Thursday, March 21, 2024

पुणे ते पानिपत

 
 या वर्षीच्या सुरवातीला ०३ जानेवारी ते २५ जानेवारी २०१२ रोजी सुमारे २५० जणांनी “ पुणे ते पानिपत ” असा दुचाकीवर सुमारे ६००० किमी चा प्रवास केला. प्रवासात उन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हि मोहीम मावळ्यांनी यशस्वी केली. या मोहिमेचं सगळं श्रेय जातं ते आयोजक डॉ. संदीप महिंद यांना. या २३ दिवसांमध्ये आम्ही शनिवारवाडा – तुळापूर – फुलगाव – वढु बुद्रुक – अहमदनगर – घृष्णेश्वर – संभाजीनगर – जालना – सिंदखेड राजा – बुलढाणा – मुक्ताईनगर – इच्छापूर – बऱ्हाणपूर – खंडवा – रावेरखेडी – ओंकारेश्वर – इंदूर – देवास – उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा – गुणा – शिवपुरी – झांशी – दतिया – ग्वाल्हेर – धौलपूर – आग्रा – मथुरा – दिल्ली – झिंझोली – सोनीपत – पानिपत – कुंजपुरा – कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – अमृतसर - वाघ सीमा – फतेहगढसाहिब – अंबाला – हरिद्वार – नजिबाबाद – मुरादाबाद – रामपूर – बरेली – शाहजहॉपुर – सीतापूर – लखनऊ – अयोध्या – सुलतानपूर – काशी – सारनाथ – अहमदाबाद – सतना – मैहर – कटनी – भेडाघाट – जबलपूर – सिवनी – देवलापार – नागपूर – यवतमाळ – माहूर – नांदेड –अंबेजोगाई – तुळजापूर – सोलापूर – पंढरपूर – पुणे असा लांबलचक प्रवास केला. या २३ दिवसांमध्ये आम्हाला खूप काही बघायला, अनुभवायला आणि शिकायला मिळाले.

या मोहिमेच मुख्य उद्दिष्ट होतं पानिपतवर शहीद झालेल्या मराठी वीरांना श्रद्धांजली देणे. १४ जानेवारी २०१२ ला पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला २५१ वर्ष पूर्ण होत होती आणि त्याचचं निमित्त साधून हि मोहीम काढण्यात आली होती. २५१ वर्षापूर्वी ज्या मार्गाने मराठ्यांच्या फौजा राष्ट्ररक्षणासाठी पानिपतावर गेल्या त्या मार्गानेच आम्ही सर्व गेलो. वाटेत आम्हाला अनेक बरे-वाईट अनुभव आले. माझ्या आयुष्यात करत असलेले हे माझ पहिलचं लिखाणं. त्यामुळे कितीतरी चुका लिखाणात होतील त्या तुम्ही दाखवून द्याव्यात हि नम्र विनंती. पानिपत युद्धामध्ये शहीद झालेल्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांच स्मरण करून लिखाणाला सुरवात करतो.

लेखामध्ये दोन गावांमधील अंतर तसेच बघितल्या ठिकाणांविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. गावांविषयीची माहिती देण्यासाठी विकिपीडियाचा आधार घेतला आहे.

नुकताचं जीवधन ते खडा पारसी असं Valley Crossing आणि खडा पारसी rappel down करून घरी परतलो होतो. रविवार होता आणि सकाळ ची मैत्र पुरवणी वाचत बसलो होतो. दुसऱ्याच पानावर पुणे ते पानिपत भव्य दुचाकी मोहीम अशी बातमी होती. माझ्यासारख्या भटक्यांना अशाच बातम्यांचे वेध लागलेल असतात. मी लगेचचं आयोजकांना फोन केला. आयोजकांनी जेवण व राहण्याची व्यवस्था ते करणार असल्याच सांगितलं. दुचाकीच्या इंधनाचा खर्च प्रत्येकाला करायचा होता. या वेळेस मुद्दामच अशा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता कि कॉलेजला नाही गेलं तरी काही फरक पडू नये. कॉलेज १५ डिसेंबरला सुरु होणार होतं. आता महत्वाचा प्रश्न हा होता कि मोहीम होती ३ जानेवारी ते २४ जानेवारी, बरं, त्याच्या अगोदरच मी सहयांकनला पण जाणार होतो. त्यामुळे ३ दिवस ते कॉलेज बुडणार होतं. घरी मी पुणे ते पानिपत मोहिमेला जाणार असल्याचं घोषित करताच नेहमीप्रमाणे आईने मी आलं तर चालेल का? असा प्रश्न केला. आता आयांना कस सांगणार समजवणार कि तुम्ही बरोबर असला कि मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर किती गदा येतात ते ? मी पण आपलं, आई आम्ही बाईक वर जाणार आहोत, तिकडे खूप थंडी असते, जेवण-खाण्याचे हाल होतात, आणि सगळ्यात शेवटी अगोदर मी बघून येतो आणि मग आपण घरातले सगळेच बघायला जाऊ अस म्हणून एकदाचा विषय संपवला. बाबांनी नेहमीप्रमाणे नकारात्मक भूमिका घेत इतक्या लांबवर कुठे जातोस बाईक वर, आज काल अपघांताच प्रमाण किती वाढलय, तुझं कॉलेज सुरु होणार आहे ना? अशी कारणे सांगून माझे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु केले आणि शेवटी प्रयत्नांना यश येत नाही म्हटल्यावर जपून जा, थंडी वाऱ्याचे कान झाक असे असंख्य सल्ले देत चर्चासत्र संपवल. मी लागलीच त्यांच्या वेबसाईट वर जाऊन फॉर्म डाऊनलोड केला. मित्रांना इतक्या दिवसाची सुट्टी मिळणं शक्य नसल्याने आता आपल्याला एकट्यानेच जाव लागतं कि काय अस वाटत असतानाच स्वागत यायला तयार झाला. त्याच कॉलेज १० जानेवारीला सुरु होत असल्याने पुढे जे होईल ते पुढच पुढे बघू म्हणत आम्ही आमचे फॉर्म पुण्यातल्या माझ्या मित्राला, श्रेयसला भरायला सांगितले. खरं चित्र सह्यांकन पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार होतं. यथावकाश कॉलेज १५ डिसेंबरला सुरु झाले. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी Course Incharge ने तुम्हाला कॉलेज कसं ६ दिवसांपेक्षा जास्त बुडवता येणार नाही, नाहीतर तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र ( Attendance Cert. ) मिळणार नाही, आणि मग तुमचे ३ महिने वाया जातील, आपले नियम कसे कडक आहेत अशी अनेक कारण सांगत घाबरून सोडलं. मला आता पानिपतची मोहिम निघण्याअगोदरच बारगळणार याचे सुतोवाच व्हायला लागले. स्वागत मला दररोज साऱ्या नक्की जायचं ना रे ? म्हणून विचारत होता आणि मी पण हो रे स्वाग्या १-२ दिवसात नक्की सांगतो म्हणून त्याला टाळत होतो. माझ्या आणि त्याच्या सुदैवाने माझा १२ वीचा वर्गमित्रच क्लास चा monitor झाला. म्हणजे उपस्थितीची नोंदवही त्याच्याकडे असणार होती. त्यातच अजून एका मित्राचा १७ ला संध्याकाळी फोन आला कि साऱ्या ३०,३१,१ ला अलंग मदन कुलंग वर जायचं आहे येणार का ? त्याला म्हणालो नक्की नाहीये पण Count me in. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो वर्गातल्या उपस्थितीचा. म्हटलं बघू पहिल्यांदा सह्यांकन तर करून घेऊ पुढच पुढे. यथावकाश सह्यांकन २३ ते २८ डिसेंबर अस पार पडल. कॉलेजला गेलो तर मित्रांनी ३ हि दिवसाची उपस्थिती लावली होती. चला पानिपत मोहिमेला जायचं नक्की होतं होत तर. रात्री असाच Syllabus बघत असताना उपस्थितीची अट ९० % वरून ७५ % अशी शिथिल करण्यात येते अस कळलं. पण त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण आवश्यक होतं. सगळ अंकगणित केल्यावर १५ दिवस आपण गैरहजर राहिलो तरी कॉलेज आपलं उपस्थिती प्रमाणपत्र थांबू शकणार नाही अस लक्षात आलं. आता अजून कॉलेजला दांड्या नकोत म्हणून अलंग मदन कुलंग चा बेत रद्द केला. खूप वाईट वाटलं. तिसऱ्यांदा माझा अलंग मदन कुलंग हुकणार होता. म्हटलं जाऊ दे “ कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है ” ( अस झाल कि असले घिसे पिटे dialogue मारायचे आणि स्वतःच, स्वतःच सांत्वन करायचं. दुसरं असतं काय आपल्या हातात ) आणि अगदी ३ तारखेपर्यंत नियमित कॉलेजला गेलो. एव्हाना मी पानिपतवर बाईकवर जाणार असल्याच कॉलेज मध्ये बऱ्याच जणांना कळल होत. माडया ( अमेय माडकर ) मला म्हणाला साऱ्या बाईक वर चालला आहेस आणि आपलं सगळ करिअर आपल्या शरीरावर अवलंबून आहे. उद्या पडलास, मोडलास तर करिअरवर पाणी सोडावं लागेल. तेव्हा जाताना तयारीत जा. मग माडया, अंगद आणि मी Lamingaton रोड ला जाऊन हेल्मेट, Hand gloves, arm guards, knee guards असं सगळं साहित्य घेऊन आलो. माडया नि बजावलं काहीही झालं तरी हे न घालता बाईक चालवू नकोस. मोहिमेसाठी काय काय घेऊन जावं आणि काय काय नको यावर माझा आणि स्वागतचा बराच उहापोह झाला. शेवटी १०-१२ T-shirts, ४-५ Jeans, मी मात्र सगळ्या ६ pockets किंवा track pant घेणार होतो, कानटोपी, हातमोजे, Goggle, ६ अंतर्वस्त्रांचे जोड , Sandle, Mobile चे chargers, कॅमेरा आणि बरचं काही नेण्याचं ठरलं. T-shirts मात्र येताना बरोबर न आणता वापरून झाले कि फेकून देऊ अस आमचं ठरलं. स्वागतने जाण्यासाठी एक चांगली Haver-sack विकत घेतली. माझ्याकडे एक चांगली sack अगोदरच होती. प्रवासात कायम बरोबर असावी म्हणून आम्ही एक छोटी sack बरोबर घेणार होतो. म्हणजे त्यात महत्वाच्या वस्तू ठेवता आल्या असत्या. मोहिमेच्या ५-६ दिवस आधी मी आणि विश्वजितने आमचं वेळापत्रक तयार केलं. त्यात कुठलं ठिकाण किती किमी अंतरावर आहे, रोजचा प्रवास किती होणार आहे, जेवण कुठे असेल, मुक्काम कुठे असणार अस सगळ्याच विवरण होतं. स्वागत Fazer घेऊन जाऊ म्हणत होता तर माझं मात्र Unicorn घेऊन जाऊ, Fazer कमी सरासरी देते, आणि बसायला पण आरामदायक नाहीये म्हणून चालू होतं. शेवटी नाही हो म्हणत स्वागत Unicorn वर यायला तयार झाला. स्वागतला २८ लाच सुट्टी लागल्यामुळे आता थेट शनिवारवाड्यावरच ३ तारखेला भेटू असं म्हणून त्याने माझा निरोप घेतला.

मोहीम मार्ग :
route.jpg 

दिवस पहिला : ०३ जानेवारी २०१२

अशी सगळी जय्यत तयारी झाल्यावर निघण्याचा दिवस उजाडला. आता उद्या पासून कॉलेज बुडणार असल्यामुळे ३ ला देखील सकाळी कॉलेजला जाऊन उपस्थिती लावली आणि साग्या ( सागर मोरे ) ला म्हणालो साग्या, आता पानिपत ची माझी मोहीम यशस्वी करायचं तुझ्याच हातात आहे. जितकी शक्य आहे तितकी उपस्थिती लावत रहा.अंगद, काका, माडया, मिहीर सगळ्यांचा निरोप घेतला. म्हणालो शक्य होईल तेवढी proxy मारा. तू काही काळजी करू नकोस, बिनधास्त जा, आम्ही सगळ पाहून घेऊ अशी अनेक आश्वासन घेत मी कॉलेज सोडलं. रूम वर पोहचता पोहचता ३ वाजले होते. मोहीम शनिवार वाड्यावरून दुपारी ३ वाजता निघणार होती. मी मनातल्या मनात भारतीय प्रमाणवेळेनुसार मोहीम काही ५ च्या अगोदर निघणार नाही असा कयास बांधला होता. स्वागत सुट्टीला घरी गेला असल्याने तो थेट शनिवारवाड्यातच मला भेटणार होता. बरोबर त्याचा ३ वाजता फोन आला, साऱ्या कुठं आहेस? अरे लोणावळ्यात पोहचलोय आलोस एक तासाभरात. फोन ठेवला आणि हेल्मेट, Hand gloves, arm guards, knee guards, शूज अशी सगळी हत्यारं घालून मी नेरूळ सोडलं. स्वागतचा सारखा फोन येत होता कारण त्याच्या अंदाजाने जास्तीत जास्त तासाभरात मी शनिवारवाड्यावर पोहचायला हवं होतं.
मी पण बाईक १००-११० च्या वेगातच चालवत होतो. सहसा मी एवढया वेगात चालवत नाही पण आज सगळ किट घातल्यामुळे, रस्ता चांगलाच हाताखालचा असल्यामुळे मी बाईक वेगात हाकत होतो. दुपारची वेळ होती NH ४ सामसूम होता. जसा पुण्यात शिरलो तसा वेग बऱ्यापैकी मंदावला. एका सिग्नलला थांबलो असताना मागून एक दुचाकी स्वार आला आणि त्याने माझ्या बाजूला गाडी थांबवली. त्याने हात दाखवला तशी मी हेल्मेट ची काच वरती घेतली.
खूप लांबच्या पल्ल्यावर निघालायसं का?
हो, पानिपतवर
अरे आम्ही पण जातो, ३ मार्च ला आम्ही जम्मू ते कन्याकुमारी ला जाणार आहे , येशील का?
बघू सांगतो तुम्हाला .
त्याचा संपर्क क्रमांक घेतला आणि मी शनिवारवाड्याच्या दिशेने निघालो.
आणि बरोबर १६४० ला शानिवार वाड्यासमोर दाखल झालो. स्टार माझा कार्यक्रमाचे शूटिंग करत होता. स्वागत माझी वाटच बघत होता त्याने माझ्यासाठी जरीपटका आणि ओळखपत्र अगोदरच घेऊन ठेवले होते. आम्ही दोघांनी आमचे सामान तिथे असलेल्या ट्रक मध्ये ठेवले. जवळपास ५०० च्या वर नाव नोंदणी झाली होती. स्वागतचा आदल्यादिवशी रात्री अकलूज वरून पुण्याला येतं असताना बाईकचा अपघात झाला होता त्यामुळे गाडी मला चालवणे क्रमप्राप्त होत. शनिवारवाड्यावर पेशव्यांचे वंशज त्याचबरोबर अनेक मान्यवर मोहिमेला निघालेल्या सदस्यांचे नातेवाईक, आई – वडील असे अनेक लोक उपस्थित होते. मी पोहचल्यानंतर साधारण १० मिनिटांमध्येच कार्यक्रम संपला.

आणि अशा प्रकारे भारतीय प्रमाणवेळेनुसार मोहीम १७२५ ला शानिवारवाड्यावरून मार्गस्थ झाली.

आजचा मार्ग : शनिवारवाडा – तुळापूर – नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, फुलगाव.
अंदाजे अंतर – २८.५ किमी

मोहिमेमध्ये स्त्री वर्ग हि बऱ्यापैकी संख्येने सामील झालेला दिसत होता. साधारण ११० दुचाकी, ५ चार चाकी आणि सगळ्यात शेवटी सामानाचा ट्रक असे साधारण २५० च्या आसपास मनुष्यबळ मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. शानिवारवाड्यावरून निघालेली मोहीम शंभूराजांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबली.
shambhuraje pune.JPG

शंभू राजांना मानवंदना देऊन आम्ही भोसरीच्या दिशेने मार्गस्थ झालो. भोसरी येथील ग्रामस्थांनी मोहीमेचा स्वागत समारंभ आयोजीत केला होता. स्वागत समारंभ आटोपून आम्ही श्री क्षेत्र तुळापूर च्या दिशेने प्रयाण केले. वेळ १९०५.

शनिवारवाड्याविषयी थोडेसे :

शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते शनिवार वाडा पहिल्या बाजीरावाने बांधला. त्याच्या बांधकामाची सुरूवात जानेवारी १०, इ.स. १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वतः लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, इ.स. १७३२ रोजी पूर्ण झाले.
हा वाडा बांधण्यासाठी हीच जागा निवडण्यासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा एक ससा त्या ठिकाणी एका कुत्र्याचा पाठलाग करतांना बाजीराव पेशव्यांच्या दृष्टीस पडला त्यांना तो शुभ शकुन वाटला. येथे वाडा बांधल्यास केव्हाही पराभवास सामोरे जावे लागणार नाही असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्‍यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.
जेव्हां श्रीमंत शाहू महाराजांना कळले की पेशवे पुण्यात मोठा किल्लेवजा वाडा बांधत आहेत, तेव्हा त्यांच्या सरदारांना भीती वाटली की पेशवे शिरजोर होऊ पहात आहेत. तेव्हा शाहू महाराजांनी पेशव्यांना लिहिले की तट मातीचे नाही, छातीचे करायचे असतात..
शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली,अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधॆ असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रूंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो ”. ( विकिपिडीया वरून साभार )

श्री क्षेत्र तुळापूरला पोहचल्यावर ( वेळ २०३०) शंभूराजांच्या समाधीवर प्रत्येकजण नतमस्तक झाला.
तुळापूर विषयी थोडेसे :

तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.पूर्वीचे नाव 'नांगरवास'.
तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. तुळापूर आळंदी पासून साधारण १४ किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
संभाजीमहाराजांचा मृत्यू तुळापूर येथे झाल्याने येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर “ नांगरवास ” गावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोनेनाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या 'नांगरवासास' 'तुळापूर' म्हणू लागले.
मोघल बादशहा औरंगजेबाने संभाजी महाराजांना अटक करून बहादूरगडावर ठेवलं होतं. संभाजी राजे तहाला व धर्मांतराला तयार नाहीत हे पाहून संभाजी महाराजांची वढु-तुळापूर इथे क्रूर हत्या करण्यात आली. महाराजांच्या देहावर अग्निसंस्कार होऊ नयेत असं फर्मान काढून भीमा, इंद्रायणीच्या पात्रात त्यांच्या देहाचे तुकडे फेकून देण्यात आले. जनाबाई नावाची एक स्त्री नदीकाठावर कपडे धुत असता तिने हे दृश्य पाहिलं. गावातील इतर महिलांच्या मदतीने रात्रीच्या अंधारात महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करून तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर त्यावर अग्निसंस्कार करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी महाराजांच्या देहाला स्पर्श केला ते ‘शिवले’ या आडनावाने प्रसिद्ध झाले.
आदिलशहाच्या दरबारातील मुरारजदेवाने रुद्रनाथ महाराजांच्या सांगण्यावरून बांधलेलं संगमेश्वराचं रमणीय देवालय आहे. रुद्रनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यावर तिथे त्यांचं समाधी मंदिर बांधलेलं आहे. तसंच या परिसरात नदीचा घाट सुंदर रीतीने बांधून घाटावर सुंदर मंदिरंही बांधलेली आहेत. रुद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने अंगावरील कोड बरं झाल्यावर हे मंदिर आदिलशहाच्या सेनापती मुरारजगदेवाने बांधलं होतं, असं म्हणतात आणि याप्रसंगी त्याने स्वत:ची तुला करून सोनं दान केलं. म्हणूनच या गावाला तुळापूर नाव पडलं. हा भाग त्यावेळी निजामशाही अमलात शहाजी राजांच्या ताब्यात होता. परंतु मुरारजगदेव शत्रुपक्षाचे सेनापती असले तरी शारीरिक व्याधीने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना रुद्रनाथ महाराजांच्या सान्निध्यात राहून नंतर मंदिर बांधण्याची परवानगी शहाजीराजांनी त्यांना दिली होती. या गोष्टीवरून शहाजीराजांच्या मनाचा मोठेपणाही दिसून येतो. ( विकिपिडीया वरून साभार )

आमचा पहिला मुक्काम होता फुलगाव येथील सैनिक शाळेमध्ये. शाळेमध्ये आम्ही २१०० च्या सुमारास पोहचलो. सगळ्यांची जेवणें झाल्यावर पहिली सभा घेण्याचे आयोजक डॉ. संदिप महिंद यांनी ठरवले. त्यामध्ये सगळ्यांची ओळख परेड झाली. आणि दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. आज सगळ्यांना झोपायला गाद्या होत्या. जेवण देखील चांगले होते. जेवायला लांबलचक रांग लागली होती. स्वतःचा आणि स्वागतचा चेहरा सोडला तर सगळेच चेहरे अनोळखी होते. उद्यापासून सर्व दुचाकी एका ओळीत चालणार होत्या. असे केल्यामुळे रहदारी देखील अडथळा येणार नव्हता आणि मोहीम देखील शिस्तीत चालू राहणार होती. ट्रक मध्ये असलेले सामान दररोज ५ जणांनी उतरवायचे आणि सकाळी ५ जणांनी चढवायचे असे ठरले. गुरुजींनी सगळ्यांना मोहिमेमध्ये राहण्यास बजावले. मोहीम सोडून गेल्यास वं एखाद्या दुचाकीचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे स्वतःवर राहिलं याची सर्वाना कल्पना देण्यात आली.

फुलगाव सैनिक शाळेच्या बाहेर लावलेल्या गाड्या.
phulgaw.JPG

फुलगावामधून निघताना टिपलेला सूर्योदय
phulgaw sunrise.JPG

उद्याचा कार्यक्रम वढु बु., अहमदनगर, घृष्णेश्वर, औरंगाबाद असा होता.
आजचा प्रवास : २८.५ किमी

दिवस दुसरा :०४ जानेवारी २०१२
वढु बु. – अहमदनगर – घृष्णेश्वर - औरंगाबाद

सकाळी ६ वाजता जाग आली. गुरुजी (डॉ. संदिप महिंद ) सगळ्यांना उठवत होते. पहिलाच दिवस असल्याने सगळेजण वेळेत उठले. उठून बघतो तर काय काळे काका योगाभ्यासाचे वर्ग घेत होते. आजूबाजूच्या खोल्यांमध्ये हि कोणी न कोणी योगाभ्यासाचे वर्ग घेत होते. पहिला दिवस का काय असल्याने बऱ्यापैकी लोकं योगा करत होते. मी देखील थोडे काळे काकांबरोबर अंगाला आळोखे पिळोखे मारून घेतले. सकाळी ७ वाजता सगळे एकत्र जमले. मग प्रार्थना झाली. कितीतरी वर्षानंतर अशी प्रार्थना म्हणताना शाळेची आठवण आली. मग वयोमानानुसार रांगा करण्यात आल्या अर्थात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. मग थोडासा सगळ्यांनीच warm-up केला. मग Doctor कोण आहे? Engineer कोण आहे? अशा माणसांची चाचपणी झाली आणि सकाळी ठीक ०८०० वाजता मोहीम फुलगाव वरून वढु बु. च्या दिशेने मार्गस्थ झाली.

०८४५ ला वढु बु. ला पोहचलो. परत एकदा सर्वजण संभाजी महाराजांच्या व छंदोगामात्य कवी कलश यांच्या समाधी पुढे नतमस्तक झालो.
wadhu.JPG
)wadhu paduka.JPGwadhu samadhi.JPGवढु बु. विषयी थोडेसे :
श्रीक्षेत्र वढू, ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीराजे यांची समाधी आहे. ११ मार्च १६८९ ,फाल्गुन अमावस्या, सकाळी १० च्या सुमारास संभाजीराजांना वढू येथील बाजारात आणले. प्रथम कवी कलशाची मान उडवली आणि नंतर संभाजीराजांचे मस्तक धडावेगळे करून शरिराचे तुकडे तुकडे करण्यात आले. वढू च्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत, जीव धोक्यात घालून, भीमा ओलांडून आणि मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिम संस्कार केला. अंतिम संस्कार करण्यापूर्वी ज्या लोकांनी ते तुकडे शिवले त्यांना शिवले असे आडनाव प्राप्त झाले असे म्हणतात. ( आंतरजालावरून साभार )
मोहीम नगरच्या दिशेने
ralley on d way 2 nagar.JPG

ठीक ०९१५ वाजता वढु बु. वरून निघालो व अहमदनगरला १२३० वाजता पोहचलो.अहमदनगरला शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि मोहीम शहरामधून फिरली. अहमदनगरला माझी मावशी व मामा राहत असल्याने स्वागत आणि मी जेवायला मावशीकडे गेलो. मावशीने नेहमीप्रमाणे आता हिंडायचं कमी कर ,घरी जास्त वेळ थांबतं जा अशा सूचना केल्या. मावशीने मस्तपैकी चिकन केलं होत.आम्ही दोघांनी त्यावर आडवा हात मारला. काका, मावशी, मामी, आजोबा सगळ्यांचा नेहमीप्रमाणे माझ्याशी भरपूर गप्पा मारायच्या होत्या. पण वेळ कमी असल्याने परत नक्की येतो असे सांगून आम्ही परत साधारण दुपारी २ च्या सुमारास मोहिमेला येऊन मिळालो.

अहमदनगरविषयी थोडेसे :
अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्त्यनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे आस्तित्व सिद्ध झालेले आहे. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा,सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
.मोगल बादशहा शाहजहान ने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला. शहरात अहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
मराठ्यांच्या कर्तुत्वाचा उदय ज्यावेळी झाला त्यात प्रमुख घराण्यांपैकी विठोजी भोसले, मालोजी राजे भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्यावर फितवा करून मिळू दिल्या बद्दल साक्री आणि रुई ही गावे दौलताबाद ( किल्ले देवगिरी ) वरून इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापुरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापुर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही ह्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि बाजी (तिसरे ) हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्या कडे किल्ले राजगडची तट सरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी आपले पूर्ण योगदान स्वराज्यासाठी अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुषांनी आपला देह हिंदू धर्म रक्ष्यण्यासाठी अर्पण केलेला आहे. आज हि कदमांकडे पारंपारिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्रे जपलेली आहेत. ह्यात धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, धाली, बिचवा, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत. ( विकिपिडीया वरून साभार )

मोहिमेमध्ये सगळ्यात पुढे रुग्णवाहिका असे त्याच्या मागे भारतचा ध्वज असलेली दुचाकी, मग भगवा ध्वज असलेली दुचाकी, मग सरदारांचा ध्वज असलेली दुचाकी.ध्वज असलेल्या दुचाकींच्या दोन्ही बाजूला हातात तलवार घेतलेलं रक्षक असत. शनिवारवाड्यावरून बाहेर पडताना आमची बाईक सगळ्यात पुढे असल्याने रक्षकाची जबाबदारी आमच्या देखील खांद्यावर येऊन पडली होती. आमच्या बरोबर असलेला रक्षकांपैकी एकजण उगाचच मोहिमेला थांबा, हळू चला, पुढे गतिरोधक आहे असे सल्ले देत होता. मी त्याला “स्वयंघोषित कार्यकर्ता” अस नाव पडल. पुढं मोहिमेत तो याच नावाने ओळखला जाऊ लागला :). मोहिमेमध्ये सगळ्यात शेवटी सामान असलेला ट्रक असे. सर्व दुचाकीस्वारांनी रुग्णवाहिका आणि ट्रक या मधेच चालावे असा नियम होता. आता पुढे आमच्या सारख्या नाठाळ मुलांनी तो कितीतरी वेळा मोडला.
दुपारी २ वाजता नगर सोडले असून देखील आम्हाला घृष्णेश्वरला पोहचता पोहचता १८३० वाजले. मोहीम घेऊन जाण म्हणजे काय असत त्याची एक झलक माझ्या लक्षात आली. वास्तविक पाहता नगर औरंगाबाद अंतर ३ तासाचे आहे . पण गाड्यांमध्ये इंधन भरणे, लघुशंका असे या ना त्या कारणाने मोहीम १८३० वाजता घृष्णेश्वर ला पोहचली. मनात वेरूळ लेण्या, औरंगजेबाची समाधी, देवगिरीचा किल्ला अस बरच काही बघायचं होत पण वेळ मिळाला नाही.घृष्णेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही औरंगाबाद येथील गुरु तेग बहादूर लंगरसाहिब गुरुद्वारा मध्ये मुक्कामासाठी पोहचलो. वेळ २०००.


घृष्णेश्वर मंदिराविषयी थोडेसे :

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या पौराणिक ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जिर्णोद्धार केला. सध्याचे आस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. ( विकिपिडीया वरून साभार )

औरंगाबाद मध्ये देखील माझी मावशी राहत असल्याने मी आणि स्वागत मावशीच्या घरी जेवायला गेलो.बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे घर सापडायला बराच वेळ लागला. मावशीला, काकांना मी कितीतरी वर्षाने घरी आल्यामुळे बरे वाटले. मावशीने मस्तपैकी शेवयाची खीर बनवली होती आम्ही परत एकदा जेवणावर आडवा हात मारला. उन्हाळ्यात भाचेकंपनी आली कि राहायला येतो असे सांगून मी मावशीचा निरोप घेतला. आम्ही परत आलो तेव्हा सगळ्यांच नुकताच जेवण आटोपल होत.मेन गेटला कुलूप लावलं होतं आता गाडी कुठ लावायची या विवंचनेत असतानाच संग्राम आला तो पण मित्राकडे गेला होता, मग त्याने गुरुद्वारातल्या एकाला बोलावून आणले आणि आमच्या गाड्या आत मध्ये लागल्या.

औरंगाबाद येथील गुरु तेग बहादूर लंगरसाहिब गुरुद्वारा
aurangabad gurudwara.JPGऔरंगाबाद विषयी थोडेसे :
काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१मध्ये औरंगजेब मोगल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद या छोट्याशा गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबाद हैदराबादच्या निजाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरू झाले.मलिक अंबरने इथे त्याच्या कारकीर्दीत एक पाणी-व्यवस्था उभारली होती, त्याच्या एका भागाचे नाव नहर-ए-अंबरी असे होते. तिचे अवशेष आजही दिसतात. ( विकिपिडीया वरून साभार )

आईला रोजची खबरबात द्यायचं ठरलं होत त्यामुळे, आज दिवसभर काय काय केलं याचं रिपोर्टिंग आई-बाबांना रोज रात्री न चुकता व्हायचं.त्यामुळे उद्या कुठे जाणार आहोत? काय करणार आहोत ? अस सगळं काही सांगायचो.
आज मात्र इथे झोपायला गाद्या नव्हत्या. आम्ही आपली सतरंजी सामानातून बाहेत काढली आणि पथारी पसरली. रात्रीची सभा व्हायची अजून बाकी होती. आज रात्रीच्या सभेत जे एकटेच दुचाकीवर आहेत त्यांनी रहदारीला नियंत्रित करावे असे ठरवण्यात आले. खर सांगायचं तर रात्रीची सभा हा फार मोठा मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा. याच सभांमध्ये कोणाला फेसबुक तर कोणाला गुलाबजामुन, स्वयंघोषित कार्यकर्ता अशी वेगवेगळी नावे पडली.

रात्री ०२३० वाजता दोघजण आले. वाटेत कुत्री थांबल्यामुळे त्यांना यायला उशीर झला होता. आणि त्यातच रस्त्याच्या मध्ये कुत्रं आडवं आल्याने दोघ गाडीवरून पडले होते. पायाला बराच लागलं होत. तशाही अवस्थेत त्याने मोहीम पानिपतपर्यंत पूर्ण केली. या पठ्ठ्याने शेवटपर्यंत घरी सांगितलं नाही. तो पण आमच्यासारखाच वल्ली होता. त्याच्याशी गप्पा मारताना त्याने लिंगाणा प्रस्तरारोहण करताना पाय मोडून घेतला होता हे देखील सांगितलं. स्वागतच्या तर घरी देखील माहित नव्हतं कि महाशय पानिपत मोहिमेवर आहेत ते.

औरंगाबादमधून प्रस्थान
aurangabad dep.JPGसिंदखेडच्या मार्गावर
on d way to sindkhed.JPG

आमचा उद्याचा कार्यक्रम सिंदखेड राजा – मलकापूर मार्गे बुलढाणा – मुक्ताईनगर
आजचा प्रवास : ३१० किमी

तिसरा दिवस : ०५ जानेवारी २०१२
सिंदखेड राजा – मलकापूर मार्गे बुलढाणा – मुक्ताईनगर

आज देखील सकाळी ६ वाजता उठलो, आज चक्क अंघोळ केली :). सर्व काही आवरून ७ वाजता गुरुद्वारा मध्ये जाऊन आलो. आज गाडीमध्ये सामान चढवण्यासाठी ५ जण गेलो. २०० जणांचे सामान चढवताना अक्षरशः घाम निघतो. लोक पण अगदी मुंबई-न्यूयॉर्क प्रवास करत असल्यासारखे सामान घेऊन आले होते. अर्थात सर्वजण नाही पण बरेचजण. नाश्ता म्हणून फोडणीचा भात होता, एकदम मस्त झाला होता. साधारण ०९०० वाजता औरंगाबाद सोडले आणि सिंदखेड राजाच्या दिशेने मार्गस्थ झालो. वाटेत बऱ्याच ठिकाणी मोहिमेच जोरदार स्वागत झाल. गावकरी अगदी प्रेमाने विचारपूस करत होते. गावातल्या स्त्रिया , दुचाकी चालवणाऱ्या स्त्री वर्गाकडे कौतुकाने पाहत होत्या.पण या सर्व सत्कार आणि कौतुक सोहळ्यांमुळे मोहिमेचा वेग मंदावत चालल होता. ११०० वाजता लखुजीराजे जाधवांच्या राजवाड्यामध्ये पोहचलो.

लखुजीराव जाधव राजवाड्याचे प्रवेशद्वार
2 lakhujiraw jadhav rajwada praeshdwar.JPG राजवाड्याचे प्रवेशद्वाराजवळ असलेली तोफ, मागं उत्खननात सापडलेल्या मूर्ती दिसत आहेत.
4 tof.JPGराजवाड्याच्या प्रवेशद्वाराचा मागील भाग
5 rajwadyacha magil bhag.JPGउत्खननात सापडलेली मूर्ती
8 kahi sapadalelei shilp.JPG

आई जिजामातासाहेबांच जन्मस्थान बघितलं. कितीतरी वेळा आपल्या ऐतिहासिक वस्तू बघितल्या कि मन उद्विग्न होत, आपल सरकार या बाबतीत अगदीच उदासीन आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्याला इतका मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असताना. ग्रामस्थांनी मात्र अगदी आपुलकीने चौकशी केली आणि तिथल्या ठिकाणांची माहिती दिली. अशी माहिती ऐकत असताना मन नकळत भूतकाळात निघून गेले. वाटल १६२९ मध्ये जेव्हा राजे लखुजी आणि त्याचे ३ मुलगे अचलोजी, राघोजीराव आणि यशवंतराव यांची निजामदरबारात कत्तल झाल्यांनतर याच वाड्यावर किती मोठी शोककळा पसरली असेल.

राजवाडयाविषयी थोडेसे :
सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्यातील तालुक्याचे ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान.१५७६ साली लाखुजीराव जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले. पूर्वी ते निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते. वाड्याचे बांधकाम १५७६ च्यचं सुमारास झालेला असून जिजाऊसाहेबांचा जन्म याच वाड्यात झाला. वाड्याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून बांधकाम दगडात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी नारळांचे तोरण होय. प्रवेशद्वार तीनमजली असून खाली देवड्या त्यावर नगारखाना त्यावर संरक्षण भिंत उभारलेला सज्जा असे मराठी स्थापत्तीय दरवाजाचे स्वरूप आहे.
मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करताच समोर दगडी बांधकाम केलेले जोते दिसतात. येते जाधवरावांचे निवासाची जागा असावी असे तर्क आहेत. या चौरसाकृती भागाच्या खाली तळघरे आहेत. तळघरात हवा खेळती रहावी म्हणून झरोकेही आहेत. राजवाड्यांच्या नैऋत्येकडील टोकास म्हाळसा महाल होता व या महालातच जिजाऊसाहेबांचा जन्म झाला होता. जिजाऊसाहेबांचा जन्म म्हाळसाबाई यांच्या पोटी हेमलंबी नामसंवस्तर शके १५१९ च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरवारी पुष्य नक्षत्रावर सुर्योदयसमयी( १२ जानेवारी १५९८ रोजी सकाळी ६ वाजता ) झाला. उत्खननात सापडलेल्या उमा महेश यांसारख्या मूर्ती अजूनही वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ आहेत. दगडी नारळांचे तोरण मात्र आता नाही. आता प्रवेशद्वाराची डागडुजी करण्यात आलेली आहे. ( राजवाड्याच्या इथे असलेल्या पाटीवरील मजकूर )

7tutaleli pakali.JPG

वरील चित्रात जे फुल दिसत आहे, त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याची डाव्या बाजूची पाकळी तुटलेली आहे हे लक्षात येते. हे फुल जिथे आहे ती जागा एकदम अंधारात आहे. समजा जर राजवाडा शत्रुपक्षाने जिंकला तर भुयारात शिरायचे आणि हे फुलं जिथे हाताला लागेल आणि त्याची पाकळी जिथे तुटलेली आहे त्या दिशेला वळायचे. त्या दिशेने जाणारे भुयार राजवाड्याबाहेर घेऊन जाते.

6 jijausaheb janmsthan.JPG
याच महालात जिजामातासाहेबांचा जन्म झाला असे म्हणतात.

जिजाऊ सृष्टी
1 jijau srushti sindakhed.JPG2 jijau srushti.JPG

नंतर तिथल्याच एका शिव मंदिरात दुपारच जेवण आटोपून आम्ही मुक्ताईनगरच्या दिशेने प्रस्थान केले. जेवणाचा बेत पण अगदी चपाती, आमटी, शिरा, जिरे भात असा फक्कड होता. आम्ही मलकापूर मार्गे बुलढाणा करून मुक्ताईनगरला पोहचलो. मोहिमेची आणि आमची वाटेत चुकामुक झाली असल्याने आम्ही मोहिमेच्या अगोदर पोहचलो. साधारण ३० मि. च्या अंतराने मोहीम देखील येऊन धडकली. आल्या आल्या सगळ्यांची आपापले भ्रमणध्वनी, कॅमेरे charge करण्यासाठी गर्दी होत असे. आम्ही अगोदरच आल्यामुळे आमचे भ्रमणध्वनी, कॅमेरे charge करण्यासाठी लावले होते. आज जेवायला फक्त भागारच होती. आणि भूक तर सपाटून लागली होती. त्यात भगर पण तिखट होती. आता जिभेचे चोचले नाही म्हणा पण पोटात काहीतरी ढकलण्यावाचून गत्यंतर नव्हते. सगळ्यांचीच अवस्था बऱ्यापैकी वाईट होती. मी एकाला म्हणतच होतो अस उपाशी पोटी झोपण्यापूर्वी गावात जाऊन काही खायला मिळतं का बघून येऊ. तेव्हढ्यात माझ्या मागे बसलेल्या काकांनी मला ४ दशम्या दिल्या. फुलगावच्या रात्रीच्या सभेत काका माझ्याशेजारी बसले होते आणि मी आपला, मी तयार करून आणलेला ठिकाण व त्यामधील अंतरे वाचण्यात दंग होतो. काकांना तो कागद खूप उपयोगाचा वाटला कारण रोज किती किमी जायचं आहे ,दोन गावांमधील अंतरे किती आहेत, आजपर्यंत किती प्रवास झाला, रोजचे जेवण, मुकाम कोणत्या गावात आहे, अस सगळं काही मी तयार केलेल्या कागदावर होतं. काकांनी मला तो कागद मागितला व माझ्या जवळ एक जादाची असणारी प्रत मी काकांना दिली. म्हटलं असू द्या तुमच्याकडे.
गीतेत म्हटलंच आहे कर्मण्येवाधिकारस्ते.....

मुक्ताईनगर विषयी थोडेसे :
मुक्ताईनगर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकारामाच्या पालखी सोहळ्या खालोखाल श्री संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला महत्त्व आहे. संत ज्ञानेश्‍वरांची बहीण मुक्ताईचा पालखी सोहळा मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून सुरू होतो.176 वर्षांची परंपरा असलेला हा पालखी सोहळा मुक्ताईनगर संस्थान चालविते.
9 muktainagar.JPG

आज दिवसभरात २-३ गाड्यांचे अपघात झाले होते. छोटे अपघात तर होणारच होते,,, एका दुचाकीच झालं काय, गाड्या एका रेषेत सरळ चालल्यामुळे पुढच्याने ब्रेक मारला कि मागच्याला देखील ताबडतोब ब्रेक मारावा लागतो. आता एका काकांना तसं करायला जमलं नाही, त्यांनी गाडी बाजूला घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याचं पुढच चाक, पुढच्या गाडीच्या Silencer आणि मागच चाक यांच्या मध्ये घुसल आणि त्यामुळे त्या गाडीचा Silencer बाहेर आला.त्यामुळे मी काहीही झाल तरी आपली गाडी समोरच्या गाडीच्या थोडीशी डाव्या अथवा उजव्या हातालाच ठेवायचो.

आता म्हणा असे छोटे मोठे अपघात होतच राहणार होते. मी तर हेल्मेट, Hand gloves, arm guards, knee guards, shoes अस सगळ घालून असल्यामुळे थोडासा वैतागून गेलो होतो पण माड्याचे शब्द आठवायचे साऱ्या आपल करिअर यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपला मी गपगुमान ते न काढता सगळीकडे फिरायचो. आम्हाला सगळ्यांनाच लोक थांबून थांबून विचारायचे कुठून आलात, कुठे चाललात, आणि सगळेजण अगदी न थकता त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. वाईट एकाच गोष्टीच वाटत अजूनही महाराष्ट्रात लोकांना पानिपतच युद्ध म्हणजे काय ते सांगाव लागतं. मुक्ताईनगर मध्ये सगळ्यात वाईट वाटलं म्हणजे मंदिराच्या बाहेरच असणाऱ्या मैदानात सगळे भाविक सकाळचा कार्यक्रम उरकून येत असतं आणि त्यामुळे सकाळी तिथे खूप घाण वास सुटलेला असायचा. महाराष्ट्र शासन साधी शौचालय बंधू शकत नाही ?
आज देखील झोपायला सतरंज्याच होत्या.आमच्यासारख्या ट्रेकर लोकांच एक बरं असतं सतरंज्या असल्या तरी आमच्यासाठी सोन्याहून पिवळ. पण मोहिमेमधील लोक पण समजूतदारपणे वागत होते. आज रात्रीची सभा वेळेअभावी झाली नाही. सकाळी ससे पकडायला गर्दी होणार हे माझ्या लक्षात आलं आणि त्यात मग केक कापणे असे प्रकार घडणारं. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी मी रात्रीच डब्बा टाकून आलो.

आजचा प्रवास : २६४.५ किमी

चौथा दिवस : ०६ जानेवारी २०१२
इच्छापूर – शहापूर – बऱ्हाणपूर – खंडवा

आज सकाळी ५ वाजताच जाग आली. आज उठल्या उठल्याच फार मळमळतं होत. दात घासल्यानंतर २-३ उलट्या झाल्या. कालच्या भगरीचा प्रताप असणार मनात म्हटलं. सगळ आवरून झाल्यावर मंदिरात जाऊन मुक्ताबाई, ज्ञानेश्वर याचं दर्शन घेतलं. आज सकाळी हेल्मेटच्या ring-lock ची चावी हरवली. सगळीकडे शोधलं. आता एकमेव पर्याय वापरायच ठरलं. जेव्हा सगळ्या गाड्या एका रांगेत उभ्या झाल्या आपल्या ring-lock सारख दुसर कुणाच ring-lock आहे का हे बघायला सुरवात केली आणि शेवटी भोसले काकांच्या ring-lock ची चावी लागली आणि आमच्या दोघांची हेल्मेट निघाले. काकांकडे दोन चाव्या असल्याने एक चावी तुम्हालाच ठेवा काकांनी सांगितलं. चला, आता सगळ्यात पहिल्यांदा गाडीच्या आणि ring-lock च्या बनावट चाव्या बनवाव्या अस ठरलं.

काही फलक, जे खरोखरच तुम्हाला गाडीचा वेग कमी करण्यास भाग पाडतात, मला वाटत हे गतीरोधकापेक्षा वेग नियंत्रणाचे काम चांगल्या प्रकारे करतात.
10 some interesting.JPG

आज आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडणार होतो.
11 aani aamhi maharshtra sodala.JPG
आणि आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडली.
12 madhypradeshmadhe aagaman.JPG

लवकरच आम्ही इच्छापूर गाठल आणि साधारण ०८१७ ला मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केला. मोहिमेबरोबर थांबल तर बरीचशी ठिकाण पाहायची राहून जाणार हे माझ्या लक्षात आल होतं. तेव्हा शक्य तेवढा वेळ मोहिमेबरोबर राहायचं आणि एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असला कि जवळपासचं एखाद ठिकाण बघून यायचं अस माझ आणि स्वागतच ठरलं. जास्त कुणाला सांगायचं नाही कारण मग मोहिमेची संख्या रोडावली असती आणि ती संधी लवकरच आली.

कुठही हि थांबल कि तिथली बच्चेकंपनी गोळा व्हायची आणि मग छायाचित्रण समारंभ पार पडायचा.
असाच एक क्षण (स्थळ : इच्छापूर)
13 bal mitr.JPG

आम्ही बऱ्हाणपूर मध्ये ठीक १०४० ला घुसलो.

बऱ्हाणपूरचे प्रवेशद्वार :
14 barhanpurche praweshdwar.JPG

मुघलांच्या महत्वपूर्ण ठाण्यांपैकी एक असलेले बऱ्हाणपूर अजून हि त्याची तटबंदी राखून आहे आणि बऱ्हाणपूर मध्ये झालेले मोहिमेच स्वागत मला नाही वाटत मोहिमेतील कोणताही सदस्य विसरू शकेल. आम्ही अक्षरशः फुलांच्या वर्षावात न्हाऊन निघत होतो. संपूर्ण रस्त्यांवर फुलांचा खच पडला होता. संपूर्ण शहर आमच्या स्वागताला जमल होत. रस्त्यांवरून जाताना दोन्ही बाजूंनी पुष्पवर्षाव होत होता. सर्व लोक आम्हाला जेवण झाल का ? पाणी हवय का? अशी काळजीने विचारपूस करत होते.संपूर्ण मोहीम या झालेल्या स्वागताने भारावून गेली होती.

बऱ्हाणपूरची तटबंदी :
16 tatbandi.JPG

बऱ्हाणपूरमध्ये स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती.
17 jangi tayari.JPG

दुपारी सभा चालू असताना मी आणि स्वागतने आमचा मोर्चा शाही महाल या किल्ल्याकडे वळवला. आम्ही गावात शिरल्या शिरल्याच गावात पाहण्यासारख काय आहे याची विचारपूस करायचो.

बऱ्हाणपूर विषयी थोडेसे :

बऱ्हाणपूर हा मध्य प्रदेशातील एक जिल्हा आहे. हे शहर ताप्ती नदीच्या उत्तर तटावर स्थित आहे. खुल्दाबाद्च्या बुऱ्हाण उद्दिन गरीब या सुफी संतावरून या शहराचे नाव बऱ्हाणपूर असे ठेवण्यात आले आहे. इ.स. १४०० मध्ये फारुकी सुलतान, नसीर खानने हे शहर वसवले. शेख झैनुद्दिनच्या आज्ञेवरून त्याने या शहराचे नाव बऱ्हाणपूर असे ठेवले. १४५७ मध्ये मिरान अली खान तिसरा हा फारुकी सुलतान सत्तेवर आला. त्याच्या इ.स. १५०१ पर्यंतच्या कारकिर्दीत बऱ्हाणपूर हे व्यापाराचे आणि कापड उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले. इ.स. १६०१ मध्ये मुघल सम्राट अकबर याने खानदेश सुलतानाला हरवून बऱ्हाणपूरवर कब्जा केला आणि बऱ्हाणपूर मुघल साम्राज्याच्या खानदेश सुभ्याची राजधानी बनले. दक्खनच्या मुघल साम्राज्यावर इ.स. १६०९ मध्ये जहांगीरने त्याचा दुसरा मुलगा परवेझ याला नेमले आणि त्याने बऱ्हाणपूरला मुख्यालयाचा दर्जा दिला.
छत्रपती संभाजीने मराठी साम्राज्याच्या सत्तेवर आल्यानंतर बऱ्हाणपूरची लुट करून मुघल सत्तेकला हादरा दिला होता. औरंगजेबाच्या फौजा खानदेशात आणण्यासाठी नंतर संताजी घोरपडे याने बऱ्हाणपूर आणि खानदेश सुभ्यावर हल्ला चढवला होता. पेशवा बाळाजी बाजीराव यांनी हा मुलुख काबीज केला होता. त्यांनी सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्या फौजा पाठवून हैदराबादच्या निजामाचा पराभव केला होता. याच शहराच्या बाहेर असलेल्या अशेरीगढ किल्ल्याला दख्खनचा दरवाजा असे म्हणतात.

शाही महाल किल्ला :

शाही किल्ल्यामध्ये या बाईसाहेब एकदम निवांत बागडत होत्या.
18 kharu tai.JPG

हा किल्ला ८० फुटाच्या उंचीवर वसला आहे. हा किल्ला आदिलखान द्वितीय याने १४५७ ते १५०३ च्या सुमारास बांधला. एकेकाळी हा किल्ला सात मजल्यांची उंच इमारत होता. आता याचे काहीच माजले शिल्लक आहेत.हा किल्ला ताप्ती नदीच्या किनारी वसला आहे. याच भव्य प्रवेश द्वार पूर्व दिशेला ताप्ती नदीच्या दिशेला आहे.महालामध्ये सगळ्यात जुने जतन करून ठेवलेले अवशेष म्हणजे जनाना स्नानगृह. त्याच्या घुमटावर कोरलेली चित्रशैली १७ व्या शतकातील आहे.

स्नानगृहामधील नक्षीकाम :
19 snangruh.JPG

किल्ल्यावरून ताप्ती नदीचे विहंगम असे दृश्य दिसते.

शाही किल्ल्यामधून दिसणारे ताप्ती नदीचे सौंदर्य :
20 tapti nadiche drushy.JPG

दिवान-ए-आम आणि दिवान-ए-खास किल्ल्याच्या वरच्या भागात बांधले गेले होते. किल्ला आता भग्नावस्थेत असल्याने याचे थोडेसेच अवशेष नजरेस पडतात. तरीही किल्ला त्यावरील अप्रतिम कलाकुसरीची साक्ष देतो. किल्ल्यावरील मुख्य आकर्षण हे शाही स्नानगृह आहे जे शाहजहान ने त्याची बायको बेगम मुमताज हिच्यासाठी बांधले होते. तिने याच किल्ल्यामध्ये तिच्या चौदाव्या बाळंतपणात ७ जून १६३९ मध्ये प्राण सोडला. तिला ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर जैनाबाद्च्या प्रसिद्ध बागेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात दफन करण्यात आले होते. किल्ल्याचे ताप्ती नदीला येणाऱ्या पुरापासून रक्षण करण्याकरिता विटा, चुना आणि दगड यांचा वापर करून ताप्ती नदीच्या बाजूला एक भक्कम भिंत उभी केली आहे. या भिंतीची रुंदी १० फुट आहे. हि भिंत ‘नौ गजी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

‘नौ गजी’ -
22 tatanchi padzad.JPG

या भिंतीच्या वरच्या बाजूला भिंतीत उतरणारा एक जीना आहे जो भिंतीच्या आतमधुनच नदीच्या बाजूला घेऊन जातो. या भिंतीला लागूनच एका बुरजाची निर्मिती केली गेली होती. जो आता पडलेल्या अवस्थेत आहे तरीही त्याचा सांगाडा स्पष्टपणे नजरेत भरतो. या बुरुजाला “ममोला” म्हणून ओळखले जायचे. इथून बादशाहाच्या राण्या आणि राजकन्या नदीचे विहंगम दृश्य बघत बसायच्या असे म्हणतात. ‘नौ गजी’ भिंतीच्या महालाच्या दक्षिणेला भव्य हत्ती महाल नजरेस पडतो, जो कि आता बऱ्याच ढासळलेल्या अवस्थेत आहे. या महालाकडे जाण्यासाठी ‘नौ गजी’ भिंतीच्या जवळूनच एक जीना आहे. या महालाच्या वरच्या भागात असलेल्या ३ सुंदर कमानी आजही उभ्या आहेत. इ.स. १६०३ मुघल बादशहाच्या येण्यानंतर त्यांची या ठिकाणी सत्ता कायम राहिली. शाहजहान बऱ्हाणपूरचा सुभेदार होता. इ.स. १६२१ मध्ये तो दक्षिणेकडील आक्रमणाच्या उद्देशाने इकडे आला आणि नंतर कितीतरी वर्षे इकडेच राहिला. या त्याच्या कालावधीत अनेक सुंदर इमारती बांधल्या गेल्या. विशेषतः आग्रा आणि दिल्लीच्या प्रकारातले दिवान-ए-आम बनवले गेले. राजमुकुट धारण केल्यानंतरही ३ वर्षापर्यंत यामध्येच राज्यकारभार केला गेला. औरंगजेब, मोहम्मद शुजा आणि शाह आलम यांनी सुद्धा या किल्ल्यामध्ये निवास केला होता.

शाही किल्ल्याचा आतील भाग :
23 shahi killa aaatil bhag.JPGमहाल :
24 shhi killa mahal.JPG

या किल्ल्यामध्ये अनेक घटना घडल्या. आदिल शाह आजम हुमायूं ने राज्यद्रोही हसामउद्दीन मुगलचा याच किल्ल्यामध्ये खून केला आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर फेकण्यात आले. १०९२ हि. मध्ये किल्ल्याच्या दारू कोठाराला लागलेल्या आगी मध्ये महालाची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली आणि २ खोल्या पूर्णपणे जळून गेल्या. या घटनेवेळी औरंगजेब किल्ल्यामध्ये होता. किल्ल्याच्या तोफखान्याच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. १०३७ हि. मध्ये शहाजहाननी दक्षिणेकडे मिळवलेल्या विजयाचा सोहळा इथेच संपन्न झाला होता. या वेळी शहाजहानने बऱ्हाणपूरला “दासुस सरूर” हि उपाधी दिली होती. किल्ल्याच्या दक्षिण-पूर्वेला काळ्या दगडांमध्ये एक सुंदर मशिद बांधली होती. आता या मशिदीची दक्षिणेकडील भिंत आणि एक मिनार उरला आहे. हा मिनार “लौग” आकाराचा आहे म्हणून या मशिदीला “सलौगी मशिद” म्हणतात.

“सलौगी मशिद”
21 padaki mashid.JPG

या मशिदीमधील फरशी संगमरवराची होती आणि आतमधला भाग चमकणाऱ्या प्लास्टरने आणि सुंदर चित्रांनी सुशोभित केला गेला होता. आता मात्र या मशिदीची बरीच पडझड झाली आहे.
किल्ल्याची डागडुजी चालू होती.

किल्ला बघून झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा जामा मशीदीकडे वळवला.जरीपटका घातलेले दोघेजण मशीदी मध्ये प्रवेश करतानाचे बघून तिथल्या लोकांच्या भुवया उंचावल्याचे माझ्या लगेच लक्षात आले. आम्ही मात्र बिनधास्तपणे आत गेलो. मी माझे सगळे Arm Guards वगैरे काढून ठेवलं. हात पाय आणि तोंड धुतलं आणि आत गेलो. नमाज पडला. अतिशय मंत्रमुग्ध करणारी कलाकुसर आतमध्ये केली होती. आता वाटत त्यावेळी आपटे काका असते तर कितीतरी माहिती त्यांनी दिली असती.

आतमध्ये जाऊन बघतो तो अहो आश्चर्यम् !! चक्क मराठी भाषेत तेथील संस्कृत शिलालेखाचा अर्थ सांगणारा फलक लावला होता.

जामा मशिदीचे प्रवेशद्वार :
25 jama mashij praweshdwar.JPGजामा मशिदीविषयी थोडसं :
इ.स. १६९० मध्ये या मशिदीचा आराखडा तयार झाला होता. पाच वर्ष दिवस-रात्र राबून हि मशीद बांधण्यात आली. हि मशीद दिल्लीच्या जामा मशिदी प्रमाणे बनवली आहे. या मशिदीच्या चारही बाजूला दुकाने आहेत, त्यामुळे ह्या परिसरात सतत वर्दळ असते. मशिदीच्या पूर्वेला प्रवेश करण्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार आहे. याची लांबी ३४ फुट आणि रुंदी १२ फुट आहे. याला जहांगीर बादशाहाच्या काळातले दरवाजे आहेत. पहिल्यांदा हा दरवाजा १२ फुट उंच होता, पण मशिदीचा भव्यपणा बघता तो खुपच छोटा होता १२८२ हि. भोपाळची बेगम सिंकंदर जहां साहिबां हज च्या यात्रेसाठी मुंबईला चालली होती, त्यावेळेस ती २-३ दिवस बऱ्हाणपूरमध्ये थांबली होती. तिला हा दरवाजा मशिदीच्या योग्यतेचा न वाटल्याने जुन्या दरवाजाच्या पुढे जमीन वाढवून नवीन दरवाजा बनवला. याची उंची जवळपास २५ फुट आहे आणि हा संपूर्णपणे दगडाचा बनवलेला आहे, याच्या छतावर सुदर अशी वेल-बुट्टीची कलाकुसर केलेली आहे.मशिदीच्या उत्तर आणि दक्षिणेला दोन हौद आहेत, लांबी ३० फुट आणि रुंदी ३० फुट आहे. यातला एक हौद मशीद बनवणाऱ्या आदिल शाह फारूकी ने बनवला आहे तर दुसरा जहांगीरच्या काळामध्ये अब्दुल रहीम खानने बनवला आहे. या हौदांमध्ये लालबाग खुनी भंडारा येथून भूमिगत असलेल्या नाल्यांद्वारा पाणी येत असे, आता हि रचना बंद पडली आहे. आता या हौदांमध्ये नळाद्वारे पाणी भरले जाते. मशिदीच्या उत्तरेला आणि दक्षिणेला दोन मीनार आहेत. या भव्य मीनारांची उंची १३० फुट आहे
(जमिनीपासून कलशांपर्यंत).

मीनार :
26 jama mashid manora.JPG

मीनारांच्या वर जायला चक्राकृती शिड्या आहेत. मीनारांच्या वरून संपूर्ण शहराचं दर्शन होत. या मशिदीचे मीनार दिल्लीच्या जमा माशिदीपेक्षा उंच आहेत.
हि मशीद “संगेखारा” नावाच्या दगडांपासून बनवलेली आहे. असे म्हणतात कि , या मशिदीच्या बांधकामासाठी मांडवगडच्या डोंगरांवरून हे दगड मागवले होते. दगड मागवण्यासाठी जेवढा खर्च झाला होता तो त्यावेळच्या सोन्याच्या किमती बरोबरीचा होता. हि सुंदर मशीद १५ शानदार कमानींवर उभी आहे.

27 jama mashid aatmadhun.JPG

प्रत्येक कमानीच्या स्तंभाच्या वरच्या भागात सुंदर सूरजमुखी फूल कोरलेले आहे.
30 surajdani phul.JPG

मशिदीची आतमधील लांबी १४८ फुट आणि रुंदी ५२ फुट आहे. हि मशीद ७२ स्तंभांवर उभी आहे. या स्तंभांची जाडी १.५ फुट असून उंची ५.५ फुट आहे. छताची उंची १५ फुट आहे. दगडांना एकमेकांवर असे रचले आहे कि जसे जसे दगड ठेवत जाऊ तस तसे कमानींच्या बरोबर छत तयार होत जाते. कमानी स्वतः छत आहेत आणि त्याचा आधार पण आहेत. अशा प्रकारचे छत संपूर्ण भारतात क्वचितच बघावयास मिळते.

29 jama mashid dalan.JPG

मशिदीच्या लांबीत ५ दालनं तर रुंदीमध्ये १५ दालनं आहेत. लांबीच्या मध्ये असलेल्या एका दालनामध्ये ५०० लोकं सहजपणे नमाज पढू शकतात. प्रत्येक दालनाच्या वरती खिडक्या आहेत. भिंतीची जाडी ५ फुट आहे. भिंतीच्या वरच्या बाजूला चारही बाजूंना दगडांवर सुंदर नक्षीकाम केलेल आहे.

28 korivkam.JPG

बाहेरच्या बाजूला भिंतीची लांबी २५ फुट आहे. भिंतीवर पणत्या ठेवण्यासाठी देवड्या बनवलेल्या आहेत. मशिदीच्या आतमध्ये भिंतीवर १५ कमानी आहेत. प्रत्येक कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, मशिदीच्या मध्य भागातील कमानीवर आश्चर्यकारक असे नक्षीकाम केलेले आहे. मशिदीच्या मध्यभागी असलेल्या कमानीवर अरबी भाषेमध्ये एक लेख कोरलेला आहे.

27 shilalekh.JPG

हा लेख आदिलशाहच्या युगामधला आहे. या मध्ये कुरण मधल्या ओळींचा अर्थ,ज्यामध्ये मशीद निर्माण केले जाण्याचे महत्व, निर्माणकर्ता बादशाहचे नाव, इमारतीची सुंदरता, मशीद बनवल्याची तारीख आणि शेवटी लेख खोदणाऱ्याचे नाव आहे.

