Wednesday, June 14, 2023

हिंगोली तालुक्यातील पर्यटनस्थळे

 मराठवाडा विभाग राज्य पुनर्रचनेच्या निजामकालीन संस्थानात समाविष्ट होता. हिंगोली उपविभाग हा तत्कालीन ब्रिटीश राजवटीच्या विदर्भ भागास लागून असलेला भूभाग निजाम संस्थानच्या सिमेवरील भाग म्हणून ओळखला जात होता. हिंगोली येथे तत्कालीन निजामाचे लष्करी ठाणे होते. लष्करी तुकड्या, लष्कराचे दवाखाने, घोडदळ व लष्कराच्या उपयोगासाठी जनावरांचा दवाखाना येथे होता. इ.स. 1803 मध्ये टिपू सुलतान-मराठा युद्ध व इ. स. 1857 मध्ये नागपूरकर भोसले यांची लढाई जनतेने पाहिली व अनुभवली आहे. आर्मी व मराठी सेनेने इंग्रजांचा केलेला यशस्वी प्रतिकाराचीही येथील जनता साक्षी आहे. हिंगोली येथे असलेल्या लष्करी छावणीमुळे हे शहर पूर्वीपासून हैदराबाद राज्यातील महत्वाचे शहर म्हणून प्रसिद्धी पावलेले आहे.

लष्करी ठाणे असलेल्या या शहरातील वस्त्यांना पूर्वीपासून प्रचलित असलेली पलटण, रिसाला, तोफखाना, पेन्शनपुरा, सदर बाजार ही नावे आजही कायम आहेत. हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल सुरू असून दसरा महोत्सवाची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
  स्वातंत्र्योत्तर काळात 1956 साली झालेल्या राज्य पुनर्रचनेत मराठवाडा विभाग तत्कालीन मुंबई राज्यास जोडण्यात आला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन परभणी जिल्ह्याचा हा भाग महाराष्ट्र राज्याचा घटक झाला. महाराष्ट्र राज्याच्या 39 व्या वर्धापनदिनी म्हणजे 1 मे 1999 रोजी आकाराने विस्तीर्ण असलेल्या परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती घेऊया...
इतिहास : प्राचीन काळात विंगुली, विंग मुल्ह, लिंगोली असा उल्लेख हिंगोलीबद्दल आढळतो. इ. स. ४९० मध्ये वाकाटक घराण्या-तील सर्वसेन या राजाने वत्सगुल्म नावाची एक शाखा स्थापन केली. या शाखेची राजधानी तत्कालीन वत्सगुल्म (आताचे वाशिम) राज्यातील नर्सी परगण्यातील हिंगोली एक गाव होते. नंतरच्या काळात कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव या घराण्यांच्या सत्ताही या प्रदेशात राज्य करीत होत्या. जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रास आमर्दकक्षेत्र म्हटले जात असे, असा उल्लेख राष्ट्रकूटांच्या ताम्रपटात आढळतो. मध्ययुगीन काळात या प्रदेशावर मोगल, इमादशहा, आदिलशहा, निजामशहा यांचे आधिपत्य होते. शिखांचे दहावे व अंतिम गुरू गुरुगोविंदसिंह हे पंजाबमधून मोगल बादशहा बहादूरशहा याच्यासमवेत दक्षिणेत आले असता १७०८ मध्ये त्यांनी जिल्ह्यातील वसमत येथे तळ (डेरा) उभा केला.
     सालारजंग या निजामाने ब्रिटिशांसमवेत केलेल्या तहानुसार १८५३ मध्ये परभणी जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यात हिंगोली जिल्ह्यातील प्रदेशाचा समावेश होता. १८५९ मध्ये जिल्ह्यातील वसमत येथे रोहिल्यांचे आणि ब्रिटिशांचे युद्ध झाले. हैदराबादचा निजाम व ब्रिटिश यांच्या राज्याच्या सीमा सांप्रतच्या हिंगोली जिल्ह्यात परस्परांना स्पर्श करीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हैदराबाद संस्थानाने येथे लष्करी छावणी उभारली होती. १९०३ पर्यंत ही छावणी हिंगोली शहरात अस्तित्वात होती. १९३६ पर्यंत हिंगोली जिल्ह्याचा समावेश नरसी परगण्यात होत होता. १ मे १९९९मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीय सोयींसाठी जिल्ह्यात दोन उपविभाग असून हिंगोली उपविभागात हिंगोलीसह कळमनुरी व सेनगाव या तालुक्यांचासमावेश होतो, तर वसमत उपविभागात वसमत आणि औंढा नागनाथ यातालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्याच्या निर्मितीबरोबरच जिल्हा परिषदेची स्थापना झाली असून पाचही तालुक्यांमध्ये पंचायत समित्या कार्यरत आहेत. हिंगोली, वसमत व कळमनुरी या तीन नगरपरिषदा आहेत. जिल्ह्यात एकूण ७१० महसुली गावे असून ५६५ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात विधानसभेचे तीन, तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. 

