मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे आशिया (६५% लोकसंख्या भारतीय वंशज), युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकांचे वास्तव्य आहे.
जगाच्या भूगोलामध्ये मॉरिशियस देशाचे एक वेगळेच स्थान आहे. मॉरिश या देशांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत जे या देशाला इतर देशांपासून वेगळे दाखवते जसे की या देशाची भाषा वेशभूषा संस्कृती बिझनेस धर्म आणि राहणीमान वेगळा आहे ज्यामुळे ते या देशाला विशेष बनवते.भारतीय लोककथेनुसार प्रभू रामचंद्रांनी हल्ला केल्यावर मारीच राक्षसाने या देशात आश्रय घेतलेला म्हणून याच नाव मॉरिशस अस म्हणतात.
मॉरिशस. फ्रेंच भाषेत त्याला म्हणतात, "मॉरीस'. हा देश म्हणजे एक बेटच आहे. भारत आणि मॉरिशसचे अगदी अठराव्या शतकापासून घनिष्ठ संबंध आहेत. मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर सद्य:स्थितीत मॉरिशसच्या राजकारण व समाजकारणावर पूर्णपणे मराठी पगडा आहे. आफ्रिका खंडातील महाराष्ट्र म्हणजे मॉरिशस.
भारताचा आणि मॉरिशसचा संबंध तसा खूप जुना, म्हणजे साधारण सन १७३०पासूनचा! १७३०मध्ये पाँडेचेरी आणि तामिळनाडूमधून काही कामगार येथे आणण्यात आले तेव्हापासून खरं तर भारत आणि मॉरिशसचे नाते निर्माण झाले. मॉरिशस येथे ऊस खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे साधारणपणे १८२०च्या सुमारास भारतीय कामगारांना गुलाम म्हणून येथे उसाच्या लागवडीसाठी आणण्यात येत असे. १८३४मध्ये जेव्हा गुलामी बंद झाली त्यानंतर हेच कामगार, मजूर लोक काही करार करून येथे आणण्यात येऊ लागले.
२ नोव्हेंबर १८३४ ला सर्वात पहिला मजुरांचा एक ग्रुप ‘अॅटलास’ या जहाजाने मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे आणण्यात आला. ज्या Immigration Depotला हा ग्रुप आला त्याला आज लोक ‘आप्रवासी घाट’ असेच म्हणतात. पोर्ट लुईसमधील हा आप्रवासी घाट २००६मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केला आहे. १८३४पासून २०व्या शतकाच्या पूर्वार्धात जवळजवळ ५० लाख मजूर भारतातून येथे आणण्यात आले. कालांतराने त्यापैकी दोन तृतीयांश लोक कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करून राहिले. येथे आलेल्या भारतीयांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र येथील लोकांचे प्रमाण खूप मोठे आहे.
हे झाले ऐतिहासिक संबंधाबद्दल; पण खरे परराष्ट्रीय संबंध सुरू झाले ते म्हणजे १९४८ सालापासून आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध असल्यामुळे हे अजून दृढ होत गेले. आज बघितलं तर आपल्याला दिसून येते की, मॉरिशस येथील ७०% लोकसंख्या ही भारतीय आहे. हिंदी महासागरातील चाचेगिरी आणि आतंकवाद यांना संपुष्टात आणण्यासाठी भारताने जो पवित्रा घेतला आहे, यात मॉरिशस कायम भारताबरोबर राहिला आहे. येथे असलेल्या भारतीयांच्या लोकसंख्येमुळे मॉरिशसशी असलेल्या व्यापारिक संबंधामुळे येथील चलनदेखील "Rupees' हेच आहे. फक्त "मॉरिशियन Rupees, MUR' म्हणून ओळखले जाते. म्हणजे, १ MUR हे १.७७ INR भारतीय Rupee/s.
१) मॉरिशस हे हिंदी महासागरात स्थित एक बेट राष्ट्र आहे. मॉरिशियस प्रजासत्ताक देश हा आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून आग्नेय दिशेला हिंद महासागरात, पश्चिमेला मादागास्कर बेटासोबत स्थित असलेला एक बेट आहे.सन १५९८ मध्ये,मसाल्याच्या व्यापार्याच्या मार्गावर असलेल्या बेटांच्या मार्गावर तीन डच जहाजांनी सर्वप्रथम प्रवास केला आणि नासाऊच्या प्रिन्स मॉरिसच्या सन्मानार्थ त्याचे नाव मॉरिशियस ठेवले.
२) हे बेट प्रथम १७ व्या शतकात डच लोकांनी स्थायिक केले होते, परंतु काही दशकांनंतर त्यांनी वसाहत सोडली.
३) १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच लोकांनी बेटावर ताबा मिळवला आणि साखर उद्योगाचा विकास केला. फ्रान्स देशाने १७१५ मध्ये मॉरिशियसवर कब्जा केला आणि त्याला आपली वसाहत म्हणून घोषित केले आणि त्याचे नाव आयल डी फ्रान्स ठेवले आणि १२ मार्च १९६८ रोजी स्वतंत्र घोषित केले.
४) मॉरिशस हे हिंदी महासागरात स्थित एक बेट राष्ट्र आहे. मॉरिशियस देशाचे एकूण क्षेत्रफळ 2,040 चौरस किमी आहे.
५) हे बेट प्रथम १७ व्या शतकात डच लोकांनी स्थायिक केले होते, परंतु काही दशकांनंतर त्यांनी वसाहत सोडली.
६) १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच लोकांनी बेटावर ताबा मिळवला आणि साखर उद्योगाचा विकास केला.
७) १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, ब्रिटीशांनी मॉरिशसवर ताबा मिळवला आणि साखर उद्योगाचा विकास करणे सुरू ठेवले.
८) १८३५ मध्ये मॉरिशसमध्ये गुलामगिरी संपुष्टात आली.
९) १९६८ मध्ये, मॉरिशसला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले आणि ते संसदीय लोकशाही बनले.
१०) मॉरिशसने कृषी अर्थव्यवस्थेतून वैविध्यपूर्ण, उच्च उत्पन्नाच्या अर्थव्यवस्थेत बदल केले आहे.