दुसरा लेख मशिदीच्या कोपऱ्यातील कमानीच्या वरच्या भागात आहे, या लेखामध्ये सुद्धा कुरण मधल्या ओळींचा अर्थ, फारुकी बादशहाची वंशावळ आणि शेवटी मशीद बनवल्याची तारीख आहे.
तिसरा लेख, दुसऱ्या अरबी लेखाच्या खाली आहे. हा संस्कृत आणि प्राचीन देवनागरी लिपी मध्ये कोरलेला आहे. हा सहा ओळींचा आहे.
'' स्वस्ति श्री संवत्‌ 1646 वर्षे, शके 1511 विरोध संवत्सरे पौष, मास, शुक्ल पक्षे 10 घटिस है का हश्या, शुभ 24 योगे वाणिज्य करणे। स्पिन दिन रात्रि, घटी 11 समय कन्या लगने श्री मुबारक शाह सुत श्री एदल शाह राज्ञी यसी तिरियं निर्माता स्वधर्म पालनार्थम ''। हा लेख बादशाहाच्या धर्मनिरपेक्षतेच प्रतिक आहे. याच प्रकारचा संस्कृत आणि अरबी मध्ये असलेला लेख अशीरगढच्या जमा मशिदीमध्ये देखील आढळतो.
चौथा लेख दक्षिणेकडील मीनारवरती आढळतो. हा लेख फारसी भाषेमध्ये आहे. यामध्ये अकबर बादशाहाच्या बऱ्हाणपूर येण्याचे, अशीरगढच्या विजयाचे त्याचबरोबर बहादुरशाह फारूकी च्या आज्ञापालनचे वर्णन आहे. यानंतर अकबर बादशाहाच्या लाहोरला झालेल्या रवानगीचे वर्णन आहे.आणि शेवटी हा लेख लिहिणाऱ्या मोहम्मद मासूम चे नाव आहे. या लेखावरून असे कळते कि अशेरीगढच्या विजयानंतर अकबराने बऱ्हाणपूरला १ महिना २० दिवस आराम केला होता. शेकडो वर्षे झाल्यानंतर देखील इमारतीमध्ये कुठे भेग अथवा पडझड दिसून येत नाही.

रस्त्यांवरून मोहीम निघाली कि लहान –थोर घराघरांमधून डोकावून बघू लागायचे, असाच बऱ्हाणपूरच्या रस्त्यावर टिपलेला क्षण :
31 lahan thor kutuhal.JPGजैन मंदिर, बऱ्हाणपूर :
32 jain mandir barhanpur.JPGबऱ्हाणपूरची मजबूत तटबंदी :
33 barhanpur tatbandi.JPG

साधारण १३०० च्या सुमारास आम्ही बऱ्हाणपूर सोडलं. मोहीम कुठल्यातरी गल्लीत घुसली आणि इकडे आम्ही थेट खंडवा रस्तायला लागलो होतो. वाटेत एका ठिकाणी झाशीच्या राणीचा सुंदर असा अश्वारूढ पुतळा होता. खंडव्याला जायला रस्ता कुठला असे तिथल्या एका पानपट्टीच्याच्या दुकानावर विचारले.
आणि घाट चढायला सुरवात होते न होते तोच माझ लक्ष उजव्या हाताला असलेल्या डोंगराकडे गेले.
स्वाग्या........ किल्ला ...................

स्वाग्या........ किल्ला ...................
“चल वर जाऊया” आम्ही दोघांनी एकदमच म्हटले
लागलीच गाडी उजवीकडे वळवून आम्ही किल्ल्याकडे निघालो. वाटेतच आम्हाला आमचे भविष्यातले साथीदार संग्राम आणि रोहन भेटले ते दोघे पण किल्ला बघण्याकरिता वरती निघाले होते.
आयला ,,,, आपल्यासारखे पण आहेत कि ... मी स्वाग्याला म्हणालो
वरती पोहचलो.

अप्रतिम किल्ला होता नाव होत असीरगढ ....
आम्ही फक्त एक तास किल्ला बघत होतो. किल्ला निवांत बघायचा म्हटला तर कमीत कमी ३ दिवस हवेत. वरून आम्हाला मोहीम जात असलेली दिसली.
८०-९० गाड्या एका मागून एक जात होत्या. गुरुजी किल्ल्याची माहिती सांगत होते. आमच्या कानावर मात्र त्यातलं, उजव्या बाजूला असीरगढ दिसत आहे ,,,एवढंच आल.
जे कोणी सह्याद्रीचे भक्त मोहिमेमध्ये असतील त्यांचा नक्कीच जीव कळवळला असणार .

असीरगढ विषयी थोडेसे :

हा किल्ला बऱ्हाणपूर पासून २२.४ किमी वर आहे. खंडव्याच्या दक्षिणेला ४८ किमी वर आहे. बऱ्हाणपूर-खंडवा मार्गावर उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो. गाडी अगदी वर पर्यंत जाते. रस्ता मात्र बऱ्यापैकी खराब आहे.
जमीनीपासूनची उंची : २५९.१ मी

असीरगढच्या अधिक प्रचि : http://www.maayboli.com/node/35649

हा “ दख्खनचा दरवाजा ” म्हणूनदेखील ओळखला जातो. किल्ल्यावरती जामा मशीद तसेच शंकराचे देऊळ आहे.
आशा अहिर नावाच्या जाटने किल्ला बांधल्यामुळे नाव असीरगढ पडले आहे असे म्हणतात.पूर्वी किल्ला ‘आशा अहिर गढ’ या नावाने ओळखला जायचा कालांतराने त्याचा असीरगढ असा अपभ्रंश झाला.
हा किल्ला सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसला आहे. बऱ्हाणपूरला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देण्यामागे या किल्याचे फार मोठे योगदान आहे. या किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ७०१ मी आहे. हा किल्ला पूर्वी जंगली क्षेत्रामध्ये येत असे. आता तिथे काही जंगल नाहीये. किल्ल्यावर थोडीफार झाडी आहे. पाण्याची ३ मोठे तलाव आत मध्ये आहेत.हा किल्ला तीन भागांमध्ये विभागला जातो. १.असीरगढ २.कमरगढ ३. मलयगढ .याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फुट असून उत्तर-दक्षिण रुंदी १८०० फुट आहे. किल्ल्याच्या तटांची उंची ८० ते १२० फुट आहे.
फिरोजशाह तुघलकाचा शिपाई मलिक ख़ाँचा मुलगा नसीर ख़ाँ फ़ारूक़ी याचा या किल्ल्यावर डोळा होता. तो बऱ्हाणपूरला आला. त्याने आशा अहिरची भेट घेतली व त्याला सांगितले कि "मेरे भाई और बलकाना के ज़मीदार मुझे पेरशान करते रहते हैं, एवं मेरी जान के दुश्मन बने हुए हैं। इसलिए आप मेरी सहायता करें और मेरे परिवार के लोगों को इस सुरक्षित स्थान पर रहने की अनुमति दें, तो कृपा होगी"

आशा अहिर उदार मनाचा होता त्याने नसीर ख़ाँ च्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याला किल्ल्यामध्ये राहायची परवानगी दिली. नसीर ख़ाँ नी पहिल्या काही डोल्यांमध्ये बायका मुलांना पाठवले आणि नंतरच्या डोल्यांमध्ये हत्यारधारी शिपाई पाठवले. आशा अहिर आणि त्याची मुलं त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. जसा डोल्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला, शिपायांनी डोल्यांमधून अचानक बाहेर पडून बेसावध आशा अहिर आणि त्याच्या मुलांना ठार मारले. आणि अशा प्रकारे किल्ला नसीर ख़ाँ फ़ारूक़ीच्या अधिपत्याखाली आला. आदिलशाह फ़ारूक़ीच्या मृत्युनंतर बहादुरशहा फारुकी सत्तेवर आला.

अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त यवढा होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारूगोळ्याचा मारा सुरु केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशाहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले. अशा प्रकारे कुटनीतीने अकबराने फारुकी बादशाहाला कैद केले.

"यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने-चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे १७ जानेवारी १६०१ ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला.

अकबराने बहादुरशहा फारुकीच्या मुलांना व बहादुरशहा फारुकीला बंदी बनवले. बहादुरशहा फारुकीला ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये तर त्याच्या मुलांना इतर वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये बंदी म्हणून ठेवले गेले. ज्या प्रकारे फारुकी बादशहाने कुटनीतीने किल्ल्यावर सत्ता स्थापन केली होती तशाच प्रकारे किल्ला त्याच्या हातामधून गेला. अशा प्रकारे मुघलांचे बऱ्हाणपूरवर आणि असीरगढवर साम्राज्य आले आणि फारुकी वंश नाश पावला. अकबर नंतर १७६० ते १८१९ पर्यंत किल्ला मराठ्यांच्या हातात होता. त्यानंतर किल्ला इंग्रजांकडे आला.
अभेद्य मानल्या जाणाऱ्या किल्ल्यांमध्ये याची गणना होते.

‘मदार दरवाजा’च्या समोर काळ्या दगडामध्ये अकबर, दानियाल, औरंगज़ेब आणि शाहजहाँचे चार फारसी भाषेमधील शिलालेख आढळतात. या शिलालेखांवर किल्ल्याच्या किल्लेद्वारांवर विजय प्राप्त करणाऱ्यांचे, सुभेदारांचे आणि इतर वर्णन आहे. शाहजहाँच्या शिलालेखावरून ज्ञात होते कि इथे काही वास्तू त्याने बनविल्या.
१५८० मध्ये राजा अली खानने (आदिलशहाने) किल्ल्यावर जामा मशीद बांधली. (याबद्दल देखील वाद आहेत.)
‘मदार दरवाजा’ राजगोपालदास या सुभेदाराने बनवला होता. आतमध्ये जाताच जमा मशिदीचे दोन मीनार स्पष्टपणे नजरेस पडतात. कोणेकाळी किल्ल्यावर शेती केली जात असे. हि मशीद पूर्णपणे काळ्या दगडांमध्ये बनवलेली आहे. हि मशीद फारुकी शासकांच्या वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हि मशिद बऱ्हाणपूरच्या जामा मशिदीच्या ५ वर्षे अगोदर बांधण्यात आली. हि मशिद ९३५ फुट लांब आणि ४० फुट रुंद आहे. ५० खांबांवर याचे छत तोलले गेले आहे. या मशिदीमध्ये एकाचवेळेस १२०० माणसे सहज नमाज पढू शकत होती. मशिदीच्या मध्यभागी अरबी भाषेमधला शिलालेख आहे ज्यामध्ये मशिदीचे निर्माण वर्ष ९९२ हिजरी असे अंकित आहे.

असा हा किल्ला नीट बघायचा म्हटल्यास कमीत कमी ३ दिवस हवेत.
परत असीरगढ बघायला चांगले ४-५ दिवस काढूनच यायचं, असे मनातल्या मनात ठरवत अशेरीगडाचा निरोप घेतला.
किल्ला बघून आम्ही साधरण ६ च्या सुमारास मोहिमेत येऊन मिळालो. अगोदर ठरल्याप्रपणे मोहिमेला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यास रात्र झाल्यास, रात्री गाडी चालविताना सर्वानी उजवा दिशादर्शक चालू ठेवावा असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला मोहीम सापडण्यास मदत झाली.
संग्राम आणि रोहन पण आमच्याबरोबरच किल्ला बघून निघाले. आम्ही साधरण १५३० च्या सुमारास किल्ला बघून निघालो. मोहीम बरीच पुढे गेली असल्याने आम्ही दुचाकी ९०-१०० नेच मारत होतो.
१७०० वाजले तरी मोहीम दिसायची चिन्हे दिसेनात. आपण रस्ता चुकलो तर नाही ना अशी हि शंका यायला लागली.संग्राम आणि रोहन पण पुढे आहेत कि मागे राहिलेत ते कळतं नव्हते.

शेवटी एकदाची मोहीम दिसली, आमच्या जीवात जीव आला. आजचा मुक्काम बढवाह या ठिकाणी होता.
सर्वानुमते उद्या भल्या पहाटे ओमकारेश्वराचे दर्शन घ्यायचं ठरलं. आज रात्रीच्या सभेत गुरुजींनी असीरगढ या किल्ल्याविषयी माहिती सांगितली. दररोज रात्रीच्या सभेत गुरुजी कुठल्यातरी विषयावर माहिती सांगत असत. आज रात्री परत एकदा जेष्ठ आणि श्रेष्ठ लोकांनी आम्हाला मोहिमेत पुढ राहू द्यावं असा मुद्दा मांडला. खर सांगायचं तर आम्हाला देखील यामध्ये काही अडचण नव्हती पण व्हायचं काय हि लोकं दुचाकी फार हळू चालवत असत आणि त्यामुळे दोन वाहनांमधील अंतर वाढत जायचे आणि मोहीम मारुतीच्या शेपटासारखी लांबलचक व्हायची. त्यामुळे हा मुद्दा मागं पडला. आता थंडी देखील वाढत चालली होती. लोकांच्या कानटोप्या, हातमोजे, पायमोजे अशा अनेक गोष्टी बॅगांमधून बाहेर आल्या होत्या, आज परत काळे काकांनी मला योगासाठी सकाळची ठराविक २०-३० मि. द्या मि सगळ्यांना योगा शिकवत जाईन. असा मुद्दा मांडला पण आता थंडी चांगलीच वाढत चालली होती आणि नव्याची नवलाई देखील संपली होती. त्यात योग करायला कोण उठतो. माझ्यासारखे आळशी घोडे तर सकाळी उठून थेट दुचाकीवर स्वार होत आणि मग कुठेतरी चहाची टपरी बघून चहा होई आणि अंगात थोडी उब आली कि मग दात घासणे, तोंड धुणे इत्यादी सोपस्कार पार पडत असत. आज तर झोपायला गाद्या आणि रजई होती आणि हे बघितल्या बघितल्याच आमच्या सारख्यांचा तोल ढळला आणि आम्ही लगेच सभागृहात घुसून मित्रांसाठी जागा पकड, mobile charging ला लाव असे उद्योग करायला लागलो. आमचे असे माकड चाळे बघीतल्यावर गुरुजींनी सगळ्यांना बाहेर हुसकावले आणि जेष्ठ ते कनिष्ठ असा न्याय करत आम्हाला सगळ्यात शेवटी सभागृहात प्रवेश मिळाला. रोहन आणि संग्रामनी काळेकाकूंकडे हातमोजे, पायमोजे नाहीत हे बघून त्यांना ते घेऊन दिले.

आजचा प्रवास : १९०.३ किमी
उद्याचा प्रवास : ओंकारेश्वर – सानवाड – भेडीया – रावरखेडी - सानवाड – भेडीया – इंदूर –देवास

पाचवा दिवस : ०७ जानेवारी २०१२

ओंकारेश्वर – सानवाड – भेडीया – रावरखेडी - सानवाड – भेडीया – इंदूर –देवास

काल ठरल्याप्रमाणे सगळेजण सकाळी ५ लाच उठले. आज ओंकारेश्वराच दर्शन घ्यायचं असल्याने मी दात घासले, हात पाय तोंड धुतलं आणि अंतकरण शुद्ध असल म्हणजे झाल अस म्हणत दुचाकीवर स्वार झालो. “अंतकरण शुद्ध असल म्हणजे झाल” यावर बऱ्याच लोकांच एकमत झालेलं दिसत होत. आणि आम्ही सगळे ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेर पोहचलो. अतिशय सुंदर अस सूर्योदयाच दृश्य तिथल्या पुलावरून दिसत होत.

31.JPG31DSCN1913.JPG
खळाळत वाहणारी नर्मदा:

31DSCN1917.JPG

नर्मदा खळाळत वाहत होती. मनात म्हटलं नर्मदामाते अशाच एका प्रातसमयी मी माझी नर्मदा परिक्रमा सुरु करेन. माझ्या मनात आहे नर्मदा परिक्रमा करायचं पण करवून घेणारी तूच आहेस तेव्हा लवकरात लवकर तो क्षण येऊ दे म्हणजे झाल. इतर मंदिरांप्रमाणेच ओंकारेश्वराच मंदिर होत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले या मंदिराच्या परिसरात हि अस्वच्छतेचा कळस होता. नर्मदेच्या काठावर अनेक भाविक (???) लोक स्नान करून नर्मदेच पाणी दुषित करत होते.

31DSCN1920.JPG
मला तर त्या ठिकाणी पाण्यात उतरण्याच्या कल्पनेने पण अंगावर काटा आला आणि सर्वात विशेष म्हणजे छायाचित्रणाला बंदी नव्हती.

ओंकारेश्वर विषयी थोडेसे:

१२ ज्योतिर्लिंगांपैकी १. खंडवा ते ओंकारेश्वर – ७२ किमी.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या बरोबर येथे अमलेश्वर ज्येतिर्लिंग पण आहे.
राजा मान्धाताने या बेटावर कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले. भगवान शंकर प्रसन्न झाल्यवर त्यांना याच ठिकाणी निवास करण्याचे वरदान मागितले. तेव्हापासून हे क्षेत्र ओंकार-मान्धाता नावाने ओळखले जाऊ लागले.
नर्मदा परिक्रमेला येथूनच बहुतांशी लोक सुरवात करतात. अहिल्याबाई होळकर यांनी १८,००० मातीची शिवलिंगे बनवून त्यांची पूजा करून याच ठिकाणी त्यांना विसर्जित केले होते.

अशीच टुकारगिरी:
31DSCN1944.JPG

सकाळी सकाळी काही लहान मुले–मुली शाळेला निघाले होते. मी त्या निरागस चेहऱ्यांचे काही भाव टिपण्याचा प्रयत्न केला.
31DSCN1948.JPG31DSCN1952.JPGपुलावरुन दिसणारं ओंकारेश्वराच मंदिर:
31DSCN1954.JPG

सरदारांचा ध्वज बघून तेथे राहणारे सरदार लोक धावत आले आणि मोहिमेची विचारपूस केली.

31DSCN1960.JPG

मोहिमेची आवरा-आवर चालली असताना हे पिल्लू दिसलं:
31DSCN1963.JPG

सगळ्यांच दर्शन होता होता ०९४० वाजले आणि मोहिमेने रावरखेडीच्या दिशेने प्रस्थान केले.

रावरखेडीच्या मार्गावर:
31DSCN1965.JPG

वाटेत बेडिया लागलं. मिरचांची मध्य प्रदेश मधील बेडिया हि सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे.
जिकडे बघाव तिकडे नुसता लालभडक मिरच्यांचा बाजार दिसत होता.
31DSCN1969.JPG31DSCN1976.JPGवाटेत लागलेली हिरवीगार शेतं :
31DSCN1977.JPG

मनात आल बर झाल आईला घेऊन नाही आलो नाहीतर आत्ता मिरचांच एक पोत मागं बांधाव लागल असत. हौशी कलाकारांनी मिरचांची खरेदीपण केली. आता आम्ही रावरखेडीच्या रस्त्याला लागलो होतो. आयुष्यात मी बघितलेला सगळ्यात खराब रस्ता असेल तो. आमच्या कितीतरी गाड्या या रस्त्यावर पडल्या. कल्याणगड, मधु-मकरंदगडावर जाणारे रस्ते कितीतरी पटीने चांगले म्हणायची वेळ आली होती.

मोहीम रावरखेडीमध्ये घुसताना :
31DSCN1980.JPGफोटू काढायची हौस भारी :
31DSCN1983.JPG

गावामाधली पोर-टोर, वयस्कर मंडळी, बायका सगळेजण मोहिमेकडे, पु. लं. च्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे जितक्या नजरेने पाहू शकते तितक्या वेगवेगळ्या नजरांनी आमच्याकडे बघत होते.

गावात घुसलेल्या मोहिमेकडे कुतूहलाने बघताना चिमुरड्या :
31DSCN1995.JPG

आमचे मावळे मात्र चिखलात रुतलेल्या गाड्या काढण्यात आणि उरलेले त्या गाड्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होते.
31DSCN1999.JPG

सरतेशेवटी १२०० वाजता आमची मोहीम श्रीमत बाजीराव पेशव्यांच्या छत्री च्या इथे पोहचली आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा .... विजय असो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

श्रीमत बाजीराव पेशव्यांच्या छत्री प्रवेशद्वार :
31DSCN2002.JPG31DSCN2007.JPGश्रीमत बाजीराव पेशव्यांच्या छत्री :
31DSCN2014.JPGमोहिमेला माहिती सांगत असताना गुरुजी:
31DSCN2023.JPGछत्रीच्या तटबंदीवरून दिसणारी नर्मदा:
31DSCN2032.JPG31DSCN2036.JPGश्रीमंत बाजीराव पेशव्यांबद्दल थोडेसे :
वडील : बालाजी विश्वनाथ
जन्म : इ.स. १७००
पेशवेपदाची सूत्रे हातात घेतली : १७२०
मृत्यू : २७ एप्रिल १७४०
दक्षिणेपासून दिल्ली पर्यंत जरब बसवणारे महान मराठा सेनापती.
विजय : मालवा , गुजरात , दक्षिणेकडील सुभेदार , निजाम त्याचबरोबर दिल्लीच्या बादशहा आणि पोर्तुगीजांना हरवले.गुजरातचे गायकवाड , नागपूरचे भोसले , ग्वाल्हेरचे शिंदे ( सिंदिया ), धारचे पवार, इंदूरचे होळकर यांना एकत्र आणून मराठा संघ बनवला.ग्वाल्हेरचे शिंदे (सिंदिया) सरदारांनी रावरखेडी येथे त्यांची समाधी बांधली.

१२५० ला आम्ही समाधी सोडली आणि इंदूरच्या दिशेने प्रस्थान केले. वाटेत बराच चिखल असल्याने स्वागत गाडी हळूहळू बाहेत काढत होता आणि मी नर्मदेच्या पाण्यात मासे पकडण्यात मग्न असलेल्या बगळ्याचे फोटो काढण्यात गुंतलो होतो.

याच्यासाठी केला होता अट्टाहास :
31DSCN1990.JPG31DSCN1986.JPG

Pond Heron Aka वंचक
31DSCN2056.JPG

गाडी बाहेर आल्यावर स्वागतने मला आवाज दिला, सारखा क्लच आणि ब्रेक दाबून तो पण वैतागला होता. त्यामुळे गाडी मी चालवायला घेतली. काही क्षणातच मला आपल्या हातात gloves नाहीयेत हे लक्षात आल. स्वागतला म्हणालो तू थांब जमल तर मोहिमेबरोबर पुढे जा मी आलोच समाधीच्या इथे gloves बघून. मनात म्हणालो लागला आता ३०० रु. ना चुना.
परत पुलावरून जाताना सहज मगाचच्या बगळ्याकडे नजर फिरवली. तो अजून मासे टिपण्यात दंग होतो.
आणि मलाच माझ हसू आल बरोबर बगळ्याच्या मागे ज्या दगडावर बसून मी बगळ्याचे फोटो काढत होतो तिथेच दोन्ही gloves पडलेले होते. पटकन गेलो gloves घेतले. स्वागत बहुतेक माझ्यावरच लक्ष ठेऊन असावा. त्याला माझे gloves मिळाल्याच लक्षात आल.

आता इंदूर गाठायचं होत. मोहीम जेवणासाठी वाटेत थांबणार होती. आम्हाला शक्य होईल तितक्या लवकर पुढे जाऊन इंदूर मधला होळकरांचा राजवाडा बघायचा होता. वाटेत भूक असह्य झाल्याने एका हॉटेलमध्ये पोट शांत केले आणि पुढे निघालो.
गाडी चालवता चालवत आपल्या गुंगी येत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी गाडी बाजूला घेतली. स्वागत ला गाडी चालवायला दिली आणि जेवल्या जेवल्या पटकन डोळा लागण्याच्या माझ्या सवयीला येथेच्छ शिव्या घातल्या. स्वागत गाडी चालवत होता आणि मी मागे त्याला धरून झोपलो. मधूनच गाढ झोप लागायची आणि तोल जायचा मग स्वागत मला येथेच्छ शिव्या घालत अरे झोपू नको म्हणून सांगायचा आणि माझ परत येरे माझ्या मागल्या सुरु व्हायचं.

( विशेष सूचना : चालत्या दुचाकीवर झोपणे अतिशय धोकादायक आहे, कृपया कुणीही असा प्रयत्न करून बघू नये Happy )

इंदूरमध्ये पोहचलो तेव्हा १७१५ वाजले होते. थोडा चहा नाश्ता करून आम्ही होळकर राजवाड्यासमोर पोहचलो. राजवाड्यासमोरच पोलीस काका उभे होते. मग परत एकदा त्यांनी आम्हाला आमचा पोशाख पाहून कुठून आला, कुठे निघालात असे बरेच प्रश्न विचारले आणि शेवटी राजवाडा १७०० वाजताच बंद होतो अस सांगितलं. मी बाहेरून होता होईल तेवढा राजवाडा न्याहाळला.

राजवाड्याचा दर्शनी भाग :
31DSCN2063.JPG31DSCN2067.JPGप्रवेशद्वार
31DSCN2068.JPG31DSCN2070.JPGराजवाड्याविषयी थोडेसे :

इंदूर मध्ये असलेला राजवाडा हि माळव्याच्या मराठ्याच्या उत्कर्ष काळातील भव्य इमारत आहे.
१७४७ च्या आसपास मल्हारराव होळकरांनी आपल्या परिवाराला राहण्यास्ठीच्या उद्देशाने या वाड्याची उभारणी केली होती. १८०१ मध्ये सिंदिया सेनापती सर्जेराव घाटगेने हा राजवाडा जाळला. १८१८ ते १८२६ च्या दरम्यान आगीपासून वाचलेल्या प्रवेशद्वाराच्या वरचे ५ माजले परत ठीक करण्यात आले.या कार्यामध्ये होळकरांचे पंतप्रधान तात्या जोग यांनी महत्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारे १८२६ ते १८३३ च्या मध्ये या इमारतीची डागडुजी पूर्ण झाली. दुर्दैवाने १८३४ मध्ये परत आग लागून लाकडाने बनवलेला पूर्ण एक मजला खाक झाला. १८४४ ला तुकोजीराव द्वितीय ला दत्तक घेतले गेले तेव्हा त्यांचा पहिला राजतिलक समारंभ पण याच वाड्यात झाला. १९८४ मध्ये याचा मागचा भाग जाळून गेला. त्यामुळे राजवाड्याचे आता ३ वेगवेगळे भाग नजरेत येतात. पहिले तीन मजले दगडांचे बनवलेले असून राजपूत शैलीची छाप असलेले आहेत. चौथ्या पासून सातवा मजला मराठा शैलीची छाप असलेला आहे. यामध्ये लाकडी कलाकुसरीचा जास्त प्रमाणात समावेश आहे. स्थापत्यकलेच्या दृष्टीने मुस्लीम , राजपूत, मराठा स्थापत्यशैलीचे मिश्रण आहे. याचा दक्षिण भाग मुघल स्थापत्य , पूर्व भाग मराठा स्थापत्य शैलीचा आहे.गणेश सभागृह, दरबार सभागृह फ्रेंच स्थापत्यशैलीचे आहे. प्रवेशद्वाराची शैली हिंदू शैलीच्या राजवाड्यासारखी दिसून येते. याच्या दर्शनी भागातील खिडक्या दर्शनीय आहेत. वास्तूचा दक्षिणी भाग वास्तूचे वारंवार पुनर्बांधकाम झाल्याची साक्ष देतो. वास्तूच्या र्निमिर्तीमध्ये दगड आणि चुना यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. काष्ठ शिल्पाचा कलात्मकरित्या उपयोग करण्यात आला आहे.

बर इथे अजून काय बघण्यासारखे आहे हे विचारल्यावर प्राणी संग्रहालय आहे अशी माहिती मिळाली. मग आमची स्वारी प्राणीसंग्रहालयाच्या दिशेने निघाली. प्राणीसंग्रहालयात पोहचता पोहचता १८०० वाजले. चौकशी केल्यावर प्राणीसंग्रहालय १८३० बंद होत असल्याचे कळले. बर आत जाव तर तिकीट कुंतर पण बंद झाल होत. आम्ही मग आमच्या कार्यकर्त्यांना ( संग्राम आणि रोहन ) फोन लावला तर दोघेही त्याच भगत असल्याच कळल. मग आम्ही त्यांची वाट बघत प्राणीसंग्रहालयाशेजारीच थांबलो. १५ मि. जोडी आली. मग आम्ही परत एकदा पोटात पाणीपुरी,भेळ अस बरच, आईच्या भाषेत सांगायचं झाल तर अबरट-चबरट खाल्लं आणि मोहिमेत असलेल्या धीरजदादाला फोन केला. धीरजदादाने गोड बातमी दिली. मोहीम इंदूरवरून न जाता इंदूरच्या बाहेरच्या रस्त्याने देवासच्या दिशेने निघाली होती. आम्ही चौघे परत एकदा देवासला जायचा रस्ता कुठला ? अस विचारत देवासच्या रस्त्याला लागली. मला तर कधी एकदा इंदूर सोडतोय अस झाल होत. भिक्कार traffic, अहो पुण्यातल traffic परवडल. आणि सरतेशेवटी आम्ही इंदूरमधून सुखरूप बाहेर पडलो. आयुष्यात काही लोकांबरोबर आपली wavelength इतकी का जुळावी ? आणि काहींबरोबर का जुळू नये ? याला काही उत्तर नसत. (हे पण पु.लं.चच बर का )

तसंच आमच संग्राम आणि रोहन बरोबर झालं. शेवटी एकदाचे आम्ही मोहिमेला येऊन मिळालो.
मोहिमेचं वडा-चटणी वर ताव मारणं सुरु होतं. आम्ही देखील मग पोट भरेपर्यंत वडे हाणले. उरलेले वडे एका बॉक्स मध्ये भरून घेतले आणि ट्रकमध्ये ठेवले. उद्याच्या नाष्ट्याची तयारी, दुसर काय ?

आजचा मुक्काम महाराष्ट्र समाज, देवास येथे होता.

आजचा प्रवास :१९५ किमी
उद्याचा प्रवास: उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा

सहावा दिवस : ०८ जानेवारी २०१२

उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा

नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता मोहीम निघाली. आता बाबा रामदेव भक्त कमी होऊन निद्रादेवी भक्तांची संख्या भलतीच वाढली होती. थंडी भरपूर असल्याने पहिल्यांदा आम्हाला नाव ठेवणारे पण आता आमचं अनुकरण करायला लागले होते. सकाळी देवास मधील दत्तमंदिरात माथा टेकवून सर्वजण उज्जैनच्या दिशेला निघाले. सकाळी ठीक ०९४५ ला मोहीम उज्जैनला पोहचली.

उज्जैनविषयी थोडेसे:

उज्जैन (उज्जयिनी) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे. या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिवयांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.
मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे.
मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोक ची राजधानी हीच.
चंद्रगुप्त दुसरा उर्फ विक्रमादित्याची हि सांस्कृतिक राजधानी होती.

उज्जैनची वेगवेगळी नावे :

अवंतिका
पद्मावती
कुशस्थळी
भगवती
हरण्यावती
कंडकत्रिंगा
कुमुदवती
प्रतीकल्पा
विशाळा
(आंतरजालावरून साभार)

आज रविवार असल्याने उज्जैन मधील मंदिरात भरपूर गर्दी होती. सगळ्यांनी दर्शन करायचं म्हटलं तर ५-६ तास सहज लागले असते. तेव्हा सर्वानुमते शाजापुरला निघायचं ठरलं. भक्तगण बरेच हळहळले, काहीजण कळसाच तरी दर्शन घेतो म्हणून आत धावले आणि आम्ही मात्र जागेवरूनच जय बम बम भोले म्हणतं जागेवरूनच हात जोडले. नसते उपद्व्याप सांगितलेत कुणी. त्याच्या मनात असलं तर होईल परत कधीतरी आयुष्यात दर्शन म्हणून मी विषय सोडला. आज मला चक्क गाडीच्या आणि हेल्मेट lock च्या चाव्या बनवायच्या आहेत याची आठवण झाली आणि आम्ही दोघा चौघांनी आपल्या गाड्यांच्या चाव्या बनवून घेतल्या. मोहीम पुढं निघून गेली होती. उज्जैन सोडता सोडता आम्हाला १०४५ वाजले.
नदीवर धुक्याने पांघरलेली चादर
4DSCN2126.JPG

काकांचा फोटो यासाठी, कि या अवलियाने एकट्याने पुणे ते पानिपत मोहीम दुचाकी वर पार केली.
4DSCN2128.JPG

अजून असेच एकजण मोहिमेत होते त्यांनी तर चक्क Activa वर हि मोहीम पूर्ण केली. एकाने त्यांना मजेने विचारले कि काका, Activa पोहचणार का पानिपातपर्यंत, तर ह्यांचे उत्तर – Activa भूतान पर्यंत जाऊन आलीये, पानिपत तर फारच जवळ आहे, पुढचा गपगार
आणि हद्द म्हणजे काळे काकांची त्यांनी आपल्या सौ ना घेऊन हि मोहीम पूर्ण केली. काळे काकांनी यापूर्वी “ भारत जोडो ” हे बाबा आमटेंनी केलेले आंदोलनात पण भाग घेतला होता. त्यामध्ये त्यांनी जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास सायकलवर केला होता.
काय कलंदर माणसं असतात एक एक. ( आणि आमच्या पिताश्रीना वाटतं, त्यांचाच मुलगा कलंदर आहे :))

आता पुढचा थांबा होता शाजापूर. बऱ्हाणपूर तसेच अजून एक दोन ठिकाणी झालेल्या सभांमध्ये थोड धर्मांध(????) वातावरण निर्माण झाल होत. त्यामुळे काही जण घाबरले होते. तर काहीना हिंदू – मुस्लीम अशी दंगल तर व्हायची नाही ना अशी भीती वाटायला लागली होती. याचाच परिणाम कि काय आज काहीजण मोहीम सोडून गेले. तशी मोहिमेला गळती औरंगाबाद मधूनच लागली होती. काहींना झोपायची तर काहींना इतर व्यवस्था पसंत पडली नव्हती. आयुष्यात सर्वच काही मनासारखे होत नाही याची त्या व्यक्तींना कदाचित जाण नसावी. मला तर काहीच काळजी नव्हती कारण सभांमध्ये मी नसल्यामुळे नक्की काय झाल हे मला माहित नव्हत. तर काहींच्या मते आपण पानिपतपर्यंत जाऊ आणि नंतर येताना गुजरात, राजस्थान करत येऊ अस चालल होत. असाच एक जण मोहीम सोडून गेला आणि त्याचा मित्र दीपकची जबाबदारी मी घेतो या अटीवर दिप्या माझ्याबरोबर राहिला. शाजापुरच्या सरस्वती विद्यालयामध्ये आज दुपारच जेवण होत.

आम्ही शाजापुरला १२३० ला पोहचलो. आसपास बघण्यासारख काहीच नसल्यामुळे आज आम्ही मोहिमेबरोबर होतो. शाजापूरमध्ये हि आमचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आल. कितीतरी वेळा वाटत काय संबंध होता त्या लोकांचा? महाराष्ट्रापेक्षाही जोरदार स्वागत आम्ही इतर राज्यांमध्ये अनुभवलं.

स्थळ : शाजापूर, मोहिमेतील एक क्षण
4DSCN2103.JPG

मोहीम अक्षरशः फुलांच्या वर्षावात न्हाऊन निघत असे
4DSCN2104.JPG

गावामधून आज मोहीम फिरणार होती म्हणून थोडा आराम करावा या हेतूने मी शाळेवर परत आलो. दुपारचे १४०० वाजत होते. नुकतेच आमचे सेनापती निखील्रराजे अंघोळ करून बाहेर पडत होते, हे बघून मला देखील अंघोळ करायची खुमखुमी आली आणि मी अंघोळ करण्यासाठी नळाखाली बसलो आणी नळ सुरु केला. अंगावर एखाद्याने बर्फ ओतावा तसं झाल आणि आपण उत्साहात येऊन भलतीच चूक केली आहे याची जाणीव झाली आता दुसरा काही मार्ग नव्हता. अशावेळी माघार घेऊन चालणार नव्हतं. कशीबशी अंघोळ उरकली.

शाजापूर सोडता सोडता मोहिमेला १६०० वाजले. सभांमुळे मोहीम मंदावत होती हे जरी खरे असले तरी गावातले लोकच आमच्या पोटापाण्याची सोय बघत असल्याने सभांना थांबण्यावाचून दुसरा उपाय नव्हता.

शाजापूर मध्ये उशीर झाल्याने मोहीम जोरातच निघाली होती. त्यामुळे सारंगपूर आलं कधी आणि गेलं कधी याचा काही पत्ताच लागला नाही. ( नाही हो, या वेळेस गाडीवर झोपलो नव्हतो मी )

संध्याकाळी ०७३० ला ब्यावरामध्ये आमच आगमन झाल. सरदार लोकांनी चक्क ढोल-ताशांच्या गजरात आमचं स्वागत केलं. प्रत्येकाला श्रीफळ-हार. आयोजन करणाऱ्या संदीप गुरुजींना त्यावेळी मला साष्टांग दंडवत घालावे असे वाटले. कधी कधी ज्यांची आपली साधी ओळख देखील नाही अशी माणसं आपल्याला मदत करतात. आज देखील आम्ही दमदमासाहिब पातशाही दसवी गुरुद्वारा, ब्यावरा येथे राहायला होतो. आज जेवायला खिचडी होती. ती देखील आमच्याच सदस्यांनी बनवलेली. खरंतर थोडीशी करपली होती पण अन्नाला नाव ठेऊ नये जे मिळेल ते गोड मानून खाव हे बाबांचे शब्द आठवून मी ती खाल्ली. आणि तिथे असलेल्या शेकोटीवर मस्त ऊब घेत बसून राहिलो. आज देखील रात्रीची सभा झाली नाही. आज मुक्कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचल्यामुळे सगळेच दमले होते. त्यात गावांमधून मोहीम जात असली कि सारखे क्लच आणि ब्रेक दाबून बोट घाईला यायची आणि आता तर थंडी असल्यामुळे काही विचारू नका.

मस्त पैकी शेकून झोपायला गेलो तर अगोदरच तिथे कुणीतरी पसरले होते. त्यामुळे मी आपला बाड-बिस्तरा घेऊन दुसरी जागा शोधायला लागलो. तेवढ्यात दुसरे एक काका झोपायला त्यांच्या दुसऱ्या एका मित्राबरोबर निघून गेले आणि त्यांच्या जागी मी आपला बाड-बिस्तरा पसरला.थंडी भयानकच असल्यामुळे जमीन पण चांगलीच थंड झाली होती. सगळेजण जर्किन, स्वेटर इत्यादी घालूनच झोपत असत. आम्ही देखील झोपताना पायमोजे, हातमोजे, कानटोप्या घालायचो. आज विशेष असं काही बघायला मिळालं नाही. शाजापूरमधेच आज बराच वेळ गेला. असो कधीतरी असाही दिवस घालवण्यात मजा असते. नेहमीप्रमाणे आई-बाबांना फोने केला. आज काही जास्त सांगण्यासारख नव्हतचं, त्यामुळे फोन लवकर आटोपला आणि जाऊन पडी मारली.

आजचा प्रवास : २२२.९ किमी

सातवा दिवस : ०९ जानेवारी २०१२

गुणा – शिवपुरी

आज थंडीमुळे सगळेजण उशिरा उठले. मी देखील सकाळी ०७०० ला उठलो, सगळ आवरून झाल्यावर गुरुद्वारामध्ये जाऊन माथा टेकून आलो. हे अस करायला मला खूप आवडत. कधी मशिदीमध्ये जाऊन नमाज पढून या, कधी चर्च मध्ये जाऊन गुडघे टेकवून या, असलं सगळ करण्यात काहीतरी वेगळ वाटत. आज मस्तपैकी जिलेबी होती नाश्ता म्हणून.

मी ०७४० ला गाडी ला starter मारून गाडी गरम करायला थोड्या वेळ चालू ठेवली.
तेवढ्यात अमर आला. चल बे साऱ्या चहा मारून येऊ. चल, मी म्हटल.
जवळच चहाची टपरी होती. त्याच्या मागेच पेट्रोल पंप होता.
थंडीमुळे आम्ही दोनदा चहा प्यालो. तेवढ्यात रुपेश,स्वागत,स्नेहल (मुलाचं नाव आहे हे ) आले.
मग परत सगळ्यांनी चहा घेतला. मग कांदा-पोहे कार्यक्रम पार पडला. मी टपरी वाल्याला म्हणालो ,
“भैया, ९ चाय और ५ प्लेट पोहा, कितना हुआ”?
५७ रु
क्यां ?????????
मुंबई येवढयासाठी १०० ची नोट सहज गेली असती.
मला क्षणभर विश्वासच बसला नाही, अजूनही चहा ३ रु ला मिळतो आणि पोहे ५ रु प्लेट असू शकतात हे मला माहितीच नव्हत. बिहारी आणि उत्तर प्रदेशमधील मुंबईमध्ये का येत असतील याची मला आता चांगलीच कल्पना आली.
म्हणूनच प्रवास करावा, त्यामुळे आजूबाजूला काय परिस्थिती आहे याची जाणीव होते. नाहीतर आपण आपल्याच कोशामध्ये इतके गुरफटलेलो असतो कि आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे याची कल्पनाच नसते.
आमच्या मोहिमेने मग त्याच्या पोह्याचा फडशा पडला.

जवळच पेट्रोल पंप असल्याने सगळ्यांनी मग आपापल्या दुचाकींमध्ये आपापल्या पैशाने इंधन भरले Happy .
मोहीम ज्या पेट्रोल पंप वर थांबायची, त्या पंप मालकाची मात्र चांगलीच चंगळ व्हायची.
पहिल्या दिवशी गाडीने सरासरी चांगलीच दिली होती (५५.५६ किमी/ली). दुसऱ्या दिवसापासून मात्र सरासरी फारच कमी झाली. त्यातच ४-५ जणांकडून आपले पेट्रोल चोरीला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मग मात्र आम्ही दररोज साधारण ५०० रु. चच पेट्रोल टाकत असू. उगाच रिस्क कशाला. खर-खोट देव जाणे.

आज मात्र थंडीने कहर केला होता संपूर्ण रस्ता धुक्याने भरला होता. मोहीम ४० च्या वेगाने हळूहळू पुढे सरकत होती. आता मध्य प्रदेशमधल्या रस्त्यांचा अनुभव घेत होतो. २-३ किमी चा रस्ता चांगला असायचा आणि मधेच २-३ फुट खोल खड्डा यायचा, या असल्या रस्त्यांमुळे मोहिम काही वेग घेईना. वाटेतच लोक थांबून चहा पिऊन परत दुचाकीवर स्वार होत होते. १००० वाजता सुर्यदेवानी दर्शन दिल.

अशाच एका गावात झालेलं मोहिमेच स्वागत :
4DSCN2145.JPG

वाटेत एका गावात चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यकर्त्यांनी त्यावर येथेच्छ ( विशेषतः पारले-जी वर ) ताव मारला. आम्ही आमच्या नेहमीच्या शैलीत गावात घुसताच आसपास एखाद बघण्यासारखं ठिकाण आहे का याची चौकशी केली. हे गुगलपेक्षा भारी, खोट नाही सांगत, अनुभव आहे आणि खबर लागली, मिळालेल्या माहितीनुसार गावापासून १२ किमी अंतरावर बजरंग गड म्हणून एक भुईकोट किल्ला होता. नेहमीप्रमाणे आम्ही मोहिमेला सोडून किल्ला बघण्यासाठी निघालो. यावेळेस मात्र आमच्याबरोबर रुपेश, स्नेहल, अमर आणि बन्या होते.

आम्ही बजरंग गडावर १२३५ ला पोहचलो. गडावर आतपर्यंत जाण्यासाठी पक्की सडक आहे. गडाचा विस्तार प्रचंड आहे. गडाला लागूनच नदी वाहते. नदीच्या पलीकडेदेखील टेहळणी बुरुज आहेत. पागा, राहण्याची ठिकाण अजून शाबूत आहेत.अनेक ठिकाणी वेगवेगळी सांकेतिक चिन्ह होती. शंकर, गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गडाविषयी माहिती देणारा फलक मात्र दिसला नाही.बुरुज अजूनही चांगल्या स्तिथीत आहेत. मंदिराच्या समोरच एक मोठी तोफ आढळते.साधारण १४०० च्या सुमारास आम्ही गड सोडला. आज गड बघायला मजा आली. अगदी मनसोक्तपणे मी गड बघून घेतला. संपूर्ण तटबंदीवरून फेरफटका मारून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळला. गडावर कुठेच माहिती देणारा फलक दिसला नाही. गुगल वर पण बरंच शोधल पण या गडाविषयी काही माहिती सापडली नाही. कुणाला माहिती असेल तर सांगा.

बजरंग गड

4DSCN2148.JPG4DSCN2163.JPG4DSCN2167.JPG4DSCN2176.JPG4DSCN2208.JPGकिल्ल्याच्या बाहेर असणारे टेहेळणी बुरुज:
4DSCN2223.JPGबाजूची तटबंदी
4DSCN2262.JPGकिल्ल्यावर असलेली एकमेव तोफ :
4DSCN2283.JPGकिल्ल्याच्या बाजूलाच असलेला बगीचा
4DSCN2290.JPG

तिथे शेजारीच माणसांच्या पूर्वजांचे एक कुटुंब बसले होते. आता गपगुमान तिथून जाव कि नाही, तर अमरला हुक्की आली, साऱ्या मी माकडांना पलीकडून हुसाकावतो, तू त्यांनी उडी मारली कि त्यांचा हवेतच फोटो काढ, आता काय म्हणावं या माकडाला. त्याला त्याच्या विचारांपासून परावृत्त करण्यात बराच वेळ गेला. जर का माकडांनी मनात आणल असत तर त्यानीच आम्हाला तिथून हुसकावून लावलं असतं. पण “ आ बैल मुझे मार ” अशी विचारसरणी असलेल्याला, मला हसावं का रडावं तेच कळत नव्हतं. शेवटी असाच एक टाईमपास म्हणून त्या माकडांच्या कुटुंबाचा फोटो घेतला, तेव्हा कुठ आमच माकड शांत झाल.

गडावरून गाड्या बाहेर काढताच होतो तेवढ्यात २-३ लहान मुलं आली, त्यातल्या एकाच्या हातात एक सुंदर फुल होते. त्या फुलाचे मग फोटो सेशन झाले. त्याला सहजच मी गमतीने घेऊन जाऊ का हे फुल म्हणालो, तर चक्क हो म्हणाला. कोण या मुलांना हे शिकवत काय माहिती ? आपल्याकडे मात्र लोकांना घ्यायचच माहित असतं.

हेच ते फुल ( कुणाला नाव माहित आहे का? )
4DSCN2313.JPG

परत आम्ही मोहिमेला गुण्यामध्ये येऊन मिळालो. गुरुद्वारा मध्ये मोहिमेचे जेवण संपत आले होते. आम्ही देखील जेवायला बसलो. लोणचं वाग्यांच्या भाजीसारख दिसत होत. मोठमोठाल्या फोडी होत्या.
स्वागत आणि रुपेश आमच्या नंतर जेवायला बसले.
स्वागतने नेहमीप्रमाणे जेवायला काय आहे? भाजी कुठली आहे? अस विचारलं.
अमरया आणि माझ अगोदरच ठरल्याप्रमाणे आम्ही स्वागतला वांग्याची भाजी आहे, मस्त झालिये अस सांगितलं. स्वागत वाग्यांची भाजी म्हणून लोणचं अजून द्या अजून द्या करून मागत होता. हे बघून आम्हाला मात्र हसू आवरलं नाही. त्याने पहिला घास खाल्यानंतर त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

आम्ही आमच जेवण उरकून सटकलो. मोहिमेबरोबर राहिलो तर शिंदे छत्री पण बघता येणार नाही, मोहिमेला शिवपुरीत पोहचायला वेळ होईल असे वाटत होते. मी आणि अमर मोहिमेच्या पुढे निघालो.

शिवपुरीत शिंदे छत्रीच्या इथे बरोबर १७५० ला पोहचलो. पाटील काका आमच्या अगोदरच तिथे पोहचले होते. आम्ही गेल्या गेल्या काकांनी पोरांनो पटकन जावा. अतिशय प्रेक्षणीय आहे अस सांगितलं.

आम्ही आत गेलो. साधारण २० रु. च तिकीट काढावं लागत. कॅमेरा असेल तर जास्तीचा चार्ज द्यावा लागतो. आम्ही आत गेलो.

अप्रतिम अस शिंदे छत्रीच बांधकाम केल होत. तिथे कामाला असलेल्या एकाने आम्हाला थोडीफार माहिती सांगितली. जवळपास दीड तास आम्ही छत्री बघत होतो
.
शिंदे छत्री विषयी थोडसं :

शिवपुरी पासून ३ किमी अंतरावर शिंदे छत्री आहे. ह्या छत्रीच बांधकाम १९२६ ते १९३३ अस चालू होत.येथे माधवरावजी सिंदियांच्या अस्थि आहेत.

शिंदे छत्रीची मागील बाजू
4DSCN2318.JPGशिंदे छत्रीची दर्शनी बाजू
4DSCN2329.JPG4DSCN2330.JPG4DSCN2331.JPG4DSCN2334.JPG4DSCN2343.JPG4DSCN2345.JPG4DSCN2347.JPG4DSCN2350.JPG

कलाकुसर
4DSCN2356.JPG4DSCN2357.JPG4DSCN2361.JPG

आतमधील शिवलिंग
4DSCN2387.JPG

तिथल्याच एकाने संपूर्ण लाईट चालू करून दाखले. लाईट चालू करायला पण त्याला ओवाळणी द्यावी लागलीच. पण आपण भारत नामक राष्ट्रात राहतो, म्हणल्यावर अशी ओवाळणी आलीच. लाईट पडला कि चमकणाऱ्या ओकम या दगडाची माहिती दिली.

आम्ही रात्री ८ ला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. आज पौष पौर्णिमा होती. चंद्राचा मस्त प्रकाश पडला होता. रात्रीच्या सभेमध्ये उद्या सकाळी शिंदे छत्री बघायला जायचं नक्की झाल.

रात्री सगळे जमले कि आज कुणी कुणी काय काय बघितलं, याची चर्चा व्हायची. दरवेळेस आम्हीच आघाडीवर असायचो. आज मात्र काहीजण चक्क राजगढ नावाचा किल्ला बघून आले होते. त्यांचे किल्ल्याचे फोटो बघून माझ्या मनात मात्र कालवाकालव झाली. राजगढ, ब्यावाराच्या जवळपास आहे हे मी एकूण होतो, पण इतक काही मला ते क्लिक झाल नाही. जाऊ दे राजगढ ची तहान बजरंग गड वर भागली म्हणून मी पण गप्प बसलो. आम्ही पण मग बजरंग गडाचे फोटो दाखवून थोडा भाव खाल्ला.
मी माझा भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र बाहेर charging ला लावलं होत. सभा झाल्यावर मी बाहेर थोडा वेळ काकांशी गप्पा मारत बसलो. थोड्यावेळाने लघुशंकेला जाऊन आलो बघतो तर काय भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र गायब. गुरुजीच नेहमीप्रमाणे घेऊन गेले असणार याची मला खात्री होती. तरी पण नक्की कराव म्हणून अजितला विचारलं. अजित म्हणाला हो गुरुजी आताच सगळे charging लावलेले भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र घेऊन गेले. गुरुजींचा कडक नियम असायचा, भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र charging लावून कुठही जाता यायचं नाही. गुरुजींना सापडलं तर ते जप्त करायचे व प्रत्येंक यंत्रामागे १०० रु. दंड आकारात असत. म्हटलं चला आता २०० रु. ला टोला.

आजचा प्रवास : २०६.३ किमी

उद्याचा प्रवास: झाशी – दतिया – ग्वाल्हेर 

आठवा दिवस : १० जानेवारी २०१२

झाशी – दतिया – ग्वाल्हेर

सकाळी उठल्या उठल्या गुरुजींना गाठलं. पहिल्यांदा भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र याबद्दल विचारलं. गुरूजींनी पण सुरवातीला ताकास तूर लागू दिला नाही. पण नंतर मी माझ ब्रह्मास्त्र वापरलं. म्हणालो गुरुजी, अजितने मला सांगितलं भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र तुम्हीच काल काढून घेतलं म्हणूनं.
जर तुमच्याकडे नसेल तर माधव शिंदेंच्या छत्रीजवळ आपलं समूह छायाचित्र कसं काढायचं? मग गुरूजींनी छायाचित्रण यंत्र दिलं आणि भ्रमणध्वनी त्यांच्याकडेच ठेवून घेतला, म्हणाले २०० रु भर मग देतो.

गुरुजींची सवय म्हणजे मराठीत बोलायला लागले कि पूर्णपणे मराठीतच बोलायचे आणि इंग्रजी किंवा हिंदी सुरु केलं कि त्याच भाषेत बोलायचे. धन्य आहे त्या अवलियाची. एकेकाळी पुण्यातल्या बी जे मेडिकल मधून पास झालेला हा अवलिया पुण्यातल्या नामांकित रुग्णालयामध्ये शल्यविशारद म्हणून काम करतं असे.

यावरूनच आठवलेला एक किस्सा सांगतो. स्वागत, माझी वाट बघत शनिवारवाड्यासमोर उभा होता, ओळखपत्र देत आहेत हे कळल्यावर, ते आणायला तिथे गेला. गुरूजींनी विचारलं, तुमचं चित्र द्या, स्वागतला काहीच कळेना, गुरुजी एकदम चित्र का मागतायत ते, तो आपला, अहो मी चित्र नाही काढतं वगैरे सांगायला लागला. शेवटी त्याला कोणीतरी अरे फोटो दे म्हणून सांगितलं आणि स्वागतने सुटकेचा निश्वास सोडला. तर .......

शिंदे छत्री मधील छतावरची कलाकुसर :
5DSCN2458.JPGकोवळ्या उन्हातील छत्रीची झलक :
5DSCN2467.JPG5DSCN2496.JPG

आज देखील थंडीचा तडाखा कायम होता. माघ सुरु झाला होता. सकाळी ८ वाजता सगळ्यांनी शिंदे छत्रीच्या दिशेने प्रयाण केले. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात संगमरवरी छत्री मस्तच दिसत होती.मग आम्ही आज सगळ्यांना लाईट पडला कि चमकणाऱ्या ओकम या दगडाची माहिती दिली.सगळ्या मोहिमेचा एकत्रित छायाचित्रण कार्यक्रम फार पडला. परत एकदा आम्ही छत्री दोनदा बघितली म्हणून आम्ही भाव खाल्ला. अमर तर सगळ्यांना रात्री छत्री बघायची मजा काही औरच आहे वगैरे वगैरे म्हणून चिडवत होता. आम्हाला काल रात्री लाईट लावून दाखवले, ते कसे भारी दिसत होते, याचं अगदी तो रसभरीत वर्णन करत बाकीच्यांना जळवण्याचा होईल तितका प्रयत्न करत होता. मग परत एकदा तिथल्या माणसाने लाईट चालू केले, तरी पण अमर, साऱ्या सकाळचं काय भिकार दिसतंय बे, रात्री कस क्लास दिसत होतं अस बोलून शक्य होईल तेवढ त्याने दुसऱ्यांना जळवल. शेवटी एकदाचे मोहिमेने प्रस्थान केले. वेळ ०९३०.

०९३० वाजता आम्ही आमचा मोर्चा तात्या टोपे स्मारकाकडे वळवला. बाकीचे काही तात्या टोपे स्मारकाकडे येण्यास उत्सुक नव्हते. मोहीम कधीच पुढं निघून गेली होती.त्यामुळे मी आणि स्वागत असे दोघंच निघालो. ०९५० वाजता आम्ही स्मारकापुढे पोहचलो. स्मारक सुस्थितीत आहे, हे बघून बरे वाटले. मोहीम पुढे निघून गेली होती.

तात्या टोपे यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती त्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आल आहे.

तात्या टोपे यांच्या स्मारकाविषयी थोडसं :

तात्या टोपे जन्म : ०६ जानेवारी १८१४
बलिदान दिवस : १८ एप्रिल १८५६

नरवरचा मानसिंग शरण आला आहे असे भासवून, इंग्रजांनी पेरोन च्या जंगलामध्ये लपलेल्या तात्या टोपेला चतुराईने पकडल.तात्या टोपे मन सिंग ला त्याचा मित्र समजायचा आणि त्यांनी पेरोन मध्ये असलेल्या त्याच्या कचेरीमध्ये विश्राम पण केला होता. मान सिंगला भेटण्याच्या ठरलेल्या पूर्वनियोजित जागेवर तात्या टोपे यांना झोपलेल्या अवस्थेत पकडले गेले.पकडल्यानंतर त्यांनीमानसिंगचा तिरस्कार करण्यास सुरवात केली. त्यांना शिवपुरीच्या ऑफिसर बंगला क्र. १७ मध्ये बंदी म्हणून ठेवण्यात आले होते आणि त्यांची ट्रायल पण त्याच बंगल्याच्या तळमजल्याच्या पुढच्या खोलीमधेच घेण्यात आली होती. तात्या टोपे यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती त्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आल आहे.त्यांना फाशी दिल्या नंतर त्यांना मानणाऱ्या इंग्रजी महिलांनी पण त्यांच्या केसांचे झुपके एकत्रित केले होते.

तात्या टोपेंचा पुतळा :
5DSCN2512.JPG

आदल्या दिवशी आमच्या हेरखात्याला लागलेल्या खबरीप्रमाणे माधव राष्ट्रीय उद्यान बघण्यासारखे आहे हे आम्हाला समजले होते आणि रात्रीच्या गुप्त खलबतींमध्ये मोहिमेला पुढे जाऊ देणे आणि मगच राष्ट्रीय उद्यान बघणे हे ठरले होते.

आदल्या दिवशी ठरल्या प्रमाणे आम्ही मोहिमेला पुढे जाऊ दिले होतो व आम्ही माधव राष्ट्रीय उद्यान बघायला जाणार होतो. अमर, बन्या, रुपेश आणि स्नेहल आमची वाट बघत माधव राष्ट्रीय उद्यानासमोर थांबणार होते. कारण आम्हाला तात्या टोपेंच स्मारक बघून यायला थोडा वेळ लागणार होता.आम्ही माधव राष्ट्रीय उद्यानासमोर थांबलो. या चौघांचा काही पत्ता नव्हता. मोबईलला पण रेंज नव्हती. आम्हाला वाटल हे गेले असणार मोहिमेबरोबर पुढ. आम्ही तिथल्या रखवालदाराला विचारलं तो म्हणाला चार चाकी असेल तरच आत जाऊ शकता. आता आली का पंचाईत. म्हणाला पुढं एक ३०० मी वर एक तलाव आहे तिथपर्यंतच बाईक नेऊ शकता. मी म्हटल , स्वाग्या, चल काही न बघण्यापेक्षा थोडस बघू. म्हटलं तू तिकीट काढ, मी गाडी पुढ घेतो.

तेवढ्यात तिथे एक बोलेरो आली. माझ्या अवताराकड बघून आतला म्हणाला
Looking very nice!
आता हा chance मी घालवणार नव्हतो.
Thanks a lot for appreciation.
कहा से आ रहे हो ?
हम लोग महाराष्ट्र से आये हुये है. सर अगर आप बुरा ना मानो तो,क्या हम आपके साथ अंदर पार्क देखणे चल सकते है ? ( मी थेट प्रश्न केला, वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता.)
त्याने त्याच्या सहचारीणीकडे कटाक्ष टाकला. मग दोघांमध्ये ऑखं मिचौली झाल्यावर त्याने
ठीक है. कितने लोग हो आप ?
सर, बस हम दो हि लोग है. हम किराया share करेंगे.
स्वागतला माझ्या वागण्याचा एकंदरीत अंदाज आल्याने त्याने तिकीट काढले नव्हते. पण तो अजून counter वरच उभा होता.
स्वाग्या, ठीक आहे ४ तिकीट काढ, आपण यांच्याबरोबर आत जाऊ.

आम्ही दोघ व मार्गदर्शक ( Guide) आत घेऊन जाने आवश्यक असल्याने तो असे तिघेजण गाडीत बसलो.
गाडीने माधव राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रवेश केला.

माधव राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार :
5DSCN2708.JPG

स्वागत आणि मी मधल्या सीटवर खिडकीच्या बाजूला तर मार्गदर्शक आमच्यामध्ये बसला होता. तेवढ्यात आम्हाला पुढून दोन बाईक येताना दिसल्या. आणि बाईक बघताच क्षणी हे आमचे चार कार्यकर्ते आहेत हे कळायला वेळ लागला नाही.

स्वाग्या, अमरया आणि रुप्या येत आहेत, खाली वाक, खाली वाक मी दबक्या आवाजात त्याला म्हणालो.
आम्ही दोघे खाली वाकलो, दोन्ही बाईक गाडीच्या बाजूने निघून गेल्या. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
एका क्षणी वाटलं आपण चुकीच करतोयं, पण आता नाइलाज होता. आम्ही काय त्याच्या बोलेरोची वडाप करू शकणार नव्हतो.

जो अभी बाईक पे गये वो लोग आपके साथ थे ?
हा, पर वो लोग अभी झांशी जा राहे है. हम बाद में जानेवाले है.
आपने खजुराहो देखा?
नही, वो हमारे रास्तेसे काफी दूर है.
एक बार जरूर जाना, बहोत हि खुबसुरत जगह है वो !

