Thursday, February 4, 2021

फेरफटका सांगली जिल्ह्याचा

 राज्याच्या व देशाच्या राजकारणामध्ये, शेतीमध्ये, व्यापार, उद्योगामध्ये हा जिल्हा कायम अग्रेसर राहिला आहे. सहकारी संस्थांचे मोठे जाळे येथे आहे. द्राक्ष उत्पादनामुळे वायनरी, बेदाणे यांचे उत्पादन आणि निर्यातही होते. हळद, गूळ यांचे उत्पादन व व्यापारही मोठा आहे. सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीमुळे या भागात आर्थिक सुबत्ता आहे. भारतातील सर्वांत कुशल सोने गाळणारे (Gold Refinery) कारागीर येथे आहेत. कृष्णाकाठच्या सुपीक जमिनीमुळे या परिसराला पूर्वापार समृद्धी होतीच. समृद्धी असली, की सुबत्ता येते व त्याच्या बरोबरीने आक्रमणे आलीच. कृष्णेच्या काठावर वसलेल्या सांगलीने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहामनी, आदिलशाही, मुघल, मराठे, संस्थानिक पटवर्धन आणि अखेर इंग्रज अशा अनेक राजवटी पहिल्या. येथे कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, वास्तुरचना, कृषी, अध्यापन, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, संगीत, नृत्य अशा सर्व प्रकारच्या विद्याशाखांमधील शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. सांगलीने अनेक नररत्ने दिली. त्यांची यादी एवढी मोठी होईल, की त्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. अनेक स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, विचारवंत, क्रिकेटपटू, कुस्तीगीर, खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका, संगीतकार, लेखक, कवी, नाटककार, वक्ते, लोकनाट्यकार, उद्योजक आणि कष्टाळू कृषीवल या मातीत जन्मले. 

सांगली हे नाव कसे तयार झाले, याबद्दल वेगवेगळी मते आहेत. कृष्णा नदीच्या काठावर सहा गल्ल्या आहेत. त्यामुळे ‘सहा गल्ली’वरून सांगली झाले असावे असा एक मतप्रवाह आहे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार, कानडी भाषेत सांगलकी म्हणत, म्हणून त्याचे सांगली झाले असावे. मिरज, कुपवाड व सांगली मिळून महानगरपालिका झाली आहे. 
    १६६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. सन १७७२मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी गोविंदराव पटवर्धनांना हा प्रदेश जहागीर म्हणून दिला. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात मिरज सांगलीपासून वेगळे झाले. सन १८०१मध्ये चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली संस्थान स्थापन केले. तेव्हापासून या गावाला महत्त्व आले. चिंतामणरावांनी सांगली येथे सुप्रसिद्ध गणेशदुर्ग बांधला. तसेच कृष्णा नदीच्या काठावर प्रसिद्ध गणेश मंदिर बांधले. 

 जिल्ह्याविषयी

भूगोल

सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव


जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.

कृष्णा, वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणाऱ्या या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून जिल्ह्यातील तिचा प्रवाहमार्ग १३०किमी. आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिम-पूर्व व त्यानंतर वायव्य-आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वारणा, येरळा व अग्रणी या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात. वारणा नदी सांगली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वतश्रेणीतील प्रचितगडजवळ उगम पावते. तिची लांबी १७३ किमी. आहे. उगमानंतर ती शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातून काहीशी दक्षिणेकडे वाहत आल्यानंतर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून (कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांची सरहद्द) प्रथम आग्नेयीकडे व त्यानंतर पूर्वेकडे वाहत जाते. सांगली शहराजवळच हरिपूर येथे ती कृष्णेला मिळते. मोरणा ही वारणेची उपनदी शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात धामवडे टेकडीजवळ उगम पावते. सह्याद्रीच्या दक्षिण व आग्नेय दिशेने पसरलेल्या डोंगररांगांच्या दरम्यानच्या प्रदेशातून दक्षिण व आग्नेय दिशेत वाहत आल्यानंतर शिराळा तालुक्यातील मांगले येथे वारणा नदीला मिळते. काडवी, कानसा, शाली, अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या आहेत.

सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी येरळा ही सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे. पश्चिमेकडील वर्धनगड-मच्छिंद्रगड आणि पूर्वेकडील महिमानगड-पन्हाळा डोंगररांगांमधून प्रथम दक्षिणेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी दक्षिणेस वाहत जाऊन सांगली शहरापासून काही अंतरावर असलेल्या ब्रह्मनाळजवळ ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु.८५ किमी. आहे. येरळा नदीला पश्चिमेकडून नानी नदी व सोनहिरा ओढा, तर पूर्वेकडून कापूर नाला येऊन मिळतो. अग्रणी नदी खानापूर पठारावर बलवडीच्या जवळपास उगम पावते. उगमानंतर सु.३२ किमी. अंतर दक्षिणेस वाहत आल्यानंतर वज्रचौंदे येथून ती आग्नेयवाहिनी बनते. जिल्ह्याच्या बाहेर ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिच्या प्रवाहमार्गाची लांबी सु.८५ किमी. आहे.

माण (माणगंगा) नदी सांगली जिल्ह्याच्या ईशान्य भागातील आटपाडी तालुक्यातून आग्नेय दिशेस वाहते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह फक्त ३५ किमी. इतका कमी असला तरी तिच्या उपनद्या मात्र खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यांचे जलवहन करतात. कोरडा नदी जतच्या जवळपास उगम पावते. उत्तरेस वाहत जाऊन ती जिल्ह्याच्या बाहेर माण नदीला मिळते. माण नदी पुढे भीमा नदीला मिळते. जतच्या ईशान्येस सु. ४ किमी. अंतरावर बोर नदी उगम पावते. या नदीने जत तालुक्याच्या पूर्व भागाचे जलवहन केले आहे. ईशान्येस व उत्तरेस वाहत जाऊन जिल्ह्याच्या बाहेर ती भीमा नदीला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु. ६४ किमी. आहे.

ऐतिहासिक महत्त्वाचे

प्राचीन इतिहास असलेल्या ह्या प्रदेशाने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७७२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यावेळी सांगलीच्या जवळ असलेले हरिपूर हे सांगलीपेक्षाही मोठे गाव होते. त्यावेळी हरिपूरची लोकसंख्या २,००० तर सांगलीची लोकसंख्या फक्त १,००० होती. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर पटवर्धन कुटुंबात अंतःकलह निर्माण झाल्याने मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात मिरज सांगलीपासून अलग झाले. तत्पूर्वी सांगलीचा समावेश मिरज जहागिरीमध्ये होत असे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधील शिराळा तालुक्यातील बिळाशीच्या सत्याग्रहाची नोंद भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात झाली आहे.गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.

स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलिनीकरण करतेवेळी सांगली, मिरज व जत ही संस्थाने सातारा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याने तो जिल्हा आकारमानाने मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला होता. त्यामुळे १९४९ मध्ये तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन उत्तर सातारा व दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. १९६५ मध्ये मिरज व खानापूर तालुक्यांचे विभाजन करून कवठे महांकाळ व आटपाडी असे आणखी दोन तालुके नव्याने निर्माण करण्यात आले. तालुका पुनर्रचनेनुसार १९९९ मध्ये पलूस, तर २००२ मध्ये कडेगाव या तालुक्यांची नव्याने निर्मिती करण्यात आली.

चिंतामणराव पटवर्धन, दादासाहेब वेलणकर, क्रांतिसिंह नाना पाटील, वि.स. खांडेकर, विजय हजारे, विष्णुदास भावे, वसंतदादा पाटील इ. सांगली जिल्ह्यातील थोर व्यक्ती होत ज्या विठोजीराव चव्हाणांनी औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला करून औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणून औरंगजेबाच्या उरात धडकी भरविली, ते विठोजीराव चव्हाण याच जिल्ह्यातील डिग्रजचे. पेशवाईच्या काळात या भागावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. त्यांपैकी चिंतामणराव पटवर्धन यांनी या भागाचा चांगला विकास घडवून आणला. त्यांनी छोटी धरणे, बंधारे व ताली बांधून जलसिंचनाखालील क्षेत्र वाढविले. दुग्धोत्पादनासाठी विविध योजना आखल्या. ग्रामीण विकासासाठी ग्रामोद्योग योजना सुरू केली. श्री गजानन मिल सुरू करण्यासाठी दादासाहेब वेलणकर यांना प्रोत्साहन दिले, तर सांगली येथे साखर कारखाना सुरू करण्यास शिरगावकर बंधूंना मदत केली. शैक्षणिक संस्थांच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे. प्रसिद्घ देशभक्त, झुंझार नेते आणि प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात झाला. प्रसिद्घ क्रिकेटपटू विजय हजारे हे सांगलीचेच. सुप्रसिद्घ मंगेशकर कुटुंबियांचे काही वर्षे वास्तव्य सांगली येथे होते.महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील पदमाळे हे होय.

 विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.

संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.

सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र – मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

 दळणवळण

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.

मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. सांगली हा महत्त्वाचा जिल्हा असल्याने आपल्याला येण्याची जाण्याची सोय चांगली आहे.

 
सांगली परिवहन विभागाचे संपर्क क्रमांक

1 डिव्हीजनल कंट्रोलर सांगली (0233) 2332113 dcstsgl@sancharnet.in
1 डिव्हीजनल ट्रॅफीक ऑफिसर्,सांगली (0233) 2331345
2 डिव्हीजनल अकाउंट ऑफिसर्,सांगली (0233) 233083
3 डिव्हीजनल पर्सनल ऑफिसर्,सांगली (0233) 2332246
4 डिव्हीजनल लेबर ऑफिसर्,सांगली (0233) 2332249

1 डेपो मॅनेजर, सांगली बस स्थानक (0233) 2530648
2 डेपो मॅनेजर, मिरज बस स्थानक (0233) 2222329
3 डेपो मॅनेजर, इस्लामपुर बस स्थानक (02342) 224110
4 डेपो मॅनेजर, विटा बस स्थानक (02347) 272022
5 डेपो मॅनेजर, तासगाव बस स्थानक (02346) 250471
6 डेपो मॅनेजर, आटपाडी बस स्थानक (02343) 221830
7 डेपो मॅनेजर, जत बस स्थानक (02344) 246249
8 डेपो मॅनेजर, कवठेमहांकाळ बस स्थानक (02341) 222055
9 डेपो मॅनेजर, शिराळा बस स्थानक (02345) 272218
 
 सांगलीची खादाडी:-

सांगली हे शहर असले तरी गावाचे 'तितके शहरीकरण' झालेले अजूनतरी बघायला मिळत नाही. छोटेसे व आटोपशीर गाव. नाट्यपंढरी , हळद, गणपतीचे देऊळ , वेशीवरून वाहणारी कृष्णा नदी , हरिपूर संगम इत्यादी अनेक गोष्टी सांगलीचे वैशिष्ट्य अथवा भेट देण्यासारखी ठिकाणे म्हणून विचारात घेत असताच या शहरात एक खाद्यसंस्कृती तयार आहे अथवा अगदी साध्या भाषेत अनेक उत्तमोत्तम व खाण्याची ठिकाणे उपलब्ध आहेत याचा अचानक विचार आला.

हॉटेल चालवून आपण लोकांची मोठी सेवा करत आहोत अथवा हाटेलाबाहेर तिष्ठत बसलेले गिर्हाईक हेच आमचे समाधान किंवा खाण्यालायक काहीही आणि कसलेही द्या खपेल असे प्रकार येथे तसे कमीच दिसतात हेदेखील इथल्या संस्कृती का काय म्हणतात त्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल असे जाता जाता नमूद करतो. असो.

तर खाण्याच्या ठिकाणांची यादी करताना पदार्थवार यादी केली आहे . खालील ठिकाणे व तेथे मिळणारे पदार्थ हे स्वतः व अनेक लोकांकडून टेष्ट ( दोन्ही स्पेलिंग !) झाले असल्यामुळे बऱ्यापैकी खात्री बाळगण्यास हरकत नाही. नमूद केलेली ठिकाणे ही सकाळच्या नाष्ट्यापासून दुपारचे जेवण ते संध्याकाळच्या वेळी खाण्याच्या पदार्थांपासून ते 'दस्त ए साकी में आफताब' येईपर्यंतची यादी आहे.

पोहे :
१. मंजू चे पोहे : वालचंद कॉलेज पाठीमागे / विलिंग्डन कॉलेज समोर गाड्यावर . पोहे व भाजी उत्तम मिळतात. . समांतर : सांगलीत पोह्यांवर सांबार घेण्याची पद्धत आहे. येथे सांबार म्हणजे इडली बरोबर देतात ते नसून मिसळीचा रस्सा
(समजण्यासाठी :शॅम्पल) असतो. कुठल्याही तिखट पदार्थात ( उदा तांबडा रस्सा , मटन वगैरे ) तिखटाची भुकटी वापरात नाहीत . त्यामुळे खान्देशी वगैरे तिखट खाऊन जी जळजळ आणि आग होते तसे न होता तिखटाचीही चव घेता येते.
२. गणेश नाष्टा सेंटर. विश्रामबाग. ( येथील जवळपास सर्वच पदार्थ चांगले असतात . मात्र पोहे , उप्पीट , पायनॅपल शिरा, वडा सांबार उत्तम )
३. हळद भवन. ( ब्रेड उसळ /चिवडा , पोहे , वडा सांबार इत्यादी )
४. पहाटे ४ वाजता स्टेन्ड समोर गाड्यावरील पोहे.
५. हॉटेल पैप्रकाश: विश्रामबाग चौक ( मसाला टोस्ट खाऊन पहाच .)
६. प्रभू प्रसाद : बापट बाल शाळेसमोर ( वडा सांबार . यांच्याकडे थोडेसे रस्सम सारखे सांबार /सॅम्पल मिळते. )
७. के टी नाश्ता सेंटर : एसटी स्टॅन्ड जवळ ( वडा सांबार , पोहे ).
मिसळ या पदार्थास दुर्दैवाने सांगलीत तितका न्याय मिळाला नाही मात्र वडा सांबार मिळणाऱ्या जवळपास सर्वच ठिकाणी मिसळ चांगली मिळेल .
८ . थोडे लांबी जायची तयारी असल्यास अंकली फाट्यावर जैन वडा व अरिहंत वडा येथे वडा सांबर नक्की खाऊन पहा.
९. एन डिज : होंडा शो रूम शेजारी व काळ्या खणी शेजारी ( दूध कोल्ड्रिंक . कॉफी बियर. माझ्या माहितीत कॉफी बियर सांगली सोडून कुठे मिळत नाही)
उसाचा रस वगैरे प्यायचा झाल्यास सगळीकडेच उत्तम मिळतो . कुठेही प्या .

दुधाचे सर्वच पदार्थ हे येतील खास वैशिष्ट्य . सांगलीचेच असलेले चितळे बंधू यांच्या पदार्थाना येथे खूपच कमी मागणी आहे व खूप मोजक्याच दुकानांत त्याचे पदार्थ मिळतात. का ? सुज्ञास सांगणे नलगे .
१. रामविश्वास दुग्धालय :वसंतदादा समाधीमागे ( सर्वच पदार्थ अतिउत्तम . त्यातही बासुंदी व आम्रखंड हे अप्रतीम. सांगलीबाहेरही प्रचंड मागणी .).
२. मंगल मिठाई : मारुती चौक ( पेढे व कलाकंद अप्रतिम )
३. बसाप्पा : मारुती चौक ( गुलाबजाम , अंगूर मलई व अनेक पदार्थ. )
४. सीरवी बंधू : राममंदिर चौक ( ढोकळा , जिलबी कचोरी वगैरे पदार्थ चांगले मिळतात ).
५. सांगलीजवळ कुरुंदवाड व नरसोबावाडी येथेही बासुंदी उत्तम मिळते . दाट व सायीसकट मिळणारी बासुंदी .

संध्याकाळनंतर भेळेचे अनेक गाडे सुरू होतात. तसेच चायनीज ( भारतीय चायनीज) ची छोटी मोठी हॉटेल्स ही चालू होतात. सांगलीत ज्या दर्जाचे चायनीज मिळते तसे मी अन्य कुठल्याही शहरात खाल्याचे आठवत नाही. तरीही कोणत्या चायनीज हॉटेल मध्ये काय खावे हे नमूनेदाखल देत आहे .
१. संभा भेळ : वखारभाग.
२. स्टार भेळ : पंचमुखी मारुती रोड सुरुवात
३. प्रतापसींह उद्यानासमोरील भेळेचे गाडे.
४. क्रांती भेळ : विश्रामबाग ( चायना हट शेजारी ) ( भेळ ,थालीपीठ, शेवपुरी ,पावभाजी वगैरे छान मिळते .)
५. चिकन ६५ चे अनेक गाडे आता चालू झाले आहेत तरीही एस्टी स्टेन्ड येथील कैफ चिकन व पुष्कराज चौक येथील श्रावणी चिकन या गाड्यांवर मस्त चिकन ६५ व सीजन मध्ये एकदम ताजे सुरमई /बोंबील मिळतात.
६. चाइना हट : विश्रामबाग ( क्रांती भेळ शेजारी ) ( सर्वच चायनीज पदार्थ जबरदस्त. येथील चायनीज चे अक्षरशः व्यसन लागते )
७. कॉलेज कॉर्नर ला चायनीज चा एक गाडा असतो तेथे फक्त 'चायनीज भेळ' हा पदार्थ खावा .
८. हॉटेल बावर्ची. प्रताप टॉकीज मागे
९ आनंदराव यांचा गाडा : १०० फुटी सुरुवात ( अंडा पेटीस , भुर्जी . एकदा गाड्यासमोरून निघाला की दरवळनाऱ्या वासामुळे काहीतरी खाऊन जाणारच.)
१० . हॉटेल हनुमान ( विश्रामबाग) : डोश्यांसाठी उत्तम ठिकाण .
११. पैप्रकाश राममंदीर चौक ( सीझलर्स चांगल्या मिळतात. अजूनही वाजवी किंमत ).
१२. एन डिज होंडा शो रूम शेजारी : ( येथे चायनीज गाड्यावर व्हेज मंचुरियन खावे) तिथेच टोस्ट चा गाडा देखील आहे त्याच्याकडील टोस्ट खाणे .
१३. शिवाजी पुतळा जवळ मिरज येथे गाड्यावर भजी.

अशा अनेक ठिकाणी खाऊन झाल्यावर रात्रीसाठी मस्त गरम गरम चिकन / मटण तांबडा पांढरा रस्सा हवाच. . कोल्हापुरात जशा छोट्या खाणावळीं मधून अतिउत्तम घरगुती चिकन मिळते तसेच इथेही मिळते. यादी बरीच आहे पण चांगली ठिकाणी काही ..
१. हॉटेल अनुराधा : सिव्हिल हॉस्पिटल रोड ( जुने) (पांढरा रस्सा ).
२. गिरीजा : खिलारे मंगल कार्यालयाजवळ ( एक्दम ताजे घरगुती गरम चुलीवरील मटन / भाकरी )
३. हॉटेल सौरभ आणि हॉटेल नंदनवन : कोल्हापूर रोड. ( चिकन मॅग्नेट हा पदार्थ इथे घेतलाच पाहिजे . )
४. रहेमतुल्ला : मिरज ( खास इस्लामी चिकन )
५. सांगलीजवळ इचलकरंजी येथे बुगड खानावळ
६. शेतकरी : १०० फुटी रोड
७. क्रांती मेस विजयनगर.
८. पूर्वा गार्डन : विजयनगर
९ आर्य ( आर्या ) :

राममंदीर चौक येथील हॉटेल नवरत्न येथे मसाला टोस्ट चांगला असतो .

मिरज मध्ये मंगळवार पेठ येथे ' मेघराज ' मधील वाडा सांबार खूप छान होता पण आता कसा असतो माहीत नाही.

मिरज मार्केट - संधयाकाळी "गुडलक " च्या गाडी वर ' रगडा पॅटिस' खूप छान असते तशी चव कोठेच नाही

 मेन कोर्स पेक्शा सांगली हे स्नॅक्स चे गाव आहे. उप्पीट हे सांगलीचे सिग्नेचर स्नॅक म्हणायला हरकत नाही. बृयाच टपर्‍यांवर, उडप्यांच्या हॉटेलात भरपूर डालडा/तेल, उडीद डाळ आणि कडी पत्ता घालून केलेल्या उप्पीटाची गोल वाफळाती मूद आणि तो कडी पत्त्या मुळे येणारा विशिष्ट कर्नाटकी पद्धतीचा वास डोळे, नाक, जीभ तिन्ही इंद्रिये तृप्त करून जातो. बापट बाल जवळ प्रसाद नाष्ता सेंटर आणि विश्रामबाग मध्ये गणेश, दोन्ही ठिकाणचे उप्पीट मस्त. सांगलीच्या भेळेचा युएसपी म्हणजे सांगली चे चुरमुरे. थोडे से बुटके आणि जाड असे चुरमुरे नुसते सुध्दा खमंग लागतात. चुरमुरे जाड असल्यामुळे, गोड आणि तिखट पाणी अगदी खूप टाकून पण मऊ पडत नाहीत. मुंबई प्रमाणेच सांगलीत सुद्धा सिझन मध्ये भेळेत कैरीच्या फोडी टाकतात.  मिसळी पेक्षा इथे वडा साम्बार, कट वडा जास्त फेमस आहेत. सांगली-मिरज रोडवर गेस्ट हाऊस ला पंडित पेट्रोल पंप शेजार च्या गाड्यावर मस्त कट वडा मिळायचा. पोह्यांचं विचाराल तर वर बर्‍याच जणांनी सांगितल्या प्रमाणे मंजुचे पोहे दी ब्येष्ट.

तर अशी ही थोडक्यात केलेली सांगलीची खाद्यभ्रमंती. ही सर्व ठिकाणे सोडून नेहेमीची पंजाबी भाज्या / दाल फ्राय जिरा राईस देणारी अनेक हॉटेल सांगलीत उपलब्ध आहेत. उदा हॉटेल नटराज :राममंदिर चौक अथवा हॉटेल पर्ल : विजयनगर . डॉमिनोज आणि तत्सम चेनही उघड्या आहेत (!) पण वर नमूद केलेले पदार्थ /ठिकाणे नक्की अनुभवा.

 सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे


 
 कसे पोहोचाल?:

विमानाने

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ 250 किमी अंतरावर आहे. कोल्हापूर येथे विमानतळ असून येथून पुणे, मुंबई विमानसेवा सुरू आहे.

रेल्वेने

सांगली आणि मिरज जंक्शन रेल्वे स्थानक अनुक्रमे 45 व 53 कि.मी अंतरावर आहेत. सांगली ‍दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असल्याने पुणे-मुंबईवरून याठिकाणी येण्यास थेट रेल्वे गाड्या आहेत.

रस्त्याने

स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर करून ठिकाणापर्यंत जाता येते. पुणे, कोल्हापूरातून प्रत्येक अर्धा तासाला एस.टी ची सोय.

रहाण्याची सोय

सांगली येथील शासकीय विश्राम गृह, थोडयाच अंतरावर आहे. याशिवाय थोडयाच अंतरावर लॉजिंग ची सोय आहे.