११) मॉरिशस हा एक बहुसांस्कृतिक आणि बहुजातीय समाज आहे, ज्यामध्ये आफ्रिकन, भारतीय, चीनी आणि युरोपीय प्रभावांचे मिश्रण आहे.मॉरिशियस देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, त्यातील मुख्य म्हणजे हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लाम आहे. हा एकमेव आफ्रिकन देश आहे ज्या ठिकाणी हिंदू बहुसंख्य आहेत.
१२) मॉरिशियस देशाची अधिकृत भाषा इंग्रजी आहे आणि इतर मान्यताप्राप्त भाषा मॉरिशियस क्रेओल, फ्रेंच आणि हिंदी आहेत.
१३) राजधानी शहर पोर्ट लुई आहे.
१४) जागतिक बँकेच्या मते, 2016 मध्ये मॉरिशियस देशाची एकूण लोकसंख्या 1.26 दशलक्ष होती.
१५) मॉरिशस पांढर्या-वाळूचे किनारे, नीलमणी पाणी आणि हिरवीगार जंगले असलेले, उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.
१७) मॉरिशस आफ्रिकन युनियन, कॉमनवेल्थ आणि संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे.
१८) पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेसाठी देशाची दृढ वचनबद्धता आहे आणि या प्रदेशात अक्षय ऊर्जा विकासात आघाडीवर आहे.
मॉरिशियस देशाच्या काही ऐतिहासिक घटना
- 17 सप्टेंबर 1598 – डच खलाशांनी मॉरिशियस देशाचा शोध लावला.
- 01 फेब्रुवारी 1835 – मॉरिशियस देशामध्ये गुलामगिरी संपुष्टात आली.
- 08 नोव्हेंबर 1965 – युनायटेड किंगडमने मॉरिशियसमधील चागो द्वीपसमूह आणि सेशेल्समधील अल्दाब्रा, फारकहार आणि डेशेरक्स बेटांचे विभाजन करून ब्रिटिश हिंदी महासागर प्रदेश तयार केला.
- 12 मार्च 1968 – मॉरिशियसला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 29 जून 1976 – सेशेल्स युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला. सेशेल्स, अधिकृतपणे सेशेल्स प्रजासत्ताक, हिंद महासागरातील एक द्वीपसमूह आहे. 115-बेटांचा देश, ज्याची राजधानी व्हिक्टोरिया आहे, मुख्य भूमीच्या दक्षिणपूर्व आफ्रिकेच्या पूर्वेस 1,500 किलोमीटर (932 मैल) आहे. इतर जवळील बेट देश आणि प्रदेशांमध्ये पश्चिमेला झांझिबार आणि दक्षिणेला कोमोरोस, मेयोट, मादागास्कर, रियुनियन आणि मॉरिशियस यांचा समावेश होतो.
मॉरीशस देशाचा भूगोल (Geography Mauritius Country)

हवामान :
मॉरिशसमधील प्राणी
मॉरिशसमधील वनस्पती
वनस्पती व प्राणी:
राज्यव्यवस्था:
राज्यकारभाराच्या सोयीसाठी मॉरिशस बेटाचे एकूण नऊ प्रशासकीय विभाग (जिल्हे) पाडण्यात आले आहेत. त्यांपैकी सात किनारी व दोन अंतर्गत जिल्हे आहेत. गावपातळीवरचा ग्रामपरिषद हा स्थानिक प्रशासनाचा सर्वांत लहान घटक आहे. १९८२ मध्ये अशा ९८ ग्रामपरिषदा होत्या. ग्रामपरिषदेत निर्वाचित व नियुक्त सदस्य असतात. ग्रामपरिषदेपेक्षा वरच्या पातळीवर जिल्हा परिषदा असून त्यांची संख्या तीन आहे. मुख्य नगरांमध्ये नगरपालिकेतर्फे कारभार पाहिला जातो. नगरपालिकेत २४ निर्वाचित सदस्य असतात. पोर्ट लूई नगरपालिकेत ३० निर्वाचित सदस्य आहेत. एखाद दुसरा अपवाद सोडल्यास मॉरीशसचे सर्व पंतप्रधान हे भारतीय मूळ असलेले राहिले आहेत.
न्याय व संरक्षण:
मॉरिशसमधील कायदे प्रामुख्याने जुन्या फ्रेंच नियमावलींवर व इंग्लिश पूर्वोदाहरणांवर आधारित आहेत. सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य व इतर सहा न्यायाधीश असतात. याशिवाय देशात फौजदारी अपील, दिवाणी अपील, लवाद, औद्योगिक व दहा जिल्हा न्यायालये आहेत. अंतिम अपील ग्रेट ब्रिटनमधील प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायदान समितीकडे करावे लागते. पोलीसबल व निमलष्करी बल हे देशाच्या संरक्षणास जबाबदार असते. १९८१ मध्ये त्यांची एकूण संख्या ४,०७७ होती.
