष पाहू.


इ.स. पूर्व २८०० ते २३०० या काळातील नाव आणि लाटांची नक्षी असलेला मातीचा तवा


 

'Thinker' या नावाने प्रसिद्ध नवपाषाण युगाच्या इ.स. पूर्व ४५०० ते ३३०० काळातील चिकणमातीचा पुतळा


रथ कोरलेली इ.स. पूर्व सोळाव्या शतकातील शिळा


मायसिनीच्या थडग्यांत मिळालेले इ.स. पूर्व सोळाव्या शतकातील सुवर्णालंकार. मायसिनीविषयी तिसर्‍या भागात वाचता येईल.


मायसिनीचे सुवर्ण


Mask of Agamemnon म्हणून प्रसिद्ध असलेला मायसिनीचा सोन्याचा मुखवटा.


मायसिनीच्या भित्तिचित्रात दाखविलेली कंठभूषण स्वीकारणारी देवता (इ.स. पूर्व तेरावं शतक)


काही भित्तिचित्रांचे अवशेष


शिश्याच्या इ.स. पूर्व चौदाव्या शतकातील मिनोअन मूर्त्या, डावीकडे नर्तकी आणि उजवीकडे बासरीवादक


ग्रीक भाषेच्या सगळ्यांत जुन्या लिप्यांमधील एक असलेली मायसिनिअन काळातील Linear B लिपी. Pylos (Palace of Nestor), Knossos या काही ठिकाणी Linear B लिपीत लिहिलेल्या मातीच्या पट्ट्या सापडल्या आहेत. फोटोतील वरच्या दोन पट्ट्यांवर तीळ, धणे, जिरं, केशर अश्या मसाल्याच्या पदार्थांच्या नोंदी आहेत. खालच्या एका पट्टीवर कामगारांची आणि दुसर्‍या पट्टीवर तेलाच्या साठ्याची नोंद आहे.


Pylos ला सापडलेल्या या Linear B लिपीतील पट्ट्यांवर मेंढपाळ आणि त्यांच्याकडील मेढ्यांच्या कळपांच्या नोंदी आहेत.


Linear B लिपीतील काही चिन्हे

 मायसिनीअन सोन्याच्या अंगठ्यांचे नमुने. मध्यभागी असलेल्या मुद्रेवर सिंहाचे शिर असलेले यक्ष आसनावर बसलेल्या देवतेला अर्पण करण्यासाठी हातात सुरया घेऊन जात आहेत; आकाशात चक्ररूपी सूर्य आणि चंद्राची कोर आहे. उजवीकडे वरच्या मुद्रेवर नाविकांसह नौका आणि दोन दांपत्ये आहेत.


Cycladic संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या नग्न संगमरवरी मूर्त्या (इ.स. पूर्व २८०० ते २३००). बहुतांशी स्त्री मूर्त्या मिळाल्या असून त्या प्रजननाच्या देवता, अप्सरा यांच्या असाव्या.

Cycladic काळातील पुरुष मूर्त्या शिकारी, योद्धे, वादकांच्या आहेत. त्यातील हार्प वादकाची मूर्ती


Cycladic काळातील भांडी (इ.स. पूर्व २८०० ते २३००). खालचं Kernos नावाचं भांडं पूजेत देवतांना अर्पण करायच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी वापरत.

यानंतरच्या काही दालनांत अप्रतिम शिल्पकला पाहता येते. ग्रीक संस्कृतीतील देवदेवता, पुराणांतील गोष्टींवर आधारित शिल्पे अश्या अनेक कलाकृती मांडून ठेवलेल्या आहेत. यातील अनेक शिल्पे देवांना अर्पण करण्यासाठी घडविण्यात आली होती. तशी माहिती कोरलेली आढळते.

'Artemision Jockey' नावाने प्रसिद्ध झालेल्या या पुतळ्याचे भाग एका जहाजाच्या अवशेषांत मिळाले. इ.स. पूर्व १४० च्या कांस्य पुतळ्यातील छोट्या जॉकीच्या डाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात आसूड असावा.

अथेना देवीचा पुतळा


ग्रीक देवता झ्यूस किंवा पोसायडनचा हा कांस्य पुतळा. उजव्या हातात thunderbolt किंवा त्रिशूळ असावा.


इसवीसनाच्या दुसर्‍या शतकातील Sarcophagus


देवांना अर्पण करण्यासाठी बनविलेल्या या शिल्पात डावीकडे तीन अप्सरा, मध्यभागी हेर्मिस आणि बकर्‍याचे पाय असलेला पान हे देव आणि उजवीकडे अर्पण करणारा अगाथेमेरोस आणि त्याला वाइन देणारा सेवक आहेत. (इ.स. पूर्व ३३०)


ग्रीक शिल्पकलेचा आणखी एक सुंदर नमुना. एका अप्सरेच्या अपहरणाची कथा या शिल्पात दिसते.


कालिमाखोस नावाच्या शिल्पकाराने घडविलेल्या इ.स. पूर्व पाचव्या शतकातील या शिल्पात एक उच्चकुलीन स्त्री हातात धरलेला दागिना पाहत आहे. तिच्या सेविकेने दागिन्यांची पेटी धरली आहे. त्या स्त्रीच्या कुटुंबाच्या अथेन्समधील प्राचीन दफनभूमीतील जागेत हे शिल्प होते.


हॉकीसारखा खेळ दाखविणारे हे शिल्प एखाद्या खेळाडूच्या थडग्यावर असावे.

या प्रचंड कुंभावर देव आणि giants यांच्यातील लढाईचं दृश्य आहे. वरती देव आणि खालच्या बाजूचे giants यांच्या रेषांनी दाखवलेल्या हालचाली, कुंभाच्या आकाराचा केलेला उपयोग अप्रतिम आहे.