गाडी एका तळ्याच्या शेजारी गाईडने थांबवली. या तलावाला माधव सागर असे नाव होते. एकून असे ३ जलाशय आहेत.जाधव सागर आणि साख्या सागर हि बाकी दोघांची नावे. माधव सागर जलाशय शिवपुरीला पाणीपुरवठा करतो.तलावामध्ये एक खंड्या ( White brested Kingfisher) मासे टिपण्यात मग्न होता.

खंड्या ( White brested Kingfisher)

5DSCN2543.JPG

तलावाचं पाणी सकाळच्या समयी खुपच मनमोहक दिसत होतं. अजून एक अचंबित करणारी माहिती अशी कि हे ३ हि जलाशय सुनियोजित मानवनिर्मित जलाशय आहेत. आणि या शुष्क प्रदेशाला वर्षभर पाणीपुरवठा करण्याचे काम हे ३ जलाशय करत असतात. हे जलाशय १९१८ साली ग्वाल्हेरच्या राजाने बनवले. जाधव सागर जलाशय हा महियर नदीवर आहे आणि तो या उद्यानाच्या बाहेर येतो. तर साख्या सागर आणि माधव सागर या उद्यानाचाच एक भाग आहेत. जाधव सागर मधून बाहेर पडणार पाणी साख्या सागर मध्ये येत आणि तिथून ते माधव सागर मध्ये येतं, अशा रीतीने हे तीनही जलाशय एकमेकांना जोडलेले आहेत.

तिथेच बाजूला भिंतीवर एक काळा पडदा होता आणि त्यावर
LIFT THIS FLAP AND SEE THE MOST DANGEROUS SPECIES OF THE WORLD AGAINST ENVIRONMENT CONSERVATION.
अस लिहल होतं. माझ्या आजपर्यंतच्या अनुभवाने त्या काळ्या पडद्यामागे आरसाच असणार याची मला खात्री होती त्यामुळे मी काही तो पडदा उचलण्याच्या भानगडीत पडलो नाही.
आता आम्ही परत गाडीमध्ये बसलो. तलावाच्या एका बाजूने गाडी जात होती.
वो देखो पिकॉक.
गाडीच्या डाव्या बाजूला एक मोर झाडाखाली निवांत बसला होता. मी एक-दोन फोटो घ्यायचा प्रयत्न केला पण झुडुपं मध्ये येत असल्याने फोटो तितकासा चांगला आला नाही.

या मोराची बराच वेळ वाट पहिली पण हा काही त्याचं तोंड दाखवायला तयारच होईना शेवटी कंटाळून याच्या सरकारी जागेचा फोटो घेतला :
5DSCN2561.JPG

आम्ही पुढे निघालो. आता आम्ही चितळ रोड नावाच्या रस्त्याला लागलो होतो. आणि अचानक आमच्यासमोरून नीलगाय आडवी गेली. मी परत शक्य होईल तेवढे फोटो घेतले.

नीलगाय (नर) सडक ओलांडताना :
5DSCN2569.JPG

एका झाडाखाली उभी असलेली नीलगाय ( मादी) – माझा एक भाबडा प्रश्न : जर आपण गाय आणि बैल असं म्हणतो, तर नीलगायीच्या नराला नीलबैल म्हणावयास हवे ना ?
5DSCN2571.JPG5DSCN2566.JPG

वाटेत बुलबुल आणि इतर असंख्य प्रकारचे पक्षी दिसत होते. गाईडने आता जंगलामध्ये वाघ नसल्याचे सांगितले, पण अजूनही ७ बिबटे असल्याची माहिती दिली. आता आम्ही GEORGE CASTLE नावाच्या गढीपुढे थांबलो.

या गढी विषयी थोडेसे :
हि गढी प्राचीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हि गढी १९११ साली ग्वाल्हेरचे राज्यकर्ते जिवाजीराव सिंदिया यांनी बांधली. हि गढी जंगलाच्या मधोमध बनवण्यात आली आहे. आता हे जंगल उद्यानाचाच भाग आहे. इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा या जंगलांमध्ये वाघाची शिकार करण्यासाठी येणार होता. त्या फक्त एका रात्रीसाठी या गढीची निर्मिती करण्यात आली. पण योगायोगाने राजा जॉर्ज पाचवा ने जंगलात शिरताच वाटेतच वाघाची शिकार केली त्यामुळे तो इथे थांबलाच नाही. हि गढी जंगलातील सर्वोच्च स्थानी बनवण्यात आली आहे. गढीवरून जलाशयाचा आणि करधई जंगलाचा मनोरम्य नजरा दिसतो.

गढी :
5DSCN2602.JPG

गढीवर गेलो असता हि घार वरती घिरट्या घालत होती :
5DSCN2607.JPG

हे जरा वेगळ्याच प्रकारच झाड दिसलं म्हणून क्लिकल :
5DSCN2614.JPG5DSCN2618.JPG

हेच ते बांधकाम, याचं प्रयोजन समजू शकलं नाही :

5DSCN2619.JPG

माझी आणि स्वागतची इथे थांबायला मिळाले तर काय मज्जा येईल या विषयावर चर्चा झाली. गाईडला विचारले असता इथे फक्त प्राण्यांची गणना होते त्यावेळेस ते लोक थांबतात असे त्याने सांगितले.
आकाशात घार घिरट्या मारत होती. जंगले, किल्ले बघितलं कि मला सगळ आयुष्य अशा परिसरातच काढावं अस वाटत. अस काही बघायला मिळाल कि मी खुश असतो. तिथे शेजारीच एका चौथऱ्यावर काहीतरी बांधकाम होतं पण नक्की काय असेल ते मात्र कळल नाही.

परत आम्ही गाडीत बसलो. आता हरणांचे कळप दिसायला सुरवात झाली होती.
रानमांजर ... मी ओरडलो.
सगळ्यांनी डावीकडे बघितलं. लांबवर रानमांजराच पिल्लू त्याच्या आईशी लाडू लाडू ( लाडात येणे- हा माझ्या भाचाने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे ) करण्यात व्यस्त होते. त्याची आई त्याला अगदी प्रेमाने चाटत होती.
5DSCN2634.JPG

भैया, इसको जंगली बिल्ली कहते है. Guide ने हिंदीत माहिती पुरवली.

अजून पुढं गेलो तर नीलगाय पाणी पिताना दिसली.यावेळेस मी गाडीतून खाली उतरून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ती अजिबात हलली नाही. मग मी मनसोक्त बघून झाल्यावर गाडीत जाऊन बसलो.
5DSCN2643.JPG

आता आम्ही मन्नो साहीब रोड वर आलो होतो. दीदींना मगर बघायची फारच ओढ लागली होती.
त्या सारख्या गाईड ला भैया crocodile देखने मिलेगा ना ? crocodile देखने मिलेगा ना ? अस वारंवार विचारात होत्या.
गाईड, पण हा मॅडम जरूर मिलेगा म्हणत होता.
आता आम्ही मगरीच्या पाणवठ्यावर आलो होतो. मगरी मस्तपैकी ऊन शेकत बसल्या होत्या.
5DSCN2652.JPG

तेवढ्यात झाडीतून रानडुक्कर आणि त्याची पिल्ले वेगात पळताना दिसली. ते बघून मला आमच्या चौथीतल्या “पाणवठ्यावरची संध्याकाळ ” या धड्याची आठवण आली. आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. पक्षांबद्दल वाचायला सुरवात केली पाहिजे, मी मनातच म्हटले.
5DSCN2655.JPG

दीदींच मनसोक्तपणे मगर निरीक्षण झाल्यावर आम्ही गाडीकडे फिरलो. मी देखील टील्लूचे काही फोटो काढले.

आमचा टिल्लू :
5DSCN2659.JPG

वाटेतच वठलेल्या झाडावर पाणकावळयांनी मुक्काम ठोकला होता.
5DSCN2667.JPG5DSCN2668.JPG

जलाशयाच्या शेजारीची मगर ऊन शेकत बसली होती. मी गाडीतून उतरलो,तशी ती पटकन पाण्यात घुसली.

तलावाच्या किनारी वेगवेगळ्याप्रकारचे पक्षी, बदकं, हरणं,काळवीट, सांबर वावरत होते.
5DSCN2674.JPG5DSCN2679.JPG5DSCN2680.JPG5DSCN2681.JPG5DSCN2690.JPG5DSCN2697.JPG5DSCN2701.JPG

सगळ्यांनी मनसोक्तपणे बघितल्यावर गाडी पुढे निघाली. स्वागतला झाडावर काहीतरी दिसले.
अरे वेगळाच प्राणी होता, इथेच होता कुठे गेला ? अशी बरीच त्या प्राण्याची शोधाशोध झाल्यवर आम्ही पुढे निघालो. माझ्या मते त्याला खार दिसली असावी आणि कधी कधी खारी झाडाला चिटकून झोपतात त्यामुळे त्यांचा आकार थोडा वेगळा भासतो.
खार अशीच कितीतरी वेळा झाडाला चिटकून बसते :
5DSCN2705.JPG

अशा रीतीने आमची माधव राष्ट्रीय उद्यानाची यात्रा सफल संपूर्ण झाली.

माधव राष्ट्रीय उद्यानाविषयी थोडेसे:
हे उद्यान शिवपुरीमध्ये स्थित असून ग्वाल्हेर पासून १०० किमी वर आहे. शिवपुरी हि ग्वाल्हेरच्या सिंदिया घराण्याची ग्रीष्ममधील राजधानी. या उद्यानाचा विस्तार ३५४ वर्ग किमी आहे.

दादांना थोडे जास्त पैसे आम्ही देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाहीत. टिल्लूला आणि त्याच्या मम्मी –पप्पांना टा टा करून आम्ही १२५० ला उद्यान सोडले आणि झाशीच्या दिशेने बाईक सुसाट सोडली

आजचा प्रवास : आग्रा – मथुरा – दिल्ली

आज ताजमहाल बघून मथुरा बघून दिल्लीला पोहचायच असल्याने सकाळी सगळेजण लवकरच उठलो. परत एकदा सकाळची धावाधाव, पळापळ, गुरुजींचा पाणी शिंपडणे कार्यक्रम असे सगळे प्रकार उरकल्यावर सकाळी सव्वा सहाच्या सुमारास मी गाडी गरम करायला पहिली किक मारली. इतक्या सकाळी उठूनही ताजमहाल गाठायला ८ वाजलेच. ताजमहालकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक बाण असल्यामुळे तशी काही अडचण आली नाही. वाटेत एक उड्डाणपूल लागला. गाडी वरून न्यायची का खालून जायचे यावर स्वागतचे आणि माझं काही एकमत झालं नाही. अर्थात गाडी मीच चालवत असल्यामुळे मी थेट गाडी उड्डाणपुलावरून घातली. पुढे गेल्यावर लगेचचं मला माझ्या चुकीची जाणीव झाली. अस आमच्यात बरेचं वेळा व्हायचं. मग दुसऱ्याला, कशाला शहाणपणा करायचा? मी सांगत होतो ना? असे टोमणे असायचेच. रस्ता बरोबर असेल तर मात्र अळी मिळी गुप चिळी. 

ताजमहालच्या बाहेर पोहचल्यावर गाडी पार्क करायला काही जागा मिळेना. रस्त्यावर गाडी पार्क करायला काही मन धजेना. जवळच बघितलं तर एक सी आर एफ ची एक चौकी होती. गाडी थेट आतमध्ये घुसवली. लागलीच तिथल्या रखवालदाराने हटकले. त्याला मग आम्ही इतक्या लांबून आलोय, गाडीवर ताजमहाल बघायला आलोय सांगितले. रखवालदाराने सगळे ऐकून घेतल्यावर साहेब गाडी थोडीशी बाहेर लावा, मी तुमच्या दोन्ही गाड्यांवर लक्ष ठेवतो. काही काळजी करू नका. हे त्याचे शब्द ऐकल्यानंतर आम्ही दोन्ही गाड्या चौकीच्या बाहेरच्याच बाजूला पार्क करून, आमचा मोर्चा जवळच्याच एका चहा टपरीकडे वळवला. थंडी चांगलीच होती. मग सगळ्यांनी २-२ कप चहा मारला.

आणि आम्ही ताजमहाल बघायला निघालो. आत मध्ये फक्त कॅमेरा, मोबाईल, पाण्याची बाटली घेऊन जाता येते. सॅक घेऊन जाता येत नसल्याने, आम्ही आमच्या सॅक बाहेरच्या लॉकर मध्ये ठेवल्या आणि ताजमहालामध्ये प्रवेश केला. तिकिटाच्या खिडकीवर बऱ्यापैकी गर्दी होती. देशी- विदेशी नागरिकांसाठी, तसेच महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी रांग असते. सगळ्यांनी तिकिटे काढल्यावर २ हिंदी आणि २ इंग्रजी मधील माहिती सांगणारी यंत्र घेतली. प्रत्येकानी आपापले यंत्र कानाला लावले आणि सगळेजण ताजमहाल बघायला आत शिरलो. मोहिमेतील बरेचं जण ताजमहाल बघायला आले होते.

ताजमहालाविषयी थोडेसे :

ताजमहाल अर्थात महालांचा मुकुट. हि एक पांढऱ्या शुभ संगमरवरामधील कबर. मुघल सम्राट शाहजहानने त्याची तिसरी बायको मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधला. ताजमहाल जगभर भारतामधील मुस्लीम कलेचा दागिना म्हणून ओळखला जातो. ताजमहाल हा मुघल वास्तुविशारद शास्त्राचा एक सुरेख नमुना आहे. ज्यामध्ये पर्शियन, तुर्किश आणि भारतीय वास्तुकलेचा देखील समावेश आहे. ताजमहालचे बांधकाम साधारण १६३२ च्या सुमारास सुरु होऊन १६५३ च्या सुमारास संपले. ज्यामध्ये हजारो कारागिरांनी आपला सहभाग दिला. ताजमहालाल १९८३ मध्ये युनेस्को ने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. ताजमहाल हि जगामधील सर्वोत्कृष्ट मानवनिर्मित कलाकृती म्हणून गौरवला गेला आहे. ताजमहाल हा इतर संगमरवरी इमारतींप्रमाणे चौकोनी आकारात न बनवता त्याचा पांढराशुभ्र घुमट संगमरवराने बनवण्यात आला आहे. मध्य स्थानी बनलेला मकबरा स्वतःच्या वास्तुश्रेष्ठतेच्या सौंदर्याचा परिचय देतो. ताजमहाल इमारत समूहाची विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे कि हा समूह पूर्णपणे सममितीय आहे. ह्याचे बांधकाम १६४८ च्या आसपास पूर्ण झाले. सभोवाताच्या इमारती आणि बगीचे याच्या ५ वर्षांनंतर पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरीला याचा प्रमुख वास्तुविशारद मानतात.

9DSCN3195.JPG

१६३१ मध्ये शहाजहानची तिसरी बायको तिच्या चौदाव्या बाळंतपणात ( गौहरा बेगम – त्याच्या मुलीचं नाव ) बऱ्हाणपूर येथील शाही किल्ल्यामध्ये मरण पावली तेव्हा अतोनात दुःख झाल्याने शहाजहानने तिच्यासाठी १६३२ मध्ये ताजमहालाचे बांधकाम सुरु केले असे म्हणतात.

ताजमहालचा केंद्रबिंदू आहे, एक मकबरा. हि एक सममितीय इमारत आहे, ज्यामध्ये एक अतिविशाल वक्राकार प्रवेशद्वार आहे. या इमारतीच्या वरती एक घुमट बांधण्यात आला आहे. बाकीच्या इमारतींसारखे याचे बांधकाम मुघल शैलीचे आहे अये म्हणतात.

याचा मूळ आधार एक विशाल बहु-कक्षीय संरचना आहे. प्रधान कक्ष घनाकृती असे त्याची प्रत्येक बाजू ५५ मी आहे. त्याच्या प्रत्येक बाजूला विशाल वक्राकार प्रवेशद्वार आहे. याच्या अशा प्रकारच्या संरचनेमुळे तुम्ही कोणत्याही बाजूने ताजमहाल बघितल्यास तो सारखाच भासतो. याच्या चारही बाजूच्या चार कोपरयांमध्ये मनोरे उभारलेले आहेत. मुख्य इमारतीच्या चारही भागांमध्ये एका वरती एक अशा प्रकारे २-२ वक्राकृती प्रवेशद्वारासारखे बांधकाम केलेले आहे. खर म्हणायचं झाल तर इमारतीला आठ बाजू आहेत, पण कोपऱ्याच्या ४ बाजू बाकीच्या चार बाजूंच्या तुलनेत छोटा असल्याने इमारतीला चौरसाकृती म्हणणे उचित वाटते.
आत मध्ये असलेल्या शाहजहान आणि मुमताज महल यांच्या कबरी खोट्या असून, खऱ्या कबरी खालच्या थरावर आहेत.

घुमट :
इमारतीच्या वरच्या भागात असलेला घुमट इमारतीचा सगळ्यात सुरेख भाग आहे. याची उंची ३५ मी असून( हि उंची इमारतीच्या लांबी इतकीच आहे), हा ७ मी दंडाकृती भागावर उभा आहे. घुमटाच्या आकारामुळे त्याला कांदाकृती अथवा पेरू सारखा आकार असलेला घुमट म्हटले जाते. याचे शिखर कमलाकृती आकाराने अलंकृत केले गेले आहे.

छत्री :
मुख्य घुमटाच्या चारही बाजूला कोपरयांमध्ये चार छोट्या घुमट असलेल्या छत्र्या आहेत. छत्र्यांचे घुमट हे मुख्य घुमटाच्या आकाराचीच प्रतिकृती आहे फक्त मापाचा फरक. यांचा आधार स्तंभ छतावरील अंतर्गत प्रकाश रचनेच्या व्यवस्थेच्या हेतूने उघडे ठेवण्यात आले आहेत. संगमरवराचे उंच मनोरे, जे कि मुख्य इमारतीच्या भिंतींच्या बाजूंवर उभारलेले आहेत, घुमटाची शोभा अजूनच वाढवतात. मुख्य घुमटाबरोबर छत्र्यांवर तसेच मनोरयांवर असलेले कमळाचे नक्षीकाम शिखराला शोभा देते. घुमट तसेच छत्र्यांवर हिंदू वास्तुकलेचा प्रमुख घटक कलश विराजमान आहे.

कलश:
मुख्य घुमटावर कलश आहे. हा कलश १८ व्या शतकापर्यंत सोन्याचा होता. आता तो कांस्य या धातूचा बनवलेला आहे. अर्थात हा कलश हिंदू मंदिरांच्या कळसावर आढळून येतो. या कळसाला लागूनच खालील बाजूला चंद्राची कोर आहे, जिची दोन्ही टोके स्वर्गाकडे इशारा करतात असे मानले जाते. चंद्र कोर आणि कलश मिळून भगवान शंकराचे चिन्ह त्रिशूळ, याच्यासारखा हा आकार दिसतो.
9DSCN3317.JPGमनोरे :
मुख्य इमारतीच्या चारही कोपऱ्यांवर चार मोठाले मनोरे उभारलेले आहेत. यांची उंची ४० मी. आहे. हे मनोरे ताजमहालाची सममितीय प्रवृत्ती दर्शवतात. प्रत्येक मनोरा २-२ सज्जांच्या सहाय्याने ३ समान भागात विभागला गेला आहे. मनोऱ्याच्या सगळ्यात वरती जो सज्जा आहे, त्याच्या वरती देखील मुख्य इमारतीवर आहे त्या सारखीच छत्री बनवलेली आहे. यांवर देखील कमळाच्या आकाराचे नक्षीकाम आणि कलश देखील आहेत. जर का तुम्ही लक्ष देऊन बघितले, तर तुमच्या असे लक्षात येईल कि हे चारही मनोरे किंचितसे बाहेरच्या बाजूला झुकले आहेत. यामागचे कारण असे कि, जरी पुढे-मागे हे पडले तरी ते मुख्य इमारतीला कोणताही धोका पोहचवणार नाहीत.
9DSCN3255.JPGप्रवेशद्वारावरील नक्षीकाम:

ताजमहालाच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे मुघल वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण आहे. जस जसा पृष्ठभाग बदलतो त्याचं प्रमाणात नक्षीकाम देखील बदलत जाते, हे नक्षीकाम वेगवेगळे रंग, प्लास्टर आणि रत्ने वापरून केले गेले होते. येथे लिहिली गेलेली लिपी हि फ्लोरिड थुलुठ लिपी आहे. येथे लिहिलेली आयतें, फारसी लेखक अमानत खां ( प्रत्यक्षात याचे नाव अब्द उल हक होते, पण शहाजहानने याच्या कामगिरीवर खुश होऊन याला “अमानत खां” हि पदवी दिली) याने कुरानामधून सुचवलेली आहेत. हे लेखन जैस्प‍र (काळे संगमरवर / दगडाचा एक प्रकार ), शुभ्र संगमरवरामध्ये जडवून करण्यात आले आहे. या संगमरवरावर करण्यात आलेले कार्य नाजूक आणि सुंदर तर आहेच त्याचं बरोबर महान देखील आहे. येथे विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे, येथे उंची लक्षात घेऊन लेखन करण्यात आलेले आहे. उंच ठिकाणी, त्याचं प्रमाणात लेखन करण्यात आलेले आहे. जेणेकरून खालून बघताना डोळ्यांना त्रास होणार नाही. पूर्ण क्षेत्रावर, अलंकारिक हेतूने कुरानामधील आयतें लिहिण्यात आलेली आहेत.
येथे खालील आयतें लिहिलेली आहेत:
सूरा 91 - सूर्य,
सूरा 112 - विश्वास की शुद्धता,
सूरा 89 - उषा,
सूरा 93 - प्रातः प्रकाश,
सूरा 95 - अंजीर,
सूरा 94 - सांत्वना,
सूरा 36 - या सिन,
सूरा 81 - फोल्डिंग अप,
सूरा 82 - टूट कर बिखरना,
सूरा 84 - टुकडे़ होना,
सूरा 98 - साक्ष्य,
सूरा 67 - रियासत,
सूरा 48 - विजय,
सूरा 77 - वो जो आगे भेजे गए
सूरा 39 - भीड़
जसे आपण ताजमहालामध्ये प्रवेश करतो खालील लेख दृष्टीस पडतो:
“ हे आत्मा ! तू ईश्वर के पास विश्राम कर । ईश्वर के पास शांति के साथ रहे तथा उसकी परम शांति तुझ पर बरसे ”
9DSCN3220.JPG
अतिशय सुंदर अशा रीतीने स्तंभांवर, मनोरयांवर, मशिदींवर, घुमटावर त्याचं बरोबर मुख्य इमारतीच्या काही भागांवर संगमारवरामध्ये सुंदर अशी कलाकुसर करण्यात आली आहे. यामध्ये विविध पानाफुलांचे आकार समाविष्ट करण्यात आले आहेत. वेगवेगळे दगड एकमेकांमध्ये जडवून हि कलाकुसर करण्यात आली आहे. या शैलीला “हैरिंगबोन शैली” असे म्हणतात. या कलाकुसरीवर हात फिरवला असता त्या कलाकृतीच्या उच्च प्रतीची कल्पना येते. ज्या प्रकारे फुलं आणि इतर प्रकारची वेलबुट्टी काढण्यात आली आहे त्या शैलीला “बास रिलीफ शैली” म्हणतात. पिवळा, काळा संगमरवर तसेच हरिताश्म दगड एकमेकांमध्ये अतिशय सुंदर रित्या बसवून त्यांना व्यवस्थित पॉलिश करण्यात आले आहे. त्यांना योग्य प्रकारे घासून चकचकीत आणि तुळतुळीत बनवण्यात आले आहे.

9DSCN3244.JPGताजमहालाचे अंतरंग :
ताजमहालाचा आतील कक्ष हा पूर्णपणे वेगळा आहे, यात कुठेही पारंपारिक नक्षीकाम अथवा कलाकुसर आढळत नाही. या मध्ये बहुमुल्य रत्ने आणि खडे जडवले होते असे म्हणतात. साध्या फक्त वेगवेगळ्या प्रकारचे खडे येथे पाहायला मिळतात. आत मधील खोली अष्टाकृती असून, खोलीची रचना अशा प्रकारे केलेली आहे कि आठ हि बाजूंनी खोलीमध्ये प्रवेश करता येतो. साध्या मात्र दक्षिण दिशेकडील बगीचाकडे तोंड असलेले द्वार वापरात आहे. आतील भिंती २५ मी उंच असून एका आभासी घुमटाने झाकल्या गेल्या आहेत. आतील घुमट हे सूर्याच्या चिन्हाने सजवलेले आहे. आठ महिरपी कमानी खोलीला सुशोभित करतात. प्रत्येक बाजूंमध्ये, भिंतीमध्ये एक एक महिरप आहे. चार केंद्रीय महिरपी सज्जा बनवतात. प्रत्येक सज्जाच्या बाहेरची खिडकी संगमरवराच्या जाळीने झाकलेली आहे. सज्जांमध्ये असलेल्या खिडक्यांशिवाय, छतावरील असलेल्या छत्र्यांच्या तावादानांमधून देखील प्रकाश आतमध्ये येतो. आतमधील प्रत्येक भिंत लेखन केलेल्या फलकांनी सजवलेली आहे. कबरी आठ संगमरवरांच्या जाळीने बंदिस्त केलेल्या आहेत. प्रत्येक जाली हे कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बाकीचा भाग मूल्यवान खड्यांनी तसेच फुले, फळे यांच्या आकारांनी सुशोभित केला गेला आहे. मुस्लीम परंपरेनुसार कबरींवर कालासुसार करण्यास मनाई आहे, त्यामुळे मुमताज आणि शाहजहानचे शव, प्रत्यक्षात दिसणाऱ्या कबरीच्या खाली भागात, साधेपणाने दफन करण्यात आले आहे. त्यांचे चेहरे उजव्या अर्थात मक्केच्या बाजूला आहेत. मुमताजची कबर बरोबर मध्यभागी स्थित आहे. जिचा आकार आयताकार असून लांबी २.५ मी असून रुंदी १.५ मी आहे. कबर अर्थातच मूल्यवान खड्यांनी आणि रत्नांनी जडवलेली आहे. येथे लिहिण्यात आलेला लेख मुमताजची प्रशंसा करतो आणि ओळख करून देतो. शःजाहांची कबर, मुमताजच्या कबरीच्या दक्षिणेला आहे. पूर्ण क्षेत्रामध्ये असममिती असलेले हे एकमात्र बांधकाम दिसते. असे म्हणतात कि हि असममिती यामुळे दिसते कारण शाहजहानची कबर येथे बनणे अपेक्षित नव्हते. हि कबर मुमताजच्या कबरीपेक्षा मोठी आहे. परंतु बाकी सर्व कलाकारी मिम्ताजाच्या कबरेसारखीच आहे. तळघरात असलेल्या मुमताजच्या खऱ्या कबरीवर अल्लाची ९९ नावे कोरलेली आहेत. ज्यांमधील काही आहेत, “ हे नीतिवान, हे भव्य, हे राजस, हे अपूर्व, हे अनंत, हे तेजस्वी,.....आणि बरच काही.” तर शाहजहानच्या खऱ्या कबरीवर “ याने हिजरी १०७६ साली रजब महिन्याच्या २६ व्या दिवशी या जगातून अनंताकडे जाणारा प्रवास केला” असे लिहिले आहे.

बगीचा:
हे क्षेत्र सुमारे ३०० चौरस मीटर असून, हे चार बाग किंवा मुघल बाग म्हणून ओळखले जाते. या बागेमध्ये एक पथ बनवलेला आहे, हा पाठ या बागेला १६ एकसमान भागांमध्ये विभागतो. बागेच्या मध्यभागी, थोड्याशा उंचीवर असलेल्या तलावामध्ये ताजमहालाचे प्रतिबिंब पडते. बाकी ठिकाणी बागेमध्ये एका रांगेत झाडे आहेत तर प्रवेशद्वारापासून मुख्य कक्षापर्यंत कारंजी आहेत. ह्या वरच्या भागात असलेल्या तलावाला “हौद अल कवथार “ म्हणतात, जो कि मोहम्मदने वाचन दिलेल्या अक्षय उर्जस्त्रोताला दर्शवतो. हि बाग फारसी बागांपासून प्रेरणा घेऊन बनवलेली आहे, या प्रकारच्या बागांची पहिला मुघल सम्राट बाबर याने भारताला ओळख करून दिली. हि बाग स्वर्गातून वाहणाऱ्या चार नद्यांकडे आणि स्वर्गातील बागेकडे (फिरदौस) कडे इशारा करते. हा शब्द फारसी मधील “पारिदाइजा़” या शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ भिंतींनी रक्षण केलेली बाग असा होतो. मुघलकालीन इस्लामी पाठ्यांमध्ये, फारसी रहस्यावादामध्ये या बागेला एक परिपूर्ण बाग म्हणून ओळखले जात असे. यामध्ये केंद्रस्थानी असलेल्या पर्वताच्या जलस्त्रोतांमधून ४ नद्या चार दिशेला वाहत असत आणि बागेला उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा विभागत.
9DSCN3274.JPG

अधिकतर मुघल बागा या आयताकृती बनलेल्या असून, त्यांच्या केंद्रस्थानी मकबरा बनलेला असे. ताजमहालाची हि असामान्यता (???) मानली जाते कि येथे मुख्य इमारत बागेच्या शेवटच्या टोकाला आहे. यमुना नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माहताब (चंद्र प्रकाशी ) बाग उर्फ चांदनी बागेच्या शोधानंतर , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने असा निष्कर्ष काढला कि यमुना नदी पण याच बागेचा हिस्सा होती आणि तिला पण स्वर्गामधील नद्यांच्या मध्ये स्थान दिले गेले हवे होते. बागेचे बांधकाम, संगमरवराच्या पायवाटा, कारंजी इत्यादी गोष्टी काश्मीरमधील शालीमार बागेशी मिळत्या जुळत्या आहेत, म्हणून या दोन्ही बागांचा वास्तुकार एकच असावा असा कयास आहे.

अली मर्दान, सांगतो कि सुरवातीला बागेमध्ये गुलाब, नर्गिस अशी विविध प्रकारची फुल झाडे तसेच फळझाडे होती, पण मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर बागेची देखरेख कमी झाली. जेव्हा इंग्रजांचे राज्य आले तेव्हा त्यांनी लंडनच्या बागांप्रमाणे या बागांमध्येही हिरवळ (lawn) लावली.

ताजमहालाचे प्रवेशद्वार :
ताजमहालची इमारत हि नदीची बाजू सोडली तर इतर तीनही बाजूंनी लाल विटांच्या भिंतींनी बंदिस्त आहे. या भिंतींच्या बाहेरच्या बाजूला कितीतरी इमारती (मकबरे) उभे आहेत. ज्यांमध्ये शाहजहानच्या अन्य बायकांची कबर आहे. यांमधील एक इमारत मुमताजच्या प्रिय दासी साठी देखील बनवण्यात आली होती. या इमारती देखील लाल दगडांनी बनवलेल्या आहेत व त्याकाळातील मुघल शैलीचे प्रतिक आहेत. भिंतीना लागूनच जो बगीचा आहे, त्यामध्ये आपल्याकडे गावाकडे जशी घराला ओसरी असते, त्याप्रकारे बांधकाम आहे. अर्थात हि शैली हिंदू मंदिरांची आहे पण नंतर मशिदींमध्ये सुद्धा हि वापरली गेली असे म्हटले जाते.
9DSCN3118.JPG
भिंतींच्या मध्ये मध्ये छत्र्यांसारख्या दिसणारया इमारती आहेत, ज्या त्यावेळेस पहारा देण्यासाठी वापरल्या जात असतं. परंतु आता तिथे संग्रहालय आहे.

मुख्य दरवाजा:
मुख्य दरवाजा हा देखील एखाद्या स्मारकासारखा आहे. हा सुद्धा लाल दगड आणि संगमरवाराचा वापर करून बांधण्यात आला आहे. हे सुरवातीच्या मुघल राज्यकर्त्यांच स्मारक आहे. याचा देखील महिरपी दरवाजा ताजमहालाच्या महिरपी दरवाजासाराखाच आहे. यावर देखील लेखन करून कलाकारी करण्यात आली आहे. येथे देखील “बास रिलीफ” आणि “पीट्रा ड्यूरा” हि शैली वापरून नक्षीकाम करण्यात आले आहे. येथील छतावर आणि भिंतीवर बाकी इमारतींसारख्या भूमितीय रचना बनवलेल्या आहेत.
9DSCN3134.JPG9DSCN3169.JPGताजमहालामधील मशीद :
ताजमहालाच्या मुख्य इमारतीच्या दोन्ही बाजूला लाल दगडांनी बनवलेल्या दोन विशाल इमारती आहेत. ज्यांची तोंडे ताजमहालाकडे आहेत. यांच्या मागील बाजू पूर्व आणि पश्चिम भिंतीना चिकटलेल्या आहेत. दोन्ही इमारती एकमेकींचे प्रतिबिंब आहेत. पश्चिम बाजूची इमारत मशीद आहे तर पूर्वेच्या इमारतीला “जवाब” (उत्तर) म्हणतात.
9DSCN3192.JPG

जवाब इमारतीचा प्राथमिक उद्देश वास्तुकलेच संतुलन हा होता आणि हि इमारत पाहुण्यांच्या राहण्यासाठी वापरली जात असे.
9DSCN3280.JPG

या दोन्ही इमारतींमधील फरक असा कि मशिदीमध्ये एक महिरप कमी असून, या मशिदीमध्ये मक्केच्या दिशेला एक कक्ष बनवण्यात आला आहे. जवाब इमारतीमध्ये जमिनीवर भूमितीय नमुने बनवण्यात आले असून, मुख्य मशिदिमध्ये नमाजासाठी काळे संगमरवर बसवण्यात आले आहे. हि मशीद शाहजहानच्या बाकीच्या निर्माण केलेल्या मशिदिसारखीच आहे. खासकरून जहाँनुमा मशीद आणि दिल्लीची जामा मशीद. त्याकाळच्या मशिदींमध्ये एका कक्षावर ३ घुमट असत. या मशिदी पवित्र स्थानाला ३ भागात विभागात असत. मधील कक्ष हा मुख्य कक्ष असे आणि त्याच्या दोन्ही बाजूला २ छोटे कक्ष असत. या बाजूच्या इमारती १६४३ मध्ये पूर्ण झाल्या.
9DSCN3313.JPGनिर्माण :
ताजमहाल आग्र्याच्या दक्षिणेला एका छोट्या पठारावर बनवला गेला, याच्या बदल्यात शाहजहानने जयपूरचे महाराजा जयसिंग यांना आग्र शहरामध्ये एक मोठा महाल दिला होता. जवळपास ३ एकर क्षेत्र खोदले गेले आणि त्याच्यामध्ये कचरा वगैरे भरून त्याला नदीच्या सपाटीपासून ५० मी उंच बनवले गेले. ज्यायोगे पुराच्या पाण्यापासून बांधकामाचा बचाव व्हावा. इमारतीच्या क्षेत्रामध्ये विहिरी खोदून, त्यांमध्ये विटा-दगड भरण्यात आले आणि अशा प्रकारे इमारतीचा पाया घालण्यात आला. नेहमीप्रमाणे बांबू वगैरे लावून आराखडा न बनवता, इमारतीच्याच उंचीचा एक भव्य कक्ष बनवण्यात आला. हा कक्ष येवढा मोठा होता कि अभियांत्रिकी तज्ञांच्या म्हणण्यानुसार तो हटवण्यात काही वर्षे खर्ची झाली असती. शेवटी शाहजहानाने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये दवंडी पिटवली कि एका दिवसात कोणीही, कितीही विटा घेऊन जाऊ शकतो. आणि याचा परिणाम असा झाला कि तो भव्य विटांचा सांगाडा एका दिवसातच साफ केला गेला. ( अर्थात हि माहिती “अतिशोयोक्ती” या प्रकारात मोडणारी वाटते.) सर्व बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि संगमरवर नियोजित जागी पोहचवण्यासाठी एक १५ किमी लांबीचा रस्ता तयार केला गेला होता. २० ते ३० बैलांनी ओढली जाणारी एक बैलगाडी तयार करण्यात आली होती व तिच्या सहाय्याने मोठमोठे शिलाखंड आणले जाट. एका मोठ्या कप्पीच्या सहाय्याने ते शिलाखंड नियोजित जागी पोहचवले जात असत. नदीचे पाणी आणण्यासाठी रहाट तयार करण्यात आले होते. यांचा उपयोग करून हे पाणी एका मोठ्या तलावामध्ये साठवण्यात येत असे. या तलावामधून हे पाणी ३ छोट्या टाक्यांमध्ये जात असे व तेथून नळ्याद्वारा नियोजित जागी जात असे.
9DSCN3247.JPG

आधारस्तंभ आणि मुक्य इमारतीला बनण्यास १२ वर्षे लागली. उरलेल्या इमारती त्यानंतर १० वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आल्या. यांमध्ये पहिल्यांदा मनोरे मग मशीद आणि सर्वात शेवटी मुख्य प्रवेश द्वार बनवण्यात आले. हा सर्व समूह वेगवेगळ्या भागांमध्ये बनला म्हणून ताजमहालाच्या कालावधीबाबत संदिग्धता आहे. उदाहरणार्थ मुख्य बांधकाम १६४३ साली पूर्ण झाले पण त्यानंतरही इमारती बनतच राहिल्या त्यामुळे याच्या निर्माणासाठी एकूण किती खर्च झाला या बाबतीत देखील भिन्नता आहे. तरीही त्यावेळेनुसार हे मूल्य ३.२० कोटी रुपये असावे असे म्हणतात. अर्थात ते वर्तमानात “अमूल्य” या शब्दातच मोजावे लागेल.

9DSCN3320.JPG

ताजमहालचे बांधकाम करण्यासाठी संपूर्ण भारतामधून आणि आशियामधून साहित्य मागवले होते. १००० पेक्षा जास्त हत्ती याचे साहित्य वाहून नेण्याच्या कामामध्ये वापरण्यात आले होते. खाली साहित्य आणि ते कुठून मागवले दिले आहे.
पांढरा संगमरवर – राजस्थान
जैस्पर – पंजाब
हरिताश्म अथवा जेड चे स्फटिक ( jade and crystal) - चीन
फीरोजा़ (turquoise) - तिबेट
Lapis lazuli, बहुतेक पाचू, हा निळ्या रंगाचा असतो – अफगाणिस्तान
नीलम (sapphire) - श्रीलंका
इंद्रगोप (carnelian) – अरब देश
अशा प्रकारे सगळी मिळून २८ प्रकारचे वेगवेगळे खडे आणि रत्न संगमरवरामध्ये जडवली गेली होती.
ताजमहालचे बांधकामासाठी वास्तुविशारदांचा एक गट स्थापन करण्यात आला होता. अब्द उल करीम, मामुर खान, मक्रमत खान आणि उस्ताद अहमद लाहौरी हे ते वास्तुविशारद होत. यांमधील उस्ताद अहमद लाहौरी हे मुख्य वास्तुविशारद होते.
उत्तर भारतामधून जवळपास २०,००० मजूर यासाठी राबत होते. बुखारा वरून शिल्पकार आले होते, सिरीया आणि इराण वरून लेखन करणारे, दक्षिण भारतामधून नक्षीकाम करणारे कारागीर, बलुचिस्तान मधून दगड कापणारे आणि गुळगुळीत करणारे कारागीर आले होते. कमळ बनवणारे, कलश कोरणारे इत्यादी प्रकारचे सत्तावीस कारागीर होते.
9DSCN3292.JPG9DSCN3294.JPG9DSCN3295.JPG9DSCN3308.JPG

ताजमहालच्या बांधकामामध्ये बांधकाम तज्ञ म्हणून खालील लोकांचा विशेष उल्लेख येतो.:
ओट्टोमन (तुर्किश) साम्राज्यामधील इस्माईल आफंदी ( खान ) – तुर्किश वास्तुविशारद, मिख्य घुमटाचा वास्तुविशारद.
उस्ताद इसा आणि इसा मुहम्मद एफेंदी - हे दोघेही इराणचे होते आणि कोचा मिमार सिनान आगा द्वारा प्रशिक्षित केले गेले होते. यांनी मुख्य वास्तूच्या आराखड्यामध्ये मोलाची भूमिका बजावली असे म्हटले जाते, पण याला पुरावे फार कमी आहेत.
बेनारुस, इराण वरून 'पुरु' ला पर्यवेक्षण वास्तुकार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
का़जि़म खान, लाहोरचा रहिवासी : याने सुवर्ण कलश बनवला.
चिरंजी लाल, दिल्लीचा दगडांना पैलू पडणारा - मुख्य त्रीमितीकार आणि नक्षीकार
अमानत खान हा शिराज, इराणचा राहणारा - मुख्य सुलेखन करणारा, याचे नाव मुख्य प्रवेशद्वाराच्या लेखनानंतर लिहिले आहे.
मुहम्मद हनीफ – हा दगडांवर कारागिरी करणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवत असे.
मीर अब्दुल करीम आणि मुक्क्रिमत खान : दोघेही शिराज, इराण चे – हे दोघे दररोजचा आर्थिक व्यवहार बघत असत.

यमुना काठ :
9DSCN3343.JPGइतिहास:
ताजमहाल पूर्ण झाल्यानंतर लगेचच शाहजहानच्या मुलाने, औरंगजेबाने त्याला आग्र्याच्या लाल किल्ल्यात नजरकैदेत ठेवले.
१८५७ च्या उठवामध्ये इंग्रजी अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवली. यात जडवलेले मूल्यवान खडे आणि रत्ने, भिंतींमधून खोदून काढण्यात आली. १९ व्या शतकाच्या शेवटी ब्रिटीश वहॉइसरॉय कर्जनने साफसफाई करण्यास सुरवात केली. हि साफसफाई १९०८ मध्ये पूर्ण झाली. त्याने मुख्य कक्षाच्या आतमध्ये, कैरो येथील एका मशिदीमध्ये आहे तसा, एक मोठा दिवा लावला. याचवेळेस येथील बागांना ब्रिटीश शैलीमध्ये बदलण्यात आले. १९४२ मध्ये मुख्य इमारतीच्या बाजूला बांबूंचा सांगाडा बनवून एक सुरक्षा कवच तयार केले होते. हे अर्थात जर्मन आणि जपानच्या हवाई दलाची दिशाभूल करण्यासाठी केले होते. परत तसेच कवच १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये, स्फोटक घेऊन जाणाऱ्या पायलट लोकांची दिशाभूल करण्यासाठी बनवण्यात आले होते.
सध्या ताजमहालास धोका यमुना नदीच्या प्रदूषणामुळे, तसेच आम्ल वर्षा, जी मथुरा ओईल रिफायनरी च्या धुरामुळे होत आहे. मथुरा ओईल रिफायनरीला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तीव्र विरोध केला आहे. १९८३ मध्ये ताजमहालाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
9DSCN3311.JPGपर्यटन :
ताजमहालाला दरवर्षी २० ते ४० लाख पर्यटक भेट देतात, यांमध्ये विदेशी नागरिकांचे प्रमाण सुमारे २ लाख इतके आहे. बहुसंख्य पर्यटक हे ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये भेट देतात. ताजमहालाच्या भागात प्रदुषण करणाऱ्या वाहनांना बंदी आहे. पर्यटक पार्किग परिसरापासून चालत अथवा विजेवर चालणाऱ्या वाहनांनी आतमध्ये जाऊ शकतात. प्रदूषणामुळे ताजमहाल पिवळा पडत चालला आहे. ताजमहालच्या दक्षिणेला असणाऱ्या वस्तीस ताज्गांज म्हणतात. यास वस्तीस मुमताज गंज असे देखील म्हटले जात असे. पूर्वीच्या काळी दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी हि वस्ती वसवली गेली होती. आधुनिक जगाच्या सात आश्चर्यांमध्ये ताजमहालाचा पहिला क्रमांक लागतो. विश्वव्यापी झालेल्या मतदानामध्ये ताजमहालाला १० कोटी मते मिळाली होती. सुरक्षा कारणांमुळे ताजमहालाच्या आतमध्ये फक्त पाण्याची पारदर्शक बाटली, छोटा विडीओ कॅमेरा, स्थिर कॅमेरा, मोबाइल फोन आणि महिलांसाठी छोटी पर्स या पाचच गोष्टी नेण्यास परवानगी आहे.
ताजमहाल सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत, शुक्रवार सोडून बघण्यासाठी उघडा असतो. शुक्रवारी फक्त मशीद नमाजासाठी १२ ते २ अशी उघडी असते. पौर्णिमेच्या रात्री आणि २ दिवस अगोदर आणि नंतर ताजमहाल रात्री बघण्यासाठी उघडा असतो. (शुक्रवार आणि रमजानचा महिना वगळता)
9DSCN3346.JPG9DSCN3349.JPGताजमहालावरून बनवण्यात आलेल्या काही इमारती :
बीबी का मकबरा, संभाजीनगर
ताजमहाल, बांगलादेश
ट्रंफ ताजमहाल, अटलांटिक सिटी, अमेरिका
ट्रिपोली श्राईन मंदिर, मिल्वौकी, विस्कॉन्सिन

काही रंजक बाबी :
या इमारतीचे निर्माण कायमच प्रशंसेचा आणि आश्चर्याचा विषय राहिला आहे. याविषयी धर्म, संस्कृती बरोबर देशांच्या सीमा ओलांडून देखील लोकांनी वैयक्तिक आणि भावनात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ताजमहालाच्या काही रंजक गोष्टी खालील प्रमाणे :
असे म्हणतात कि शाहजहानची अशी इच्छा होती कि यमुनेच्या पैलतीरी दुसरा या ताजमहालासारखाच पण काळा ताजमहाल उभारला जावा, ज्यामध्ये त्याची कबर असेल. हे अनुमान १६६५ मध्ये आग्रा फिरण्यासाठी आलेल्या, युरोपीय पर्यटक जीन बैप्टिस्ट टैवर्नियर याने सांगितल्यानुसार आहे. त्याने असे लिहिले होते कि कला ताजमहाल बनवण्याच्या अगोदरच शाहजहानला कैद करण्यात आले. यमुनेच्या पलीकडच्या तीरावर , माहताब बागेमध्ये जेव्हा काळे संगमरवराचे शिलाखंड आढळून आले त्यावेळेस या गोष्टीला पुष्टी मिळाली. पण १९९० साली झालेल्या उत्खननात असे आढळून आले कि ते शुभ्र संगमरवरच होते जे कि काळाच्या ओघात काळे पडले. मग प्रश्न असा येतो कि हे संगमरवर जर काळाच्या ओघात काळे पडले तर ताजमहाल काळा का नाही पडला? २००६ मध्ये पुरातत्व खात्याने जेव्हा माहताब बागेमध्ये केंद्रीय सरोवराची पुनर्स्थापना केली त्यावेळेस असे दिसून आले कि, त्या सरोवरामध्ये सध्याच्या ताजमहालचे स्वच्छ प्रतिबिंब बघितले जाऊ शकते. यावरून शाहजहानचा हेतू स्पष्ट होतो.
असे म्हणतात कि शाहजहान ने ताजमहाल बनवणाऱ्या कारागिरांचे हात तोडले होते अथवा त्यांना मारले होते. परंतु यासाठी काहीच पुरावा उपलब्ध नाही. काही जण असे देखील म्हणतात कि त्यांच्याकडून असे देखील लिहून घेण्यात आले होते कि ते यासारखी दुसरी इमारत बनवणार नाहीत. पण अशा प्रकारच्या गोष्टी अनेक प्रसिद्ध इमारतींच्या बाबतीत आढळतात.
भारताचा १८३० मध्ये गवर्नर जनरल असलेल्या विल्यम बैन्टिक बद्दल असे म्हणतात कि त्याने ताजमहालाला उद्वस्त करून त्याचे संगमरवर विकण्याची योजना बनवली होती. पण बैन्टिकचा चरित्रकार जॉन रसौली लिहितो कि जेव्हा विल्यम बैन्टिकने आग्र्याच्या किल्ल्यामध्ये असलेले उरलेले संगमरवर विकायला काढले त्यावेळेस अशी अफवा उठली.
एक अंधश्रद्धा अशी देखील आहे कि शिखराच्या कळसाच्या सावलीला मारले असता पाऊस येतो. आज देखील येथील अधिकाऱ्यांना शिखराच्या कळसाच्या सावलीच्या ठिकाणी तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे सापडतात.
असे देखील म्हणतात कि पावसाच्या काळात वरच्या घुमटामधून पाण्याचे थेंब कबरीवर पडत राहतात आणि आजपर्यंत हा दोष मोठमोठाले अभियंते शोधू शकले नाहीत. काही म्हणतात असे होते कारण ताजमहालची निर्मिती करणारे कारागीर हिंदू होते आणि त्यांना शाहजहान त्यांचे हात तोडणार याची अगोदरच कल्पना होती म्हणून त्यांनी इमारतीच्या बांधकामामध्ये हा दोष जाणूनबुजून ठेवला. तर काही म्हणतात कि पूर्वी येथे शंकराचे मंदिर होते आणि शंकराच्या पिंडीच्या अभिषेकासाठी हि योजना करण्यात आली होती. तर काही म्हणतात हि अफवा रविंद्रनाथ टागोरांच्या "एक अश्रु मोती ... समय के गाल पर" या काव्यपंक्ती मुळे उठली. खरे खोटे देवच जाणे !
२००० साली इतिहासकार पुरुषोत्तम नागेश ओक यांनी दाखल केलेला अर्ज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला. त्यात त्यांनी म्हटले होते कि एका हिंदू राजाने ताजमहाल बनवला होता. श्री ओक यांनी अनेक पुराव्यांसह हा दावा केला होता कि ताजमहालाची मूळ इमारत आणि त्याच बरोबर देशातील अनेक इमारती ज्या मुस्लिम शासकांनी बनवल्या आहेत असे म्हणतात, पण खर सांगायचं तर या इमारती त्यांच्या अगोदरच्या कालावधीपासून अस्तित्वात होत्या. या इमारती हिंदू राजांनी निर्माण केल्या होत्या आणि त्यांचा मूळ उगम हा हिंदू आहे. जर नागेश ओक यांचे पुरावे वाचले तर आपल्याला सुद्धा या गोष्टींची सत्यता पटते. कधी कधी अस वाटत कि काळाच्या पडद्याआड गेलेला एखादा अद्भूत पुरावा सापडावा जो कि भारताचा सर्व इतिहास हलवून ठेवेल आणि ज्याच्या त्याच्या निर्मात्याला त्याच श्रेय जाईल. अर्थातच आपण या गोष्टी विसरून चालणार नाही कि जिथे समूहच्या समूह धर्मांतरित झाले तेथे या मुक्या इमारतींची काय कथा.

इतिहासकार पुरुषोत्तम नागेश ओक यांनी त्यांच्या Tajmahal is a Hindu Temple Palace या पुस्तकामध्ये १०० पेक्षा जास्त मुद्दे मांडले त्यातील काही मुद्दे असे :
नाव :
१. शाहजहान तसेच औरंगजेबाच्या कारकीर्दीमध्ये कधीच कुठल्या शासकीय दस्ताऐवजांमध्ये ताजमहालाचा उल्लेख आलेला नाही. ताजमहालाला ताज ए महल समझने हास्यास्पद आहे.
२. ताजमहालाच्या शेवटी येणारा महल हा शब्द मुस्लिम नाहीये, अफगणिस्तान पासून अल्जेरिया पर्यंत, कोणत्याही मुस्लिम देशामध्ये एक देखील अशी इमारत दाखवून द्यावी कि जिच्या शेवटी महल हा शब्द येतो.
३. असे म्हणतात कि मुमताज महल येथे दफन केली गेली म्हणून ताजमहाल हे नाव पडले, हि गोष्ट कमीत कमी २ गोष्टींच्या तर्कामध्ये बसत नाही. पहिली हि कि त्याच्या बायकोचे नाव मुमताज महल नव्हतेच, नाव होते मुमताज उल जमानी आणि दुसरी गोष्ट अशी कि मुमताज मधील मुम हटवून तेथे ताज लावणे याला काही अर्थच उरत नाही.
४. जर का स्त्रीच नाव मुमताज असेल तर Taj च्या जागेवर Taz असे असावयास हवे.
५. शाहजहानच्या काळामध्ये युरोपातून आलेल्या पर्यटकांनी ताजमहालाचा उल्लेख 'ताज-ए-महल' असा केला आहे. जे कि शिव मंदिराचे पारंपारिक नाव तेजोमहालयशी मिळते जुळते आहे. युरोपीय लोकांचे उच्चार लक्षात घेता हे म्हणणे जास्त लाक्षत्त येईल.याच्या विरुद्ध औरंगाजेबने आणि शाहजहानने मोठ्या युक्तीने याचा पवित्र मकबरा असा उल्लेख केला आहे.
६. मकबरयाला कबरगाह म्हणतात महल नाही. यावरून असे लक्षात येते कि हुमायुँ, अकबर, मुमताज़ , एतमातुद्दौला आणि सफ़दरजंग यांसारख्या लोकांना हिंदूंच्या पवित्र मंदिरांमध्ये अथवा महालांमध्ये दफन करण्यात आले आहे.
७. आणि जर ताज या शब्दाचा अर्थ कब्रस्तान असा असेल तर त्याच्या बरोबर महल शब्द जोडण्याचा काही तर्कच लागत नाही.
८. ताजमहल हा शब्दप्रयोग मुघल दरबारात कधीच करण्यात येत नव्हता त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. “ताज” आणि “महल” हे दोन्ही मूळ संस्कृत शब्द आहेत.
मंदिर परंपरा
९. ताजमहाल हा शब्द शिव मंदिर दर्शवणाऱ्या तेजोमहालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. या मंदिरामध्ये अग्रेश्वर या शिवाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती.
१०. संगमरवराच्या पायऱ्या चढून जायच्या अगोदर पादत्राणे काढायची परंपरा शाहजहानच्या काळाच्या अगोदरपासून आहे, जेव्हा ताज एक शिवमंदिर होते. जर ताज एक मकबरा म्हणून बांधला गेला असता तर हि परंपरा रूढ झाली नसती कारण मकबरयामध्ये प्रवेश करताना पादत्राणे काढणे अनिवार्य नसते.
११. बघणाऱ्यांना जाणवले असेल कि कबर असलेल्या ठिकाणीचं फक्र पांढऱ्या संगमरवराचा वापर केला गेला आहे, जेव्हा कि बाहेर लता वेली यांनी सजवलेले नक्षीकाम आहे, यावरून हे सिद्ध होते कि मुमताजची कबर जिथे आहे तोच कक्ष शिव मंदिराचा गाभारा आहे.
१२. संगमरवराच्या जाळ्यांवर १०८ कलश कोरलेले आहेत. आणि १०८ हा आकडा फक्त हिंदू धर्मातच शुभ मानला जातो.
१३. ताजमहालची देखरेख करणारे आणि दुरुस्ती करणाऱ्या लोकांमध्ये असे लोक देखील आहेत कि ज्यांनी प्राचीन पवित्र शिव लिंग आणि मूर्तीना संगमरवराच्या कबारीखाली असलेल्या लाल दगडांच्या कक्षामध्ये, जो कि आता बंद करण्यात आला आहे, बघितले आहे.
१४. भारतामध्ये १२ ज्योतिर्लिंगे आहेत. असे निदर्शनास येते कि ताजमहाल त्यांमधील एक आहे जे नागनाथेश्वर या नावाने ओळखले जात असे. त्याला हे नाव दिले गेले होते कारण त्याला नागाने वेढा घातल्यासारखे बनवले गेले होते. जेव्हा शाहजहानने यावर कब्जा केला तेव्हा याची पवित्रता नष्ट झाली.
१५. वास्तुकलेच्या विश्वकर्मा वास्तुशास्त्र नावाच्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये 'तेज-लिंग' चे वर्णन येते. ताजमहालामध्ये 'तेज-लिंग' होते म्हणूनच त्याचे नाव तेजोमहालय पडले होते.
१६. श्रावण महिन्यात आग्र्यामधील लोक ५ शिव मंदिरांमध्ये जाऊन शंकराचे दर्शन करत असत. आता फक्त बालकेश्वर, पृथ्वीनाथ, मनकामेश्वर आणि राजराजेश्वर हीच मंदिरे उरली आहेत. तेव्हा हे स्पष्ट होते कि ५वे मंदिर हे तेजोमहालय मंदिर होते.
१७. आग्रा हि जाट लोकांची नगरी आहे. जाट लोक शंकराला तेजाजी या नावाने ओळखतात. The Illustrated Weekly of India, २८ जून १९७१ च्या जाट विशेषांकानुसार जाट लोकांमध्ये तेजा मंदिर असे. कित्येक शिवलिंगामध्ये तेजलिंग असे. ज्याचे जाट लोक उपासक होते. यावरून असे दिसून येते कि ताजमहाल भगवान शिवाचे निवासस्थान तेजोमहालय होता.
काही दस्तऐवज :
१८. बादशाहनामा, जे कि शाहजहानच्या दरबारातील गोष्टींचा आढावा घेणारे पुस्तक आहे त्यातसुद्धा ( पृष्ठ ४०३, भाग १ ला ) असे स्वीकारले गेले आहे कि मुमताजला दफन करण्यासाठी शाहजहानणे जयपूरचे महाराज जयसिंग यांच्याकडून एक विशाल घुमट असलेली विशाल इमारत विकत घेतली होती, जी इमारत राजा मानसिंग भवन म्हणून ओळखली जात असे.
१९. औरंगजेबाने स्वतःच्या बापाला लिहिलेल्या चिठ्ठीचा 'आदाब-ए-आलमगिरी', 'यादगारनामा' आणि 'मुरुक्का-ए-अकब़राबादी' (१९३१ मध्ये सैद अहमद द्वारा संपादित पृष्ठ ४३, भाग २) या ३ महत्वाच्या ऐतिहासिक पुस्तकांमध्ये उल्लेख येतो. यामध्ये औरंगाजेबने स्वतः लिहिले आहे कि मुमताजला ज्या सात माजले असणाऱ्या लोकप्रिय स्थानावर दफन करण्यात आले आहे तेथील इमारती इतक्या जुन्या झाल्या आहेत कि त्यामधून पाणी गळत आहे. घुमटाच्या उत्तर दिशेला भेग पडली आहे. यासाठी औरंगजेबाने स्वतःच्या खर्चानी इमारतींची डागडुजी करायचे फर्मान काढले होते व शाहजहानला भविष्यात येथील विस्तारपूर्वक डागडुजी करण्याबाबत सुचवले. यावरून असे दिसून येते कि शाहजहानच्या वेळेसच ताज प्रांगण एवढे जुने झाले होते कि त्याच्या डागडुजीची गरज होती.
२०. जयपूरचे महाराजा यांनी त्यांच्या दैनदिनी मध्ये १८ डिसेंबर १६३३ मध्ये शाहजहानने ताज भवन समूह मागितल्याच्या (२ गोष्टीना नवीन क्रमांक आर १७६ आणि १७७ ) विषयाबाबत असे लिहिले आहे कि गोष्ट जयपूरच्या त्या वेळच्या शासकासाठी अतिशय निंदनीय होती आणि तिला कधीच स्वीकारले गेले नाही.

असे बरेच मुद्दे आहेत, सर्व इथे सांगणे योग्य नाही आणि या लेखाचा तो हेतूही नाही. पण ताजमहाल हि एक अप्रतिम कलाकृती आहे आणि ती बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोक इथे येत असतात, आता ती प्रेमाचे प्रतिक आहे का नाही? ती कुणी बांधली ? असे बरेच प्रश्न आहेत. पण ज्या कुण्या लोकांनी ती बनवण्यात मोलाचा वाटा उचलला, त्या सगळ्यांना मात्र मानाचा मुजरा. प्रत्येक भारतीयाने मात्र ती आयुष्यात एकदा का होईना जरूर बघावी.

साधारण १२ वाजता ताजमहाल सोडला. चिक्कार फोटो काढले. चला अजून एक जगातील सात आश्चर्यापैकी अजून एक बघून झाले, आता पुढील कधी बघावयास मिळते कुणास ठाऊक ? हा विचार करत करतच बाहेर आलो. गाडी कडे बघितले तर २ बकऱ्या गाडीला लावलेला हार खाण्यात मश्गुल होत्या. आता फक्त हाराचा दोराचं शिल्लक राहिला होता त्यामुळे त्यांना हुसकावण्यात देखील काही हशील नव्हते. गाडी काढताना ज्याच्या दुकानासमोर गाड्या लावल्या होत्या त्याने चक्क २५० रु. मागितले. आणि वर गाडीला २-२ हेल्मेट आहेत वगैरे सांगू लागला. मी त्याच्याशी वाद न घालता सरळ सी आर एफ ची चौकी गाठली आणि तिथल्या एकाला घेऊन आलो. त्याला बघताच मात्र याने ४० रु. दोन्ही गाड्या सोडल्या. परत जाता जाता लाल किल्ल्याचे बाहेरून दर्शन झाले.
आणि शेवटी एकदाच्या आमच्या दोन्ही गाड्या श्री कृष्ण जन्म भूमीच्या दिशेने निघाल्या. मोहीम कुठे आहे याचा काही पत्ताच नव्हता, फक्त आज काहीही झाल तरी दिल्ली गाठायची होती. 

 आणि शेवटी एकदाच्या आमच्या दोन्ही गाड्या श्री कृष्ण जन्म भूमीच्या दिशेने निघाल्या. मोहीम कुठे आहे याचा काही पत्ताच नव्हता, फक्त आज काहीही झाल तरी दिल्ली गाठायची होती.