वाहतूक व संदेशवहन:
मॉरिशसमध्ये एकूण १,७७० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी ९०% रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. १९८३ मध्ये जागतिक बँकेने रस्ते विकासासाठी १५·२ द. ल. अमेरिकी डॉलर इतके कर्ज दिले आहे. देशात एकूण ५०,२४६ खाजगी वाहने (मोटारगाड्या, मोटारसायकली, स्कूटर इ.), २०,४०६ व्यापारी वाहने (मोटारगाड्या, बसगाड्या इ.) व २,५६८ सरकारी वाहने होती (१९८३). पोर्ट लूई ह्या खोल सागरी बंदराचे आधुनिकीकरण १९८० पर्यंत पूर्ण करण्यात आले असून त्याच वर्षी येथून २०,२५,००० टन माल हाताळण्यात आला. रोड्रीगेस बेटावरील मॅथुरिन या खोल सागरी बंदराची निर्मिती करण्यात आली असून (१९८०) माएबूर येथेही बंदराचा विकास करण्याची सरकारची योजना आहे. यूरोप मॉरिशस यांदरम्यानची प्रवासी व मालवाहतूक सेवा ब्रिटिश, फ्रेंच व स्कँडिनेव्हिअन कंपन्यांकडून नियमित पुरविली जाते. डच कंपनी आशिया, दक्षिण आफ्रिका व दक्षिण अमेरिकेच्या बंदरांशी प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरविते. भारताशी मालवाहतूक सेवा चालू आहे. स्थानिक कंपनी मॉरिशस ते रोड्रीगेस, मादागास्कर, आफ्रिकी देश व ऑस्ट्रेलिया यांदरम्यानची वाहतूक सेवा पुरविते. ट्रौ फॅनफॅरॉन या मासेमारी बंदराच्या विकासाचे काम १९८३ पासून सुरू झाले आहे. हवाई सेवा पुरविण्याचे काम आठ कंपन्यांद्वारे केले जाते. त्यांपैकी एअर मॉरिशस या हवाई वाहतूक कंपनीत ४२% भाग शासनाचा आहे. ही कंपनी मॉरिशस बेटावरील मुख्य विमानतळ प्लाईसान्स ते रोड्रीगेस यांदरम्यान आठवड्यातून सहा वेळा हवाई वाहतूक सेवा देते. प्लाईसान्स विमानतळाचे आधुनिकीकरणाचे काम १९८४ पासून सुरू झाले असून ते तीन टप्प्यांत पूर्ण व्हावयाचे आहे. मॉरिशस बेटावर सर्वत्र टपाल, तार आणि दूरध्वनी सेवा पुरविण्यात आल्या आहेत. शासननियंत्रित ‘मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ कडून रेडिओ आणि दूरचित्रवाणी कार्यालय प्रसारित केले जातात. देशात ३८,५६१ दूरध्वनी संच (१९८१), ७,१९,११२ रेडिओ संच व ९१,०१९ दूरचित्रवाणी संच वापरात होते (१९८४).
लोक व समाजजीवन :
भिन्न संस्कृतीच्या लोकांमुळे मॉरिशस येथील खाद्यसंस्कृतीदेखील खूप समृद्ध आहे. येथील खाद्यसंस्कृतीवर क्रिओल, चायनीज, युरोपिअन आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. येथे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे येथील फ्रेंच डिशेस प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये बौलीयन, तुना माशाचे सलाड, दौबे यांसारखे मांसाहारी पदार्थ फ्रेंच वाईन सोबत वाढले जातात. १९व्या शतकात तेथे गेलेल्या भारतीयांनी आपली उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृती तेथे रुजवली. आपल्या मुंबईत मिळणाऱ्या वडापाव सारखाच तेथे "ढोलपुरी' नावाचा एक पदार्थ मिळतो, जो स्थानिक पदार्थ म्हणून खूप प्रसिद्ध आहे. १९व्या शतकानंतर येथे चिनी लोक आल्यामुळे चायनीज पदार्थांची येथे चलती आहे. चायनीज लोकांनी येथील खाद्यपदार्थात भात आणि ‘स्टेपल डायट’ नावाची संकल्पना रुजविली. चायनीज आणि इतर एशियन रेस्टॉरंटची येथे रेलचेल आहे. एखाद्या एशियन हॉटेलमध्ये जेवण म्हणजे मॉरिशसच्या लोकांसाठी मेजवानीच!!
मॉरिशियस देशाची भाषा
राजधानी पोर्ट लूई हे देशातील सर्वांत मोठे शहर तसेच प्रमुख व्यापारी व
प्रशासकीय केंद्र आहे. त्याखालोखाल बो बार्सी/रोस हिल (लोक. ८७,११७),
कुरपीप (५७,१९१), कात्र बॉर्न (५६,२९१) व व्हाकोआस/फीनिक्स (५५,४९४) ही
मॉरिशस बेटावरील प्रमुख शहरे तसेच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे
आहेत. परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा
महत्त्वाचा व्यवसाय आहे. किनाऱ्यावरील सुंदर पुळणी, निसर्गसुंदर पर्वतीय
प्रदेश, आल्हाददायक हवा आणि अनेक संस्कृतींचे आढळणारे मिश्रण ही पर्यटकांची
प्रमुख आकर्षणे आहेत. देशात १९८३ मध्ये १,२३,८२० पर्यटक येऊन गेले व
त्यांच्यापासून देशाला ५०१ द.ल. रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच या
व्यवसायामुळे दहा हजारांवर लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यूरोपमधील
बऱ्याच देशांतील लोकांना मॉरिशसमध्ये येण्यास परवाना काढावा लागत नाही.
फ्रान्स, मादागास्कर, रेयून्यों व दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या पर्यटकांची
संख्या जास्त असते.
मॉरिशस देशामध्ये मराठी माणसांचं प्रमाण जास्त का आहे?



मॉरिशसची मातृभाषा क्रियोल असली तरीही दोन मराठी माणसं भेटली की त्यांच्या मुखातून निघणारा पहिला शब्द म्हणजे 'नमस्कार'. मंगळसूत्र, कुंकू, जोडवी असे दागिने सौभाग्याचे प्रतीक मानण्याची संकल्पना अजूनही स्त्रियांमध्ये आहे. इथे नऊवारी साडी इतकी प्रसिद्ध आहे की गणेश चतुर्थीच्या वेळी मराठी स्त्रियांसोबत अमराठी स्त्रियाही नऊवारी साडी नेसतात.
मॉरिशसमध्ये मूळ मराठी वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यामध्ये सरकारही भरीव योगदान देते. शैक्षणिक क्षेत्रात पहिली ते नववीच्या मुलांना मराठी किंवा इतर भारतीय भाषा शिकणे अनिवार्य आहे. प्रत्येक शाळेत एक मराठी शिक्षक उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. मराठी शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी होत असली तरी एक शिक्षक असावाच लागतो. तसेच दर शनिवारी आणि रविवारी मराठा मंदिर आणि मराठी साहित्य परिषद या दोन संस्था वेगवेगळ्या गावात आणि शहरातल्या आपल्या शाखेत मुलांना मोफत शिकवणी देतात. इतकेच नव्हे, तर दरवर्षी मराठीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सची) शिष्यवृत्ती मिळते. या मुलांना पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठीतून बी.ए करण्याची संधी मिळते.
मॉरिशसमध्ये मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी महात्मा गांधी संस्था, मराठी साहित्य परिषद, मराठा मंदिर, मॉरिशस मराठी भाषक संघ, मराठी सांस्कृतिक केंद्र, मॉरिशस मराठी महामंडळ इत्यादी अनेक संस्था कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांद्वारे तरुण पिढीला मराठी भाषा आणि संस्कृतीशी एकरूप करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू असतो. तसेच कला आणि संस्कृती मंत्रालयाद्वारे दरवर्षी मराठी नाट्यस्पर्धा आयोजित केली जाते.