Epinetron नावाच्या या कुंभावर नवविवाहिता आणि तिच्याबरोबर देवता दाखवल्या आहेत.

     संग्रहालयाच्या शेवटच्या दालनांमध्ये मिनोअन काळातील पूर्ण आकारातील भित्तिचित्रे आहेत. मिनोअन ही मायसिनिअन संस्कृतीपेक्षा जुनी संस्कृती इ. स. पूर्व २६०० ते ११०० या काळातील आहे. क्रिटी (Crete) बेटावर उगम पावलेली ही संस्कृती तिथून इतर बेटांवर पसरली. अथेन्सला पाहता येणारी मिनोअन भित्तिचित्रे (frescoes) ही मुख्यत्वे सांटोरिनी किंवा थिरा या बेटावरील आहेत. पांढर्‍यानिळ्या रंगसंगतीची घरे आणि सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या बेटावरील अक्रोटिरीचे (Akrotiri) पुरावशेषही पाहण्यासारखे आहेत. इ. स. पूर्व १६२७ साली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने अक्रोटिरीचा विध्वंस केला. पण ज्वालामुखीच्या राखेमुळे काही अवशेष नष्ट होण्यापासून वाचले. त्यातील काही भित्तिचित्रे अथेन्सला पाहता येतात.

मुष्टियुद्ध करणारी मुले (Boxing children fresco)


Antelopes fresco


वसंत ऋतूतील देखाव्याच्या या सुंदर चित्रात (Spring fresco) थिराची ज्वालामुखीजन्य भूमी आणि तिच्यावर उमललेली लाल लिलीची फुले दिसतात.

    प्राचीन इतिहासातील ग्रीसचे स्थान पाहता हे संग्रहालय (इतर काही युरोपीय संग्रहालयांसारखं) प्रचंड मोठं, भारंभार पुतळे आणि पुरातन वस्तूंनी भरलेले असेल असं वाटलं होतं. पण तसं नसून संग्रह बर्‍यापैकी आटोपशीर आहे. वेगवेगळ्या संस्कृतींची उत्तम माहिती दिलेली आहे. प्राचीन संस्कृती आणि अवशेषांत रस असेल तर अथेन्सच्या भेटीत हे संग्रहालय पाहायलाच हवं.

      संग्रहालयातील दोनतीन दालने बंद ठेवली होती, त्यामुळे थोडा विरस झाला. पण एकंदर संग्रहाचा आणि दिलेल्या माहितीचा आवाका पाहता वेळ कमीच पडला. ग्रीसच्या प्राचीन इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील वस्तू पाहताना कधी ओळखीच्या खुणा दिसल्या. तर काही अपरिचित जागांची ओळख होऊन पुढच्या सहलींचं बीज रुजलं.

ग्रीसच्या क्रिटी बेटावरील समारिया घळ (Samaria Gorge, Crete)

अनेक जागांची, देशांचीही आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. जसं ग्रीस म्हटलं कि आठवतो तो निळाशार समुद्र, बेटं आणि अक्रोपोलिससारखे प्राचीन अवशेष. ग्रीस हा युरोपातील पर्वतीय देशांपैकी एक असला तरी पर्यटकांमध्ये ग्रीस ट्रेकिंगसाठी विशेष प्रसिद्ध नाही. याला अपवाद म्हणजे ग्रीसचं क्रिटी बेट. ग्रीसच्या अनेक बेटांपैकी क्रिटी हे आकाराने आणि लोकसंख्येनेही सगळ्यांत मोठं. युरोपातील जुन्या मिनोअन संस्कृतीच्या पुरातन वास्तू, तसेच उत्तर आणि पूर्व किनार्‍यांवरचे सागरी पर्यटन ही इथली मुख्य आकर्षणे. त्याचबरोबर पूर्वपश्चिम पसरलेल्या या बेटावरील पर्वतांमधील गुहा, घळी, घाटवाटासुद्धा भटक्यांना खुणावत असतात.

यावर्षी एप्रिल महिन्यात नवर्‍यासह केलेल्या क्रिटीच्या सहलीत पायी भटकंतीसाठी दिवस राखून ठेवले होते. बेटाच्या पश्चिम भागातील Lefká Óri (White Mountains) अर्थात श्वेत पर्वत असं नाव पडलेल्या पर्वतरांगेतील समारिया आणि इम्ब्रोस घळी पाहण्याचा बेत होता. या घळी दक्षिणेकडे समुद्राच्या दिशेने उतरत जातात. क्रिटी बेटाच्या या भागात फिरायला सार्वजनिक वाहतूक चांगली नाही. स्वतःचं वाहन असल्यास बरं पडतं. मुक्कामासाठी आम्ही फ्रांगोकास्टेल्लो (Frangokastello) हे समुद्रतीरावरचं गाव निवडलं होतं.

समारिया घळ ही क्रिटीच्या डोंगरवाटांमध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे. १३ किलोमीटर लांबीचा समारियाचा ट्रेक साधारणतः मे ते ऑक्टोबर महिन्यांत पर्यटकांसाठी खुला असतो. बहुतेक पर्यटक उत्तर टोकाहून ट्रेक सुरू करून दक्षिण टोकाला पोहोचल्यावर तिथून ३ किमीवर समुद्रकिनारी असलेल्या अगिया रोमेली (Agia Roumeli) गावी येतात. तिथून फेरी बोटीने सोवगिया (Sougia) किंवा स्फाकिया (Hora Sfakion) ला (फेरी बोट, पोहणे किंवा चालणे हेच उपलब्ध पर्याय!) जाऊन पुढचा प्रवास करता येतो.