पाण्याची कमतरता आणि जंगलाची विरळता यांमुळे जिल्ह्यात जंगली प्राणी व पक्षी फार कमी प्रमाणात आढळतात. बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी येथे आढळतात. खडकाळ व टेकड्यांच्या जंगलभागात बिबळ्या आढळतो. इतरत्र अभावाने आढळणारा रोही हा प्राणी येथे विपुलतेने आढळतो. पक्ष्यांमध्ये कबूतर, सफेद तितर, काळे तितर तसेच अल्प प्रमाणात मोर आढळतात. येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणांच्या बाजूला स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने हिवाळ्यात आढळतात. या परिसरात हिरवे कबूतर (हरोळी) हा महाराष्ट्राचा राज्यपक्षीही आढळतो. हिंगोली जिल्हा सापांच्या प्रजातींबाबत संपन्न असून त्यात मण्यार, पट्टेरी मण्यार, नाग, घोणस, फुरसे, गवत्या, हरणटोळ, पाणसाप, मांजरसाप इ. सापांचे बहुसंख्य प्रकार आढळतात.
      हिंगोलीला वाङ्मयीन पार्श्वभूमी लाभली असून येथील नाटककार व नट श्रीपाद नृसिंह बेंडे प्रसिद्ध आहेत. मराठी कथेत मोलाची भरघालणारे बी. रघुनाथ हे मूळचे हिंगोलीचे होत. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, कीर्तनकार व प्रभावी वक्ते राम शेवाळकर यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील शेवाळे हे होय. एकोणिसाव्या शतकातील सुप्रसिद्ध संत पूर्णानंद महाराज यांचे वास्तव्य शेवाळे येथे होते. ख्यातनाम मराठी साहित्यिक व विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे जन्मस्थळ वसमत तालुक्यातील कुरुंदा हे आहे. वासुदेव, वाघ्यामुरळी, गोंधळी या समाजघटकांद्वारे जिल्ह्यात लोकसाहित्य जपले गेले आहे. येथील समाजजीवनावर वर्‍हाडी वळणाचा प्रभाव असून भाषेवर वर्‍हाडी भाषेचा प्रभाव आहे. मुसलमानी अमलाखाली हा प्रदेश राहिल्याने येथील भाषेत उर्दू शब्द आढळतात. 

महत्त्वाची स्थळे : भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ मंदिरासाठी औंढा नागनाथ हे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. मंदिराचे बांधकाम देवगिरीच्या यादवांच्या काळातील म्हणजे तेराव्या शतकातील आहे. मंदिराचा सर्वांत प्राचीन भाग त्याचे अधिष्ठान (जोते) असून ते चार थरांमध्ये आहे. कीर्तिमुख, गज, अश्व, व नर असा थरांचा क्रम असून नर थरात मानवी शिल्पाकृती व देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे गर्भगृह, अंतराळ, सभामंडप असे भाग दिसतात. बाहेरील बाजूस अर्थमंडप व मुखमंडप असून त्यांच्या पायऱ्यांच्या कठड्यावर हत्ती व घोडे यांच्या शिल्पाकृती आहेत. त्यामुळे देऊळ मिरवणुकीच्या रथाप्रमाणे दिसते. प्राचीन काळी वसुमती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत येथे सुन्नी पंथीय मुशाफीर शहाचा दर्गा तसेच शुकानंद महाराजांचा मठ आहे. शिरड शहापूर येथे मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. जिल्ह्यातील नर्सी हे संत नामदेवांचे जन्मस्थान म्हणून पर्यटकांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांचे वास्तव्य औंढा नागनाथ येथे होते. यांशिवाय हिंगोली, कळमनुरी, कुरुंदा, गिरगाव, डोंगरकडा, वसमत, एरंडेश्वर, शेवाळे ही इतर महत्त्वाची स्थळे आहेत.