 
सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय ठिकाणे...

मिरज तालुका
• सांगली येथील श्री गणेश मंदीर व कृष्णाकाठी कै. वसंतदादा पाटील यांची समाधी.
• सांगली येथील आयर्विन पुल व गणेश दुर्ग.
• हरिपूर येथील कृष्णा व वारणा नद्यांचा संगम व श्री संगमेश्वर देवालय, बागेतील गणपती.
• तुंग येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदीर.
• मिरज येथील रेल्वे जंक्शन, ख्वाँजा शमशुद्दीन मिरासाहब दर्गा.
• भोसेजवळ दंडोबा डोंगरावरील दंडेश्वर मंदीर व अभयारण्य.
• बेळंकीजवळ श्री सिद्धश्वर मंदीर.
तासगाव तालुका
• तासगाव येथील श्री गोपूर, गणेश मंदीर.
• कवठेएकंद येथे अतिप्राचीन श्री सिद्धराज देवालय, खंडोबा मंदिर.
• बेदाणा व द्राक्षांसाठी प्रसिद्ध तालुका
पलूस तालुका
• अंकलखोपजवळ श्री क्षेत्र औदुंबर व दत्त मंदीर.
• पलूस येथील श्री धोंडी महाराज समाधी.
• ब्रम्हनाळ येथील कृष्णा व वेरळा संगम.
• भिलवडीजवळ (भुवनेश्वरवाडी) येथील भुवनेश्वरी देवीचे अति प्राचीन मंदीर.
वाळवा तालुका
• बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रातील श्री रामलिंग बेट.
• नरसिंहपूर येथील भुयारातील श्री नृसिंह मंदीर.
• किल्ले मच्छिंद्रगड येथे श्री मच्छिंद्रनाथाचे देवालय.
• येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन मंदीर (डोंगरमाथ्यावर).
• ऊरण इस्लामपूर येथील संभूआप्पा देवालय.
• शिवपुरी येथील सिद्धेश्वर देवालय.
कवठेमहांकाळ तालुका
• कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली मंदीर.
• आरेवाडी येथील श्री बिरोबा देवालय.
शिराळा तालुका
• शिराळा येथील श्री गोरखनाथ मंदीर, येथेच समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदीर.
• चांदोली येथील वारणा धरण (वसंतसागर) व अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान.
• प्रचितगड प्रेक्षणीय किल्ला.
• चांदोली खु. प्रेक्षणीय कंधार डोह धबधबा.
• गिरजवडे येथील जोतिर्लिंग देवस्थान.
आटपाडी तालुका
• आटपाडी येथील कैद्यांची खुली वसाहत (तुरुंग) (स्वतंत्रपूर).
• खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदीर.
• करगणी येथील श्री राम मंदीर.
• वलवण येथील मोराचे थवे.
• राजेवाडी येथील इंग्रज काळातील तलाव.
जत तालुका
• जत येथील श्री यलम्मा देवी मंदीर व श्रीराम मंदीर.
• गुड्डापूर येथील दानम्मा मंदीर.
• बनाळी येथील बनशंकरी मंदीर.
• गिरगांव येथे डोंगरावरील श्री लक्ष्मी मंदीर.
• सोर्डी येथील श्री दत्त मंदीर, मलाकसिद्ध.
• गुडघरी सिद्धनाथ येथे हेमाडपंथी देवालय.
खानापूर तालुका
• रेणावी येथील श्री रेवणसिद्ध मंदीर.
कडेगांव तालुका
• देवराष्ट्रे येथील कै. यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी व सागरेश्वर अभयारण्य.
• कडेपूर येथील श्री डोंगराई देवी.
आयर्विन पूल : सांगलीत प्रवेश होतो तो आयर्विन पुलावरून. या पुलावरून महापुरात पट्टीचे पोहणारे उड्या टाकतात व पोहत काठावर येतात. सांगलीत इ. स. १९१४ व इ. स. १९१६ साली आलेल्या कृष्णेच्या महापुरानंतर नदीवर पूल असण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी पुढाकार घेतला व इ. स. १९२७मध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले आणि इ. स. १९२९ साली ते पूर्ण झाले. पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाइसरॉय आयर्विन यांच्या हस्ते इ. स. १९२९मध्ये झाले. 
 
 आयर्विन पूल

सांगलीचे प्रसिद्ध गणपती पंचायतन मंदिर 

श्री गणेश, सांगली

सांगलीचे आराध्यदैवत श्री. गणपती पंचायतन मंदिर पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै. चिंतामणराव थोरलस आप्पासाहेब पटवर्धन यांनी यांनी या देवस्थानची स्थापना केली. ते जेव्हा सांगलीत आले तेव्हा सांगली केवळ पाच हजार वस्तीचे लहान खेडेगाव होते. या शहरास राजधानीचे रूप देण्याचा संकल्प करून त्यांनी गणेशदुर्ग किल्ला आणि गणपती मंदिर उभारले. सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असणा-या या मंदिराची श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अलीकडच्या काळात शोभा वाढविली आहे. पंचायतन, अर्थात पाच मंदिरांनी बनलेले. गणपतीबरोबरच शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण देवतांची मंदिरे याठिकाणी आहेत. मंदिराचा परिसर विलोभनीय आहेच शिवाय मंदिरातील प्रसन्न वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करते. थुई थुई उडणारे कारंजे, उंच शिखरे, त्यावरील नक्षीकाम, बागबगिचे आणि मुख्य म्हणजे गणरायाची देखणी मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे.

चिंतामणराव पटवर्धनांनी कृष्णा नदीकाठी १८१४ मध्ये गणेश मंदिराची उभारणी सुरू केली. ती पुढे तीस वर्षे सुरू होती, असे सांगितले जाते. मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

संस्थानकाळात सन. 1811 ला मंदिरच्या बांधकामास प्रारंभ झाला. मंदिरासमोरील भव्य महाद्वार कुरुंदाच्या दगडात बांधण्यात आले आहे. तर मंदिरांची बनावट काळ्या दगडातील आहे. पायासाठी मजबूत धर नसल्याने प्रथम ३० ते ४० फूट खोदाई करून दगड व चुना यांचा पाया तयार करून घेण्यात आले. नदीच्या पश्चिम बाजूला खालपासून तटबंदी करण्यात आली. तटबंदीच्या पलीकडे नदीला सुंदर घाट बांधण्यात आला. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा तटबंदीशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. तसेच नदीच्या पूर्वेकडे धूप होत नाही. त्यामुळे पुरापासून गावालाही संरक्षण मिळते. अशा कल्पकतेने हे मंदिर बांधलेले आहे. हे पेशवाई शैलीचे पंचायतन मंदिर आहे. बांधकाम पूर्णं झाल्यावर 1844 साली पाचही मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. बांधकाम पूर्णं होण्यास जवळजवळ तीस वर्षांचा कालावधी लागला. पाचही मुर्त्यां संगमरवरी आहेत. श्री. क्षेत्र महाबळेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी जो दगड शिल्लक होता, तो उपलब्ध करून या मुर्त्या बनविण्यात आल्या आहेत. भिमाण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांनी या मुर्त्या तयार केल्या आहेत. संस्थान काळातच श्री. गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत दररोज पूजाअर्चा सुरू करण्यात आली.

दीडशे वर्षाचा काळ लोटला तरी आजही हे मंदिर नवीन वाटते. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सांगलीत आल्यानंतर त्यांनी मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. अन्नछत्र सुरू केले, उर्दू, जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले. सुनीतीराजे पटवर्धन सभागृह बांधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली. मंगल कार्यालयाची उभारणी करून अनाथ, अपंग जोडप्यांसाठी हे कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

संस्थानचा गणेशोत्सव गणपती मंदिराप्रमाणेच संस्थान ट्रस्टचा गणेशोत्सव खास आकर्षण असते. गणपती मंदिरची आकर्षक सजावट करण्यात येते. या गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमानंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. हत्ती, उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्या वर्षी लवकर या... ' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो. हत्तींची परंपरा गणपती पंचायतन संस्थानाची हत्तींचीही परंपरा आहे. पूर्वी मंदिरात पंचवीस हत्ती होते. संस्थान खालसा झाल्यानंतर संख्या कमी झाली. सुंदर गजराज उंचापुरा व देखणा हत्ती सांगलीची शान होता. त्याच्या निधनानंतर बबलू हत्तीचे आगमन झाले. गेली 20 ते 25 वर्षे बबलूने सांगलीकरांना लळा लावला होता. त्याला 'लाडका बबलू' असे म्हटले जात. संस्थानाचा हत्ती असल्याने त्याचा वेगळाच डामडौल होता. श्रीमंत विजयसिंहराजे यांनी त्याच्यासाठी पंखे, शॉवर आणि टीव्हीची सोय केली होती. खाण्यापिण्याचेही लाड होत असत. त्याचे अचानक निधन झाले त्यावेळी त्याच्या अंतयात्रेवेळी जनसागर लोटला होता.

 इस्लामपूरमार्गे आल्यावर कृष्णा नदीच्या काठावरच हे मंदिर दिसते. 




गणेशदुर्ग किल्ला : प्रशासकीय कारभारासाठी पटवर्धन संस्थानिकांनी या भुईकोट किल्ल्याची उभारणी केली. या ठिकाणी तटबंदी केलेली असून खंदकही होता. सध्या येथे जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. वसंतदादा पाटील यांना येथे बंदिवासात ठेवण्यात आले होते.

गणेशदुर्ग दरबार हॉल

गणेशदुर्ग
 
कृष्णेकाठी वसलेले सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.सांगलीतील गणेशदुर्ग हा अष्टकोनाकृती किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. किल्ल्याच्या भिंती ४·५७ मी. जाडीच्या व ५·१८ मी. उंचीच्या आहेत. यामध्ये तत्कालीन दिवाणखान्याची प्रशस्त इमारत आहे. किल्ल्याच्या परिसरात सध्या शासकीय कार्यालये, महाविद्यालय, माध्यमिक शाळा व वस्तुसंग्रहालय आहे. किल्ल्याच्या परिसरातील विलिंग्डन कॉलेज म्यूझीयम हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे वस्तुसंग्रहालय असून या इमारतीच्या प्रवेशद्वारावर अजिंठा, वेरूळ व कार्ला येथील शिल्पांची भव्य छायाचित्रे लावलेली आहेत. तसेच सांगली शहरातील कृष्णा नदीवरील पुलाची प्रतिकृती लाकडी कपाटात ठेवलेली आहे. या संग्रहालयात प्रसिद्घ चित्रकार ए. एन्. म्यूलर, जेम्स वेल्स व धुरंधर यांनी काढलेली मूळ तैलचित्रे, नाना फडणीसांचे तैलचित्र, बुद्घ, पीसाचा झुकता मनोरा, ज्यूलीअस सीझर व क्लीओपात्रा यांचे संगमरवरी पुतळे, फुलदाण्या, चिनी मातीची भांडी इत्यादींचा समावेश आहे. १९५४ मध्ये हे वस्तुसंग्रहालय विलिंग्डन महाविद्यालयाने व्यवस्थापनासाठी ताब्यात घेतले.

गणेश मंदिर ( जयसिंगपुर एम.आय.डी.सी.)

सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे. अतिषय सुंदर असे हे मंदीर असून खास फोटो. हे मंदीर फक्त वीटा, चुना ई.चा वापर करून बांधले आहे..सिमेंटचा वापर करणेत आलेला नाही..

प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे.

प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे.

प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात.

प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात.

प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर.

प्रचि--०6 –

प्रचि--०7 –

प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत.

प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत.

प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.

उदगाव हे गाव जयसिन्गपुरच्या थोडे अलिकडे आहे . तिथुन एक रस्ता वाडीला जातो . जयसिन्गपुरचे भडंग खुप प्रसिद्ध आहे . उदगावची लाकडी खेळणी खुप छान असतात. तसेच तेथे लोकनाट्याचेही बरेच प्रयोग असतात - जसे की - 'वहिनी माझी लक्ष्मी घरची '

कुंजवनः-

   सांगली -शिरोळ रोड जयसिंगपुर गावातून जातो.याच परिसरात एम.आय.डी.सी. आहे.ईथेच कुंजवन हे अतिशय क्षेत्र आहे. 






  मिरज : मिरज हे दक्षिणेकडे जाणारे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून, येथील भुईकोट किल्ल्याचे अवशेष, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. अवलिया हजरत पीर ख्वाजा शमशोद्दिन हे तुर्कस्तानातील काशगर या गावातून येथे आले. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या दर्ग्यापुढे हिंदू आणि मुस्लिम दर्शनासाठी जात असतात. या दर्ग्याचे बांधकाम सन १६६८मध्ये करण्यात आले. २०० फूट लांब आणि २०० फूट रुंद अशा चौथऱ्यावर हा दर्गा बांधला आहे. प्रख्यात शास्त्रीय गायक स्वरसम्राट मरहूम अब्दुल करीम खाँ यांची कबर याच दर्ग्याच्या आवारात आहे. त्यांचे शिष्य त्यांची पुण्यतिथी येथे संगीत महोत्सवाने साजरी करतात. मिरजेची जगभरात ‘मेडिकल सिटी’ अशी ओळख झाली आहे. खासकरून अरब देशांतील लोक उपचारासाठी येथे येत असतात. अनेक प्रकारची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स येथे आहेत. तसेच मेडिकल कॉलेजही आहे. दुसरे म्हणजे सतार, तंबोरा, सारंगी, वीणा ही तंतुवाद्येही येथे तयार करून मिळतात. या ठिकाणी हिंदुस्थानी संगीतातील अनेक गायक होऊन गेले. 
 
हजरत पीर ख्वाजा शमशोद्दिन
संगमेश्वराचे मंदिर
 
संगीत शारदा नाटकाचे लेखन येथे झाले.
 
मिरजेतील एकमुखी दत्तमूर्तींची ऐतिहासिक परंपरा

मिरज आणि म्हैसाळमध्ये एकमुखी दत्तमूर्ती

   मिरज तालुक्यात एकमुखी दत्तमूर्ती असलेली तीन ऐतिहासिक मंदिरे आहे. उत्तर पेशवाईत मिरजेत आलेल्या निरंजन रघुनाथ या थोर दत्तभक्तांनी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिरात एकमुखी दत्तांची मूर्ती स्थापना केली. त्यानंतर म्हैसाळ आणि मिरजेत अशाच पध्दतीच्या हुबेहुब मूर्ती अन्य दत्तभक्तांनी स्थापन केल्या. एकमुखी दत्तांच्या या मूर्ती दुर्मिळ असून, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.मिरज आणि म्हैसाळ येथील एकमुखी दत्तमंदिरात दर्शनासाठी  दूरवरून भाविक येतात.
    पेशवाईच्या उत्तर काळात निरंजन रघुनाथ नावाचे थोर दत्तभक्त होऊन गेले. त्यांनी गिरनार पर्वतावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले, असे सांगण्यात येते. हे दर्शन सहा हस्त आणि एकमुख अशा स्वरूपाचे होते. निरंजन रघुनाथांनी दत्तभक्तीपर काही ग्रंथ आणि काव्यात्मक रचना केल्या. पुढे रघुनाथ निरंजन हे मिरजेत आले. त्यावेळचे मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (दुसरे) यांनी त्यांना आश्रय दिला.निरंजन रघुनाथांनी मिरजेत मठ स्थापना केली. सध्याच्या अंबाबाई तालीमसमोर शिराळकर (बेकरीवाले) यांच्या वाडय़ात आजही हा मठ आहे.
निरंजन रघुनाथांचा अनुग्रह श्रीमंत बाळासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे  त्यांनी सन 1853-54 मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या माधवजी मंदिरात दत्त मंदिर बांधले. या मंदिरात निरंजन रघुनाथांच्या हस्ते काळ्या पाषाणातील एकमुखी दत्तांची सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली. ही मूर्ती त्याकाळी मिरजेच्या पंचक्रोशीत प्रसिध्द होती. *निरंजनबावांनी सन 1855 मध्ये मिरजेत कृष्णानदीत जलसमाधी घेतली. त्यांचे पुत्र योगीराजबावा यांना श्रीमंत बाळासाहेबांनी जमिन इनाम दिल्या होत्या. मिरज किल्ल्यातील या दत्तमंदिर स्थापनेसंदर्भातील आणि निरंजनबावांच्या मुलांना दिलेल्या इनामाबाबतची कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.
निरंजबावांच्या हस्ते स्थापन झालेली किल्ल्यातील दत्तमूर्ती पाहून तत्कालीन अन्य दत्तभक्तांनीही त्याच कारागिराकडून हुबेहुब अशा मूर्ती तयार करवून घेतल्या. या तीनही दत्तमूर्तींना एक मुख असून, सहा हात आहेत. या सहाही हातांपैकी दोन हातात विष्णूंची शंख आणि चक्र ही आयुधे, शिवाची डमरू आणि त्रिशुल ही आयुधे आणि ब्रम्हाचे कमंडलू आणि माळ अशी रचना आहे. पायात खडावा आहेत. मूर्तीभोवती कोरीव नक्षीकाम असलेली सुंदर प्रभावळ असून, त्यावर मध्यभागी कीर्तिमूख आहे.
मिरजेतील भुईकोट किल्ल्याच्या बाहेर उत्तर बाजूला असणाऱया मोकळ्या मैदानात दत्तभक्त असणाऱ्या वेदमूर्ती सीतारामभट आपटे यांनी 1881 सालच्या माघ शुध्द पंचमीला एकमुखी दत्त मूर्तीची स्थापना केली. किल्ल्याच्या मैदानातील मंदिर म्हणून त्याला ‘मैदान दत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
याच काळात *मिरजेजवळच असणाऱ्या म्हैसाळ गावातील देवल नामक दत्तभक्ताने आपल्या घरालगत एकमुखी दत्तमूर्तीचे मंदिर बांधले. त्यामुळे मिरज तालुक्यात 19 व्या शतकात एकसारख्या दिसणाऱ्या तीन एकमूखी दत्तमूर्ती होत्या.त्यांचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत. सन 1948 साली मिरज संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन झाले. त्यानंतर मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराच्या आवारात असणाऱ्या दत्तमंदिरातील एकमुखी मूर्ती स्थलांतरीत करण्यात आली. सध्या मैदान दत्त मंदिर आणि म्हैसाळ येथील दत्त मंदिरात या मूर्ती पहावयास मिळतात.
    एकमुखी दत्तमूर्ती या महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळतात.मैदान दत्त मंदिरात नैमित्तिक कार्यक्रमांबरोबर कार्तिक महिन्यात होणारा दीपोत्सव प्रेक्षणीय असतो. दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा होतो. पूर्वी येथे राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकारांची प्रवचने होत असत. या मंदिराचे शतकमहोत्सव आणि शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले होते.
 मानसिंगराव कुमठेकर
हरिपूर : कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी हे गाव आहे. येथे संगमेश्वराचे मंदिर आहे. सांगलीतून हरिपूरकडे जाताना वाटेत पुरातन गणपती मंदिर आहे. पूर्वी त्याच्या भोवताली दाट झाडी होती. त्यामुळे या ठिकाणाला ‘बागेतला गणपती’ असे म्हणतात.
 एक पिकनिक स्पॉट म्हणून हे ठिकाण लोकप्रिय आहे. मिरजेचे जहागीरदार गोविंद हरी पटवर्धन यांनी हे देऊळ बांधले. संगमामुळे हे सहलीचे ठिकाण झाले आहे, तर संगमेश्वराच्या मंदिरामुळे भाविकांची गर्दीही असते. विशेषकरून पावसाळ्यात पूर आल्यावर नदी सागराप्रमाणे दिसते. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी येथील चौकातील पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले आहे. तो पार आजही येथे पाहायला मिळतो. येथे हळदीचे पेव (जमिनीतील साठवणूक) पाहायला मिळते. हे ठिकाण सांगली शहरापासून तीन किलोमीटरवर आहे.

 येथे प्रत्येक श्रावण सोमवारी मोठी यात्रा भरते.

संगमेश्वराचा इतिहास थेट रामायणाशी जोडला आहे. वनवासात असताना शिवभक्त प्रभू श्रीरामाने वाळूपासून हे शिवलींग तयार करून पूजा केली असल्याची आख्यायिका जाणकारांकडून सांगितली जाते. मंदिराचे बंधाकाम हेमाडपंथी असून खांबांचा अर्धा भाग कोरीव असून अर्धा भाग गोलाकार चकत्यांनी बनला आहे. या चकतीवर आघात केला असता घंटेसारखा आवाज येतो. भिंतीवर गणेशमूर्ती कोरल्या आहेत. देवाच्या आंघोळीच्या पाण्याचे रांजण असून मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग रुपात मूर्ती आहे. त्यावर दुधाचा अभिषेक केल्यास दहा बोटांचे ठसे स्पष्टपणे दिसतात. बाजूची साळुका आणि लिंग यात बोटभर अंतर असून खाली वाळू व पाणी आहे. हे लिंग वाळूचे असूनही ते झिजत नाही, हे त्‍याचे वैशिष्‍ट्‍य.
'श्रीगुरुचरित्रा'त या तीर्थक्षेत्रचा 'वरुणा संगम असे बरवे तेथे तुम्ही स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वर पुजावा' असा उल्लेख आहे. श्रीक्षेत्र काशी नंतर हरिपूर येथेच स्वयंभू मार्कंडेश्वर आहे.
श्री संगमेश्वर हे हरिपूर चे ग्रामदैवत आहे. वर्षातून तीनवेळा यात्रा भरते. श्रावण सोमवार, महाशिवरात्री आणि पौष पौर्णिमाला भरणारी विशाळी यात्रा, यावेळी संपूर्ण पंचक्रोशीतील शिवभक्त मोठी गर्दी करतात. विशाळी यात्रेदिवशी निघणाऱ्या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. मंदिराच्या आवारात गणपती, हनुमान, कृष्णामाई आणि विष्णू मंदिर असे शिवपंचायतन आहे. शहरापासून जवळ असूनही गावाचे गावपण जपले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच भलीमोठी कमान आणि हनुमान मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिराची दगडी तटबंदी, कोरीव विस्तीर्ण नदीघाट पहाण्यासारखे आहे. येथील जगप्रसिध्द हळदीची पेवे आणि नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संगीत शारदा नाटक लिहलेला वृक्ष पार अशी अनेक ठिकाणे आहेत.

हरिपूर येथील मार्कंडेश्वर मंदिराकडे जाण्‍याचा मार्ग

सांगली येथील मुख्य बसस्थानका पासून अवघ्या २ किलोमीटरवर हरिपूर गाव आहे. स्थानका शेजारील शास्त्री चौकातून खाजगी वाहने, रिक्षा आणि विशेष म्हणजे टांग्याची ही सोय आहे.