समारियाचं उत्तर टोक समुद्रसपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. यातला बराच उतार ट्रेकच्या सुरुवातीला असल्याने हा ट्रेक तसा कठिण आहे. या तीव्र उतारानंतरचा घळीचा भाग अधिक सुंदर आहे. त्यामुळे दक्षिण टोकाकडून सुरुवात करून तुलनेने सोपा अर्धा ट्रेक करून परत येणे हा उपाय माझ्यासारख्या थोड्या आळश्यांसाठी आहेच. अर्थात यात अंतर खूप कमी होत नाही आणि दोनदा फेरी बोट घ्यावी लागते.

हिवाळ्यानंतर घळीतलं पाणी कमी झालं की वाटेची डागडुजी करतात. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यापासून समारियाचा दक्षिणेचा भाग खुला होतो, असं जालावर वाचलं होतं. २०१७ ची तशी बातमीही वाचली होती. त्यात गेल्या हिवाळ्यात पाऊस जास्त पडला नसल्याने एप्रिल महिन्यात खालचा अर्धाअधिक भाग नक्की पाहता येईल असं वाटत होतं. ट्रेक नाही करता आला तर समुद्रमार्गे छान सहल झाली असतीच.

Heraklion या क्रिटीच्या मुख्य शहराहून १६ एप्रिलला निघालो आणि फ्रांगोकास्टेल्लोला येऊन पोहोचलो. समुद्रतीरी असलेल्या कॅसलमुळे गावाला हे नाव पडलं आहे. चौदाव्या शतकात वेनिशिअन्सनी बांधलेल्या या आयताकृती गढीच्या बाहेरच्या भिंती आणि चार कोपर्‍यांवरचे बुरुज तेवढे सुस्थितीत आहेत.

.

.

फ्रांगोकास्टेल्लो छोटंसं निवांत गाव आहे. मोठ्या रिसॉर्ट्ससारखी इथे पर्यटकांची गर्दी नाही. अर्थात काही न्याहारीनिवास आणि लहान हॉटेल्स सोडल्यास इथे फार सोयीही नाहीत. आजूबाजूच्या इतर गावांचीही हीच कथा आहे. क्रिटीच्या या भागात बरेच पर्यटक हानियाहून (Chania) एका दिवसाच्या सहलीसाठी येतात. अनेक टूर कंपन्यांच्या समारिया, इम्ब्रोससाठी तश्या सहली आहेत. आम्हाला दोन्ही ठिकाणी जायचं असल्याने तिकडे राहणं जास्त सोयीचं होतं.

आम्ही बुकिंग केलेल्या निवासात पोहोचलो तर तिथल्या मालकिणबाईंचं म्हणणं पडलं की आज काही कोणी नवीन गेस्ट येणार नाहियेत, तुमचं इथे बुकिंग नसेल!! त्यांच्याच नावाने आलेली इमेल बघायलाही तयार नव्हत्या. त्या आम्हाला कटवायलाच बघत होत्या. त्यांच्या हेकटपणामुळे डो़कं तापायला लागलं होतं. पण दुसरी सोय करणं ही सोपं नव्हतं. बाबापुता केल्यावर त्यांच्या रजिस्टरमधे बुकिंगची नोंद शोधायचं नाटक सुरू झालं. शेवटी समोर दिसणारं नाव त्यांना दाखवल्यावर सॉरी म्हणणं दूरच उपकार केल्यासारखी एकदाची किल्ली मिळाली. एवढी वाईट वागणूक ग्रीसमध्ये कधी मिळालेली नाही.

दोनतीन दिवसांच्या मुक्कामात मालकिणबाईंचा नूर बदलला नाही. पण ती कसर त्यांच्या मुलीने आणि वयस्कर यजमानांनी मात्र भरून काढली. त्या दोघांशी मस्त गप्पा झाल्या. मालकिणबाईंच्या यजमानांनी मर्चंट नेव्हीत खलाश्याचं काम केलं होतं. त्यामुळे इंग्रजी छान बोलता येत होतं. भारतातील मुंबई, विशाखापट्टण, कांडला अश्या अनेक बंदरांनाही त्यांनी भेटी दिलेल्या. ती नोकरी सोडल्यावर त्यांना प्रथमच भारतीयांशी बोलायला मिळत होतं, त्यामुळे ते भरभरून बोलत होते. सत्तरऐंशीच्या दशकांतले, जग जवळ येण्यापूर्वीचे त्यांचे अनुभव, आठवणी ऐकायला मिळणं ही पर्वणी होती. हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानातील त्यांचा रस पाहून त्याकाळी कुणीतरी भेट दिलेलं भगवद्गीतेच्या इंग्रजी भाषांतराचं पुस्तकही आम्हाला दाखवलं. मग भारत आणि ग्रीसचे प्राचीनत्व, संस्कृती ते राजकारण, आर्थिक स्थिती अश्या अनेक विषयांवर संध्याकाळी गप्पा रंगत.

समारियाला जाता येईल की नाही, ही शंकाही त्यांनी दूर केली. अर्धा भाग नक्कीच खुला आहे, असं त्यांनी सांगितलं.

समारियाला केलेला भोज्जा

१८ एप्रिलला संपूर्ण ग्रीसमध्ये फेरी बोटी चालवणार्‍यांचा संप होता. समारियासाठी फेरीने जायचं असल्याने १७ ला समारिया आणि १८ ला इम्ब्रोसला जाणं भाग होतं. एप्रिल महिन्यात दिवसाला दोनच फेरी असल्याने १७ तारखेला स्फाकियाहून सकाळी साडेदहाच्या पहिल्या फेरीने अगिया रोमेलीला जाऊन ट्रेक करून संध्याकाळी पाचच्या फेरीने परत यायचं होतं. सकाळची फेरी चुकू नये म्हणून जरा लवकरच न्याहारीला गेलो. पण ग्रीसमध्येही खूपदा सुशेगात कारभार असतो. त्यामुळे व्हायचा तो उशिर झालाच. गाडीने स्फाकियाला आलो तेव्हा फेरी सुटायला पाच मिनिटं होती. धावतपळत जाऊन तिकिट काढलं. समारिया स्पेशल नावाने परतीचं थोडं स्वस्त तिकिट होतं. ते काढताना समारियाला जाता येईल ना असं विचारल्यावर तिथल्या बाईंनी गावापर्यंत जाता येईल असं सांगितलं. पण नक्की कुठलं गाव ते त्या सांगेनात. मनात पाल चुकचुकली. कारण घळीत एक ओसाड पडलेलं समारिया नावाचंच गाव आहे. तिथपर्यंत की अगिया रोमेलीपर्यंत हे कळेना. मागे रांगेत आणखी लोक होते. त्यामुळे जास्त विचारताही आलं नाही.