हिंगोली शहर

हिंगोली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या शहरास निजामकालीन लष्करी ठाणे म्हणून ऐतिहासिक महत्व आहे. परभणी शहरापासून 78 कि. मी. तर नांदेडपासून 90 कि.मी. अंतरावर हिंगोली शहर आहे. हिंगोली रेल्वे मार्गाने जोडलेले आहे तसेच हे या भागातील प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.

एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू होण्यापूर्वी मराठवाड्यातील हिंगोली हे एक कापूस खरेदी-विक्री व्यवहाराचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे या परिसरात जिनींग प्रेसींग फॅक्टरीज अस्तित्वात आहेत. शहरापासून जवळच जलेश्वर हे मंदिर विस्तीर्ण तळ्याच्या परिसरात वसलेले असून या तलावात विविध रंगाची कमळाची मनमोहक फुले असल्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला आहे.

दसरा महोत्सव

हिंगोली शहरात स्वर्गीय मानदासबाबा यांनी 151 वर्षांपूर्वी दसरा महोत्सव सुरू केला. दसरा महोत्सवानिमित्त 10 दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजनपर तसेच प्रदर्शनी व रावणदहन आदी उपक्रम राबविले जातात. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाड्यातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासियांसाठी आकर्षण ठरला आहे. दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर व सदगुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला लाभली आहे.
हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्याला राजाश्रय लाभला तर हिंगोलीच्या दसऱ्याला लोकाश्रय. हा लोकाश्रय इतका उदार आहे की म्हैसूरच्या खालोखाल क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
फार पूर्वी कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठाच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा सुरु झाली, असे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही पंरपरा हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपुरी पडू लागली आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन होऊ लागले. आता हा महोत्सव हिंगोलीतील समस्त जाती-धर्मांच्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
सन 1855 पासून परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे समस्त हिंगोलीवासियांनी अभिमानाने जतन केले आहे. भाद्रपद पोर्णिमेला बांसाफोड या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. घटस्थापना ते रामराज्याभिषेक असा 9 ते 10 दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय.

हिंगोली जिल्हा पर्यटन स्थळे

 औंढा नागनाथ :-

भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ हे 8 वे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मुख्य मंदिराभोवती बारा ज्योतिर्लिंगाचे लहान मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. औंढा नागनाथ तालुक्याचे ठिकाण असून हिंगोली पासून 24 कि.मी. अंतरावर आहे. परभणी व नांदेड शहरापासून औंढा नागनाथ साधारणत: 55 ते 60 कि.मी. अंतरावर आहे. राज्य शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास योजनेत औंढा नागनाथचा समावेश करण्यात आला असून याठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून भक्तनिवास, बालोद्यान, रस्ते, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 
   मंडळी, आपल्या महाराष्ट्राला “संतांची भूमी” म्हटलं जातं ते काही उगीच नाही ! इथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताई, संत चोखामेळा यांच्यासारखे अगणित संतमहात्मे होऊन गेले, ज्यांनी साक्षात विठ्ठलाला येणं केलं. त्यांच्यातीलच एक संत नामदेव. संत ज्ञानेश्वरांच्या उपदेशावरून ते गुरु करण्यासाठी औंढा नागनाथ मंदिरात आले. त्यांनी पाहिलं की एक सद्गृहस्थ शिवलिंगावर पाय ठेवून आराम करत आहेत. “हा भगवान शंकरांचा अपमान आहे”, असं म्हणत नामदेवांनी त्यांना पिंडीवरून पाय काढण्यास सांगितले. त्यावेळी ते सद्गृहस्थ म्हणाले, “तुम्हीच माझे पाय उचलून दुसरीकडे ठेवा.” संत नामदेवांनी लागलीच तसं केलं, पण भूमीतून दुसरी पिंड वर आली. संत नामदेवांनी त्यांचे पाय तिथून काढून तिसरीकडे ठेवले, तर तिथे तिसरी पिंड वर आली. असं करत करत संपूर्ण मंदिर शिवलिंगांनी भरून गेलं. त्यावेळी संत नामदेवांनी त्यांना लोटांगण घातलं व शरण गेले. हेच संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर ! त्यांच्याच उपदेशांनी संत नामदेवांचे जीवन तरले.
 