कृष्णा आणि वारणा संगम
 
 दंडोबा : 
 
 मिरजेच्या पूर्वेस हे निसर्गरम्य ठिकाण आहे. पुरातन गुंफा मंदिरे हे येथील वैशिष्ट्य. वनविभागाने येथील जंगल केले आहे. दुष्काळी भागात हे ठिकाण म्हणजे वाळवंटातील मृगजळ आहे. सांगली-पंढरपूर रस्त्यावर देशिंग गावाच्या हद्दीत डोंगरावर हे ठिकाण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा दंडकारण्याचा भाग होता. डोंगरावर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा मनोरा आजही सुस्थितीत उभा आहे. डोंगरावर अनेक मंदिरे असून, एका दिवसाच्या ट्रिपसाठी किंवा ट्रेकसाठी "दंडोबाचा डोंगर " खूपच छान आहे .देवदर्शन आणि निसर्ग दोन्ही गोष्टींची  सांगड आहे. या डोंगराचा ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये समावेश झाला आहे. 
     इथे जण्यासाठी सांगली कुपवाड एमआयडीसीमार्गे कोळंबीला जावे. भोसे फाट्यापासून खरसिंग रोड लागतो. रस्ता  अरुंद आहे. गाडी डोंगरांच्या माथ्यापर्यंत जाते . रस्ता दुतर्फा झाडांनी आच्छादलेला आहे.घाणेरीची लाल , पिवळी , गुलाबी फुलं बहरलेली होती . दंडोबा हे शंकराचं नाव  आहे. हे मंदिर डोंगरावर एका गुहेत आहे .सभामंडप गर्भगृह आणि त्याच्या सभोवती परिक्रमा करण्याची जागा अशी मंदिराची ठेवण आहे. गर्भगृहात लिंगाची स्थापना केलेली आहे तर सभामंडपात कासव , नंदी , पार्वती , काळभैरव ,गणेश यांच्या आखिव- रेखिव मूर्ती आहेत . मंदिराच्या सुरुवातीलाच एक   स्त्री आणि पुरुष हात जोडून उभे असलेल शिल्प आहे .जणु ते येणाऱ्या भाविकांचे स्वागत करत आहेत . या मूर्तींबद्दल तेथे असणाऱ्या पुजाऱ्यांनी सांगितलेली कथा रोमांचकारक  होती . ज्यांनी हे देवळ उभा केले त्या पती पत्नींची हि मुर्ती आहे.   येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे आपल्याला आशीर्वाद मिळोत आणि आपला जन्म सार्थकी लागो हि त्यांची इच्छा होती .  


      इथं खूपच छान वृक्षारोपण केलेले आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवांत बसून निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी मोक्यावर व्ह्यू पॉइंट बनवलेले आहेत .विविध प्रकारची आणि आकर्षक रंगांची फुलपाखरे इथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात .बऱ्याच प्रकारचे पक्षी इथे दर्शन देतात .
             हा डोंगर भोसे , खरशिंग आणि देशीग या तीन गावांच्या वेशीवर आहे सध्या आजूबाजूच्या गावातील  लोक एकत्र  येऊन श्रावण महिन्यात दंडोबा परिक्रमा आयोजित करतात सात दिवसांच्या  या परिक्रमेची सांगता  पारायणाने  होते  .
    दंडोबाचा डोंगर हा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावाजवळचा पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेला एक डोंगर आहे. डोंगरावर पुरातन दंडनाथाचे देऊळ आहे. डोंगरात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रे आता कालौघात पुसट झाली आहेत.

   डोंगरावर एक पाच मजली मनोरा आहे. मनोर्‍याचा सर्वांत वरचा भाग आहे तेथे चार ते पाच माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायर्‍या आहेत, पण तिथून पुढे वरती जायला मानवनिर्मित पायर्‍या नाहीत; सध्या तेथे एक दगड आहे; त्याचा उपयोग करून वरती जाता येते. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायर्‍या आहेत. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगले असेल तर मनोर्‍यावर उभे राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचे शिखर दिसते.
    भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत क्रांतिकारकांचे नेते रत्नाप्पा कुंभार यांचे या ठिकाणी गुप्त वास्तव्य व कचेरी होती. 
 महाराष्ट्रातील ‘देवळांचे गाव’ – आळसंद – शहरे आणि गावे

कधी विचार केलायत की एखाद्या गावात किती मंदिरे असतील? कदाचित ४-५, किंवा १०-१२ मंदिरे?

      सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद गावामध्ये एक-दोन नव्हे तर तब्ब्ल १३० देऊळे आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देवतांची! आणि प्राचीन मंदिरे.. यामुळेच या गावाला “देवळांचे गाव” आणि “प्रतिपंढरपूर” म्हणूनही ओळखले जाते.

   आळसंद गावची लोकसंख्या साधारण ९ हजार असून गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो. प्राचीन काळात सातारच्या औध संस्थानातील एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जात होते.

विशेष म्हणजे ही सगळी मंदिरे वेगवेगळ्या देवदेवतांची आहेत. यामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचाही समावेश आहे.

रामदास स्वामींनी अकरा मारुतींचे मंदिर या ठिकाणी बनविले आहे. या मंदिरात वेगवेगळया रुपातील आणि भागातील मारुतींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सरस्वती देवीची मूर्ती या ठिकाणी शिळेवर कोरण्यात आल्याचे आढळून येते. महाराष्ट्रात अशी मूर्ती क्वचितच आढळून येतात.

 

येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असून सुमारे ३५० वर्षे जुने आहे. येथील दगडी खांब नक्षीदार आहेत. या ठिकाणी शिव-पार्वती असे पंचमुखी शिवालय आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, मायक्का मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर अशी जुन्या काळातील मंदिरे अस्तित्वात आहेत.

काही मंदिरे ही गेल्या २० ते २५ वर्षांमध्ये ग्रामस्थांनी स्वत:च्यादेखील बांधली आहेत. या गावांमध्ये गुमानगिरी, लालगिरी आणि मनशागिरी महाराज अशा ३ महाराजांनी जिवंत समाधी घेतल्या आहेत.

   आळसंद गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीकही पाहायला मिळते. येथे मुस्लिम धर्मियांच्या पीरांचे २ दर्गेसुद्धा आहेत. राजवल्ली आणि दस्तीगर पीर असे त्यांची नावे आहेत.

    आळसंद गावामध्ये या सर्व मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. महाराष्ट्रात एवढी मंदिर एकाच गावामध्ये असणारे हे दुर्मिळ गाव आहे. कदाचित देशभरातही अशा प्रकारची फार कमी गावे असतील.

विटा : हे खानापूर तालुक्याचे मुख्यालय. हे गाव कायम दुष्काळी भागात आहे. या गावात पूर्वी कोष्टी लोकांचा हातमागाचा मोठा व्यवसाय होता. आता या गावातील लोक गळई सोने गाळणे (गोल्ड रिफायनरी) या व्यवसायात गुंतले आहेत. विटा व आसपासच्या गावातील लोक या कारागिरीत प्रवीण असून, संपूर्ण भारतभर पसरले आहेत. दुसरे म्हणजे हे गाव कुस्तीगीरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात नगरपालिकेने एक सुंदर सुलक्षणी गजराज पाळला आहे. गावातील सर्व कार्यक्रमांत त्याचा सहभाग ठरलेला असतोच.  
 

बहिर्जी नाईक समाधी, बाणूरगड

 
बाणूरगड : हा भूपाळगड म्हणूनही ओळखला जातो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला हा एक किल्ला आहे. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी येथे आहे. मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलण्यात पारंगत असलेले बहिर्जी नाईक यांना महाराजांनी पाहिले. त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून महाराजांनी त्यांना त्यांच्या गुप्तहेर खात्यात सहभागी केले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात वेशांतर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार व्यक्ती होत्या. महाराजांच्या मोहिमा बहिर्जींच्या माहितीनुसार आखल्या जात. त्यामुळे स्वराज्यातील त्यांची भूमिका व स्थान खूप महत्त्वाचे होते. या शिवरायांच्या शिलेदारांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी येथे जावे.
रेणावी :

विटा-खानापूर रस्त्यावर रेणावी गावाजवळ श्री रेवणसिद्धाचे स्वयंभू स्थान आहे. देवालयाच्या पूर्व बाजूस उसळसिद्ध व पश्चिम बाजूला भुयारात विश्वाराध्य आहे.



 येथील रेवणसिद्ध मंदिर हे नाथपंथीय रेवणसिद्धस्वामींचे मंदिर आहे. १६व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले. हे लिंगायत समुदायाचे श्रद्धास्थान आहे. श्री देव रेवणसिद्धनाथ यांनी सोलापूर शहरातील लिंगायत समुदायाचे मुख्य संत श्री सिद्धेश्वर महाराजांना भेट दिली होती. चिपळूण-कराड-विजापूर रस्त्याच्या दक्षिणेस रेवणसिद्ध मंदिर उभे आहे. असे म्हणतात, की या पर्वतावर ८४ पवित्र ठिकाणे आहेत. येथे आता उद्यान तयार करण्यात आले आहे. रेवण पर्वतावर निरनिराळ्या रंगांची माती सापडते. भक्त भस्म म्हणून याचा वापर करतात.
     आटपाडी : 
    सांगलीच्या ईशान्येस हे गाव आहे. हा भाग माणगंगेच्या खोऱ्यात असल्याने माणदेश म्हणतात. या भागातील डाळिंबे निर्यात होतात. या दुष्काळी भागातून गेलेल्या चार साहित्यिकांनी साहित्याचे मळे फुलविले. इतिहासकार ना. सं. इनामदार यांनी अनेक व्यक्तिरेखांचा इतिहास पुढे आणला. ‘गदिमां’नी गीतरामायण लिहून गीत-संगीताच्या क्षेत्रात ठसा उमटविला. आटपाडीजवळील शेटफळ येथे आजोळी ग. दि. माडगूळकर यांचा जन्म झाला. व्यंकटेश माडगूळकरांनी ग्रामीण कथा खुसखुशीतपणे लिहिल्या. आटपाडीजवळील माडगूळ हे त्यांचे गाव. शंकरराव खरात यांनी ‘तराळ-अंतराळ’ या आत्मकथेतून उपेक्षितांच्या व्यथा मांडल्या. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या चौघांनीही भूषविले. या भागातील राम नाईक यांनी केंद्रामध्ये मंत्रिपद भूषविले असून, सध्या ते उत्तर प्रदेशाचे राज्यपालपद भूषवत आहेत. प्रा. अरुण कांबळे यांनीही लेखन केले. या भागात धनगर वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे धनगरी नृत्य हा आटपाडीच्या संस्कृतीचा मुख्य घटक आहे. कोल्हापुरी फेटा हा मूळचा माणदेशातील लहरी पटका/फेटा आहे असे म्हणतात. 
 
जत : जत हे एक सांगली-विजापूर रस्त्यावर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. या भागाचा सातव्या शतकापासून इतिहासात उल्लेख सापडतो. तसेच स्थानिक लोकांच्या मते महाभारत व रामायणाशीही या ठिकाणाचा संबंध होता. विजापूर दरबारातील मूळचे राजस्थानमधील डफळे सरदार यांचे हे गाव. त्यांचा येथे एक वाडा आहे. शेजारीच प्रसिद्ध राममंदिर असून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय नौदलात असलेले विजयसिंहराजे यांनी खासदार रूपाने जतची सत्ता सांभाळली.

हा भाग कायम दुष्काळी आहे. तरीही या भागातील अभियंता अशोक खाडे यांनी परिस्थितीवर मात करून उद्योजक म्हणून नाव कमावले. आज त्यांच्या उद्योगात मुंबई येथे ४५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. 
रामगड/रामदुर्ग : हा किल्ला विजापूरचे सरदार डफळे यांनी जत तालुक्यात रामपूरजवळ सतराव्या शतकात बांधला असून, किल्ल्याला पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. येथे हेमाडपंती शैलीतील प्राचीन शिवमंदिर आहे. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजूनही दिसतात. हा किल्ला एका छोट्या टेकडीवर बांधला असून, त्याचा टेहळणीसाठी उपयोग केला जात असावा. हा किल्ला सांगलीपासून डफळापूरमार्गे ८३ किलोमीटरवर आहे.
रामगड
 
उमराणी : जतजवळच उमराणी म्हणून ऐतिहासिक गाव आहे. या गावातच प्रतापराव गुर्जरांनी बहलोलखानास शरण येण्यास भाग पाडले; पण त्याने दयायाचना करताच उदारमनाने त्यांनी दया केली. त्यामुळे महाराजांची खप्पा मर्जी झाली. उमराणीमध्ये डफळे सरकारांची गढी आहे. गढीचा दरवाजा व बुरुज आणि काही जुन्या बांधकामांचे अवशेष दिसून येतात. बहलोलखानाच्या विरुद्ध प्रतापरावांनी मिळविलेल्या विजयाच्या आठवणीप्रीत्यर्थ गावकऱ्यांनी स्तंभ उभारला आहे. 
 
बनाळी :
जत शहरापासून उत्तरेस ११ किलोमीटर बनाळी हे गाव पाच ते सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे.जत तालुक्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे आहेत. जत शहरापासून उत्तरेस ११ किलोमीटर बनाळी हे गाव पाच ते सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावालगतच डोंगराच्या कुशीत गर्द हिरवेगार बन आहे. या गर्द वनराईत श्री बनशंकरीचे देवस्थान आहे. जत तालुक्यात वैराण माळरान असताना येथे मात्र हिरवेगार बन दुष्काळी भागात बसलेले हे ठिकाण सुंदर पर्यटनस्थळ आहे. चारी बाजूला छोट्‍या टेकडया, मधोमध असणार्‍या दर्‍यामध्‍ये वेगवेगळे वृक्षांनी गर्दी केली आहे. या परिसरात दोन मोठ्या विहिरी आसून एका विहीरीतून बनाळी गावास पाणीपुरवठा केला जातो. तर दुसर्‍या विहिरीने देवस्थान परिसरातील झाडे व इतर वापराकरिता पाण्याचा पुरवठा केला जातो. जत तालुक्यात वैराण माळरान असताना येथे मात्र हिरवेगार बन आहे. आकर्षक अशी श्री बनशंकरीची मूर्ती पाहावयास मिळते. बनाळी शुध्द शाकाहारी गाव बनशंकरी देवी जागृत देवस्थान आहे. या गावचं वैशिष्टय़ म्हणजे गावात मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडणार नाही. कारण कोणी मांसाहार केलेला येथील देवीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर जंगलातील मधमाशा हल्ला करतात, अशी अख्यायिका सांगितली जाते. भीतीपोटी गावात मांसाहार केला जात नाही काही जणास अनुभव आल्याने सहसा कोणी मांसाहार करुन याठिकाणी जाणेचे धाडस करत नाही. गावात जाणारा पाहुणा असेल तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना गावात घडल्याचं ग्रामस्थांनी प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. त्यामुळे भीतीपोटी गावात कोणीही मांसाहार करत नाही. शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात गावातील लोक कडकडीत उपवास करतात. दर शुक्रवारी या ठिकाणी महाप्रसादचे आयोजन केले जाते. दसरा सणावेळी येथे यात्रा असते. जाण्‍याचा मार्ग जतपासून बारा किलोमीटर अंतराचर बनाळी गाव आहे. यासाठी बसची सोय आहे. 


 
बनाळी बनशंकरी
 
  श्री खरसुंड सिध्द ( खरसुंडी )
आटपाडी तालुक्यात श्री खरसुंडाचे प्राचीन देवस्थान असून ते सुमारे ११२५ वर्षापुर्वीचे आहे.वर्षातील पौष आणि चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.

  माणदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिध्दाचे सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे.
मंदिराची रचना हेमाडपंथी
श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे याठिकाणी पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे.
खारसुड सिद्धाची आख्यायिका
औंध संस्थानाचे अधिपती बाळासाहेब महाराज यांच्या सूचनेवरून प्रसिध्द कारखानदार किर्लोस्कर यांनी हा मंडप बांधला आहे. गाभार्‍यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे. परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे.
या ग्रामदेवतेची आख्यायिकाही अतिशय मनोरंजक आहे. मायाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिध्दनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरू झाली. या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली. म्हणून या स्थानास खरसुंडी सिध्द-खरवस, शुंड सिध्द असे नांव प्राप्त झाले. या देवाची चैत्र वद्य द्वादशीला भरणारी चैत्र यात्रा वर्षतील महत्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक मधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासासारखा असतो.
श्रींची विशेष कापडीपूजा आणि पत्रीपूजा
गाभार्‍यावर सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे.शिखरावर भक्तगणांनी अर्पण केलेला सुवर्णकलश असून त्याची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली. श्री सिद्धनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे चार वाजता सनई-चौघडा वादनाने सुरू होतो. त्यानंतर मूर्तीस अभिषेक घालून पत्रीपूजा बांधण्यात येते.
पत्रीपूजेनंतर ’श्रीं’ची कापडी पूजा बांधण्यात येते. संपूर्णपणे कापडाचा वापर करुन विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे येथील प्रमुख वैशिष्टय आहे. नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते. खरसुंडी गावातील पुजारी मंडळींकडून सिद्धनाथांची विविध स्वरुपात पूजा बांधली जाते. भल्या पाहाटे श्रींच्या मूर्तीस गरम पाण्याने स्नान घालण्यात येते. देवांना कौल लावला जातो. त्यानंतर श्रींची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते.
दररोज श्रींची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा करण्यात येते. पूजेसाठी विविध प्रकारचे प्राणी वापरतात. त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते.
सशाची पारध
माघ पौर्णिमेस परशुराम लोणारी या भक्ताची आठवण म्हणून “ सशाची पारध ” वाटली जाते. मोठ्या उत्सवात पालखी सोहळा रंगतो. त्यास 'पारधी पौर्णिमा उत्सव' असे म्हणतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. सशाचे मांस तसेच मीठ व गुलाल यांच्या मिश्रणापासून ही पारध बनवली जाते.
वर्षभर विविध उत्सवांचं आयोजन
मंदिरात वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. यात चैत्रपाडवा, रामनवमी, नाथअष्टमी, चैत्र वद्य दशमी, चैत्र यात्रा, नवरात्रौत्सव, देव सीमोल्लंघन शिकारीसाठी प्रस्थान, पालखी सोहळा,  माघ पौर्णिमा, श्रीनाथ जन्मकाळ, कार्तिक वद्य प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध त्रयोदशी, अधिकमास यांचा समावेश होतो. याठिकाणची सासणकाठ्यांची परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे. नवसाच्या सासणकाठ्या, मानाची सासणे, श्री सिद्धनाथांच्या पालखीवर मुक्तपणे भाविक गुलाल- खोबऱ्याची उधळण करतात. यावेळी भाविक गुलालाने अक्षरशः न्हाऊन निघतात.
खरसुंडी नगरीतील मंदिर परिसर, गावातील सर्व रस्ते, गावचा परिसर गुलालाने व भाविकांनी खचाखच भरलेला असतो. 'नाथबाच्या नावानं चांगभलं', 'सासनाचं चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन निघतो. ढोल-ताशांच्या निनादावर सासणकाठ्या नाचत असतात. हे मनोहारी दृष्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येथे हजेरी लावतात. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच खरसुंडीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं.
या भागात असलेली इतर धार्मिक व पर्यटन स्थळे : श्री खरसुंडसिद्ध (खरसुंडी), तुंग येथे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदिर, बेळंकीजवळ श्री सिद्धेश्वर मंदीर, पलूस येथील श्री धोंडी महाराज समाधी, वलवण येथील मोराचे थवे, राजेवाडी येथील इंग्रज काळातील तलाव, जत येथील श्री यलम्मा देवी मंदिर व श्रीराम मंदिर.
 