आता पाहूया मॉरिशसची वैशिष्ट्ये
जसे कि आपण सगळे जाणतो मॉरिशस तिथल्या जगप्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखला जातो. पांढरी वाळू आणि निळेशार पाणी ही तिथल्या सर्व बीचची खासियत आहे.
चॅमरल (Chamarel) :
हे जगप्रसिद्ध आकर्षण अद्वितीय असे आहे. चामरल हे गाव सात रंगांच्या पृथ्वीसाठी प्रसिद्ध आहे. ज्वालामुखीचे खडक वेगवेगळ्या तपमानावर थंड झाल्याने ही घटना घडली आहे, परिणामी सात भिन्न रंगांचे टिळे बनतात. जगाच्या पाठीवर इतर कुठेही अशा प्रकारचा आविष्कार पाहवयास मिळणार नाही.
बोटॅनिकल गार्डन :
या गार्डन मध्ये आपल्याला जगभरातले हजारो जातीची झाडे पाहवयास मिळतात. तिथल्या तलावात आणि भोवताली मोठमोठाले कासव देखील आहेत. मात्र बोटॅनिकल गार्डनचे मुख्य आकर्षण निःसंशयपणे मॉरिशसचे प्रसिद्ध वॉटर लिली आहे. अतिशयोक्ती वाटेल पण खरं सांगतो, ही पानं इतकी मोठी आहेत कि एका पानामध्ये दोन व्यक्ती ऐसपैस बसून जेवण करू शकतील.
कॅसेला नेचर पार्क:
कुटुंब असो किंवा हनिमूनची सहल असो, जर आपण मॉरिशसमधील कॅसेला नेचर पार्कला भेट दिली नाही, तर आपली मॉरिशस सफर अपूर्ण आहे. इथे आपण जंगलातल्या प्राण्यांना जसे कि वाघ, सिंह ह्यांच्या जवळ जाऊन त्यांना हात लाऊ शकतो तसेच जंगलात त्यांच्यासोबत भटकंती देखील करू शकतो.
गंगा तलाव :
वरील चित्र हे भारतातील एखादे तीर्थाक्षेत्र नसून मॉरिशस मधील प्रसिद्ध गंगा तलाव येथील आहे. भारताप्रमाणे मॉरिशस कडे पवित्र गंगा नदी नाही म्हणून त्यांनी तिथल्या एका तलावाचे नामकरण गंगा तलाव असे केले आहे.
महाशिवरात्री हा मॉरिशस मधील सर्वात महत्वाच्या सणापैकी एक आहे. शंकराच्या ह्या महाकाय मूर्तिशिवाय इतरही अनेक भारतीय देवतांची मंदिरे तलावाच्या भोवती आहेत. भारतात अभावानेच दिसणारी विष्णुची १० रूपं देखील एका मंदिरात बघायला मिळतात.

मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळ टर्मिनस येथून मॉरिशसला जाण्यासाठी एअर मॉरिशस, एअर इंडिया या एअरलाइन्स आहेत. मुंबईपासून मॉरिशसचे अंतर साधारणपणे ४७०० किमी इतके आहे. आणि हा प्रवास जवळपास सहा तासांचा आहे. मुंबईपासून मॉरिशसला जाण्यासाठी दर आठवड्याला पाच फ्लाईट्स आहेत. त्याचबरोबर दिल्ली आणि चेन्नईपासूनदेखील आपण विमानाने मॉरिशसला जाऊ शकतो.
भारतीयांना मॉरिशसला भेट देण्यासाठी व्हिसाची गरज आहे का?
होय, मॉरिशसला जाणाऱ्या भारतीय पासपोर्ट धारकांना देशात प्रवेश करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असेल.
भारतीयांसाठी मॉरिशसमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल/ई-व्हिसा उपलब्ध आहे का?
होय, भारतातून मॉरिशसला प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरं तर, भारतीयांसाठी मॉरिशस टूरिस्ट व्हिसा शोधत असताना, तुमच्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे व्हिसा ऑन अरायव्हल. भारतीय प्रवास सुरू होण्यापूर्वी व्हिसा घेऊ शकत नाहीत.
तुम्ही मॉरिशस एअरपोर्टवर पोहोचू शकता आणि तिथल्या इमिग्रेशन डेस्कवरून तुमच्या व्हिसाचे कागदपत्र घेऊ शकता.
मॉरिशस व्हिसा ऑन अरायव्हल मिळविण्यासाठी भारतीयांना पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे
भारतीय नागरिकांना या मॉरिशस व्हिसासाठी पात्र होण्यासाठी, भारतीयांनी न चुकता खालील निकष पूर्ण केले पाहिजेत:
प्रवासाच्या तारखेपासून किमान सहा महिने वैध राहणारा भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
मॉरिशसमध्ये राहण्याचा पुरावा.
60 दिवसांच्या आत पुष्टी केलेली परतीची तिकिटे ज्यासाठी व्हिसा वैध आहे.
- रु.3,600च्या दरम्यान आणि रु. 6,600 प्रत्येक दिवसाच्या मुक्कामाचा खर्च.
भारतीय नागरिकांसाठी मॉरिशस व्हिसा शुल्क
प्रवाशांसाठी चांगली बातमी अशी आहे की भारतीयांसाठी मॉरिशस व्हिसा पूर्णपणे विनामूल्य आहे. याचा अर्थ असा की जरी तुम्हाला अधिकृतपणे देशात प्रवेश करण्यापूर्वी तुमची व्हिसाची कागदपत्रांची आवश्यकता असली, तरीही तुम्हाला व्हिसासाठी शुल्क भरण्याची गरज नाही.