अगिया रोमेली आणि वाटेतील लोट्रो या गावांसाठी फेरी हेच वाहतुकीचं साधन आहे. त्यामुळे पर्यटकांच्या बरोबरीने स्थानिक लोकही खूप होते. या गावांचं सगळं सामान (एक वॉशिंग मशिन आणि काही फर्निचर दिसलं), भाजीपाला वगैरे फेरीने आणला जातो. (कचर्‍याच्या विल्हेवाटीची सोय नसल्याने तोही लोट्रोत बोटीवर चढवला गेला.) एकदाचं सगळं सामान आणि गाड्या बोटीवर चढल्या आणि बोटीने धक्का सोडला.

पुढचा वेळ खारी हवा खात आणि किनारपट्टी बघत मजेत गेला. वाटेत लोट्रोला थांबा होता. इथे बरेच लोक उतरले. डोंगर आणि समुद्राच्या मधल्या टिचभर जागेत असलेलं हे गाव पर्यटकांत प्रसिद्ध व्हायला लागलं आहे. स्फाकिया, लोट्रो आणि रोमेलीला जोडणारी समुद्राच्या कडेने जाणारी वाट आहे. मी तेवढी जीवावर उदार झालेली नसल्याने तो ट्रेक करायची कल्पनाही मनात आली नाही.

.

अगिया रोमेली जवळ आलं आणि समारियाचे डोंगर दिसायला लागले. थोडं धुकं होतं, तरीही भव्यता नजरेत भरत होती. गावापासून घळीपर्यंत बरंच चालत जावं लागतं. बोटीतून उतरल्यावर कोणत्या दिशेने जायचं हे कुणी सांगायची गरज नव्हती. ट्रेक करायला़ आलेल्या इतर प्रवाश्यांप्रमाणे आम्हीही गावाकडे न जाता घळीच्या दिशेने चालायला सुरूवात केली.

.

बरोबर थोडा कोरडा खाऊ होता. पण आणखी काहीतरी खायला घ्यायचं होतं. वाटेतल्या एकमेव सुरू असलेल्या हॉटेलच्या उपहारगृहातही सँडविच वगैरे बरोबर नेण्यासारखं काही नव्हतं. जेवणात वेळ घालवायचा नव्हता. फार भूकही नव्हती. मग एका ऑम्लेटची ऑर्डर दिली. कुक कम मालकिणबाई किचनकडे वळल्या आणि मालकांशी बोलणं सुरू झालं. ट्रेक करून संध्याकाळच्या फेरीने परत जायचंय, म्हणून आम्ही घाईत आहोत कळल्यावर त्यांनी समारियाचा ट्रेक अजूनही बंद असल्याचं सांगितलं. ट्रेकसाठी येणारे लोक रोज निराश होऊन परत जात होते.

असं व्हायची शक्यता गृहित धरलीच होती. आता काय हातात बराच वेळ होता. हे हॉटेल थोडं उंचावर बांधलेले होतं, त्यात आम्ही पहिल्या मजल्यावर टेरेसवर बसलो होतो. त्यामुळे समोर थोडा दूर समुद्र आणि डावीकडे डोंगर आणि उंच कडे असं मस्त दृश्य दिसत होतं. तेवढ्यात आलेल्या ऑम्लेटची चव चाखली आणि आणखी एक ऑम्लेट आणि संत्र्याच्या रसाची ऑर्डर दिली. खाऊन झाल्यावर कॉफी पित निवांत गप्पा मारत बसलो. मालकही आले मग गप्पा मारायला. त्यांनी आधी सैन्यात आणि मग बोटीवर काम केलं होतं. त्यांनाही भारताबद्दल उत्सुकता होती. आम्हाला एवढं लांब आलोय तर किमान समारियाचं बंद गेट तरी बघायचं होतं. म्हणून शेवटी तिथून निघालो. मालकांनी परत जाताना त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला यायचं आग्रहाचं आमंत्रण दिलं. शिवाय बरोबर पिशवीत घालून चार संत्री दिली. का? तर आम्हाला यायला वेळ नाही मिळाला किंवा नेमके ते तेव्हा बाहेर गेले तर कॉफी प्यायची राहून जाईल. त्यांचा आग्रह मोडवेना. कॉफी प्यायला नक्की येऊ असं सांगून निघालो.

छोट्या का असे ना ट्रेकची सुरूवात झाली. व्यवस्थित दगडात बांधलेली वाट होती. दहाएक मिनिटांनी वाट नदीच्या कडेने जायला लागली. पाणी अगदी कमी होतं. पाण्यापलीकडचा ताशीव कडा मात्र अंगावर येत होता.

.

.

मधेच काही घरं लागली. कुंपणांच्या आड जुने ऑलिव्हचे वृक्ष होते. जागा मिळेल तिथे फुलं फुलली होती. आता हलका चढ सुरू झाला होता. थोडं पुढे एका चर्चचा बोर्ड दिसला. डोंगराच्या कपारीत लहानसं चर्च होतं. एवढी जागा असताना तिथे चर्च का बांधलं असेल कुणास ठावूक!

.

.