फार फार वर्षापूर्वी नौमिशाराण्यामध्ये कार्तिकस्वामी व बरीचशी ऋषिमंडळी ज्ञानचर्चा करत बसले होते अगस्तीमुनी प्रश्न विचारात होते कार्तिकस्वामी कथा सांगत होते अगस्तीमुनिनी स्कंदांना नमस्कार केला व म्हणाले हे शिवसुता स्कंद महाराजा मी आपल्या मुखातून बर्याचश्या शुभ व अशुभ पापनाशक अश्या कथा पुष्कळ कथा ऐकल्या,परंतु कथा ऐकण्याची माझी त्रुप्तीच होत नाही तरी आता कृपा करून कलियुगाची स्तिती कशी होणार आहे हि कथा मला कृपा करून सांगावी अगस्तीमुनींचे शब्द ऐकून स्कंद महाराज बोलू लागले हे मुनिवर्या तुम्ही अगदी चांगल्या प्रकारचा प्रश्न मला विचारला आहे कलीयुगामध्ये मानवाची स्तिती कशी होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही लाक्ष्यापुर्वक ऐका. हे मुनिवर्य कालयुगामध्ये ज्याचा जन्म होईल त्याला आनेक दुखे प्राप्त होतील.कारण कलयुगाची चाल हीन असल्यामुळे सर्व हीन गोष्टी घडतील पत्नी आपल्या पतीचा मान ठेवनार नाही पत्नीच्या इशार्यावर चालतील आईवडिलांना घराबाहेर काढतील,नात्यामध्ये पवित्र संबंध राहणार नाही, अशाप्रकारे काल्युगामध्ये थैमान माजेल स्कंद महाराज आनंदित होऊन श्री कालभैरावांची कथा संगु लागले प्रचीन काळी एक अश्च्यार्याकारक घटना घडली ब्रम्हदेव व विष्णु दोघे मायेने भुलले त्यामुळे दोघानाही अहंकार निर्माण झाला व दोघात भांडण सुरु झाले ब्रम्हदेव म्हणू लागले कि मी श्रेष्ट तर विष्णू म्हणू लागले कि मी थोर दोघांचे भांडण विकोपाला गेले एवढ्यात तिन्ही तळांमध्ये मगन करणारे ज्यांना भूत भविष्य वर्तमान ह्यांचे ज्ञान असणारे नारदमुनी अचानक तिथे आले नारद मुनींनी सर्व काही जाणले होते कि ब्रह्मदेव व विष्णू हे सुद्धा मायेने ग्रासलेले आहेत व दोघात कोण थोर ह्याचावरून वाद सुरु झालेत नाराद्मुनिना पाहून दोघे म्हणाले कि बरे झाले नारदा तू आलास आता तुच संग कि आम्हा दोघामध्ये थोर कोण हे ऐकून नारद पेचात पडले ते मनात विचार करू लागले आता यांना काय उत्तर द्यावे ? दोघांमध्ये थोर कोणाला म्हणावे ब्राम्हदेवास थोर म्हणावे तर त्यांचा जन्म विष्णूच्या नाभिकामाला पासून झाला आहे विष्णूस थोर म्हणावे तर ते भगवान शंकरांची आराधना करतात नारदाला नवल वाटते आता थोर कोणाला म्हणावे नारदमुनिना सर्व भाविशार्थ माहित होता व ते जाणून ते म्हणाले हे देवानो तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यास मी असमर्थ आहे तरी तुम्ही आता बदरीवनामध्ये जा त्या ठिकाणी थोर थोर ऋषी मुनी तपश्चार्येसाठी बसले आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील नारदाचे बोलणे ऐकून दोघेही बदरीवनामध्ये गेले तेथे मार्क्डेय,वसिष्ठ अत्रिमुनी ,वामदेव दधिची बक्दाल्भ्या,मारीची पिप्लाद इ अनेक ज्ञानी अनुष्टान मांडून बसले होते .व ब्र्हम्देव व विष्णु हे दोघे त्या मुनिना विचारू लागले कि आमच्यात थोर कोण पण त्यांनी दिलेल्या उत्तराने दोघांचेही समाधान झाले नाही शिवाय ब्रह्मदेव व विष्णू सगळीकडे गेले पण त्यांचे समाधान झाले नाही हे सर्वग पाहून नारद मुनी भगवान शंकरांकडे गेले व सर्व काही हकीकत सांगितली भगवान शंकर हसून म्हणाले ,नारदा ब्रह्मदेव व विष्णू आणि मी आमच्यामध्ये लहान थोर नाही त्या दोघांना मायेने ग्रासल्यामुळे त्यांचे भांडण चालू आहे अरे ब्रम्हदेवाने सृष्टीरचना नाही केली तर मी प्रलय कोठून आणणार अरे आम्ही तिघांनी मिळून दात्तावतार धारण केला आहे आम्ही तिघेही समान आहोत असे दोघांचे बोलणे चालू असताना शिवगण पळत पळत पळत तिथे आले व शंकराला नमन करून उभे राहिले अशा वेळेस सुरगण धावत आले व ते राक्षस कसे त्रास देतात ,ते सांगू लागले देव म्हणू लागले कि राक्षसांनी आमचे जगणे मुश्कील करून टाकले आहे पृथ्वीवरील तर लोक हैराण झाले आहेत इंद्र तर म्हणू लागले कि आमचे इंद्रपद सुद्धा राक्षस घेतात कि काय कुबेराचे पद लुटतील अशी भीती वाटू लागलीय असे देवांचे बोलणे ऐकून भगवान शंकरांचा क्रोध अनावर झाला डोळे खैराच्या निखार्याप्रमाणे लाल झाले रागाने शरीर थरथरू लागले त्या आवेशात शंकरांनी आपला उजवा हात काली आपटला त्या बरोबर त्यांच्या उजव्या भूजदांडापासून एक तेज पुंज मूर्ती प्रकट झाली त्यास भैरव असे सार्वजन म्हणू लगले . दैदिप्यमान तेजस्वी भैरवाला पाहून सर्व देवांना आनंद झाला.ज्याप्रमाणे दुपारच्या वेळी सूर्य जसा अतिशय तेजस्वी त्याप्रमाणे भैरवनाथ शोभू लागले गळ्यामध्ये रुद्रमाला शैइलि शृंगी घातलेली कानामध्ये चंद्राप्रमाणे तेजस्वी कार्नामुद्रा मस्तकावर किंचित पिंगट रंगाच्या जटा,हातामध्ये त्रिशूल धारण केलेला .कमळाच्या दलाप्रमाणे डोळे ,बळकट पुष्ट दंड गुडघ्यापर्यंत लांब हात हातामध्ये दिव्या डमरू विशाल भाल भालावरती त्रिपुंड भस्म इतर बारा ठिकाणी टिळे लावलेले त्याचा प्रकाश चोईकडे पडला होताअशी दैदिप्यमान भैरव मूर्ती भगवान शंकराच्या भूजदंडापासून कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी या शुभ दिवशी प्रकट झाली. ज्याच्या धाकानेवर वाहू लागतो सूर्य नित्य समयी उगवतो अशी भैरव मूर्ती प्रकटली ज्याचे नाव घेतल्यावर यामदूतसुद्धा पळून जातात ती भैरव मूर्ती प्रकट झाली शनी ज्याची नित्य पूजा करतो ती भैरव मुर्ती प्रकट झाली सर्व देवांना आनंद झाला त्यांनी भैरवाचे स्तवन केले त्याची पूजा करून नमस्कार केला सर्व देवानी मिळून आपल्या ठिकाणी असणारे सामर्थ्य व शक्ती निरनिराळी आयुधे भैरवास अर्पण केली भैरव श्री शंकरापुढे गेले .त्यांना वाकून नमस्कार केला व भैरव भगवान शंकरास म्हणू लागले. हे पिता महादेव तुम्ही मला प्रकट करून माझ्यावर खूप मोठी दया केली तुमचे अनंत उपकार माझ्यावर आहेत ,परंतु सदाशिव तुम्ही कोणती कार्यइच्छा मनामध्ये धरून मला प्रकट केले ते आधी सांगा. ते कार्य पूर्ण करेन व आपणास आनंदित करेन.भगवान शंकरांनी भैरवास आपल्या ह्र्यादाई धरले व अत्यंत प्रेमाने म्हणू लागले. हे भैरव तुला पाहून मी अत्यंत आनंदी झालो. आता पुढे काय कार्य करायचे आहे ते मी तुला सांगणार आहे ते तू लाक्ष्यापुरवाक ऐक. पृथ्वीवर काळसूर प्रचांडासूर या सारखे अनेक राक्षस माजलेले आहेत त्यांनी ब्रम्हदेवाकडून वर मागून घेतले आहेत. त्यामुळे गर्वाने ते उन्मत झाले आहेत त्यांचे मरण आता तुझ्या हातात आहे. काळासुर राक्षस काळालाही भीती दाखवणारा आहे त्याचा तू संहार केल्यावर लोक तुला कालभैरव ह्या नावाने ओळखतील असे स्कंद मुनींचे बोलणे ऐकून अगस्ती मुनिना आनंद झाला व म्हणू लागले. हे स्कंद महाराजा आपल्या मुखातून ऐकलेली भैरव अवतार कथा अमृतापेक्षाही गोड आहे याप्रमाणे भैरावनाथांचा अवतार शंकराच्या उजव्या हाताच्या दंडापासून कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमीस झाला या ग्रंथास काशीखंड ग्रंथाचा आधार आहे पुढे भैरवाने ब्रह्मदेव व विष्णू यांचे गर्वहरण केले त्यांचे भांडण सोडवले. काळासुर व प्रचंडासूर राक्षसांचा नाश केला व सर्व देवलोक व भूलोकाला सुखी केले पाताळात जाऊन तक्षकाची बाळा (जोगाई) हिच्याशी विवाह केला भगवान शंकरानेही भैरवास पुष्कळ वर दिले. आपल्या ६४ कोटी गनांचा अधिपती भैरवास केले मग त्यांना भैरवनाथ असे म्हणू लागले त्याना सर्व सिद्धी सामर्थ्य शक्ती अवगत असल्यामुळे त्यांना श्री सिद्धनाथ असेही म्हणतात. श्री सिध्दनाथाची स्थाने महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी आहेत त्यातील मुख्य स्थान काशी हे आहे दुसरे स्थान कंडारी ,तिसरे स्थान सोनारी हि परंडा तालुक्यातील आहेत क्षेत्र सोनारी जवळ सुवर्णसूर व प्रचंडासूर अशा राक्षसांचा नाश केला व सिध्दनाथ भक्तांच्या इच्छेसाठी जोगाई सहित सोनारी येथे राहू लागले. नंतर तेथून भैरव सातारा जिल्हा मान तालुक्यात श्रीक्षेत्र म्हसवड येथे माणगंगेच्या काठावर राहू लागले. तेथे अशा पाषा अश्या दृष्ट राक्षसांचा नाश केला व भक्तांची मनोकामना पुरवीत म्हसवड येथे वात्सव केले. पुढे खरसुंडीचा नायबा गवळी हा एक अतिशय नाथांचा निष्टावंत भक्त होता त्याची मनोकामना पुरवण्यासाठी श्री सिध्दनाथ जोगेश्वरी त्यांनी श्रीक्षेत्र खरसुंडी येथे वास्तव्य केले. नंतर नेलकारंजी तेथील (भोसले) पाटलांची सुकन्या जकाई हिच्याशी नाथ विवाहबद्ध झाले. ते जकाईचे स्थान खरसुंडीपासून ७ किमी वर आहे त्यास जकाईदरा असे म्हणतात. सिध्दनाथ तीन वर्षातून एक वेळ जकाईच्या भेटीस जातात अशीही श्रीक्षेत्र सोनारी श्रीक्षेत्र म्हसवड श्रीक्षेत्र खरसुंडी पवित्र स्थाने आहेत भाविकभक्तानो मी तुम्हाला नम्र विनंती करू इच्छितो कि सदर कथा मी माझ्या ब्लोग वर पोस्ट केलीली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर तुमचा अभिप्राय मला खालील पत्यावर पत्राद्वारे काळवा व आपणास श्री सिद्धानाथांविषयी काही माहिती हवी असल्या मनात कोणताही संकोच न धरता मला माहिती विचारा मी ती माहिती सांगण्यास सद्यैव तत्पर आहे हि माझी छोटीशी सेवा आहे. तुम्ही जास्तीत जास्त माहिती विचारा तेवढी माहिती मी ब्लोग वर पोस्ट करेन आपल्या मनात जर काही शंका व सूचना असतील तर मला पत्रव्यवहार करून कळवा त्यासाठी मी माझा पत्ता खाली देत आहे प्रविण अनिल जरंडकर ( पुजारी ) मु .पो. खरसुंडी ता. आटपाडी जि. सांगली पिन : ४१५३०८ मोबाईल नंबर: ९७६६००९६९७ , ९४०३००६५३० EMAIL ID – pravinjarandkar@gmail.com

  कडेपूर येथील श्री डोंगराई देवी.

हिंदुस्तानातील देव-देवतांची पवित्र व जग्रूत मंदिरे पर्वताच्या, डोंगर-गड, व नदीकिनारी उगम, संगमावर वसली आहेत. यापैकी समुद्र सपाटीपासून २९०० फुट उंचावर सह्याद्री पर्वताच्या रांगेत पूर्वेच्या टोकावर आकाशी चुंबन घेणारे, चंद्र-सूर्याच्या प्रकाशाने दिवसरात्र सुशोभीत दिसणारे, नानविविध लतावेलीच्या हिरव्यागार गर्ध झाडीने नटलेल्या, नयन रम्य टिकाणी वसलेले असे हे डोंगराई देवीचे गिरीकंदरातील अतीप्राचीन डोंगराई शक्तीपीठ आहे.

 


 

मध्ययुगात इ. स. 1209 राजा भोज यांचा, देवगिरीचा सम्राट सिंधण यादव यांनी पराभव करून , सातारा (पुर्वी सांगली सातारा जिल्ह्यात होती) कोल्हापूर भागावर सत्ताप्रस्थापित केली. त्यांच्या पदरी असलेल्या हेमाद्रिपंताने महाबळेश्वर येथे बरीच हेमाद्रिपंताकडून महाबळेश्वराच्या पूर्वेस (160 कि. मी.) कडसुर पर्वत (पूर्वीचा लिंगराज पर्वत) या डोंगरावर म्हणजेच “आताचे श्री क्षेत्र डोंगराई” या टीकाणी मंदिर उभारणी कराणेस पंताकडून व्यवस्था केल्याचे समजते. शिर्के, व जावळीच्या मोरे घरण्याची सत्ता आल्यावर, अनेकर सरदार ब काडेपूरच्या यादव-देशमुख घराण्यांनी देवीच्या मंदिराची वेळोवेळी डगडुजी केली.त्यांनी कडेपूरचे लढाऊ यादव-देशमुख व परिसरातील शेकडो भक्त हाताशी धरून, तटबंधी गड बांधला . उत्तर दिशेला (औंध) देविकडे तोंड करून चिरेबंदी मोठा दरवाजा बांधला. गडाच्या पायार्‍या केल्या. या डोंगराई गडावरुन चारी दिशांची स्पष्ट टेहळणी केन्द्र म्हणून निवड करून , तोफखांय व्यवस्था केली. 12 वर्षे तीर्थथान करुन इ. स. 1645 साली, श्री समर्थ रामदास स्वामी चाफलाहून (उंब्रज मार्गे) प्रथम काडासूर (आताचे नांव कडेपूर) या परिसरमध्ये आले. तेव्हा त्यांनी या डोंगरीईवर काहीतरी, दैविक गोष्टींचा साक्षात्कार झाला. त्यावेळी त्यांचे वय 37 वर्षे होते. डोंगराई मंदिरावर राजगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी येथे मारूतीरायंची व अन्य देवतांची स्थापना केल्याचे जाणकारकडून व इतर पुस्तकाच्या आधारे दिसून येते. यादव घराला त्यांनी अनुग्रह दिला. सध्या या ठिकाणी आर्य समाजाचे देवीचे अत्यंत परमभक्त “पटवी बंधू भगिनी” व त्यांचे सर्व भागात विखुरलेले अन्य नातेवाईक हे यासाठी (डोंगाराईच्या भक्तीसाठी ) भरपुर मदत करतात.

चालुक्‍यकालीन शिलालेख सांगलीतील भाळवणीत सापडला

एक नजर
    भाळवणी (ता. खानापूर) येथे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख.  
    चालुक्‍य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार
    शेतकऱ्यांकडून बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व व्यापाऱ्यांकडून दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात
    मिरज - सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख भाळवणी (ता. खानापूर) येथे सापडला आहे. चालुक्‍य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला. तसेच बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.
    मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेख शोधला. जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेणी, त्यांची कामगिरी, जैन धर्मीयांचे स्थान यांची माहिती नव्याने प्रकाशात आली. हळेकन्नड लिपीतील हा जिल्ह्यातील सर्वांत जुना शिलालेख असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
    भाळवणी (ता. खानापूर) गाव प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील सध्याच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथून राज्य करणाऱ्या चालुक्‍य राजांची भाळवणी उपराजधानी होती. गावात मोठी व्यापारपेठ असल्याने प्रसिद्ध व्यापारी गावात वास्तव्यास होते. गावचे नागरिक, व्यापाऱ्यांनी मोठी मंदिरे बांधल्याचा उल्लेख शिलालेखांत आहे. भाळवणी येथे यापूर्वी दोन कानडी, एक देवनागरी शिलालेख सापडले. त्यापैकी दोन चालुक्‍यकालीन, तर एक यादवनृपती दुसरा सिंघन याच्या काळातील आहेत. सर्व शिलालेख सध्या कऱ्हाड येथे आहेत. मात्र, सध्या उपलब्ध झालेला शिलालेख त्याहून वेगळा आहे.

तीन भागात शीलालेख
  या लेखाचे तीन भाग आहेत. प्रारंभी जैन देवतेची स्तुती करण्यात आली आहे. त्यानंतर दानलेख लिहिला आहे. त्यानंतर शेवटच्या भागात शापवचन लिहिले आहे. भाळवणी येथे असलेल्या प्राचीन मूळसंघ नावाच्या जैन बस्तीचा सामान्य शेतकरी, प्रमुख व्यापाऱ्यांनी मिळून जीर्णोद्धार केला. या बस्तीतील गंध, धूप, नैवेद्य या नैमित्तिक धार्मिक कार्यासाठी काही जमीन, फुलझाडांच्या दोन बागा, काही दुकानांमधून येणारे उत्पन्न दान म्हणून दिले आहे. शिलालेखांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध प्रा. काटकर, कुमठेकर यांनी धारवाड येथे राष्ट्रीय इतिहास परिषदेत वाचला.
वर्षभर अभ्यास
प्रा. काटकर, कुमठेकर यांना सापडलेला हळेकन्नड लिपीतील शिलालेखाचे ठसे घेऊन वर्षभर अभ्यास करण्यात आला. राहुल गंगावणे, बाळासाहेब पाटील यांनी सहकार्य केले. शिलालेखातील दान हे २० फेब्रुवारी १०७० रोजी देण्यात आले आहे. भाळवणीतील व्यापारी, ६० शेतकऱ्यांनी शिलालेख लिहून ठेवलाय.
अभ्यासानंतरचे निष्कर्ष
    हा शिलालेख चालुक्‍यराजा सोमेश्वर (दुसरा) याच्या राजवटीतला आहे.
    सोमेश्वराची कारकीर्द सन १०६८ ते १०७६ अशी केवळ आठ वर्षेच झाली होती.
    या काळातील त्याचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिलालेख आढळून येतात.
    शिलालेख हा जुन्या कन्नड लिपीत आहे. 


 कडेगाव तालुक्यात आढळले दोन  ऐतिहासिक गध्देगाळ* 

 *यादव -अदिलशाहीकालीन इतिहासावर प्रकाश,* 

 _मिरज इतिहास मंडळाच्या अभ्यासकांचे संशोधन_ 

 *कडेगांव तालुक्यातील नेर्ली आणि अपशिंगे येथे  दोन वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गध्देगाळ शिल्प  मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना  आढळून आले आहेत.* 
यादव आणि अदिलशाहीकालीन ही लेखयुक्त शिल्पेआहेत. राजाज्ञा किंवा नियम मोडू नये, यासाठी अशी शिल्पे कोरलेली असतात. त्यावर शापवचनसारखी वाक्ये कोरली असतात. गाढव आणि स्त्री यांचे शिल्प त्यावर असते. तत्कालीन सामाजिक इतिहासाच्या अभ्यासासाठी ही शिल्पे उपयुक्त आहेत. 

 *गद्धेगाळ म्हणजे काय?* 
गध्देगाळ ही शिलालेखांसारखीच लेखयुक्त शिल्पे असतात. मात्र, त्यावर संबंधीत  शिलालेखांत लिहिलेले नियम, आज्ञा मोडू नये. नागरिकांनी त्याचे पालन करावे, यासाठी शेवटी शापवचनासारखी काही वाक्ये लिहिली असतात. त्यामध्ये गाढवावरुन दिलेली शिवी असते आणि या शिवीत लिहिल्याप्रमाणे गाढव आणि स्त्रीचे  शिल्पांकनही केलेले असते. प्रथमदर्शनी हे शिल्प आणि त्यावरील शिवीसदृष्य वाक्य हे अशिष्ट वाटले तरी त्यामागे केवळ शिवीगाळ करणे हा उद्देश नसतो. तर राजाज्ञा अथवा नियम मोडले तर कोणते परिणाम भोगावे लागतील, याचा इशारा देणारी ही वाक्ये असतात. अशा वाक्यांमधून शिलालेखांमधील आज्ञा अथवा नियम भंग करण्याचे धारिष्टय कोणी करणार नाही, असा उद्देश गध्देगाळ लिखाणात असतो आणि ही आज्ञा गावातील सर्व नागरिकांच्या दृष्टीस पडावी, यासाठी असे गध्देगाळ हे गावाच्या प्रमुख ठिकाणी ठेवलेले असतात.
कडेगांव तालुक्यात नेर्ली आणि अपशिंगे ही दोन शेजारची गावे आहेत. हा परिसर इतिहासदृष्टय़ा समृध्द आहे. या भागात वीरगळ, सतीशिळा विपुलप्रमाणात आढळतात. याच तालुक्यातील उपाळे (मायणी) येथे मोठय़ा प्रमाणात वीरगळ आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी त्याचे संग्रहालयही उभे केले आहे. याच परिसरात आता गध्देगाळही आढळले आहेत.
      मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या परिसरात संशोधन करीत असताना त्यांना नेर्ली येथे मारुती मंदिरासमोर आणि अपशिंगे येथे ज्योतीबा मंदिराच्या मागे गध्देगाळ आढळून आले. *नेर्ली येथील गध्देगाळ हा पाच ओळींचा असून, त्यावर ‘जो...हे ळिहे लोपे त्या गधावळेव झयो’ असे लिहिले आहे. अक्षरवाटिकेवरुन आणि भाषा शैलीवरुन सदरचा गध्देगाळ हा यादवकालीन असावा, असे वाटते.* या गध्देगाळमध्ये पाच ओळींच्या मजकुराबरोबरच गाढव आणि एका व्यक्तीचे चित्र शिल्पांकित केले आहे. तर वरील बाजूस सुर्य-चंद्र कोरले आहेत. नेर्ली येथील गध्देगाळ अभ्यासण्यासाठी अंकुश मुळीक, जयकर मुळीक, जितेंद्र शिंदे, माजी सरपंच ताजुद्दीन मुजावर यांचे सहकार्य लाभले. 






 *अपशिंगे येथे ज्योतीबा मंदिराच्या मागे जमीनीत खोलवर गेलेला शिलालेख आहे, याची माहिती कुमठेकर आणि प्रा. काटकर यांना मिळाली होती. त्यांनी त्याठिकाणी जावून पाहिले असता तो गध्देगाळ असावा, अशी त्यांची खात्री झाली. त्यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने सदरचा लेख जमीनीतून बाहेर काढला असता त्यावर गाढव आणि एका स्त्रीचे शिल्पांकन आढळून आले. सदरचा गध्देगाळ हा दोन्ही बाजूला लिहिला आहे. एका बाजूला सात ओळी असून, त्यावर आडव्या ओळीतही अस्पष्ट अक्षरे आहेत. तर मुख्य बाजूवर चार ओळी असून, त्याच्या उजव्या आणि डाव्याबाजूस सुर्यचंद्र काढले आहेत.* *मधील भागात ‘............आबदुळ मवाळ घराळहि माफ’ असे लिहिले आहे. तर त्याला लागून असलेल्या बाजूवर ‘.......घाट माफ केळं.... जो ... वीजे’ असा मजकूर आहे. या परिसरावर आदिलशाहीची अनेक वर्षे राजवट होती. त्या राजवटीमध्येच हा गध्देगाळ असावा.* आबदूल नावाच्या कोणा अधिकाऱ्याने कोणते तरी कर माफ केले असावेत, असा अंदाज या वाक्यावरुन लावता येतो. अपशिंगे येथील या गध्देगाळीच्या अभ्यासाठी सुरेश सुर्यवंशी, टी. जी. सुर्यवंशी, बजरंग सुर्यवंशी, शहाबुद्दीन शेख गुरूजी यांचे सहकार्य लाभले.



नेर्ली आणि अपशिंगे येथील या गध्देगाळ शिल्पावरुन तत्कालीन सामाजिक इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे.

नेवरी वाडा

नेवरीतील नारायण आप्पाचा वाडा
●●●●●●●●●◆◆◆◆●●●●●●●●●●●

नेवरी गाव हे कडेगाव तालुक्यातील विविध कारणांमुळे प्रसिद्ध गाव (जिल्हा सांगली) , मग ते सध्याचे राजकीय दबदबा असेल किंवा पंचक्रोशीतील सर्वांत डेव्हलपड खेड असेल, लोकसंख्याही तशी गावची भरपूर त्यामुळे ज्या बाजूने नेवरीकर झुकतील त्याचाच गुलाल आमदारकीसाठी किंवा इतर पदांसाठी व्हायचा हा इतिहास आहे.