मोहिमेमधील लोकांना फोन केला असता, मोहीम मथुरा सोडून निघाली असल्याचे कळले, तेव्हा आता थेट आपली भेट दिल्लीतच होईल असे सांगत फोन ठेवला. आग्रा ते मथुरा हे फक्त ५७ किमी अंतर आहे. पण आता पोटात चांगलेच कावळे ओरडू लागल्यामुळे आम्ही आम्ही आमचा मोर्चा उपहारगृहाकडे वळवला. थंडी देखील भरपूर असल्यामुळे भूक चांगलीच लागली होती. मग मस्त पैकी शाकाहारी जेवणावर ताव मारला. मथुरेला जायचे असल्याने दुसरा पर्यायच नव्हता. हे सगळे होता होता मथुरेला पोहचायला चक्क दुपारचे ३ वाजले.
मथुरेचे सध्याचे रूप बघून लहानपणी “कृष्णा” या कार्यक्रमात जी छबी मनात होती, ती मात्र स्पष्टपणे पुसली गेली. अर्थात हे गृहीत धरलेच होते.

चहा पिता पिता , सहजच
10DSCN3376.JPGमथुरेविषयी थोडेसे :
मथुरा आग्र्यापासून ५७ किमी तर दिल्ली पासून १५० किमी वर आहे. मथुरेपासून वृंदावन ११ किमी वर आणि गोवर्धन २२ किमी वर आहे. मथुरा ऐतिहासिक तसेच धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय प्राचीन अशी हि नगरी भगवान कृष्णाचे जन्मस्थळ आहे. भारताचा हा भाग हिमालय आणि विंध्य पर्वत यांच्या मध्ये येतो.
वाल्मिकी यांच्या रामायणामध्ये मथुरेचे वर्णन मधुपुर अथवा मधु दानवाचे नगर असे केले गेले आहे. मथुरेलाच “लवणासुराची राजधानी” असे देखील संबोधले गेले आहे. यामध्ये हि नगरी मधु दैत्याने वसवल्याचे सांगितले आहे. लवणासुर हा मधु दैत्याचा मुलगा होय. लवणासुर याचा इक्ष्वाकु कुळाचा राजपुत्र शत्रुघ्न याने वध केला आणि येथे राज्य स्थापित केले. यावरून मथुरा उर्फ मधुपुर रामायण काळात वसल्याचे दिसून येते.
मथुरेच्या चारही दिशांना चार शिव मंदिरे आहेत. पूर्वेला पिपलेश्वर, दक्षिणेला रंगेश्वर, उत्तरेला गोकर्णेश्वर आणि पश्चिमेला भूतेश्वर. शहराच्या चारही बाजूंना शिव मंदिरे असल्याने शंकराला मथुरेचा कोतवाल म्हणतात. महाभारत आणि भगवद्‌ पुराणानुसार मथुरा हि शूरसेन साम्राज्याची राजधानी होती, जिचा कंस (कृष्णाचा मामा) हा राजा होता.
येथे चैत्र शु. ६ तसेच कार्तिक शु. १० ( कंसाच्या वधानंतरचा दिवस ) ला यात्रा भरते. जवळच असलेल्या कंकाली टेकडीवर कंकालीदेवीचे मंदिर आहे. या टेकडीवर देखील अनेक पुरातन वस्तू सापडल्या आहेत. हि देवी म्हणजे, जी देवकीची मुलगी समजून कंसाने हिला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण हि त्याच्या हातातून सुटून आकाशात गेली.
या ठिकाणी ई.स.पू. ५०० च्या काळातील अवशेष मिळाले आहेत, त्यावरून या नगराची प्राचीनता लक्षात येते. वराह पुराण तसेच नारदीय पुराणामध्ये मथुरेच्या भोवताली १२ वने असल्याचा उल्लेख आहे.
१. मधुवन
२. तालवन
३ कुमुदवन
४ काम्यवन
५ बहुलावन
६ भद्रवन
७ खदिरवन
८ महावन (गोकुळ)
९ लौहजंघवन
१०बिल्व
११. भांडीरवन
१२. वृंदावन
याच बरोबर २४ उपवने असल्याचा उल्लेख आहे. आज हे सर्व छोट्या छोट्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये रुपांतरीत झाले आहेत.

कारागृह
10DSCN3377.JPG10DSCN3380.JPGजन्म भूमीचा इतिहास:
जेथे श्री कृष्णाचा जन्म झाला तेथे कारागृह होते. त्या ठिकाणी सगळ्यात पहिले मंदिर ई.स. पू. ५७ च्या सुमारास बांधले गेले होते. महाक्षत्रप सौदासच्या काळात मिळालेल्या एका शिलालेखावरून याची प्रचीती येते. शिलालेखावरून असे कळते कि “वसु” नामक व्यक्तीने ते मंदिर बांधले होते. यानंतर दुसरे मंदिर खूप काळानंतर विक्रमादित्य राजाच्या काळामध्ये बनवले गेले. हे मंदिर ई.स. १०१७-१८ मध्ये महमूद गझनीने फोडले. नंतर महाराजा विजयपाल देव यांच्या शासनकाळात ११५० मध्ये येथे मंदिर बांधले गेले. हे मंदिर पहिल्या मंदिरापेक्षा विशाल होते, जे १६ व्या शतकाच्या आरंभी सिकंदर लोदीने नष्ट केले. ओरछा चा राजा वीरसिंह जू देव बुन्देलाने पूर्वीच्या अवशेष असलेल्या ठिकाणी नवीन मदिर बांधले. १६६९ साली औरंगजेबाने परत हे मंदिर फोडले आणि या जागेवर मशीद उभारली गेली. या मशिदीच्या मागील बाजूलाच सध्याचे केशवदेवाचे मंदिर उभे आहे. प्राचीन केशव मंदिर असलेल्या ठिकाणाला “केशवकटरा” म्हटले जाते.
मथुरा आणि वृंदावन एका दिवसात सहज बघून होते. विश्राम घाटाशेजारी कमी खर्चिक असलेल्या धर्मशाळा राहण्यासाठी उपलबद्ध आहेत. अधिकतर मंदिरे सकाळी १२ वाजेपर्यंत तर संध्याकाळी ४-७ च्या सुमारास उघडी असतात.

मथुरा परिक्रमा :
प्रत्येक एकादशी आणि अक्षय नवमीला मथुरेची परिक्रमा केली जाते. वैशाख शुक्ल पौर्णिमेला रात्री एक परिक्रमा केली जाते, तिला “वनविहाराची परिक्रमा” असे म्हणतात.
मंदिरासमोरच एक मोठा तलाव आहे आणि त्याच्या भोवतीच कारागृह आहे. याच ठिकाणी कंसाने वासुदेव आणि देवकीला कैदेत ठेवले होते असे गावकरी सांगतात. तलाव एकदम बकाल अवस्थेत आहे.
मथुरेमधील पेढे खूप प्रसिद्ध असल्याचे ऐकले होते, पण आम्हा सातारकरांना “सातारचे कंदी पेढे” सोडले तर बाकीचे सगळे सारखेच. त्यामुळे पेढे वगैरे घेण्याच्या भानगडीत मी पडलो नाही.
मंदिराच्या इथेच ताक विकायला होत. मात्र सिंहगड, राजगडावर मिळणाऱ्या ताकाची चव त्याला नव्हती.
दर्शन मात्र व्यवस्थित झालं, जास्त गर्दी देखील नव्हती. खरतरं मथुरेमधील अजून ठिकाणे बघायची पण इच्छा होती पण वेळेच्या अभावामुळे त्या इच्छा इच्छाच राहिल्या.
एकतर आपला भारत एवढा मोठा आहे आणि प्रत्येक शहरात बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत कि सगळा भारत बघण्यासाठी कमीत कमी ३-४ जन्म घ्यावे लागतील.
मंदिर सोडून निघत असतानाच मैत्रीचा फोन आला, सह्यांकन ग्रुप ५ च गेट टुगेदर होतं. बघू, २६-२७ पर्यंत परत आलो आणि बाईक चालवण्याच्या अवस्थेत असलो तर नक्की येईन म्हणत फोन ठेवला.
तो फोन ठेवतो न ठेवतो तोच आईचा फोन,
कुठे आहेस?
अग मथुरेत, काल रात्री तर सांगितलं होत ना तुला.
अरे, भाभींच्या कडे जाऊन ये ना ,,,,,,
अग आई, तुला काल पण सांगितलं होत ना कि वेळ मिळाला तर नक्की जाईन.
हे बघ, आत्ता ४ वाजतायत , दिल्ली अजून १५० किमी आहे, आत्ता जरी निघालो तरी पोहचायला रात्र होणार आहे, मी रात्रीचं गाडी चालवायच टाळतोय
मी शक्य तितक्या थोडक्यात, आई मला तुझ्या त्या मैत्रिणीच्या घरी जाण्यात काहीच रस नाहीये हे पटवून द्यायचा प्रयत्न केला.
हा, रात्री २-२ वाजेपर्यत एकटा कळसूबाई वरून येशील आणि आता रात्र होते काय ?
हे बघ, आई, तू कोणतीही गोष्ट कुठेही जोडू नकोस. तेव्हा नाईलाज होता. एकतर बाबांनी सांगितलंय रात्री गाडी चालवायची नाही. अशी बरंच काही कारण देत मी आईला, मला तुझ्या त्या मैत्रिणीच्या घरी जाण्यात काहीच रस नाहीये हे पटवून देण्यात यशस्वी झालो.
आईच मात्र शेवटपर्यंत अरे गेला असतास तर बरं वाटल असतं रे तिला, असं बरचं काही बाही सांगण चालू होतंच.
आता मी लहान असताना त्या भाभी आमच्या शेजारी रहात आणि आईची आणि त्यांची गाढ मैत्री वगैरे होती आणि आहे हे जरी खरं असलं तरी मी त्यांच्या घरी जाऊन काय बोलणार हा मला पडलेला यक्ष प्रश्न. बर त्यात बाकीचे मित्र बरोबर.
परत एकदा सगळा सरंजाम अंगावर चढवला आणि साधारण ४ च्या सुमारास मथुरा सोडत असतानाच साऱ्या, ५ मि. थांब ना,,,,, स्वागत म्हणाला. मला पुढचं स्वानुभवावरून समजल.
मग स्वागत जातच आहे तर मी देखील जाऊन येतो म्हणतं स्नेहल देखील गेला. यांचा सगळा कार्यक्रम उरकून मथुरा सोडायला ०४३० वाजले.
म्हणजे अजून साधारण ४ तास लागतील दिल्लीत पोहचायला. आता इतके दिवसांच्या अनुभवाने गाडी कितीही दामटली तरी चहा नाश्ता , शी-शु असले सगळे प्रकार वाटेतच येत असल्याने ४० किमी/तास हाच गाडीचा वेग राहतो हे आता मला देखील माहित झाल होतं.
दिल्लीला जाणारा रस्ता मात्र मस्तच असल्याने मी ७०-८० च्या वेगानेच गाडी दामटवत होतो, शक्य तितक्या लवकर दिल्ली मध्ये पोहचणे याच त्यामागचा एकमेव उद्देश होता. स्नेहल-रुपेश पण साधारण त्याचं वेगात होते. साधारण ०५३० ची वेळ असेल सूर्य मावळला होता आणि बऱ्यापैकी काळोख झाला होता, रस्त्यावर आता बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ होती पण रस्ता चांगला असल्याने सर्व वाहने जवळपास ५०-६० च्या वेगानेच होती, मी देखील वेग थोडासा कमी केला होता.
समोरचा बाईकवाला थोडा हळू असल्याने मी त्याच्या उजव्या बाजूला गाडी घेतली व त्याला Overtake करावे या हेतूने बाईक थोडी उजव्या बाजूला घेतली.
आणि अचानक मला माझ्या रस्त्याच्या मधेच उभा असलेला तो इसम दिसला.
पुढंच सुज्ञास सांगण न लगे,,, दोन्ही ब्रेक एकदम क्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
आणि आमच्या गाडीने धरणीमातेला साष्टांग दंडवत घातला होता. गाडीचे Side guard मजबूत असल्याने आमचे पाय वगैरे खाली सापडले नाहीत एवढंच ते नशीब.
खाली पडलो असतानाच गाडी अजून थोडी पुढ ढकलली गेली, मागं वळून बघायला पण वेळ नव्हता, परत गाडी उचलत असताना अजून एक हलकासा धक्का जाणवला.
स्वाग्या, स्वाग्या, तू ठीक आहेस ना?
मला सगळ्यात जास्त काळजी त्याची होती, कारण मी पूर्णपणे Arm guard, knee guard, gloves वगैरे गोष्टींमुळे सुरक्षित होतो.
मला फक्त गादीवर अंग टाकून देताना शरीराला जेवढा धक्का जाणवतो, तेवढाच जाणवला होता. त्या जाड्या भरड्या जर्किनने त्याचं काम योग्य बजावलं होतं.
तू गाडी काढ बाजूला पहिल्यांदा, मी ठीक आहे .... स्वागत
गाडी सुरु केली, मागच्या बाजूने बरिच आरडओरड ऐकायला येत होती. अरे स्वाग्या, गिअर अडकलाय. फक्त पहिलाच पडतोय.
अरे आहे त्या गिअर मध्ये घे बाजूला.
मग मी देखील गाडी बाजूला घेतली, तेवढ्यात मागच्या बाजूने Swift Dezire भरधाव पुढे गेली, पण लोकांनी लगेचचं तिला अडवलं, तिच्या ड्रायव्हरला एक फटका पडत असताना मी बघितला, साधारण १०० मी गेल्यावर गाडी एका टपरीजवळ थांबवली.
स्वाग्या, ठीक आहेस ना?
अरे आहे रे, साऱ्या कितीवेळा तुला म्हणतोय थांबव, थांबव अरे आपण १०० किमी पेक्षा जास्त आलोय, आणि ब्ला ब्ला ब्ला ब्ला
सगळ लेक्चर गपगुमाने ऐकल, दुसरा पर्याय नव्हता. चूक माझीच होती.
झाल अस होतं, आमची बाईक पडल्यावर आमच्या बाईकला मागून येऊन Swift Dezire थडकली होती आणि Swift Dezire ला Innnova. Innnova ने Swift Dezire ला इतक्या जोरात मागून धक्का मारलं कि Swift Dezire ची डिक्की पूर्ण वरती आली होती.
अस आहे होय, त्यामुळेच मला गाडी पडल्यावर २ हलके धक्के जाणवले.
स्वागतच्या स्पष्टीकरणाने आज आपण काय पराक्रम केला आहे याची मला पूर्णपणे जाणीव झाली.
पहिल्यांदा स्नेहलला फोन लावला आणि आम्ही दिल्लीच्या बाहेरच्या बाजूला आहोत आणि गाडीचा Indicator चालू ठेवला आहे सांगितलं. सगळी गाडी मागून पुढून तपासली, Side guard थोड वाकलं होतं आणि गिअर आडवा आत घुसल्यामुळे अडकला होता. Tail Indicator फुटला होता. डाव्या बाजूचा आरसा गायब होता.  चला, फार काही मोठा चुना नाही लागणार असं एकंदरीत लक्षात आल्यावर जीवात जीव आला. स्वागतच लेक्चर चालूच होतं. मी मनातल्या मनात, तू आता फक्त पड रे परत बाईकवरून मग सांगतो तुला अस म्हणत लेक्चर ऐकत होतो.

तोपर्यंत स्नेहल-रुपेश आले, मग परत एकदा त्यांना सगळ रामायण सांगितलं. जर्किन पण बरच फाटलं होत.
मग शेजारी असलेल्या एका दुकानातून एक पाईप आणला आणि थोड्या खटाटोपानंतर गिअर बाहेर आला.
मस्त पैकी चहा मारला. मोहिमेतल्या कार्यकर्त्यांना फोन केला, मोहीम मुक्कामी पोहचली होती. गुरुद्वाराचं नाव वगैरे व्यवस्थित विचारून घेतलं. आणि परत एकदा बाईकवर स्वार झालो, आता गाडी मी चालवण्याचा प्रश्नच नव्हता.

दिल्लीत पोहोचल्यानंतर आम्हाला ग्रेटर कैलास नावाचे १,२ आणि ३ असे भाग आहेत आणि त्यातील २ भागामध्ये गुरुद्वारा आहेत हा शोध लागला. त्यामुळे प्रत्येकजण आम्हाला वेगवेगळा पत्ता सांगत होता. शेवटी एकदाचा गुरुजींनाच फोन करून व्यवस्थित पत्ता घेतला आणि मुक्कामी सुखरूप  पोहचलो.
दिल्लीत आल्यावर कळलं कि काही उत्साही कार्यकर्ते आज गोकुळला पण भेट देऊन आले होते. गोकुळ देखील इतर पर्यटन स्थळांसारखचं आहे, हे ऐकून वाईट वाटलं. तेथील प्रत्येक घरी, लल्ला (कृष्ण) याच घरामध्ये कसा रांगत असे, येथीलच लोणी कसे चोरून खात असे वगैरे भाकड गोष्टी सांगून पर्यटकांकडून पैसे उकळण्याचे उद्योग चालू आहेत. हे सर्व ऐकल्यावर मला स्वानंदची आठवण आली. कारण म्हणजे स्वानंदच कामानिमित्त अधे मध्ये बारामती त्या भागात जाणं होत असे. ह्याचं म्हणनं बारामतीमध्ये कोणीही शरद पवारांच्या वयाच्या आसपास असणारा माणूस भेटला कि तो हमखास तो आणि शरद शाळेत एकाच बाकड्यावर कसे बसायचे ते सांगणार. आणि स्वानंदच्या भाषेत साला, त्यांनी म्हटलं असत ना कि क्रिकेट खेळले, गोट्या खेळले, विटी-दांडू खेळले तरी ऐकलं असत बे ,,,,पण सगळे जण आपणच कसे त्याच्याबरोबर बाकड्यावर बसायचो ते सांगणार. एकदा गेलं पाहिजे साऱ्या, ते बाकडं बघायला.

आज साधारण २५० किमी प्रवास झाला होता. झोपायला आज देखील मस्त गाद्या होत्या.आल्यावर सगळ्यांना आग्र्याहून आणलेला पेठा वाटला.
आणि पहिल्यांदा माड्याला फोन केला आणि
माड्या, आपण घेतलेल्या Arm guard, knee guard, gloves चा उपयोग झाला रे, अस सांगितलं.
हरामखोर, हेल्मेटचा नाही झाला का?...
नाही रे, पण तू काळजी करू नकोस, अजून ३००० किमी बाकी आहेत. आणि मग परत एकदा सगळ रामायण त्यला सांगितलं.
मग बाकी नेहमीच, कॉलेज काय म्हणतंय, जास्त कुणाला सांगू नकोस, Proxy मारतोयस ना ? वगैरे वगैरे.
मग नेहमीप्रमाणे जेवण उरकलं आणि झोपी गेलो.

आजचा प्रवास : २५३.७ किमी

उद्याचा प्रवास :
अक्षरधाम – शिसगंज गुरुद्वारा – झिंझोली
१३ जानेवारी २०१२

आज दिल्ली मधून मोहीम जाणार असल्याने, निखिलने काल रात्री झोपतानाच मला बाबा, उद्या तरी मोहिमेबरोबर राहा, कुठे जाऊ नका. असे विनवले होते. त्यामुळे आम्ही देखील जास्त कुठे बाहेर जाण्याच्या फंदात पडणार नव्हतो.

सकाळची लगबग - दिल्ली गुरुद्वारा
10DSCN3387.JPG

आज सकाळी उठून चक्क अंघोळ वगैरे केली ते हि गरम पाण्याने. असं सुख फार क्वचितच हो.
आज दिल्ली असल्याने सर्वानी पारंपारिक पोशाख घातले होते. दिल्लीमध्ये महिलांना सुरवातीला ध्वज पथक आणि रक्षक म्हणून राहू द्या असा प्रस्ताव आल्याने आज महिला वर्ग खुशीत होता. नववारी वगैरे घालून, गुरुजींच्या भाषेत “झाशीची राणी पथक” आज आघाडीवर होते.

होय, पुन्हा मराठेच पानिपतावर
10DSCN3385.JPG

सकाळी मस्त पैकी चहा बिस्कीट, फोडणीचा भात असा अल्पोपहार (?) झाल्यानंतर मोहीम ९ वाजता अक्षरधाम च्या दिशेने मार्गस्थ झाली. इतके दिवस गायब असणारे आमच्या सारखे अजून काही कलाकार आज मोहिमेमध्ये हजर होते. हे सर्व बघून मला शाळेचे तपासणीचे दिवस आठवले.
आज मोहीम दिल्लीत असल्यामुळे, पोलीस बंदोबस्त देखील होता. नेहमीसारखेच सर्व दिल्लीकर देखील मोहिमेकडे कुतूहलाने बघत होते.

१० वाजण्याच्या सुमारास अक्षरधाम मध्ये पोहचलो. आत मध्ये कॅमेरा, मोबाईल वगैरे न्यायची परवानगी नसल्याने परत एकदा सर्व साहित्य काढून गाडीमध्ये व्यवस्थित ठेवले आणि आत मध्ये गेलो.

अक्षरधामच्या रस्त्यावर :
10DSCN3411.JPGस्वामीनारायण अक्षरधाम विषयी थोडेसे :
हे मंदिर सोमवारी बंद असते. सकाळी ०९३० ते संध्याकाळी ०६३० या कालावधीत प्रवेश दिला जातो. मंदिर बघण्यास साधारण १ तास पुरेसा होतो.
श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख स्वामी महाराज यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर ७००० कारागिरांनी ३००० स्वयंसेवकांच्या सहायाने बांधले. दिल्लीला भेट देणाऱ्या पर्यटकांपैकी ७० % पर्यटक या मंदिराला भेट देतात. हे मंदिर ६ नोव्हेंबर २००५ मध्ये अधिकृतरित्या भाविकांसाठी खुले झाले. हे मंदिर वास्तू शास्त्र आणि पंचारत शास्त्रानुसार बांधले आहे.
मुख्य मंदिर १४१ फुट उंच, ३१६ फुट रुंद आणि ३७० फुट लांब आहे. मंदिरामधील कलाकुसर डोळ्याचे पारणे फेडते, यात काही वादच नाही. हे मंदिर राजस्थानी गुलाबी Sandstone आणि इटालियन मार्बल वापरून बांधण्यात आले आहे. यामध्ये कुठेही लोखंड अथवा कॉक्रिट चा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरामध्ये २३४ कलाकुसर केलेले स्तंभ, ९ घुमट, २००००(???) मूर्ती आणि पुतळे आहेत. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून या मंदिराची “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ” मध्ये नोंद झाली आहे.

मंदिर बघून निघण्यास ११३० वाजले. तिथून मोहिमेने शिसगंज गुरुद्वाराच्या दिशेने प्रस्थान केले. लाल किल्ल्यासमोरून जाताना हृदयात कालवाकालव झालीच पण पर्याय नव्हता, कुतुबमिनार, इंडिया गेट अस बराच काही बघायचं होतं पण वेळ नव्हता. आयुष्यात वेळेला किती महत्व असतं हे आता मला मनोमन पटले होते.

अचानक विदुलाची ( बालमैत्रीण ) आठवण झाली. ती देखील दिल्ली मधेच कुठेतरी आहे हे माहिती होतं. ३-४ वेळा फोन करायचा प्रयत्न केला पण फोन बंद. जाऊ दे, दुपारी करू म्हणत पुढे निघालो.
दिल्लीमध्ये चक्क दुचाकीसाठी देखील टोल आहे. तेथील टोल नाक्यावर घडलेली एक गमतीशीर घटना. मोहिमेत सगळ्यात पुढे रुग्णवाहिका असायची आणि तिच्या मागे मागे ध्वज पथकाच्या गाड्या असायच्या. बहुतेक लेन चा काहीतरी घोटाळा झाला असावा, म्हणून विशालने रुग्णवाहिका नेहमीच्या सवयीप्रमाणे मागे घेतली. आता नेहमी ध्वज पथकाच्या गाड्यांबरोबर मुले असायची, त्यामुळे बाईक पटापट बाजूला सरकायच्या. आज महिला वर्ग आहे हे याच्या लक्षातच नाही आलं. त्याने नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका मागे घेतली आणि तिचा हलकासा धक्का मागच्या बाईकला लागला. काकू आणि दिदी एखादं पोत गाडीवरून पडत त्या प्रकारे थेट रस्त्यावर. इकडे मला हसू का रडू अस झालं. पण लागलीच हसू आवरून पुढे धावलो. जास्त काही झाल नव्हतं. विशालला थोडं समजावलं आणि परत मागे आलो.

वाटेत “सुदर्शन NEWS” ने थांबवले. गुरुजी आणि पुढे असलेल्या लोकांची ते मुलाखतं वगैरे घेत होते. बाकी आमचं सगळ्यांचं लक्ष त्या रिपोर्टर कडे. भारी होती राव. कसे कुणास ठाऊक, आज स्वयंघोषित कार्यकर्ता पुढे होता, त्यामुळे त्याला पण थोडे प्रश्न विचारण्यात आले. त्याला मुलाखत देताना बघून मला व स्वागतला एकाचवेळी “Wednesday”” मधला विद्युत बाबा आठवला. हा इकडे मुलाखत देतोय आणि आम्ही इकडे हसून हसून बेजार.
जवळच एका हातगाड्यावर कुत्र्याची ५-६ नुकतीच जन्मलेली पिल्ले होती. पहिल्यांदा त्यांची आई कुठ जवळपास नाही ना याची खात्री केली आणि मगच फोटो काढले. ( अनुभव माणसाला शहाणा करतो, दुसर काय?)

10DSCN3421.JPG
पिल्लावळ :
10DSCN3429.JPGशीशगंज साहिब गुरुद्वारा आगमन :
10DSCN3450.JPG

सगळं उरकत दुपारी १ वाजता शीशगंज साहिब गुरुद्वारा मध्ये पोहचलो. माथा टेकून आल्यानंतर जेवण आटोपले. इथे देखील कुठलेतरी वृत्तवाहिनीवाले आले होते. पण आम्ही त्यामध्ये काही इंटरेस्टेड नव्हतो. कारण आत येत असतानाच तेथील चौकामधे तुपामध्ये बनवल्या जात असलेल्या जिलेब्या आम्हाला दिसल्या होत्या. मी, स्वागत आणि जय दादा गुपचूप बाहेर पडलो आणि येथेच्छ जिलेब्या हादडल्या. मी आणि स्वागतने स्लिपिंग बॅगज् घेतल्या आणि परत आलो. तोपर्यंत बाकीच्या लोकांची देखील जेवणं उरकली होती.
गुरुद्वाराच्या बाहेरचं एक मजेशीर दृश्य दिसलं. एक भिकारी बसला होता आणि त्याच्या शेजारीच त्याचा इमानी कुत्रा झोपला होता.कुत्र्याला थंडी लागू नये म्हणून त्याच्या पाठीवर जाकीटासारखं काहीतरी घातलं होतं. Life is all about your priorities – हे वाक्य तंतोतंत पटलं.

Life is all about your priorities
10DSCN3466.JPGदिल्लीच्या रस्त्यांवर :
10DSCN3434.JPG
परत एकदा विदुलाला फोन करून पहिला, पण अजूनही तो भ्रमणध्वनी माझा भ्रमनिरासच करत होता. आम्ही १० वी नंतर कधीच भेटलो नव्हतो. कधी मी भारतात ती बाहेर, तर कधी ती भारतात मी बाहेर असा आमचा लपंडाव चालूच होता.

मोहिमेतील काही अविस्मरणीय क्षण:
10DSCN3500.JPG10DSCN3503.JPG
साधारण दुपारी अडीच वाजता गुरुद्वारा सोडला आणि झिंझोलीच्या दिशेने निघालो. हे कुठे आहे आणि किती लांब आहे याचा आम्हाला काही पत्ता नव्हता. गुरूजींनी पण मोहिमेला सोडू नको, तो भाग थोडासा आडवाटेवर आहे असं सांगितलं असल्यामुळे आम्ही मोहिमेबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता.
पण गाव जास्त काही लांब नव्हतं पण आडवाटेवर होतं. संध्याकाळी ५ च्या सुमारास तिथे पोहचलो. गावात मोरांची संख्या प्रचंड आहे. चक्क मोर हातात दाणे घेऊन जवळ गेल तर खायला येतात. त्यामुळे मी पण गाडी थांबवून थोडे फोटो काढावेत म्हणून बाजूला थांबलो.

झिंझोली
10DSCN3482.JPG10DSCN3498.JPG
माझे फोटो काढून झाल्यावर निघण्याच्या तयारीत असताना फेसबुक दिसला. तो अशाच एका मोराबरोबर खेळण्यात व्यस्त होता. हा इथ एकटा काय करतोय? आणि याचा जोडीदार कुठाय ? असा प्रश्न मला पडला असतानाच, दादा जाऊ नको रे, तो मला सोडून गेलाय. इति फेसबुक
अरे, अस कसं तू त्याला जाऊ दिलंस ? आणि आता तू येणार कुणाबरोबर ?
तुझ्याबरोबर
झाल, म्हणजे हा आमच्याबरोबर ट्रिपल सीट येणार होता तर.
वा, किती विश्वास माझ्यावर, आता आमच्याकडे देखील पर्याय नव्हता.
फेसबुकला मध्ये घेतला आणि येथेच्छ शिव्या घालत पुढे निघालो.
मुक्कामाचं ठिकाण फार काही लांब नव्हतं.
५-१० मि. मध्ये आम्ही पोहचलो.
प्रशिक्षण केंद्र होत कुठलतरी.
तिथल्या मुलांना विचारलं तर त्यांना ३००० रु मासिक भत्ता मिळतो अस कळालं.
त्या बदल्यात त्यांना काही ठिकाणी कामाला जाव लागतं.
रहायचा खाण्याचा खर्च ती संस्थाच करते.
सामान वगैरे जागेवर ठेऊन चहा पिऊन ताजेतवाने झालो. आज चक्क १७३० वाजताच मुक्कामी पोहचलो असल्याने आता काय करायचं हा प्रश्न होताच पण स्वागत कुठे दिसेना म्हणून इकडे तिकडे बघितलं तर साहेबांनी मैदानावर जाऊन फुटबॉल खेळणं देखील सुरु केल होतं.
मग मी आणि अजून काहीजण त्यांना जाऊन मिळालो. आज सकाळ पासून डावा हात जरा ठणकायला लागला होता, कदाचित काल बाईक वरून पडताना सगळा भर त्याच्यावर गेला असावा. त्यामुळे मी आपला गोलकी च्या भूमिकेत शिरलो.
साला, आमच्या गोल पोस्ट कडे बॉल येण्याची काही चिन्हे दिसेनात. काय कराव म्हणून सहज परत विदुलाला फोन लावला आणि अपेक्षेप्रमाणे लागला. आता लागणारच हो.
अग आज दिल्ली मध्ये होतो. सकाळपासून प्रयत्न करतोय तुझा नंबर बंद येत होता वगैरे वगैरे
तिने देखील अगदी टिपिकल मुलींच्या भाषेत, अय्या खरंच , अरे फोन बंद ठेवला होता क्लास मध्ये होते. ( आयला, आम्ही काय क्लास कधी अटेंड केले नाहीत कि काय ? )
१ दिवस अगोदर तरी सांगायसच, नाहीतर उद्या ये कि ,, वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला
जाऊ दे, आता वाईला आलीस आणि मी असलो तर भेटू म्हणत फोन ठेवला.
कार्टी कधी नव्हे ते खेळायला मिळाल्यामुळे अगदी डोळ्यात बोट गेल तरी दिसू नये इतका अंधार होईपर्यत खेळत राहिली. १ गोल देखील मारला. मी पण अरे अंधारामुळे बॉल दिसला नाही अस काहीतरी कारण सांगून माझा डिफेंड करायचा प्रयत्न केला.
पण एकंदरीत आज खेळल्यामुळे सगळ्यांनाच खूप मजा आली होती.
जेवण देखील मस्त होते. फोडणीचा भात, पापड आणि लोणचं असा फक्कड बेत होता.
तिथे वाढणारी मुले देखील फार प्रेमाने वाढत होती. बहुतेक पहिल्यांदाच वाढत असावीत कारण लोणचं पण “ भाई, थोडा लो , थोडा तो लो” करत आग्रहाने वाढत होती.
जेवण वगैरे उरकल्यावर सभा सुरु झाली.
उद्या मुख्य दिवस असल्याने भुले, भटके सगळेजण आज सभेमध्ये होते. गुरूजींनी उद्याच्या कार्यक्रमाची आणि प्रवासाची रूपरेषा सांगितली.
उद्या देखील सर्वजण पारंपारिक वेशभूषेत असणार होते.
सूचना वगैरे झाल्यावर कुणाला काही अनुभव वगैरे सांगायचे असतील अथवा सूचना करायच्या असतील तर सांगा म्हणून सांगण्यात आले.
मी लहानपणासून श्रोत्याची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे करण्यात यशस्वी असल्याने मी त्याचं भूमिकेत रहायचे पसंत केले.
लोक आपापले अनुभव सांगत होते. आम्ही देखील ते अनुभव एकूण स्वतःची करमणूक करून घेत होतो.
तेवढ्यात एकजण तावातावाने उभा राहिला.
गुरुजी, तुम्हाला खर सांगतो, आजपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कधीच बाहेर गेलो नव्हतो. फक्त युरोप मधील ३ देश बघितले.
त्याच्या या वाक्यानंतर पूर्ण सभागृह हशा आणि शिट्ट्या ( या आमच्या) नी भरून गेलं. त्यानंतर तो पुढ काय बोलला ते मला माहित नाही. पण त्यानंतर प्रत्येकाच्या थोंडी एकच वाक्य होत, गुरुजी, तुम्हाला खर सांगतो, आजपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कधीच बाहेर गेलो नव्हतो. फक्त युरोप मधील ३ देश बघितले. वा रे मेरे बब्बर शेर !!!!!
आणि त्याचं “युरोप” या नावाने बारस करण्यात आम्ही यशस्वी झालो.
उद्या पानिपतच्या मुख्य युद्ध भूमीला भेट देणार होतो.
रात्री झोपताना आज पर्यंत पानिपत बद्दल वाचलेलं, ऐकलेलं डोळ्यासमोर उभे राहत होतं. इब्राहिमखान ( हा माझा हिरो ) , सदाशिव भाऊ, शिंदे-होळकर यांचेच चेहरे (वाचून ,ऐकूण मनात ज्या प्रतिमा तयार झाल्या आहेत त्या, नाहीतर म्हणाला हा काय हरितात्या आहे का ?) वारंवार डोळ्यासमोर येत होते.

आजचा प्रवास : ५३.७ किमी
उद्याचा प्रवास : सोनीपत – पानिपत – कुरुक्षेत्र

बरीच उशिरापर्यंत झोप लागली नाही आणि सकाळी झोप उघडली ती गुरूजींनी कानात टाकलेल्या पाण्याने.
गुरुजी, आज थेट कानात पाणी, पहिल्यांदा उठवलं नाही तुम्ही.
बाजीराव, दुसरा राउंड सुरु झालाय.

 गुरुजी, आज थेट कानात पाणी, पहिल्यांदा उठवलं नाही तुम्ही.

बाजीराव, दुसरा राउंड सुरु झालाय.
उठलो,उठलो करत मी अंगावर घेतलेले दोन रग बाजूला केले.
घ्या,घ्या अजून ४-४ रग घेऊन झोपा, मग कशाला झोपा मोडतील ,, इति गुरुजी
मी आपला गुपचूपपणे अंथरून- पांघरूणाच्या घड्या घातल्या आणि बाहेर आलो.
आता कडाक्याच्या थंडीत २-२ रग अंगावर घेऊन झोपण्यात जी मजा आहे, ते दुसऱ्याला काय कळणार.
बाहेर येऊन बघतो तर अंघोळीला कडकडीत तापवलेल पाणी होतं.
देव भलताच प्रसन्न आहे वाटतं, चक्क आज देखील अंघोळ.
तेवढ्यात गुरूजींनी नवीन बातमी सांगितली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील कार्यक्रमाला येणार असल्याने पानिपतची बलिदान भूमी बंद करण्यात येणार असल्याचं कळलं.
आता पुढं जे होईल ते पुढंच पुढं बघू, पण सध्या पानिपत गाठू या विषयावर सर्वांच एकमत झालं आणि मोहीम पानिपतच्या दिशेने मार्गस्थ झाली. सकाळी देखील तेथील लोकांनी नाश्ता करून जाण्यासाठी खूप खूप आग्रह केला पण वेळ कमी असल्याने आम्ही नाश्ता न करताच निघालो.
अपघात झाल्यापासून मी गाडी चालवली नव्हती त्यामुळे आज मात्र मी गाडी चालवणारच असल्याचं स्वागतला सांगितलं. कारण एखाद्या गोष्टीची मनानं एखादा भीती घेतली कि ती गोष्ट करणे फार अवघड होऊन बसते आणि ती रिस्क घ्यायला मी तयार नव्हतो. २०,००० + किमी च्या वर गाडी चालवली आहे, त्यामुळे ती एखादे वेळा पडणारच त्यात वावगे असे काही नाही म्हणत परत गाडी चालवायला घेतली.

झिंझोली पासून पानिपत साधारण १२० किमी आहे. अमृतसरकडे जाताना पानिपत मध्ये घुसलं की सुनौती नावाची एक पाटी लागते.तिथून साधारण ५ किमी वर बाजारपेठ आहे. वाटेत एक दर्गा लागतो व त्या दर्ग्यापासून साधारण २ किमी वर आहे ती शहीद वीरांची भूमी अर्थात पानिपतच्या युद्धाचे स्मारकं. ते “काला आम” या नावाने ओळखले जाते. सध्या तिथे तो आंब्याच झाड आहे ते मुळचं नव्हे. हा वृक्ष १ ऑगस्ट १९९२ रोजी हरयाणाचे राज्यपाल धनिक लाल मंडल यांनी लावला. या ठिकाणी इतका मोठा रक्तपात झाला की रक्ताचे पाट वाहिले गेले आणि या झाडाला येणाऱ्या आंब्यांचा रंग बदलून लाल भडक असा दिसू लागला म्हणून या आंब्याला काला आम म्हणून ओळखले जाऊ लागले. ( असं मी ऐकलं आहे, खरं-खोट माहित नाही, जाणकारांनी प्रकाश टाकावा, हि नम्र विनंती )
११ च्या सुमारास पानिपत गाठलं. आज १४ जानेवारी २०१२. बरोबर पानिपतच्या युद्धाला २५१ वर्ष पूर्ण होत होती. पानिपत नाव जरी कुठे वाचालं तरी अंगावर सरसरून काटा उभा राहतो आणि आज तर आम्ही प्रत्यक्ष त्या युद्धभूमीवर होतो. प्रत्येकाच्या डोक्यात काय विचारचक्र सुरु होते ते ज्याचे त्यालाच माहिती. अर्थात जवळपास सर्वांच्याच मनात तेच विचार असणार.
देवीचे मंदिर :
11DSCN3507.JPG11DSCN3509.JPG
सर्वात प्रथम आम्ही देवी मंदिरात जाऊन देवीच दर्शन आणि नंतर जवळ असलेल्या मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेतलं. येथील शिव मंदिर हे पानिपतच्या युद्धानंतर मागे राहिलेले मंगल रघुनाथ यांनी बांधल्याच सांगितलं जातं.
प्रतिभाताई येणार असल्या तरी त्यांचा कार्यक्रम दुपारी ३ च्या सुमारास होता त्यामुळे आमचा काला आम कडे जाणायचा मार्ग खुला झाला. वाटेत पोलीस बंदोबस्त होताच. पण फार काही त्रास झाला नाही. पानिपत बद्दल लिहायचं झालं तर १-२ भाग कमी पडतील. विश्वास पाटील यांनी “पानिपत” मध्ये सगळं काही मांडलच आहे, तरी देखील

पानिपतविषयी थोडेफार :
भारताच्या हरियाना राज्यातील एक शहर. दिल्लीपासून साधारण ९० किमी वर असून राष्ट्रीय महामार्ग १ वर आहे. या शहराचा इतिहास जातो तो थेट महाभारताच्या कालखंडात.ज्या वेळेस धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन करायचे ठरवले त्यावेळेस पांडवाना यमुनेचा पश्चिमेकडील भाग, हस्तिनापुर साम्राज्याच्या बदल्यात वाटणी मध्ये देण्यात आला. या भागामध्ये पांडवांनी स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर पाच शहरे वसवली.
१. पांडुप्रस्थ अथवा पानप्रस्थ – सध्याचे पानिपत
२. स्वर्णप्रस्थ – सध्याचे सोनीपत
३. इंद्रप्रस्थ – सध्याची दिल्ली
४. बागप्रस्थ – सध्याचे बागपत, येथेच अब्दालीने यमुना ओलांडण्याचे साहस दाखवले.
५. तिलप्रस्थ – सध्याचे तिलपत
प्रस्थ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ठिकाण, जागा असा होतो.

इतिहासामध्ये पानिपतला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले ते येथील निर्णायक ठरलेल्या युद्धांमुळे. जर का ही युद्धे झाली नसती अथवा या युद्धांचे निकाल वेगळे लागले असते, तर आज या भारताचा इतिहास आणि भूगोल, हो भूगोलपण पूर्णपणे वेगळा असता हे सांगण्यास कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

पानिपतचे पहिले युद्ध -
पानिपतचे पहिले युद्ध झाले ते २१ एप्रिल १५२६ रोजी. याच युद्धाने भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. हे युद्ध दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि काबुलीस्तानच्या तिमुरीड साम्राज्याचा( तिमूर हा या साम्राज्याचा निर्माणकर्ता (१३३६ ते १४०५ ) ) सुलतान बाबर यांच्या मध्ये लढले गेले. युद्धाअगोदर दोन्ही सैन्य एकमेकांपुढे आठवडा उभे होते. शेवटी बाबरचा रात्री हल्ला करायचा डाव फसला आणि इब्राहीमने दुसरी दिवशी युद्ध सुरु केले. हे युद्ध बाबरने त्याच्या तोफखान्याचा अतिशय नियोजनबद्ध वापर करून जिंकले.या युद्धानंतर लोधी घराण्याचा अस्त झाला. ( १४५१ ते १५२६ ) दारूगोळा आणि तोफखान्याचा वापर करून लढलेले हे अतिशय सुरवातीच्या युद्धांपैकी एक. इब्राहिम लोधीकडे त्याचा तोफखाना नव्हता आणि तोफांच्या आवाजांची सवय नसलेले लोधीचे हत्ती, आवाज ऐकून गोंधळून गेले आणि हत्तींनी स्वतःच्याच सैन्याला चिरडले. पण उपलब्ध साधनांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की तोफखान्यापेक्षा नियोजनाचा या युद्धात बाबरला फायदा झाला. या युद्धामध्ये बाबरने “तुलुघमा” या युद्धतंत्राचा वापर केला. अरबी भाषेत “तुलुघमा” याचा अर्थ विभागने असा होतो. या युद्धतंत्रात सैन्य डाव्या, उजव्या आणि मध्य भागात विभागले जाते. हे भाग देखील नंतर पुढचा आणि मागचा अशा भागात विभागले जातात. अशा प्रकारे अल्प सैन्य वापरून प्रतिस्पर्ध्याला सर्व बाजूंनी घेरण्यात येते. मधल्या फळीतील पुढच्या भागात गाड्या असत, या एकमेकांना बांधलेल्या असून त्या जनावरांना जोडलेल्या असतं. या गाड्यांच्या मागील भागात तोफा असत, या तोफांच्या शेजारी तोफजीचे तोफेच्या उष्णतेपासून संरक्षण होण्यासठी एक चाके असलेली संरचना असते. त्यामुळे या तोफा विविध दिशेला वळवता सुद्धा येऊ शकतात. या दोन कारणांमुळे बाबरचा तोफखाना धोकादायक ठरतो. या प्रकारच्या रचनेमुळे बंदुका आणि तोफा स्वतः लक्ष्य न ठरता निवांतपणे चालवता येत असतं. जड तोफांची तोंडेदेखील या प्रकारच्या रचनेमुळे सहज वळवता येत असतं. इब्राहीम लोधी युद्धभूमीवर लढता लढता मरण पावला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला एकटे टाकून युद्धभूमीवरून पळ काढला. असे म्हणतात कि अजून एक तास इब्राहीम जिवंत राहिला असता तर विजयी झाला असता, कारण बाबरकडे राखीव दल नव्हते आणि त्याचे सैनिक वेगाने थकत चालले होते.
अर्थात जर- तर च्या गोष्टीना इतिहासात महत्व नसते.

बाबर आणि लोधीची तुलना :

मुघल साम्राज्य :
प्रमुख : बाबर – जन्म २३ फेब्रुवारी १४८३, अन्दिजन, उझबेकिस्तान येथे तर मृत्यू २६ डिसेंबर १५३० आग्रा येथे.
रथीमहारथी - चिन तुमुर खान ( सेनापती, युद्धात मधली फळी सांभाळत असे )
उस्ताद अली कुली ( तोफखान्याचा प्रमुख )
मुस्तफा रूमी ( बंदुकधारी सैन्याचा प्रमुख )
असद मलिक हस्त खान व राजा संघर अली खान – जनजुवा राजपूत वारसदार, बाबर आणि यांची पहिली भेट १५२० साली झाली नंतर हे पानिपतच्या १ ल्या युद्धात मुघल फौजेला येऊन मिळाले. पुढं खानव्याच्या लढाईमध्ये पण लढले.
सैन्य : घोडदळ – २४,०००
पायदळ – ३,०००
तोफा – २०
मृत/जखमी : ४,०००
लोधी साम्राज्य :
इब्राहीम लोधी – हा एक अफगाण होता. १५१७ ते १५२६ या कालखंडात त्याने उत्तर भारतावर राज्य केले.
राजा हसन खान मेवातपती – खान्झाडा राजपूत, खानव्याच्या लढाईमध्ये मृत्यू १५ मार्च १५२७. याच्या घराण्याने सुमारे २०० वर्षे मेवात वर राज्य केले. असे म्हणतात कि फिरुझ शहा तुघलकाने १३७६ मध्ये याच्या घराण्याला धर्म बदलण्यास भाग पाडले. नंतर याचा मुलगा नहेर खान याने मुघलांचा प्रतिनिधी या नात्याने मेवातवर राज्य केले.
सैन्य :
घोडदळ – ४०,०००
पायदळ – ३०,०००
हत्ती – १,०००
मृत/जखमी : २०,०००

पानिपतचे दुसरे युद्ध :

पानिपतचे दुसरे युद्ध हे ५ नोव्हेंबर १५५६, रोजी सम्राट हेम चंद्र विक्रमादित्त्य उर्फ हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झाले. खरे पाहता, हे युद्ध हेमू आणि अकबराचे सेनापती बैरम खान यांमध्ये झाले म्हणणे उचित ठरेल. युद्धावेळी अकबराचे वय अवघे १४ वर्षे होते.
हेमूने दिल्ली जिंकल्याच कळताच बैरम खान दिल्ली परत मिळवण्याच्या हेतूने दिल्लीवर चालून येण्यास निघाला. हेमुला याची कुणकुण अगोदरच लागली असल्याने हेमुने आपल्या सैन्यासह पानिपतच्या दिशेने कुच केली होती.
आणि ५ नोव्हेंबर १५५६ रोजी या दोन्ही सेना एकमेकांना भिडल्या. जेष्ठ इतिहासकार कीन यांच्या मतानुसार, अकबर आणि त्याचा रक्षणकर्ता बैरम खान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. अकबर बरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बैरम खानचा सैन्याला आदेश होता.
हेमू स्वतः सैन्याचे नेतृत्व करत होता, हेमूच्या सैन्यात सुरवातीला १५०० हत्ती आणि तोफखाना होता. हेमू ने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ३०,००० च्या घोडदळाला घेऊन कुच केली होती. या घोडदळामध्ये राजपूत आणि अफगाणांचा भरणा होता. सैन्याचा आणि अफगाणांचा उत्साह वाढवण्यासाठी हेमूने त्यांना जहागिरी म्हणून जमिनी दिल्या होत्या आणि त्याच्या खजिन्याची द्वारे उघडली होती. अशा प्रकारे त्याने अतिशय कर्तबगार असे सैन्य एकत्र केले होते.
अकबराचे सैन्य :
नाममात्र प्रमुख : अकबर
प्रत्यक्ष प्रमुख : बैरम खान,याचा मुलगा, अब्दुल रहीम खान हा अकबराच्या दरबारातील “नऊ” रत्नांपैकी एक होता.
तिरंदाज असलेले घोडदळ प्रमुख : मोहम्मद कासिम
मुघलांच्या केंद्रस्थानी असलेल्या पायदळ, घोडदळ यांच्यामध्ये
उस्ताद अली कुली खान ( तोफखान्याचा प्रमुख ) हा पानिपतचे १ ले युद्ध लढला होता. अकबराच्या आजोबांबरोबर
हुसेन कुली खान, मोहम्मद साजिद खान पूर्वांची, शाह कुली खान महरूम, मीर मोहम्मद बरका, कासिम खान नियास्पोरी व सईद मोहम्मद बरका असे महारथी होते.
सर्वात पुढे असलेल्या सैन्यामध्ये मेहमूद खान बुडूस्की, कक्साल खान, हुसेन कुली बेग, शाह कुली बेग महराम आणि समाजी खान होता.
मुघलांची उजवी फळी सिकंदर खान उझबेग सांभाळत होता तर डावी फळी अब्दुल्ला खान सांभाळत होता.
हेमुचे सैन्य :
प्रमुख अर्थात हेमू ‘
तोफखाना प्रमुख: मुबारक खान आणि बहादूर खान
हत्तीदल :
हसन खान फौजदार
मैकल खान
इखतीयार खान
संगरम खान आणि कपन
उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. केंद्रस्थानी जातीने हेमू आणि भगवान दास होते.
आता सैन्याची रचना पाहू,
जस आपण बघितलं, तशी ही दोन्ही सैन्ये डावी, उजवी आणि मधली आघाडी अशी विभागली गेली. अकबरातर्फे हुसेन कुली बेग, शाह कुली खान महरूम सर्वात पुढची फळी सांभाळत होते, तर शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली कुली खान हे मधली फळी सांभाळत होते. कोणत्याही युद्धात (अगदी क्रिकेटमध्ये पण ) मधली फळी ही अतिशय महत्वाची मानली जाते. मधल्या फळीच हे काम असतं की जसे प्रमुखाला शत्रुपक्षाची बाजू कमकुवत झाल्याचे निदर्शनास येते मधली फळी पुढच्या फळीला बाजूला करत वाऱ्याच्या वेगाने शत्रुपक्षात घुसते आणि शत्रुपक्षाची मधली फळी एकमेकांपासून विभक्त करते. दुसरं काम अस की जर पुढची फळी पडली तर मधली फळी येणाऱ्या शत्रुपक्षाला स्वतःच्या अंगावर घेते.
शाह बदाग खान आणि शाह अब्दुल माली हे राखीव तुकडी सांभाळत होते.
हेमुतर्फे हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत होते तर उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. हेमुने या लढाईच्या अगोदर २२ युद्धे जिंकली होती, त्याच्या आघाडीच्या फळीत सुमारे १००० हत्ती होते. हेमुचे सैन्य अनुभवी होते तसेच हत्तींनी आणि शस्त्रांनी सुसज्ज होते. हत्तीच्या सुळ्याना जांबिये लावले गेले होते.
हेमुचं सैन्य मुघालांपेक्षा काकणभर सरसच होते. पण मुघलांच सैन्य धोकादायक बनलं होत ते त्यांच्या घोडदळामध्ये असणाऱ्या तिरंदाजांमुळे. घोडदळ तिरंदाज हे अतिशय धोकादायक मानले जातात, ते शत्रुपक्षावर एका ठराविक अंतरावरून बाणांचा वर्षाव करत राहतात. यामुळे शत्रुपक्ष गोंधळतो आणि या दलाच्या मागे लागतो आणि त्यांना तेच हवे असते. अशा प्रकारे शत्रुपक्ष विखरला की त्यांना हरवणे सोपे जाते.
आता प्रत्यक्ष काय घडले पाहू :
यात अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही सैन्याच्या मधोमध एक खंदक होता जो हत्ती ओलांडून जाऊ शकत नव्हते.
सर्वात प्रथम हेमुने हत्तींच्या सहाय्याने हल्ला चढवला तो मुघलांच्या डाव्या आणि उजव्या फळीवर जी अब्दुल्ला आणि सिकंदर खान सांभाळत होते. मुघलांच्या पायदळाला हत्ती आवरेनासे झालेले बघताच मोहम्मद कासिम त्याचं तिरंदाज असलेले घोडदळ घेऊन अब्दुल्ला खानच्या मदतीला जातो. तिरंदाज बाण मारून हत्तींना जायबंदी करायचा प्रयत्न करत असतानाच वाऱ्याच्या वेगाने उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत, मुघलांच्या डाव्या आणि उजव्या फळीवर तुटून पडतात.
अजून हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत आहेत. आत्ता फक्त हत्तीदलचं पुढे आहे.
या दरम्यान वेगवेगळी झालेली हत्तीदलं युद्धाच्या केंद्रस्थानी सरकू लागतात. हे बघताच मुघलांची मधली फळी खंदकाकडे सरकू लागते. हिचं संधी आहे हे बघून हेमू वेगाने आक्रमण करतो. आता दोन्ही दले खंदकापुढे येऊन थांबतात. हेमूच्या सैनिकांनी जरी खंदक पार केला तरी आता त्यांना हत्ती साथ देऊ शकणार नाहीत. हे कळताच मुघलांची मधली फळी खंदकाच्या विरुद्ध बाजूला चिटकून राहते तर हेमुचे हत्तीदल परत एकदा वेगवेगळे होऊन डाव्या आणि उजव्या बाजूला सरकू लागतात. भगवान दास आणि हिंदू-अफगाणी सैन्य हेमुच्या मागे येऊन उभे आहे.
इकडे अब्दुल्ला खान (मुघल डावी फळी ) शादी खान कक्करला (हेमू उजवी फळी ) मागच्या बाजूने केंद्रस्थानी ढकलतोय तर दुसऱ्या बाजूला रामयाला (हेमू डावी फळी ) सिकंदर खान उझबेगने (मुघल उजवी फळी ) केंद्रस्थानी ढकललंय. याचवेळेस मुघलांची शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली कुली खान असलेली मधली फळी विभागून वाऱ्याच्या वेगाने बाहेर पडते आणि खंदकाच्या दोन्ही टोकांना असलेल्या हत्तीदलाला जाऊन भिडते. आता हेमुचं सैन्य सर्व बाजूंनी घेरलं गेलं आहे.
आणि जे घडू नये ते घडते, भगवान दास आणि हेमुचे भरवशाचे वीर शादी खान कक्कर, रामया पडतात.
हेमू अजूनही सैन्याला हत्तीच्या अंबारीत बसून लढाईला प्रवृत्त करतोय. त्याचं वेळेस एक बाण हेमूच्या डोळ्यातून आरपार जातो आणि हेमू बेशुद्ध होऊन अंबारीत कोसळतो. शाह कुली खान जो हेमूच्या हत्तीच्या जवळचं असतो त्याच्या काहीतरी अतर्क्य घडल्याचं लक्षात येतं. सैन्याच्या सहाय्याने तो हत्तीच्या माहुताला पकडतो आणि हत्तीवर असलेल्याच नाव विचारतो. माहूत नाव सांगतो, हेमू पडल्याचं कळताच हेमुचे सैन्य विखरते. हेमुला बेशुद्ध अवस्थेत मुघलांच्या छावणी मध्ये घेऊन जाण्यात येते. अकबर हेमुला मारायचे नाकारतो पण बैरम खान हेमुचं शीर कापून काबूलला तर धड दिल्लीला रवाना करतो.
अबुल फझल (अकबरनामाचा लेखक ) म्हणतो, जर अकबराने हेमुला जीवनदान देऊन स्वतःच्या सैन्यात घेतले असते तर अकबरची दृष्टी आणि हेमुचं सामर्थ्य वापरून काय जिंकता आलं नसत ?
हेमूच्या पळणाऱ्या सैन्याला इस्कंदर खानने पाठलाग करून पकडले. त्याच्या हातात सुमारे १००० हत्ती आणि अनेक सैनिक लागले. युद्धानंतर हेमुची बायको दिल्लीमधील हाताला येतील तेवढे जडजवाहीर घेऊन निसटली,तिचा इस्कंदर खानाने पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
( काही ठिकाणी हेमू युद्धभूमीवरच मरण पावल्याचा उल्लेख आहे.)
विशेष : अकबरच्या सैन्याचा १५५६ मध्ये आग्रा आणि दिल्ली येथे पराभव केल्यानंतर हेमुने उत्तर भारतामध्ये “हिंदू राज्य ”, “विक्रमादित्य ” या नावाने सुरु केले. ७ ऑक्टोबर १५५६ मध्ये दिल्लीमधील जुन्या किल्ल्यामध्ये हेमुचा राज्याभिषेक झाला आणि हेमू “सम्राट हेम चंद्र विक्रमादित्य ” या नावाने ओळखला जाऊ लागला होता.