मॉरिशस व्हिसाकरिता भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रे
मात्र, फक्त आवश्यकता समजून घेणे पुरेसे नाही. तुम्ही काही कागदपत्रे तयार ठेवावीत, जी मॉरिशसमधील भारतीय पासपोर्ट धारकांसाठी विनाविलंब व्हिसा ऑन अरायव्हल सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत. खालील यादीवर एक नजर टाका:
सर्व आवश्यक तपशील आणि माहितीसह भरलेले व्हिसा फॉर्म
दोन अलीकडील पासपोर्ट साइज फोटो
पासपोर्ट जो मॉरिशसच्या भेटीच्या तारखेपासून आणखी किमान 6 महिन्यांसाठी वैध आहे.
जर तुम्ही मॉरिशसमधून दुसर्या गंतव्यस्थानावर जात असाल, तर तुम्ही त्या राष्ट्रासाठी वैध व्हिसा दाखवावा. अन्यथा, तुम्हाला कन्फर्म केलेले रिटर्न फ्लाइट तिकीट दाखवावे लागेल.
सर्व निवास तपशील, ज्यात रूम बुकिंग पावत्या आणि इतर तपशील समाविष्ट असावेत
जर एखादा मॉरिशियन नागरिक तुमचा राहण्याचा खर्च उचलत असेल, तर तुम्हाला प्रायोजकाकडून ते सूचित करणारे पत्र दाखवावे लागेल. पुढे, या प्रायोजकत्व पत्रामध्ये नागरिकाचा पत्ता आणि नातेसंबंध देखील नमूद करणे आवश्यक आहे.
देशात राहून विविध खर्च भागवण्यासाठी पुरेशा निधीचा पुरावा
बँक स्टेटमेंट देखील आवश्यक असू शकते
आगमनावर मॉरिशस व्हिसासाठी अर्ज कसा करावा?
मॉरिशसला भेट देण्यासाठी भारतीयांना वेळ घेणारी व कंटाळवाणी व्हिसा अर्ज प्रक्रिया सहन करण्याची आवश्यकता नाही. खरं तर, कोणत्याही पूर्व-नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण नाही. तुम्ही प्रवासात सर्व आवश्यक कागदपत्रे नेऊन एअरपोर्ट इमिग्रेशन विभागाकडून व्हिसा ऑन अरायव्हल घ्यावा.
मॉरिशसमधील भारतीय दूतावास
मॉरिशस हा तुलनेने सुरक्षित देश आहे, जो अंतर्गत कलह, दहशतवाद किंवा इतर कोणत्याही धोक्यांपासून मुक्त आहे. तरीही, देशातील भारतीय दूतावासाचा पत्ता आणि संपर्क तपशील लक्षात घेणे हे एक शहाणपणाचे पाऊल आहे.
- पत्ता - भारतीय उच्चायुक्तालय, 6 वा मजला, L.l.C. इमारत, प्रेस. जॉन केनेडी स्ट्रीट, पी.ओ. बॉक्स 162, पोर्ट लुईस, मॉरिशस.
- संपर्क क्रमांक - +(230) 208 3775/76, 208 0031, 211 1400
- कामाची वेळ - सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 दरम्यान
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही दूतावासातील प्रतिनिधीच्या संपर्कात असल्याची खात्री करा.
तुम्ही तुमच्या मॉरिशस प्रवासादरम्यान आणीबाणीच्या आर्थिक जोखीम कमी करण्याचा विचार करत असल्यास, इन्शुरन्स पॉलिसी निवडणे हा तुमचा सर्वोत्तम पर्याय आहे.
तुम्ही मॉरिशससाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करावी का?
तुम्ही जिथे जाल तिथे ट्रॅव्हल इन्शुरन्स ही एक गरज आहे. मॉरिशस प्रवासासाठी अनिवार्य नसले तरी, असे कव्हर खरेदी केल्याने तुमची आर्थिक जोखीम एकदम कमी होऊ शकते.
तुम्हाला मॉरिशस ट्रॅव्हल इन्शुरन्सची आवश्यकता नाही असे वाटत असल्यास , पुन्हा विचार करा!
आंतरराष्ट्रीय स्थळांमध्ये वैद्यकीय मदतीची किंमत भारताच्या तुलनेत अधिक महाग आहे. त्यामुळे, आजार आणि दुखापतींमुळे तुमच्या खिशावर मोठा ताण येऊ शकतो, विशेषत: तुम्ही मॉरिशसमध्ये असताना. अशा अनियोजित खर्चांना कमी करण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स योजना हा सर्वात सोपा मार्ग आहे.
मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे नुकतेच मॉरिशसमध्ये अनावरण करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला . महाराजांची ख्याती जगभर पसरली आहे. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे, त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. जगभरातील अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. आता, मॉरिशसमध्ये देशातील सर्वांत मोठ्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ उपस्थित होते. १४ फुट उंचीचा हा पुतळा फायबर ग्लास मिडीयममध्ये तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉरिशियमधील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. नाशिक येथील शिल्पकार विकास तांबट यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागला.
- ओळख
मॉरिशियस ला जायचा तसा प्लान नव्हता. बाकीचे काही देश माझ्या मनात होते. पण माझा नेहमीचा प्रश्न असतो तो व्हीसासाठी लागणार्या वेळाचा. मोजक्या दिवसांच्या सुट्टीतले दिवस व्हीसा मिळवण्याच्या खटपटीत घालवणे मला रुचत नाही. अंगोलातून व्हीसा अप्लाय करायचा तर अनेक देशांच्या एम्बसीज इथे नाहीत. त्यासाठी पासपोर्ट साऊथ आफ्रिकेत पाठवावा लागतो ( तेही केलेय मी. ) त्यामूळे सर्व भारतींयाना ऑन अरायव्हल व्हीसा देणार्या या सुंदर देशाची ट्रिप नक्की झाली.
मोरपिशी रंगाच्या समुद्राने वेढलेले हे सुंदर बेट. उसाची शेती, हिरवेगार जंगल आणि मोहक आकाराचे पर्वत यांनी नटलेले आहे. खरे तर तो एक छोटासा भारतच आहे. ५२ % लोकसंख्या भारतीय हिंदु आहे, त्यामूळे आपल्याला परकेपणा अजिबात जाणवत नाही.
तर या देशाची चित्रमय झलक दाखवणारी मालिकाच सुरु करतोय. नेहमीचा शिरस्ता सोडून, नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या भागात देतोय.
१) कसे जाल ?