तसेच गावाला ऐतिहासिक वारसा हि लाभला आहे, छ. शिवरायांचे जावई सरसेनापती. हरजीराजे महाडिक यांचे बंधू व्यंकोजी महाडिक यांनी वसवलेले गाव म्हणूनही या गावाकडे पहिले जाते. आजही गावच्या दक्षिण बाजूला ऐतिहासिक बारव , आमराई, व बाजूला हत्तीकुंड पाहायला मिळतो.  कालांतराने मुलुख वर्चस्वाने या गावात  महाडिक व इंगवले यांच्यात सत्ता संघर्ष झाला व इंगवले लोकांना हे गाव सोडून जावे लागले (सध्या हे लोक कराड जवळील रिसवड या गावात राहतात)

गावामध्ये पूर्वीच्या काळचे भरपूर वाडे होते पण कालांतराने काही नष्ट केले गेले तर काही वाडे आजही आपले आस्तित्व , इतिहास टिकवून आहेत. गावामध्ये गोडवनाजवळ नारायण आप्पाचा वाडा, त्याच्या बाजूलाच पाटलांचा वाडा, चिंचनकर आळीला ब्राह्मणाचा वाडा, गणेश चौकातील वाडा, पिराच्या वाड्यात 1-2 वाडे आहेत. सध्या मात्र यातील थोडेसेच चांगल्या स्थितीमध्ये आहेत.

आपण या वाडयांच्या बांधणीबद्दल थोडी माहिती घेऊया, गोडवणाजवळील नारायण आप्पाच्या वाडा हा आजही चांगल्या अवस्थेत आहे, वाड्याचे निरीक्षण केले असता असे निदर्शनास येते कि हे बांधकाम संपूर्ण चुन्यामध्ये झाले असून, दरवाजाच्या वरती शिल्प कोरले आहेत (पूर्वी एक पद्धत होती कि ज्या काळात बांधकाम होईल त्या काळातील एक घोषित चिन्ह त्या बांधकामावर कोरले जायचे) 
या शिल्पामध्ये शरभ (वाघ व सिंहाचे प्रजननातुन निर्माण झालेला प्राणी) दाखवला आहे, शरभाच्या पायामध्ये हत्ती दाखवला आहे (हत्तीची शिकार), मध्यभागी कुंभ दाखवला आहे. हे शिल्प शिवकाळातील प्रत्येक किल्ल्यावरील दरवाजावरती आपणास पाहायला मिळते याचा अर्थ हे बांधकाम हि शिवकाळातीलच आहे ( या चिन्हाचा अर्थ त्या राज्यामध्ये कोनत्याही सत्तेबरोबर संघर्ष करण्याची ताकद (शरभ) , राज्यामध्ये भरभराटी येवो (कुंभ) असा त्याचा अर्थ होतो)

वाड्याची रचनाही नियोजन बद्ध आहे, दरवाजा लाकडी आहे तर आतमधून रात्रीचे वेळीस दरवाजा बंद करणेसाठी लाकडी ओंडका आतमधून लावण्याची सोय आहे, चोहो बाजूने दगडी भिंत आहेत व आतमध्ये एका ओळीत घरांचे माती बांधकाम, समोर लहान मुलांना खेळण्यासाठी आंगण, पाण्यासाठी मोहरी, मौल्यवान वस्तू दडवून ठेवण्यासाठी खोदलेले प्याव (भुयारी खोली), व घरांवरती कंभरभर  मातीचे छत ज्यामुळे घर पावसाळ्यात गरम राहायचे तर उन्हाळ्यात थंड. अप्रतिम बांधकाम.
सलाम त्या कारागिरांना.....!!!

🖋मनोज महाडिक
      9156571313


कवठे महांकाळ महाकाली

 
 
 
 
 

 
 
कवठे महांकाळ येथील २५ फूट उंचीची दीपमाळ.
 
 
 
 
 
 
 
श्री महाकाली देवी विग्रह दर्शन
 
 
 
कवठे महांकाळ : महाकाली देवीच्या मंदिरासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. श्री महाकाली देवीच्या मस्तकाचा आकार शिवलिंगासारखा आहे. श्री महाकाली देवीच्या हातातील शस्त्रे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीसारखी दिसतात. श्री महाकाली मंदिरात सर्व नैवेद्य शाकाहारी असतात. मंदिराच्या आवारात कोणतीही पशुहत्या होत नाही. श्री महाकाली मंदिराच्या जवळच श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. पूर्वी मंदिराला लागून कमंडलू नावाची नदी वाहत होती. या नदीच्या तीरावर त्रिमुखी दत्तमंदिर आहे. द्राक्षे, साखर-गहू, ज्वारी, बाजरी, गोड मका ही येथील मुख्य उत्पादने आहेत. त्याचप्रमाणे देवी महाकाली साखर कारखानादेखील आहे. हे शहर सांगलीपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. कवठे महांकाळ गावाच्या आसपास कुकटोळी येथे श्री गिरलिंग, दंडोबा येथे श्री दंडनाथ, रायवाडी येथे श्री हरणेश्वर, आरेवाडी येथे श्री बिरोबा देवस्थान, इरळी येथे हेमांडपंती शिवमंदिर, आगळगाव येथे आगळेश्वर आदी प्राचीन ठिकाणे आहेत.
  

श्री_हरणेश्वर_महादेव 

         #रायवाडी ता.#कवठेमहांकाळ येथे एक श्री महादेव मंदिर आहे हे प्राचीन अनादी कालापासून जागृत श्री #शिवलीलामृत (स्कंदपुराण, ब्रम्होत्तरखंड) ग्रंथातील द्वितीय अध्यायातील उल्लेखित व्याधास जेथे शिवपद प्राप्ती झाली. #मृगांना (हरणांना) जेथे शिवगनाकडून दिव्य विमानामध्ये बसवून कैलास धामास नेले गेले होते,असे हे साधनेचे पवित्र धार्मिक स्थळ आहे. 
 
 
    या ठिकाणी श्री गणेश मंदिर, श्री महादेव मंदिर तसेच हरणाचेही मंदिर आहे. या ठिकाणी श्री महदेवाची खूप मोठी उभी प्रतिमादेखील आहे.
 
      या ठिकाणी सोमवारी श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविक मोठ्या संख्येने येत असतात. याठिकाणी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.हे ठिकाण खूपच निसर्गरम्य आहे. या ठिकाणचा पर्यटनस्थळ व तिर्थक्षेत्र म्हणून विकास होणे गरजेचे आ
तासगाव : हे गाव द्राक्षांसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्री गजाननाचे २०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. पेशव्याचे प्रसिद्ध सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराला दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपुर आहे. गोपुरावर खालपासून वरपर्यंत विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.  
गोपुर तासगाव गणपती
 
 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इ.स.1883 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पण त्याच्या 106 वर्ष आधी तासगाव (जि.सांगली) येथील संस्थानिक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. इथला ऐतिहासिक रथोत्सव संपूर्ण राज्यासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे.

तासगावचे संस्थानिक श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन हे या घराण्यातील पराक्रमी सरदार होते. या घराण्याचे मूळ पुरूष पुण्यश्‍लोक हरभट (बाबा) पटवर्धन हे होते. ते गणपतीपुळे येथील गणपतीचे फार मोठे भक्त होते. अनेक वर्षांपासून ते दुर्वांच्या रसाचे प्राशन करून श्रींची खडतर आराधना करीत होते. असं म्हणतात की त्यातून त्यांनी विशेष सिद्धी प्राप्त केली होती. त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकण प्रदेशचा निरोप घेऊन त्यांनी देशांतर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांचा मुक्काम इचलकरंजी इथे झाला. तिथे त्यांची भेट पुण्यातील पेशवे दरबारातील प्रसिद्ध सरदार इचलकरंजीकर घोरपडे यांच्याशी झाली. त्यांनी हरभट बाबांच्या सहा मुलांची पुण्याला पेशवे दरबारी शिफारस करून नोकरी मिळवून दिली. हरभट बाबांचे एक चिरंजीव म्हणजे रामचंद्रपंत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे परशुराभाऊ. पण परशुराभाऊंना दुदैवाने वडीलांचा सहवास फार कमी लाभला. इ.स. 1746 च्या दरम्यान रामचंद्रपंतांचे देहावसन झाले. त्यानंतर आई, चुलते यांनी भाऊंचा सांभाळ केला. भाऊ संस्कृत पठण, पत्रलेखन आणि मर्दुमकी या क्षेत्रात निपुण होते. इ.स.1755 ते 1799 या काळात सुमारे शंभर लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गजवला. त्यावेळी ब्रिटीश सेनापती लॉर्ड वेल्स यांनी भाऊंबद्दल गौरोवोद्गार काढले होते. राजनिष्ठेचा महामेरू, युद्धतज्ञ असल्यामुळे माधवराव पेशवे यांनी पानिपतच्या युद्धानंतर भाऊंना कसबे तासगावची नेमणूक दिली. त्यावेळी भाऊंनी तासगावच्या संस्थानाची मुहूर्तमेढ 1767ला रोवली. 1770 ते 1799 या कालंखंडात भाऊंनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. टिपू सुलतान बरोबरही भाऊंची अनेक युद्धही झाली. याचवेळी मोहिमांच्या निमित्ताने भाऊंना अनेकवेळा कर्नाटक आणि श्रीरंगपट्टनचे दर्शन झाले. तेथील हिंदू मंदिरे आणि गोपूरं पाहून भाऊ आश्‍चर्यचकित झाले.

पटवर्धन घराणे गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे भक्त होते. भाऊंचे आजोबा हरभट बाबा हे गणपतीपुळे येथे गणपतीचे पुजारी होते. त्यांच्याकडूनच भाऊंना गणेशभक्तीचे बाळकडू मिळाले. दरम्यान 1971 मध्ये भाऊ तासगाव येथे स्थायिक झाले. थोड्याच दिवसात त्यांना गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दर्शन दिले. त्यावेळी प्रत्येक वेळी गणपतीपुळेला येऊन दर्शन घेण्याचा त्रास घेण्यापेक्षा तासगाव येथेच माझी प्रतिष्ठापना कर, असे श्रींनी भाऊंना स्वप्नात सांगितले, अशी मान्यता आहे. गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार भाऊंनी कर्नाटक इथून गवंडी, सुतार, शिल्पकार आणि राजस्थानातून चित्रकार आणून 1771 ते 1779 या काळात तासगाव येथे सिद्धीविनायकाचे भव्य मंदीर उभारले. तासगावच्या गणपती मंदीराची रचना ऐतिहासिक आणि अतिशय भव्य दिव्य आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मोठे प्रशस्त पटांगण आहे. समोर प्रवेशद्वार आणि देवस्थानची कचेरी आहे. शेजारी रथगृह आहे. प्रवेशद्वारावर 7 मजली (96 फूट उंचीचे) राज्यातील एकमेव गोपूर आहे. तेथून पुढे गेल्यावर केंद्रस्थानी पूर्वी कार्यरत असलेली कारंजे दगडी प्रांगण आहे. मंदीराच्या पश्‍चिम बाजूला नक्षीदार खांबांनी केलेला सभामंडप, पाचही देवतांचे दगडी मंदीर आहे. गोपूर मात्र दगड आणि विटा अशा साहित्यांने युक्त आहे. भाऊंनी श्रीरंगपट्टण येथे पाहिलेली रथोत्सवाची कल्पना तासगावात आणली. रथोत्सवासाठी प्रथम भाऊंनी तीन मजली लाकडी रथ तयार केला. इ.स. 1779 मध्ये प्रथम त्यांनी तासगावात रथोत्सवाला सुरूवात केली. श्रीं ची प्रतिष्ठापना झाली. तासगावात रथोत्सवाला सुरवातही झाली. मात्र गावची भरभराट झाली तरच गावकरी आणि श्रींचे मानकरी, सार्थक यांचे पाठबळ मंदिराला मिळेल. या जाणीवेतून भाऊंनी व्यापारी, चित्रकार, संगीतकार, मानकरी यांना जमीनी दिल्या.

तासगावच्या रथोत्सवास 237 वर्षांची परंपरा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात भाविक भक्तीभावाने हा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात. हा रथ पाच मजली आणि तीस फूट उंचीचा आहे. रथोत्सवाच्या दिवशी गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमिटरवर असलेल्या श्री काशिविश्‍वेश्‍वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान या रथोत्सवास सुरवात होते. राजवाड्यात प्राणप्रतिष्ठापना केलेली मातीची मूर्ती आणि संस्थानची 125 किलोची पंचधातूंची मूर्ती पालखीतून वाजत - गाजत मंदिरात आणली जाते. त्यानंतर तेथे दोन्ही मूर्तींची आरती केली जाते. त्यानंतर जमलेला लाखो भाविकांचा जनसमुदाय गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात रथ ओढण्यास सुरवात करतो. यावेळी गुलाल व पेढ्यांची होणारी उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांझपथक, समोर दिमाखात चालणारी गौरी हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झालेलं असतं. हा रथ काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदीरापर्यंत ओढत नेला जातो. तेथे आरती करून मातीच्या मुर्तीचे कापूर नाल्यात विसर्जन केलं जातं. विसर्जनानंतर पंचधातूंच्या मुर्तीसह मिरवणूक पुन्हा गणपती मंदीराकडे येते. या रथोत्सवाने शहरातील वातावरण मंगलमय झालेलं असतं.

तासगांवला परशुरामभाऊंनी गणपतीचच मंदिर का बांधलं??
      तर कहाणी सुरु होते कोकणातून-रत्नागिरीजवळच्या कोतवडे नावाच्या गावातून.गावात बाळंभट नावाचा चित्पावन ब्राह्मण पुजारी होता.आपल्याकडे देशावर(कोकण आणि सह्याद्री सोडला कि सुरु होणारा आपला पठारी प्रदेश) जशी गावचा प्रमुख पाटील तसा कोकणात खोत असायचा.कोतवडे चे खोत होते सहस्र्बुद्धे.तर बाळंभट त्यांच्या घरचे पुजारी होते.तसेच गावातली पूजा अर्चेची,लग्न मुंजाची कामे करून उदरनिर्वाह भागवत.घरची परिस्थिती तशी दरिद्री च .बाळंभटांना मुले 3 हरी,केशव आणि विठ्ठल.थोरल्या हरीने अवघ्या 15 व्या वर्षी घराचा त्याग केला व थेट गेला तो कुलदैवताकडे -पुळ्याच्या गणपतीकडे.आपल्या  जीवनाचा अर्थ शोधण्याच्या हेतूने त्याने मनोभावे गणरायाची भक्ती केली.मंदिरातच राहून सेवा करू लागला.बराच काळ निघून गेला तरी प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच राहिल्यामुळे त्याने 21 दिवस फक्त दुर्वारसावर राहून आराधना केली.अशा हरीची कीर्ती दूरवर पसरू लागली. लोक लांबून भेटायला येऊ लागले. हरीही त्यांना आपल्या परीने योग्य सल्ले देऊ लागला.हरीचा हरिभट झाला.
  गणरायाच्या पावन भूमीत हरिभटांचं दर्शन घ्यायला लोक दुरवरुन यायला लागले.गरीब ब्राम्हण मुलगा घर सोडून गणरायाच्या चरणात आला आणि लक्ष्मी सरस्वती दोघी प्रसन्न झाल्या. मग गणरायाच्याच साक्षात्काराने हरिभटानी देशावर जायचा निर्णय घेतला आणि त्यांनी उत्तूरला मुक्काम ठोकला.मग तिथून सरसेनापती संताजी घोरपडेंचे मानसपुत्र नारायण जोशी-घोरपडे यांच्याशी संपर्क आला आणि त्यायोगे तत्कालीन राजकारण सत्ताकारणाशी..तिथून पुढचा इतिहास त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी गाजवून सोडला.
   हेच हरिभट बाबा म्हणजेच हरिभट पटवर्धन-आपल्या परशुरामभाऊंचे आजोबा. पटवर्धन घराण्याचे मूळपुरुष किंवा कुलपुरुष मानले जातात. कृष्णेपासुन तुंगभद्रे पर्यंत सगळा प्रदेश पटवर्धनांच्या अधिपत्याखाली होता.सुरुवातीला मिरज,कुरुंदवाड,मंगळवेढा मग तासगाव ,जमखिंडी ,सांगली,बुधगांव,चिंचणी,कागवाड अशी बरीच संस्थान उभी राहिली.आपण हा इतिहास पाहूच पण आपला मुद्दा गणपती आणि पटवर्धन घराणं हा होता.तर ह्या साऱ्या घराण्याने सदैव आपल्या कुलदैवत गणरायाची किंबहुना मूळपुरुष हरिभट बाबांची कृपा अखंड स्मरणात ठेवली व वरील प्रत्येक ठिकाणी गणरायाची स्थापना केली.
     याच हरिभट बाबांच्या स्मरणार्थ (1655 -1750) त्यांच्या मुलाने गोविंदरावांनी 1767 मध्ये हरिपूर गाव वसवले.(आपल सांगलीजवळचं हरीपूर).आणि त्याबरोबरच हरीपूरमधील चिंचेच्या बनात गणपतीचे मंदिर बांधले.आज हे मंदिर बागेतला गणपती म्हणून ओळखले जाते.
कुरुंदवाड जवळ असलेले गणेशवाडी हे पहिले स्थान जिथे  पटवर्धनांनी गणरायाची स्थापना केली. गणपतीची एकूण ५६ स्थाने आहेत,त्यापैकी गणेशवाडी हे एक स्थान मानले जाते.हरिभट पटवर्धनांनी या गावी गणेशमूर्तीची स्थापना केल्यावर गावाला गणेशवाडी नाव मिळाले .
    सांगली, बुधगाव, मिरज, कुरुंदवाड, जमखंडी या संस्थानचे अधिपती पटवर्धन या गणपतीच्या दर्शनासाठी येत. कृष्णा नदीचे काठावर हे देऊळ आहे. येथील मूर्ती पाषाणाची असून मंदीर हेमांडपंथी आहे.त्याबरोबरच मिरजेत गणेश तलावातला गणपती, मंगळवेढ्यातील गणपती आणि सांगलीचं गणपती पंचायतन हे प्रसिद्ध आहेत.सांगली संस्थान चे संस्थापक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी मिरजेच्या गादीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजवाडा सोडताना सोबत फक्त गणपतीची सिंहारूढ मूर्ती  सोबत घेतली. तांब्याची हि मूर्ती आजही पुजली जाते.चिंतामणराव आणि त्यांचे काका मिरजेचे तेव्हाचे संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांच्यात वाटणीवरून वाद सुरु होता.तेव्हा सांगलीतील  गणेशदुर्ग किल्ल्याची स्थापना होईपर्यंत त्यांचे वास्तव्य मिरजेतील त्यांच्या मळ्यात होते.तेव्हा त्यांनी 1799 ते 1801 या कालावधीत गणरायासाठी मळ्यात एक मंदिर बांधून घेतलं.आजही हे मंदिर 'सांगलीकर मळ्यातील गणपती'म्हणून ओळखले जाते .त्यानंतर 1811 ला कृष्णा नदीकाठी सद्याच्या मंदिराची निर्मिती सुरु झाली.1814 मध्ये पायाभरणी झाल्यानंतर चिंतामणरावांचा मुक्काम गणेशदुर्गा ऐवजी मंदिराजवळील वाड्यातच होता. कारण त्यांचं बांधकामात जातीने लक्ष होते. आणि त्यांची अशी धारणा होती कि हे सर्व त्या गणरायाचंच आहे आपण फक्त त्याचे हस्तक आहोत.
      तर आपले परशुराम भाऊ सुद्धा याच घराण्यातील असल्यामुळे कुलदैवत पुळ्याच्या गणरायाप्रती त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती.आणि बाकी तासगांवकर आहोत म्हणजे माहिती असनारच आपल्या मंदिर आणि गोपुराचा इतिहास...
 आणि सर्वात महत्वाचा किस्सा म्हणजे कुरुंदवाडच मंदिर असो का सांगलीच प्रत्येक मंदिरात  तासगांव च्या मंदिरासारखीच अफवा आहे कि 'इथून एक भुयार आहे कि जे डायरेक्ट गणपतीपुळ्यात निघतंय'

  आरवडे  इस्कॉन मंदिर ता- तासगाव

अतिशय अप्रतिम मंदिर.
अत्यंत रेखीव मुर्ती, जिवंत भित्तिचित्रे ( प्रकाशचित्रंवरून कल्पना येऊ शकेल.) 
 

 IMG_1568.jpgIMG_1569.jpgIMG_1555.jpgIMG_1546.jpgIMG_1547.jpgIMG_1548.jpgIMG_1577.jpg 

या प्रकाशचित्रात मला त्रिमितीचा भास होत आहे....................आपला अनुभव कळवा

IMG_1550.jpg

 For registration for accommodation, transport, pilgrimage or any other information:

E-mail: LOK.Office@pamho.net

Telephone: Chinmayi dasi: +91-(0)9850723481

Krishna Bhakta das: +91-(0)9921177798

Address: Hare Krishna Gram

At-Post: Aravade

Taluka: Tasgaon

District Sangli

 ऐतिहासिक पेड*

सांगली जिल्ह्याला खूपच मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. जिल्ह्यातील अनेक गावे हजारो वर्षांचा पराक्रमाचा इतिहास आपल्या पोटात सामावून  आहेत. अश्याच एका ऐतिहासिक गावापैकी एक गाव म्हणजे  तासगाव तालुक्यात वसलेले पेड  हे गाव होय.


तासगाव तालुक्याच्या अगदी उत्तरेला व काहीसे ईशान्येला वसलेले हे गाव. पेड हे सांगली पासून सुमारे 50 कि मी तर तासगाव पासून 25 कि मी इतक्या अंतरावर आहे. गावची लोकसंख्या 2011च्या जन गणनेनुसार  अंदाजे 5602 च्या  असून गावच्या भवती इतरही 12 वाड्यावस्त्या  वसल्या आहेत. पेड गावचे एकूण क्षेत्रफळ 2964.00 चौ हेक्टर इतके आहे. पेड हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले गाव असून तालुक्याचा इतर भाग शुष्क असून पेड मात्र  एक नैसर्गिक साधनसंपत्ती  ने  समृध्द गाव आहे. तसेच गावाला तिन्ही बाजूनी डोंगररांग आहे त्यामुळे त्याला नैसर्गिक संरक्षण देखील लाभले आहे.  एकदा औरंगजेब बादशहा खानापूर नजिक आला असता या ठिकाणी भरपूर "पेड" हैं असे उच्चारल्याने पेड हे नाव पडले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

पेडचे ठळक असे वैशिष्ट्य म्हणजे गावातील मोठे वाडे तसेच विपुल प्रमाणात असणाऱ्या वीरगळ . 

पेड गावात पुरातन सिध्दनाथ मंदिर, महादेव मंदिर, भवानी मंदिर , हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दर्गा अशी धार्मिक स्थळे आहेत. पेड मध्ये सहकारी बँक व्यावसायिक बँक सहकारी संस्था व पणन संस्था देखील आहेत. 

पेड चा इतिहास संक्षिप्त स्वरूपात पाहिला असता, कलचुरीं च्या कर्हाटक साम्राज्याच नाक असे ज्या प्रदेशाला म्हणले आहे ते हे पेडच असावे. देशींग बोरगाव येथील हळेकन्नड  शिलालेख तसेच भाळवनी येथील शिलालेखात हेडनाडू प्रदेशाचा ऊल्लेख आला असून केत गावुंड , कप्प गावुंड, महांक व करीकुळ इत्यादी बिज्ज्लाच्या पेड येथील  सैन्य अधिकाऱ्यांचा ऊल्लेख देशींग बोरगाव शिलालेखात आला आहे. गावुंड म्हणजे ग्रामाधिकारी होय. हे ग्रामाधिकारी पेडचेच असावेत. 