घळीची रुंदी कमी होऊ लागली आणि एकदाचं समारियाच्या बंद गेटपाशी येऊन पोहोचलो. माहितीचा बोर्ड लावला होता. आत तिकिट खिडकी दिसत होती. गेटबाहेर एक कॅफे आहे, तिथे साफसफाई सुरू होती. उगाच दमल्यासारखं करून जरा वेळ बसलो. थोडे फोटो काढले आणि तिथून निघालो.

.

.

.

.

रमतगमत ठरल्याप्रमाणे कॉफी प्यायला गेलो. गोडसर चवीचा पाव, आम्ही एराक्लिओनहून आणलेल्या कुकीज आणि कॉफी बरोबर पुन्हा गप्पा रंगल्या. क्रिटी बेटावर पर्यटनाला कशी सुरूवात झाली, वेगवेगळ्या देशांतील पर्यटकांच्या तर्‍हा, आमचे युरोपातील अनुभव, युरोपियन युनिअन, ग्रीसचं अर्थकारण असे एकेक विषय निघत होते. पाय निघत नव्हता, पण फेरीच्या वेळेआधी निघणं भाग होतं.

धक्क्यावर गर्दी बरीच होती. पाच वाजता एक बोट आली, ती अगदी लहान होती. बोटीपाशी गेल्यावर कळलं ती आमची बोट नव्हती. धक्क्यावर लाटांचं पाणी उसळत होतं. लाटांचा अंदाज घेऊन आम्ही दोघं आणि आणखी दोनतीन जण परत जात असताना नेमकी पोटातली लाट आली आणि भिजवून गेली. बेटावर येऊनही समुद्रस्नान व्हायचं होतं ते झालं एकदाचं. बुटात पाणी भरलं होतं. ते काढून वाळत ठेवले. बोटीचा पत्ता नव्हता, बोटीशिवाय तिथून निघायचा दुसरा मार्ग नव्हता. बायको आहे लक्ष द्यायला म्हटल्यावर नवर्‍याने मस्त झोप काढली. दीस तास उशिराने बोट आली. तोपर्यंत आधी वाट पाहणं, मग त्रागा, फेरी कंपनीवरचा (आणि नवर्‍याला झोप कशी लागते याचा) राग, थोडीशी काळजी, मग आपल्या हातात (नवर्‍याची झोपमोड करण्याशिवाय) काहीच नाही हा हताशपणा अशी स्टेशनं घेत मन जगन्मिथ्या पर्यंत पोहोचलं होतं :)

परतीच्या प्रवासात सकाळी धुक्यात दडलेले डोंगर बघण्यात वेळ गेला. क्वचित कुठे एखादी पुळण दिसत होती, मोठे बीच नव्हतेच. स्फाकियाला उतरून गाडीने कास्टेल्लोला आलो.

.

.

.

एक लांबलचक दिवस संपला. त्याआधी रूममधून हॉटेलच्या पाळलेल्या कुत्र्याने कपडे पळविण्याचं उपनाट्यही घडलं. ट्रेक करता आला नाही तरी या आठवणींमुळे समारिया लक्षात राहील.

ग्रीसच्या क्रिटी बेटावरील इम्ब्रोस घळ (Imbros Gorge, Crete)

गेल्या भागात लिहिल्याप्रमाणे समारियाचा ट्रेक करणं शक्य झालं नव्हतं. परंतु वर्षभर खुली असणारी इम्ब्रोसची घळ बघता येणार होती. हिवाळ्यात तर समारिया बंद असतेच, शिवाय इतर वेळीही पाऊस पडल्यास किंवा उष्मा वाढल्यास समारिया बंद ठेवतात. अश्या वेळी टूर कंपन्या समारियाऐवजी इम्ब्रोसला घेऊन जातात. इम्ब्रोसचा ट्रेक समारियापेक्षा छोटा व सोपा आहे. घळीत पाणी क्वचितच असतं. इम्ब्रोसला जाण्यासाठी रस्ता आहे, फेरीची गरज नाही. अश्या अनेक कारणांमुळे क्रिटी बेटावर समारियाखालोखाल लोक इम्ब्रोसचा ट्रेक करतात.

पण याचा अर्थ असा नाही की दुधाची तहान ताकाने भागवायची म्हणून इम्ब्रोसला जायचं! इम्ब्रोसची घळही अतीव सुंदर आहे. त्यात वसंत ऋतूत तर रानफुलांचाही साज बघायला मिळतो.

फ्रांगोकास्टेल्लोहून स्फाकियाला जाताना थोडं अलीकडे कोमिताडेस (Komitades) गावापाशी इम्ब्रोसचं पार्किंग (नकाशातील IMBROS Tawerna) आहे. आदल्या दिवशी स्फाकियाहून परत येताना ही जागा बघून ठेवली होती. तिथून जवळच घळीचं खालचं दक्षिण टोक आहे आणि रस्त्याने गेल्यास १३ किलोमीटर अंतरावर उत्तर टोक आहे. दोन्ही दिशांनी ट्रेक करायचा नसेल तर या १३ किलोमीटरच्या रस्त्यावर खाजगी टॅक्सी आहेत. खरंतर हे पिकअप ट्रक असतात. पुढे बसायला मिळालं तर ठिक, नाही तर मागे मोकळ्या जागेत हवा भरलेल्या गादीवर बसावं लागतं. अर्थात खूप जणांना असा प्रवास आवडतही असेल!

.