मुंबई आणि दिल्लीहून एअर मॉरिशियसची थेट सेवा उपलब्ध आहे. मला
एमिरेटसचे फ्रिक्वेंट फ्लायर ( स्कायवर्ड्स ) चे माईल्स हवे होते म्हणून मी
ते विमान निवडले. मुंबई ते दुबई - ३ तास, दुबईत ३ तासाचा थांब व पुढे दुबई ते मॉरिशियस ६ तासांचा प्रवास आहे. दिवसातून दोन विमाने आहेत. त्यापैकी एक ३८० ( डबलडेकर )
आहे. जर तूम्ही तारखा आधी निश्चित केल्यात तर एमिरेटस वरती चांगले डील मिळू शकते ( साधारण ४०, ००० रुपये )
कधी जाल ?
मॉरिशियस दक्षिण गोलार्धात असल्याने आपल्यापेक्षा उलट ऋतू असतात. पण तरी
ट्रॉपिकल हवामान असल्याने वर्षभर सुखावह हवामान असते. जून, जुलै मधे
बर्यापैकी थंडी असते. पाऊसही पडत असतो. नोव्हेंबर डीसेंबर मधे उन्हाळा असतो. तिथले वनस्पतिउद्यान अतिशय सुंदर आहे. तिथली फुले बघायची
असतील तर मात्र उन्हाळ्यातच जाणे योग्य. तसे खास कपडे न्यायची गरज नाही. पण पाण्यात जायचे असेल तर पोहण्याचे कपडे जवळ असावेत.
व्हीसा वगैरे
वर लिहिल्याप्रमाणे व्हीसा ऑन अरायव्हल आहे. उतरल्यावर दोन फॉर्म्स भरावे लागतात. एक व्हीसासाठी आणि एक हेल्थ साठी. व्हीसासाठी कुठलाही चार्ज नाही. परतीचे तिकिट असणे गरजेचे आहे. ( मला विचारले नाही. ) हॉटेल बुकिंग, फॉरेन एक्सेंज वगैरे असावे पण विचारत नाहीत. भारतातून थेट जात असाल तर कुठलिही लस घ्यायची गरज नाही. ( मला सगळीकडेच येलो फीव्हर व्हॅक्सीनेशन दाखवावे लागते, पण तेही विचारले नाही. ) पैसे नेण्यावर बंधन नाही. बिया, प्राणी वगैरे मात्र नेऊ नयेत.
कुठे रहाल ?
हॉटेल निवडताना मात्र नेटवरचे रेव्ह्यू वाचूनच निवडा. मी थॉमस कूक तर्फे, ल मेरिडीयन निवडले होते. खुपच सुंदर प्रॉपर्टी होते. परीसरही सुंदर होता. जेवणाखाण्याची चंगळ होती. तिथेच टॅक्सीस्टॅन्ड असल्याने भटकायची सोय होती. मला भेटलेल्या काही लोकांची मात्र निराशा झाली. नेटवरून स्वस्तातले डिल मिळाले, प्रॉपर्टी सुंदर होती पण जेवणाखाण्याचे हाल होते. प्रॉपर्टी एका बाजूला असल्याने बाहेर जाऊन खायचीदेखील सोय नव्हती.
काय खाल ?
शक्यतो हाफ बोर्ड निवडा ( ब्रेकफास्ट आणि डिनर हॉटेलमधेच ). दिवसभर भटकून आल्यानंतर परत जेवणासाठी बाहेर जायचे त्राण रहात नाहीत. दिवसाचे जेवण मात्र बाहेर घ्यावे लागते. टुअर ऑपरेटर असेल तर तो त्याच्या पसंतीच्या हॉटेलमधे नेण्याची सक्ती करतो. पण ते जेवण चांगलेच असेल याची खात्री नाही ( महागही असते. ) थाली सिस्टीम असते. शक्यतो ती घ्या म्हणजे एखाद दुसरा पदार्थ आवडू शकतो.
इतर देशांत मी शक्यतो स्ट्रीट फूड खाणार नाही पण मॉरिशियस मधे मात्र ते आवर्जून खावे, असा सल्ला देईन. बहुतेक पदार्थ भारतीय चवीचेच असतात. भजी, सामोसे मस्त असतात. डाल पुरी / रोटी अवश्य खा. मऊसूत चपाती, त्यावर डबल बीन्स / बटाटा भाजी, कोबीचे लोणचे, टोमॅटोची चटणी आणि आपल्याला हवी तेवढी मिरची घालून देतात. खुपच मस्त आणि पोटभरीचा प्रकार असतो. तिथे मिरची नेहमीच स्वतंत्रपणे देतात.
मिरच्या खुप तिखट असतात. (माझ्यासाठी तरी ) तरी तिथली वेगवेगळी लोणची अवश्य चाखा. जमल्यास घेऊनही या. ( काही मायबोलीकरांनी चाखलीत ती. )
जेवल्यानंतर नारळाचे पाणी, इतर फळांचे रसही प्या. अननस मात्र अगदी
चाखाच. लहान आकाराचा व्हीक्टोरियन अननस तिथे अनेक ठिकाणी मिळतो. तो नीट
कापून त्यावर चिंचेची तिखट चटणी टाकून देतात. भन्नाट लागतो तो प्रकार. आणि हे प्रकार ( हॉटेलच्या मानाने ) खुपच स्वस्त असतात. साधारणपणे बायकांनी
चालवलेले हे स्टॉल्स ठिकठिकाणी आहेत. सी फूड पण चांगले मिळते म्हणे..
काय बघाल ?
शक्यतो हॉटेल स्टे आणि सहली असे पॅकेज निवडा. यात साधारण ३ सहली येतातच. त्यापैकी एक बीच टुअर, एक शॉपिंग टूअर आणि एक साईट सिईंग टुअर असते. आयटनरी बघून त्यात दाखवली जाणारी ठिकाणे लक्षात ठेवा. बहुतेक महत्वाची ठिकाणे दाखवली जातातच. हॉटेल पिक अप आणि ड्रॉप असतो.
पण त्या ठिकाणांपेक्षाही बघण्यासारखी काही ठिकाणे आहेतच. चहाचे संग्रहालय, साखरेचे संग्रहालय आहे. एखादा ट्रेकही करता येईल. निरपेक्ष भटकताही येईल.
कसे फिराल ?