हेडनाडू नावा प्रमाणेच पेड हे गाव आपल्या समृध्दीची साक्ष देते. गावातील तीन टोलेजंग गढया भुतकाळातील समृध्दपणाच्या खुणा स्पष्ट करतात. मोठ्या वाड्याचे दोन बुरुज सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत तर इतर 4 बुरुज जमीनदोस्त झाले आहेत. साधारण दोन एकर एवढ्या परिसरात ही गढी पसरली होती. तसेच वाड्याचा  चा मुख्य दरवाजा हत्ती सहज पणे आत बाहेर येऊ शकेल इतका मोठा आहे. तसेच वाड्याच्या शेजारी पिलखाना म्हणजेच हत्ती बांधावयाची जागा आहे  व तेथे दगडी साखळदंड असल्याचे गावकरी सांगतात. गावातील तीन वाड्याचे मोठा वाडा छोटा वाडा व मधला वाडा असे सोईनुसार नाव पडले आहे. हे वाडे एकाच घरातील तीन भावाच असावेत. 

गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील वीरगळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वीरगळ सापडणारे सांगली जिल्ह्यातील मोजक्या गावापैकी पेड एक आहे. आज सध्या चांगल्या स्थिती मधील 21 वीरगळ गावात आहेत. ( काही दिवसापूर्वी बा रायगड परिवार व मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ यांच्या वतीने सदर वीरगळ संवर्धन कार्य केले आहे.) 

वीरगळ म्हणजे गावातील विराने गावच्या रक्षणासाठी किंवा गावचे पशुधन वाचवण्यासाठी हौतात्म्य पत्करले तर त्या वीराच्या स्मरणार्थ जी शिळा उभारली जाते तिला वीरगळ असे म्हणतात. पेड मध्ये अश्या विविध आकाराच्या अगदी अडीच फुटापासून ते साडेसात फुटाइतक्या भक्कम वीरगळ आहेत. हे वीरगळ गावातील योध्याचा पराक्रमच विशद करतात. वीरगळ यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून सर्व वीरगळ सुबक व आखीव रेखीव कोरल्या आहेत. ह्यावरून त्या कोणा महत्वाच्या व्यक्ती च्या असाव्यात हे सहजच लक्षात येते. गावामध्ये  गो रक्षण वीरगळ , नाग शिल्प कोरलेली वीरगळ , तांबूस जांभ्या दगडात कोरलेली वीरगळ असे साधारण वीरगळ आढळून येतात. 

पेडचे परंपरागत पाटील हे शेंडगे पाटील आहेत. ह्याचा पुरावा म्हणजे आदिलशहा दरबारात पाटिलकी अथवा गौडकी चा वाद गेला असता तिथे शेंडगे पाटलांनी आपण गेल्या सात पिढ्या पासून पाटिलकी करत असल्याचा जबाब दिल्याचे पत्र उपलब्ध आहेत तसेच पुढे मराठा  कालखंडात अमृतराव शेंडगे  हे सरदार की करत असल्याचे उल्लेख मिळतात तर भारत स्वतंत्र होईपर्यंत ही पाटिलकी शेंडगे घराण्याकडे कायम होती. तसेच सिध्दनाथ मंदिराच्या समोर गावच्या मध्यभागी अमृतराव (नाथाजी ) शेंडगे यांची समाधी देखील अस्तित्वात आहे.

पेड गावच्या अनुषंगाने अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्या म्हणजे राजा कडून गावच्या सीमा निश्चित करण्याकरिता सकाळी दिवस उजडायला घोडे पळवण्यास सुरवात केली असती सूर्यास्ताच्या वेळी जिथं घोडी थांबली तेवढी चौरस जागा पेड गावची सीमा निश्चित झाली म्हणून त्यास घोडेपेड असेही संबोधले जाते. 

दुसरी कथा म्हणजे औंध चे पंतप्रतिनिधी यांचे दैवत म्हणजे औंधची यमाई ही ह्या शेंडगे पाटलांनी काही वाद झाल्याने पळवून आणली होती व ह्या झटापटीमध्ये पंतप्रतिनिधी यांचा हात शेंडगे पाटलांनी कापला होता. आज ही ती यमाई पेड मध्ये भवानी स्वरूपात पुजली जाते. अश्या विविध दंतकथा ऐतिहासिक पेड गावाशी जोडल्या गेल्या आहेत.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही पेड गावाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सांगली जिल्ह्याच्या सुरवातीच्या काळातील  बँरिस्टर होण्याचा मान ह्याच गावातील बँरिस्टर टी के उर्फ तुकाराम शेंडगे यांचा आहे. ते काही काळ जत विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी देखील राहिले होते. त्यांनी गावात अहिल्याशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून शिक्षणाची गंगा जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील चालू केली. जी आज ही अव्याहत पणे सुरू आहे. तसेच आजचे मिरज विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी मा सुरेश भाऊ खाडे हे देखील पेड या गावचेच . तर दास कँपिटल या प्रसिध्द  कंपनीचे सर्वेसर्वा अशोक खाडे हे देखील पेड गावचेच सुपुत्र होत. असे हे ऐतिहासिक पेड आपल्या पराक्रमाचे साक्ष देत आजही उभे आहे. 

धन्यवाद 

मधुकर हक्के.
सदस्य
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ
कवठे एकंद : सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील हे खूप लहानसे खेडे; पण दसऱ्याच्या आतषबाजीमुळे हे प्रसिद्ध झाले आहे. जशी गणपतीची मंडळे असतात, तशी येथे आतशबाजीची मंडळे आहेत. म्हैसूरच्या तोडीसतोड आतषबाजी येथे होते. दारूकाम करणाऱ्यास गोलंदाज म्हणतात. असे दोन ते तीन हजार गोलंदाज येथे आहेत. लाकडाचे ओंडके पोखरून त्यात दारू ठासली जाते. त्याच वेळी आत विशिष्ट रचना करून, मग ती प्रज्ज्वलित केली जाते. त्यामध्ये भारताचा नकाशा, मोर, फुगडी डिस्को, झाडांचे आकार दाखविले जातात. येथे श्री सिद्धरामाचे एक प्राचीन मंदिर आहे. तासगावपासून पाच किलोमीटरवर हे गाव आहे. 
    आपला महाराष्ट्र वेगवेगळ्या अफलातून गोष्टींनी भरलेला आहे. पण आपणच आपला उदोउदो करत नसल्यानं मराठी माणसांचे कलागुण सगळ्यांपर्यंत पोचत नाहीत. असेच भन्नाट कलागुण भरलेयत सांगली जिल्ह्यातल्या कवठे एकंदच्या गांवकर्‍यांमध्ये. या गांवी दरवर्षी दसर्‍याच्या रात्री डोळ्यांचे पारणे फिटतील अशी आतषबाजी रात्रभर चालते. आसपासच्या गावांतून हे दारूकाम बघण्यासाठी गावात गर्दी होते.  यावर्षी या गावकर्‍यांनी समस्त मराठीजणांना व्हॉटसऍपच्या माध्यमातून साद घातलीय. तेव्हा शक्य असेल तर आजच्या रात्री कवठे एकंदला जरूर भेट द्या. 

नक्की काय आहे कवठे एकंदमध्ये?

खरंतर कवठे एकंद हे खूप लहानसं खेडं आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगांव तालुक्यातलं. तासगांवपासून साधारण पाच-सहा किलोमीटर्सवर असणारं. इथलं बिर्‍हाडसिद्ध हे देवस्थान प्रसिद्ध आहे. श्रावणातल्या दर सोमवारी इथं जत्रा भरते आणि आसपासच्या गावातले लोक कवठ्यापर्यंत चालत येतात.  श्रावणातल्या रिमझिम पावसात तर पाच-सहा किलोमीटर्स हे अंतर काही जास्त नाही.  तर या बिर्‍हाडसिद्धासमोर दसर्‍याच्या रात्री म्हैसूरच्या दारूकामाच्या बरोबरीने असलेली आतषबाजी केली जाते. 

असं म्हणतात की ही दोनशे वर्षांहूनही अधिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे. इथल्या दारूकामासाठी लागणारी शोभेची सर्व दारू गावातच बनवली जाते. रुई, शेवरी, चुना पावडर, हडताळ, विविध रंगांचा खार, हजार स्फोटकं, असं साहित्य वापरुन
शोभेची दारू बनवतात. आपल्याकडं जशी गणेशोत्सव मंडळं असतात, तशी तिथं दारूकाम मंडळंही आहेत. त्यामुळं प्रत्येक मंडळात बनणार्‍या दारूकामाचा फॉर्मुला हे त्यांचं-त्यांचं ट्रेड सिक्रेट असतं.  लोक यातही बरेच प्रयोग करतात आणि हे रहस्य त्या-त्या गटातल्या मुख्य व्यक्तीकडं गुपित ठेवलं जातं. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडे हे शास्त्र असतं, त्याला 'गोलंदाज'  म्हणतात.  आज गावात शोभेची दारू बनविणारे ३ ते ४ हजार 'गोलंदाज' आहेत, यावरुन येथील उत्सवाचा अंदाज येईल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच या उत्सवात आणि दारूकाम बनवण्यात सहभागी होतात. दसर्‍यानंतर लोक दिवाळीसाठीही इथले फटाके येऊन घेऊन जातात. 

 कसे होते हे दारूकाम?

शिंगटी:

ही  शोभेची दारू खरंतर झाडाच्या बुंधा पोखरून त्यात भरली जाते. चिंचेचं झाड यासाठी जास्त उपयोगी ठरतं. चार- पाच फूट लांबीचा चिंचेच्या झाडाचा बुंधा कापून त्यात तीन-चार इंच व्यासाचं आरपार छिद पाडतात आणि त्यात लाकडी मुसळ्याने शोभेची दारू ठासून भरतात. बरेचदा ही अशी दारू भरताना स्फोट होतात आणि दरवर्षी  अशी किमान एखादी तरी दुर्घटना घडतेच घडते. तर या चिंचेच्या खोडात भरलेल्या दारूला शिंगटं म्हणतात. हे शिंगटं किंवा शिंगटी रस्त्याच्या कडेला तीन-तीन फुटांचे खड्डे खणून त्यात बसवतात. ही शिंगटी  तब्बल दीड-दोनशे फूट उंच उडते. आणि आकाशात मस्त रंगीबेरंगी तुषार दिसतात.

औट: 

पोखरलेल्या नारळात दारू भरून हा औट नावाचा फटाका तयार करतात. हा औट आकाशात भिरभिरत जाऊन फुटतो. कधीकधी हा औट आकाशात एखादा देखावाही तयार करतो.  पण हाच औट परत येऊन एखाद्या घरावर पडला तर घराची कौलंही फुटतात. 

जमिनीवरचे देखावे: 

शिंगटी आणि औट आकाशात जाऊन फुटतात पण जमिनीवरचे देखावेही काही कमी नसतात. एका काठीवर देखावा उभा केला जातो. त्यातही मोर, फुगडी हे नेहमीचे यशस्वी कलाकार. एकदा का पेटवलं की काठीभोवती बांधलेली दारू त्या काठीला गोल-गोल भिरवते आणि नाचरा मोर किंवा फुगड्या घालणार्‍या बायका मनोहारी दिसतात. दरवर्षी या देखाव्यांत भर पडतच राहते.

आजवर  डिस्को, सोनेरी झाड, कारंजे, सुदर्शन चक्र, फुगडी, मोर, स्वागत कमान, धबधबे, भारताचा नकाशा, गेटवे ऑफ इंडिया, अमेरिकेतील र्वल्ड ट्रेड सेंटरचा नजारा या आतषबाजीतून जमिनीवर आणि आकाशात दाखवला गेलाय. यावर्षी तर आर्मीने केलेला सर्जिकल स्ट्राईक हे मुख्य आकर्षण असणार आहे. दरवर्षी घडणार्‍या दुर्घटना सोसूनही आज कवठे एकंद आपली परंपरा पुढे चालवत आहे. इतक्या जुन्या परंपरेचे काही दस्तावेज आज उपलब्श नसले तरी तरी तिचं संवर्धन केलं जातं आहे, हे ही काही कमी नाही.


 श्री संत नामदेव महाराजांसंबंधी आजही कवठे एकंद व परिसरात एक अख्यायिका सांगितली जाते. नामदेव महाराज आषाढी वारीसाठी दरवर्षी दिंडी घेऊन पंढरपुरास जात. एके वर्षी कवठे गावातून मधल्या वाटेने नामदेव महाराजांची ही दिंडी जात असताना श्रीसिध्दराज मंदिरासमोरच्या रस्त्यावर आल्यानंतर नामदेवांचे लक्ष मंदिराकडे गेले. मंदिराच्या आवारात असलेली विठ्ठल-रखुमाईची मूर्तीही त्यांना दिसली. हे विठ्ठल मंदिर असावे, या कल्पनेने नामदेव दिंडीसह मंदिराकडे निघाले.
मंदिराच्या उत्तर दरवाज्याजवळ येताच मुख्य मंदिरासमोर असणारा नंदी त्यांना दिसला. नंदीस पाहताच हे शिवमंदिर असावे, असा विकल्प त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आवारात असलेल्या विठ्ठलमूर्तीस प्रथम नमस्कार करुन सर्व वारक-यांसह त्यांनी नंदीजवळ जाऊन बाहेरुनच आतील देवाला नमस्कार केला, तो काय आश्चर्य ! मंदिरातील पिंडीवरती प्रत्यक्ष पंढरपूर येथील पांडुरंगाची मूर्ती त्यांना दिसू लागली. नामदेवांच्या मनातील विकल्पाचे निरसन झाले. प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन तेथेच झाल्यामुळे पुढे न जाता नामदेव महाराजांनी पंढरपुरात होणारे त्या उत्सवातील सर्व कार्यक्रम पुढे पाच दिवस त्याच ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे केले. परत जाताना त्यांनी दिंडीच्या प्रवासी काळातील नित्यपूजनातल्या त्यांच्याजवळ असलेल्या श्रीविठ्ठल व रखुमाईच्या मूर्ती आठवण म्हणून मंदिरात ठेवून दिल्या.
आजही श्रीसिध्दराजांबरोबर त्यांची पूजा केली जाते. हा चमत्कार घडल्यानंतर मंदिराच्या बाहेरील परिसरात एक पार बांधला गेला. छायाचित्रात दिसणारा हाच तो कट्टा ! 'नामदेवाचा कट्टा' किंवा 'नामदेवाचा पार' म्हणून आजही तो प्रसिद्ध आहे.
मंदिरात आषाढी पोर्णिमेदिवशी श्रींची पालखी मंदिराबाहेर आणून ह्याच नामदेव पारावर ठेवली जाते. कृष्ण-गोपाळांचे खेळ होतात, दहीहंडी फोडली जाते, तसेच नामदेवांनी सुरु केलेल्या किर्तन परंपरेनुसार आषाढी गोपाळकाल्याचे वेळी या पारावरील श्रींच्या पालखीसमोर आजही टाळ मृदुंगाच्या गजरात किर्तनसेवा केली जाते.
 
ब्रह्मनाळ : कृष्णा व वेण्णा नदीच्या संगमावर हे ठिकाण आहे. राजयोगी आनंदमूर्ती यांची येथे समाधी आहे. कृष्णेच्या पात्रामध्ये मगरींचा वावर आहे. अनेक लहान मुले, मोठी माणसे मगरींनी येथून ओढून नेली आहेत. 

कवलापूर : सांगलीजवळ असलेल्या या छोट्या गावातील माधवराव पाटलांनी इंग्लंडमधील इलिंग या शहराचे महापौर होण्याचा मान १ मे १९९६ रोजी मिळवला. गेली तीन तपे इंग्लंडमध्ये राहूनही अस्खलित मराठी बोलणारे माधवराव हे मराठी बोलताना वाक्यात चार-चार इंग्रजी शब्द घुसडणाऱ्या मराठी जनांसाठी आदर्श आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बॅ. पी जी. पाटील यांचे हे जन्मगाव, तसेच प्रसिद्ध वगसम्राट ‘काळू बाळू’ हेही याच गावचे. बॅ. पी जी. पाटील गमतीने म्हणायचे, की आम्ही ‘काळू बाळूच्या गावचे. 

कवठेपिरान : मिरज तालुक्यातील कवठेपिरान हे गाव आदर्श गाव म्हणून गौरवले गेले होते. खासदार पहिलवान मारुती माने यांचे हे जन्मगाव. 

पद्माळे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे हे जन्मगाव. कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे गाव बागायतींचे आहे. नदीच्या पात्रामध्ये अनेकदा मगरींचे दर्शन होते. 
नागठाणे :-
    महाराष्ट्रातील जी पावन तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आलेली आहेत त्या तीर्थक्षेत्रापैकी उत्तर वाहिनी कृष्णातीरी ( जिला दक्षिण गंगा म्हणून संबोधले जाते ) या ठिकाणी एक गांव वसलेले आहे ते म्हणजे सद्यस्थितीतील नागठाणे.
              नागठाणे गावचा प्रवास हा दहाव्या शतकापासून गवळेवाडी आकराशे सत्तर ( ११७० ) पासून नागेवाडी १७ व्या शतकापासून नागठाणे असा हा गवळेवाडी, नागेवाडी, चा सर्व साधारण नऊशे ते एक हजार ( ९०० ते १००० ) वर्षाचा प्रवास. या गावात ब्रिटीश काळात एक व्यक्तीमत्वे या गावास लाभले. आपणा सर्वाना माहितीतील नटसम्राट बालगंधर्व.
        बालगंधर्वाचे मुळ नावं नारायण श्रीपाद राजहंस ( कुलकर्णी ) असे होते. त्यांचा जन्म २६ जून १८८८ साली नागठाणे येथे झाला. आज ही गंधर्वाचा कुळकायद्याने गेलेला वाडा सुस्थितीत आहे. जन्म जातच गंधर्वाना लता दिदीच्या सारखा कंठ होता. त्यांचा गळा सुमधुर होता ते शिक्षणासाठी पुणे येथे गेले असता त्यांचा गायण, नाटकात कामे करणे आवडत असल्याने त्यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नाट्य क्षेत्र हे आपली कर्म भुमी म्हणून त्यांनी स्वीकारली विवीध नाटकांमध्ये शास्रीय गायन त्यांनी केले कालांतराने त्यांनी आपली गंधर्व नावाची नाट्य कंपनी चालू केली.
        गंधर्वाना लहान वयात लोकमान्य टिळकांनी गंधर्वाचे शास्रीय गायन व भुमिका सादरीकरण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर बालगंधर्व ही पदवी दिली तेव्हा पासून ते नारायण राजहंसाचे नटसम्राट बालगंधर्व झाले आणि तो काळ त्यांनी ३० ते ३५ नाटकांच्या माध्यमातून गाजवला त्यांनी त्यांच्या कारकिर्दिमध्ये अनेक भुमीका आजरामर केल्या त्यातील त्यांची महत्वाची म्हणजे स्री वेशातील भुमीका लोकांना थक्क करून सोडे.
       महाराष्ट्रातील अनेक गावागावात त्यांची नाटके सादर व्हायची हे सर्व कार्यक्रम तिकीटावरती असायचे परंतू नागठाणे गावातून येणाऱ्‍या गावकरी लोकांसाठी फ्री पासची सोय असायची नागठाणेमध्ये शिराळकरांच्या कट्ट्यावर गंधर्वाची नाटके चार चार दिवस सादर व्हायचे याच बरोबर किर्लोस्करवाडीचे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या विनंतीवरून सुद्धा नाटकांचे प्रयोग होत असत त्यांची गाजलेली काही नाटके " एकच प्याला " , " संयोगवर " , " शांकुतल " , " मानापमान " , " मृचकटिक " ई. अशा महान कलाकाराने नाट्य कंपनी मधून मिळवलेल्या पैशातून नागठाणे गांवचा सुपूत्र म्हणून आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ नागेश्वर मदीरा समोर मंदीरात जाणसाठी दगडी पायऱ्‍याने बांधकाम केले आहे त्या बांधकामामध्ये कोरलेल्या शिला लेखात पुढील मजकूर लिहलेला आपणास पाहावयास मिळतो तो असा " श्री नागेश्वर महाराज यांचे चरणी कै. श्रीपाद कृष्ण कुलकर्णी (राजहंस) रा. नागठाणे यांचे स्मरणार्थ चि. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी या पायऱ्‍या बांधल्या मिती कार्तिक शु॥ १५ शके १९५२ " अशा या महान कलाव्यक्तीचा मृत्यू १५ जुलै १९६७ साली पुणे येथे झाला.