१८ एप्रिलला सकाळी आरामात खाऊनपिऊन नवरा आणि मी निघालो. फेरीच्या वेळेचं वगैरे बंधन नव्हतं. इम्ब्रोसच्या पार्किंगमध्ये गाडी लावली. तिथून टॅक्सीने वर जायचं आणि घळ उतरून परत यायचं असं आम्ही ठरवलं होतं. टावेर्नापाशी टॅक्सीचा बोर्ड होता, आत जाऊन चौकशी केली. आणखी दोन मुलं तिथे कॉफी पित होती. त्यांचं आवरलं की एकत्र जाता येणार होतं. एकूण चारच जण असल्यामुळे सगळ्यांना बसायला जागा मिळाली. पंधरावीस मिनिटांत निघालो. ड्रायवर म्हणजे एक नमुनेदार व्यक्तिमत्त्व होतं! साठच्या आसपास वय असेल. त्या घाटरस्त्याचं हरेक वळण अंगात भिनलेलं असणार. एक हात खिडकीवर आणि दुसरा हात स्टिअरिंगवर ठेवून रस्त्याच्या मधोमध घाटात सुसाट गाडी चालवली. जोडीला मोठ्याने, पण सुरात कोणतंतरी ग्रीक लोकगीत म्हणणं चाललं होतं. समोरून घाट उतरणार्‍या गाड्या येत नसत्या तर गाण्याचा आनंद घेता आला असता!

.

.

हवा स्वच्छ असती तर वळणावळणाचा रस्ता आणि घाटाच्या तळाशी समुद्र असं मस्त दृश्य दिसलं असतं. एकदाचा चढ संपला. घळीच्या उत्तर टोकापाशी उतरलो. इथे थोडं पुढे इम्ब्रोस गाव आहे. याच नावाचं एक गाव तुर्कस्तानात आहे म्हणे. कोणे एकेकाळी दोन भावांना तिथून हाकलून दिल्यावर ते इथे डोंगरात येऊन राहिले आणि पुढे त्या जागेला आणि घळीला इम्ब्रोस नाव पडलं.

टॅक्सीला निरोप दिला. बरोबर आलेली मुलं तिथेच सावलीत बसली. आम्ही उजवीकडच्या पाऊलवाटेने चालायला सुरूवात केली.

.

.

.

.

लगेचच तिकिटखिडकी लागली. उन्हाळ्यात अडिच युरोचं तिकिट आहे. पण आम्ही गेलो तेव्हा खिडकी बंद होती. तिथे ग्रीक, इंग्रजी आणि चक्क जर्मन भाषेत बोर्ड लावला होता. बोर्डावर लिहिल्याप्रमाणे एकूण ८ किमी चालायचं होतं. त्यात चढ जवळजवळ नव्हताच, एकूण ६०० मीटर उतरण होती. दगडधोड्यांमधून वाट काढलेली असली तरी हा ट्रेक कठिण नाही. कुठे झाडांची सावली तर कुठे कडेकपारींनी अडवलेलं ऊन यामुळे भरदुपारीही उन्हाचा त्रास होत नाही. बरोबर पुरेसं पाणी आणि खाऊ मात्र हवा.

.

.

.

सुरुवातीला अंतर राखून असलेले डोंगर जवळ येऊ लागले तशी वाट अरुंद होऊ लागली. उंच कड्यांच्या मधून गेलेल्या अश्या चिंचोळ्या वाटेसाठी इम्ब्रोस प्रसिद्ध आहे. अचानक कुठे मोकळी जागा आणि उतारावर scree लागत होती.

.

.

.

वाटेत हे झाड आडवं आलं. ते प्रेमाचा भार सहन न होऊन उन्मळून पडलं की प्रेमवीरांनी त्याला आधार दिला, कुणास ठाऊक!

.

आता घळीचा सगळ्यात अरुंद भाग लागला. इथे कड्यांमधलं अंतर दिड ते दोन मीटर आहे. इथे उनसावल्यांचा खेळ बघत थांबावसं वाटत होतं. पण इतरांची वाट अडवणं योग्य नव्हतं.

.

.

.

.

अर्धा ट्रेक झाला असावा. इथे घळ बरीच रुंद होती. डोंगराच्या बाजूला दगडात एक झोपडी बांधलेली होती. तिथे बहुतेक तिकिट तपासनीस असतो. समोर मोकळ्या जागेत हिरवेगार गालिचे पसरलेले होते. इथे थोडा वेळ विश्रांती घेतली.

.

.

आम्ही स्वान्तसुखाय हा ट्रेक करत होतो. पण एकेकाळी दळणवळणाचा हाच मार्ग होता. आम्ही कोमिताडेसहून ज्या रस्त्याने आलो तो रस्ता बांधून होण्यापूर्वी उत्तरेच्या हानिया (Chania) वगैरे ठिकाणांहून स्फाकियाला येण्याजाण्यासाठी इम्ब्रोस घळ पार करावी लागे. त्यामुळे या घळीला ऐतिहासिक महत्त्वही आहे.

दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने क्रिटी बेटावर केलेला हल्ला परतवण्यात दोस्त राष्ट्रांना अपयश आले. माघार घेतलेल्या दोस्तांच्या हजारो सैनिकांना बोटींनी इजिप्तला हलविण्यात आले. उत्तरेला अडकलेल्या सुमारे वीस हजार सैनिकांना चालत स्फाकियाच्या बंदरापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. त्यासाठी एकमेव मार्ग होता इम्ब्रोसचा. मागावर जर्मन सेना होतीच. अनेक सैनिक मृत्युमुखी पडले, कोणी पकडले गेले, तर कोणी डोंगरदर्‍यांचा आश्रय घेतला. त्या सैनिकांचा विचार मनात आला की खिन्नता येते. वीस हजारातील सुमारे तेरा हजार सैनिक स्फाकियाला पोहोचले आणि तिथून इजिप्तला जाऊ शकले. यातले बरेच ANZAC म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे सैनिक होते. क्रिटी बेटाला भेट देणार्‍या अनेक लोकांसाठी इम्ब्रोसला येण्यामागे ही ऐतिहासिक पार्श्वभूमीही असते.

याच बेटावरील साध्यासुध्या लोकांनी पुढच्या काळात केलेला जर्मन सेनेचा प्रतिकारही अतुलनीय होता.

.

.