एके दिवशी संत नामदेव या मंदिरात पूजेसाठी आले होते. त्याकाळी जातीपातीचं खूप मोठं अवडंबर माजलं होतं. आणि आपले संत हे ब्राम्हण नव्हते. संत नामदेव तर शिंपी होते. त्यामुळे मंदिरातील ब्राम्हण पुजाऱ्यांनी त्यांना तिथून उठण्यास सांगितलं. ते म्हणाले, “तुम्ही मंदिरात कसे आलात ? देवाला भ्रष्ट केलंत. मंदिराच्या मागे जाऊन जे काही कीर्तन करायचं ते करा. इथे आमच्या पूजेत व्यत्यय नको.” संत नामदेवांना खूप वाईट वाटलं. ते शांतपणे तिथून उठले व मंदिराच्या मागील बाजूस बसून पूजा करू लागले. त्यांची ही भक्ती आणि निष्ठा बघून भगवंताने चक्क मंदिराचं मुख फिरवलं. पूर्वाभिमुख असलेलं मंदिर पश्चिमाभिमुख झालं, ते आजतागायत तसंच आहे. हेच कारण आहे की, या मंदिराला औंढा (उलटा) नागनाथ मंदिर नाव पडलं व तेच पुढे प्रचलित झालं. यापूर्वी ते नागनाथ मंदिर म्हणूनच ओळखलं जायचं. मंडळी, यावरून आपल्याला एकाच शिकवण मिळते की भगवंताला सगळीच समान आहेत. त्याच्याकडे उच्च-नीच असा भेद नाही. जो त्याची निष्ठेनं भक्ती करेल त्याच्याकडे तो आनंदाने जातो. म्हणूनच म्हटलंय, “भगवंत भावाचा भुकेला | भावार्थ पाहुनी भुलला ||”

     मंडळी, असं हे बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ मंदिर, जे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. हे मंदिर फार पुरातन आहे, अगदी द्वापारयुगापासून ! असं म्हणतात की आपल्या वनवासकाळात पांडव इथे काही काळ वास्तव्यासाठी थांबले होते. त्यावेळी गाई जवळच्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी जात असत. पाणी प्यायल्यानंतर त्यांचं दूध आपोआप त्यामध्ये वाहून जात असे. जणू काही गाई सरोवराला ते भेट म्हणून देतायत. एके दिवशी भीमाने हे दृश्य पाहिले व ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिराच्या कानावर घातले. त्यावेळी दह्र्मराज युधिष्ठिर म्हणाले, “नक्कीच इथे एखादी दिव्य शक्ती आहे.” त्यांनी ज्या दिशेने पाणी वाहत होतं तिथे शोध घेतला, तेव्हा त्यांना नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी इथे मंदिर बांधले. स्थानिकांच्या सांगण्यानुसार हे मंदिर सात मजली व भव्य होते. पण मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने ते उध्वस्त केले. नंतर केवळ मंदिराचा खालचा भाग शाबूत  होता.
 