अरेंज्ड टूअरशिवाय भटकायचे असेल तर टॅक्सीज उपलब्ध आहेत. भाड्याने बाईक्सही मिळतात. सरकारी बससेवा आहे. पण त्याची नीट चौकशी करून घ्या कारण त्या मला तितक्या संख्येने दिसल्या नाहीत.
एकट्याने फिरण्यात धोका नाही, तरीपण बेसिक काळजी घ्याच. टॅक्सीचे दर आधी ठरवून घ्या. जास्तीचे ठिकाण बघायचे असेल तर तोही दर आधीच ठरवा. ( शक्यतो वाद होत नाहीत.. तरीपण )
रस्त्यावरती पाट्याही तितक्याश्या नाहीत. लोकसंख्या व वस्ती विरळ आहे. पण रस्ता चुकलात तर स्थानिक लोक नक्कीच मदत करतात.
काय बोलाल ?
मॉरिशियस मधे इंग्रजी, फ्रेंच या सरकारी भाषा आहेत. फ्रेंचचीच बोलीभाषा असल्यासारखी क्रियोल भाषा तिथले लोक आपापसात बोलताना वापरतात, पण आपल्याला सुखद वाटेल अशी बाब म्हणजे तिथे बहुतेकांना हिंदी येते. ते हिंदीदेखील उर्दू शब्दांचा किमान वापर करून बोलले जाते. ( त्या मानाने हिंदीतल्या पाट्या कमी दिसल्या ) त्यामूळे भाषेची अजिबात अडचण नाही.
पैसे
मॉरिशियसचे चलन रुपये आहे. एका डॉलरला साधारण ३० मॉरिशियन रुपये मिळतात. ( म्हणजे आपल्या रुपयांच्या अर्धे ) याचाच अर्थ एक मॉरिशियन रुपया म्हणजे २ भारतीय रुपये होतात. पैसे नेण्या आणण्यावर बंधने नाहीत. भारतीय रुपये स्वीकारताना दिसले नाहीत कुणी. त्यामूळे शक्यतो डॉलर्स जवळ ठेवा.
काय खरेदी कराल ?
वरचा विनिमयाचा दर लक्षात घेता, ऐकताना किमती कमी वाटल्या तरी त्या महागच असतात. माझ्या अनुभवावरुन सांगतो कि भारतासारखी स्वस्ताई जगात कुठे नाही. तरीपण गेल्यासारखे थोडे शॉपिंग होणारच ना ? तिथे लोक साधारण कपड्यांची खरेदी करतात. ब्रँडेड कपडे अर्थातच महाग आहेत. पण स्ट्रीट बझारमधे स्वस्त कपडे मिळू शकतात. तिथे बर्यापैकी भावही करता येतो. फॅक्टरी आऊटलेट / शॉप हा तिथला फसवा शब्द आहे. तिथे जरा नेट लावला तर ७५ % ( हो ७५ % ) सूट मिळवता येते.
शिप मॉडेल्स ही पण त्यांची खासियत. लाकडापासून बनवलेल्या या छोट्या बोटी तूमच्या दीवाणखान्याची शोभा वाढवतील. पण त्यांची किंम्मतही तशीच छान असते. ( त्याची झलक दाखवीनच. )
साखर हा तिथला महत्वाचा उद्योग आहे. तिथे वेगवेगळ्या स्वादाची साखर मिळते. अवश्य नमुना बघा. साखरेबरोबरच खास रम देखील मिळते.
शिंपले, मोती, पोवळे दिसले पण त्याच्या किंमती जास्तच वाटल्या. ( नायजेरियात स्वस्त मिळतात. ) वर लिहिल्याप्रमाणे लोणची, मसाले, मिरच्या अवश्य घ्या. व्हॅनिलाच्या शेंगा मिळतील. चहा, कॉफीचे मळे आहेत पण त्यांचा स्वाद मला आवडला नाही. ( केनयातला चहा आणि इथिओपियातली कॉफी जास्त
चांगली असते. ) साखरेचे नमुने, तिथल्या रंगीत वाळूचे नमुने, सध्या अस्तित्वात नसलेल्या डोडो पक्ष्याच्या प्रतिकृती पण घेता येतील.
काय कराल ?
वॉटर स्पॉर्टससाठी हा देश प्रसिद्ध आहे. भरपूर पर्याय आहेत. तूमच्या सहलीत याचा समावेश नसतो पण तिथे गेल्यावर काही करावेसे वाटले तर अवश्य करा. तिथे भाव करून स्वस्त दर मिळवता येतील. उन्हापासून संरक्षण करणारे क्रीम व गॉगल मात्र अवश्य जवळ ठेवा. बाकीचे साहित्य तिथे भाड्याने मिळते.
किनार्याजवळचा समुद्र खोल नाही. तिथले पाणीही नितळ आहे. दूरवर मोठ्या लाटा येताना दिसतात. तिथे मात्र जाऊ नका. आणि तसेही हॉटेलच्या सुरक्षा नियमांचे पालन कराच. झू, बर्ड पार्कस पण आहेत. तिथे माऊंटन बाईकिंगची सोय आहे.
खर्चाचा अंदाज
विमानभाडे, हॉटेल स्टे व ३ टूअर्स यासाठी माणशी १ लाख रुपयांचे बजेट ठेवा, ग्रुप टूअर स्वस्त मिळू शकेल. स्वतः सगळे अरेंज करणार असाल तर आणखी स्वस्तात होईल. आता केवळ झलक म्ह्णून काही फोटो टाकतोय.. सविस्तर ओळख नंतर करुन देईनच..
पिक्चर अभी बाकी है
ल मेरिडीयन
मी मॉरिशियसला पोहोचलो तो दिवस शनिवार होता. दुपार होऊन गेली होती. एमिरेट्सच्या फ्लाईटमधे भरपूर खाणे झाल्याने भूक नव्हती. इमिग्रेशन वगैरे लगेचच पार पडले. माझ्याकडे फारसे सामानही नव्हते. ड्रायव्हर माझी वाट बघतच होता.