आता आजूबाजूचे डोंगर पुन्हा दिसू लागले होते. काही ठिकाणी डोंगरांमध्ये नैसर्गिक amphitheater असावं तशी मोकळी जागा होती. दगडांचे प्रकार, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे झालेली झीज दिसत होती. एक बोकड कुटुंबही भेटलं वाटेत.

.

.

.

.

वरच्या फोटोतलं झाड बघितलं कसं गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या करतंय. कुठे खडकात मूळं रोवून उभी झाडं, कुठे अंगावर येणारा उतार आणि कधीही कोसळतील असे पत्थर! घळीचं सुरुवातीचं रूप आणि हे रूप यांत किती फरक होता!

.

.

.

.

ही दगडातली कमान आली म्हणजे बराचसा ट्रेक झाला होता. कमानीच्या डावीकडून वाट जाते. चार पावलं पुढे गेल्यावर वळून पाहिलं तर टेकडीच्या विशिष्ट कोनामुळे कमान दिसेनाशी झाली होती.

.

.

आजूबाजूच्या कड्यांची उंची कमी होऊ लागली होती. आणखी थोडंसं चालल्यावर अचानक घळ संपून बाजूने झीज झालेला डोंगरउतार आणि समोर दगडधोंड्यांचं मोकळं मैदान उरलं होतं.

.

ट्रेकनंतर परतीचा प्रवास नेहमीच जीवावर येतो. गाडीचं पार्किंग गाठलं पण निघायची इच्छा होत नव्हती. तिथल्या कॅफेत थोडा वेळ बसलो. चविष्ट स्फाकियन पाय (स्थानिक चीज भरलेली पोळी, खाताना वरून मध घालतात) खाल्ला आणि फ्रांगोकास्टेल्लोला परतलो.

.

क्रिटी बेटावर भटकून बरेच दिवस झाले. पण तिथल्या डोंगरदर्‍या मात्र आजही साद घालत असतात...

.

नॅक्सोस

पावणे सहाला आम्ही हॉटेल सोडले, हॉटेलच्या कॉफी शॉपमधून मस्तं कॉफी घेतली व तडक चालत ओमोनिया रेल्वे स्थानकावर आलो. पिराऊसला जाणारी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये सोबत असलेले ठेपले व कॉफी असा नाश्ता केला. २०-२५ मिनिटांत पिराऊसला पोहोचलो, स्थानकाच्या बाहेर येताच समोर दिसत होता मोठा समुद्र, अनेक मोठ्या बोटी, क्रुझ. एसकलेटरवरून खाली उतरून आम्ही सामान घेऊन सरळ नॅक्सोसच्या बोटीत चढलो.

.

.

साडे सातला बोट सुटणार होती. पटापट जागा पकडून आम्ही सामान लावले व गप्पा मारत बोट सुटण्याची वाट बघू लागलो. साडे पाच तासांचा प्रवास होता त्यामुले थोडे बोटीत भटकून, थोडं खाऊन आम्ही बसल्या बसल्या झोप काढली ;)

नॅक्सोसला बरोबर साडे बाराला बोट आली, आमच्याबरोबर असंख्य पर्यटक सामान घेऊन उतरले. बाहेर येत असताना डाव्या बाजूला आम्हला खुणावत होता पोर्तारा, संध्याकाळी आम्हाला तिथे जायचेच होते.

.

.

पोर्तारा

नॅक्सोस हे एगीयन समुद्रातील सायक्लेड ग्रुपमधील सर्वात मोठे बेट आहे. नॅक्सोस ची राजधानी छोरा हे सर्वात मोठं शहर आहे , आम्ही एक रात्र छोरामध्येच राहणार होतो. बंदरावर हॉटेलचा माणूस आम्हाला घ्यायला आलाच होता. सामान गाडीत टाकून आम्ही हॉटेलला पोहोचलो. रिस्पेशनवर एक ग्रीक आज्जी होती, तिला इंग्राजी फारसं बोलता येत नव्हतं , पण मोडकं- तोडकं बोलून, हातवारे, खाणा-खुणा करुन तिने आमचे स्वागत केले. भर उन्हाचे आल्यामुळे आम्हा सगळ्यांना तिने आईस्क्रिम ही खाऊ घातले.

.

कुकी क्रिम आईस्क्रिम :)

रुम मध्ये जाऊन , कपडे बदलून आम्ही थेट Agios Georgios बीचवर गेलो, बीच तसा अगदी जवळ होता. मस्तं पांढरी वाळू, निळंशार , स्वच्छ पाणी, अनेक पर्यटकांनी भरलेला हा बीच होता. नॉक्सोसची एका दिवसाची ट्रिप असल्यामुळे आम्हाला तो दिवस निवांत घालवायचा होता. मस्तं २-३ तास आम्ही बीचवर घालवले, मनसोक्तं पोहलो, उन्हं खात बसलो, धम्माल केली. तिथल्या दुसर्या बीच वर अनेक वॉटर स्पोर्ट्स होतात.

.

Agios Georgios बीच

.

Agios Georgios बीच

.

Agios Georgios बीच

हॉटेलवर आलो आणि हॉटेलच्या स्वीमींगपूलमध्ये मनसोक्तं डुंबलो आणि मग मस्तं फ्रेश होऊन फक्कडसा चहा घेतला, सोबत घेऊन गेलेलो घारगे ही हादडले. आवरून आम्ही पोर्ताराचा प्रसिद्ध सुर्यास्त बघायला निघालो. वाटेत आम्हला ग्रीसमध्ये अनेक ठिकाणी दिसणारे पांढर्‍या-निळ्या रंगाचे चर्च दिसले, लगेच कॅमेर्यात टिपून घेतले.

.