 नागठाणे मुळ गवळेवाडीपासून चालू होते, याचा लेखी पुरावा मायाक्का चिंचणी येथील विलास हेळवी यांच्या पिढ्यान - पिढ्या चालत आलेल्या वंशावळीतून मिळतो. तो असा दहाव्या शतकामध्ये गवळेवाडी येथे बाराबलुतेदार यांचेसह रयत समाज वास्तव्य करत होता. त्या काळी २५ उंबऱ्‍यांची ही वाडी या वाडीमध्ये गुरे पालन हा व्यवसाय मुख्य असल्याने निर्माऱ्‍या दुधापासून दही, ताक, लोणी, तूप या सारखे उप पदार्थ तयार करुन आजूबाजुच्या गावामध्ये बाजारातून नेहवून विकरी करणे हा उद्योग असल्याने गवळेवाडी हे नाव पडलेले या गावामध्ये सर्व लोक गुण्या गोविंदाने नांदत होते.
       अकराव्या शतकाच्या मध्यंतरीला नागदेऊरचे ( नागपुरचे ) देशमुख नंतर कवठेमहंकाळ येथील रांजणी गावी वास्तव्यास असणारे भोसले हे ११४२ साली रांजणी येथील आपले जेष्ठ बंधू हिरोजी भोसले यांना सोडून दोन नंबरचे बोनोजी भोसले हे गवळीवाडी येथे कायमचे वास्तव्यास आले व त्यांचे दोन बंधू ऊरुण इस्लामपूर येथे व रामजी भोसले हे येडेनिपाणी येथे वास्तव्य करू लागले.
        बोनेजी भोसले यांनी गवळेवाडीचा पूर्ण अभ्यास काही वर्षात केला. नंतर गवळेवाडीची पाटीलकी असणाऱ्‍या व्यक्तीचा खून करून गवळेवाडीची सत्ता आपले हाती घेतली आणि ते स्वतः वाडीचा कारभार पाहू लागले. वाडीतील सर्व सीमेवर मार्ग शोधू लागले त्यांच्या नजरेसमोर होते की ऐन उन्हाळ्यात वाडीवरील २०० वर असणाऱ्‍या लोकांना पाण्याची टंचाई पडत असल्याचे जानवले. आणि ते पाण्याच्या शोधासाठी एक दिवस वाडी शेजारी असणाऱ्‍या झाडीमध्ये ते गेले फिरत - फिरत ते नदी काठी असण्याऱ्‍या टेकडीवर जाऊन पोहचले त्या ठिकाणी त्यांना एक ऋषी तपसाधना करत असलेले दिसले बानोजींनी त्यांचे दर्शन घेतले आणि ऋषीची विचारपूस केली..
      बानोजींना ऋषी सांगू लागले मी या गावातून चाललो असताना तहान भागवण्यासाठी मी या नदी पात्रातील पाणी प्राशन करून विश्रांतीसाठी या टाकडीवरती वस्तीसाठी काही दिवस होतो त्या दरम्यान या टेकडीवरती शंकर पार्वती मुक्कामासाठी आले होते. त्या दोघांनी ही या उत्तरेस वाहणाऱ्‍या नदीची खूप प्रशंसा केली. या नदीस त्यांनी कृष्णा म्हणून संबोधले आहे. या टेकडी परिसरात नागांचे असणारे वास्तव्य पावण करण्यासाठी त्यांनी येथे शिव लिंगाची स्थापना केली आहे. या शिव लिंगा वरती नेहमी दोन नागांची वस्ती असते. सकाळी शंकर पार्वती या दोघांनी कृष्णेच्या पात्रामध्ये उत्तर दिशेस तोँड करुन या ठिकाणी आले असता मी त्यांना नमन केले आणि त्यांनी मला शिव लिंगाची सेवा करण्याची आज्ञा दिली. तेव्हा पासून मी या ठिकाणी या नागटेकडी वरती या शिवलिंगाची पहाटे कृष्णेत आंघेळकरून उत्तर वाहिनीचे पाणी या शिवलिंगावरती घालतो आहे. या उत्तर वाहिनी कृष्णेत जो कोणी उत्तर दिशेस तोंडकरुन पाण्यामध्ये डुबकी मारेल, त्याचे पातक नाहीसे होईल या गोष्टीचा तु प्रसार कर असा अशिर्वाद देवून शंकर पार्वती या ठिकाणाहून लुप्त झाले....
        हे ऋषींचे बोलणे ऐकल्यानंर बानोजी आपली व्यथा ऋषींना सांगितली, त्यावर ऋषी म्हणाले या कृष्णेचे पाणी कधीही उन्हाळ्यात आटलेले नाही, मी गेली कित्येक वर्षे पाहत आहे, आपण या नागटेकडीच्या बाजूस राहण्यासाठी यावे हे ऐकून बानोजींनी सुद्धा मनोमनी या भागात रहाणेचे ठरवले आणि ते गवळीवाडीत परत आले व वाडीतील लोंकांची बैठक घेवून त्यांना सर्व हकिकत सांगून गवळीवाडीतील पांठरी मातीसारखीच माती या टेकडी व परिसरात असल्याचे हीत त्यांनी नमुद करून सर्वानी माझ्याबरोबर या नागटेकडीकडे वास्तव्यास यावे असे सांगितले व काही महिन्यातच नागटेकडी शेजारी वस्ती निर्माण झाली. याच गवळेवाडीतील दोन कुटुंबे गवळेवाडीच्या उत्तर दिशेस असणाऱ्‍या खोलभागात आपल्या जमिनीमध्ये राहण्यास गेले. नागटेकडी व खोलभाग यांचे मधोमध दोन कुटुंबे नदिच्या किणारी वास्तव्य करु लागले. कालांतराने ही दोन कुटुंबे नागटेकडी येथे राहण्यास गेली मात्र खोलभागातील कुटुंबे कायमस्वरुपी या खोल भागातच राहु लागल्याने खोल भागावरुन खोले असे त्यांचे आडनांव झाले व आडनांवरून त्यांच्या वस्तीचे खोलेवाडी असे नाव पडले अलिकडेच या वाडीचे सुर्यगांव असे नाव अस्थीत्वात आहे......
       नागटेकडी वरती राहण्यास आलेल्या बानोजी भोसले आता पाटील झाले होते. त्यांना आपल्या मुळ गांवचे नांव नागदेऊर आणि नागटेकडी या शिंवलिंगा भोवती वास्तव्यास गवळेवाडी येथे वास्तव्य असणाऱ्‍या भागात आजही पांढरी या नावाने ओळखले जाते. याच नागेवाडीत अनेक पिढ्या गावचा मुळ इतिहास आपल्या पुढच्या पिढीस सांगत कालवश झाल्या आहेत....
      नागेवाडीचे नामांतर सतराव्या शतकात नागठाणे असे झाले. या नागठाणेचे महात्म्य आसपासच्या शहरापर्यत पोहचले हेते. तासगांव शहराच्या राणीसाहेब सावित्रीबाई पटवर्धन उत्तर वाहिनी नदीमध्ये अंधोळ करुन पुण्य मिळवण्यासाठी आल्या त्यांनी या नदीमध्ये स्नान केले व तासगांव येथे नागठाणेचे त्यावेळचे कारभारी यांना तासगांव येथे बोलावून घेवून उत्तर वाहिनी कृष्णा तीरी भव्य उत्तरेश्वर महाराज यांचे चरणी घाट बांधण्याची आपली कल्पना सांगितली. नागठाणेकरांची मान्यता मिळताच काही कालावधीमध्ये घाट बांधकामासाठी लागणारे साहित्य या कृष्णातीरी येवून पडले. आणि शेपाचशे लोक या घाटाचे काम करू लागले. या घाटाची रचना नागेश्वर मंदीरातून भूयारी मार्गाने कृष्णानदीमध्ये असणाऱ्‍या डोहातील मंदिरात नंदी, नदीसमोर शिवलिंग, शिवलिंगाच्या सभोवती सात स्मृती, सात मृतीच्यावर छत्री, छत्रीच्या पुढील बाजुस जलकुंड, जलकुंडातून घाटाची सुरुवात, जलकुंडात जादा होणारे पाणी निघून जान्यासाठि भव्य गोमूख, गोमुखातून निघनारे पाणी मंदीरापासून दूर नेण्यासाठी साखळी, ऐन पावसाळ्यात देखील भुयारि मार्गाने या मंदीरामध्ये पूजा होणेसाठी शिसव या धातूने या मंदीराचे व घाटाचे बांधकाम रचनेनुसार पाचव्या पायरीपर्यत आले आणि या पायरीमध्ये बरोबर मध्यभागी " श्री उत्तरेश्वर महाराज चरणी सावित्रीबाई पटवर्धन तासगांवकर निरंतर शालीवाहक शके ॥ १७४६ सुश्रानुनाम सवत्सरे ॥ " अशी अऱ्‍याची शिला बसवण्यात आली आहे, हे नागठाणेकर कारभारी व गावकरी यांना पसंत न पडल्याने त्यांनी घाटाचे काम थांबवले. तासगांवकर पटवर्धन राणीसाहेबांनी गावकऱ्‍यांची समजूत घालण्याची खूप प्रयत्न केला परुंतू, नागठाणेचे कारभारी यांना मान्य नसल्याने अखेर राणी साहेबांनी झालेले घाटाचे काम तसेच अर्धवय सोडून भिलवडी येथे दक्षिण वाहिनी कृष्णा तारी साहित्य हलवून घाटाचे काम पूर्ण करूण घेतले. आजही आपणास हा घाट भिलवडी येथे दिमाखात उभा असलेला पहावयास मिळतो आहे....
           या घाटाचे अवशेष उखरून गावकरी मंडळींनी नागठाणे येथे कृष्णा तीरी नाईकबा मंदिराचे काम पुर्ण केले आहे. या मंदीराचा पाट भिँतीला राणी साहेबांच्या नावाची शिला लेख कोरलेला घाटाचा तो दगड लावण्यात आला आहे....
          अश्या या पुरातन गवळेवाडी ( नागठाणे ) लोकसंख्या १५,००० आणि खोलेवाडी ( सुर्यगांव ) लोकसंख्या १,७०० इतकी असून सुर्यगांवमध्ये फक्त काळंबा देवीचे मंदीर असून बाकी सर्व मंदिरे नागठाणे येथे आहेत. सुर्यगांवचे सर्व लोक नागठाणे येथे देवाचे दर्शनासाठी येतात व नागठाणेचे सर्व लोक देवीच्या दर्शनासाठी सुर्यगांव येथे जातात..
सागरेश्वर देवराष्ट्र : देवराष्ट्र ही यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी, तसेच प्रसिद्ध समाजसेविका रमाबाई रानडे यांचेही जन्मगाव. गावाच्या हद्दीतच सातवाहन काळातील सातव्या शतकातील मंदिरसमूह आहे. येथे लहानमोठी ४०-५० मंदिरे आहेत. सर्व देवळे हेमाडपंती शैलीची आहेत, मध्यभागी असणारे देऊळ सर्वांत प्राचीन असून, ते समुद्रेश्वराचे (सागरेश्वर) आहे. हा भाग पूर्वी ‘कुंताड’ राष्ट्र म्हणून ओळखला जाई व येथे ऋषी-मुनी तपश्चर्या करीत असत. त्यांच्यापैकी कोणीतरी ही देवालये बांधली असावीत, असे संशोधकांचे मत आहे. देवळांची बांधणी हेमाडपंती आहे. सागरेश्वराहून देवराष्ट्र गावात जाताना एक प्राचीन तळे आहे. हे कुंतल नरेशाने दुरुस्त केले, असे म्हणतात. सूत नावाचे पूर्वी एक महाऋषी होते. त्यावरून ‘सूत उवाच’ असा उल्लेख पुराणात आहे. सूत हा पुराणकथाकार होता. सूतमुनी एकदा व्यासांना म्हणाले, ‘गुरुदेव, मी सारी तीर्थे हिंडलो. परंतु मला मानसिक समाधान मिळाले नाही. मला आत्मिक समाधान लाभेल असे ठिकाण सांगा.’ व्यासांनी त्यांना समुद्रेश्वराच्या महादेवाचे मंदिर सुचविले. तेव्हापासून सूत ऋषींनी या ठिकाणी तप केले. त्यामुळे ही भूमी पावन झाली असे लोक मानतात.

सागरेश्वर अभयारण्य : 
 सांगली जिल्ह्यतील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वसले आहे. १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौरस किलोमीटर इतके आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो.म. मोहिते या वृक्ष आणि वन्यजीव प्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य त्यामुळेच वेगळं आहे. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. भरपूर पाऊस, धुक्याची दाटी, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो. विविध पक्षांचा कुंजारव, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आणि चिंब भिजण्यासाठी आतुरलेली माणसं.. मनातल्या ओढीला तृप्तीचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. येथे प्राचीन मंदिराचा समूह आहे. एकूण ४७ मंदिरे व १३ ओवऱ्या आहेत. आंघोळीचं आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी  असते. 
 सागरेश्वर मंदिरापासून पुढे एक-दीड किलोमीटरचा यशवंत घाट ओलांडल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्या सागरेश्वर डोंगराच्या माथ्यावर आहे. देवराष्ट्र गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.

सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरडय़ा हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्ष आणि झुडपे यासोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औदुंबरसारख्या अनेक वनौषधी आहेत. सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्ष्यांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. शुष्क गवताळ झुडपी टेकडय़ांचा अधिवास असलेल्या या छोटेखानी अभयारण्यात १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सूर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवटय़ा, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावशा, पोपट, कोकीळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध रंगी पक्ष्यांचं मनोहारी दर्शन आपल्याला खूप आनंद देऊन जातं. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटतं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे यांचा हक्काचा निवारा आहे.

वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे तर वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन अ‍ॅम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी बाहेर वावर होताना आढळत नाही.

अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंटवरून नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्या पॉइंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभरवाचे मंदिर लागते. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉइंट हे अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.

कसे जाल?

मिरज रेल्वे स्थानकापासून ६० किलोमीटर, कराडपासून ३० किलोमीटर. ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर. पुणे-बंगळुर महामार्गावरील कराडपासून बससेवा उपलब्ध.

केव्हा जाल?

पावसाळा हा उत्तम कालावधी.

श्री चौरंगीनाथ मंदिर ,सोनसळ

जि :- सांगली
ता :- कडेगाव.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहरापासून दक्षिणेला सुमारे १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदिर परिसरात वनमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने साडेपाच कोटी रूपये खर्चून निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गाचे वरदान लाभूनही गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या परिसराचे आता रूप पालटले आहे.



  येथे निसर्ग माहिती केंद्रही उभारण्यात आले असून या माहिती केंद्रामध्ये विविध वन्य प्राणी, पक्षी यांचे फोटो, पर्यावरण, औषधी वनस्पतींचे फोटो व पुस्तके तसेच वन्य प्राण्यांची शिल्पे अभ्यासासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हे केंद्र राज्यातील वन्यप्राणी, पक्षीमित्र व वनअभ्यासकांसाठी एक अभ्यासकेंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.
सोनसळ गावाच्या पश्चिमेला असणार्या डोंगराला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. येथे चौरंगीनाथ देवस्थान असून हा मंदिर परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा अशी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून इच्छा होती. त्याप्रमाणे येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी सन २००८ मध्ये प्रस्ताव सादर केला गेला. त्याचप्रमाणे शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला.
आतापर्यंत चौरंगीनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेपाच कोटी रूपये निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच विविध वन्यप्राणी, पक्षी यांची लोकांना ओळख व्हावी यासाठी त्यांचे फोटो व शिल्पे येथे ठेवण्यात आली आहेत.
प्राण्यांचे संगोपन करण्याबरोबरच पर्यावरणातील त्यांचे महत्व काय आहे? ते मानवाचे कसे मित्र आहेत? याबाबत लोकांचे माहिती केंद्राच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. तसेच अभयारण्यातील विविध औषधी वनस्पतींची ओळख व कोणत्या वनस्पती कोणत्या रोगावर गुणकारी आहेत याबाबतही विविध तक्त्यांच्या माध्यमातून सचित्र माहिती देण्यात आली आहे.
वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती, औषधी वनस्पतींची माहिती असलेल्या पुस्तकांचे सुसज्ज असे ग्रंथालयही या केंद्रात साकारले आहे. यामध्ये अनेक नामवंत लेखक व तज्ञांच्या पुस्तकांचा समावेश आहे. येथे येणार्या वनअभ्यासकांना जगभरातील अभयारण्ये, प्राणिमात्रांची, पक्ष्यांची स्लाईड शो व व्हीडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.
येथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या वनअभ्यासकांसाठी तंबू निवासाचीही सोय करण्यात आली आहे. निसर्ग माहिती केंद्रात येऊन निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांना राहण्यासाठी युवागृहे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे हे निसर्ग माहिती केंद्र राज्यातील वन्य प्राणी, पक्षीमित्र व वनअभ्यासकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.


क्षेत्र औदुंबर

क्षेत्र औदुंबर : हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक नरसिंह सरस्वती यांचा येथे आणि नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीच्या काठी मुक्काम होता. औदुंबर येथे त्यांनी एका चातुर्मासात मुक्काम केला होता. श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यामुळे दत्तभक्तांची येथे वर्दळ असते. ब्रह्मानंदस्वामी हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. ते येथेच समाधिस्थ झाले. त्यांच्याबरोबर आलेल्या मेरूशास्त्री यांनी ब्रह्मानंदांच्या साह्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ‘ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. ब्रह्मानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी औदुंबरचा प्रशस्त घाट भक्तांच्या देणगीतून बांधला. कवी हणमंत नरहर जोशी, अर्थात काव्यतीर्थ कवी सुधांशू यांचे निवासस्थान व जन्म ठिकाण येथेच आहे. त्यांनी अनेक मराठी भक्तिगीते, भावगीते लिहिली. कवी कुंजविहारी यांनी ह. न. जोश्यांना सुधांशू हे नाव दिले. औदुंबरक्षेत्री चैत्रात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. येथील कृष्णा नदीचा घाट व निसर्गरम्य परिसर खूपच छान आहे. येथे नौकानयनाची सोय आहे. नदीच्या पत्रामध्ये मगरींचा मुक्त वावर आहे. आष्टामार्गे येथे जाता येते. 
 
बहे मारुती

बहे–बोरगाव : समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी येथे एक मारुती मंदिर आहे. कृष्णा नदीतील एका बेटावर हे मंदिर असून, दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या छोट्या निसर्गरम्य रामलिंग बेटावर हे ठिकाण आहे. या बेटावरील राम मंदिराच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना केलेली आहे. स्थानिक कथेनुसार, श्रीलंकेहून परत येत असताना राम-लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला, असे म्हटले जाते. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांनी याच ठिकाणी रचले. ‘बाहुक्षेत्र’ असा कृष्ण-माहात्म्यात या ठिकाणाचा उल्लेख आहे. अत्यंत रमणीय परिसरामुळे नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यासाठी सहा कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी पहिला हप्ता म्हणून शासनाने दोन कोटी रुपये दिले आहेत. मच्छिंद्रगड येथून जवळच आहे. हे गाव क्रांतिसिंह नाना पाटील यांचे आजोळ. त्यांचा जन्म येथेच झाला. हे ठिकाण इस्लामपूरपासून १० किलोमीटरवर आहे. 
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बोरगावजवळ बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झालं आहे. इस्लामपूरहून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या निसर्गरम्य व कृष्णामाईच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहात धनाजी पाटील व माणिक कारंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बालाजी बोट क्लब स्थापन केला आहे. बोरगाव-रेठरे रस्त्यावरील रामलिंग येथील कृष्णा नदीवरील भव्य पूलाच्या उजव्या बाजूला रामलिंग पुरातन मंदिर परिसर तर डाव्या बाजूला कृष्णेचं विस्तीर्ण पात्र व शांत डोह पसरलेला आहे. हे ठिकाण इतक मोहित करणारं आहे की तिथं पोहोचल्यावर कृष्णेच्या शांत आणि मनाला उल्हासित करणाऱ्या पात्रात नौका विहाराला प्रवृत्त व्हायलाच होत.

एकूणच आता नौका विहारासाठी लांबवर कोकणात जायला नको. सांगली जिल्ह्यात एक चांगली व अनोखी अशी नौका-नयनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शांत व विस्तीर्ण कृष्णामाईचा प्रवाह, कृष्णाईच्या काठावरची हिरवीगार शिवारं, निसर्गरम्य वातावरण, रामलिंग बेटावरची पुरातन देवालय आणि नौका-विहार. रोजच्या दैनंदिन जीवनातील तोच-तोचपणा घालवायचा असेल व मनाला चैतन्य प्राप्त करून घ्यायच असेल तर रामलिंग नौका विहाराचा आनंद लुटायला लवकरच जायला हवं.
संपर्क:
रामलिंग बेट नौका विहारासाठी भोजन आदी सुविधेबाबत बालाजी बोटिंग क्लबचे सदस्य धनाजी पाटील (भ्रमणध्वनी-9552940507) किंवा माणिक कारंडे (भ्रमणध्वनी-9594795400) यांच्याशी पर्यटकांनी संपर्क साधावा.
 
ज्वाला नृसिंह
नरसिंहपूर : कृष्णा नदीच्या काठावर नरसिंहाचे पुरातन मंदिर आहे. येथील भुयारात जाण्याच्या पहिल्या पायरीवर एक शिलालेख असून, त्यावर हे मंदिर तीन पिढ्यांनी बांधले असल्याचा उल्लेख आहे. दर्शनासाठी एका वेळी एक व्यक्ती जाऊ शकेल, असा मार्ग या भुयारात आहे. ‘ज्वाला नृसिंह’ या नावाने देवाची ओळख आहे. नृसिंहाने त्याच्या मांडीवर हिरण्यकश्यपूस आडवे घेतले असून, त्याने त्याची बोटे त्याच्या पोटात खुपसली आहेत. काळ्या पाषाणातील अतिशय सुरेख मूर्ती असून, तिच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. ज्याला भुयारातून जाता येत नाही, ते तुळशी वृंदावनाला नमस्कार करतात. तेथे देवाला ठेवलेले पैसे खाली मूर्तीसमोर पडतात. इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. 

शिराळा : हे गाव दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे समर्थ स्थापित ११ मारुतींपैकी एक मारुती, तर दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमी उत्सव. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले हे गाव नागपंचमी उत्सवामुळे प्रसिद्ध झाले आहे. समर्थ स्थापित ११ मारुतींपैकी एक येथे असून, एस. टी. स्टँडजवळच हे मंदिर आहे. सात फूट उंचीची अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे असे आहे. चुन्यापासून बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरसुद्धा उत्तराभिमुखच असून, हनुमानाच्या कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसवलेल्या आहेत. कटिवस्त्र आणि त्याला सुंदर गोंडासुद्धा आहे. मूर्तीच्या डोक्याच्या डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. मंदिराच्या प्राकाराला दक्षिणेकडे अजून एक दार आहे. शिराळ्याचे महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य म्हणून प्रसिद्ध होते.  

शिराळा नागपंचमी

येथील नागपंचमी उत्सव महायोगी गोरक्षनाथांनी सुरू केला, अशी श्रद्धा आहे. या उत्सवाला सुमारे हजार वर्षांची पंरपरा आहे. शिराळ्याचा उल्लेख इसवी सन ९००च्या पूर्वीपासून आढळतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथून पकडून तिवरे घाटातून नेताना त्यांना सोडवण्याचा प्रयत्न शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर झाला होता. किल्लेदार पिलाजी देशमुख आणि त्यांचे सहकारी दीक्षित यांनी हा प्रयत्न केला होता. शिराळा गावामध्ये गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते, की गोरक्षनाथ भिक्षा मागत गावामधून जात असताना ते गावातील महाजन यांच्या घरी गेले असता, तिथे त्यांनी नागाच्या प्रतिमेची पूजा चालू असलेली पाहिली होती. तेव्हा नाथांनी त्यांना प्रश्न केला, ‘जिवंत नाग पाहिलास, तर त्याची अशीच मनोभावे पूजा करणार का?’ त्यावर त्या महिलेनी ‘हो’ म्हणून सांगितले आणि पाहतात, तर खरोखर त्यांच्या घरी जिवंत नाग खेळत होते. त्या वेळी त्यांनी प्रत्येक वर्षी नाग पकडून पूजेला नागपंचमीदिवशी घेऊन येतील असे सांगितले. तेव्हापासून अखंडपणे जिवंत नागाची पूजा शिराळा गावामध्ये केली जाते. नागपंचमीदिवशी मातीच्या व कोतवालांनी पकडलेल्या जिवंत नागांची पूजा आजही येथील महाजनांच्या घरी होते. येथील महिला नागाला भाऊ मानून पूजा करतात. ग्रामदैवत अंबामातेस नारळ फोडून बेंदराच्या सणापासून नाग पकडण्यास सुरुवात होते. मातीच्या गाडग्यात त्यावर लोटके व रंगीत कपड्यांनी झाकून नागांना सुरक्षित ठेवले जाते. आता वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे नागोबा पकडण्यास बंदी आहे. सर्प या प्राण्याची ओळख होण्यासाठी हा उत्सव महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने ही संधी महत्त्वाची आहे. ग्रामस्थ उत्सवानंतर नागोबाला सोडून देतात. त्याची हत्या करीत नाहीत. 
 
चांदोली धरण

चांदोली धरण : सांगली जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारे चांदोली धरण कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पाटबंधारे प्रकल्पातील हे एक मोठे धरण आहे. यावर एक छोटी जलविद्युत निर्मिती यंत्रणाही कार्यान्वित करण्यात अली आहे. तसेच धरणाच्या जलाशयाभोवती निसर्गरम्य चांदोली अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पही आहे. कै. वसंतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून हे धरण साकारले गेले आहे. 