संदर्भ : http://sumitsoren1983.blogspot.no/p/war-room.html

पानिपत चे तिसरे युद्ध -
हे युद्ध, पौष शुद्ध अष्टमी. बुधवार, १४ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाण अहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. १८ व्या शतकात लढल्या गेलेल्या मोठ्या युद्धांपैकी हे एक. या लढाईमध्ये उत्तरेला मराठे तर दक्षिणेला अफगाण होते. हे युद्ध मराठ्यांनी गोलाईच्या तंत्राने खेळले. मराठ्यांबरोबर असलेले बाजारबुणगे आणि यात्रेकरू यांचे रक्षण करण्याच्या हेतूने त्यांनी यामध्ये गोलाईचा वापर केला. मराठ्यांच्या सैन्याला मिळणारी रसद अब्दालीने तोडली होती त्यामुळे सैन्यात दुष्काळ पडला होता, त्यामुळे भाऊंनी गोलाईचे तंत्र वापरत दिल्लीकडे कुच करावयाचे ठरवले. अब्दाली दक्षिणेला असल्याने साहजिकच सैन्याला अब्दालीच्या सैन्याशी दोन हात करूनच दिल्लीकडे सरकावे लागणार होते. (गोलाची लढाई = गोलाई )
मराठा मार्ग :
ग्वाल्हेर, मध्य प्रदेश : ३० मे १७६०
दिल्ली – १ ऑगस्ट १७६०
कुंजपुरा, हरयाणा – १० ऑक्टोबर १७६०
अब्दाली मार्ग :
अब्दालीच्या अलिगढ वरून निघालेल्या सैन्याने खालीलप्रमाणे कूच केली.
बाघपत – २५ ऑक्टोबर १७६०
सोनपत - २७ ऑक्टोबर १७६०
समालखा - २८ ऑक्टोबर १७६०
दक्षिण पानिपत - ३१ ऑक्टोबर १७६०
मराठा व्यूहरचना:
गोलाच्या लढाईचा नकाशा इब्राहीम गारदी आणि समशेर बहाद्दराने, भाऊंच्या नजरेखाली बनवला होता. पश्चिम दिशेला पानिपतच्या अंगाला मल्हारराव होळकर कमान सांभाळणार होते तर होळकरांची पूर्वेची बाजू जनकोजी व महादजी शिंदे सांभाळणार होते. मराठा सैन्याची डावी बाजू इब्राहिमखान आणि दमाजी गायकवाड सांभाळणार होते.इब्राहिमखान बरोबर किंबहुना थोडी मागे विंचुरकरांची पथके होती. इब्राहीमखान हा तोफखान्याचा प्रमुख असल्याने सर्वात पुढे त्याचे दल होते. तोफखान्याच्या मागे असलेल्या घोडदळाच्या मागे ३०,००० अननुभवी सैनिक होते.
तोफखाना शत्रुपक्षाला खिंडार पाडेल आणि त्या जागेमधून पूर्ण मराठा सैन्य दिल्लीकडे कूच करेल अशी प्रारंभी योजना होती. सदाशिवराव भाऊ गोलाच्या मध्यभागी असून भाऊंच्या बरोबर विश्वासराव होते तर त्यांच्या उजव्या हाताला यशवंतराव पवार व अंताजी माणकेश्वर होते.
कुणाबरोबर किती सैन्य होते ? :
इब्राहिमखान गारदी : ८,००० बंदूकधारी सैनिक(घोडदळ) आणि १५० तोफा
दमाजी गायकवाड : २,५०० घोडदळ
विठ्ठलराव विंचुरकर : १,५०० घोडदळ + कुंजपुरयाला दाखल झालेले २,००० अफगाण ( कॅडमॅड पथक )
सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव : १३,००० घोडदळ आणि सोनजी भापकर, तुकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, अंताजी माणकेश्वर, सुभानराव माने, संताजी वाघ, दादाजी दरेकर, सहजी झांबरे, खंडेराव नाईक-निंबाळकर, बाजी सुपेकर, ढमढेरे, काकडे, शिंदे, कडू, कामथे, मुठे, हरफळे, कदम, शितोळे, धायबर, चव्हाण असे अनेक नामवंत मराठा सरदार
सटवोजी जाधव : १,५०० घोडदळ
समशेर : १,५०० घोडदळ
यशवंतराव पवार : १,५०० घोडदळ
जनकोजी व महादजी शिंदे : १०,००० पायदळ
मल्हारराव होळकर : १०,००० पायदळ `
गोलाच्या मागील भागात : ७,००० पायदळ
हे सर्व सैन्य २ मैल रुंद आणि ३ मैल लांब (मागची बाजू ) अस पसरलं होतं.
मराठा सैन्य :
तोफा : २०० ( महाकाली, तकदीर – नावाजलेल्या तोफा )
घोडदळ : ४०,०००
पायदळ : १५,०००
बाजार बुणगे : २ ते ३ लाख
अब्दाली व्यूहरचना:
आजचा जो सानौली रस्ता आहे त्याच्या दक्षिणेला काही मीटर अंतरावर अब्दालीचे सैन्य होते. अब्दालीने सैन्याची मांडणी सुरवातीला तिरकस पद्धतीने केली होती. जसे युद्धाला तोंड फुटले तसा या मांडणीने चंद्र्कोरीचा आकार धारण केला. अब्दालीच्या सैन्याची मधली फळीची कमान त्याचा सेनापती शाह वली पेलणार होता. अब्दालीच्या सैन्याची उजवी फळी बरखुरदार व अमीरबेग सांभाळत होते. यांना हफिझ रहमत खान, दुंदेखान आणि बंघास खान सहाय्य करत होते.यांच्याच डाव्या हाताला रोहिले होते. तर डावी फळी नजीब सांभाळत होता. सुजा उद्दौला मोक्याच्या प्रसंगी फितुरी अथवा काही वेडेवाकडे पाऊल टाकू नये म्हणून अब्दालीने त्याला नजीब आणि शाह वलीच्या मध्ये ठेवले होते.तर नजीबाच्या उजव्या बाजूला, म्हणजेच डाव्या बाजूच्या शेवटच्या टोकाला शहापसंद खान होता. तर फौजेच्या मागील भागात दीड कोसावर एक उंचवटा धरून अब्दाली नजर ठेऊन होता. अब्दालीचा जनानखाना आणि इतर बेगमा ४ कोस मागे होत्या.
मुख्य तोफची : रहमान बारकझाई
कुणाबरोबर किती सैन्य होते ? :
नजीबखान : १५,००० पायदळ
सुजा उद्दौला : ३,००० घोडदळ आणि ६० तोफा
शहावली, अताईखान, गाझी : १९,००० घोडदळ
शहापसंद खान : ५,००० घोडदळ
बरखुरदार व अमीरबेग : ४,००० घोडदळ, १४,००० पायदळ आणि तोफखाना
राखीव दल : १०,००० घोडदळ
या सैन्याने ७ कोस भरेल असा चंद्रकोरीचा आकार धारण केला होता.
अब्दाली सैन्य :
तोफा : १३०
घोडदळ : ४२,०००
पायदळ : ३८,०००
राखीव दल : १०,०००
बाजार बुणगे : १०,०००
काय घडलं प्रत्यक्ष युद्धभूमीवर:
डाव्या आघाडीवर :
साधारण १० च्या सुमारास युद्ध सुरु झाले, सर्वात प्रथम इब्राहीमखान त्याच्या सैन्यासह बरखुरदारखानाला जाऊन भिडला. साधारण एका तुकडीमध्ये १००० सैनिक असतं. इब्राहिमखानाने त्याच्या २ तुकड्या (२०००) घेऊन अजून डाव्या बाजूला चालं केली जेणेकरून बरखुरदारखानाचे सैन्य समोरासमोर सापडावे. अन्यथा इब्राहीमखानाच्या सैन्याला डाव्या बाजूने घोडदळाला भिडावे लागले असते आणि त्याच्या राहिलेल्या ७ तुकड्यांसह (७,०००) बरखुरदारखानाच्या १४,००० पायदळाला आणि ४,००० घोडदळाला तो समोरासमोर भिडला. तोफांचा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, तोफांचे गोळे शत्रुपक्षाला ओलांडून पलीकडच्या बाजूला पडत आहेत हे लक्षात येताच त्याने तोफखाना बंद करून त्याच्या ७ तुकड्या पुढे घुसवल्या. इब्राहीमखानाने अपेक्षा केल्याप्रमाणेच बरखुरदारखानाने त्यच्या काही तुकड्यांना घेऊन अगदी डाव्या बाजूने वेढा टाकला. पण त्याचे २,००० सैनिक अगोदरच डावी बाजू धरून होते. १२३० वाजेपर्यंत इब्राहीमखानाने त्याच्या ८,००० सैनिकांच्या मदतीने १२,००० रोहिले गारद केले होते.मराठ्यांना विजय दिसू लागला. बाकीचे रोहिले जीव वाचवण्यासाठी पळू लागल्याचे बघताच विंचुरकर आणि गायकवाडांना स्फुरण चढले आणि त्यांनी त्यांचे ६,००० चे सैन्य गोल तोडून पुढे घुसवले. जसे घोडदळाने गारद्यांना ओलांडले, त्यांच्या बंदुका बंद पडल्या, बंदुका बंद पडल्याचे बघताच इनायत खानाचे सैन्य मागे फिरले आणि रोहील्यानी गोळीबार सुरु केला. इकडे डाव्या बाजूला घुसलेल्या बरखुरदारखानाच्या सैन्याने गारद्यांची उत्तरेची वाट रोखली. दारूगोळा मागच्या मागेच राहिला. इकडे इनायतखानाने विंचुरकर आणि गायकवाडांना तडाखा दिला.अहमद बंगष पठाण, इनायत खान, दुंदेखान उरली सुरली पथके घेऊन पुढे चाल करून आला. इकडे उत्तरेची रोखलेली वाट मोकळी करण्यासाठी मागे फिरलेल्या गारद्यांच्या पाठीवर येऊन हि पथके आदळली.
एका घटकेत होत्याचे नव्हते झाले. इब्राहीम चारही बाजूंनी घेरला गेला. त्याचा भाऊ फत्तेखान त्याच्या डोळ्यादेखत मारला गेला. अवघे ३०० गारदी त्याच्याबरोबर उरले होते. विंचुरकर आणि गायकवाड उरली सुरली पथके घेऊन भाऊंच्या दिशेला पळत सुटले.
मधल्या फळीत :
सकाळी साडेनऊच्या आसपास शहावली आणि भाऊसाहेब एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंचा तोफखाना सुरु झाला. अफगाणांनी जम्बुरे, सुतरनाळा, साहीन, सहांग, गरनाळा यांचा सांडणीस्वारांच्या मदतीने योग्य वापर करून भाऊंना शिकस्त दिली. यशवंतराव पवारने गोविंदपंताना यमसदनी धाडणाऱ्या अताई खानास व त्याच्या ३ हजार सैन्यास पाणी पाजले. अफगाण घाबरून पळू लागले, शहावलीला मोठा शह बसला, भाऊंच्या सैन्याने अफगानांच्या मधल्या फळीला मोठे खिंडार पडले होते, भाऊंचा दिल्लीकडे निघायचा रस्ता साफ झाला होता.
पण सूर्याच्या दक्षिनायनाने घात केला होता, सूर्याची किरणे मराठ्यांच्या डोळ्यावर येऊ लागली, सकाळपासून लढून थकलेली माणसे, जनावरे तहानेने गलितगात्र झाली. काही तहानेने, भुकेने कोसळली.
अब्दालीला त्याचा पराभव स्पष्ट दिसू लागला, अब्दालीचा जनानखाना अजून २ कोस मागे सरकून पळण्याच्या तयारीत होता.अब्दालीने याच वेळी त्याचे ४ हजाराचे राखीव दळ धाडले. पडलेले खिंडार परत बुजवले गेले. दुपारी साधारण २ च्या सुमारास विश्वासराव पडले, इकडे भाऊंनी हत्तीवरून घोड्यावर मांड टाकली. अब्दालीने किझलबक्ष नावाच्या गुलामांच्या प्रत्येकी २ हजारांच्या ३ तुकड्या बाहेर काढल्या. भाऊंची मधली फळी तिन्ही बाजूंनी घेरली गेली.
दरम्यान इब्राहीम खान पकडला गेला. गारद्यांनी पराक्रमची शर्थ केली होती. अशीच शर्थ प्रत्येक पथकाने केली असती तर..........
यशवंतराव मुरारबाजीसारखा लढत होता, विंचुरकरांच्या कॅडमॅड पथकाने बाजू बदलली.

उजव्या आघाडीवर :
दुपारी ३ च्या सुमारास नजीब आणि शिंदे-होळकरांची पथके एकमेकांशी भिडली. जनकोजी, तुकोजी शिंद्याची काही पथके सोडली तर, शिंदे-होळकरांच्या बाकी पथकांनी पळ काढला.

मधली फळी आणि भाऊसाहेब एकटे पडले होते, बरखुरदारखान आणि अमीर बेग नदीच्या बाजूने पुढे घुसले होते, शहापसंद खान खाली सरकला होता, नाजीबाचे १२,००० सैन्य डाव्या हाताला , तर समोरून शहावली आणि त्याला येऊन मिळालेले राखीव दल, तर उजव्या हाताने इनायत खान, दुंदेखान यांच्या फौजांनी मधली फळी गुदमरली. विठ्ठलराव विंचुरकर, होळकरांच्या पाठोपाठ पळू लागले होते, जनकोजी पकडला गेला होता, भाऊ पडले.
अब्दालीने निसटता विजय मिळवला होता. इब्राहीमखानसारख्या कोहीनुराचा मृत्यू वाचताना देखील डोळ्यातून आसवे गळतात. हजारो बाजारबुनग्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अनेक आया-बहिनींची अब्रू लुटण्यात आली. अनेक स्त्रियांनी विहिरींमध्ये उड्या मारून जीवन संपवले, तर काहींनी मिळेल त्या हत्यारांनी आत्म-बलिदान दिले.
बाकीच्यांचे काय झाले असेल हा विचार आज देखील करवत नाही, त्या भयाण रात्रीने किती हंबरडे ऐकले असतील, त्या रात्री किती विनवण्या झाल्या असतील घृष्णेश्वराला, महालक्ष्मीला, वाईच्या गणपतीला, पांडुरंगाला, तुळजा भवानीला....................
त्या रात्री काय घडले असेल आणि काय नसेल हे सांगता येत नाही, अशा गोष्टी कुणी लिहून ठेवत नाही, त्या ज्याच्या त्यानेच अनुभवायच्या असतात अर्थात कल्पनाविश्वावर..................................

संदर्भ : पानिपत - विश्वास पाटील
(टीप : एकूण सैन्य आणि प्रत्येकी सैन्य यांच्या अंकांमध्ये तफावत असू शकते.)

आजही पानिपत आणि आसपासच्या भागात साडे आठ लाख मराठा लोक राहतात आणि ते रोड मराठा या नावाने ओळखले जातात. आम्ही ज्या वेळेस पानिपतावर पोहचलो त्यावेळेस “मराठा समाज संघाचे” लोक “काला आम” येथून शहीद झालेल्या ज्ञात-अज्ञात वीरांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहून परतताना दिसले. खरचं फार बरं वाटलं हे बघून. कोणालातरी जाणीव आहे त्या ज्ञात-अज्ञात वीरांची, ज्यांनी या देशासाठी आपले प्राण वेचले. आम्हाला बघून त्यातील कितीतरीजण परत आमच्याबरोबर “काला आम” येथे आले. लहान-थोर, महिला, वयस्कर पुरुष सगळेच होते त्यामध्ये.

पानिपतवर भेटलेला "रोड मराठा " समुदाय :
11DSCN3513.JPG
मी गाडी लावून आत मध्ये जातच असताना दोन साधारण माझ्याचं वयाची मुले माझ्याजवळ आली.
भैय्या, आप मराठा हो ? मराठा हो आप?
हा......पुढंच वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्यातल्या एकाने मला कडकडून मिठी मारली.
जसं की त्याला वर्षानुवर्षानंतर “आपलं” म्हणावं अस कोणीतरी भेटलं असावं.
खरचं, अशा नाजूक प्रसंगी मनाची अवस्था फार बिकट होते. मला काय बोलावं तेच सुचेना.
देखा, बोला था ना मैने मराठा है ये ,,, तो त्याच्या मित्राला म्हणाला. मग त्याच्याशी देखील गळा-भेट झाली.
मग पुढे आप महाराष्ट्र में किधर रहते हो ?
हमे भी आना है वहा, एक बार. अभी तो यही बस गये है, हमे मराठी भी नही आती.
वगैरे बोलण झालं.
पानिपतच्या युद्धात शहीद झालेल्या कुणाचेतरी आपण वंशज आहोत याचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता.
असे काही अनुभव आयुष्यात खूप काही देऊन जातात. कधी कधी आयुष्य खूप निरर्थक आहे असे वाटतं तेव्हा हे जपलेले क्षण आयुष्य जगण्याची एक नवी उर्मी देतात.
काय नातं होत त्यांच्या आणि माझ्यामध्ये, पण ते दोघ आम्ही तिथून निघेपर्यंत माझ्या सोबत होते.
भैय्या, अगली बार भी आना, बहोत अच्छा लगा, आपको मिलके.
देखते है, हो सका तो जरूर आऊंगा म्हणत मी त्यांचा निरोप घेतला.
11DSCN3514.JPG11DSCN3515.JPG
“काला आम” ठिकाणी अजितने स्वतः बनवलेली तोफेचे ५ बार उडवून व नंतर सर्वानी २ मि. स्तब्ध उभे राहून या पानिपतच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली वाहिली. अजितच्या या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे या तोफेचा पल्ला सुमारे २ किमीचा आहे. ( अस तो म्हणतो, त्या तोफेमधून बाहेर पडणाऱ्या चेंडूचा वेग बघता तो १ किमी पेक्षा नक्कीच जास्त असावा.) त्यानंतर गुरूजींच एक छोटसं पानिपतच्या वीरांची महती सांगणार भाषण झालं.
काला आम स्मारक :
11DSCN3518.JPG

त्यांनतर
हिंदवी स्वराज्य संकल्पक, शहाजी महाराजांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
हिंदवी स्वराज्य मार्गदर्शक, राजमाता जिजाऊसाहेबांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
हिंदवी स्वराज्य संवर्धक. छत्रपती संभाजी महाराजांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर विश्वासराव पेशव्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर इब्राहिमखान गारद्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर दत्ताजी शिंद्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर समशेर बहाद्दरांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
पानिपतच्या मातीत शहीद झालेल्या ज्ञात अज्ञात वीरांचा..............विजय असो, विजय असो, विजय असो

11DSCN3530.JPG

अशाच असतील का जम्बुरे, सुतरनाळा, साहीन, सहांग, गरनाळा ?
11DSCN3532.JPG

अशा घोषणा झाल्यावर मोहीम काला आम च्या पवित्र भूमीवरून निघाली. निघायच्या अगोदर काला आम परिसरातील भिंत ओलांडून मागच्या बाजूस गेलो, सभोवताली नजर टाकली, मुठभर माती उचलून कपाळाला लावली, थोडी कपड्यांना लावली. ती माती हातात घेऊन क्षणभर उभं राहिलो. आयुष्यात कधी न अनुभवलेली एक विचित्र अशी मनाची स्थिती झाली. कदाचित हीच अवस्था अनुभवण्यासाठी येथे आलो आहे असे वाटले.
आणि साधारण १५३० ला काला आम परिसर सोडला. तिथूनच साधारण ५०० मी अंतरावर एक सपाट मैदान होते, तेथे सर्वानी गाड्या लावल्या. आणि आम्ही २५० जण एकत्र बसलो.
२५० जण, नुसतेच महाराष्ट्रातील नाही तर गोवा, कर्नाटक राज्यातील सुद्धा यांमध्ये होते. हिंदूच नाही तर मुस्लीम सुद्धा होते. सर्वात लहान १० वर्षाचा तर सर्वात वृद्ध ७२ वर्षाचे. असा सर्व प्रकारचा वयोगट या मोहिमेमध्ये होता. जसे पानिपतच्या युद्धामध्ये जे लढले ते सर्व मराठा होते, तेथे मराठा म्हणजे धर्म अथवा जात नव्हती, त्या युद्धामध्ये देशासाठी लढणारा प्रत्येकजण मराठा होता, मग तो हिंदू असो वा मुस्लीम, ब्राह्मण असो वा शूद्र. तसेच आम्ही सर्वजण मराठा होतो.

सर्वात प्रथम गुरुजी उभे राहिले, हात जोडून त्यांनी सुरवात केली,
हा लहान तोंडी मोठा घास घेताना, हि मोहीम यशस्वी होईल का नाही याची मनात धाकधूक होतीच. पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हि मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेत अनेक बरे- वाईट अनुभव आपल्या वाट्याला आले. इंदोर सारखे शहर जे एकेकाळी मराठ्यांचे महत्वाचे ठाणे होते, त्या शहरातून तुम्हा लोकांची जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही सारखा प्रतिसाद तर बऱ्हाणपूरसारखे शहर जे मोगलांचे महत्वाचे ठाणे होते, ज्या ठिकाणी आपला पाय मातीवर न पडता कायम लोकांनी उधळलेल्या फुलांवरच पडला, भेडीया सारख्या छोट्याशा गावात १ तासाच्या आत त्या लोकांनी जेवायची व्यवस्था केली. असेच अनुभव आपल्याला घडवत असतात. आयुष्यात कितीतरी वेळा आपलेच परके होता तर कितीतरी वेळा परकेच आपलेसे करतात. कितीतरी जणांच्या गाड्या पडल्या, तुटल्या. कितीतरी लोकांना खरचटले, मुका मार लागला, काहींचे हात गळ्यात आले आणि हे सर्व होऊनसुद्धा तुम्ही सर्वजण येथपर्यंत आलात याचा मला सार्थ अभिमान आहे. खरचं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हत की अशा लोकांना घेऊन एवढे लांबचे अंतर दुचाकीवरून पार करू शकू, पण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले. तुम्हा सर्वांचा मी खूप खूप ऋणी आणि आभा..........आणि गुरुजींच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली.

खरचं या क्षणाला आम्ही सर्वजण भावनाविवश झालो होतो.
नंतर नफिसा उभी राहिली, तिने देखील तिच्या भावना मांडल्या. जवळपास सर्वांनाच भावना मांडताना अश्रू अनावर होत होते. आज कितीतरी जण मोहीम सोडून परत पुण्याला जायला निघणार होते, तर काहीजण मोहिमेबरोबर पुढे प्रस्थान करणार होते. नाफिसाचे, “खरतर मोहीम संपूच नये” अस वाटतयं हे शेवटचं वाक्य जवळपास सगळ्यांच्या मनातील होत.
आणि आजच मोहिमेतील एका सदस्याला त्याच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याची बातमी कळाली. त्यांना देखील तातडीने परतावं लागणार होतं.
अशी हि सुखदुःखानीभरलेल्या मोहिमेचा पूर्वार्ध या ठिकाणी संपत होता.
काही जण राजस्थान मार्गे पुण्यात परत जाणार होते. आम्ही मात्र मोहिमेबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. पाहिलं कारण म्हणजे दोन जड सॅक घेऊन पुढंच अंतर कापणं बऱ्यापैकी अवघड काम होतं आणि दुसर म्हणजे आमची मोहिमेबरोबर एक प्रकारची नाळ जोडली गेली होती आणि ती इतक्या लवकर तुटावी असे आम्हाला वाटत नव्हते.

पानिपत हे माझ्यासाठी असे नाव आहे कि जे नुसते कानावर पडले तरी अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ते नाव एकदा कानावर पडले कि पुढचे काही क्षण सुजा, नजीब, अब्दाली, भाऊ, जनकोजी, इब्राहीम खान, गोविंदपंत दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, नानासाहेब, पार्वतीबाई , समशेर अशी सगळी मंडळी मनामध्ये गर्दी करतात. त्या क्षणाला नक्की काय झालं असेल, काय बोलणं झालं असेल त्यांच्यात, असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.. एका एका मोहरयाचा विचार केला तरी मनं अस्वस्थ होतं. इब्राहीम खान तू निदान माझ्यासाठी तरी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा नायक होतास, आहेस आणि राहशील. तुला उपमा द्यायची झालीच तर नेताजी पालकरची द्यावीशी वाटते.( कधी कधी ती देखील कमी पडेल की काय असं वाटतं ) समशेरा तू जे सहन केलसं ते नुसतं ऐकूनचं शहारे येतात. कृष्णाचं सामर्थ्य झाकावं तर ते मराठ्यांनीच. बापासारखा तुही महापराक्रमी असशीलच रे, कदाचित त्याहूनही जास्त, पण आयुष्यात नशीब नावाची देखील एक गोष्ट असते ती कमी पडली.
अब्दाली खिलाडूवृत्तीने मी मान्य करतो की तू एक कुशल योद्धा नक्कीच होतास. तुझं त्यावेळचं यमुना ओलांडण आठवलं आणि आजची जरी यमुना बघितली तरी तू काय धाडस केलं असशील याची कल्पना येते. तुझं ते राखीव तुकडी मागं ठेवणं, शहावलीला मुख्य जागी उभं करून, तुझ मागे राहून संपूर्ण युद्ध क्षेत्रातील हालचालीची बारकाईने पाहणी करणं आणि पहाटेच्या प्रहरी जेवणं बनत असताना तू काढलेले उद्गार "मरणाच्या दारात असतानाही जे लोक एकमेकांच्या हातची भाकरी खात नाहीत आणि एकत्र स्वयंपाक करु शकत नाहीत ते एकीने काय लढणार?” ( आता यात देखील बरेचं वादाचे मुद्दे आहेत, जसे एकत्र स्वयंपाक करावयचा झाल्यास लागणारा वेळ हा वैयक्तिक जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या कितीतरी पट अधिक असतो ) फक्त झालं एवढंच या बुद्धिबळात तू अगदी प्यादांचाही योग्य वापर करून घेतलास. आमचे मात्र हत्ती, घोडे, उंट आणि वजीर आपापल्याच तंद्रीत पळत राहिले आणि शेवट व्हायचा तोच झाला. “शह”

खरचं पानिपतच्या प्रत्येक मोहरयाच वर्णन करायला शद्ब कमी पडतील. भाऊ, कितीही लोकांनी तुम्हाला दोषी ठरवलं, तरी ते पाप मी कधीच करणार नाही. कारण वातानुकुलीत यंत्राच तापमान २५ वर ठेऊन पराभवाची कारणे लिहीन फार सोप काम आहे. त्या भूमीवर जाऊन लाखांच्या वर बाजार-बुणग्यांच रक्षण करत करत, पोटात अन्नाचा कण नसताना तलवार फिरवायला वाघाचं काळीज असावं लागतं. आपणं जो इथ बसून विचार करतो की अरे भाऊ ने असे केले पाहिजे होते, तसे केले पाहिजे होते, या गोष्टी काय त्यांना कळल्या नसतील. युद्धाचे प्रमुख या नात्याने किती वेळा त्यांनी व्यूहरचना आखली असेल? किती वेळा अनुभवी माणसांबरोबर मसलत केल्या असतील ? किती काळोख्या रात्री जागवल्या असतील ? ह्या सगळ्याची नोंद तुम्हा आम्हाला कोठेच सापडणार नाही. हे सगळ अनुभवण्यासाठी त्या त्या व्यक्तीरेखेमध्ये शिरून विचार करण गरजेचे आहे. त्या वेळेस नेमके तिथे काय होत असेल याचे आपण फक्त तर्क करत राहतो. आपण नुसता इतिहास वाचतो आणि ते तो घडवतात हा मूळ फरक लोकांनी लक्षात घ्यावयास हवा. पानिपतमध्ये आपल्या लोकांनी काय भोगले याची एक झलक अनुभवण्यासाठी फक्त २ दिवस उपाशी राहून बघा. एखाद्याला अविवेकी, अविचारी म्हणनं फार सोप असतं, कधी कधी वाटतं, राजे बर झालं तुम्ही त्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, जर त्या दिवशी चुकूनही काही बरं-वाईट घडलं असतं, तर या लोकांनी तुम्हाला देखील अविवेकी, अविचारी म्हणण्यास कमी केलं नसतं आणि मग राजांचे निर्णय कसे चुकले, जुनी –जाणकार माणसे कसे त्यांना अफझलखानाची भेट घेऊ नये म्हणून सांगत होती यांसारखी शेकडो कारणे द्यायला सुद्धा हे कमी पडले नसते. हे तर फक्त अफझलखान भेटीचं झालं, हेच पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणे अथवा आग्र्याहून सुटका या प्रसंगाना लागू होते. म्हणजे विजय झाला तर उदो उदो आणि पराभव झाला तर नाचक्की हे कुठल्या तत्वात बसतं. ( यामध्ये भाऊ आणि राजांची तुलना करायचा कुठलाही हेतू नाही ) हीच गोष्ट भाऊंना देखील लागू होते, जर त्यादिवशी विजय प्राप्त झाला असता तर एक असामान्य योद्धा वगैरे वगैरे लिहून भाऊंच्या वर सुद्धा अगणित रकाने लिहिले गेले असते. ( याचा अर्थ पराभवाची कारणे शोधूच नये असे नाही पण त्यावेळी तसे निर्णय का घेतले गेले? त्यांच्याही काही मजबुरी असतील इ.चा जास्त विचार व्हावयास हवा आणि त्या कारणांचे “शवविच्छेदन” नको आणि भाऊंचे तर नकोच नको )

पानिपत युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे “दक्षिण्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले.मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रूस्तम आणि इस्फिंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्य”

पानिपतवर असतानाच आम्ही २५० लोकांनी मराठी भाषेतील “पानिपत झाले” हा वाक्प्रचार आयुष्यात पुन्हा कधीही न वापरण्याची शपथ घेतली. जिथे माझे वाड-वडील पोटात अन्नाचा कण नसताना केवळ हिंदुस्तानच्या मातीसाठी प्राणपणाने लढले, त्यांच्या या देदीप्यमान पराक्रमाचा अभिमान बाळगण्याचा सोडून आम्ही “पानिपत झाले” हा वाक्प्रचार कसा काय वापरू शकतो. काय म्हणतं असतील त्यांचे आत्मे? क्लेश नसेल का होतं त्यांना ? बाकी महाराष्ट्राचं मला माहित नाही, पण पानिपतावर उपस्थित असलेल्या त्या २५० जणांपैकी एकाचीही जीभ आता “पानिपत झाले” हे २ शब्द उच्चारण्यास कधी धजणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे.

पानिपत मधील बघण्यासारखी अजून काही ठिकाणे :
पानिपत संग्रहालय : पानिपतच्या युद्धांमध्ये ज्या प्रमुख घटना घडल्या, त्या घटनांवर या संग्रहालयामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
काला आम
देवी मंदिर
हेमुचे समाधी स्थळ
इब्राहीम लोधीची कबर
कबुली बाग
सालार गुंज दरवाजा
वेळेच्या अभावी आम्ही फक्त काला आम आणि देवी मंदिर या दोनच स्थळांना भेटी दिल्या.
हेमुचे समाधी स्थळ आहे , इब्राहीम लोधीची कबर आहे आणि आमच्या भाऊंच, त्यांच मात्र काहीच नाही. ह्याच फार वाईट वाटत.

पानिपतवर जाण्याची हि माझी पहिलीच वेळ होती, पण आता इथून पुढे जात राहीन, कधी मित्रांना घेऊन, कधी आई-बाबांना घेऊन, ती पवित्र भूमी दाखवण्यासाठी जिथे माझ्या बापजाद्यानी शेवटचा श्वास घेतला, शेवटची घटका मोजली. ते माझे पूर्वज असतीलही किंवा नसतीलही, पण एक महाराष्ट्रीय या नात्याने मी शक्य तितक्या पद्धतीने मराठ्यांचा हा देदीप्यमान पराक्रम लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन.

( माझं इतिहासच ज्ञान अगदी तोकडं आहे आणि पानिपतला जायच्या अगोदर मला हे युद्ध अब्दाली आणि सदाशिवरावभाऊ पेशवे यांमध्ये झाले होते, याच्या व्यतिरिक्त बाकी काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे लेखनामध्ये काही चुका राहून गेल्या असल्यास त्या जाणकारांनी निदर्शनास आणून द्याव्यात ही नम्र विनंती )

जे आम्हाला सोडून निघाले होते त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिभाताईंचा कार्यक्रम सुरु झाला होता. मोहिमेतील काहीजण तिकडे देखील गेले होते. आम्ही मात्र मोहीम सोडून जाणाऱ्या लोकांना शेवटचा निरोप देण्यासाठी थांबलो होतो.
सर्व काही आटोपून निघण्यास संध्याकाळचे ५ वाजले, पानिपतपासून कुरुक्षेत्र सुमारे ७० किमी वर आहे. राष्ट्रीय महामार्ग १ सोडायचा नाही. वाटेत कर्नाल लागते. पानिपतच्या बाहेरच्या टोल नाक्यावर सर्वानी थांबायचं ठरलं होतं. सर्वजण आले की मग एकत्रच निघणार होतो. आम्हाला सर्वाना थांबलेलं बघून एक ट्रक्टर शेजारी येऊन थांबला.
भैय्या, मराठा हो क्या ? त्याने आमच्यातील कुणालातरी विचारले.
तेवढ्यात आमच्यातील एकाची नजर त्याच्या ट्रक्टर च्या पुढे “मराठा” लिहिलेल्या शब्दांवर गेली.
हम भी मराठा है ! त्याचे उत्तर
मग परत एकदा त्याच्याशी गप्पा झाल्या. त्याच्या बोलण्यातून असे कळले की काही वर्षापर्यंत या लोकांना आपण कोण, कुठले, कुठून आलो काहीच माहित नव्हते. त्यामुळे हे लोक लपून लपून राहायचे. सहसा ते मराठा आहेत हे कोणाला सांगायचे नाहीत. पण त्यांना त्यांचा इतिहास कळल्यानंतर आता ते गर्वानी आम्ही मराठा आहोत म्हणून सांगतात. नंतर देखील आम्हाला काही वाहने दिसली ज्यांच्यावर “मराठा” असे लिहिले होते. हे लोक त्या भागात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. आता हे लोक तेथे मोठ-मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. त्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकून बर वाटलं. त्या लोकांची आडनावे मात्र वेगळी आहेत, कदाचित अपभ्रंश झाला असावा.
मग त्याच्या ट्रक्टर समोर बसून सगळ्यांचे फोटोसेशन झालं.
11DSCN3537.JPG
एव्हाना जवळपास सगळेजण आले होते. थंडी पण पडायला लागली होती. आत निघायच्या अगोदर एक चहा मारू आणि निघू म्हणत आम्ही जवळच असलेल्या एका ढाब्यामध्ये घुसलो. चहा- बिस्कीट खून ताजेतवाने झाल्यावर साधारण रात्री ७ च्या सुमारस पानिपत सोडले. आता पुढंच लक्ष्य होतं कुरुक्षेत्र.
आता मी आणि अमर एका गाडीवर होतो तर स्वागत आणि रुपेश एका गाडीवर होते. ही गाड्यांची अशी अदलाबदली कायमच चालू असायची. थंडी पण बऱ्यापैकी असल्यामुळे आम्ही पण गाड्या निवांत चालवत होतो. रात्री ९ च्या सुमारास आम्ही कुरुक्षेत्र गाठलं. कुरुक्षेत्रमध्ये प्रवेश करतानाच, प्रवेशद्वारावर श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतानाचे भले मोठे शिल्प आहे. आजचा मुक्काम एका जाट धर्मशाळेत होता. धर्मशाळेत पोहचता पोहचता ०९३० वाजले. तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे गाद्या आणि पांघरून घेऊन येणे इ. कामांना सुरवात झाली. आज प्रचंड थकल्यामुळे कधी एकदा झोपतो असे झाले होते, जेवायची पण काही इच्छा नव्हती. स्वागत आणि रुपेशचा अजून काही पत्ता नव्हता, तेवढ्यात ते देखील आले. मी आल्याआल्या नेहमीप्रमाणे camera, mobile charging ला लावलेच होते. तेवढ्यात स्वागत आला, साऱ्या सॅक कुठे आहे?
सॅक, ती तर तुझ्याकडेच होती.
अरे चहा पिल्यानंतर मी अमरला दिली होती.
मग त्यालाच विचार की
अमरयाला सॅक त्याच्याकडे दिली होती याचा पत्ताच नव्हता.
नाही बे, तू माझ्याकडे कधी दिली? ..........अमर
अरे, चहा पिल्यानंतर तुमच्या टेबलवर ठेवली होती आणि तुला म्हणालो पण होतो अमरया, सॅक आठवणीने घेऊन ये म्हणून. इति स्वागत
झालं, म्हणजे हे महारथीं सॅक धाब्यावरचं ठेऊन आले होते. मी पटकन माझं जाकीट चेक केलं. Mobiles, Camera त्यांचे chargers, पाकीट एवढचं काय माझा ब्रश, vaseline इत्यादी किरकोळ गोष्टी पण माझ्या माझ्याकडे होत्या, स्वाग्या, माझ्या महत्वाच्या गोष्टी तर माझ्याकडे आहेत, सॅक मध्ये नॅपकीन, रुमाल आणि एकदा दुसरा शर्ट असेल जाऊ दे आता गेला तर, तुझ्या गोष्टी बघं.
मोबाईल आहे रे माझा माझ्याकडे पण I-pad सॅक मध्येचं आहे.
आई ग,,, चला, आता परत पानिपतवर राजे.
खरं तर मला जायची मुळीचं इच्छा नव्हती. पण मैत्रीच्या नात्याला स्फुरण आलं आणि रात्री १० वाजता आम्ही दोघे परत एकदा पानिपतच्या दिशेने निघालो.
हे कमी होत की काय म्हणून आता पावसाला देखील सुरवात झाली होती.
स्वाग्या, असू दे निवांत जाऊ, तू नको गाडी चालवू आता, तुझ मनं त्या I-pad मध्येचं असणारं, एकतर त्या उसा तून I-pad घेऊन ये, काहीही झालं तरी आणचं, म्हणून किती जीव काढला होतास ते माझं मला माहितेय. त्यामुळे आता निवांत मागे बस. जे होईल ते बघू. म्हणून मी गाडीला किक मारली आणि आम्ही परत आमच्या पानिपतच्या दिशेने निघालो.

पावसाने देखील आता बऱ्यापैकी जोर धरला होता, मी गाडी शक्य तितक्या सावकाश चालवत होतो. एके ठिकाणी रस्ता ओलांडताना बराचं चिखल झाला होता, मी गाडी शक्य तितकी हळू केली, पण चिखलामुळे गाडी घसरलीच. वेग १० पेक्षा ही कमी होता त्यामुळे गाडी अलगद एका बाजूला झुकली आम्ही आमच्या पायांवर गाडी कशी बशी सावरली. आता मात्र गाडी चांगल्या रस्त्याला लागली असल्याने काळजीचे काही कारण नव्हते, गाडीचा वेग आता वाढवला. रात्री ११४५ च्या सुमारास पानिपत गाठले आणि एकदाचा तो धाबा सापडला आणि विशेष म्हणजे धाबा उघडाच होता. आम्ही गेल्या-गेल्याच धाब्याच्या मालकाने, आप अपना बॅग क्यू छोडके गये यहां ? म्हणून प्रश्न केला.
भैय्या, भूल गये थे.
छोटे, उनका बॅग दे. त्याने बॅग नीट आतमध्ये ठेवली होती.
पावसाचा जोर अजूनच वाढला होता. आता पोटात कावळे देखील ओरडायला लागले होते. आता इथेच काहीतरी खाऊ आणि निघू असा विचार करून आम्ही जेवायला बसलो. शक्य होईल तितक्या लवकर जेवण आटपले, परत एकदा त्या ढाबा मालकाचे आभार मानले, त्याला बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ केली, पण ती त्याने नाकारली आणि परत कुरुक्षेत्राच्या दिशेने निघालो.

चालव, बाबा आता गाडी , मला जाम झोप आली आहे. मी मागे बसतो, मी स्वागतला म्हणालो.
आता हा गाडी व्यवस्थित चालवणार याची मला खात्री होती.
साधारण तासाभरानंतर एका टोल नाकयाजवळ चहा प्यायला आम्ही गाडी थांबवली. शेजारीच रस्त्यावर काम करणाऱ्या एका मजुराचे घर होते, तो त्याच्या घराच्या पडवीत शेकत बसला होता. आम्ही देखील मग जरा चहा पिऊन आणि शेकून स्वतःला गरम केलं. आता मला देखील तरतरी आली होती.
चल स्वाग्या, घेतो मी गाडी म्हणत मी गाडी घेतली. कुरुक्षेत्र गाठायला साधारण १ तास लागेल असा माझा अंदाज होता. इथून पुढे मी किती वेळ गाडी चालवत होतो हे मला देखील माहित नाही. माझी नजर फक्त डाव्या बाजूला कुरुक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या श्रीकृष्ण-अर्जुनाला शोधत होती. पण श्रीकृष्ण-अर्जुन दिसायचे काही नाव घेईनात. आता डोळ्यावर झोप देखील प्रचंड येऊ लागली होती. स्वागत पण शांत होता, त्याला देखील झोप आवरत नसावी. वाटेत एक मोठा पूल लागला, आणि अचानक मनात अब्दालीने ही नदी कशी ओलांडली असेल असा विचार आला, आणि अचानक .........
अब्दालीच सोड, तू हा पूल कधी ओलांडला होतास रे, कुरुक्षेत्र गाठताना.
खरचं की.......
आता गाड्यांची वर्दळ पण कमी होती. वाटेत एक ट्रक थांबलेला दिसला, मग त्या ट्रक वाल्याला कुरुक्षेत्र अजून किती लांब आहे विचारलं.
कुरुक्षेत्र,,,,,, वो तो पीछे रह गया, आप लोग २५ किमी आगे आ गये है !
कल्याण........... दुसरं काय ?
परत गाडी मग वळवली, आत स्वागतपण पेटला होता, तू काय झोपेत गाडी चालवतोस का ? तू एवढ मोठ प्रवेशद्वार चुकवलंसच कसं ? आणि ब्ला ब्ला ब्ला
आता मला देखील आवरलं नाही आणि मग मी पण
एकतर सॅक विसरायची स्वतः, इथं माझ्या झोपेचा खेळ-खंडोबा झालाय, तुझ्यासाठी इतक्या लांब आलो आणि मी पुढं बसून झोपा काढतो तर तू मग बसून काय गाडी चालवत होतास का? आणि ठीक आहे मला नाही दिसलं प्रवेशद्वार तुला तरी दिसलं का ? आणि ब्ला ब्ला ब्ला
या सगळ्या बाचाबाचीत दोघांच्याही झोपा चांगल्याच उघडल्या होत्या आणि शेवटी दोघानाही एकदम इतक्या वेळ ज्याचा शोध होता ते श्रीकृष्ण-अर्जुन दिसले.
बाहेर गाड्या चालवण्याचा एक फायदा असतो, माणूस आपोआपच रस्ते लक्षात ठेवायला शिकतो. त्यामुळे ती जाट धर्मशाळा आतमध्ये असून देखील एकदाही न चुकता आम्ही बरोबर तिथे पोहचलो.
पहाटेचे ०३३० वाजले होते. सर्वांनाच मेल्यासारख्या झोपा लागल्या होत्या आणि शेवटी आम्ही देखील अंथरुणात घुसलो.
आजचा प्रवास : ४२९.८ किमी
उद्याचा प्रवास :
कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर

१५ जानेवारी २०१२

आजचा प्रवास : कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर

आज सकाळी ५ वाजताच “ ऊठा, रे, किती वेळा उठवायचं तुम्हाला ? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला ?” अशा शब्दांनी जाग आली.
दररोज आम्हाला गुरुजींचा आवाज ऐकायची सवय, आज हे एवढ्या उर्मट भाषेत कोण उठवतंय बघण्यासाठी पांघरुनाचा एक कोपरा किंचित बाजूला करून किलकिल्या डोळ्यांनी बघितलं, तर पुण्याहून काल पानिपतला आलेले एक काका उठवत होते.
मला देखील त्यांनी उठवलं,
मी शांतपणे, पहाटे ०३३० वाजता आलोय काका, आमची सॅक पानिपतमध्येच विसरली होती. काहीच झोप झालेली नाही, कसेबसे मोजून तास-दीड तास झोपलो असेन मोहिमेला निघू द्या पुढे, आम्ही येतो मागून असे सांगितले.
ते काही नाही, सगळेजण तुझ्यासारखीच कारणे द्यायला लागतील, असे म्हणतं त्यांनी चक्क माझ्या अंगावरचे पांघरून ओढले.
माझ्या रागाचा पारा एकदम वर आणि तेवढ्यात “सारंग, आयुष्यात सर्वच ठिकाणी काही चांगले लोक मिळत नाहीत, तेव्हा लोकांशी जमवून घ्यायला शिक” हे बाबांचे शब्द एकदम आठवले आणि मी शांतपणे उठून अंथरूणाची घडी घातली. तरी पण घडी घालता घालता, आज संध्याकाळच्या सभेत बघून घेऊ, मी स्वागत आणि अमरला म्हणालो. एकंदरीत त्यांच्या या उर्मट बोलण्यावर सगळेजणच नाराज असल्याच कळलं.
बर झालं, सुरवातीपासून नव्हते बरोबर नाहीतर एकदा तरी झालीच असती……….. खडाजंगी.
आज देखील अंघोळीला कडक गरम पाणी होतं, हे म्हणजे अतीच झालं चक्क सलग तिसऱ्या दिवशी अंघोळ, लय भारी,
नेहमीप्रमाणे चक्रासन आटोपलं, अंघोळ केली आणि परत सामानाची आवराआवर करायला सुरवात केली.
अरे मोहीम निघाली पण ,,,,,कोणीतरी ओरडलं.
मग आम्ही देखील पटापट आटोपलं आणि निघालो.
बाहेर आलो तोच आझाद आणि नीलम भेटले. त्यांची आज सकाळची ट्रेन होती. मग त्यांना निरोप दिला, पुण्याला भेटूच रे म्हणत आम्ही गाडी बाहेर काढली.
स्वाग्या, सॅक आता तुझ्याकडेच ठेव, परत कुठं विसरलास तर बघ. मी सुरवातीलाच स्वागतला सांगितलं.
हो रे, तू पहिल्यांदा मोहीम कुठे गायब झालीये ते बघ.,,,,,,स्वागत

आज मोहीम फारच वेगात निघाली होती. आज अमृतसरचं सुवर्ण मंदिर गाठायचं होत ते देखील वाघा सीमा बघून. कुरुक्षेत्र ते वाघा सीमा अंतर ३३० किमी आहे. म्हणजे ४० किमी/तास या वेगात गेलो तरी ९ तास लागणार होते. वाघ सीमेवरील परेड संध्याकाळी ४ वाजता सुरु होते अस कळलं होत, त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर कुरुक्षेत्र सोडावे लागणार होते. त्यामुळे कुरुक्षेत्रावरील महत्वाची ठिकाणे बघून लगेच वाघा सीमेकडे निघू, मोहिमेबरोबर उशीर होईल यावर आमचे एकमत झाले.

कुरुक्षेत्राविषयी थोडेसे :
या शहराला एक अनन्यसाधारण असे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व आहे. पूर्वी हा प्रदेश पंजाब मध्ये होता. आत्ता तो हरयाणा राज्यामध्ये येतो. महाभारताची ऐतिहासिक लढाई ( ई.स.पू. ३१०२) याच ठिकाणी झाल्याचे मानले जाते. ऋग्वेद आणि यजुर्वेद या वेदांमध्ये या ठिकाणाचा अनेक वेळा उल्लेख आढळतो. जेव्हा कुरु राजा या ठिकाणी आला तेव्हा हे शहर उत्तर्वेदी या नावाने ओळखले जात असे. या शहरावर अनेक राजांनी राज्य केले. सरस्वती आणि द्रिशद्वती या दोन नद्यांच्या मध्ये असलेली ४८ एकर भूमी राजा कुरुने सोन्याच्या नांगराने नांगरली.कुरु राजावर प्रसन्न होऊन विष्णूने त्याला २ वर दिले. पहिला हा की हि भूमी कायम स्वरूपी पवित्र भूमी म्हणून तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि दुसरा असा की या ठिकाणी मरण पावणारा स्वर्गात जाईल. भरत वंश या ठिकाणी आला आणि स्थिरावला. कुरु हा भरत वंशातील. ई.स.पू. १९०० पासून या ठिकाणी वाहणारी सरस्वती नदी आटल्याचे सांगतात.
पूर्वीची नावे : उत्तर्वेदी, ब्रह्मवेदी आणि
धर्मक्षेत्र – कुरुने या ठिकाणी धर्माचे बीज रोवले म्हणून धर्मक्षेत्र
सम्राट अशोकाने, त्याच्या कारकीर्दीत हे विद्येचे केंद्र म्हणून जगभरातील लोकांसाठी खुले केले. पुढे मोघलांच्या हल्ल्यानंतर या भूमीचे महात्म्य नष्टप्राय झाले.

महत्वाची स्थळे :
ज्योतिसर : ज्या ठिकाणी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली ते ठिकाणं.
ब्रह्मसरोवर : दरवर्षी सोमवती अमावस्येला आणि सूर्य ग्रहणाच्या वेळी लाखो भाविक या सरोवरात पापमुक्त होण्यासाठी आणि जन्म-मृत्यूच्या फेरयामधून सुटका होण्यासाठी स्नान करतात. या सरोवराचा महाभारतात तसेच वामन पुराणामध्ये उल्लेख आढळतो. हे प्रचंड मोठे सरोवर आहे आणि याच ठिकाणी कृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतानाचे रथातील प्रचंड मोठे शिल्प आहे. हे शिल्प पुण्यातील शिल्पकार श्री. सुतार यांनी २००७ मध्ये बनवले आहे.
सन्निहत सरोवर : या सरोवरात स्नान कारणे पवित्र मानले जाते. “अश्वमेध यज्ञ” केल्याने जी पुण्यप्राप्ती होते, तीच पुण्यप्राप्ती अमावस्येला किंवा ग्रहणात येथे स्नान केल्यास होते असा समज आहे.
भद्रकाली मंदिर : हे भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी १. आणि हरियाणा राज्यातील एकमेव शक्तीपीठ.
याचा इतिहास असा की शंकराने दक्षाच्या मुलीबरोबर म्हणजेच सतीबरोबर, दक्षाच्या इच्छेविरुद्ध विवाह केला. त्यामुळे नाराज झालेल्या दक्षाने घरच्या यज्ञकार्यात सती आणि शिवाला बोलावले नाही, तरी देखील घराचे कार्य म्हणून सती घरी गेली. दक्षाने सर्व पाहुण्यांसमोर शिवाची निर्भत्सना केली, त्यामुळे अपमानित झालेल्या सतीने यज्ञात प्राण त्यागले. हा आघात सहन न झाल्याने दक्षाचा वध केला आणि यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचे शव हाती घेऊन त्याने तांडव सुरु केला. या तांडवामुळे घाबरलेले देवं विष्णूला शरण गेले. विष्णूने सुदर्शनचक्र वापरून सतीच्या शवाचे ५२ तुकडे केले. हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणांना शक्तीपीठ म्हणतात. येथे सतीचा “घोटा” पडला असे म्हणतात.
महाभारतातील युद्धाला सुरवात होण्यापूर्वी पांडवांनी या देवीची पूजा केली होती. हि देवी “जागृत” असल्याचे मानले जाते. ( सर्वच शक्तीपीठे जागृत आहेत )
याच्याच जवळ स्थानेश्वर मंदिर आहे.
स्थानेश्वर मंदिर : असे म्हणतात की महाभारताच्या युद्धाअगोदर कृष्ण आणि अर्जुनाने या ठिकाणी शंकराची उपासना करून आशीर्वाद मिळवला होता. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुद्वारा आणि मंदिर यांच्यामध्ये एक सामाईक भिंत आहे.
या मंदिरामुळे या भागाला थानेसर असे नाव पडले. ही सम्राट हर्षवर्धनाची राजधानी होती.
शेख चेहलीचा मकबरा : हा भाग भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. हा मुघल काळात सुफी संत शेख चेहलीची आठवण म्हणून बांधला. शेख चेहली हा मुघल राजपुत्र दारो शिखाचा अध्यात्मिक गुरु होता. अर्थात हा समज खोटा आहे असे म्हणतात. मुघल राजपुत्र दारो शिखाचा खरा अध्यात्मिक गुरु लाहोरचा हजरत शेख मियाँ मीर साहीब होता असे म्हणतात.
( हा शेख चेहली आणि आपला शेख चिल्ली एकच का ? आणि एकच असेल तर, हा तर संत होता, आमचा शेख चिल्ली म्हणजे झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडणारा :))
कुरुक्षेत्र परिसरात चार प्राचीन इतिहास सांगणारी संग्रहालये आहेत.
ट्रेकर्ससाठी : कुरुक्षेत्रापासून काही किमी अंतरावर अमीन नावाचे गाव आहे जिथे अभिमन्यूच्या किल्ल्याचे अवशेष आज देखील बघावयास मिळतात.

ब्रह्मसरोवर :
12DSCN3551.JPG12DSCN3558.JPGज्योतिसर :
12DSCN3553.JPG12DSCN3563.JPG

वाटेत एका ठिकाणी असणारी कृष्णाची मूर्ती :
12DSCN3579.JPG

ज्योतिसर येथे फडकणारा तिरंगा :
12DSCN3588.JPG

हेच ते शिल्प, पुण्यातील शिल्पकार श्री. सुतार यांनी २००७ मध्ये बनवले आहे.
12DSCN3599.JPG12DSCN3605.JPG12Kurukshetra.JPG

माग मी म्हणाल्याप्रमाणे सगळा भारत पालथा घालायचा म्हटलं तरी १ जन्म कमी पडेल. आम्हाला काहीही करून संध्याकाळी ४ च्या आत वाघा सीमा गाठायची होती. त्यामुळे आम्ही ज्योतिसर आणि ब्रह्मसरोवर बघून कुरुक्षेत्राचा निरोप घेतला.

हेच ते प्रवेशद्वार ज्याच्या दर्शनासाठी आमचे डोळे त्या रात्रभर आसुसलेले होते :
12DSCN3610.JPG

इतक्या सकाळी उठून पटापट आवरून निघालो तरी कुरुक्षेत्र सोडता सोडता ०८४५ वाजले होते. साधरण ३३० किमी चा पल्ला गाठायचा होता त्यामुळे गाडी मुख्य रस्त्याला लागताच सुसाट सोडली. आत मोहिमेला थेट मुक्कामाच्या ठिकाणी भेटू असं ठरलं. मोहिमेचा वेग बघता मोहीम काही ४ च्या आत वाघा सीमेवर पोहचणार नाही याची आम्हाला खात्री होती.

गाडी मध्ये पेट्रोल टाकावे लागणार होते, त्यामुळे जसा पेट्रोल पंप दिसला तशी मी गाडी पंपावर घातली. तिथेच बाजूला PUC काढून मिळत होते, मग अनायसे आलोच आहे तर घ्या काढून, या हिशेबाने ते देखील काढले. पाऊस उघडलेला होता. पेट्रोल, PUC झाल्यावर तिथल्याच एका टपरीवर चहापान कार्यक्रम उरकला आणि आता कुठे थांबू नका रे, असं स्नेहल-रुपेश ला सांगत आम्ही वाघा सीमेच्या दिशेने निघालो.

कुरुक्षेत्रापासून लुधियाना १६० किमी वर आहे. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत सहज लुधियाना गाठू असं माझा अंदाज होता.

कुरुक्षेत्रापासून ३०-४० किमी पुढे आलो तोच पावसाची रिपरिप सुरु झाली. कॅमरा, मोबाईल, पाकीट इत्यादी महत्वाच्या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित गुंडाळून सॅक मध्ये ठेवल्या गेल्या. अगोदरच ठरल्याप्रमाणे नोकियाचा ११०० बाहेर आला. फोन असावा तर असा. Happy

पावसाने रिमझिम रूप सोडून मुसळधार रूप धारण करायला सुरवात केली होती. हेल्मेटच्या काचेतून बाहेरचं दिसेनासं व्हायला लागल्यावर मात्र गाडी एका छोट्या हॉटेल जवळ थांबवली. पाऊस कमी झाल्याशिवाय निघण्यात अर्थ नव्हता. योगायोगाने संग्राम-रोहन पण तिथेच थांबलेले दिसले. मोहीम अजून बरीच मागं होती. तोच जयदादाची गाडी दिसली, बहुतेक त्याला आम्ही थांबलेलो दिसलो असू. मग त्याने पण गाडी बाजूला घेतली. काही वेळाने पाऊस कमी झाला आणि आमच्या तीनही गाड्या परत वाघा सीमेच्या दिशेने दौडू लागल्या. आता मात्र ३०-४० किमी/तास या वेगाने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रस्त्याचं काम पण चालू होतं. परत काही वेळाने पाऊस सुरु झाला, संग्राम-रोहन दिसेनासे झाले होते, पण जयदादाची आणि आमची गाडी एकमेकांबरोबरच होत्या. घड्याळात बघितलं, १२३० वाजत आले होते, लुधियाना अजून ८० किमी वर होतं. सकाळपासून काही खाल्लं देखील नव्हतं, त्यामुळे आता जेवण करूनच पुढे निघू म्हणतं दोन्ही गाड्या एका हॉटेल शेजारी उभ्या केल्या. पावसाचा जोर देखील बराचं वाढला होता. संग्राम-रोहनला फोन केला तर साहेब लुधियानापासून ५०-६० किमीवर होते. तुम्ही निघा पुढे, आम्ही जेवण करून घेतोय, तुम्हीदेखील ढकला पोटात काहीतरी, लुधियानामध्ये भेटू म्हणत फोन ठेवला.

मस्तपैकी थंड वातावरण असल्यामुळे, चिकनवर ताव मारायला मजा आली. जेवण वैगरे होऊन निघायला २ वाजले. आता जेवल्यानंतर मी गाडी चालवायला घेतली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ चं काम चालू होतं.
गाडी ४० किमी/तास च्या वेगात आरामात चालली होती.

……………………………………………………..आणि स्वागतने, एकदम मागून पाठीवर थोपटलं.
डोळे उघडले तर गाडी रस्ता सोडून डाव्या बाजूला दुभाजकाच्या मध्ये आली होती. गाडी इकड का घालतोयस ?
अरे, खालच्या रस्त्यावर घेतोय, तिकडं रहदारी नाहीये.........मी एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेत उत्तर दिलं.
प्रत्यक्षात हेल्मेट, जर्किन आणि इतर साधनांमुळे, अंग गरम झालं होतं आणि बाहेर गारठवणारी थंडी, रात्रीची कशीबशी दीड तासाची झोप आणि वरून तंदुरी चिकनचा फडशा. अशा परिस्थितीत डोळ्यावर झापडं न येईल तरचं विशेष.

मनातल्या मनात देवाशे शतशः आभार मानले. हेल्मेटची काच उघडली. जसा थंड वर चेहऱ्यावर आला तशी झोप उडाली. स्वागतला अजूनदेखील त्यादिवशी काय झालं हे माहित नाही. अजून लेक्चर ऐकायची माझी मुळीच इच्छा नव्हती.
गुपचूप परत गाडी मूळ रस्त्यावर आणली. जयदादा-दिपक बरोबरचं होते. लुधियाना गाठता गाठता ३ वाजले होते. सगळेजणं पूर्णपणे भिजून गेलो होतो. चिखलामुळे पॅन्टची अवस्था तर विचारूच नका. गुडघ्यापासून खालपर्यंत पूर्णपणे चिखलाने भरली होती. लुधियानामध्ये परत एकदा पावसाने आमची परीक्षा घ्यायला सुरवात केली.
मोहिमेला फोन केला तर पावसामुळे मोहीम मार्ग बदलून फतेहगढ साहिबच्या रस्त्याला लागणार होती. आता आम्ही इकडे पूर्णपणे संभ्रमात होतो. मोहीम उद्या याच वाटेने पुढे जाईल, तर मोहिमेला सकाळी भेटू असे ठरले. राहण्यासाठी लॉज बघितला. सगळ्यांचेच कपडे पूर्णपणे भिजलेले होते म्हणून मग कपडे खरेदी करू म्हणून तिथल्या एका कपड्याच्या शो-रूम मध्ये घुसलो. आमचा अवतार बघूनच तिथल्या मालकाबरोबर कुठून आला ? कुठे निघालात इत्यादी प्रश्न-उत्तरे झाली. त्या सदगृहस्थाने आम्हाला गरमागरम कॉफी आणून दिली. हे बहुतेक थंडीमुळे थडथड उडणाऱ्या दिपककडे बघून दिली असावी. दीपकची थंडीमुळे फारच वाईट अवस्था झाली होती.संग्राम-रोहनला फोन केला तर ह्या लोकांनी जालंधर गाठले होते. जालंधर अजून ६० किमी होते. आम्ही आज इथेच राहणार आहोत उद्या सकाळी मोहिमेबरोबर निघू, तुम्ही आज तिकडेच मुक्काम करा, कार्यक्रमात काही बदल झाला तर कळवतो म्हणत फोन ठेवला.

आणि इतक्यात निखिलचा फोन आला, मोहीम उद्या फतेहगढ साहिबवरून हरिद्वारला निघणार होती. अमृतसर-वाघा सीमा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. निख्या, सांगतो तुला काय होत ते ? म्हणत फोन कट केला. पटकन सॅक मधून ठिकाणे आणि अंतरे लिहिलेला कागद काढला.
स्वाग्या, इथून वाघा सीमा १७० किमी आहे आणि वाघा ते हरिद्वार ४४० किमी आहे, म्हणजे उद्या मोहिमेला अमृतसर-वाघा सीमा बघून गाठायचं असेल तर उद्या कमीत कमी ६१० किमीचा पल्ला कापावा लागेलं. पाऊस आणि इतर सगळ बघता हे अवघड आहे असे वाटतयं रे, उगाच रिस्क नको. मी एका दमात बोललो.
जयदादाची कपडे खरेदी झाली होती, त्याला देखील सगळं सांगितलं. गाड्या फतेहगढ साहिबच्या दिशेने वळवण्यातच शहाणपणा होता. स्वागत आणि मला, आम्हा दोघांनाही फार वाईट वाटलं, सुवर्णमंदिर आणि वाघा सीमेवरची परेड हुकणार होती.
जाऊ दे रे, स्वाग्या .......लेह-लडाख ला येताना नक्की करू, प्रॉमिस, म्हणत मी स्वागतच मन वळवण्याचा प्रयत्न केला.
ठीक आहे. तो देखील तयार झाला आमच्यापुढे दुसरा कुठला मार्ग नव्हता. प्रत्यक्षात आजचा प्रवास
कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर असा तर उद्याचा
अमृतसर – सरहिंद - फतेहगढ साहिब -अंबाला- हरिद्वार असा होता.
असू दे, जे झालं ते झालं म्हणत परत आम्ही गाड्या फतेहगढ साहिबच्या दिशेने सोडल्या. फतेहगढ साहिब ते लुधियाना अंतर ६० किमी आहे. पावसाचा जोर आता कमी झाला होता पण रिपरिप चालूच होती. वाटेतच एका ठिकाणी माझी नजर एका ढाब्याच्या बाहेर तळल्या जाणाऱ्या कोंबडीकडे गेली, मग अर्थातच थंडीचा फायदा उठवण्यात आला आणि कोंबडीला पोटात ढकलेले. सरहिंदच्या इथे डाव्या बाजूला वळायचे होते, मागे बघितले तर जयदादा-दीपक दिसत नव्हते. मग एका ठिकाणी गाडी बाजूला घेऊन त्यांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात ते देखील आले, मग चहा घेऊन पुढे निघालो. साधारण ७ च्या सुमारास फतेहगढ साहिब गुरुद्वारामध्ये पोहचलो.

फतेहगढ साहिब विषयी थोडफार :
फतेहगढ साहिब, पंजाबच्या उत्तर-पश्चिमेला असलेला एक जिल्हा. शीख लोकांसाठी या शहराला एक वेगळेच महत्व आहे. या ठिकाणी सरहिंदचा सेनापती वजीर खान याने १२ डिसेंबर १७०५ रोजी, शीखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या २ कोवळ्या मुलांना, साहीबजादा फतेह सिंग आणि साहीबजादा जोरावर सिंग यांना या ठिकाणी भिंतीमध्ये चिणून मारले. बहुतेक यामुळेच या ठिकाणाचे नाव फतेहगढ साहिब असे पडले असावे. सर्वात हृदयद्रावक गोष्ट अशी की साहीबजादा फतेह सिंग अवघ्या ६ वर्षाचा पण नव्हता ( जन्म : १६९९) तर साहीबजादा जोरावर सिंग फक्त ८ वर्षाचा होता. (जन्म : १६९६). आणि या दोघांचा गुन्हा काय तर यांनी धर्मांतराला नकार दिला. लिहिताना पण अंगावर काटा आलायं.
या ठिकाणी १७१० मध्ये शिखांनी बंडा बहादूर याच्या नेतृत्वाखाली बालबनच्या वर विजय मिळवला.
गुरुद्वारा ज्योती स्वरूप साहीब हा फतेहगढ साहिब पासून १ किमी अंतरावर आहे. येथे माता गुजरी, गुरु गोविंद सिंग यांची आई आणि साहीबजादा फतेह सिंग आणि साहीबजादा झोरावर सिंग यांना पुरण्यात आले होते. वजीर खानने साहीबजादा फतेह सिंग आणि साहीबजादा झोरावर सिंग यांना मारल्यानंतर त्यांच्या अंतिम विधी करण्यास जागा देण्यासाठी त्या जमिनीवर सोन्याची नाणी पसरून मागितली होती. त्यावेळेस राजा तोडर मल याने सोन्याच्या नाण्यांची जमीन झाकून जागा घेतली होती. त्यामुळे तोडर मलविषयी शीखांमध्ये खूप आदर आहे. पुढे तोडर मलला “ दिवान” हा किताब देण्यात आला.
ह्या शहराभोवती चार ऐतिहासिक दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजा हा शिखांच्या इतिहासात विशेष महत्व असणारया व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारला आहे.
१. दिवान तोडर माल ‘
२. नवाब शेर मोहम्मद खान
३. बाबा बंडा सिंग बहादूर
४. बाबा मोती राम मेहरा
हे चौघेही जरी वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी हे त्यावेळच्या सर्वधर्मसमभावाची साक्ष देतात.