पोर्ताराला जाताना वाटेत एका पक्ष्यांचे दुकान लागले , तेथे हे पोपट महाराज पोपटपंची करत होते. त्यांच्या जवळ जाताच कर्कश्य आवाजात ओरडले आणि जसे आपण घाबरुन मागे सरतो तसे महाराज जोर-जोरात हसायला लागतात मात्र फोटो काढु दिला हे ही नसे थोडके ;)

.

पोर्तारा म्हणजे मोठे द्वार. पोर्तारा पॅलेटिया ह्या टेकडीवर बांधले गेले आहे. असे म्हणतात हे अर्धवट बांधलेले मंदिर अपोलो राजाला समर्पित केले होते. ५३० BC मध्ये Lygdamis ने ह्याचे बांधकाम सुरु केले. 506 BC मध्ये Lygdamis ला पदच्युत केले त्यावेळेस त्या मंदिराच्या फक्त भिंतीच तयार होत्या. ५-६ व्या शतकात ह्या मंदिराचे चर्चमध्ये रुपांतर झाले होते. व्हेनेशियन आणि तुर्कींच्या राज्यात ह्या चर्चला तोडून त्याचे संगमरवर किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले गेले होते. ही दाराची चौकट विशाल, भव्य असल्याकरणामुळे ती तशीच राहीली . आयताकृती ह्या दरवाच्याची उंची २६.फी उंच आहे आणि प्रत्येकी सोळा.फी लांब अश्या चार संगरवराच्या ठोकळ्यांनी बनला आहे.

.

.

चालत, फिरत आम्ही बंदरापाशी आलो. हळू हळू आकाशात सुर्यास्ताची लाली पसरु लागली होती. एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे अनेक कॅफे, उपहारगृह.

.

.

आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली, फार उंच नसल्यामुळे चढायला ही कमी वेळ लागला. लोकांची गर्दी ही जमू लागली. सुर्यास्तं बघायला प्रत्येक जण मोक्याची जागा शोधत होतं. हळू हळू सुर्याचे सौंदर्य खुलु लागले.

.

पोर्तारातून दिसणारा प्रकाशदाता

लाल- तांबडा आगीचा गोळा ढगाआड जाऊ लागला तसं तसं आकाशात सोनेरी लाली पसरली. समुद्राचे पाणी ही जणू काही केशर मिसळयासारखे दिसू लागले. हळू हळू सुर्यदेव ढगांखालून बाहेर आला आणि अस्ताला जाऊ लागला. त्याची पिवळट, गुलाबी रंगछटा बघून ते निव्वळ जादूई सौंदर्य आहे असे वाटून गेले. ट्रुअली मेस्मरायझिंग. सुर्याचे असले मोहक रुप ह्या आधी कधी पाहिले नव्हते.

.

.

एकीकडे शांतपणे अस्ताला जाणारा सुर्य स्वतःसोबत कातरवेळेची उदासीनता घेऊन जात होता तर दुसरीकडे चंद्रोदय झाल्यामुळे वातावरणात मस्तं धुंदी पसरली होती. खूप छान, शांत आणि प्रसन्न वाटत होतं.

.

.

पोर्तारा आणि चंद्र

.

पोर्तरावरुन दिसणारं नॅक्सोसचे ओल्ड टाऊन आणि किल्ला.

.

खाली उतरून आम्ही जेवायला गेलो. खाली उतरलो तेव्हा बंदरावरचे दिसणारे मोहक दृश्य.

.

रोस्ट चिकन, फ्रेंच फ्राईज, त्झात्झिकि, पिटा व सॅलॅड.

दुसर्‍या दिवशी दुपारी साडे बाराची बोट होती सँतोरीनीसाठी, त्याआधी म्हटले जरा गावात फेर-फटका मारून येऊ. अकराला हॉटेलचा माणूस आम्हाला सोडायला येणार होता बंदरावर म्हणून त्याआधी आम्हाला फिरुन हॉटेलवर ही यायचे होते. नॅक्सोस गावात एक चक्कर मारून आलो, तिथे एक जुना किल्ला आहे त्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गेलो अजून आत गेलो असतो तर उशीर झाला असता म्हणून तिथून खाली उतरलो. वाटेत काही दुकांनामध्ये सन ड्राईड टोमॅटोज, ग्रीक कॉफी पॉट विकत घेतले. (ते फोटो अंतिम भागात)

.

नॅक्सोस गावात केलेली भटकंती

.

नॅक्सोस गावात केलेली भटकंती

.

किल्ल्या बाहेरील उपहारगृह.

.

.

.

हॉटेलच्या माणसाने आमचे सामान गाडीत टाकले आणि आम्हाला त्याने बंदरावर ड्रॉप केले. एक दिवसाची नॅक्सोसची ट्रिप आम्हाला खूप आवडून गेली, ह्या गावाच्या प्रेमातच पडलो होतो आम्ही.पुन्हा ग्रीसला कधी येऊ तेव्हा इथे नक्कीच यायचे हे ठरवूनच आम्ही तिथून निघालो. साडे बाराला आमची सँतोरीनीची बोट निघाली आणि आम्ही नॅक्सोसला टाटा करत निघालो.

.

संदर्भ :-

१) द स्पार्टन्स - द वर्ल्ड ऑफ द वॉरिअर हिरोज ऑफ एन्शंट ग्रीक्स डिसिजीव बॅटल्स - थर्मापलै - हिस्टरी चॅनेल
विकिवर लिओनायडस प्रतापरावांवरील मटामधील लेख याखेरीज वर्तमानपत्रांतील अनेक लेखांचा संदर्भ. १ चित्रे: सर्व चित्रे विकिपिडीयावरून
२) http://vmoti.blogspot.com/2009/12/blog-post.html 
३) http://vmoti.blogspot.com/2007/04/blog-post.html
४) इंग्रजी विकिपीडियावर पार्थेनॉन, नॅशविलचे पार्थेनॉन, ग्रीक दैवते
५)  http://misalpav.com/node/43222
६)  http://misalpav.com/node/43292



No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...