चांदोली अभयारण्य : सांगलीच्या पश्चिम टोकावर चांदोली धरणाच्या मागे असलेल्या पाणीसाठ्याच्या किनाऱ्यावर सर्व बाजूंनी हे अभयारण्य विस्तारले आहे. या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली. २००४मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा व व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. सुमारे ३० हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावर चांदोली अभयारण्य विस्तारले आहे चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही वनश्रीचे दर्शन घेण्यात वेगळाच आनंद आहे. दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो. ‘माउस डिअर’ (गेळा) आणि शेकरू हे प्राणी जंगलात हमखास आढळतात. पट्टेरी वाघ, बिबटे, गवे, सांबर, अस्वले, भेकर, रानडुकरे, साळिंदर इत्यादी प्राणीही येथे पाहायला मिळतात. तसेच हॉर्नबिल, गरुड, होपे, ब्राह्मी काइट असे पक्षीही दिसून येतात. जलाशयात राहू, मरळ, वांब, मळे, कटला या जातींचे मासे आणि मगर असे जलचर प्राणी आढळतात. त्याबरोबरच साप, नाग, घोणस, मण्यार, दिवड, फुरसे, धामण, अजगर असे सरपटणारे प्राणी आढळतात. वारणा नदीचा उगम, रामघळ, वारणा पॉइंट, माकड टोक, कोकण दर्शन पॉइंट, झोळंबीचा सडा, रुंदिवचा धबधबा, अस्वल सडा, वाल्मिकी सडा इत्यादी ठिकाणे निसर्गप्रेमी पर्यटकांना आकर्षित असतात. या जंगलात अनेक प्रकारचे दुर्मीळ जंगली प्राणी पाहण्यास मिळतात. येथील वृक्षसंपदा पर्यावरणप्रेमी व वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी आहे. रामघळीमध्ये समर्थ रामदास येऊन गेले, असे म्हणतात. इतिहासाचे साक्षीदार असलेले प्रचितगड, भैरवगड, कलावंतिणीची विहीर इत्यादी ठिकाणे येथे आहेत. 

चांदोली अभयारण्य


कंधारडोह :
हे सांगली जिल्ह्यातील अवघड, पण निसर्गरम्य ठिकाण आहे. पदभ्रमंती (ट्रेकिंग) करणाऱ्या धाडसी पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जाता येते. परतीसाठी आल्या वाटेने उतरून परत चांदेल, गोठणे धनगरवाड्यामार्गे कुंडी गाव गाठावे किंवा जाणकार वाटाड्या सोबत असल्यास रुंदिवहून पुढे कंधारडोहच्या घळीत उतरून कंधार धबधबा पाहता येईल. 



प्रचितगड

प्रचितगड : शिवरायांनी २९ एप्रिल १६६१ला शृंगारपूर जिंकले. त्याच वेळी कोकणावर नजर ठेवता येईल, असा प्रचितगडही घेतला. १७१०-१२ मधील छत्रपती शाहू महाराज व रामचंद्रपंत अमात्य यांच्या करारात प्रचितगडाचा उल्लेख येतो. नंतर जानेवारी १८१८मध्ये कर्नल प्रॉथरने प्रचितगडाचा ताबा घेतला. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या पश्चिमेला असणारा हा महत्त्वाचा टेहळणी किल्ला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर गावातून या गडावर सह्याद्री पर्वतामधून पायवाटेने जाता येते. साखरपा येथून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते. शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडीक वास्तू असून येथील कातळाच्या कुंडात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. 

मच्छिंद्रगड : वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रगड हा एक छोटेखानी किल्ला आहे. इ. स. १६७६च्या सुमारास छत्रपती शिवरायांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर नाथपंथीय मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर असल्यामुळे या किल्ल्याला मच्छिंद्रगड हे नाव पडले असावे. मच्छिंद्रनाथ मंदिर प्रशस्त असून, विविध शिल्पांनी सजविलेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. इ. स. १६९३मध्ये हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला, तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला. त्या वेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे इ. स. १८१८मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड ताब्यात घेतला. या नावाचा आणखी एक किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे. मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी इस्लामपूर येथून जाता येते. 

बागणी भुईकोट किल्ला


बागणी भुईकोट किल्ला :
दोन-तीनशे वर्षांपूर्वी बाजारपेठ होती. १७व्या शतकात येथे हा किल्ला बांधला असावा. सध्या येथे तटाचे भग्नावशेष दिसून येतात. हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे पीरचा दर्गा असून, मोठा उरूस भरतो. 

बागणी गावचे लोखंडाचं काम करणारे हे शिकलगार गेल्या शेकडो वर्षांपासून हे काम करतायत. घरात आणि शेतात लागणारी धातूची अवजारं ते हाताने घडवतायत. पण त्यांची खासियत, ज्यामुळे लोक त्यांना ओळखतात ते म्हणजे अडकित्ते. वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे, टिकाऊ आणि धारदार.   
   अगदी चार इंचापासून ते दोन फुटापर्यंतचे अडकित्ते ते बनवतात. लहान आकाराचे अडकित्ते सुपारी आणि कात कातरण्यासाठी, खोबऱ्याचे काप करण्यासाठी किंवा सुतळी तोडायला वापरले जातात. मोठे अडकित्ते सोनं आणि चांदीच्या कामात (सोनार आणि सराफ वापरतात) किंवा मोठ्या सुपाऱ्या फोडण्यासाठी वापरतात, ज्याची खांडं बाजारात विकली जातात.
     या शिकलगार कुटुंबाने तयार केलेले अडकित्ते इतके प्रसिद्ध आहेत की लांबलांबून लोक ते घ्यायला बागणीला येतात. अगदी अकलूज, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगोला आणि सांगली या महाराष्ट्रातल्या गावांहून तर लोक येतातच पण कर्नाटकातल्या अथणी, विजापूर आणि रायबागहूनही येतात.  

रेठरे हरणाक्ष : हे गाव प्रसिद्ध लावणीकार, तमाशा फड गाजविणारे पठ्ठे बापूराव यांचे जन्मगाव. लहानपणापासूनच त्यांना तमाशाची आवड होती. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या महिलेशी त्यांचा विवाह झालेला होता. परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. त्यांची एक मजेदार कथा या लेखाचा विषय सोडून देत आहे. पठ्ठे बापूराव तहसील कचेरीत कारकून होते. त्यांच्याकडे एक बाई दस्त लिहिण्यासाठी आली. तिचा दस्त राहिला बाजूला आणि तिच्याकडे बघून त्यांना कविता सुचली!! – ‘तीळ शोभे गोरा लाल, तुझी नथनी झुबकेदार!!’ आणि त्यांनी त्या ओळी दस्तावर लिहिल्या आणि कागद साहेबापुढे तसाच गेला. पुढे काय झाले असेल, याची कल्पना तुम्हास आली असेलच. गायक, संगीतकार, कवी, शाहीर अशा सर्वच भूमिका ते पार पडत होते. पवळा नावाच्या नायकिणीबरोबरच ते अखेरपर्यंत राहिले. 

विटा गजलक्ष्मी

वाटेगाव :
प्रसिद्ध शाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते व लेखक अण्णा भाऊ साठे यांचे हे गाव. कासेगावजवळच पश्चिमेला हे गाव आहे. येथे त्यांचे स्मारक आहे. क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, हुतात्मा किसन अहिर असे अनेक लोक पत्रीसरकारमध्ये क्रांतिकार्य करीत होते. सावकारांपासून भूमिपुत्रांची होणारी पिळवणूकही या आंदोलनाने थांबवली होती. 

कडेगाव : हे गाव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ताबूतांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या १५० वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. विशेष म्हणजे या ताबूतांच्या मिरवणुकीत हिंदूंना मानाचे स्थान आहे. भाऊसाहेब देशपांडे यांनी कडेगाव मोहरमचा पाया घातला व पीरजादे यांनी त्यावर कळस चढविला, असे म्हटले जाते. देशपांडे, सातभाई, हकीम, शेटे, पाटील, आतार, युसूफ बागवान, महंमद बागवान, माईंकर, तांबोळी, कळवात, सुतार, मसूदमाता, शेख असे ताबूत मिरवणुकीत भाग घेतात. ताबूतांची उंची २०० फुटांपर्यंत असते. ताबूतांमध्ये पाच फुटांचे वीस ते पंचवीस मजले असतात. बांबूच्या कळकावर आधारित ताबूतांसाठी सूत, चिखल, ४८ कळकाचे तुकडे, १६ खांब, आठ कैच्या एवढी सामग्री लागते. याची जोडणी करीत असताना कोठेही गाठ बांधली जात नाही. ताबूत रंगीबेरंगी नक्षीकामाने सजविले जातात. अगोदर कळसाकडून पायाकडे अशी त्यांची बांधणी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. 

पारे : सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव विटा या तालुक्याच्या गावापासून नऊ किलोमीटरवर आहे. सोने गाळणे या कारागिरीची सुरुवात विटा गावाच्या उत्तरेस असलेल्या वेजेगावमधील लोकांनी १०० ते १५० वर्षांपूर्वी केली. मुळातच दुष्काळी भाग असलेल्या या गावातील लोकांनी उपजीविकेसाठी मुंबई गाठली व सोने गाळण्याची कला शिकून घेतली. हळूहळू या भागातील लाखाहून अधिक लोक या व्यवसायाशी जोडले गेले. ते सर्व भारतात नव्हे, तर जगात पोहोचले आहेत. त्यांची टुमदार घरे त्यांच्या गावात आता उभी राहिली आहेत; पण ८० टक्के घरे बंद असतात. कारण हे लोक सर्व कुटुंबीयांसह कामाच्या ठिकाणी रहातात; पण त्यांच्या गावाची ओढ मात्र त्यांना असते. विटा गावाच्या आसपासची अनेक गावे, तसेच सातारा जिल्ह्यातील चितळी व आसपासच्या काही भागांतील लोक या व्यवसायात उतरले आहेत. या गावातील व आसपासच्या चार-पाच गावांतील लोक सोने गाळण्याच्या कामात गुंतललेली आहेत. पारे हे गाव खडकाळ डोंगरांमध्ये वसले आहे. त्यामुळे गावातील लोक गमतीने ‘काळ्या पर्वतातील सोन्याची खाण’ असे म्हणतात. अत्याधुनिक यंत्राद्वारे सोने-चांदी रिफाइन करण्याचे कारखाने सुरू झाले; मात्र या पारंपरिक तंत्रापुढे त्याचा टिकाव लागला नाही. 

किर्लोस्करवाडी : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली किर्लोस्करवाडीची स्थापना केली. तेव्हा त्यांनी कुंडल रोड नावाच्या रेल्वे स्टेशनजवळ किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड नावाचा कारखाना सुरू केली. औंध संस्थानचे शासक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी कारखाना व शहर स्थापन करण्यासाठी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना जमीन दान केली. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी युरोप व अमेरिकेमध्ये औद्योगिक नगरीबद्दल वाचले होते. तेथे उद्योगमालकांनी कर्मचाऱ्यांसाठी वसाहती बांधल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी कारखाना व कामगार यांच्यासाठी वसाहत निर्माण केली. तीच आज किर्लोस्करवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. ओतीव नांगराची निर्मिती करीत असतानाच १९२०मध्ये कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली. वर्षभरातच कंपनीचे पहिले डिझेल इंजिन बाजारात आले. १९४१मध्ये भारतात पहिले विद्युत इंजिन कंपनीने तयार केले. 




कुंडल : हे गाव चालुक्यांची या भागाची प्रशासकीय राजधानी होती. या गावाचे प्राचीन नाव कौंडिण्यपूर असे होते. कुंडलचे अस्तित्व १६०० वर्षांहून अधिक जुने असावे. असे मानले जाते, की भगवान पार्श्वनाथ, तसेच अनेक जैन मुनी या भागात येऊन गेले आहेत. कुंडल हे गाव पत्रीसरकारमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात गाजले होते. क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. (बापू) लाड, क्रांतिवीर कॅप्टन आकाराम (दादा) पवार, क्रांतिवीर आर. एस. (मामा) पवार, कॅप्टन रामभाऊ लाड, यशवंत (बाबा) पवार, शंकर जंगम आणि इतर अनेक लोकांची ही कर्मभूमी आहे. 

भिलवडी : हे गाव चितळे दूध डेअरीमुळे प्रसिद्ध झाले आहे. हा दुग्ध प्रकल्प महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा समजला जातो. चितळेंच्या दुग्धवाहक गाड्यांवर ‘श्री कोटेश्वर प्रसन्न’ असे लिहिलेले असते. त्यांची लिंबच्या कोटेश्वराची भक्ती त्यावरून दिसून येते. भारतात म्हशीच्या क्लोनद्वारे कृत्रिम रेतनाचा प्रयोग राबवला गेला. आनुवंशिक कृत्रिम रेतनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आलेल्या या रेडीचे नाव दुर्गा ठेवण्यात आले. आज चितळे उद्योग दुधाबरोबर मिठाई उद्योगातही नावाजला गेला आहे. लिंबच्या अभ्यंकरांबरोबर चर्चा करताना, सध्या सांगलीतील पण मूळचे लिंब येथील धनी वेलणकरांची आठवण निघाली. खरे तर त्यांची माहिती मागील भागातच द्यावयाची राहून गेली. वेलणकरांनी सांगलीत १०० वर्षांपूर्वीच यंत्रमागाची स्थापना करून वस्त्रोद्योगाची सुरुवात केली होती. ते दानशूर होते. अलीकडच्या (सन १९००) काळात सुवर्णतुला झालेले ते एकमेव व्यक्ती होते. 

भिलवडी येथील कृष्णा दगडी घाट वास्तुशिल्पाचा वैशिष्ठ्यपूर्ण नमुना आहे. कृष्णेच्या उगमापासून असा घाट आढळत नसल्याचा उल्लेख केला जातो.घाटाचा इतिहास मोठा रंजक आहे.इसवी सन १७७९ मध्ये मराठा सलतनीचे सरदार श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी बांधला.परशुरामभाऊंचा मुस्लिम सरदाराकडून १६९४ मध्ये पराभव झाला.या घाटाची लांबी सव्वा चारशे फूट आहे.एकशे दोन फूट रूंदी आहे दोन्ही बाजूला चार फूट व्यासाचे चौदा बुरूज आहे.बेचाळीस पायर्‍या आहेत.गावाकडील बाजूस दगडी ओवारी आहे.

ओवरीच्या पाठीमागील बाजूस घाटाच्या मध्यभागातून समांतर असे भुयार आहे. त्यातून महिला नदीपात्रात जात असत.नदीपात्रातील मध्यभागी महिलाच्या स्नानासाठी कुंडे होती.कुंडंच्या खोलगट भागात घोडे,जनावरे यांचे पाय अडकून अपघात होऊ लागल्याने कालांतराने येथे अष्टकोटी मंदीर बांधण्यात आले.त्यामध्ये शंकाराची पिंड आहे.घाटाच्या आणखी वैशिष्टयापैकी ओवारी पाहिले असता तो सपाट भासतो.महापुरातही ओवारी दगड सुस्थितीत आहेत.स्वातंत्र्योत्तर काळात या ओवारीमध्ये गावातील शेतक्री वर्गाच्या धान्याची साठवणूक होत असत.

गेल्या दोन-तीन दशंकात गावकर्‍यांनी या चिरंतन वास्तूच्या रक्षणासाठी काही पावले उचलली.ग्रामस्वच्छता अभियानाच्या पार्श्व भूमीवर या घाटाबाबत जागरूकता आणखी वाढली.कृष्णामाई उत्सव,दीपोत्सव अशा उपक्रमांच्या निमित्ताने घाटची स्वच्छता होते.ऎतिहासिक वास्तू बरोबर गावाची व परिसराची शान असलेला हा घाट चिरंतन प्रतीक आहे.



कसे जाल सांगलीच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला?
विटा, खानापूर, आटपाडी, तासगावकडे सांगलीकडून, तसेच कराडकडूनही रस्तेमार्गाने जाता येते. तसेच इस्लामपूर, शिराळा भागात कोल्हापूर, सातारा सांगलीकडून जाता येते. पश्चिम भागासाठी जवळचे रेल्वे स्टेशन कोल्हापूर हे आहे. सांगली, भिलवडी येथेही रेल्वे स्टेशन आहेत. जवळचा विमानतळ कोल्हापूरला आहे. कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, चांदोली येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. 
 


!! "सागारेश्वर अभयारण्य" !!
भारतातील पाहिले मानवनिर्मित असणारे सागरेश्वर अभयारण्य हे परिवर्तानाच्या वाटेवर " स्वार " आहे.या परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळन केलि आहे.भौगोलिक सोंद्र्याने नटलेल्या या भागात विविध प्रकारचे पक्षी,
व्याग्र(वाघ),सिंह ,तसेच हरिन ,सांबर ,मगर असे अनेक पशु-पक्षी येथे विहार करतात.
येथील कामे पूर्ण झाली असून बालोद्यान,ऍम्पी थियेटर , निसर्ग माहिती केंद्र यासारख्या केंन्द्राकडे पर्यटकांचे व् खास करून लहान मुलांचे आकर्षण आहे . येथे लहान मुलांसाठी सी-सॉ,घसरगुंडी , यासारखे अनेक खेलाच्या वस्तु आहेत .यामुळे अभायारन्याच्या सौंदर्यात भर पडत आहे.त्यामुळे पर्यटकांच्या संखेत लक्षणीय वाढ झाली आहे .
1972 च्या दुष्काळात वृक्षमित्र धों.म.मोहिते,मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतुन सागरेश्वर अभयारन्याची निर्मिती झाली .या अभयारन्यास भौगोलिकदृष्टया अतिशय महत्त्व आहे.
निसर्गाने या परिसरावर मुक्त हस्ताने उधळन केलि आहे .10.84 चौ.किमी असणारी या परिसरात सदाहरित वृक्षांसह अनेक प्रकारची झाडे-झुडपे आणि औषधी वनस्पति आढ़ळतात . यामधे प्रामुख्याने साग,वड ,पिंपळ,लिंब,चेरी,औदुम्बरा यासारख्या औषधि वनस्पति आढ़ळतात.
त्याचबरोबर हे अभयारन्य
हरिनांचे माहेरघर म्हणून ओळ्खले जाते .अरण्यात चितळ ,सांबर यांची संख्या भरपूर आहे .याव्यतिरिक्त अरण्यात मोर ,ससे,कोल्हे ,साळीन्दर,राणडुक्कर ,तरस असे अनेक प्राणी आढळतात.अरण्यात पक्ष्यांचे 155 प्रकार आढ़ळतात.
यशवंतराव चव्हाण
यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्ताने यशवंतरावांच्या लाडक्यासह ,शासनाचेही
लक्ष या परिसराकडे वळले आणि विकास कामांसाठी कोत्यावाधिंचा निधि
उपलब्ध झाला. विकास कामांसाठी जिल्हा नियोजन आयोग आणि यशवंतराव चव्हाण जन्म भूमि विशेष निधि यामधून 6 कोटींचा निधि मिळाला आणि अंतर्गत भागातील भूजल पातली
वाढवन्यासाठी विहिर खुदाई व् बंधारा
बांधून पाण्याची व्यवस्था झाली आहे.आणि जवळ-जवळ 10 हेक्टर परिसरात स्पिन्क्लर बसवण्यात आले आहेत. त्यमुळे प्राण्यांसाठी चारयाची सोय
झाली आहे ,यामुळे चारा आणि पाणी
शोधत भटकनाऱ्या हरिनांच्या मृत्युत घट झाली आहे.
पर्यटकांनां आकर्षित करणारा अभ्यारान्यतिल 'किर्लोस्कर पॉइंट 'येथे समुद्र सपातिपासुन 3860 फुट उंचीवर अन्तरराष्ट्रीय दर्जाचे बाम्बू लॉगट म्हणजे पिट्रीटेड बम्बू सवरक्षक कुटी ,सौर उर्जा पुरवठा तयार करण्यात आला आहे .त्यासाठी 15 लाख रुपयांचा निधि खर्च करण्यात आला आहे.
अभयारण्यात येनाऱ्या पर्यटकांना निसर्गाची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून 45 लाख खर्चून माहिती केंद्राचे काम सुरु आहे .हे माहिती केंद्र अदयावत असून येथे येणाऱ्या पर्यताकांना येथील स्थळाची , पक्ष्यांची , प्राण्यांची , झुडपांची , औषधी वनास्पतिन्न्ची ,तसेच शेतकरीचा मित्र समजला जनाऱ्या सापांच्या प्रजातीं विषयी माहिती दिली जनार आहे.अरण्यात उपलब्ध असणारी जंगली ,निशिगंधा ,आडूळषा ,पानफुटी या औषधी वनास्पतिंची माहिती दिली जनार आहे.
अभ्यारण्याचा सर्वांगीण विकास आणि पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेउन इथे ईमारत बांधकाम सुरु झाले आहे .यामधे वेटिंग रम,युवा गृह ,रहन्यासाठी खोल्या यांचे काम सुरु आहे .अभ्यारान्यतिल प्राण्यांच्या संगोपनावर भर देने गरजेचे आहे.
ताकारी रेल्वे स्टेशन पासून5 किमी अंतरावर तर या आणि जरुर भेट दया.
!! सागरेश्वर अभयारण्य !!
देवराष्ट्रे,
जिल्हा -सांगली
तालुका -कड़ेगांव

एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह (कोड्याचं माळ , योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )

जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध  आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे . युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह ' रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसा हे माहित होत पण बाहेर पडायचं कसा हे माहित नव्हता आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल .
तर मुख्य मुद्दा त्या चक्रव्यूह रचनेचा , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये  दगडावर कोरलेली , जुन्या भिंती चित्रात दिसते .
आणि आपल्या कोड्याच्या माळावरचे ते रचनाकार ठेवलेले दगड हे ती चक्रव्यूह रचनाच आहे , याची रचना मध्ययुगीन भारतात झाली असावी . तेंव्हा सिनेमा , TV , मोबाईल वगैरे काही नव्हते  त्यामुळे  करमणुकीच्या हेतूने याचा उपयोग केला असावा .
आज याठिकाणी tourism साठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो  योग्य नियोजन केले तर लोकांना १ day trip पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि भेटेल .
कोणत्याही गोष्टीत अडकणे सोपं पण बाहेर पडणं खूप अवघड . ती रचना आणि चक्रव्यूह आपणाला तेच शिकवते . बाहेर आता आलं पाहिजे अडचणी असो वा संकट तरच अर्जुन बनता येईल . त्यासाठी श्री कृष्णासारखा सारथी मार्गदर्शक पण आपल्याला नेहमी जवळ ठेवावा लागेल .

ठिकाण -
कोड्याचे माळ
(योगेवाडी / मणेराजुरी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )

माहिती आणि लेखन -
डॉ . शशिकांत पाटील , संदीप पाटील

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...