ट्रक बाहेरचं उभा होता. परत एकदा मोहिमेतले लोक भेटले. सर्वांचाच मूड गेला होता पण इलाज नव्हता. बॅगा घेऊन राहण्याच्या ठिकाणी गेलो. कपडे बदलले. अशा वेळी घरची हमखास आठवण येते. आता इथे हातात गरमागरम चहाचा कप देणारी आई नव्हती. अशाच एखाद्या क्षणी आपल्याला त्या माउलीची किंमत कळते. खोलीमध्ये गुरुजी सर्वांना पानिपतच्या युद्धाचे वर्णन सांगत होते. मग आम्ही देखील खोलीत घुसलो आणि अंगावर पांघरून घेऊन वर्णन ऐकू लागलो. आपल्या लोकांमध्ये परत आल्याचा एक वेगळाच आनंद वाटत होता. मग शिवाजी महाराजांपासून - पेशव्यांपर्यंत सर्व विषयांवर चर्चा झाली. प्रामाणिकपणे सांगायचं तर रात्री गुरुद्वारामध्ये जेवायचा मूड नव्हता, मग बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ असं ठरलं. मी कुणाशीतरी कुठल्यातरी विषयावर बोलत बसलो आणि खाली येऊन बघतो तो आमचा ग्रुप गायब. स्वागतला फोन केला तर अरे गुरुद्वाराच्या बाहेर येऊन पहिल उजवं वळण घे, वाटेतच एका ठिकाणी बरेच खाण्याचे गाडे उभे आहेत, तिथेच आहोत सगळे. गाडी बाहेर काढली आणि पहिलं उजवं वळण घेतलं, पावसाला पण बरोबर याच वेळी यायचे होते, काही क्षणातच मुसळधार पाऊस सुरु झाला आणि मी ज्या रस्त्याला लागलो होतो तो तर एकदम निर्जन, दोन्ही बाजूला दाट झाडी होती, आपण चुकीच्या रस्त्याला लागलो आहोत याची एव्हाना खात्री झाली होती. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. बर, विचारणार तरी कुणाला? मनातल्या मनात सगळ्यांना येथेच्छ शिव्या घातल्या. साले, ५ मि. थांबू शकत नाहीत का ? इतक्यात दुरवरुन एक दुचाकी येताना दिसली. बाईक थांबवून बाईकचा अप्पर-डीप्पर मारतं राहिलो. पाऊस चालूच होता. थांबले तर बघू, पण चक्क थांबले. रस्ता विचारला असता, भाईजान, आप गलत रस्ते लग गये हो, हमारे पिछे आ जाओ. त्या भल्या गृहस्थांनी अगदी हे सगळे जिथे थांबले होते तिथपर्यंत पोहचवले. त्यांचे आभार मानले आणि मोर्चा भुर्जीच्या गाड्याकडे वळवला.

बादवे उर्फ रच्याकने – उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेशात लोकांना अप्पर-डीप्परचा अर्थ माहित नाही कि काय देव जाणे, पण आपण कितीही अप्पर-डीप्पर मारले तरी हे आपले अप्पर मारूनच चालले असतातं. शिवाय यांचे दोन्ही आरसे बाईकच्या आतील भागात वळवलेले असतात, त्यामुळे मागून कोण येत आहे आणि मागचा काय करत आहे याचा या लोकांना पत्ताच नसतो, तरी लोकांनी उत्तर भारतात गाड्या, विशेषतः बाईक चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

पोटभर भुर्जी पाव खाऊन परतलो. रात्रभर अमृतसरला जायचे का नाही ? या विषयावर अनेक जणांमध्ये अनेक चर्चा झाल्या आणि नेहमीप्रमाणे त्यातून काहीच निष्पन्न न होता सर्वजण झोपी गेले.
आजचा प्रवास : २३९.२ किमी
उद्याचा प्रवास :
फतेहगढ साहिब- लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर- फतेहगढ साहिब
१६ जानेवारी २०१२

चला उठा, चला उठा, वाघा सीमेवर जायचंय, वाघा सीमेवर जायचंय असा आवाज कानावर पडताच खाडकन डोळे उघडले. बघतो तो “स्वयंघोषित कार्यकर्ता” त्याच्या नावाला साजेशी दवंडी पिटत होता. चौकशी अंती काहीजण वाघ सीमेवर जाणार असल्याचं कळलं, जे वाघ सीमेवर जाणार होते ते आज परत मुक्कामाला फतेहगढ साहिब मधेच येणार होते आणि नंतर मोहिमेला पुढे भेटणार होते.
आणि अचानक मला काय स्फुरण चढले देव जाणे, पण आज काहीही करून वाघ सीमा आणि अमृतसरच सुवर्णमंदिर बघूनच यायचं मी ठरवलं. एका दिवसात इतक्या लांबचा पल्ला अशक्य नव्हता पण फार रिस्की होता, फतेहगढ साहिब ते वाघ सीमा – २३० किमी आहे, म्हणजे जाऊन येऊन ४६० किमी होणार होते, त्यात पाऊस चालूच होता. त्यामुळे येथून एखादी गाडी घेऊन जावी आणि त्यानेच आज रात्री परत यावे असं ठरले. मी पटकन बाईक काढली, रुपेश आणि मी, गाडी घेऊनच येतो, फक्त ८ जण तयार राहा.
फतेहगढ साहिबच्या बाजारात गेलो. गाडी शोधायला जास्त वेळ लागला नाही. पण मांडवली करायला मात्र बराचं वेळ गेला. चक्क ६,००० म्हणत होते. आता आम्हाला किती किमीला किती घेतात, चालकाला किती पैसे द्यायचे असतात, रात्रीचा चार्ज काय असतो, गाडी किमीवर घेतली तर बरी पडते का दिवसावर याचा चांगलाच अभ्यास असल्याने जास्तीत जास्त ३५०० रु. मध्ये सगळं भागलं पाहिजे होते, पण शेवटी अडला हरी ..... या न्यायाने मी ४००० रु मध्ये गाडी ठरवली आणि टोल आम्हीच भरणार होतो. गाडी घेऊन गुरुद्वारा मध्ये आलो. सगळेजण तयार होते, असं म्हणालो असतो तर तो आमचा ग्रुप कसला? मग सगळ्यांना एक एक करून गोळा करून आणले. त्यात अमर मोहिमेच्या मागे एकाला सोडायला गेला होता, त्याला अजून अर्धा तास लागला आणि अशी सगळी साग्रसंगीत जमवाजमव आटपून आम्ही १० वाजता फतेहगढ साहिब सोडले.
६०-७० किमी पुढे आलो असतानाच, गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला तिथे सोडून मी परत येणार, नुसते जायचेच ४००० रु. आहेत, परत यायचं झालं तरी तेवढेच लागतील असं म्हणायला लागला. आता मात्र सगळ्यांचच डोक सरकलं. पण भांडून फायदा नव्हता. मी सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. नशीब, त्यला मराठी कळतं नव्हतं. नाहीतर लोकांनी वापरलेले शब्द याला कळाले असते तर तो आम्हाला तेवढ्याच पैशात, वाघाच काय लाहोर पर्यंत घेऊन जायला तयार झाला असता. Happy

अशा वेळी भांडून उपयोग नव्हता, मी त्याला अतिशय सौम्य शब्दात, देखो भाई, सबसे पहले आप ४००० रु. मै राजी हो गये थे, टोल हम भरणे वाले थे. हमारा फतेहगढ साहिब से वाघा बॉर्डर और फिर वापस, ऐसा डीसाईड हो गया था. कोई नही, मेरी सुनने मी गलती हो गयी होगी, आप हमे वापस फतेहगढ साहिब ले चलो, आप की गड्डी जिधर खडी थी वहा पे और भी लोग थे, हम लोग उन्हमेसे किसी की गाडी ले लेंगे. सुना था, सरदार बहोत जबान के पक्के होते है. छोडो अभी, आप घुमावो गड्डी वापस...
तुम लोग आज रात वही रुकने वाले हो क्या ?
नही यार ...मी
अच्छा, फिर तो मै आप लोगोको लेके आ जाता हू ! मुझे लगा आप उधर रुकने वाले हो !
बहुतेक शेवटच्या वाक्याचा परिणाम असावा. शिवाय आम्ही गाडी परत घेऊन गेलो तर तिथल्या बाकीच्या लोकांनीच त्याला शिव्या घातल्या असत्या. कारण त्यांच्या समोरच सगळ काही ठरलं होतं. हा आपला, लुटता आल तर लुटावं या न्यायानी त्याने प्रयत्न करून बघितलं.
आता पाऊस चांगलाच वाढला होता. त्यात साहेबांच्या गाडीचा वायपर काम करत नव्हता. मग तो दुरुस्त करण्यात अर्धा तास मोडला. डॉक्टरांनी आणलेल्या भडंगावर मात्र सगळ्यांनीच ताव मारला. वाटेत जेवायला देखील आम्ही कुठे थांबलो नाही.
तरी देखील वाघा सीमेवर पोहचता पोहचता संध्याकाळचे ५ वाजलेच. गाडी लावली आणी खाली उतरलो नेमकी त्यावेळी परेड संपली होती. खूप वाईट वाटलं, एवढी धावपळ करून आलो तरी परेड चुकली होती. विशेषतः बाकिच्यांसाठी. माझ्यासारखा भटका काय ती कधीतरी परत बघेलच. पण आमच्या बरोबर काही वयस्कर देखील होते, की त्यांना परत यायला मिळेल का नाही देव जाणे? परेड चुकली तरी वाघा सीमेपर्यंत पोहचल्याच एक वेगळं समाधान होतंच. मोहिमेमधील अजून काही लोक तिथे भेटले. तिथं काही फोटो काढले आणि परत अमृतसरच्या दिशेने निघालो.

12DSCN3628.JPGवाघा सीमेविषयी :
हा भारतामधून पाकिस्तान मध्ये जाण्याचा एकमेव मान्यताप्राप्त मार्ग. हा रस्ता अमृतसर आणि लाहोर या दोन शहरांना जोडतो. या रस्त्याला “Grand Trunk Road” म्हणून ओळखतात. १९४७ मध्ये वाघा हे गाव फाळणीनंतर विभागले गेले. आता वाघा हे पाकिस्तान मध्ये आहे. आपल्या बाजूला अटारी हे गाव आहे. त्यामुळे या सीमेला अटारी सीमा देखील म्हणतात.
येथे तुम्हाला भारतमाता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणा ऐकायला मिळतील. जाताना जमलं तर तिरंगा घेऊन जावा.
दररोज सायंकाळी होणारी परेड बघण्यासारखी असते. परेड उन्हाळ्याच्या दिवसात ५ ला तर थंडीच्या दिवसांमध्ये सायंकाळी ४ ला सुरु होते. परेड बघण्यास प्रचंड गर्दी होत असल्याने, दुपारी ३ वाजता ठिकाणं गाठल्यास उत्तम.
६ वाजले होते. तासाभरातच अमृतसर गाठले. शूज वैगरे काढून ठेवले. कुपन्स घेतली आणि सुवर्णमंदिराकडे निघालो. तिथे जवळच जालियनवाला बाग आहे पण ते देखील बंद झालं होतं.

जालियनवाला बागेविषयी :
१३ एप्रिल १९१९ रोजी, डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी आणि रॉलेट अॅक्टचा निषेध करण्यासाठी एक सभा घेण्यात आली.
काय होती रॉलेट अॅक्ट :
८ मार्च १९१९ रोजी ब्रिटीश सरकारने हि अॅक्ट लागू केली. भारतीयांच्या क्रांतिकारी भावनेला चिरडण्यासाठी आणि राष्ट्रीय भावनेला संपण्यासाठी ब्रिटीश सरकारने “ सिडनी रॉलेट” याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. समितीने सुचवल्यानुसार केंद्रीय विधानमंडळावर फेब्रुवारी मध्ये, २ विधेयके लागू करण्यात आली.
या अॅक्टचा निषेध करताना महात्मा गांधीनी ब्रिटीश सरकारला “सैतानी लोक” असे उद्देशले. रॉलेट अॅक्ट “काळा न्याय” या नावाने देखील प्रसिद्ध होती.
या अॅक्टला देशभरातून विरोध होऊन देखील हि विधेयके लागू करण्यात आली. या विधेयाकांनुसार मॅजिस्ट्रेटला, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला अटक करण्याचा आणि त्याच्यावर खटला दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला. अशा प्रकारे सरकार कोणत्याही निर्दोष व्यक्तीला अटक करू शकत होती. या कायद्यानुसार आरोपीला न्यायालयात नेल्याशिवाय तुरुंगात डांबू शकत होती.
त्यानंतर तासाभराने हिंदू आणि शीख बांधव बैसाखी सण साजरा करण्यासाठी, सुमारे १५ ते २० हजार लोक एकत्र जमले होते, पण त्याचवेळी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता आणि ५ किंवा अधिक जणांच्या जमावाला बंदी होती. यावेळी अचानक इंग्रजांचा ब्रिगेडियर जनरल डायर याने ६५ गुरखा आणि २५ बलुची सैनिकांना घेऊन अमृतसर येथील जालियानवाला बागेमध्ये जमलेल्या निशस्त्र लोकांवर रायफलींच्या १६५० फैरी झाडल्या. अधिकृतपणे मृतांचा ३७९ तर जखमींचा ११०० असा आकडा जाहीर करण्यात आला तर प्रत्यक्षात १,००० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले.
जालियानवाला बागेमध्ये प्रवेश करण्यास असलेले अरुंद प्रवेशद्वार डायरने बंद केले होते. बाकीची बहुतांशी द्वारे वापरत नसल्याने लोकांना पळण्यास मार्ग सापडला नाही. अनेकांचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला. हल्ल्यानंतर विहिरींमधून सुमारे १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले. कर्फ्यू लागू केल्याने जखमींना मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही वं अनेक जखमींचा त्या रात्री मृत्यू झाला.
या घटनेची सफाई देताना डायरने “ गोळीबार हा सभा तहकूब करण्यासाठी नाही तर, आदेश न पाळणाऱ्या भारतीयांना धडा शिकवण्यासाठी केला” असे म्हटले. या घटनेनंतर डायरला पदावरून हटवण्यात आले आणि त्याला सक्तीने निवृत्ती देण्यात आली. इंग्रजांच्या भारतातील वास्तव्याला सुरुंग लावण्यामध्ये या घटनेने मोलाचा वाटा आहे.
डायर इंग्लडमध्ये परतल्यावर त्याचा मोठा सत्कार करण्यात आला आणि त्याला २६,००० पौंड रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी हंटर समिती नेमण्यात आली होती. पण वरिष्ठांचा सहभाग असल्यामुळे डायर सुटला.

डायरने चौकशीदरम्यान केलेली काही व्यक्तव्ये :
हंटर : तुला सभेविषयी केव्हा कळाले ?
डायर : दुपारी १२४० ला
हंटर : मग तू सभा थांबू शकत होतास ?
डायर : हो
हंटर : तू गोळीबार करायच्या उद्देशाने बागेमध्ये गेला होतास ?
डायर : हो, जमाव जमलेला असेल तर मी गोळीबारच करायचा या उद्देशाने तिकडे गेलो होतो. मी सभा थांबवू शकलो असतो, पण लोक परत एकत्र आले असते आणि माझ्यावर हसले असते. मी काय मूर्ख आहे का माझा अपमान करून घ्यायला ?
जस्टीस रान्कीन : जर का शस्रास्त्रांनी भरलेल्या गाड्या, आत मध्ये घुसवायला पुरेशी जागा असती तर तुम्ही मशीन गन वापरल्या असत्या ?
डायर : मला वाटतं, हो
चिमणलाल सेतलवाड : मग तर कितीतरी लोक मृत्युमुखी/जखमी झाले असते ?
डायर : अर्थात.
समिती : जखमींना दवाखान्यात हलवण्यात आले नाही ?
डायर : अर्थात नाही, ते माझे काम नाही, दवाखाने उघडे होते, ते जाऊ शकत होते.
का केला होता मार्शल लॉ लागू ?

डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक जमाव, अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे निघाला होता. पण वाटेत सैन्याच्या एक तुकडीने त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. अर्थातच या हल्ल्याचे प्रतिसाद शहरात सर्वत्र उमटले. टाउन हॉल, बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम यांना आगी लावण्यात आल्या. रेल्वे गोदामाच्या इंग्रजी रक्षकाला मारहाण करण्यात आली, काही बँक कर्मचारी लावलेल्या आगीत ठार झाले, एका इंग्रजी नागरिकाचा भर रस्त्यात खून करण्यात आला. एका इंग्रजी महिलेवरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण भारतीयांनीच तिचे प्राण वाचवले. ब्रिटीश सैनिकांनी दिवसभर केलेल्या गोळीबारात सुमारे २० स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले.
यानंतरचे २ दिवस अमृतसर शांत होते. पण हा उद्रेक आजूबाजुच्या शहरांमध्ये पसरला. इतर भागांमध्ये देखील हिंसा सुरु झाली. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ इंग्रजी नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.
भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना १९१५ मध्ये इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.
शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) याला गोळ्या झाडून ठार मारले.

येथे अजूनही गोळीबाराच्या २८ खुणा शिल्लक आहेत.
स्वाग्या, एक और पंजाब ट्रीप तो मारनीच पडेगी भिडू.......
तो पण हसला, लेह-लडाखच्या वेळेस इकडून जाऊ म्हणाला.
सुवर्णमंदिरात प्रवेश केला. थोडीफार गर्दी होतीच. पण मस्त दर्शन झालं.

12DSCN3660.JPG12DSCN3662.JPG12DSCN3664.JPGप्रवेशद्वार :
12DSCN3667.JPGसुवर्णमंदिराविषयी थोडसं :
खरं नाव श्री हरमंदिर साहीब, पण सुवर्णमंदिर म्हणूनच आता जास्त प्रसिद्ध आहे. दरबार साहीब असे अजून एक नाव. हे शीखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनी हे सोळाव्या शतकामध्ये बांधले. त्यांनी “आदिग्रंथ” लिहून पूर्ण केला आणि त्याची गुरुद्वारा मध्ये स्थापना केली. याचे बांधकाम डिसेंबर, १५८५ रोजी सुरु झाले आणि ऑगस्ट, १६०४ रोजी पूर्ण झाले.
येथे प्रवेश करण्यास ४ प्रवेशद्वारे आहेत, याचा अर्थ असा की हे सर्व प्रकारच्या लोकांसाठी आणि धर्मांसाठी खुले आहे. सध्याचा गुरुद्वारा हा १७६४ रोजी जसा सिंग अहलुवालिया याने अगोदरच्या गुरुद्वारामध्ये डागडुजी करून बांधला. १९व्या शतकामध्ये महाराजा रणजित सिंहाने पंजाब भाग ताब्यात घेतला आणि गुरुद्वाराचा वरील भाग सोन्याच्या पत्र्याने झाकला. हि या गुरुद्वाराची वेगळी ओळख आहे आणि यामुळेच हा सुवर्णमंदिर म्हणून ओळखला जाऊ लागला.
श्री हरमंदिर साहीब हा शिखांसाठी खूप पवित्र आहे. “गुरु ग्रंथ साहिबा” हा सगळ्या गुरुद्वारामध्ये असतो. आणि याच्या पुढेच सर्व लोक माथा टेकतात. हरमंदिर साहीब याचा खरा अर्थ “ देवाचे मंदिर” असा होतो. शीखांचे चौथे गुरु, राम दास यांनी १५७७ मध्ये हा तलाव बांधला. हि जागा अकबराने दिली होती. या तलावामध्ये पाणी नसून ते अमृतच आहे असे मानतात. आणि या तलावाच्या भोवताली जे शहर वसले ते “अमृतसर” या नावाने प्रसिद्ध झाले. “सर” याचा अर्थ तलाव.

अजून एक कहाणी अशी आहे की, रामाने सीतेला त्यागल्यानंतर ती या तलावाच्या शेजारी येऊन राहिली. इथेच लव-कुशनी रामाचा घोडा अडवला आणि त्याचा पराभव केला. येथेच एक झाड आहे त्याला “दुख भंजन बेरी” म्हणतात, या झाडाखाली राम शेवटच्या घटका मोजत होता, जेव्हा लव-कुश यांना आपल्या हातून “पितृहत्ये” सारख महापातक होतंय कळलं तेव्हा त्यांनी रामाला या तलावाचं पाणी पाजलं आणि राम खडखडीत बरा झाला. तिथे साधारण ३ झाडे आहेत, त्यातले नक्की कोणते हे मला माहित नाही. हिंदुना जसे गंगेच्या पाण्यात अथवा काशी, मथुरा, नर्मदा परिक्रमा केल्यावर पुण्य मिळते, पाप नाहीसे होते, मुस्लिमांना जसे हज तसेच शिखांसाठी हा तलाव. अर्थात पाण्यात उतरून मला शुद्ध आणि तलावाला अशुद्ध करण्याची माझी इच्छा नव्हती हे एक कारण आणि दुसर त्या थंडीत मी तलावात उतरलो असतो तर मी शुद्ध तर झालो असतो पण वाटेतच काशीमध्ये माझ्या अस्थी विसर्जित कराव्या लागल्या असत्या.

त्यामुळे मी फक्त आपले नेहमी गुरुद्वारामध्ये जाताना हात-पाय धुतात त्याप्रमाणे धुतले आणि गेलो. मला मी केलेल्या पापांचा घडा रिकामा करायचा नाहीये की पुण्याचा घडा भरायचा नाहीये. तो जसा आहे तसाच ठीक आहे. पण लोक मात्र त्यांच्या पापांचा घडा रिकामा करून आणि पुण्याचे घडे भरून भरून घेऊन जात होते. ‘
१९२३ रोजी हा तलाव पहिल्यांदा पूर्णपणे कोरडा करण्यात आला. आणि त्यामधील गाळ आणि इतर माती सोन्या-चांदीच्या घमेल्यांनी, फावड्यांनी काढली असे सांगतात. त्यावेळेस गुरु गोविंद सिंगांचा पांढरा ससाणा मंदिराच्या कळसावर बसून होता असे सांगतात.

पायाचा दगड बसवला लाहोरच्या हजरत मियाँमीरने अशी लोकांमध्ये चुकीची समजूत आहे. प्रत्यक्षात शीखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनीच पायाचा दगड डिसेंबर १५८८ मध्ये बसवला.
शीखांच्या “ग्रंथसाहीबा” मध्ये फक्त गुरु नानकांचे आणि इतर शीख गुरूंचे विचार नाहीत तर त्यामध्ये नामदेवांच्या ओव्या आहेत, बाबा फरीद, कबीराचे दोहे पण आहेत.
सुरवातीला ह्या जागी एक छोटसं तळ आणि विरळ असं जंगल होतं, जेव्हा अकबर शीखांचे तिसरे गुरु अमर दास यांना गोइंदवल मध्ये भेटला तो त्यांची आणि लोकांची जीवनशैली बघून खूप प्रभावित झाला आणि त्याने अमर दास यांची मुलगी भानी हिच्या भाई जेठा बरोबर झालेल्या लग्नात भेट म्हणून जहागीरी दिली. पुढे भाई जेठा शीखांचे चौथे गुरु राम दास झाले.

अहमद शहा अब्दालीचा सेनापती जहान खान याने गुरुद्वारा पाडला, नंतर तो १७६० मध्ये परत बांधण्यात आला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून शिखांची फौज पाठवण्यात आली आणि अमृतसरपासून ५ मैलावर त्यांची जहान खानशी गाठ पडली आणि त्यांनी जहान खानाला आणि त्याच्या सैन्याला धुळीला मिळवले.

सुवर्णमंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी काही पाळावयाच्या गोष्टी :
१. आपली पादत्राणे बाहेरचं काढून ठेवा, आत जाताना हात-पाय जमल्यास तोंड धुवून आता जावा.
२. आतमध्ये दारू पिणे, कोणत्याही प्रकारचे मांस खाणे, सिगरेट ओढणे अथवा कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करणे निषिद्ध आहे.
३. डोक्यावर कायम रुमाल, ओढणी अथवा तत्सम कपडा ठेवावा.

सध्या जे संगमरवर आणि सोन्याचा पत्रा दिसतो तो १९व्या शतकामध्ये हुकम सिंग चिमनी याच्या सहाय्याने महाराजा रणजीत सिंहाने लावला आहे.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ( साधारण १३ तारखेला ) येणारा बैसाखी सन ( या दिवशी खालसा धर्माची स्थापना झाली) येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. तसेच दिवाळीला देखील येथे मोठी रोषणाई करण्यात येते. अमृतसर आणि श्री हरमंदीर साहीबला भेट न दिलेला शीख अजूनतरी मला भेटला नाही. तुम्हाला भेटल्यास जरूर सांगा.

राजा रणजितसिंहाने जेव्हा पुढे एका मुस्लीम मुलीशी विवाह केला तेव्हा त्याला अकाल तख्ताच्या प्रमुखाने चाबकांच्या फटक्यांची शिक्षा ठोठावली होती आणि त्याने देखील ती निमुटपणे सहन केली.
तिथे फिरताना हे क्षण असेच राहावेत असं वाटतं. एक वेगळचं पवित्र वातावरणाने तो परिसर भरलेला आहे. प्रसाद म्हणून शिरा देण्यात येतो. त्या साजूक तुपाचा वास नंतर कितीतरी वेळ हाताला येत राहतो. तेथील कलाकुसर, स्वच्छता ती पवित्रता अनुभवल्यानंतर तेथून खरचं पाय निघत नाही. काहीही करा पण आयुष्यात एकदा भेट द्याचं. मरण्याअगोदर बघितलंच पाहिजे अशा मोजक्या ठिकाणांपैकी हे एक. जमल्यास तेथील संग्रहालयास भेट द्या, शीखांचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न करा. हिंदू धर्माचेच एक बंडखोर बाळ म्हणून शीख धर्माकडे बघण्यात येते. त्यांची श्रद्धा बघा, तिथे अब्जाधीशपण जेवण वाढत असतो, चपला ओळीत लावत असतो. स्वतःहून काम करतात ते लोक. त्यांना सांगावे लागत नाही. खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून. एकवेळ मंदिराच्या दानपेटीत पैसे देताना माझा खिशाकडे जाणारा हात अडखळेल पण गुरुद्वारामध्ये तो कधीचं अडखळला नाही. का ? याचं उत्तर कधी मी शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही.
अनेक वेळा मुस्लीम सुलतानांनी हे मंदिर जमीनदोस्त केलं आणि तितक्याच वेळा ते परत उभे राहिले. अर्थात भारतातील सर्वच मंदिरे इतकी सुदैवी ठरली नाहीत.

काही जणांना तलवारी घ्यायच्या होत्या. मलापण खूप इच्छा होती. आणि आई आठवली. जिने माझा Survival knife गुपचूप मला न सांगता माझ्या ट्रेकिंग सॅक मधून काढून फेकून दिला. कारण विचारलं तर म्हणे, तुझ्या हातात तसलं विघातक शस्त्र बघून मला भीती वाटते, मी काय तुला जामीन द्यायला येणार नाही.
नको येऊ, माझा बाप समर्थ आहे ...........माझं उत्तर
माझी सॅक का उचकलीस ? किती वेळा सांगितलं तुला, माझ्या ट्रेकिंगच्या वस्तूंना कुणी हात लावायचा नाही. ते नुसते दगड असतो नाहीतर काठ्या.
आजचं सकाळी, तुझ्या सॅक मधून कसलातरी घाण वास येत होता. ( बहुतेक उरलेल्या बटाट्याच्या भाजीचा असावा Wink ) म्हणून बघितलं आणि भाजी तरी फेकायचीस ?
आता खर खर सांग, कधी आणि कुठे फेकलास ?
आज सकाळीच फेकलाय, कचराकुंडीत
शाआआआआ ..............बाबा.............आणि मी कचराकुंडीच्या दिशेने निघालो.
तब्बल २ तास कचराकुंडीत शोधल्यावर तो Survival knife मला मिळाला. त्या भल्या सकाळी ज्यांनी मला कचराकुंडीत कचरा शोधताना बघितलं असेल त्यांच्या चेहऱ्यावर सारंग, हा धंदा कधीपासून सुरु केलास रे ? असे भाव स्पष्ट दिसत होते. आणि मी देखील “ ऐकावे जनाचे, करावे मनाचे” या न्यायाने आज सगळी कचराकुंडी पालथी घालेन पण माझा Survival knife घेऊनच जाईन या न्यायाने तो शोधला. घरी आल्यावर आई, स्वयंपाकघरातील काटे चमचे, सुरी इतकेच काय विळी पण फेकतो........ मी म्हणालो.
त्यावर आई शांतपणे ...... लगेच फेक, फक्त मग रोज डाळ-भात खायची तयारी ठेव.
शेवटी नेहमीप्रमाणे बाबांनी मध्यस्थी करून या नाट्यावर पडदा घातला.
मागे एकदा आईने बाबांचे रिव्होल्व्हरचे लायसन्स असेच फेकून दिले होते. अर्थात बाबा माझ्यासारखी प्रतिक्रिया व्यक्त करू न शकल्याने आमचा भाऊ- बहिणींचा एक मनोरंजन कार्यक्रम हुकला, तर बाबा रिव्होल्व्हर लायसन्सला मुकले आणि आमची रिव्होल्व्हर चालवायची इच्छा इच्छाच राहिली. Happy
त्यामुळे तलवारी समोर दिसत असून देखील मला एका सकाळी कचराकुंडीत मी तलवार शोधत फिरत आहे असे डोळ्यासमोर दिसले आणि मी तलवार घ्यायच्या विचारांना श्रद्धांजली दिली.

अवांतर : अमृतसरपासून २५ किमी अंतरावर शीखांचे पाचवे गुरु आणि पहिले शहीद धर्मवीर अर्जुन देव यांनी सर्वधर्मियांसाठी बांधलेले "तरणतारण" नावाचे मंदिर आहे. येताना जमल्यास तेही बघून यावे. तेथे राहण्याची-खाण्याची मोफत सोय होते.

काहींनी तलवारी घेतल्या. सर्वांचं दर्शन झाल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. रात्री ८ वाजता अमृतसर सोडले. आता सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. शिवाय आम्ही पंजाबमध्ये असल्याने नॉनव्हेज न खाता गेलो असतो तर आमच्यासारखे कमनशिबी आम्हीच.
त्यामुळे ड्रायव्हरला एखाद चांगलं हॉटेल बघून गाडी थांबवा, जेवणं करून पुढे निघू असे सांगितले. आणि मी ताणून दिली. दिवसभराच्या धावपळीने लगेच झोप लागली.

कुणाच्या तरी आरड्याओरड्याने जाग आली. स्वागत आणि ड्रायव्हरची जुंपली होती. :). एकंदरीत लक्षात आलं की ड्रायव्हरचा गाडी मध्ये कुठही न थांबता फतेहगढ साहिब गाठायच होता, पण स्वागत त्याचं नॉनव्हेजप्रेम बघता जागा राहिला होता आणि रस्त्यावर कुठे चांगलं हॉटेल दिसत का ते बघत होता, आणि ड्रायव्हर त्याला थोडं अजून पुढे चांगलं हॉटेल आहे तिथं थांबूया असं सांगत होता. असं २-३ वेळा झाल्यावर स्वागतने त्याच रौद्र रूप धारण केलं होतं. घड्याळात बघितलं तर रात्रीचे ११ वाजून गेले होते. मग लगेचच पुढच्या एका हॉटेलमध्ये गाडी थांबवली. सगळेजणच भुकेले होते. त्यामुळे सगळ्यांनीच जेवणावर आडवा हात मारला. ड्रायव्हरच जेवणं बघून हा आता गाडी कशी चालवणार असा प्रश पडला ? पण स्वागत जागाच राहणार असल्याने काही प्रश्न नव्हता. जेवण आटोपून गुरुद्वारा गाठायला १ वाजला. आमच्याच मोहिमेमधील अजून एक ग्रुप तिथे पोहचला होता. जास्त वेळ न दडवता आम्ही खोल्यांच्या चाव्या घेतल्या आणि पहाटे ६ ला निघू म्हणतं ताणून दिली.

पण आज कुणीच बाईक न चालवल्याने तसा काही जास्त थकवा आला नव्हता फक्त थोडी दगदग झाली होती. मोहिमेतील लोकांना फोन केला तेव्हा मोहीम हरिद्वारला पोहचली होती. पण जवळपास निम्म्याहून अधिक लोक विखुरले होते. काहींनी बाईक वरून अमृतसर गाठून, तिथून बाईक ट्रेन मध्ये टाकल्या होत्या.
एका दोघांनी काय गाडी आणली होती?, वायपर चालत नव्हता, मागचं दार वाजत होतं इत्यादी किरकोळ तक्रारी केल्याच. पण अशा छोट्या-मोठ्या कुरबुरी चालणारच, त्यात विशेष असे काही नाही, तो मनुष्य स्वभावच आहे. या नात्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आयुष्यात “adjustment”” नावाची एक गोष्ट असते आणि ती सगळीकडे करावीच लागते. त्यात विशेष असे काही नाही. पण एकंदरीत सगळेजण खुश होते.
घरी फोन केला तेव्हा बाबांनी नेहमीप्रमाणे थंडी आहे का? आणि परत एकदा बास की भटकन, टाक ट्रेन मध्ये बाईक आणि ये परत असा सल्ला देऊन बघितला. मी देखील नेहमीप्रमाणे त्यांना जास्त काही न बोलता, आज काय काय बघितलं आणि उद्या कुठे जाणार आहोत ते सांगून फोन ठेवला.
रात्री झोपता झोपता उद्या इतका लांबचा पल्ला ( जवळपास ४७० किमी) काही आपल्याच्याने पार होणार नाही, वाटेत कुठेतरी थांबवाचे लागणार. इत्यादी विचार करता करता झोप लागली.

आजचा प्रवास : अंदाजे ५०० किमी अर्थात गाडीमध्ये निवांतपैकी बसून
उद्याचा प्रवास:
फतेहगढ साहिब -अंबाला- हरिद्वार – नजीबाबाद – मुरादाबाद – रामपूर – बरेली

क्रमशः

१७ जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
फतेहगढ साहिब -अंबाला- हरिद्वार – नजीबाबाद – मुरादाबाद – रामपूर – बरेली

स्वाग्या, ऊठ रे आज ५०० किमी कापायचं.
निख्याचा फोन झालाय, मोहीम निघालीये हरिद्वार वरून.
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म .......... इति स्वागत
अमरया, ऊठ बे
माझ काय बे, आपण उठलो कि निघालो ह्यांनाच आवरायला उशीर होतो. इति अमर
शेवटी कसेबसे सगळे उठले, आवरणं वगैरे प्रकार आमच्यात नसतो. आम्ही आपले उठलो कि सुटलो. आज लवकर उठलो आणि चक्क सात वाजताच गुरुद्वारा सोडला. मी मनातल्या मनात आज बारा तास बाईक चालवली तर मोहिमेला गाठता येईल असा विचार करत होतो. मोहीम जेवढी लवकरात लवकर गाठता येईल तेवढं बरं असा माझा विचार.
पण ह्या कार्ट्यानी माझा हा आनंद काही जास्त वेळ टिकू दिला नाही. कारण जशी गाडी गुरुद्वाराच्या बाहेर पडली स्वाग्याने, साऱ्या, कुठंतरी चहा मारून निघू अशी धमकीवजा विनवणी केली. मला पुढंच चित्र साफ दिसायला लागलं.
स्वागत अगोदर स्नेहलनीच गाडी एका छोट्याशा हॉटेल मध्ये घातली. मग चहा झाला मग ज्यांना भूक होती त्यांनी छोले भटोरे खाल्ले, ज्यांना नव्हती त्यांनी छोले भटोरे आणि पराठे खाल्ले. वरून “आयला, आता पंजाब सोडलं कि पराठे मिळायचे नाहीत” वगैरे कारणं देखील सांगितली. अशा प्रकारे सगळ्यांची पोटं तुडुंब भरल्यावर आम्ही गाड्यांचीपण पोटं तुडुंब भरली आणि साडेआठ वाजता आम्ही गाड्या हरिद्वारच्या दिशेने भरधाव सोडल्या.
आता जो कोणी गाडी थांबवेल त्याला तिथल्या तिथे पायताणानी हाणायचं असे स्फोटक विचार माझ्या मनात चालू असतानाचं गाडी मुख्य हायवेला लागली.
रुप्याला गाडी हायवेला लागताच अशा मस्त धुक्यात फोटो किती मस्त येतील याच स्वप्न पडलं आणि परत एकदा आमच्या तिन्ही गाड्या हायवे लगत थांबल्या. तुरळकच वाहतूक असल्याने मग प्रत्येकाने आपली फोटो काढायची हौस भागवून घेतली. मग कधी बाईकवर झोपून तर कधी हायवे वर अशा प्रकारे एखादी व्यक्ती बाईक बरोबर जितक्या वेगवेगळ्या पोझ देऊ शकते तितक्या प्रकारे प्रत्येकाचे सोलो फोटोशूट झाले. मग कॅमेराला दिलेल्या टायमर या तंत्रज्ञानाचा वापर करून ते बंद पडेपर्यंत ग्रुप फोटोशूट झाले.

धुक्यात हरवलेला रस्ता :
13DSCN3684.JPGसभोवताली दिसणारा हिरवागार निसर्ग :
13DSCN3687.JPG

शेवटी एकदा आम्ही हरिद्वारच्या दिशेने निघालो. वाटेमध्ये अंबाला लागते पण अंबालामध्ये बघण्यासारखे देखील जास्त काही नाहीये आणि त्यातच आम्हाला उशीर पण झाला असल्याने आम्ही वाटेत कुठे थांबण्याच्या भानगडीत पडलो नाही. फोटोशूट नंतर अमरची गाडी मी घेतली आणि अमर स्वागतच्या मागे बसायला आला. ह्यामागचा माझा एकमेव उद्देश म्हणजे शक्य होईल तितकी गाडी पुढं ठेवायची आणि त्यामुळे निदान दुसरे तरी वाटेत कुठे जास्त वेळ थांबणार नाहीत हा होता. राष्ट्रीय महामार्ग ७३ पकडायचा हा थेट हरिद्वारला जातो.
एकदा फतेहगढ वरून निघाल कि राष्ट्रीय महामार्ग ७३ सोडायचा नाही. हा सरळ हरिद्वारला जाऊन मिळतो. मस्त गुलाबी थंडी पडली होती. हेल्मेटचा आतमध्ये वारंवार बाष्प जमा होतं असल्याने हेल्मेटचा पुढचा भाग उघडला होता. सर्वत्र धुकं पसरलं होतं आणि रस्तापण रिकामा असल्यामुळे मी गाडीचा सगळ्यात वरच गिअर टाकला. बाईकने ७०-८० चा वेग घेतला होता. गार वाऱ्याने हात चांगलेच गारठू लागले होते. पण मनाला एक प्रकारचा उत्साह जाणवत होता. हा रस्ता आणि हे क्षण संपूच नये अस वाटत होतं. आरशांमध्ये बघत आम्ही सगळेजण एकमेकांबरोबर असल्याची खात्री करत होतो. आज काहीही करून बरेली गाठायचं एवढंच सगळ्यांच्या मनात होतं. तर अंबाला पर्यंत आम्ही सगळे मागे पुढेच होतो. चांगला आणि मोकळा रस्ता मिळाला तर ४५० किमी सहज जाऊ अस आमच्या मनात होतं. पण अंबाला मध्ये ट्राफिक लागलं आणि मग मात्र मला तरी आमच्यातल कोणी दिसलं नाही, नेहमीप्रमाणे विचारत विचारत निघालो होतो. जोगधरी, सहारनपूरपर्यंत तरी मी बरोबर होतो. पण माझा बहुतेक शहापूर फाट्यावर रस्ता चुकला आणि मी रुरकी मध्ये घुसलो.

शहापूर फाट्यावर रस्ता चुकला
13DSCN3691.JPG

बरोब्बर दुपारी तीन वाजता मी उत्तराखंड मध्ये प्रवेश केला.

13DSCN3693.JPG

धुकं, धुकं आणि फक्त धुकं :
13DSCN3702.JPG

Zero Visibility Happy
13DSCN3703.JPG

माझ्या अंदाजाप्रमाणे या सर्वांपुढे माझीच गाडी असल्याने साधारण ०४००-०४३० पर्यंत हरिद्वार गाठू आणि बाकीच्यांची तिथंच वाट पाहू अशी माझी एकंदरीत योजना होती.
उत्तराखंडमध्ये प्रवेश करतानाच रूरकी २२ किमी, हरिद्वार ५४ किमी तर दिल्ली १९५ किमी असा फलक नजरेस पडला. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता तर.
रूरकी मध्ये गाडी घुसताच एकजण जोर जोरात हॉर्न वाजवत माझ्या मागे आला. मला क्षणभर कळेना, बर साईड हवी म्हणावं तर रस्ता मोकळा होता. त्यांनी हात वगैरे दाखवत गाडी बाजूला घ्यायला सांगितली.
मी पण काय म्हणतोय ते तर बघू म्हणतं गाडी बाजूला घेतली.
गाडी बाजूला थांबवली व नीट एकू येण्यासाठी हेल्मेट काढलं.
अरे गिर गये थे क्या ? आपका जाकेट फट गया है.
मी हसून “ हा बाईक थोडा स्लीप हो गयी थी”
हमारे पीछे आव, अस म्हणून त्याने गाडी सुरु देखील केली.
मी पण बघू तर कुठे घेऊन जातो म्हणत त्याच्या मागे बाईक नेऊ लागलो.
साधारण १० मि. गल्लीबोळातून घेऊन गेल्यावर त्याने एका ठिकाणी बाईक लावली. मी पण त्याच्या मागोमाग बाईक लावली.
त्याने तिथेच शेजारी असलेल्या एका शिंप्याच्या दुकानातील माणसाला आवाज दिला.
सलाम वालेकुम मुल्ला भाई, ये छोकरा का उतना जाकेट सिलवा के दे दो. मै थोडा जल्दी मै हू, आता हू शाम को, पैसा मत लेना इससे
इतक बोलून तो त्याची बाईक घेऊन निघून पण गेला.
मी माझं जर्किन काढून त्याला दिलं.
त्यांनी ते उलट सुलत करून बघितल्यावर, मुश्कील है, देखता हू अस म्हणत शिवायला घेतलं.
जर्किन काढल्यामुळे आता arm guard पण सर्वाना दिसायला लागले. येणाऱ्या जाणारयाबरोबर परत एकदा नेहमीचा प्रश्नोत्तराचा खेळ सुरु झाला.
त्याने १५ मि. मध्ये जर्किन एकदम पूर्वी होतं तसं शिवून दिलं.
भैय्या, कितना हुवा ?
अरे नही नही, आपसे पैसा लेंगे क्या ? अल्ला ताला नाराज होगा हमसे.
मी त्याला शक्य होईल तेवढी पैसे घेण्याविषयी विनवले. तो काही केल्या कबुल होईना.
शेवटी धन्यवाद म्हणून गाडी बाहेर काढली.
एका मिठाईच्या दुकानात गेलो, थोडी मिठाई घेतली. दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका मुलाला दुकानात नेऊन दे म्हणून सांगितलं. मुलगा दुकानात मिठाई घेऊन गेला, मालकाने माझ्याकडे बघताच हात दाखवला आणि हरिद्वारच्या दिशेने निघालो.
साधारण पाच वाजता हरिद्वार मध्ये घुसलो. एकदम सुरवातीलाच थांबाव म्हणू एका छोट्याशा हातगाड्याजवळ थांबलो. शहर बऱ्यापैकी आतमध्ये दिसत होते. बाहेर तितकीशी वर्दळ देखील नव्हती. प्यायचा म्हणून चहा पिला. स्वागत, अमर, रुपेश, स्नेहल सगळ्यांना फोन करून झाले, कुणाचाच लागत नव्हता. त्या हातगाड्याजवळ उभे असलेले लोक पाहून मला पहिल्यांदाच थोडीशी असुरक्षिततेची जाणीव झाली. लगोलग बाईक सुरु केली आणि पुढे निघालो. तिथून निघून थोडं आत शहरामध्ये जाऊन थांबावं म्हणून मी परत बाईक सुरु केली. साधारण १०-१५ मिनिटांतच ट्राफिक सिग्नल लागला. शेजारीच पोलीस चौकी पण होती. सिग्नलला सगळ्याचं गाड्या स्लो होत असल्याने इथेच गाडी बाजूला लावू आणि यांची वाट बघत बसू अस म्हणत मी बाईक बाजूला घेतली. स्वागतला फोन लागला पण रिंग वाजून वाजून बंद झाला. गाडी चालवत असेल, थांबून तो पण करेलच परत अस विचार करत फोन बंद केला. तेवढ्यात चौकीवरचा पोलीस माझ्याकडे येताना दिसला. बहुतेक माझा असा अवतार बघून त्याला शंका आली असावी.
कहासे आये हो ?
महाराष्ट्रसे ............. मी
इतनी दूर ? बाईक पे ?
हा ......................
बाईक लगावो, मेरे साथ चलो.
भाईसाब मेरे दोस्त आ रहे है पीछे से उनका वेट कर रहा हू.
त्यांनी त्याच्या सहकाऱ्याला आवाज दिला.
अरे कोई महाराष्ट्रकी बाईक दिखे तो रोकना.
चलो आप मेरे साथ
कहा ??????? मी अगदी, आता कुठे नेता मला अशा अविर्भावात
साब से मिलो.
चलो.
आता शक्य होईल तितक्या लवकर याला कटवू अस म्हणून त्याच्याबरोबर शेजारच्या पोलीस चौकीमध्ये गेलो.
त्याने त्याच्या साहेबाला “ साब ये लडका महाराष्ट्रसे बाईक पर आया है! “
आता त्याच्या साहेबाने माझा ताबा घेतला. मग परत एकदा माझ्या सगळ्या प्रवासाची उजळणी झाली. आणि मध्ये त्याने त्याच्या सहकाऱ्याला “ अरे जरा वो अमित को बुलाना ” असा आदेश दिला.
खाना खाया ?
हा, बीच मे खा लिया था थोडासा!
चलो, चाय पिते है!
मग हा मला एका हॉटेल मध्ये घेऊन गेला.
आणि मग चहा- बिस्किटे खाता खाता तुला अशी भीती नाही का वाटतं? आणि हे सगळं अंगावर घातलयस ते कितीला येते ? तुझे बाकीचे मित्र कुठे आहेत वगैरे वगैरे अशा गप्पा चालू असतांनाच
अरे अमित इधर..............!
अस त्याने कुणाला तरी आवाज दिला.
तिकडे बघितलं तर तो अमित आणि त्याच्याबरोबर एक छायाचित्रवाला आमच्याकडे येतं होते.
मग त्या अमितशी आणि त्याच्या मित्राशी ओळख झाली.
तो अमित “ अमर उजाला ” का अशाच कोणत्या तरी वृत्तपत्रासाठी काम करत होता.
मग परत प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. आणि मोहीम कालच निघून गेली आम्ही मागे राहिलो होतो असे म्हटल्यावर, अरे साब, ये बहोत बडा opportunity मिस किया हमने. चलो कोई नही अगली बार आओगे तो हमे जरूर बताना!
असा संवाद चालू असतानाच फोन वाजला.
हा स्वाग्या, कुठाय रे ?
अरे साऱ्या, रुपया बोलतोय. अरे आम्ही हरिद्वारच्या पुढे आहे. अरे रस्ता फारच सुनसान आहे. तू कुठे आहेस?
अरे मी हरिद्वार मध्ये आहे. तुम्ही तिथेच थांबा मी आलोच.
बर, बर सावकाश ये. आम्ही थांबतोय.
मी त्या साहेबांना आणि अमितला चलो साब, चलता हू! असे म्हणताच
मिल गये आपके दोस्त लोग ? किधर है ?
मग त्याला ते हरिद्वारच्या पुढे वाट बघतायत सांगितल्यावर
आरामसे जाना, बरेली लगबग २५० किमी है. आगे पथारी और चीडीयापूर जंगल का थोडा हिस्सा है. डरना मत और बिचमे किसिकेलीये मत रुकना असा सल्ला दिला.
मी मनातल्या मनात “डरना मत और बिचमे किसिकेलीये मत रुकना ” व्वा, याला म्हणतात मिश्र वाक्य.
हॉटेलवाल्याला मी पैसे देऊ लागताच “ अरे साब, आप हमारे मेहमान है ” असे म्हणत तिथल्या एकाला “ जा रे एक पानी का बोतल दे साब को ” असे म्हणत नको, नको म्हणत असतानाच बाटली माझ्या हातात कोंबली.

कडाक्याची थंडी, जीवाभावाचे मित्र आणि गरमागरम चहा, अजून काय हवंय आयुष्यात :
13DSCN3725.JPGहरिद्वार :
हरिद्वारचा अर्थ हरीचे ( काहींच्या मते विष्णूचे) म्हणजेच ईश्वराचे द्वार असा होतो. हिंदू धर्मीयांमध्ये हरिद्वार हे अतिशय पवित्र असे तीर्थक्षेत्र मानले गेले आहे. हिंदू धर्मानुसार अतिशय पवित्र असलेल्या ७ तीर्थक्षेत्रांपैकी हे एक होय. ज्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो अशा ठिकाणांपैकी हे एक.
गरुड पुराणामध्ये अतिशय पवित्र असलेली ७ तीर्थक्षेत्रे खालीलप्रमाणे :
१. अयोध्या
२. मथुरा
३. मायापुरी – हरिद्वार
४. काशी – वाराणसी
५. कांची – कांचीपुरम, तामिळनाडू
६. अवंतिका – उज्जैन
७. द्वारावती – द्वारका

३१३९ मी उंचीवर असलेल्या गंगोत्री या गंगेच्या उगमापासून सुमारे २५३ किमी अंतर पार करून गंगा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते म्हणून याला गंगेचे प्रवेशद्वार असे देखील म्हटले जाते.
पौराणिक कथेनुसार जेव्हा गरुड समुद्रमंथनातून निर्माण झालेले अमृत घड्यामधून घेऊन जात होता तेव्हा त्या घड्यामधून अमृताचे ४ थेंब वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्यामधील एक हरिद्वार. बाकीची ३ स्थाने म्हणजे उज्जैन, नाशिक आणि प्रयाग म्हणजेच अलाहाबाद. प्रत्येक ३ वर्षांनंतर या ठिकाणी कुंभमेळा भरतो. आणि १२ वर्षानंतर महाकुंभमेळा अलाहाबादला भरतो.
येथूनच चारधाम यात्रेची सुरवात होते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री हे ते उत्तराखंडमधील चारधाम.

पाहण्यासारखी ठिकाणे :
१. हर-की-पौडी : ज्या ठिकाणी अमृताचा थेंब पडला होता त्याला “हर-की-पौडी” ( शंकराच्या पाऊलखुणा ) या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी असलेले ब्रह्मकुंड प्रसिद्ध आहे. हा घाट इ.स.पूर्व १ ल्या शतकामध्ये राजा विक्रमादित्याने त्याचा भाऊ भर्तारी याच्या स्मरणार्थ बांधला.
२. चंडी देवी मंदिर : हे मंदिर काश्मीरचा राजा सूचत सिंग याने १९२९ मध्ये बांधले. आदि शंकराचार्यांनी या मंदिराची ८ व्या शतकामध्ये स्थापना केली होती.
चंडीघाटापासून मंदिरपर्यंत साधारण ३ किमी चालावे लागते. रोप-वे ची सुविधा देखील उपलब्ध आहे.
३. मनसा देवी मंदिर : हे मंदिर बिल्व टेकडीवर स्थित आहे. हे मंदिर तिथे असणाऱ्या केबल कार मुळे यात्रेकरूंमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मनोकामना पूर्ण करणारी म्हणून मनसा अशी या नावाची व्युत्पत्ती आहे. या मंदिरावरून हरिद्वार शहराचा रम्य देखावा दिसतो.
४. राजाजी राष्टीय उद्यान
५. पतंजली योगपीठ

त्या सगळ्यांचा निरोप घेऊन मी गाडी ठेवलेली त्या ठिकाणी आलो. मगाशी ड्यूटीवर असलेल्या मित्राचा पण निरोप घेतला आणि बरेलीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
हे सगळं होता होता ५ वाजून गेले होते,
२५० किमी बरेली, अशक्य आहे, आता वाटेतच थांबू कुठेतरी असा मी मनातल्या मनात विचार केला.
हरिद्वार सोडताच जंगलाच अस्तित्व जाणवू लागल. गारठादेखील पडू लागला होता.
सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. मोरांचे आवाज कानी पडू लागले आणि मनातल्या मनात आता हे सगळे कधी एकदा भेटतात असे झाले. १५-२० मि, झाले तरी या पोरांचा पत्ता नाही.
रस्ता पण बऱ्यापैकी निर्मनुष्य झालेला. आता यांना मी नक्की कुठे आहे ते तरी कसं सांगणार ?
वाटेत एक मोठा पूल लागला आणि मी निश्वास सोडला.
स्नेहलला फोन लावला, मी मोठ्या पुलाच्या इथे आहे सांगितलं.
अरे ५ मि. मध्ये पोहोचशील ....स्नेहल
आणि २-३ मि. मधेच यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसल्या आणि त्याहीपेक्षा यांचे हसण्या खिदळण्याचे आवाज कानावर आले आणि आमची जीव नावाची वस्तू भांड्यात पडली. Happy
गाडी थांबवली. परत एकदा आळोखे पिळोखे दिले.
आणि देवाच्या कृपेने पुढच्या एखाद्या छोट्याशा शहरामध्ये मुक्काम करू यावर सर्वांच एकमत झालं. कारण २५० किमी अंतर हा रस्ता काय आम्हाला सहजासहजी पार करू देईल असे वाटत नव्हते. माझ्या मनात मुरादाबाद पर्यंत तरी जाऊ अस होत. कारण बरेली मुरादाबादपासून ९० किमी आहे. परत उद्या एवढा लोड घेता येणार नाही अस नाही पण तरीही रोजचं बायकिंग एवढं झालं तर मग जास्त काही बघताही येणं शक्य नव्हतं.
एव्हाना अंधार पडला होता, घड्याळात बघितलं तर सहा वाजून गेले होते,
पटापट गाड्या काढल्या आणि निघालो. दिवसभर गाडी चालवून कंटाळा आला होता मग अमरला गाडी दिली आणि मी मागे बसलो. रस्त्यावर जास्त अशी वर्दळ नव्हती.
हरिद्वार पासून राष्ट्रीय महामार्ग ७४ पकडायचा, नंतर नजीबाबाद लागते, त्यानंतर धामपुर फाट्यावर डावीकडे न वळता सरळ मार्ग पकडायचा. डावीकडे राष्ट्रीय महामार्ग ७४ जातो.
त्या रस्त्याला बघितल्यावर याला राष्ट्रीय महामार्ग का म्हणत असावेत असा एक गहन प्रश्न मला भेडसावू लागला होता.
रस्ता म्हणजे अतिशय बकवास, बर त्यात वाटेत हत्तींच्या कळपापासून सावधान इत्यादी प्रकारचे बोर्ड लावले होते.
आता आपल्या बाईक पंक्चर नाही झाल्या तर मिळवले. कोणीतरी नको ते बोललं. मला राहून राहून एखादा तरी हत्तींचा कळप रस्ता ओलांडताना दिसावा असं सारखं वाटतं होतं, अधून मधून ट्रक, टेम्पो सारखी वाहने येत-जात होती. रस्ता छोटा असल्याने गाड्या सारख्या खाली उतरायला लागायच्या. बर, अप्पर – डीप्पर मारून फायदा नव्हता, त्या वाहनचालकांना त्या गोष्टीचा अर्थच माहित नसावा. अमर आणि स्वागतचे हात अप्पर – डीप्पर देऊन घाईला आलेले. पण हि वाहन काय त्यांची रस्त्यामधील जागा सोडायला तयार व्ह्यायची नाहीत. “गरज हि शोधाची जननी आहे” या पार्श्वभूमीवर अप्पर – डीप्पर देऊन वैतागल्याने आम्ही रुप्याला त्यांची गाडी आमच्या बऱ्यापैकी पुढे ठेवायला सांगितली. स्वागत आणि अमरने गाड्यांचे वेग जुळवले आणि अप्पर चालू केले. आता पुढून येणाऱ्या वाहनांना आमच्या दोन बाईक पण चार चाकी सारख्याच भासू लागल्या आणि वाहने पण रस्ता सोडून खाली उतरू लागली. Proud
आम्ही मग ए आता आपला ट्रक, आता मारुती, आता अजून काय असे पाचकळ जोक मारत मारत गाड्यांमधील अंतर कमी जास्त करत होतो आणि येणारा ट्रक रस्त्याच्या खाली उतरला कि जोरजोरात हसत होतो. एकंदरीत अशा प्रकारामुळे नजीबाबाद आलेलं आम्हाला कळलंच नाही.
आमचा हा जुगार चांगलाच यशस्वी झाला. एवढच काय कि पुढील प्रवासात देखील या युक्तीचा आम्हाला खूप उपयोग झाला.

साधारण तासाभरातच आम्ही नजीबाबाद सोडलं. बरेली अजून जवळपास २०० किमी होतं. संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते. थंडी देखील बरीच पडली होती. मी मागे बसल्यामुळे तसा मी उबदार वातावरणामध्ये होतो.
अमर अधून मधून साऱ्या, जाम थंडी वाजतेय रे, असलं काहीतरी सांगून मला गाडी चालवायला उद्युक्त करत होता. पण आता असल्या गोष्टीचा मला सराव झाला होता. त्यामुळे अमरया, तू कितीही रडलास तरी मी काही आता बाईक चालवत नसतो. मी त्याला वारंवार सांगत होतो आणि परत १०-१५ मि. झाले कि तो मला त्याचं पालुपद ऐकवत होता.
आता थंडीमुळे सगळ्यानांच भुका लागल्या होत्या. छोट्या छोट्या वस्त्या, गावं लागल्याने कुठे चहाची टपरी देखील नजरेला पडेना. बऱ्याच वेळा गावांमध्ये वीज नसायची, आम्हाला अशा वेळी खऱ्या भारताच दर्शन होतं होत. अजून देखील आपला भारत १९ व्या शतकामधेच असल्याचं आम्हाला पुरेपूर पटलं.
थोड्याच वेळात धामपूर लागलं. आमच्या अगोदर स्नेहलने गाडी थांबवली होती. आम्ही पण गाड्या बाजूला घेतल्या. गावामध्ये वीज नव्हतीच. एक छोटसं हॉटेल होतं, आम्ही सगळ्यांना ग्लास भरून चहा सांगितला. जी काही बिस्कीट त्याच्याकडे होती त्याचा फडशा पडला आणि त्यांच्या भट्टीवर मस्तपैकी हात शेकले.
मग त्याच्याबरोबर पण आता पुढे एखाद राहण्यासारखं गाव कधी येईल, रहायची व्यवस्था होईल का ? इत्यादी प्रश्नोत्तरांचा तास झाला.
मी स्वाग्याला, बघ स्वाग्या निघताना टेंट घेतला असता तर बरं झालं असतं कि नाही, मस्तपैकी जंगलामध्ये झोपलो असतो अस म्हणताच
नालायक, तुला हि छोटी sack घ्यायचं जीवावर येतंय आणि टेंट घेतला असता म्हणे, असं म्हणत स्वागतने त्याच्या पाठीवरची ती जडशी sack माझ्याकडे दिली. मी पण आपल, दे दे म्हणे फार जड आहे, अस तोंडदेखल्या म्हणत जराशा नाखुशीने ते लोडण पाठीवर घेतलं.
त्या मालकाने सांगितल्याप्रमाणे आता मुरादाबाद मध्ये मुक्काम करायचं नक्की झालं होतं.
कारण मुरादाबाद सोडलं कि पुढे बरेलीशिवाय दुसरं शहर नव्हतं.
मुरादाबाद मध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा रेल्वे स्थानक शोधा, कारण राहण्याची सगळ्यात स्वस्त सोय रेल्वे स्थानकाशेजारी सहज होते आणि त्याचं बरोबर बाईक पार्किंगला पण तिथे जागा असते. असे सगळ्यांनीच एकमेकांना सल्ले दिले आणि बघ, बाईकवर फिरून आम्हाला किती माहित झालाय असा अविर्भाव चेहऱ्यावर आणत आम्ही मार्गस्थ झालो.
मुरादाबादमध्ये पोहचता पोहचता दहा वाजले होते. आता पुढच्या ८ तासांसाठी पाठ टेकवायला जागा शोधायची होती.
एका ठिकाणी पाच जणांसाठी एक रूम मिळाली.रूमच भाडं त्याने ५०० रु. सांगितलं होतं. आम्ही त्या लॉज मालकाला जेवून आलोच असे म्हणतं अजून १-२ ठिकाणी रूम बघू आणि कुठेतरी पेट-पूजा उरकून घेऊ आणि झोपायला जाऊ अस म्हणतं आम्ही तिथून निघालो. अजून २-३ ठिकाणी रूम बघितल्यावर त्याचं लॉजवर राहायला जाऊ असं ठरलं आणि आम्ही जेवायला हॉटेलमध्ये घुसलो.
तिथल्या पोऱ्याने, त्याने पाठ केलेलं मेनू कार्ड म्हणून दाखवलं. तिथली स्वच्छता लक्षात घेता, आम्ही छोले-भटुरे अशी ऑर्डर दिली.
इतक्यात माझं लक्ष बाहेर गेलं.
शैल्या................
अरे हे बघ हे पण इकडेच आलेत.
आमच्या मोहिमेमधील अजून ३-४ जण आम्हाला दिसले.
मग त्यांच्याबरोबर, आता कुठे थांबलाय? हरिद्वार बघितलं का?
मोहीम बरेली मध्ये आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. त्यांनी पण १ रूम घेतली होती. हे सर्वजण हरिद्वार मध्ये गंगेमध्ये स्नान वगैरे करून आले होते. तुम्ही केल का रे गंगेमध्ये स्नान ?
नाही ना रे ...मी
अरे करायचं ना, पवित्र असतं......
अरे करणार होतो, पण मग तुम्ही गंगा घाण केली ना, म्हणून आम्ही नाही केली.
........ आम्ही सगळेजण खिदळलो. Proud
आमच्या मध्ये एक बर होतं, कि आमच्यापैकी कुणालाच तीर्थक्षेत्र, देवधर्म इत्यादी गोष्टींमध्ये रस नव्हता. काशी सारख्या ठिकाणाची परिस्थिती आम्ही बघितली होती.
सगळीकडे चालणारा पैशाचा बाजार, शंकराच्या पिंडीभोवती झालेला हळद, कुंकू, तांदूळ, फुलं, दही, दुध इत्यादींचा चिखल. त्याचा येणारा उग्र वास. अशा ठिकाणी माझा पाय क्षणभर देखील टिकत नाही. कसलं पुण्य आणि कसलं काय?
बाजार...............एवढ एकच नाव आहे या गोष्टीला.
तरी देखील मी गर्दी वगैरे नसेल तर अशा ठिकाणी जातो. काय असतं आणि तिथे बघण्यासारखं तरी.
दूरवर एखाद्या नदीकिनारी अथवा जंगलाच्या आतमध्ये अनुभवता येणारी निरव शांतता येते अनुभवता ?
तेवढं सोडा, साधं सुवर्ण मंदिरामध्ये अथवा मोनास्ट्री मध्ये गेल्यावर जसं फिलिंग येत ना तेवढ आलं तरी पुरे.
मी बघितलेलं मला मकरंदगडावरच मंदिर आठवलं. अतिशय शांत वातावरण, कुठलाच गोंगाट नाही, कि कुणी नारळ आणि फुले घेऊन मागं लागत नाही. तिथे ना हळद होती ना कुंकू.
फक्त शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक होत होता.
चकचकीत मार्बल नसेलही कदाचित पण ते मस्तपैकी शेणाने सारवलेलं होतं. अशा ठिकाणी नक्कीच देव असेल तर तो रहात असेल.
असो अशा विषयावर लिहायला लेख कमी पडेल.