त्यावेळी देवगिरीच्या यादवांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणूनच मंदिराचा खालचा व कळसाचा भाग वेगवेगळे दिसतात. मंडळी, औंढा नागनाथला “दारुकावन” असंही म्हटलं जातं. एका प्रचलित आख्यायिकेनुसार इथे एक दारूका नावाची राक्षसीण राहत होती. ती स्थानिकांना खूप त्रास द्यायची. त्यावेळी त्यांनी भगवान शंकराला साकडं घातलं व दारूकाच्या त्रासापासून सुटका मिळवून देण्याची विनंती केली. भगवान शंकरांनी दारूकाला ठार केलं, पण मरण्यापूर्वी तिने भगवान शंकरांकडे “तिचं नाव सतत आठवणीत राहिल व त्या ठिकाणाशी जोडलं जाईल” असा वर मागितला. भगवान शंकरांनी “तथास्तु” म्हटलं व ते “दारुकावन” या नावाने ओळखलं जाऊ लागलं. एव्हाना आपल्याला कळलं असेल कि मंदिर जितकं प्राचीन असतं तितका त्याचा इतिहास मोठा असतो आणि औंढा नागनाथ मंदिरही त्याला अपवाद नाही. 
 
हेमाडपंथी शैलीत बांधलेलं हे मंदिर त्यावरील कोरीवकामामुळे जास्त लोभस दिसतं. मंदिराच्या शिल्पपट्टीवर शिवपार्वती, श्रीविष्णू, ब्रम्हदेव, श्रीदत्तात्रेय, नीळकंठेश्वर, गणपतीबाप्पा, गौतम बुद्ध, यती इत्यादींच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मधला गोलाकार मंडप व त्यावरील घुमट आठ अष्टकोनी कलाकुसरींच्या खांबांवर उभारलेला आहे. औंढा गावाच्या दक्षिणेकडील मंदिरातील कनकेश्वरी हि नागनाथपत्नी मानली जाते. औंढा नागनाथ हे आठवं (आद्य) ज्योतिर्लिंग मानलं जातं. त्यामुळे त्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. 
 नागनाथ मंदिरातील भिंतीवरील शिल्पपट्ट, औंढा नागनाथ.
नागनाथ मंदिरातील भिंतीवरील शिल्पपट्ट, औंढा नागनाथ.
 ६०००० चौरस फूट क्षेत्रावर बांधलेलं हे विस्तीर्ण मंदिर म्हणजे भारतीय स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराची आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. मंदिराच्या आवारात एक मोठा पराकोट असून त्याला चार प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. हेच मुख्य प्रवेशद्वार ! मंदिराच्या आवारात एक पायविहीरही आहे. तिला नागतीर्थ असंही म्हणतात. पूर्वीचे लोक तिलाच “सासू-सुनेची बारव” असं संबोधतात. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहेत. या सभागृहातून चिंचोळ्या वाटेने कोरलेल्या दगडी पायऱ्या उतरून खाली जायचं. चार दगडी खांबांच्या मध्ये हे स्वयंभू शिवलिंग आहे. शिवाय मंदिराच्या विस्तृत आवारात इतर ठिकाणच्या ज्योतिर्लिंगांचीही लहान लहान मंदिरं आहेत. महाशिवरात्र आणि विजयादशमीला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. या काळात मंदिराच्या परिसराला उत्सवाचं स्वरूप आलेलं असतं.







     मग एकदातरी हिंगोलीतील हे वैभव “याचि देही याचि डोळा” न्याहाळायला हवंच. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकासाचा प्रस्ताव मंदिर प्रशासनाने तयार केलेला आहे. येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह पर्यटकांना राहण्यासाठी उपलब्ध आहे. मंदिरापासून 1 कि.मी. अंतरावर प्रेक्षणीय असे नागनाथ उद्यान आहे.
औंढा नागनाथ मंदिराकडे कसं पोहोचायचं ?
औंढा नागनाथ मंदिर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात स्थित आहे. तिथे पोहोचण्यासाठी औरंगाबाद हे जवळचे विमानतळ तर परभणी हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. तसेच परभणी, लातूर व नांदेडहून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय खाजगी जीप करूनही इथे पोहोचता येईल. राहण्यासाठी भक्त निवास उपलब्ध आहे, पण अगदी पायाभूत सुविधा आहेत. इथे खाण्यापिण्यासाठी लहान-मोठे हॉटेल्सही उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवास करताना आपल्या राहण्याची, खाण्याची नीट तजवीज करूनच निघा.