जमलं तर उद्या सकाळी बरोबरच निघू म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेतला. भूक असली तरी सगळ्यानीच आज जेवण आटोपत घेतलं. अर्थात त्याला तिथली कमालीची स्वच्छता हे महत्वाच कारण होतं. Wink
कारण एकदा का पोटाने त्रास द्यायला सुरवात केली कि नको तो ताजमहाल आणि नको ती वाघा सीमा असे विचार मनात येतात. मोहिमेमधील बऱ्याच जणांना (माझ्यासकट) हा अनुभव होता त्यामुळे पुढे सोने जरी वाढून ठेवलं तरी आता प्रत्येकजण भुकेपेक्षा २ काय ४ घास कमी खात असे. त्यामुळे लवकरच जेवण आटपून आम्ही गाड्या रेल्वे स्थानकामध्ये लावल्या आणि लॉजच्या दिशेने निघालो.
लॉज मालकाला, मघाशी रूम घेतली होती त्याचे पैसे कुणाकडे द्यायचे असे विचारातच
वो तो गयी .......... त्याचे उत्तर
४-५ लोग बाईक पे आये है, उन्होने ली है !
आणि मग आम्हाला त्याच्या लॉजच्या बाहेर उभ्या असलेल्या MH passing असलेलेल्या बाईक दिसल्या आणि त्यावरचे भगवे झेंडेसुद्धा. Angry
आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. ११ वाजून गेले होते. आम्ही मिळेल त्या लॉज मध्ये घुसलो. ३ रूम घेतल्या. जेमतेम १ बेड आणि थोडीशी उभी राह्यला जागा अशा रूम होत्या. पण आम्हाला काय तिथे आयुष्य काढायचं नसल्याने आम्ही आतमध्ये घुसलो.
स्वागत आणि रुपेश मात्र रूम बघून जास्त खुश नव्हते. स्वाग्याने, साऱ्या दुसरीकडे बघू, अरे चांगल्या मिळतील इत्यादी सुरु केलं. मी, अमर आणि स्नेहल मात्र आता कुठेही नको, सकाळी ५ ला तर निघायचंय, आता ६ तासासाठी ताजचा प्रेसिडेन्शिअल सूट जरी कुणी फुकट देत असेल तरी नको असे म्हणतं आतमध्ये घुसलो.
स्वागत आणि रुपेश मात्र दुसरीकडे जाऊन आम्ही बघतो असे म्हणत तिथून बाहेर पडले. सकाळी ५ ला निघायचंय रे, तेव्हा लवकर उठा आणि नुसतं उठू नका निघा पण. म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेतला.
आमच्या स्वाग्याच हे असं असत, माग एकदा या साहेबांना मी “नाणेघाट-जीवधन-शिवनेरी-लेण्याद्री-भीमाशंकर” अशा ट्रेक ला घेऊन गेलो होतो. आता या ट्रेक मध्ये नाणेघाटाच्या गुहेमध्ये झोपण्यासारखं दुसर कुठलं सुख आहे का या जगात, पण नाही नालायाकाने मला ती रात्र जुन्नरमधल्या कुठल्यातरी हॉटेलच्या रूम मध्ये काढायला लावली. बर कुणाला सांगायचं म्हटलं तरी पंचाईत. समस्त गिर्यारोहण समुदायाने वाळीत टाकलं असतं मला.
मग स्नेहलनी एका रूम मध्ये, अमर आणि मी एका रूम मध्ये अशी ताणून दिली.
स्नेहलची तब्बेत जरा ढासळली होती, थोडासा ताप होता म्हणून त्याला नीट झोपता याव म्हणून दुसरया रूम मध्ये पाठवलं.
आईला फोन केला. आईला मी मोहिमेबरोबर नाहीये हे कळताच, मी कसा जास्त शहाणपणा करतो ? कसं कुणाचं ऐकत नाही ? मोहीम सोडायची काय गरज होती का ? वगैरे लेक्चर सुरु केलं.
मी अगदी शांत डोक्याने बरं, बरं............ काळजी करू नको, आम्ही १०-१५ जण आहोत अशा थापा देत फोन ठेवला.
झोपताना मग अमर आणि माझ्या गप्पा सुरु झाल्या.
अमरया, स्नेहलला तिकडे का पाठवलं माहितेय का ?
का ?
आता समजा मला कुणाचा फोन आला आणि मी सांगितलं अरे आता नाही बोलता येणार स्नेहल झोपलाय, तर माझ्यावर कुणीतरी विश्वास ठेवेल का ? कि मी स्नेहल नावाच्या मुलाबरोबर आहे म्हणून . Blush
असे काहीतरी फालतू विनोद मारत, कॉलेज-शाळा, पहिलं प्रेम वगैरे गप्पा मारता मारता आम्हाला झोप कधी लागली कळलंच नाही.

आजचा प्रवास : ३८४.५ किमी

१८ जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
मुरादाबाद – रामपूर – बरेली –शाह्जहापूर- सीतापूर - लखनऊ

सकाळी ५ च्या गजराने झोप मोडली.
Snooze नावाचं बटण ज्याने बनवलं त्या अवलियाला धन्यवाद देत मी परत झोपलो. थोड्या वेळाने दोघांचेही मोबाईल आळीपाळीने हनुमान चालीसा आणि जॉन सीना ऐकवू लागल्याने आम्ही शेवटी उठलो.
स्नेहल पण उठला होता. पहिला स्वाग्याला फोन लावला, उठलोय, लगेच निघतोय असं खोट का होईना स्वाग्यानी उत्तर देऊन फोन ठेवला.
स्नेहलची तब्बेत बरी होती. ताप देखील जास्त नव्हता.
डब्बा टाकून आलो. अमरच पण आवरलं होतं.
म्हणा आवरायचं म्हणजे काय?
त्या थंड पाण्यात हात घालण मला जीवावर आल होतं. त्यामुळे तोंड धुणे, ब्रश करणे वगैरे निरर्थक गोष्टी दुपारी करायच्या ठरल्या.

अमरया,, आमचे फादर काय म्हणतात माहितेय काय ?....मी
काय ?
सकाळी उठून ब्रश नाही केला तरी चालेल, पण रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करावा.
हो का ............
म्हणून मग मी रोज सकाळी आमच्या फादरच हे वचन आठवतो आणि आजपासून रात्री ब्रश करून झोपत जाऊ अशी प्रतिज्ञा करतं दिवसाला सुरवात करतो.
मग आजपासून मी पण असचं करतो. ...अमर

आम्ही training मध्ये असताना रविवारी काय करायचो माहितेय का अमरया,?
काय ?
सकाळी ८ वाजता, नाश्त्याची वेळ संपायची, बरोबर ०७५५ ला उठायचो, थेट नाश्ता.
पूर्ण ताट भरून शिरा आणि पोहे घ्यायचे, १ ग्लास भरून चहा, १ ग्लास भरून कॉफी. कारण ८ ला बरोबर counter बंद व्हायचं.
आणि मग निवांत चरत बसायचं आणि मग परत होस्टेल वर आलं कि ब्रश. Wink
असे संवांद करत आम्ही आमची हत्यार चढवली आणि बरेलीच्या दिशेने प्रस्थान केलं.
पूर्ण रस्ता धुक्यामध्ये हरवला होता. आजपण बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. जवळपास ३५० किमी अंतर तोडायचं होतं.
निखीलला फोन केला तर मोहिमेने सकाळी ६ वाजताच बरेली सोडल होत. मोहीम भलत्याच वेगात निघाली होती. कालपण दिवसभर आम्ही फक्त आणि फक्त biking biking आणि फक्त biking च करत होतो.
आम्हाला कोणालाच याच वाईट वाटलं नव्हतं कि काही बघायला मिळत नाहीये अथवा नुसतंच बायकिंग होतंय.
कारण आम्ही बायकिंग करायला तर बाहेर पडलो होतो. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा आम्ही इतरही बरचं काही अनुभवत होतो.
जंगल, थंडी, गारठल्या नंतरचा गरमागरम चहा या कितीतरी गोष्टी आम्हाला मनापासून आवडत होत्या. आम्ही लोकजीवन जवळून अनुभवत होतो. आम्हाला आमचं व्यवस्थापकीय कौशल्य किती तोकड आहे याची जाणीव झाली होती. प्रवास आम्हाला खूप काही शिकवत होता. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला, आहे त्यातून मार्ग काढायला आणि बरंच काही.
स्वागत, रुपेश चा अजून पत्ता नव्हता. आम्ही अंतर आज काहीही झाल तरी लखनौ गाठायचचं या हेतूने बाईक पळवत होतो. पण धुक्यामुळे बाईक काही वेग घेईनात.
थंडी मुळे आम्ही आज जास्तच गारठलो होतो. दर २५-३० मि. नि आम्ही गाड्या थांबून जमेल तिथे, जमेल तितका चहा ढोसून पुढे निघत होतो.
साला, हे उत्तर प्रदेश मधील रेल्वे फाटकं भलताचं वेळ खात होती. चक्क ३-३ रेल्वे गेल्यानंतर हि फाटक उघडायची. त्यामुळे ट्राफिक पण खूप खोळंबलेली असायची. आम्हाला आपण बाईक वर आहोत याच खूप बर वाटायचं. ३-३ किमी पर्यंत काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. बाईकमुळे आम्ही पटापट पुढे निघून जायचो. त्यातच रस्त्यांची पण कामे चालू होती. त्यामुळे अजूनच खोळंबा.
स्वागतला परत एकदा फोन करून झाला आणि अरे तुम्ही चला रे पुढे, आम्ही आहोत तुमच्या मागे, असं उत्तर परत एकदा ऐकवून झालं.
स्वागताच्या गाडी चालवण्यावर जरी माझा विश्वास असला तरी इथल्या रस्त्यांवर मुळीच नव्हता. स्वागत आम्हाला गाठेल याबद्दल मला काहीच शंका नव्हती आणि अशी वाहतूक पाहता तर तो नक्कीच आम्हाला गाठणार होता.
अशाच एक रेल्वे फाटकाजवळ आम्ही फाटक उघडण्याची वाट बघत होतो. बाईकला देखील पुढे सरकायला थोडीशी देखील जागा नव्हती. इतक्यात कोणीतरी जोरजोरात हॉर्न वाजवत ज्या रस्त्यावर जाण्यास बंदी होती ( काम चालू असल्यामुळे ) त्यावरून सुसाट वेगाने पुढे निघून गेले.
स्वाग्याच असणार रे तो, हे असले किडे तोच करणार. काय गरज आहे का आता ज्या रस्त्याच काम चालू आहे त्या रस्त्यावर गाडी घालायची. बर घालायची ते घालायची वरून ८०-९० ने हाणायची. पण असले उद्याग तोच करणार.
माझ्या या बोलण्यावर अमरची शून्य प्रतिक्रिया.
बहुतेक त्याने कानटोपी, मफलर, हेल्मेट अस इतक काही चढवलं होतं कि त्याला काही ऐकू जाण शक्यच नव्हतं.
मग त्याला मी नुसत्या हाताने गाडी पुढे घे म्हणून सुचवलं. कशीबशी मागेपुढे करत आम्ही पण गाडी पलीकडच्या रस्त्यावर घातली आणि पुढे फाटकाजवळ स्वागतला जाऊन मिळालो. स्नेहलपण पलीकडच्या बाजूने फाटकाजवळ पोहचला होता.
जस फाटक उघडलं तस आम्ही परत एकत्र आलो आणि पुढच्या चहाच्या टपरीवर मोर्चा वळवला. आज थंडीने कहरच केला होता. कमीत कमी २ चहाचे कप पोटात गेल्याशिवाय ऊब यायची नाही. नाश्ता कुणाचाच झाला नव्हता. मग तिथेच गरमागरम पराठे आणि लोणचं असा मस्तपैकी मन आणि पोट तृप्त करणारा नाश्ता झाला.
काय आहे का रे वाटेत बघण्यासारख? ...................स्वागत
नाही रे, विचारलं मी १-२ ठिकाणी .................... मी
आपल्या बरोबर जर का आपल्या बायका असत्या तर आपण बरेली मधून “झुमके” न घेता पुढे जाऊ शकलो असतो काय रे ? ........... रुपेश
तेच ना, बर आहे बे एकटच असलेलं. ................ अमर
आता बायको हा विषय आल्यावर स्नेहलला त्याच्या एकुलत्या एक प्रेयसीची नको एवढी आठवण झाली.
आणि जाता जाता जमलं तर तिच्यासाठी एखादं कानातलं घेऊ अस त्याच्यामधल्या एकनिष्ठ नवऱ्याने सुचवलं.
अबे, त्या गाण्यामध्ये तीच कानातलं बरेलीच्या बाजारामध्ये पडलं असं ती सांगतेय, ती असं सांगतेय का इथल्या बाजारात “झुमके” भारी मिळतात. ............... अमर उवाच
पण स्नेहलमधला नवरा त्याला स्वस्थ बसू देईना.
शेवटी सर्वानुमते स्नेहलने कानातलं घ्यावं, पण ते बरेलीमधूनच घ्याची गरज नाही. वाटेत जिथे भेटेल तिथून घ्यावं आणि ते बरेली मधूनच घेतलं आहे अस छाती ठोकून सांगाव यावर एकमत झालं.
शेवटी वस्तू नाही भावना महत्वाच्या, हे देखील आम्ही त्याला पटवून देण्यात यशस्वी झालो.
आणि आम्ही बरेलीकडे प्रस्थान केलं. Biggrin
बरेली मध्ये साधारण ११ च्या सुमारास पोहचलो. पाहण्यासारखं विशेष काही नसल्याने परत एकदा चहा पार्टी झाली.
साल्यांनो, सकाळपासून आपण फक्त १०० किमी आलोय ते पण ४ तासामध्ये.
स्नेहलने मुद्द्याला हात घातला. अजून लखनौ २५० किमी आहे. असंच गेलो तर आजपण मोहीम नाही सापडायची रे.
यावेळेस सगळेजण एखाद्या शहाण्यामुलासारखे वागले आणि आता फक्त जेवणाला मध्ये कुठेतरी थांबूया म्हणत आम्ही लखनौच्या दिशेने मार्गस्थ झालो.
चक्क ठरल्याप्रमाणे १ वाजता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो.
अमरया, बाईक चालवशील ना अजून २-३ तास ? .............. मी
नाही, तो नाही चालवणार....................स्वागत
तुला विचारलाय का ? मी त्याच्याशी बोलतोय
अमरया, तू नाही म्हण रे, हा बैल तू हो म्हणालास कि अजून २ रोट्या हाणणार आणि मग गाडीवर तुला धरून मागे झोपा काढणार. स्वाग्याने माझ्या मनातला उद्देश सगळ्यांसमोर प्रकट केला.
खा रे साऱ्या तू बिनधास्त, चालवतो मी............ असं म्हणत अमरनी पण अजून २ रोट्या मागवल्या.
अमरकडून परवानगी मिळताच मग मी अजून २ रोट्या, जिराराइस, स्वागतला वाकड दाखवत हाणला.
जेवण मात्र मस्तंच होतं.
पण अमरयाच्या मनात काही वेगळंच होतं. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि आता थेट लखनौ. वाटल्यास वाटेत कुठंतरी संध्याकाळी चहा प्यायला थांबू म्हणतं आम्ही निघालो.
थोडं अंतर जाताच अमरनी गाडीचा वेग कमी केला. बाकीच्या दोन्ही गाड्या पुढं निघून गेल्या होत्या. मला पुढंच चित्र स्पष्ट दिसायला लागलं होतं.
आत्ताच तर हॉटेल सोडलं न रे, जायचं होतं तर तिकडेच जाऊन यायचं न अमरया. काय वैताग आहे. इति मी
साऱ्या, झाडं बघ कुठं दिसतायत का रे ?
थोड्याच अंतरावर शेताच्या बांधावर ३-४ डेरेदार झाडं होती, त्या शेजारी आमची गाडी थांबली.
मी गपचूपपणे पाण्याची बाटली अमर समोर धरली. जावा राजे ..............
त्याला नाही थांबलो बे ..............
मग ....................
झोपू ना मस्तपैकी तासभर. निवांत जाऊ रे, आज तुला लखनौमध्ये पोहाचवल्याशी कारण.
मला काय, गाडीवर अथवा झाडाखाली झोप मिळाल्याशी कारण
मग निवांतपैकी दोघांनी पण झाडाखाली ताणून दिली.
तासाभरानंतर उठलो. मस्तपैकी झोप झाली होती. ३ वाजले होते. दुपारची तासभर जरी अशी झोप मिळाली म्हणजे काय बरं वाटतं सांगू.
मस्तपैकी फ्रेश झालो. सकाळचा राहिलेला ब्रश केला. मग पुढच्या एका हॉटेलवर कडक चहा झाला.
आणि आमची बाईक आता सुसाट लखनौच्या दिशेने सुटली.
वाटेत एका ठिकाणी दोन ट्रकांचा अपघात झाला होता. उसाची मळी घेऊन जाणारा ट्रक उलटला होता. त्या मळीचा वास किलोमीटर भराच्या परिसरामध्ये येत होता. नेमकी त्या मळीवरून जाणारी एक टमटम आम्ही तिथे पोहोचण्याच्या अगोदर साधारण ५ मि. अगोदर उलटली होती. सुदैवाने टमटममधील सर्व प्रवासी सुखरूप होते. टमटमला सरळ करण्याचे प्रयत्न चालू होते. आम्ही पण मग खाली उतरून त्यामध्ये आमचं खारीच योगदान दिलं आणि टमटम सरळ होताच परत लखनौचा रस्ता धरला.

टांगा पलटी, घोडे ( ट्रक चालक) फरार :
13DSCN3732.JPG13DSCN3730.JPG

आणि टमटम उभी राहिली :
13DSCN3729.JPG

साधारण तासा-दिडतासामध्ये स्वागत-स्नेहलच्यापण बाईक दिसल्या.
साले हे अजून इतके मागे कसे काय ? मी अमरला विचारले.
काय माहिती बे ...... अमर
आम्ही पण नेहमीच्या पद्धतीने त्यांना जाऊन मिळालो आणि परत एकदा आमच्या गाड्या चहा प्यायला रस्त्याकडेला थांबल्या.
झोपला होता ना तुम्ही? ..स्वागत
आम्ही थोडं लाजत............. होय रे, पण तुम्ही इतक्या मागं कसं काय ?
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एकटेच छावे आहात काय ?
आम्ही पण झोपलो होतो. ..................रुपेश.
चहा-बिस्कीट पार्टी झाली. मी आता स्वागतच्या मागे बसलो. साडेपाच वाजले होते.
स्नेहलपण कंटाळला होता. रुपेशनी त्याची गाडी घेतली. लखनौ अजून १०० किमी होतं.
रच्याकने हरिद्वार – लखनौ हि दोन शहरं राष्ट्रीय महामार्ग २४ ने जोडली गेलेली आहेत. अतिशय सुंदर रस्ता आहे. विशेषतः शेवटचे १०० किमी तर एकदम भारी.
पण आता रस्ता चांगला होता. गाड्या सहजं ९०-१०० चा वेग पकडत होत्या. निखिलला फोन केला, मोहीम लखनौ च्या अलीकडे ५० किमी वर होती. आम्ही परत एकदा सुसाट निघालो. आता लक्ष्य मोहिमेला जाऊन मिळायचं होते.
अंधार पडू लागला होता, पण लखनौच्या महामार्गाच्या दुभाजकामध्ये असलेल्या झाडांमुळे पुढच्या गाड्यांचे प्रकाशझोत अजिबात डोळ्यावर येतं नव्हते. सगळीकडे असे रस्ते झाले तर काय मजा येईल असा विचार आमच्या सगळ्यांच्याच मनातं येऊन गेला.
लखनौ २० किमी राहिलं असताना डाव्या बाजूचे इंडिकेटर चालू असलेल्या गाड्या लांबूनच दिसू लागल्या होत्या. मोहीम आता दृष्टीपथात होती.
वाटेत १-२ जण भेटले. मोहीम हिंडोल नाका, गुरुद्वारा मध्ये पोहचली होती. पण अजून कितीतरी जण मागे होते. ट्रक ला रात्री ९ नंतर शहरामध्ये प्रवेश असल्याने ट्रक देखील बाहेरचं थांबला होता.
आता आम्ही हिंडोल नाका, गुरुद्वाराच्या शोधात निघालो. बऱ्याचं ठिकाणी गाड्यांच पासिंग बघितलं कि लोकांनी पत्ते सांगितले नाहीतं. आम्हाला हा अनुभव नवीन होता. स्वागतची पण तब्बेत थोडी डाऊन झाली होती. मला पण घशाला त्रास व्हायला सुरवात झाली होती. एका मेडिकल मधून गोळ्या घेतल्या, मेडिकलवाल्याला पत्ता विचारला, पण पता नही......... अस तोडकं उत्तर आलं.
इतक्यात एक साठीचे गृहस्थ तिथे आले.
Guys, you do one thing, go straight and then take left turn then after about 5 mins you will reach to one traffic signal. From that circle take right turn and that road only will take you to the gurudwara.
Thanks a lot uncle, thank you very much. God bless you. म्हणत आम्ही त्या सद्गृहस्थाचा निरोप घेतला.
त्याने सांगितल्याप्रमाणे बरोबर १५-२० मि. मध्ये आम्ही गुरुद्वारामध्ये पोहचलो.
पार्किंग मधेच जयदादा भेटला. आम्हाला बघताच “ चोरांनो, कुठे फिरताय रे? काय काय बघून आला ?”
आम्ही आपलं “अरे कसलं काय दादा, काहीच नाही बघितलं २ दिवस, नुसत्या गाड्या चालवतोय” वगैरे सांगून बघितलं.
तुमच्याशिवाय या मोहिमेमध्ये अजून कोणी इतकं फिरलं नाहीये असं म्हणत म्हणत दादा आम्हाला आतमध्ये घेऊन आला.
पहिल्यांदा कॅमेरा चार्जिंगला लावला. जेवणं सुरु झालीच होती. थोडफार जेवून घेतलं. आज बऱ्यापैकी मागं राहिलेले सगळेजण परत मोहिमेला येऊन मिळाले होते. सगळ्यांना परत एकदा भेटून बरं वाटलं. परत रात्री गप्पा रंगल्या.
आईला फोन करून मोहिमेमध्ये सुखरूप पोहोचल्याच सांगितलं.
काळे काकांना बघताच, अमर आणि मी एकमेकांकडे बघत दबक्या आवाजात “श्वास घ्या, श्वास सोडा.......... म्हणत टाळ्या दिल्या. Lol
उद्या रामाच्या गावाला आणि काशीला जायचं होतं.
रात्रीच्या सभेमध्ये परत आलेल्यांच स्वागत करण्यात आलं. परत थोडी चेष्टा मस्करी झाली.
गुरुजींनी जे सकाळी लवकर उठणार आहेत त्यांनीच आतमध्ये झोपा, जे उठणार नाहीत त्यांनी बाहेरच्या बाजूला झोपा असं सांगूनही, आम्ही बाहेर पडणारी थंडी लक्षात घेता आतमध्येच झोपायला पसंती दिली.
आणि निश्चिंतपणे पथारी पसरली.

आजचा प्रवास : ३६३.१ किमी

उद्याचा प्रवास : लखनौ – अयोध्या – सुलतानपूर – काशी

(भाग प्रचंड उशिरा टाकत आहे, जे काही जोडे, नासकी अंडी, टोमेटो द्याल ते नम्र पण स्वीकारेण. माफी असावी. )

क्रमशः

१९ जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
लखनौ – अयोध्या – सुलतानपूर – काशी

आणि परत एकदा गुरुजींच्या आरडाओरड्याने आमची साखरझोप मोडली.
एकदा सांगून कळत नाही का ? सांगितलं होतं न जे लवकर उठणार नाहीत त्यांनी आपापल्या पथाऱ्या बाहेर पसरा. गुरुजींचा नेहमीप्रमाणे सकाळचा आरडओरडा सुरु झाला. आम्हीपण नेहमीच्या सवयीने जोपर्यंत आपल्याला ते काही बोलत नाहीत तोपर्यंत तिकडे लक्ष द्यायचं नाही, या न्यायाने झोपून राहिलो.
उठ रे साऱ्या, मोहीम निघालीये. आज चक्क स्वागत लवकर उठला होता.
हो रे, जाऊ कि...........
सकाळी ५ वाजताच मोहीम मार्गस्थ झाली आणि आम्ही परत एकदा निद्रिस्त झालो.
६ वाजता जाग आली, मग शांतपणे ब्रश व इतर सोपस्कार आटोपले. इतक्यात जयदादा आला,
आवरलं का रे ?....... मी
हो रे, पण अरे मी पुण्याला निघालोय, गाडी रेल्वेत टाकतोय.
का रे ?
अरे, थोडं काम आला आहे. तेवढं पेट्रोल घेशील का ?
अरे, हे काय विचारनं झालं का दादा?, फुकट ते पौष्टिक. मी हसत हसत म्हणालो.
मग आम्ही दोघं रिकाम्या बाटल्या घेऊन खाली गेलो. गाडीमध्ये अगदी गरजेपुरतच पेट्रोल ठेवलं. पेट्रोल माझ्या गाडीत टाकलं, दादाला न विसरता पैसे दिले. Wink
सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी वरती येत असतानाच स्नेहल भेटला.
त्याचं फोनवर हा शोना, हा जानू असलं काहीतरी चाललं होतं.
वरती जात असतानाच तो खुणेने काहीतरी सांगू लागला.
पहिला तो फोन ठेवं, ही सांकेतिक भाषा मला नाही कळतं. मी वैतागून म्हणालो.
चक्क, साहेब फोन ठेवून वरती आले.
जयदादाने सगळ्यांचा निरोप घेतला व तो निघाला.
तो जाताच, स्नेहल आम्हाला म्हणाला.
अरे मी “तिला” भेटायला जातोय.
कुठे ?....................... हे अर्थातच त्याने आमच्या चेहऱ्यावरून ताडलं.
अरे, तिला सुट्टी आहे. आपणं नागपूरला भेटू.
मी घडाळ्यात बघितलं. आज १९, आपण नागपूरला पोहचणार २२ ला .
ठीक आहे.
इतक्यात स्वागतच्या लक्षात जयदादा पण जाणार असल्याचं आलं. मग आम्ही स्नेहलला त्याच्या ताब्यात दिलं. पोहचलं कि फोन करा इत्यादी हवे नको सल्ले दिले आणि आमच्या गाड्या पेट्रोल पंपाच्या दिशेने वळवल्या. गाड्यांच्या टाक्या फुल केल्या. आज रामजन्मभूमी. बरेचं वर्ष चर्चेत असलेलं नाव. अनेकवर्षापासून जिथं जायची मनातं इच्छा होती ती आज पूर्ण होणार होती.
अयोध्या म्हटलं कि डोळ्यासमोर बाबरी मशिद, हिंदू मुस्लिम दंगल, कारसेवक वगैरे अनेक बाबी येऊ लागल्या. आणि आज प्रत्यक्ष तिकडं जायचं. मी कुणास ठाऊक का आज जरा एक्साईट होतो.
अयोध्येविषयी लहानपणासून खूप काही ऐकल होतं. आज सकाळपासून गाडी माझ्याकडेच होती.

मोहीम बरीच पुढे गेली असल्याने आम्ही पण आमचा नाश्ता लगेचचं आटपला.
एकतर मोहिमेबरोबर राहिलं तर जास्त शोधाशोध करावी लागत नाही हा आजवरचा अनुभव होता.
आजपण तसा लांबचा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे आम्ही पण जास्त वेळ न दवडता लगेच निघालो. रस्त्यावर रहदारी देखील जास्त नव्हती. आम्ही साधारण शहराच्या बाहेर आलो होतो.
बाईकने पण आता बऱ्यापैकी वेग घेतला होता.
आणि अचानक साऱ्या..........................................
बाईकचा एकदम ब्रेक मारत, बाईक कशीतरी नियंत्रणाखाली ठेवतं मी बाईक थांबवली.
झालं अस होतं रस्त्याच्या कडेने एक सायकलवाला निवांतपणे निघाला होता. रस्ता सरळसोट असल्याने आणि रस्त्यावर रहदारी नसल्याने बाईक पण साधारण ६०-७० च्या वेगाने होती. या जगातं बऱ्याच घटना का होतात याला काही उत्तर नसतं, त्याचं प्रकारे त्या निवांत निघालेल्या सायकलवाल्याने त्याची सायकल एकदम काटकोनात का वळवली याला उत्तर नव्हतं. बर रस्त्याच्या त्या बाजूला काही वस्ती, घरं वगैरे काहीच नव्हतं. आम्ही अगदी धडपडता धडपडता वाचलो. स्वागतने उतरून त्याला शिव्या घालायला सुरवात पण केली होती.
जाऊ दे रे, आता झाल्यावर काय बोलणारं, म्हणून विषय सोडून दिला. एकवेळ आम्ही धडपडलो असतो तरी चाललं असतं, पण ते एखाद्याला जाऊन धडकन नको आणि त्यानंतरच रामायण नको. त्याची एक छोटीशी झलक आम्ही दिल्लीमध्ये अनुभवली होती.
यावेळेस चक्क स्वागत मला एका शब्दाने देखील बोलला नाही. अर्थात चूक माझी नव्हतीच.
पण या घटनेनंतर मात्र आमच्या हृदयाचे ठोके चांगलेच वाढले होते. सकाळ सकाळी नसता उपद्व्याप.
परत एकदा गाडी सुरु केली आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
लखनौवरून राष्ट्रीय महामार्ग २८ पकडायचा, हा थेट फैजाबादला जातो, ह्याला फैजाबाद रोड म्हणून पण ओळखले जाते. फैजाबाद वरून साधारण ०७ किमी वर अयोध्या वसलं आहे.
लखनौ ते अयोध्या अंतर साधारणतः १३५ किमी आहे.

अयोध्या :

खरंतर आपण सगळ्यांनी अयोध्येविषयी लहानपणापासून इतकं ऐकलंय, वाचलंय कि या गावाबद्दल काही सांगूच नये कि काय असं क्षणभर वाटलं, पण त्याचं काय आहे आपण जे काही ऐकलं, वाचलं ते अगदी रामाच्या काळातलं. पण आपण आता २१ व्या शतकामध्ये राहतो, त्यामुळे आता सर्व काही बदललंय. कुरुक्षेत्र म्हणा, पानिपत म्हणा वा अयोध्या म्हणा, हि आता तुमच्या आमच्या गावांसारखीच गावं आहेत. तिथे देखील आता तुमच्या-आमच्या सारखेच लोक राहतात. त्यामुळे प्रभू रामचंद्राच गावं वगैरे खुळचट कल्पना डोक्यात ठेऊन जालं, तर फक्त आणि फक्त भ्रमनिरासच वाट्याला येईल. तर ............

हिंदू धर्मानुसार शरयू(घाग्रा) नदीच्या काठावर वसलेलं, रामाचं हे जन्मस्थळ.कोसला साम्राज्याची हि राजधानी. राम हा विष्णूचा सातवा अवतार समजला जातो.
अथर्व वेदामध्ये, अयोध्येच वर्णन “ईश्वराची नगरी” असे केलं आहे. हिंदू धर्मियाप्रमाणेच हे जैन आणि बौद्ध धर्मियांचे देखील तीर्थस्थळ आहे. शाकेत, साकेत, कोशल, नंदिनी, अयोज्झा, विनीता, कोशल (सुकोशल), रामपुरी, इक्ष्वाकुभूमि, सोगेद, विशाखा, पुण्यालक्षणा ( महाभारतामध्ये ) अशा वेगवेगळया नावांनी हे शहर, वेगवेगळ्या कालखंडामध्ये ओळखले जात असे. सूर्यवंशीय/ ईश्वाकुवंशीय अनेक राजे या भूमीमध्ये होऊन गेले. मनुने सुमारे ९००० वर्षापूर्वी या शहराची स्थापना केली असे मानले जाते, तर काहीच्या म्हणण्यानुसार अयुध राजाने या शहराची स्थापना केली.

अयोध्येवर राज्य करणारा ईश्वाकु हा पहिला राजा होय.

ईश्वाकुवंशीय राजे :
१. ईश्वाकु
२. वैवस्वत मनु
६. प्रीथु
७. मांधातु
३१. हरिश्चंद्र
३२. सूर्य वमसा
३३. सगर – याने अश्वमेध यज्ञ केला.
३४. भगीरथ – याने याच्या पित्याने केलेल्या अश्वमेध यज्ञावेळी गंगेला पृथ्वीतलावर आणले.
३५ दिलीप
३६. खट्वांग
३७. रघु – याच्या नावानुसार राघुवंशाला सुरवात झाली.
३८. दशरथ
३९. रामचंद्र
४०. लव-कुश

सूर्यवंशीय राजा ऋषभ याने या शहराचे पुनर्वसन केले.
शरयू नदीमुळे अयोध्येचे उत्तर-दक्षिण असे भाग पडतात. रामाने हे दोन भाग लव व कुश यांना वाटून दिले. लवाने उत्तर कोसलची राजधानी श्रावस्ती तेथे नेली, तर कुशाने दक्षिण कोसलची राजधानी कुशावती येथे हलविली.
प्रभू रामचंद्रानंतर लव-कुश यांनी आपापल्या राजधान्या अनुक्रमे श्रावस्ती व कुशावती येथे हलवल्याने अयोध्येचा नंतर म्हणावा तसा विस्तार झाला नाही. बौद्ध साहित्यामध्ये अयोज्झा या गावी गौतम बुद्ध २ वेळा गेला असल्याचा उल्लेख आढळतो. बौद्ध काळामध्ये अयोध्येजवळ असलेले साकेत गाव समृद्धावस्थेत होते.सातव्या शतकामध्ये ( इ.स.६३६) आलेल्या चिनी प्रवासी ह्यूएनत्संगाच्या प्रवासवर्णनामध्ये अयोध्येचा आणि येथील स्तूप, मठ, मंदिरे अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आढळतो. त्याच्या माहितीनुसार येथे २० बौद्ध मंदिरे होती आणि ३००० भिक्षु या ठिकाणी वास्तव्यास होते.

जैनांच्या ऋषभदेव, अजितनाथ, अभिनंदन, सुमतिनाथ व अनंतनाथ या तीर्थंकरांचा जन्म अयोध्या येथे झाला.

तीर्थंकर :
१. ऋषभदेव म्हणजेच आदिनाथ
२. अजितनाथ
४ अभिनंदननाथ
५ सुमतिनाथ
१४ अनंतनाथ

जैनधर्मीय राजे भरत, मधवा, सनतकुमार आणि सुभौम यांची अयोध्या हिच राजधानी होती. हेमचंद्रसुरी यांच्यानुसार पुरुषांना ७२ आणि स्त्रियांना ६४ कला शिकवण्याचे जैन विद्यापीठ इ.स.पू. ६०० मध्ये अयोध्येत अस्तित्वात होते. बाबर काळामध्ये येथील राम मंदिर पाडून येथे बाबरी मशीद उभारण्यात आली होती.

हिंदुधर्मीय प्रेक्षणीय स्थळे :
हनुमानगढी,
कनकभवन,
रामजन्मस्थान,
नागेश्वर नाथ मंदिर – हे मंदिर कुश, रामाचा मुलगा याने बांधल्याचे सांगतात. असे सांगतात कि जेव्हा कुश शरयू नदीमध्ये स्नान करत होता, तेव्हा त्याचा बाजुबंद हरवला. तो कोण्या नागकन्येला मिळाला, तिचे कुशवर प्रेम बसले. ती शिवभक्त असल्याने कुशने तिच्यासाठी हे मंदिर बांधले.

बौध्दधर्मीय प्रेक्षणीय स्थळे :
मणिपर्वत,
सुग्रीवपर्वत,
कुबेरपर्वत,
दतूनकुंड

जैनधर्मीय प्रेक्षणीय स्थळे :
तीर्थंकरांची मंदिरे: जैन धर्मीय मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. अयोध्येला ५ जैन तीर्थंकरांची जन्मभूमी म्हटले जाते. ज्या ठिकाणी तीर्थंकरांचा जन्म झाला त्याचं ठिकाणी मंदिरे आहेत.

अयोध्या गाठायला आम्हाला ११ वाजले. अयोध्येमध्ये घुसल्यावर राम मंदिर शोधायला काही जास्त वेळं लागला नाही. आता गाडी कुठं लावायची ही समस्या भेडसावत असतानाच पोलीस स्टेशन दिसलं आणि आमचा गाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मिटला. Happy

गाड्या बहुतेकदा बऱ्यापैकी बाहेर लावाव्या लागतात. आतमध्ये चालत जावं लागतं. जर तुमच्या कडे चार चाकी वाहन असेल तर मोबाईल, शूज इत्यादी गोष्टी गाडीमध्येच काढून ठेवा, वेळ वाचतो. जमलचं तर पाकीट, पर्स इत्यादी वस्तू देखील जवळं बाळगू नका. अयोध्येमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. काहीतरी खाण्याच्या वस्तू मिळतील या आशेने ही माकडं पर्स पळवतात आणि पर्स पाठोपाठ तुम्हालादेखील पळवतात. आता ही माकडं पाकीट का पळवत असावीत याचा मला अजून अंदाज आलेला नाही, कदाचित पैसे देऊन दुकानातून विकत आणून देखील खात असावीत. खोटं नाही सांगत, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय पाकीट पळवताना. बरं, अयोध्येमध्ये सगळीकडे कडेकोट बंदोबस्त असतो. सगळीकडे जाळ्या लावल्या आहेत. त्यामुळे जाळीमधून हात घालून एकदा का एखाद्या माकडाने तुमचं काही सामानं पळवलं कि खुद्द हनुमान काय प्रभू रामचंद्र आले तरी ते परत मिळणार नाही. तेव्हा माकडांपासून अतीव सावधान! (स्वानुभावरून)

माझ्या त्या अंगावर चढवलेल्या साधनांकडे पोलिसांचं लक्ष गेलं आणि मग मला रितसर बाजूला घेऊन काय ? कुठला ? कुणीकडे? इत्यादी चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्याचा मला पूर्वानुभव जरी नसला तरी मी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखी उत्तरे दिली आणि माझा पुढचा मार्ग मोकळा झाला. आतमध्ये फोटो काढण्यास देखील सक्त मनाई आहे.

शेवटी एकदाचं सगळं साहित्य तिथे असलेल्या counter वर जमा करून, कुपन घेऊन आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो. रांगेमध्ये उभ्या असलेल्या निम्म्यापेक्षा भाविकांची (???) त्यांच्याकडे असलेल्या पर्स, फुले नारळ इत्यादी माकडांच्या तावडीतून वाचवण्याची कसरत चालू होती. उरलेले भाविक (??) बोलो राम लला कि ,,,,,,,,,,, बोलो श्री प्रभू रामचंद्र कि ..... जय इत्यादी आरोळ्या देण्यात गुंतले होते आणि माझ्यासारखा एखादा अयोध्या,राम मंदिर, बाबरी मशिद हा प्रकार म्हणजे आहे तरी काय या उत्सुकतेपोटी रांगेत उभा होता आणि माकड दाखवत असलेल्या त्याच्या करामतींचा मनमुरादपणे आनंद घेतं होता.

रांगेमध्ये उभे असतानाचं सिंधुताई सपकाळयांचे शब्द माझ्या कानात घुमतं होते. का करावा आम्ही रामाला नमस्कार ? का जपावं रामनाम ? ज्याने स्वतःच्या पत्नीला अग्निपरीक्षेतून जायला लावलं, त्याच्यावर का ठेवावा विश्वास ?
रांग हळूहळू पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आम्ही रामाच्या मूर्तीसमोर आलो. मंदिर इत्यादी नाहीच ये. फक्त तंबू ठोकून रामाला आडोसा निर्माण केला आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र एकदम प्रसन्न करणारे होते. मी देखील नकळत हात जोडले.
पोलीस सगळ्यांना पटापट पुढे ढकलत होते. आम्ही बाहेर आलो. counter वर जमा केलेलं साहित्य परत घेतलं आणि बाहेर आलो. Arm guard इत्यादी चढवायला बऱ्यापैकी वेळ लागत असल्याने बाकीचे पुढे गेले, मी सगळी आयुधं परत एकदा अंगावर चढवली आणि बाहेर आलो. आता बाहेर फोटो काढायला बंदी नव्हती. मोहिमेचा छायाचित्रकार रघू देखील माझ्या पुढेच फोटो काढत निघाला होता. चला, आपण देखील फोटो काढावेत म्हणून मी पण लगेच माझा कॅमेरा सरसावला आणि फोटो काढू लागलो. इतक्यात एक हात पाठीमागून खांद्यावर पडला. मागे वळून बघतो तर पोलिसकाका.
किधर से आये हो ? किसके साथ हो ?
महाराष्ट्रसे ............. हम लगबग २०० के करीब लोग आये है !
किधर है बाकीके लोग?
आता आजूबाजूला कुणीतरी दिसेल, म्हणून मी इकडतिकड पाहू लागलो, तर कोणीच दिसेना. एकदम कुणीतरी जादूटोणा केल्यासारखे सगळे गायब.
इधर हि थे ? किधर गये ? मी असं काहीतरी पुटपुटत बाकीच्यांना शोधायला लागलो. पोलिसवाला मात्र मी इंडिअन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आहे असं मानूनच किधर है ? इधर-किधर ? असे प्रश्न आवाज चढवून विचारू लागला. इतक्यात मला इनामदार दिदी दिसल्या आणी माझा जीव भांड्यात पडल्या. दिदी दुकांदाराबरोबर घासाघीस करण्यात व्यस्त होत्या. ( ह्यांना कुठेही घेऊन जावा, ह्या शॉपिंग करणारच )
इनके साथ ! असं म्हणत मी माझ बोट दिदींकडे दाखवलं. मग तो मला घेऊन दिदींकडे गेला.
ये आपके साथ है ?
हा ! दिदीने माझ्याकडे (नेहमीप्रमाणे काही गोंधळ तर नाही ना घातलास रे बाबा ) अशा अविर्भावात बघत उत्तर दिले.
क्या करते है ये ?
आता आली का पंचाईत, मी काय करतो ?
कॉलेज मे है ! दिदींनी त्यांना माहित असलेले उत्तर दिले.
ठीक है ! म्हणत पोलीसकाकांनी मला परत बाजूला नेले.
कॉलेज मे ? आप तो कुछ और ही बता रहे है ! चलो मेरे साथ !
इतक्यात मला आमचा स्वाग्या दिसला आणि त्याहीपेक्षा महत्वाची आमची सॅक दिसली.
१ मि. पटकन जाऊन सॅक घेतली. पटकन ओळखपत्र बाहेर काढलं. पोलीसकाकांना शांत भाषेत समजावलं, काहीही न बोलता त्यांनी मला सोडलं आणि मी परत आमच्या ग्रुपला जाऊन मिळालो.
जवळच्याच एका ठिकाणी सगळ्यांची जेवायची सोय केली होती. अंगात ताप असल्याचं आता चांगलचं जाणवू लागलं होतं. कसबसं पोटात काहीतरी ढकललं, तरीपण अंग चांगलच गरम झाल्याचं जाणवायला लागलं.
असं काही झालं कि मग लगेच घराची आठवण येते. आईला फोन केला, आवाजावरूनच आईला ताप आल्याचं कळलं, मग मी कसं आईस्क्रिम खाल्लं असेल, थंड पाणी प्यायलो असेल, कोल्ड्रिंक पीत असेन, कानाला कसं बांधत नाही .कधी तीच ऐकत कसं नाही, अशा मी तिच्या न कळत केलेल्या आणि न केलेल्या बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या.
बरं, आता औषध सांगतेस का ? मी अगदी काकुळतीला येऊन विनवणी केली.
काय काय आहे सध्या तुझ्याकडे ?
मग मी सॅक मधून गोळ्यांच जंजाळ काढून त्यातलं एकेक नावं तिला वाचून दाखवायला लागलो.
शेवटी एकदाच्या गोळ्या मिळाल्या आणि तू काही काळजी करू नकोस म्हणत मी फोन ठेवला.
स्वाग्या, जरा ताप वाटतोय, थोडासा झोपतो आणि येतो. ठीक आहे, आम्ही पण पुढे जाऊन थांबणारच आहोत. ये सावकाश म्हणत स्वागत, रुपेश, अमर वगैरे पुढे गेले आणि मी, दीपक, संग्राम आणि रोहन मागेच थांबलो.
शाळेच्या बाहेर मस्तपैकी लॅान होतं. मग आम्ही चौघांनीपण मस्तपैकी ताणून दिली. जाग आली तेव्हा ०३४५ वाजत होते, रोहननी जवळचाच एक हातपंप शोधून काढला होता, साहेब, नुकतीच अंघोळ करून येत होते, तर संग्रामची अंघोळ चालू होती. गोळ्यांमुळे आणि झोप चांगली झाल्यामुळे एकदम फ्रेश वाटतं होतं, मग मी देखील अंघोळ आटोपली आणि आम्ही सगळेजण काशी करायला निघालो. 
बाहेर निघताना वाटेत “श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजमहाल” असा बोर्ड दिसला, पाहूया तरी काय आहे, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. आतमधले लोक,हा त्यांचा महाल होता, इथे राम खेळला वगैरे सांगत होते. अर्थात आमचा काही त्यावर विश्वास बसला नाही. त्या ठिकाणी राजमहाल असावा नाही असे नाही पण सध्याची जी वास्तू होती, तिला बघून आणि तिथल्या लोकांच्या तोंडून कथा ऐकून, माझ्या तोंडून “बुलशीट” येवढा एकच शब्द बाहेर पडला. आमच्या मोहिमेमधल्या लोकांनी हाच प्रकार गोकुळामध्ये देखील अनुभवला होता. आतमध्ये राजमहाल म्हणण्यासारखे काहीही नाहीये.

श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजमहाल
14DSCN3737.JPG14DSCN3740.JPG

तिथून निघून आम्ही वाराणसीचा रस्ता पकडला.

अयोध्या ते वाराणसी अंतर साधारण २२० किमी आहे. अकबरपूर वरून वाराणसी मध्ये जाण्यापेक्षा सुलतानपूरवरून डावीकडे वळावे. राष्ट्रीय महामार्ग ५६ असल्याने प्रवास लवकर होतो. अयोध्या सोडायलाच ४ वाजले होते. वाराणसीमध्ये पोहचायला रात्र होणार हे नक्की होतं. साधारणतः ९ वाजतील अस आम्ही डोक्यात ठेऊन चाललो होतो. रस्ता उत्तर प्रदेशच्या मानाने चांगलाच होता. उत्तर प्रदेश मध्ये रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो ह्याची देखील जाणीव होतीच पण आमच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता, मोहीम कधीच पुढे निघून गेली होती. जौनपुरच्या अलीकडे एका छोट्याशा गावामध्ये आम्ही चहा घेतला. अमर आणि मी एका गाडीवर तर रुपेश आणि स्वागत दुसऱ्या बाईकवर होते. वाराणसी अजून ७० किमी वर होते. मी आलोकला फोन केला, आम्ही दोघं एकत्र जहाजावर कामाला होतो.
सर, बस एक घंटे मे आपके घर पे पहोंच जाऊंगा म्हणत मी फोन ठेवला.
१०-१५ मि. होतात न होतात तोच एका टोलनाक्यावर साऱ्या, अमरया थांब थांब असा आवाज आला.
मी दचकून बघितलं, अमरने पण लगेच गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. स्वागत-रुपेश काहीतरी शोधत होते.
काय झालं? विचारायच्या आत मला स्नेहलची बाईक दिसली आणि पोटात गोळा आला. बाईकचा पुढचा भाग पूर्णपणे मोडला होता.
स्वाग्या – रुप्या तुम्ही ठीक तर आहात ना?
स्वागतने काही न बोलता त्याचं हेल्मेट दाखवलं, हेल्मेटला चीर पडली होती.
रुपेशाचा हात कोपरातून निखळला होता.
टोलनाक्यावर उजवीकडून येणाऱ्या ट्रकमुळे रुपेशला दुभाजक दिसला नव्हता आणि गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली होती.
अमर, तू आणि स्वाग्या गाडी नीट आहे का बघा, मी रुपेशला घेऊन दवाखान्यात जातोय.
आमच्या सुदैवाने काही मीटर अंतरावरच दवाखाना होता. नर्सनी लगेच डॉक्टरांना बोलावून आणलं. नशीबाने जास्त लागलं नव्हतं, डॉक्टरांनी हाताला Tourniquet लावलं, एक्स- रे ची गरज नाही, गोळ्या आणि इंजेक्शन खालच्या मेडिकलमधून आणायला सांगितलं.
इंजेक्शन वगैरे देऊन होईपर्यंत मी बाहेर बसून होतो, तिथल्या नर्स आमची खूप आस्थेने चौकशी करत होत्या, मुंबईवरून आहे समजल्यावर तर त्या आमची पण लोक आहेत तिकडं खूप, पण आता राज ठाकरेमुळं लोक थोडी घाबरलीत वगैरे सांगत होत्या.
डॉक्टरांनी गोळ्या कधी घ्यायच्या, घाबरायची गरज नाही, २-३ दिवसात नीट होईल सांगितल्यावर माझा जीव भांड्यात पडला. त्या देवमाणसाने पैसे घ्यायला नम्रपणे नकार दिला. भारतामधल्या मागास समजल्या जाणाऱ्या भागामध्ये आज आम्हाला माणुसकीचं दर्शन झालं.
खाली आलो, तोपर्यंत गाडीदेखील चालवण्यालायक झाली होती, सगळा कार्यक्रम उरकून निघायला ११ वाजले. तोपर्यंत आलोकला देखील फोन करून झाला प्रकार सांगितला होता. तो तर लगेच कार घेऊन आम्हाला आणायला निघाला होता, पण मीच एवढं काही झालं नाही, आम्ही सावकाश येऊ म्हणतं त्याला थांबवलं.
आजचा मुक्काम श्री धर्मसंघ शिक्षा मंडळ, वाराणसी येथे होता. तिथे पोहचायला रात्रीचे १२ वाजून गेले होते. आज सगळेच खूप थकले होते, आलोक वाट बघत बसला होता.
भारत माता मंदिरासमोर ये, आलोकचा फोन आला.
बाकी कोणी आता येण्याच्या मूड मध्ये नव्हते. भारत माता मंदिर शोधता शोधता १ वाजला, आलोक तिथे येऊनच थांबला होता.
आलोकच्या घरी जाऊन, थोडा फ्रेश झालो. वैनी, त्याचा मुलगा सगळेच आमची वाट बघत थांबले होते.
वैनीने मस्तपैकी गरमागरम पराठे खायला दिले आणि सगळ्या दिवसाचा शिणवटा निघून गेला. निघताना काही पराठे उद्यासाठी पण बांधून दिले. या गडबडीत आलोकच्या बच्चासाठी काहीच घेऊन जाता आलं नाही याची चुटपुट लागून राहिली.
परत येऊन बघतो, तर सगळ्यांना मेल्यासारख्या झोपा लागल्या होत्या, माझी स्लिपिंग bag पण गायब होती. कसाबसा मी सतरंजीवर अंगाच मुटकुळं करून पडून राहिलो आणि झोपेची वाट बघू लागलो. पण भयानक थंडी आणि पांघरायला देखील काहीच नसल्याने झोप काही येत नव्हती. थोड्या वेळात डोळा लागतो न लागतो तोच डॉक्टरांचा आवाज आला.
सारंग, अरे काही न घेता कशाला झोपलाय, इकड ये.
डॉक्टरांनी त्यांच्या जवळ असलेली सतरंजी मला पांघरायला दिली आणि सतरंजीच्या मस्त उबेमध्ये मी ताणून दिली.

आजचा प्रवास : ३७० किमी

२० जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
काशी – अलाहाबाद – चित्रकूट – सतना – मैहर

आज मात्र सकाळी थोड उशिरा म्हणजे साडे सहा वाजता उठलो, कसाबसा ब्रश केला. मोहीम अगोदरचं मार्गस्थ झाली होती. सकाळी सकाळी काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे होते.

वाराणसी घाट :
14DSCN3753.JPGकाशी विश्वेश्वराविषयी थोडेसे :
विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवणूक निघाली.

एक आख्यायिका अशी देखील सांगितली जाते कि, कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने “मला कुणी चिडविणार नाही” अश्या ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले

या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात.त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.विश्वनाथाचे दर्शनाअगोदर धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे.या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत.साक्षी विनायक,पश्चिमेला देहली विनायक,उत्तरेला पापशार्थी विनायक,दक्षिणेला दुर्गा विनायक,नैऋत्येला भीमचंद विनायक,वायव्येला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक.

मुख्य मंदिर :
काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे.त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात.ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे.तेथे दर्शन घ्यावयाचे तर,तीन हार न्यायची पद्धत आहे.एक हार शंकराला,दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो.

इतर मंदिरे :
अविमुक्तेश्वर मंदिर
श्री बिंदूमाधव मंदिर
काळभैरव मंदिर
कौदेवी मंदिर
मनकर्णिका मंदिर
पिशाच्च मोचनी मंदिर

वाराणसीविषयी थोडेसे :
काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला 'वाराणसी' हे नाव पडले.
हे शहर वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. जगातील सर्वांत जुने सलग वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे. या शहराला काशी, बनारस आदी अनेक नावे आहेत. त्यांतील काही अशी :
अविमुक्त(शंकराच्या वास्तव्यामुळे),
आनंदकानन/आनंदवन(शंकराला आनंद देणारे वन),
काशिका,
तपःस्थली,
महास्मशान,
मुक्तिक्षेत्र,
रुद्रावास(रुद्राचे राहण्याचे ठिकाण),
श्रीशिवपुरी
हे शहर,महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसविल्यामुळे यास 'काशी'/'काशिका' हे नाव पडले.

स्कंद पुराण या इ स पूर्व ५०० ते ९०० वर्षे जुन्या पुराणात काशीचे महात्म्य आढळते. त्या काशीखंडात वाराणसीच्या आसमंतातील शैव मंदिरांचे वर्णन आहे. सवाई जयसिंग या वैज्ञानिक राजाने इ.स. १७३७ मध्ये बनारसला मानमंदिर येथे वेधशाळा उभारली होती. इ.स. १७८३ च्या आधी पासून काशीवर इंग्रजांचे राज्य होते. येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातले पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज इ.स. १७९१ साली स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रांतील अभ्यास होत असे. आज येथे बनारस हिंदू विद्यापीठ आहे.
'काश्यां तु मरणमुक्ती': काशीत मरण आल्यास त्या जीवाला मुक्ती मिळते असा समज आहे. प्रयाग, काशी आणि गया अशी त्रिस्थळी यात्रा करण्याची पद्धत आहे.
रामायण, महाभारत, स्कंद, लिंग मत्स्य, पद्म, अग्नि इत्यादी पुराणांमध्ये, बृहत्संहिता, मआसीर-आलम-इ-गिरी या ग्रंथांमध्ये तसेच ह्युयनत्संग, इत्सिंग या चीनी प्रवाशांच्या प्रवासवर्णणांमध्ये वाराणसी विषयी लिहून ठेवले आहे.
( वरील माहिती विकिपीडिया आणि मराठी विश्वकोशवरून साभार )

काशी विश्वेश्वराचे दर्शन छान झालं. इतर ठिकाणांप्रमाणेच इथेही अभिषेक करा , यावं करा त्याव करा सांगणारे अनेक ठक भेटले. आम्ही देखील नेहमीच्या सवयीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दर्शन घेतलं. मंदिराबाहेर मरणासन्न स्थितीमध्ये बसून राहिलेल्या आजोबा आजींना बघून 'काश्यां तु मरणमुक्ती' या वाक्याचीच किळस आली.
अनेक मुलं आपल्या आई-वडिलांना येथे काशीला दर्शन करून आणतो म्हणून आणतात आणि सोडून निघून जातात असे तिथल्या काही लोकांनी सांगितले.
विदेशी पर्यटक मात्र खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पहावयास मिळतात.
घाटावर जाऊन एक चक्कर मारून आलो. बहुतांश विदेशी पर्यटक तिथे चाललेल्या विविध घटनांचे छायाचित्र टिपण्यात मश्गुल होते.

काशी हिंदू विश्वविद्यालय आणि भारत माता मंदिर बघितल्याशिवाय वाराणसी सोडू नको असे आलोकने सांगितल्याने, मी मोर्चा काशी हिंदू विश्वविद्यालयाकडे वळवला. सुमारे १३५० एकर परिसरामध्ये हे विश्वविद्यालय पसरलेले आहे.

काशी हिंदू विश्वविद्यालय बघून झाल्यावर बाईकच्या शोरूम मध्ये गेलो. शोरूम उघडलं होतं, बाईक दुरुस्त व्हायला कमीत कमी २-३ तास लागणार होते, तेवढ्या वेळामध्ये तिथे बसून राहण्यापेक्षा भारत माता मंदिर बघून येऊ असं ठरलं.
वाटेत काळे काका-काकू भेटले. त्यांना पण भारतात एकमेव असलेल्या भारत माता मंदिराविषयी सांगितलं, काका पण यायला लगेच तयार झाले, नेहमीप्रमाणे मोहीम मार्गस्थ झाली होती आणि आम्ही भटकत होतो.
भारत माता मंदिर बघताना मात्र खूप मस्त वाटलं, अजिबात गर्दी नव्हती. मी, दीपक आणि अजून एकदोन विदेशी पर्यटक आले होते.

भारत माता मंदिर
14DSCN3763.JPG

इथे कुठल्या देव-देवीची मूर्ती नाहीये, इथे संपूर्ण भारताचा नकाशा संगमरवरावर त्रिमिती मध्ये काढण्यात आलेला आहे. काळे काका-काकूना पण मंदिर आवडलं, बाहेर येऊन गाडी काढतो न काढतो तोच, विदेशी पर्यटक सारनाथ विषयी काहीतरी बोलत असल्याचं जाणवलं, चौकशी केली असता ते सारनाथ येथे चालले असल्याचं समजलं.
सारनाथ वाराणसी पासून फक्त १० किमी वर आहे. आता इथपर्यंत आलोच आहोत तर भारताची राजमुद्रा ज्या अशोक स्तंभावरून घेतलेली आहे तो बघूनच जाऊया म्हणत मी आणि काळे काकांनी मोर्चा सारनाथ कडे वळवला. एव्हाना १० वाजून गेले होते, रहदारी खूपच वाढली होती. सारनाथला पोचायला आम्हाला १०३० वाजले.
त्या दिवशी नेमका शुक्रवार होता. शुक्रवारी सारनाथच संग्रहालय बंद असल्याचं कळलं.
मग आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत तिथले स्तूप बघत बसलो.

सारनाथ विषयी थोडेसे :

सारनाथ हे प्रमुख अस बुद्धांच तीर्थस्थळ आहे. मोहम्मद घौरीने हे स्थळ नष्ट केलं होतं, १९०५ साली भारतीय पुरातत्त्व विभागाने याठिकाणी उत्खननास प्रारंभ केला.
येथील प्रेक्षणीय वस्तू :
सारनाथ संग्रहालय
चौखंडी स्तूप
धर्मराजिका स्तूप
धमेख स्तूप
मूलगंध कुटी
वाराणसीला भेट देणाऱ्यांनी मात्र आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण.

सारनाथ संग्रहालय
14 SARNATH.JPG14. SARNATH.JPGचौखंडी स्तूप
14. CHAUKHANDI STUPA.JPG

( सारनाथ छायाचित्र : नीरज जाट )

सारनाथवरून निघेपर्यंत स्वागतचा फोन आला होता, बाईक दुरुस्त झाली होती आता थेट अलाहाबादला भेटायचं होतं, आजचा पल्ला पण मोठा होता. काळे काका आणि आम्ही एकत्रच निघालो.
सारनाथवरून अलाहाबाद १३२ किमी आहे. ठीक ११ वाजता आम्ही सारनाथ सोडलं.
सारनाथ वरून अलाहाबादला जाताना संपूर्ण वाराणसी क्रॉस करावं लागतं, आम्ही पुणेरी पद्धतीने कशीतरी बाईक वाराणसीच्या बाहेर काढली, काळे काकांना मात्र निश्चितच ते जमणार नव्हतं. आम्ही साधारण दुपारी २ च्या दरम्यान प्रयाग गाठलं, कुंभमेळा भरण्याची जागा, त्यामुळे आम्ही जास्त कुणाला शोधायच्या भानगडीमध्ये पडलो नाही. मी आणि दीपक त्रिवेणी संगमाजवळ जाऊन आलो. गंगा आणि यमुना या नद्यांचा संगम मात्र अतिशय सुंदर दिसतो.

प्रयागविषयी थोडेसे :

गंगा, यमुना या नद्यांचा अलाहाबाद शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात.कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, हरिद्वार, उज्जैन व नाशिक ही अन्य क्षेत्रे आहेत.
हे भारतातील दुसरे सर्वात पुरातन शहर असल्याचे मानले जाते. हरवलेले चारही वेद परत मिळाल्यावर प्रजापतीने येथे यज्ञ केला. म्हणून यास प्रयाग असे नावं ज्या वेळेस चंद्र सूर्य मकर राशीत असतात, आणि गुरु वृषभ राशी मध्ये असतो त्यावेळेस येथे कुंभमेळा भरतो. या क्षेत्राच्या परिसरातील काही तीर्थक्षेत्रे :
१. त्रिवेणी माधव
२. सोमेश्वर
३. वासुकीश्वर
४. प्रयागवेणी माधव

भारतातील सगळ्यात मोठा Cable Stayed Bridge - New Yamuna Bridge
14DSCN3784.JPG

दुचाकी असल्यामुळे आम्ही पटकन संगमापर्यंत जाऊन परत येऊ शकलो. चारचाकी आतपर्यंत जात नाही.
साधारण साडेतीन वाजता प्रयाग सोडलं आणि चित्रकुटच्या मार्गाला लागलो.
प्रयाग ते चित्रकुट : १३१ किमी
चित्रकुट ते सतना : ७८ किमी
सतना ते मैहर : ४० किमी
खरं पाहता आमचा आजचा मुक्काम सतनाच्या नानक दरबार गुरुद्वारा मध्ये होता, पण काही कारणाने तो मैहरला करावा लागला.
त्यामुळे अजून साधारण २१० किमी अंतर आहे आणि सतनाला पोहचायला आपल्याला साधारण रात्रीचे नऊ वाजतील अशा बेतात होतो.
चित्रकूट हे बरोबर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे.
साडेतीन वाजले होते, दुपारचं जेवण पण झालं नव्हतं, आता पोटात कावळे ओरडायला लागले होते, वाटेत एका धाब्यावर थांबलो, मनसोक्त जेवणावर आडवा हात मारला. थोड्यावेळ वामकुक्षी घेतली आणि पुढे निघालो.

चित्रकुट मध्ये पोहचायला सात वाजले होते, अंधार पडला होता, अनेक जणांना फोन केला, प्रत्येकजण वेगवेगळ्या जागी होते, मोहीम पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मी आणि दीपक एकटे पडलो होतो. पुढे जाण्यावाचून पर्याय नव्हता.

चित्रकूट विषयी थोडेसे :

राम आणि सीतेने त्यांच्या १४ वर्ष वनवासामधील ११ वर्षे या प्रदेशामध्ये काढली होती.
या ठिकाणी ऋषी अत्री आणि सती अनसुइयाने ध्यान धारणा केली होती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी सती अनसुइयाच्या घरी जन्म घेतला होता.
पाहण्यासारखी ठिकाणे :
कामदगिरी पर्वत : या पर्वताच्या पायथ्याशी अनेक सुंदर मंदिरे आहेत.
रामघाट
जानकी कुंड: जानकी इथे अंघोळ करायची म्हणून जानकी कुंड.
स्फटिक शिळा :
हनुमान धारा :
भरत कूप :
शेवटी आम्ही मनाचा हिय्या करून सतनाच्या दिशेने प्रस्थान केले. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी रस्त्याची अवस्था होती. रात्र आणि खड्डे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. दिपकला बाईक चालवायला देऊन बघितली, पण हा जिथे चांगला रस्ता असेल तिथे पण शोधून शोधून खड्ड्यात गाडी घालु लागल्यावर, हा नक्की आपल्याला आज रात्री खड्ड्यात घालणार हे मला जाणवलं, आणि परत एकदा मी गाडीचा ताबा घेतला. कसेबसे साधारण सव्वा नऊच्या सुमारास सतना गाठलं, आता कधी एकदा नानक दरबार गुरुद्वारामध्ये अंग टाकतोय असं झालं होतं, तेवढ्यात संग्रामचा फोन आला, मोहीमेचा आजचा मुक्काम मैहर मध्ये असल्याची गोड बातमी त्याने दिली. त्यांनी देखील सतना नुकतंच सोडलं होत, आता पुढचे ४० किमी काहीही करून पार करायचे होते.
शिवाजी महाराजांचं स्मरण करून गाडीला स्टार्टर मारला. पूर्णपणे रस्ता खाचखळग्यांनी भरलेला, बरं कोणीच सोबत नाही, रस्ता पूर्णपणे सुनसान.
आणि अचानक मला काळे काकांची आठवण झाली. काळजात धस्स झालं.
काळे काका ?
काकांची एकतर CT १००, त्यात काकू बरोबर आणि आम्ही ज्या वेगाने आलो त्या वेगाने काकांना खचितच जमणार नव्हतं. मनातल्या मनातं देवाला काकांना सुखरूप ठेव एवढीच विनवणी केली. आमच्या हातात दुसरं काहीही नव्हतं,
कसाबसा ४० किमी चा टप्पा पार पडला. वाटेत एका ठिकाणी रेल्वे फाटक लागलं, तिथे आमचे काही वीर भेटले आणि एकदाचा जीव भांड्यात पडला.
आजचा मुक्काम बरोबर शारदा मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या एका शाळेमध्ये होता.
तिथे पोहचल्या पोहचल्या काळे काकांचा शोध घेतला, काकांचा मोबाईल पण बंद होता. मोहिमेमधील १५-२० जण सतनामध्ये पोहचले होते, त्या लोकांनी तिथेच थांबायचा निर्णय घेतला होता, स्वागत लोकं सतनाच्या पण २० किमी मागे होते. ते पण तिथेच रात्र काढणार होते. आणि वाईट गोष्ट म्हणजे यांच्या पैकी कुणाबरोबरच काळेकाका काकू नव्हते.
आज रात्रीच्या सभेमध्ये मोहिमेची सभासद संख्या मोजली गेली, काळेकाका काकू सोडले तर बाकी सगळ्यांचा ठावठिकाणा होता. रात्री झोपताना संग्रामाला मी सगळा प्रकार सांगितला. मी उगाचच काकांना माझ्याबरोबर घेऊन गेलो, फालतुगिरी केली मी, असं बरंच काही काही सांगत राहिलो. काकांना सर्वात शेवटी बघितलेला मीच होतो.
रस्ता आणि परिसर लक्षात घेता, आता सगळं काही परमेश्वराच्याच हातात होतं. संग्राम मात्र काही काळजी करू नकोस, काका येतील नीट, राहतील कुठेतरी असं सांगत होता.
काळे काकांना सुखरूप ठेव अशी प्रार्थना करतच निद्रादेवीच्या अधीन झालो.

आजचा प्रवास : ४०३ किमी
उद्याचा प्रवास : मैहर – कटनी – भेडाघाट - जबलपूर

२१ जानेवारी २०१२

आजचा प्रवास : मैहर – कटनी – भेडाघाट - जबलपूर

आज सकाळी लवकरच जाग आली. उठल्या उठल्या काळे काकांना फोने केला, फोन अजून बंदच येत होता.
कितीतरी जण अजून साखरझोपेतचं होते, आज अगदी नीट आवरलं, तोपर्यंत बाकीचे लोक देखील उठले होते. आज शारदा देवीच दर्शन घेऊन, भेडाघाटचा धबधबा बघून, जबलपूर गाठायचं होतं. शारदा देवीचं मंदिर शाळेपासून काही हाताच्या अंतरावर होतं.
सकाळी आम्ही सात वाजता चढायला सुरवात केली. अगदी रमतगमत पावणे आठ पर्यंत मंदिरात पोहचलो. मंदिरामध्ये काळ मागे राहिलेले मोहिमेमधील काही अतिउत्साही कार्यकर्ते अगोदरच पोहचले होते. काळे काकांबद्दल त्यांच्याकडे पण चौकशी केली. पण त्यांना देखील काही माहित नव्हते. सकाळ असूनदेखील बऱ्यापैकी गर्दी होती. पण चांगलं दर्शन झालं. मंदिराचा इथून आजूबाजूचा परिसर मस्तंच दिसतं होता. मैहर तस छोट गाव आहे.

मैहरविषयी थोडेसे :

या शहराचा इतिहास Paleolithic युगापर्यंत मागे जातो.
Paleolithic युग : पुराणपाषण कालखंड किंवा प्रौगेतिहासिक कालखंड. या युगानंतर मध्यपाषण युगाला सुरवात झाली आणि मानव शेती करू लागला.

हे शारदा देवीचं मंदिर त्रिकुटा नावाच्या टेकडीवर बांधलं आहे. वरती पोहचायला १०६३ पायऱ्या चढाव्या लागतात.
या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितले जाते कि, जेव्हा शंकर दक्षयानीचे प्रेत घेऊन निघाला होता, तेव्हा तिच्या गळ्यातील हार या ठिकाणी पडला. म्हणून हे ठिकाण माई(आई) + हार = मैहर या नावाने ओळखले जाऊ लागले.

आज जवळपास २०० किमी अंतर कापायचे होते. मध्य प्रदेश मधील रस्ते लक्षात घेता, कमीत कमी ६ तास लागणार हे गृहीत होते. बरं अजून वाटेत काय वाढून ठेवले आहे हे माहित नव्हते. स्वागतला पण फोन झाला. ते लोकं अजून तासाभरानंतर निघणार होते ( आळशी लेकाचे ). देवीचं दर्शन झालं कि मी आणि संग्राम-रोहन एकत्रच निघालो. रस्ता नेहमीप्रमाणे खाचखळग्यांनी भरलेला होता. तिथल्या एका गाववाल्याला कटनीकडे जाणारा रस्ता विचारला. विचारतानाच भैया, थोडा दूर का रास्ता होगा, तब भी चलेगा पर रोड अच्छा होना चाहिये. असे सांगितले. त्या सदगृहस्थाने एकदम चांगला असणारा रस्ता सांगितला. हा रस्ता बहुतेक बहरी या गावावरून येतो. आत्ता मला नक्की आठवत नाही पण रस्ता चांगला आहे. त्या रोड वर आमच्याच दोन बाईक होत्या रस्ता बऱ्यापैकी मोकळा आणि कितीतरी चांगला होता. आजूबाजूला दुरवर पसरलेली हिरवीगार शेते होती. कानात कधी रिकी मार्टीन तर कधी अजय-अतुल वाजत होते. आणि एक मस्त झकास रिकामा रस्ता होता. अजून काय पाहिजे होत या आयुष्यात. वाटेत एका ठिकाणी रेल्वे सिग्नल लागला. सिग्नल लागला कि कमीत कमी १५-२० मि. थांबावं लागणार हे गृहीतच होतं. मग आम्ही आमच्या बाईक बाजूला घेऊन मस्तपैकी चहाचे दोन दोन कप रिचवले. वाटेत मार्बलचे कारखाने होते. मग तिथल्या एका कारखान्यात जाऊन मार्बलचे दर, प्रकार अशा अनेक विषयावर बोलबच्चनगिरी करून आम्ही परत एकदा रस्त्याला लागलो.

मैहर ते कटनी ८३ किमी चे अंतर आहे. कटनी मध्ये पोचायला दुपारचे १ वाजले. आता कुठेतरी क्षुधाशांती करनं गरजेचं होतं. वाटेतल्या एका ढाब्यावर बाईक थांबवल्या. हनुमान भक्त रोहनचा शनिवार असल्याने, तुम्ही जेवण करून घ्या मी जरा गावात बाईक दाखवून घेतो म्हणत रोहन पुढे निघून गेला. मी आणि संग्रामनी मात्र जेवणावर आडवा हात मारला. रोहनला फोन केल्यावर तो जवळच एका डाव्या हाताच्या गॅरेज मध्ये असल्याचं कळलं. तिथं गेल्यावर संग्रामनी त्याच्या बाईक मधून काढलेलं जळलेल ऑइल दाखवलं. या कार्ट्यांनी पुणे सोडल्यानंतर ऑइलच बदललं नव्हतं. गाडीत जेमतेम २०० मिली ऑइल राहिलं होतं. आज खरच हनुमानाने आम्हाला वाचवलं होतं. नशीब याचा उपवास असल्याने याने गाडी गॅरेज मध्ये दाखवली.

साधारण लांबच्या प्रवासात दर २००० किमी नंतर ऑइल बदली करावं.

भेडाघाट अजून १०० किमी होतं. सूर्यास्तापर्यंत कुठल्याही परिस्थितीत तिथे पोहचण आवश्यक होते. नाहीतर परत उद्याची वाट पहावी लागणार होती.
आता मात्र राष्ट्रीय महामार्ग ७ सोडून चालणार नव्हतं. भेडाघाटला जाताना राष्ट्रीय महामार्ग ७ पकडायचा आणि हा मार्ग जिथे राष्ट्रीय महामार्ग १२ ला मिळतो, (१२ राष्ट्रीय महामार्ग १२ अ नव्हे. ) तिथून उजवीकडे काही मिनिटांवर भेडाघाट आहे. गाड्या वरती लावून ५-१० मि. खाली थोडं चालतं जाव लागतं.

धुवांधार धबधबा
15Bhedaghat1.jpg15Dhuandhar_falls3.JPG15DSCN3818.JPG15DSCN3811.JPG

भेडाघाट येथे बघण्यासारखी ३ प्रमुख ठिकाण आहेत
१. धुवांधार धबधबा
२. मार्बलच्या टेकड्यांच्या मधून नौकाविहार
३. चौसष्ट योगिनी मंदिर.

बरोबर ५ वाजता आम्ही धुवांधार धबधबा गाठला. मग निवांत फोटोसेशन झालं. डोळ्याचं पारण भेटणारा धबधबा आहे. प्रत्येकानी आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असा.
आता आम्हाला नौका विहार करायचा होता. पण आता प्रॉब्लेम असा झाला कि संध्याकाळ झाली होती. नौका विहार करायचा तर कमीत कमी १० माणसं हवीत. बर तिथे आलेल्या ३-४ महाराष्ट्रीय जोडप्यांच म्हणनं अस होतं कि नावेमध्ये फक्त तेच लोकं असतील बाकी कुणीच असता कामा नये. आता तर पंचाईत होती, बर ते लोकं त्यासाठी पैसे द्यायला पण तयार होते. आणि आमची गोची अशी झाली कि त्या दिवसाची शेवटची नाव होती. आता मी शेवटचं हत्यार वापरायचं ठरवलं. नावाडी नाव काढायच्या तयारीत होता.
जाऊ दे रे संग्राम, लोकं कितीही वरच्या पदावर पोहचली, तरी त्यांचे विचार नेहमी खालच्या पातळीचेच राहणार, वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडे कमीच असते.
हे वाक्य मी संग्रामला उद्देशून पण नावेमध्ये चढणाऱ्या दीदीला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणालो.
घाव वर्मावर लागला होता. ती दीदी नावेत बसताच,
भैया, आने दो वो लोग को भी. नावाड्याला उद्देशून म्हणाली.
तिच्या ग्रुपमध्ये अनेक जणांनी तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितले.
आम्ही मात्र नावाद्याला न विचारताच लगेच नावेत उद्या टाकल्या आणि दीदीच आभार मानून मोकळे झालो.
नावाडी त्या ठिकाणी चित्रित झालेल्या सिनेमांची माहिती देण्यात गुंग होता.
तिथे चित्रित झालेलं सिनेमे
१. अशोका – रात का नशा अभी गाणं
२. जिस देश मै गंगा बहती है – राज कपूर आणि पद्मिनी
३. प्राण जाये वचन न जाये
अस बरंच तो काहीतरी सांगत होता आणि जोडीला पीजे मारत होता.
पण वेगवेगळ्या रंगाचे संगमरवरी खडक बघताना खूप मजा आली. साधारण साडे सहा वाजता आमचा नौका विहार संपला. तिथे संगमरवरावर कारागिरी केलेल्या अनेक मस्त मस्त वस्तू मिळतात. तुम्ही चांगल्यातले घासाघीस करणारे असाल तर खुपच स्वस्त मिळतात. मोठ्या वस्तू न्यायला अडचण येणार होती. म्हणून मग आम्ही, आपापल्या आयांसाठी हेअर क्लिप्स घेतल्या. एक क्लिप आम्हाला ५ रु ला पडली.
तो पर्यंत रुपेशचा फोन आला होता. मोहीम जबलपूर मध्ये मुक्कामी दाखल झाली होती.
आम्ही पण जास्त वेळ न दडवता लगेच जबलपूर गाठलं. भेडाघाट ते जबलपूर अंतर २० किमी आहे.

जबलपूरमध्ये आमचा मुक्काम गुरुद्वारा दसवी पातशाह, मढाताल येथे होता. जबलपूरला गाडी लावत असतानाच अचानक काळे काका गाडी लावताना दिसले.
मला एकदम हायसे वाटले.
काळे काकांनी सांगितलेली हकीकत अशी.
काकांना रात्री ११ वाजले तरी कुठले गाव दिसेना, शेवटी कसातरी त्यांना एक माणूस दिसला. त्यांनी त्याला आता पुढे राहण्यायोग्य गाव किती किमी वर अआहे असे विचारले असता कमीत कमी ५० किमी जावे लागेल असे उत्तर मिळाले. माझ्या तर्कानुसार काका चित्रकूट –सतना रस्त्यावर असावेत. म्हणजे काका त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत एकटे गाडी चालवत होते. शेवटी त्या माणसालाच काकांची दया आली आणि त्याने काकांना त्याच्या झोपडीत नेले. रात्री जेऊ घातले आणि काका-काकू रात्रीचा मुक्काम करून, आज त्यांनी जबलपूर गाठलं होतं. काकांना सुखरूप परत आणल्याबद्दल मी देवाला धन्यवाद दिले. तो देवमाणूस काकांना भेटला म्हणून काकांचं निभावलं. अशा काही प्रसंगानंतर तुमची देवावरील श्रद्धा अजूनच दृढ होते.
आज जेवणाचा मेनू एकदम फक्कड होता. गुलाबजाम Happy

मस्तपैकी जेवून झाल्यावर आज परत सगळेजण एकत्र भेटलो होतो. आज पोरांच्या गप्पांना अगदी उत आला होता. उद्या आम्ही महाराष्ट्रात प्रवेश करणार होतो.
आज आई-बाबा सगळ्यांना फोन केले. बाबांनी लगेच उद्या अमावस्या आहे, गाडी नीट चालवं, असं सांगून अमावस्येची आठवण करून दिली. मी देखील हो ला हो करत, काळजी करू नका वगैरे गोष्टी सांगितल्या.
सागरला फोन केला. प्रिन्सिपलच लेक्चर सोडलं तर माझी हजेरी लावायचं काम सागर व्यवस्थित करत होता. आता काही टेन्शन नव्हतं.
आज गप्पांमुळे झोपायला बरीच रात्र झाली, सगळेजण आता एकत्र होतो.
उद्या नागपूरकडे प्रस्थान करायचं होतं.

आजचा प्रवास :२२१.५ किमी
उद्याचा प्रवास : जबलपूर – सिवनी - देवलापार – नागपूर

२२ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : जबलपूर – सिवनी - देवलापार – नागपूर

आज मोहीम सकाळीच भेडाघाटकडे रवाना झाली. त्यामुळे आम्हाला झोपायला अजून वेळ मिळाला. जबलपूर ते नागपूर हे अंतर २७७ किमीचे आहे. हि दोन शहरे राष्ट्रीय महामार्ग ७ ने जोडलेली आहेत.

जबलपूर – सिवनी : १४७ किमी
सिवनी - देवलापार: ६४ किमी
देवलापार – नागपूर: ६६ किमी

सिवनी ते देवलापार मध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान लागते. हा रस्ता याच उद्यानामधून जातो.

जमल्यास पेंच राष्ट्रीय उद्यान बघायचं असं माझ्या मनात होतं.
निवांत उठल्यामुळे निघायला ८ वाजले. आज बघण्यासारखं असं काहीच नव्हत. वाटेत फोटोशूट साठी सगळे थांबलेले असताना एका ठिकाणी गिधाडाचं घरटी बांधायचं काम चालू होतं. मी पहिल्यांदाच गिधाडाला निलगिरीच्या झाडावर घरटं करताना बघत होतो. नाश्ता वगैरे करून सिवनी गाठायलाच १ वाजला. आज फारच रमत गमत आणि निवांत चालू होतं. दुपारी बरोबर २ च्या सुमारास आम्ही पेंच अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यात होतो.

रुडयार्ड किपलिंग यांनी पेंच अभयारण्य डोळ्यासमोर ठेऊनच “मोगली” लिहील होतं. जंगल बऱ्यापैकी दाट आहे. एका वळणावर आम्हाला झाडीत खसखस ऐकू आली. स्वागतला मी बाईक थांबवायला सांगितली. बाकीच्या बाईक बऱ्याच पुढे होत्या. परत एकदा खसखस ऐकू आली. स्वागतला बाईक बंद कर म्हटलं. बहुतेक गवे रस्ता ओलांडणार असावेत अस वाटतंय, काहीही झालं तरी बाईक सुरु करू नको. सहसा गवे हल्ला करणार नाहीत. आम्ही बाईक बंद करून वाट बघू लागलो.
आणि अचानक ५-६ कोल्हे झाडीतून बाहेर आले आणि रस्ता ओलांडून गेले.
हात तिच्या मायला, मला वाटल गवे असतील.
स्वागत बाईक सुरु करणार तोच त्याला सांगितलं इतक्यात नाही. गवे, कोल्हे साधारण झुंडीने राहतात, पहिल्यांदा म्होरक्या रस्ता ओलाडतो मग बाकीचे. बहुधा शेवटी माद्या आणि पिल्ले असतात. आणि कोल्हे असल्याने आता घाबरायची जास्त गरज नव्हती.
३-४ मि. मधेच ६-७ कोल्ह्यांच्या दुसऱ्या झुंडीने रस्ता ओलांडला. पण यामध्ये माद्या आणि पिल्ले दिसली नाहीत. म्हणून अजून ५ मि. थांबायचं ठरलं. ५ मि. झाली तरी काहीच हालचाल दिसली नाही, म्हणून गाडी चालू करणार इतक्यात तिसऱ्या झुंडीने रस्ता ओलांडला. १-२ पिल्ले होती, बहुतेक बाकीच्या माद्या असाव्यात.
मी मनातल्या मनात मारुती चितमपल्लींचे आभार मानले. त्यांच्यामुळे आम्हाला जंगलातील प्राणीसंपदा बघायला मिळाली होती.

आम्ही पुढे निघालो. उशीर बराच झाला असल्याने पेंच अभयारण्याचा बेत बारगळला.
आज आदित्यच्या घरी सर्वाना चहापाण्याचे निमंत्रण असल्याने मोहीम नागपूर बाहेर थोड्यावेळ थांबली होती. सगळे एकत्र आले आणि आम्ही आदित्यच्या घरी जमलो.
साई बाबा मंदिरामध्ये सगळ्यांनी दर्शन घेतले आणि चहा पाणी करून मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.
आज फारसं काही बघायला मिळालं नसलं तरी कोल्हांच्या दर्शनामुळे मी समाधानी होतो. आयुष्यात प्रत्येक दिवस वेगळा असतो हेच खरं.

संध्याकाळी स्नेहलपण आला. मैत्रिणीला भेटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आम्ही पण याचाच फायदा घेतला आणि स्नेहलला गाडीबद्दल सांगितलं. आणि वरून अरे, तू तिच्याबरोबर होतास, मग तुला उगाच तुझ्या बाईकची काळजी लागली असती वगैरे लोणकढी दिली. स्नेहलनी पण बाईक बघितल्यानंतर आम्हाला मोठ्या मनाने माफ केलं. आणि या नाट्यावर पडदा पडला.
आज रात्रीच्या सभेमध्ये उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा झाली. उद्याचा मार्ग नागपूर- अमरावती – यवतमाळ – माहूर – नांदेड असा होता. पण मग उद्याही माहूरच्या देवीव्यातिरिक्त काहीही पदरात पडणार नव्हते. शिवाय सगळा पल्ला ४५० किमी चा होता. त्यामुळे हा मार्ग सोडून नागपूर- वर्धा – यवतमाळ – माहूर – नांदेड असा मार्ग घ्यायचे नक्की झाले. त्यामुळे प्रवास पण तब्बल १०० किमीने कमी होणार होता आणि वर्ध्यामधला परमधाम आश्रमाला पण भेट देता येणार होती.
आज सगळे लगेचच “खुडुक” झाले. उद्याचा पल्ला देखील लांबचा होता.

आजचा प्रवास : २८० किमी
उद्याचा प्रवास : नागपूर- वर्धा – यवतमाळ – माहूर – नांदेड

२३ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : नागपूर- वर्धा – यवतमाळ – माहूर – नांदेड

नागपूर – पवनार आश्रम : ७० किमी
पवनार आश्रम – यवतमाळ : ८० किमी
यवतमाळ - माहूर : ७८ किमी
माहूर – नांदेड : १२७ किमी

आज मात्र सकाळी साडेसहावाजताच गाडीला किक मारली. नागपूर मध्ये असल्याने आता थंडीचा काही प्रश्न नव्हता. सकाळीच ६ वाजता उठून फ्रेश होऊन, आम्ही परमधाम आश्रमाची वाट धरली.
नागपूर सोडून आम्ही वर्धा रस्त्याला लागतो न लागतो तोच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक माणूस पडलेला दिसला. स्वागतने लगेच बाईक थांबवली. जाऊन पल्स बघितली. काही हाती लागलं नाही. शरीर थंड पडलं होतं. बहुतेक रात्रीच्या वेळीच कुठल्यातरी अज्ञात वाहनाने ठोकरले असणार. आजूबाजूला दुचाकी वगैरे पण काही दिसलं नाही. प्रेताच्या बाजूला दगड ठेवले आणि १०० ला फोन करून माहिती दिली आणि पुढे निघालो. नागपूर ते परमधाम आश्रम हे अंतर साधारण ७० किमी आहे. सकाळीच निघालो असल्याने ९ च्या आतच आम्ही आश्रमामध्ये पोहचलो.

परमधाम आश्रमाविषयी थोडेसे :
या आश्रमाला परमधाम आश्रम / पवनार आश्रम / विनोबा भावे आश्रम या नावांनी ओळखतात.

15DSCN3877.JPG

पवनार हे महाराष्ट्रामधील वर्धा जिल्ह्यातील एक गावं. हे गावं धाम नदीच्या तीरावर वसले आहे. हा आश्रम विनोबांनी ज्या स्त्रिया आपलं आयुष्य साध्वी म्हणून व्यतीत करू इच्छितात अशा स्त्रियांसाठी हा आश्रम १९३४ साली सुरु केला. विनोबांनी भूदान चळवळीची सुरवात येथपासून केली. आश्रमातील महिला या आश्रमाला ब्रह्म विद्या मंदिर म्हणतात. सुमारे १५ एकर वरती हा आश्रम पसरलेला आहे. सध्या या आश्रमाचे व्यवस्थापक गौतम बजाज आहेत. या आश्रमामध्ये भारतातील एकमेव भरत-रामाचे मंदिर आहे. आश्रम हा सकाळी ४ ते १२ आणि दुपारी २ ते रात्री ८ या वेळातच उघडा असतो. आश्रमामध्ये, आश्रमाचे काम चालू असताना सापडलेली अनेक शिल्पे ठेवली आहेत.

वेळ असेल तर तुम्ही इथून जवळच असणारी सेवाग्राम आश्रमाला देखील भेट देऊ शकता.

साडेनऊ वाजता आम्ही आश्रम सोडला. आता पुढचा मुक्काम होता माहूर. १६० किमी अंतर अजून कापायचं होतं. पण रस्त्याने आणि गाडीने आम्हाला साथ दिली. जेवायला पण आम्ही अधेमधे थांबलो नाही. मे २०११ मधे पण याच रस्त्याने मी चंद्रपूरला गेलो होतो. माहूरच्या पायथ्याशी येऊन पण मला दर्शन घेणं जमलं नव्हतं. त्याची पूर्ती यावेळेस होणार होती.
माहूर गाठायला दुपारचा दीड वाजला. दुपार असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. पटकन दर्शन झाले.

माहूर विषयी थोडेसे :
माहूर हे रेणुका देवीचं जन्मस्थान असल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रात असणाऱ्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक. बाकीची खालीलप्रमाणे :
तुळजापूरची भवानी माता
कोल्हापूरची महालक्ष्मी
सप्तश्रुंगीची जगदंबा माता
येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.

माहूरगड
15DSCN3930.JPGरेणुका माता मंदिर :
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व “इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर” असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस.' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले.

दत्त मंदिर :
पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.
माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.
माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०' X१२' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.
या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. 'माळवातीर्थ' म्हणून ओळखले जाणारे तीर्थ म्हणजे महानुभावी साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.

वस्तुसंग्रहालय:
गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे.त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे.
( विकिपीडियावरून साभार )

दुपारी २ वाजता आम्ही माहूरगड सोडला. आता थेट नांदेड गाठायचे होते. जवळपास १३० किमीचा पल्ला पार करायचा होता. आता पोटात देखील कावळे ओरडू लागले होते.
माहूर वरून राष्ट्रीय महामार्ग २०४ पकडायचा. हा मार्ग महागाव-उमरखेड मार्गे नांदेडला मिळतो.
महागावच्या आसपास पोटात भर टाकली आणि नांदेडकडे प्रस्थान केले. नांदेडमधे पोहचायला सव्वा सहा वाजले. पण नांदेडवासीयांनी मोहिमेच ज्या प्रकारे स्वागत नांदेड मधे केलं, त्याला तोड नव्हती. फटाके, हार-तुरे (अर्थात मी याच्या विरोधात आहे ) इत्यादी येनकेनप्रकारेण नांदेडवासीयांनी मोहिमेच स्वागत केलं. त्यांनी मोहिमेसाठी एक छोटेखानी सत्कार सभारंभ आयोजित केला होता. त्यात मोहिमेमाढल्या काही सदस्यांना तलवारी देण्यात आल्या. मग मोहिमेतल्या काही सदस्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
आणि आजपर्यंत मोहिमेमधलं सगळ्यात भारी जेवण. Happy
गाजराचा हलवा, पुरी , पापड, कोशिंबीर, मसाले भात, साधा भात वरण त्यावर साजूक तूप आणि अजून बरच काही. सगळ्यांनीच आज जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
आजचा मुक्काम श्री हजुरसाहीब गुरुद्वारा नांदेड येथे होता. नांदेड मधले गुरुद्वारा, त्यांची रोषणाई, स्वच्छता बघून खरंच डोळ्याचं पारण फिटत.
आज काही रात्रीची सभा वगैरे घ्यायच्या भानगडीत कुणी पडलं नाही, फक्त उद्याचा प्रवास नांदेड-परळी वैजनाथ-तुळजापूर-सोलापूर- पंढरपूर – पुणे असा अशक्यप्राय होता.
कारण वाटेत ३ मंदिरांना भेट होती आणि हे सगळं अंतर जवळपास ५६० किमी आहे. तेव्हा सर्वानुमते सोलापूरला मुक्काम करायचं नक्की झालं.

आजचा प्रवास : ३७० किमी
उद्याचा प्रवास : नांदेड-परळी वैजनाथ-तुळजापूर-सोलापूर

२४ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : नांदेड-परळी वैजनाथ-तुळजापूर-सोलापूर

आजची सकाळ मात्र नेहमीसारखी नव्हती. गुरुजींचा राग आज शिगेला होता. कालच्या गाजराच्या हलव्याची धुंदी अजून सगळ्यांच्या डोळ्यात होती. आज गुरुजींनी मात्र आम्हाला अक्षरशः ढकलून खोली बाहेर काढलं. 
आम्ही पटापट सामान घेतलं आणि परळी वैजनाथच्या दिशेने गाडी सोडली.
नांदेड ते परळी वैजनाथ हा टप्पा १०५ किमीचा आहे. साधारण ९ च्या सुमारास आम्ही परळी वैजनाथ गाठलं, अर्थात हा चमत्कार गुरुजींनी पहाटे पहाटे बाहेर ढकल्यामुळेच शक्य झाला होता.
सकाळ असल्यामुळे मस्त दर्शन झालं.

परळी वैजनाथविषयी थोडसं :

परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई तालुक्यात आहे. वैजनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांचा श्रीकारणाधिप हेमाद्री याने बांधले असावे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्वार केला (१७८३), असा उल्लेख तेथील एका संस्कृत शिलालेखात आढळतो. हरिहर, मार्कंडेय, नारायण ही तीर्थे आणि शनैश्वर, झुरळ्या गोपीनाथ यांची मंदिरे तसेच संत जगमित्र नागा यांची समाधी या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. वैजनाथ मंदिरास पश्चिम सोडून इतर तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप १९०४ मध्ये रामराव देशपांडे या दानशूर गृहस्थाने बांधला. सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत. येथे वीरभद्राची एक भव्य पितळी प्रतिमा आहे. मंदिरात मंडपाशिवाय दोन गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीने सजविलेले आहेत. मुख्य ज्योतिर्लिंगाच्या सभोवताली असलेल्या बारा लिंगांमुळे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

आम्ही दर्शन घेऊन बाहेर येउपर्यंत संग्रामने गोड बातमी दिली. तुळजापूरकडे जाताना वाटेतच धारूर नावाचं एक गावं लागतं. ते संग्रामच आणि रोहनच गावं. त्यामुळे दुपारचं जेवण त्याच्याकडे करायचं ठरलं. आता आम्ही आमचा मोर्चा धारूर कडे वळवला. वाटेत चुकामुक होऊ नये म्हणून स्वागत-संग्राम आणि रोहन आणि मी असं जायचं ठरलं.
खरंतर रोहन बरोबर जायचं हि माझी खूप मोठी घोडचूक. कारण रोहन्या बाईक चालवणार म्हणजे तो शूमाकरला पण ओवरटेक करू देणार नाही. मी हनुमान चालीसा म्हणतच रोहण्याच्या मागे बसलो.
तेवढ्यात संग्रामने मटण चालेल ना ? असा निरर्थक प्रश्न केला.
पण आता तुळजापूरला जायचं ना ? मी उत्तरलो.
संग्राम फोनवरच होता. आई, तुळजापूरला चालत का मटण खाऊन गेलेलं?
आता संग्रामच्या आईनेच हो उत्तर दिल्यामुळे आमचा काही प्रश्नच नव्हता.
(हा भाग शुद्ध शाकाहारी लोकांनी वाचू नये, फक्त शुद्ध मासांहारी लोकांनी वाचावा. Happy )

धारूरला जायला अंबेजोगाईनंतर कैज गावामधून उजवीकडे वळायचे.
वाटेत आम्हाला शाळेला निघालेल्या चिमुरड्या भेटल्या. जानेवारी महिना असल्यामुळे गॅदरिंगचे दिवस चालू होते. त्यामुळे सगळ्याजणी साड्या घालून नटूनथटून निघाल्या होत्या. मग त्यांचे थोडे फोटो काढले. आता साधारण ८ फुटी रस्ता होता आणि रोहन्याला नको नको म्हणतं असताना, हा पठ्ठ्या ९०-१०० ने बाईक मारत होता.
आणि अचानक समोर रस्ता काटकोनातून उजवीकडे वळताना दिसला.
मला गाडीवरून उडी मारावी असं वाटू लागलं, पण त्यामुळे गाडीचा तोल अजूनच बिघडणार होता. डाव्या बाजूला १०-१५ फुट खाली शेत होते. मी Arm Guard आणि Knee Guard अनुक्रमे कोपरातून आणि गुडघ्यातून थोड वाकवल, जेणेकरून पडलो तरी त्याच्यावर पडावं. गाडी वेगात असल्यामुळे ब्रेक पण नीट मारता येईना.
देवाच्या कृपेने गाडीचे ब्रेक लागले, गाडी वाकडी तिकडी होत का होईना रस्त्याच्या खाली जाऊन थांबली. पण बाईक इतकी टोकावर जाऊन थांबली होती कि आमचा डावा पाय खाली टेकत नव्हता, आम्ही कसाबसा उजवा पाय खाली टेकवला, गाडी हळूहळू खाली झोपवली आणि रस्त्याकडेला आलो. दोघांच्या हृदयाचे ठोके, एकमेकांना ऐकू येत होते.
खाली उतरून नॉर्मल झाल्यावर आम्ही बाईक सुरु केली. हनुमान चालीसा पावला होता. अजून एक अपघात होता होता वाचला होता.
थोड्याच वेळात धारूरला पोहचलो. साडे अकरा वाजले होते, अमृतसर वरून आणलेल्या तलवारी संग्रामच्या घरी दिल्या.
धारूर गावात एक किल्ला आहे. हा धारूरचा किल्ला म्हणूनच प्रसिद्ध आहे.

धारूरविषयी थोडेसे :
धारूर हे नाव, गावाच्या भौगोलिक स्थानामुळे देण्यात आले आहे. डोंगर धारेवरील स्थान म्हणून धारूर असे नाव पडले आहे. गावाचे ग्रामदैवत धारेश्वर असून, गावात त्याचे मोठे हेमांडपंथी मंदिर आहे. येथे असणाऱ्या मजबूत किल्ल्यामुळे मोघलकाळात गावाला मोठे महत्व होते. काही लोकं राजा धारसिंहामुळे गावचे नाव धारूर पडले असेही सांगतात, पण याला पुरावा नाही. उत्तर मध्ययुगीन काळात चंदीप्रसाद मिश्रा, स्वरुपसिंह जहारी, रामचंद्र शेटे, प्रमोद शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले आणि त्यांनी वस्त्या वसवल्या. पूर्वी गावात पाणी पुरवठ्यासाठी हरिणपीर विहीर व रंगारोनी विहीर यांचा वापर केला जात असे. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आहेत. उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन कला वैभवाची साक्ष देतात. संपूर्ण गाव दगडी तटबंदीने बंदिस्त होते.
मुर्तजा निजामाने धारूरचे नाव बदलून फतेहबाद ठेवले होते, स्वातंत्र्यानंतर येथील जनतेच्या प्रयत्नामुळे ५ मे १९७२ रोजी पुन्हा ते धारूर करण्यात आले.

धारूरच्या किल्ल्याचा थोडासा इतिहास :
किश्वरखानने धरुरचा किल्ला बांधला अशी नोंद आढळते. अब्दुल हमीद लाहरी याने हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याची नोंद केली आहे. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अनभिज्ञ ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला.
मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली होती.
शहाजहान बादशहाचा सेनापति अजिमखान यानें अहमदनगरपासून धारूरचा किल्ला घेतला तेव्हां महमद आदिलशहा यानें आपला सेनापति रणदुल्लाखान यास पाठवून, मोंगल व विजापूरकर यांच्यामध्यें मलिकंबराच्या वेळीं झालेल्या एका गुप्त तहानुसार तो किल्ला आपल्या स्वाधीन करण्यांत यावा अशी अजिमखानास विनंती केली. यावर विजापूरकरांनी कराराप्रमाणें अहमदनगराचें राज्य घेण्याच्या कामीं मोंगल बादशहास मदत केली नसल्यामुलें या किल्ल्यावर त्यांचा हक्का पोहोंचत नाहीं असें अजिमखानानें उत्तर दिलें. याच वेळीं निजामशहानें आदिलशहास सोलापूरचा किल्ला परत करुन मोंगलापासून संरक्षण करण्याकरितां त्याची दोस्ती संपादन केली. परंतु त्यांचें कारस्थान परिवक्कदशेस येण्यापूर्वींच रणदुल्लाखान व मोंगल सैन्य यांमध्यें लढाई होऊन तींत विजापूरच्या सैन्याचा पराभव झाला (१६३१).

शिवकालात विठोजी राजे भोसले तसेच नेताजी पालकर या किल्ल्यात राहिल्याच्या नोंदी सापडतात.

अमृतसरचा मेवा Happy
15DSCN4043.JPG

येथेच्छ मटणाचा आस्वाद घेतला आणि तुळजापूरला कूच केली.
धारूर ते तुळजापूर अंतर ११३ किमी आहे. तुळजापूरला पोहचायला दुपारचे ३ वाजले होते. मोहीमपण नुकतीच पोहचली होती. आम्ही गाभाऱ्यात जाण्याच्या फंदात पडलो नाही. खूप गर्दी होती.

तुळजापूरविषयी थोडेसे :

साडेतीन शक्तीपीठांपैकी हे आद्य शक्तीपीठ मानले जाते. हे मंदिर बालाघाट डोंगराच्या पठारावर बांधले गेले आहे. या डोंगराचे पूर्वीचे नाव यामुनागिरी असे होते. नंतर येथे खूप मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचगिरी असे झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावामुळे तुळापूर / तुळजापूर या नावाने ओळखले जाऊ लागले.
देवीबाबत सांगण्यात येणारी आख्यायिका अशी : कृतयुगात कर्दभ नावाचे एक ऋषी होते. त्यांची पत्नी अनुभूती, सुंदर आणि पतिव्रता होती. कर्दभ ऋषी मरण पावल्यानंतर सती जायला निघालेल्या अनुभूतीला, इतर ऋषींनी अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाणे हे शास्त्राला धरून नसल्याचे पटवून दिले आणि तिला सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर अनुभूतीने तिच्या मुलाला गुरुग्रही सोडून, मेरुपर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीजवळ तपश्चर्या सुरु केली. तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिला त्रास देऊ लागला. दैत्याच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून तिने आदिशक्तीचा धावा सुरु केला, कुकर दैत्य हा महिषेचे रूप घेऊन आला होता, तर आदिशक्ती हि भवानी मातेच्या रुपात आली. देवीने त्रिशूळाने त्याचे शीर धडावेगळे केले. देवी तिच्या मदतीला त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नावं पडले. नंतर त्याचा अपभ्रंश तुरजा, तुळजा असा झाल्याचे सांगतात.

मंदिरात जाताना पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. हे महाद्वार हेमांडपंथी असून त्यावर नारद मुनींचे शिल्प आहे. आतमध्ये कल्लोळ तीर्थ आणि गोमुख तीर्थ आहे.
कल्लोळ तीर्थ : देवी इथे आल्यानंतर, जेव्हा तिने इथे तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व तीर्थे येथे धावून आली. म्हणून हे तीर्थ कल्लोळ तीर्थ म्हणून ओळखले जाते.
पुढे गेल्यावर अमृतकुंड आहे. त्याच्या शेजारीच सिद्धिविनायक मंदिर आहे. नंतर निंबाळकर दरवाजा आहे. दरवाजा ओलांडून गेले असता कळस दिसतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या पुढील बाजुस होमकुंड आहे व त्यावर शिखर बांधले आहे. सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.ऐतिहासिक व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

गाभा-याचे मधे भवानी मातेची मूर्ती असून ती गंडकी शिळेचा वापर करून बनवण्यात आलेली आहे. ती चांदीच्या सिंहासनावर आरूढ असून तिने डाव्या हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर उजव्या हाताने त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती आहे. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे.देवीला स्पर्श करता येत नाही.देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग आहे.तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
सभामंडप ओलांडल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दिसतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह ,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मूर्ती आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस मान आहे. शिवाजीमहाराज यांच्या घराण्याची ही कुलदेवता. एका आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन भवानी तलवार दिली होती. जुनी मूर्ती अफजलखानाने फोडली. त्यामुळे नंतर ही नवीन मूर्ती महाराजांनी घडविल्याचे सांगतात.

मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या मजल्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघर आहे. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या आवारात छायाचित्रणाची परवानगी नाही.

तुळजापूरच्या आसपासची काही प्रेक्षणीय ठिकाणे :
काळभैरव: हे स्थान काशी प्रमाणेच डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते.
आदिमाया व आदिशक्ति: देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.
पापनाश तीर्थ:येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.
रामवरदायिणी : येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.
भारतीबूवाचा मठ: देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.
गरीबनाथाचा मठ: हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.
नारायणगिरीचा मठ: हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होता. सध्या हा क्रांती चौकात आहे.
मंकावती तीर्थ: मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेहि म्हणतात.यावर महादेवाची पिंड आहे.तसेच मोठे मारुती मंदीर आहे.त्याचबरोबर याज्ञवाल्यक्य ऋषींचा आश्रम आहे
धाकटे तुळजापूर: येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते.

आता आजच्या दिवसाचा शेवटचा टप्पा होता. तुळजापूर ते सोलापूर हे अंतर ५० किमी आहे. साधारण ४ वाजता आम्ही तुळजापूर सोडले आणि तासाभरात सोलापूरला पोहचलो.
आजचा मुक्काम खरंतर पुण्यात होता, पण अंतर जास्त असल्याने सोलापुरात मुक्काम करायचं ठरलं होतं.
त्यामुळे सोलापुरात मुक्काम आणि जेवणं याची काहीच सोय नव्हती. पण सुदैवाने काही सोलापूरकर मोहिमेमध्ये होते. त्यात एका सोलापूरच्या शाळेतील मुख्याध्यापकही होते. त्यांनी एक नामी शक्कल लढवली. मतदान करण्याबाबत जागृती करण्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलावले होते व त्याचबरोबर आम्ही देखील या कार्यक्रमात सहभागी असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर मधेही मोहिमेचे जंगी स्वागत झाले. स्वागताला जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक सारख्या मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. मग आम्ही देखील हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालो.

त्यांच्यामुळे झोपायचा प्रश्न मिटला. त्यांच्याच शाळेत आम्ही आमच्या बॅगा टाकल्या.
आणि जेवणासाठी सिद्धेश्वर धावून आला. त्या दिवशी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसाद होता. मग सगळी मोहीम मंदिरातच जेवून परतली.
आज जवळपास मोहिमेचा शेवटचा दिवस असल्यातच जमा होता. बरेचसे लोकं, ज्यांची गावं वाटेत होती, ते आपापल्या घरी परतले होते. काळे काका- काकू पण तुळजापूरवरून घरी गेले होते.
गेले २२ दिवस सुरु असलेल्या प्रवासाची उद्या अखेर होणार होती. खरतरं घरी जाऊच नये असं वाटत होतं. आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रवास संपत आला होता.
आज रात्रीच्या सभेमध्ये उद्या पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमधे कार्यक्रम असल्याचे समजले. आज मात्र झोप लागता लागतं नव्हती. मोहिमेमध्ये अनुभवलेले सगळे क्षण डोळ्यासमोर येत होते. रात्री कधीतरी डोळा लागला.

आजचा प्रवास : ३७२ किमी
उद्याचा प्रवास : सोलापूर – पंढरपूर – पुणे

२५ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : सोलापूर – पंढरपूर – पुणे

आज चक्क गुरुजींनी कोणालाच उठवलं नाही, पण प्रत्येकजण स्वतःहून उठला होता. आज एकदम नीट आवरलं. सोलापूरकरांना निरोप दिला आणि पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सोलापूर ते पंढरपूर अंतर ६८ किमी आहे. पण सोलापूर म्हटलं कि स्वागत तिथला लांबोटीचा चिवडा खाण्यासाठी थांबणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्यामुळे आमचा पहिला थांबा “लांबोटीचा चिवडा” इथेच झाला. आणि मग नेहमीप्रमाणे स्वागतने तो कित्ती वर्षापासून हा चिवडा खातोय आणि तो किती भारी आहे हे मला परत ऐकवलं. घड्याळात बघितलं तर साडे सहाच वाजले होते. आम्ही आज जरा लवकरच निघालो होतो. मग आम्ही मनसोक्तपणे लांबोटीचा मक्याचा चिवडा खाल्ला, चहा पिला आणि पुढे निघालो. सोलापूर ते लांबोटी हे अंतर २५ किमी आहे.
मक्याचा चिवडा खरंच भारी आहे, शिवाय तिथे अनेक प्रकारच्या चटण्या पण मिळतात. आता उड्डाण पूल झाल्यामुळे ते हॉटेल खाली राहिले आहे. त्यामुळे थोडे फिरून जावे लागते.
मोहोळला अमोल राहत असल्याने मग परत त्याच्या घरी गेलो. लांबोटी – मोहोळ हे अंतर १० किमी आहे. तिथे परत चहा-पोहे झाले. अमोलला निरोप दिला. त्याच्या आईला अगदी न चुकता, तुमच्या मुलाने रोज न चुकता अंघोळ केली हे सांगितलं. खरंच या प्राण्याने रोज न चुकता गेले २३ दिवस, कडाक्याची थंडी असू अथवा गार पाणी असू , अंघोळ केली होती. माझ्यामते हाच एकमेव प्राणी आमच्यात असावा कि ज्याने रोज अंघोळ केली.
अमोलला निरोप देता देता १० वाजले आणि आम्ही विठुरायाच्या दर्शनाला निघालो. पंढरपूर अजून ६० किमी होतं.
वाटेत टेंबुर्णी फाट्यावर स्वागतने बाईक थांबवली.
का रे ?
अरे भाऊ येतोय, कपडे घेऊन.
स्वागतचा भाऊ अकलूजवरून स्वागतचे कपडे घेऊन येतं होता.
नशीब तो लगेचचं आला. मग स्वागतने त्याचे नवे कपडे देऊन जुने घेतले का जुने देऊन नवे असा काहीतरी प्रकार केला. तसं पाहिलं तर अकलूज काही लांब नव्हतं, पण स्वागतच लॉजिकच वेगळे असते.
साधारण साडे अकरा वाजता आम्ही पंढरपुरात दाखल झालो. मोहीम कधीचं पुढे निघून गेली होती. आज काही जास्त गर्दी नव्हती. सगळ्यांना पटापट दर्शन मिळालं.

विठ्ठल मंदिराविषयी थोडसे :
पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठलमंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात
पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे.
पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.
देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मत हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात.
दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे. मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवऱ्या व सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा-खांबीचे दगडी खांब कोरीव असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करतना उजव्या हातास संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकऱ्यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.
विठोबावे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात.
चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती यांबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर ५१६ मध्ये जयद्विट्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून, होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठलदेवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामघील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील कडूर तुलाक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे.बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर वा पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द व्युत्पादितात. चौऱ्याऐंशीच्या शिलालेखात (१२७३) पंढरपुरास फागनिपूर व विठेबास विठ्ठल किंवा विठल म्हटले आहे. १२६० ते १२७० च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. १२५८ च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचरिते ग्रंथात पंढरपूर, विठ्ठल मंदिर व तेथील गरुड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या १३११ च्या मराठी शिलालेखात पंडरिपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.
विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, कीसंत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामांजस्याचा दुवा सांधला जातो
वारकऱ्यांची टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते.
चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो.
इ.स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.
या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’त आणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वप्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदीर सु. २०० मी. आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. १०७ मी. व दक्षिणोत्तर रूंदी सु. ५२ मी. आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत. तसेच येथे गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरूंद दगडी मंडपाच्या (सोप्याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बांजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वतीआहेत. मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशी विश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात. यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मी. पेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता; तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबहिर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेशमंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरी तसेच लक्ष्मिमंदिर आहे. ओवरीत नारद व कोपऱ्यात रामेश्वर यांच्या मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे. जन्ममरणांच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.
११ नोव्हेंबर १९४७ रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त झाले. महात्मा गांधींचा विरोध असूनही साने गुरुजींनी सत्याग्रह करून हे शक्य करून दाखविले.
( विकिपीडिया वरून साभार)

डॉक्टर आणि त्यांचे भाऊ पण भेटले. ते लोकं पंढरपूरवरून कोल्हापूरला निघणार होते. डॉक्टरांना निरोप दिला आणि आम्ही मोहिमेच्या शोधार्थ निघालो.

अजून २१० किमी अंतर जायचं होतं. त्यात हडपसर ते पुणे असा रहदारीचा रस्ता होता. शिवाय मोहिमेचं पुण्यात जंगी स्वागत होणार, याची आम्हाला खात्री होतीच. तो क्षण आम्हाला मिसायचा नव्हता.
आम्ही बाईक सुसाट सोडली. मोहिमेचा काहीच पत्ता नव्हता. रोहनला फोन केल्यावर मोहीम निरा नदीच्या काठावर जेवणासाठी थांबल्याचं कळलं. निरेचा पूल ओलांडताना मोहीम आम्हाला दिसली. परत एकदा आम्ही मोहिमेत जाऊन मिळालो. हडपसर वगैरे सगळ्याचं भागात मोहिमेचं सहर्ष स्वागत झालं.
बरोबर सव्वा पाच वाजता आम्ही शनिवार वाडा गाठला. शनिवार वाड्यावर “इतिहास प्रेमी मंडळाने” मोहिमेचे स्वागत केले. तिथून आम्ही आमचा मोर्चा लाल महालाकडे वळवला.

पुन्हा शनिवारवाडा

15DSCN4096.JPGलाल महालाचा इतिहास :
पहिली गोष्ट म्हणजे हा महाल खरा लाल महाल नाही.
खऱ्या लाल महालाची जागा झांबरे- पाटील यांच्याकडून विकत घेतली होती. लाल महाल बांधून होईपर्यंत शिवाजी व जिजाबाई यांचा मुक्काम खेड शिवापूरला होता.
सन १६४९ ला जिजाऊ यांनी खेड शिवापूर सोडले व लाल महालामधे राहायला आले. पुढे शिवाजी महाराज राजगडावर राहायला जाईपर्यंत, म्हणजे साधारण सन १६४७ पर्यंत त्यांचा मुक्काम लाल महालातच असे.
लाल महालाचा पाया ५२ ½' x ८२ ½' व्यासाचा होता आणि उंची ३०½' होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचा मुक्काम राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या कालखंडात लाल महाल पूर्णपणे दुर्लक्षित होता. १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला. राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पूर्ण उध्वस्त केला. लाल महालामध्ये विहीर व कारंजे असल्याचे सांगितलं जाते. या वाड्याच्या जागीच १९२५ मध्ये जिजामाता उद्यान उभारण्यात आले असावे. लाल महालची रचना, त्यातील शिल्पकाम, चोरवाटा इत्यादी बद्दल जास्त माहिती उपलब्द नाही. सध्याचा लाल महाल १९८४ ते १९८८ या कालावधीत बांधण्यात आला. या लाल महालामध्ये बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा आहे.

लाल महालामधे शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांना अभिवादन करून आम्ही मुक्कामाला ज्ञान प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केद्रात आलो. तिथे इतिहास प्रेमी मंडळातर्फे एक छोटासा स्वागतपर कार्यक्रम आयोजित केला होता. वक्त्यांच भाषण झाल्यावर काहीजणांनी त्यांचे मोहिमेमधले अनुभव कथन केले. माझा दादा आणि वहिनी मला न्यायला आले होते. पण मोहिमेतल्या सदस्यांच्या आग्रहावरून आजची रात्र त्यांच्या बरोबरच राहायचे ठरले. दादाला उद्या सकाळी सकाळी तुझ्याकडे येतो असे सांगून त्याचा निरोप घेतला. रात्री मोहिमेची शेवटची सभा झाली. त्यात सगळा जमा-खर्चाचा हिशेब झाला. गुना,मध्य प्रदेशमधे असताना मला केलेला दंड गुरुजी विसरले नव्हते. मी देखील २०० रु. लगेच (?) जमा केले. रात्री आम्हाला सगळ्यांना मोहिमेची आठवण म्हणून टी-शर्ट देण्यात आले.
जाताना आम्ही जवळपास २५० जण होतो. आज शेवटच्या रात्री त्यातले ३९ जण बरोबर होतो. उद्यापासून परत सगळ्यांची तीच घिसीपिटी जिंदगानी सुरु होणार होती.
उद्या मी घरी जाणार होतो. आज आईला फोन करून उद्या सकाळीच घरी येणार असल्याचं कळवलं. स्वागत आज रात्रीच एका मित्राकडे राहायला निघून गेला.

आजचा प्रवास : २७० किमी
उद्याचा प्रवास : पुणे ते वाई

२६ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : पुणे ते वाई

सकाळी ६ वाजताच दादाचा फोन आला. पटकन उठ आणि निघ.
आता पर्याय नव्हता. अजून बरेचं जण झोपेतच होते. साडे सहा पर्यंत सगळे उठले. आज प्रजासत्ताक दिन होता. सगळ्यांचा निरोप घ्यायला जीवावर आलं होत.
दादाच्या घरी पोहचलो. वहिनी कॉलेजला निघाल्या होत्या. वहिनीला बस थांब्याजवळ सोडलं आणि वरती आलो.
दादाने आल्या आल्याचं पहिला प्रश्न केला?
अंघोळ कितीवेळा केलीस ?
कितीवेळा म्हणजे? दिवसाआड.
खरं सांग.
दोन-तीन दिवसातून करायचो रे एकदा.
आता खर खर सांग
मग मी मनातल्या मनात मोजायला सुरवात केली.
पाच वेळा.
हरामखोर, पहिला आंघोळीला जा.
मग मी मस्तपैकी अंघोळ केली. चहा घेतला.
आणि आम्ही दोघे बाईकवरून घरी निघालो.
वाईला जायचं म्हटलं कि बाईकचा वेग आपोआपच वाढतो.
वाटेत दादाला, घरी गेलं कि बाबांना बोलण्यात गुंतवून ठेवं म्हणजे हेल्मेटवर पडलेले scratches त्यांना न दाखवता मी घरात जातो इत्यादी गोष्टी सांगितल्या.
आणि बाईकने तासाभरातच पारगाव-खंडाळा गाठला. आता माझा सगळ्यात आवडता रस्ता सुरु झाला होता. खंबाटकी घाटात बाईक झोपवायला जी मजा येते, ती काही औरच. आणि नंतर सुरूर ते वाई हा दोन्ही बाजूंनी झाडीने झाकलेला रस्ता.
माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर असणाऱ्या काही क्षणांपैकी हे काही क्षण.
भद्रेश्वरचा कृष्णानदीवरील पूल लागला. कृष्णामाईचे आणि भद्रेश्वरचे सुखरूप परत घेऊन आणल्याबद्दल मनोमन आभार मानले.
दहाच्या सुमारास घरी पोहचलो.
बाबा नुकतेच ध्वजवंदन करून परत आले होते.
दादानी त्याचं काम चोख निभावलं. मी पटकन हेल्मेट माझ्या कपाटात ठेवलं.
बाबांनी आल्या आल्या, बाईक भोवती फिरून बघितलं. बाईक पडल्याचं त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मी पण मित्राच्या हातून पडली अशी थाप ठोकून दिली. बाबा जे समजायचं ते समजले.

२७, २८ दोन दिवस घरी राहिल्यावर २९ तारखेला रविवारी परत बाईकवर मुंबई गाठलं. रविवारी रात्री स्वागतने आणि आम्ही संपूर्ण मोहिमेचा खर्च काढला.
खर्च बघितल्यावर दोघांच्या पण चेहऱ्यावर एक मिश्कील हसू तरळलं.
पेट्रोल चा खर्च = ९००० रु. (प्रत्येकी ४५०० )
बाईकची दुरुस्ती आणि सर्विसिंग = ( ५०० रु.)
स्लिपिंग बॅगा = ८०० रु. प्रत्येकी
इतर खर्च = २००० रु.

म्हणजे आमची सगळी मोहीम एकंदरीत ८,००० रु मधे झाली होती.

३० जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ०९३०
स्थळ : मुंबईची लोकल

लोकलनी कुर्ला स्थानक सोडलं आणि मला बसायला जागा मिळाली. तेवढ्यात फोन वाजला.
Hello
Hello, Good morning, May I speak to Mr. Sarang Bhosale please
Yes, speaking
Good Morning Sarang, LBS College, Principle speaking
(हे वाक्य ऐकल्यानंतर माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता.)
Good morning Sir,
Sarang, I checked attendance register of your class, since last month you are absent. So we won’t be issuing you attendance certificate.
But sir, I was suffering from jaundice, I had already informed my Course in charge.
Sorry, we haven’t received any such kind of information. If any query please come and meet me personally.

मी पूर्णपणे घामाने भिजलो. मला पुढंच चित्र साफ दिसायला लागलं होतं,
धावत पळत कॉलेज गाठलं. पहिला वर्गात धावत गेलो. लेक्चर अजून सुरु नव्हतं झालं, सागर पण गायब होता.
तेवढ्यात माड्या दिसला. माड्याला झाला प्रकार सांगितला.
अंगदने मजा केली असेल रे, साल्या आमच्यापेक्षा जास्त तुझी attendance आहे.
तेवढ्यात सागर attendance register घेऊन येताना दिसला.
खरंच माड्याच खरं झालं होतं, माझी फक्त दोनदाच absenty लागली होती.
सागरच्या मागोमाग अंगद पण हसत आला.
आणि मी एक दीर्घ श्वास घेतला.

!! इति सारंगकृतं पानिपत स्तोत्रं संपूर्णम !!

तळटीप : मी रोज बाईक वर बसल्यावर हनुमान चालीसा म्हणायचो, पण ज्या ज्या दिवशी मी तो म्हणायला विसरलो, त्या त्या दिवशी आमच्यावर बाका प्रसंग गुदरला. योगायोग म्हणा अथवा अंधश्रद्धा Happy

Happy HAPPY BIKING Happy

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...