नर्सी नामदेव

   नर्सी हे संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असून त्यांचा इ.स. 1270 मध्ये जन्म झाला होता. नर्सी हे कयाधू नदीच्या काठी वसलेले आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या एकादशीस व आषाढी एकादशीस मोठी यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात. संत नामदेव महाराज हे शिख समाजाचे आदरणीय संतपुरूष असल्याने नांदेड येथील गुरूद्वारा बोर्डाच्या पुढाकाराने येथे गुरूद्वारा, नदीवरील घाट वाहतुकीचे रस्ते, विश्रामगृह आणि व्यापारी संकुल बांधण्याची योजना कार्यान्वित होत असून त्यात महाराष्ट्र शासनाचे मोठे योगदान आहे..सरकारने नरसी येथील पर्यटनस्थळ बांधले आहे. पंजाब मधील त्यांच्या अनुयायांनी,बाकीचे भारताचे अनेक अनुयायी आहेत जे नार्सीला वारंवार येतात शीख अनुयायी नरसी येथील गुरुद्वारा बांधत आहेत आणि त्यांनी संत नामदेव यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.संत नामदेवांचे जन्मस्थळ, नार्सी, तालुका हिंगोली.संत नामदेवांचे जन्मस्थळ, नार्सी, तालुका हिंगोली.

     नर्सीचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात आला असून या निधीतून जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, यात्री निवास, वाहनतळ, सांस्कृतिक सभागृह, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह पाणीपुरवठा, बाग-बगीच्या, विद्युतीकरण आदी कामे सुरू आहेत. हिंगोली शहरापासून 17 कि.मी. अंतरावर नर्सी नामदेव असून प्रती पंढरपूर म्हणून नर्सीची ओळख आहे.

आसेगाव

हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव ता. वसमत हे गाव जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान आहे. या गावात संपूर्ण महाराष्ट्रातील व इतर भागातील जैन भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

सिद्धेश्वर धरण

औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण बांधण्यात आलेले आहे. सदर धरणाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांची योजना पूर्ण झाली असून यामध्ये बाग बगीचा, सुशोभीकरण, पर्यटक निवास, अंतर्गत रस्ते व पोच मार्ग निर्माण करण्यात आले आहेत.सिद्धेश्वर धरण, सिद्धेश्वर.सिद्धेश्वर धरण, सिद्धेश्वर.
 याशिवाय औंढा व वसमत तालुक्याच्या सिमेवर बाराशीव हनुमान मंदीर असून मंदिराची जागा परिसरातील 12 गावांची सीमा एकाच ठिकाणी येतात म्हणून बाराशीव हनुमान मंदीर असे नाव पडले आहे. तसेच सेनगाव तालुक्यातील खैरीघुमट येथे हटकर समाजाचे पुरातन मंदीर आहे.

औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथील महादेव मंदीर, सिद्धनाथ मंदीर, शिरड शहापूर येथील जैनमंदीर, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जटाशंकराचे मंदीर व लमाणदेव यात्रा, हजरत सय्यद नुरोद्दीन ऊर्फ नुरीबाबा यांचा दर्गा व हिंगोली शहरातील चिराग शहा तलाव आदी धार्मिक व इतर प्रेक्षणीय स्थळे पाहता हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.

गुरु गोविंदसिंग गुरुद्वारा, वसमत.
गुरु गोविंदसिंग गुरुद्वारा, वसमत.



दिगंबर जैनची मूर्ती

मल्लिनाथ दिगंबर जैन

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरद शहापूर गावात जैन समाजातील सर्वात ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. 300 वर्षे जुने असलेले लॉर्ड मल्लिनाथ यांचे…


श्री मल्लिनाथ दिगंबर जैनमंदिर, शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ.
श्री मल्लिनाथ दिगंबर जैनमंदिर, शिरड शहापूर,
दक्षिणमुखी महादेव मंदिर, अंजनवाडा.
दक्षिणमुखी महादेव मंदिर, अंजनवाडा.

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...