हा विमानतळ आहे या बेटाच्या दक्षिण पूर्व टोकाला आणि माझे हॉटेल, ल मेरिडीयन उत्तर पश्चिम टोकाला. हा १०० किमीचा टप्पा त्या देशाच्या एकमेव हायवेवरून तासाभरातच पार पडला. ड्रायव्हर बोलका होता. हिंदीतून गप्पा चालल्या होत्या. वाटेतला एक अपघात ( दोन दिवसांपुर्वी झालेला ) त्याने मला कौतूकाने दाखवला. मनात म्हणालो, बेट्या माझ्या आफ्रिकेत ये, म्हणजे दाखवतो तूला अपघात काय असतात ते.
शनिवार असल्याने बहुतेक दुकाने बंदच होती. पण त्याच्या ओळखीने मी डॉलर्स चेंज करून घेतले. ( खरं तर तशी गरज नव्हती. डॉलर्स कुठल्याही दुकानात स्वीकारतात तिथे.)
हॉटेल मधे पोहोचल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. गेल्यागेल्या चिंचेचे अप्रतिम चवीचे सरबत व आईस्क्रीम देऊन स्वागत झाले. पाच मिनिटात सर्व सोपस्कार करून रुम ताब्यातही मिळाली. आदल्या रात्री दुबईला जागरण झाले होते म्ह्णून खरे तर झोप येत होती. रुम तर मस्तच होती.. पण निग्रहाने बाहेर पडलो. हॉटेलचा परीसर, बाहेरचा रस्ता भटकून आलो.. तिथले हे फोटो.
रुमचे प्रथम दर्शन
सज्जा
आतली पायवाट
बाहेरचा रस्ता, इथून पाच मिनिटावर एक सार्वजनिक समुद्रकिनारा होता.
वडगाव ( या जंजाळात पण शिरलो मी. )
रस्त्याच्या कडेने पसरलेली आईसक्रीम क्रीपर
हा फोटो आमच्या कोल्लापूरातला म्हणून खपेल.. हॉटेलच्या समोरच अशी शेती आणि मागे देखणे पर्वत होते. रोज त्यांचे नवे रुप दिसायचे.
हॉटेलच्या मागे त्यांचाच खाजगी समुद्रकिनारा होता.. तशीच छोट्या स्विमिंग पूल्सची मालिकाही होती.
"तिन्हीसांजा सखे मिळाल्या ..." गाणे म्ह्णायची जागा अरसिक माणसं इथे मासे पकडतात.
हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावर बोराचे झाड होते... मी गोळा करून आणली.
अंगत पंगत
त्या रात्री तर जेवलोच नाही.. दुसर्या दिवशीचा नाश्ता
दुसर्या दिवशीची प्रसन्न सकाळ
आम्ही म्हटलं हो..तर म्हणे आम्ही पण मूळचे मराठी आहोत. ते लोक पिढयानपिढया तिथे स्थायिक होते. त्या मुलीला मराठी येत नव्हतं पण तिला भाषा ओळखू आली. तिने 'आम्ही शिवाजी महाराजांची जयंती सेलिब्रेट करतो' असं म्हटल्यावर मी तिला मोठ्ठी स्माईल दिली होती
इथे खूप मराठी लोक स्थायिक आहेत.
शुगर म्यूझियम - Aventure du Sucre
दुसरा दिवस रविवार होता. त्यादिवशी मला कुठलीही टुअर नव्हती म्हणून स्वतंत्रपणे फिरायचे ठरवले. नेटवर काही छान ठिकाणे दिसत होती. पण रविवार असल्याने ती बंद होती. शुगर म्यूझियम मात्र उघडे आहे, असे टॅक्सीवाल्याने सांगितले. म्हणून तिथे गेलो.
साखर हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे आणि सध्याही तेच निर्यातीचे प्रमुख उत्पादन आहे. उसाच्या शेतीत काम करायला म्हणून अनेक भारतीय लोक गेले असले तरी त्यांना गुलाम म्हणणे मला तरी योग्य वाटत नाही. एकतर ते कसबी होतेच शिवाय त्यांचे फार हाल झाले असे काही वाटत नाही.
या देशाची जमीन आणि हवामान उस उत्पादनासाठी योग्य असले तरी, ज्यावेळी सुरवात केली त्याकाळी सर्व जमीन नांगरल्यासारखी सपाट होती, असे मुळीच नव्हते. त्यातले मोठेमोठे खडक फोडून बाहेर काढावे लागले, काही शेतात अजूनही असे ढीग दिसतात.
साखरेचे उत्पादन त्या काळच्या युरपमधे अजिबात नव्हते. साखरेचा कच्चा माल म्हणजे उस तिथे पिकत नव्हता. बीट व इतर शेतमालापासून मिळणारे उत्पादन मर्यादीत होते, शिवाय ते कारखानेही महायुद्धाच्या काळात बंद पडले होते. त्यामूळे वसाहतवाद्यांनी या देशाचा चांगलाच उपयोग करून घेतला.
साखरेचे तंत्रज्ञान मात्र मूळ भारताचे. चिनी लोकांनाही आपणचे ते तंत्र दिले.
एका जून्या साखर कारखान्यात हे संग्रहालय आहे. सर्व मशिनरी शाबूत आहे. मांडणी तर अतिशय सुंदर आहे. साखरेसंबंधी सर्व माहिती रंजक रुपात तिथे मांडलेली आहे. ( केवळ साखरच नव्हे तर एकंदर या देशासंबंधी इतरही माहिती आहेच. )
तिथे ती माहिती इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषांत लिहिलेली आहे, शिवाय छापील पुस्तकही मिळायची सोय आहे.
http://www.aventuredusucre.com/index.php?nv=content&id=33 इथे आणखी माहिती आहे.
जवळच रेस्टॉरंट आहे. साखर आणि रम विकणारे एक दुकानही आहे. एकंदर मस्त जागा आहे ही. चला फोटोतून ओळख करून घेऊ या.
सकाळीच हॉटेलमधून असे मस्त दर्शन झाले
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती
पण तिथे जंगलेही भरपूर आहेत.
संग्रहालयाचा दर्शनी भाग
यंत्रांची मांडणी
वेगवेगळ्या प्रकारची साखर
मॉरिशियस आधी आणि मग स्वर्ग निर्माण केला
जून्या काळचे गलबत
या सर्व ठिकाणी जाता येते
वेगवेगळ्या साखरेची मांडणी
अरब व्यापारी साखरेच्या अश्या ढेपा नेत असत. ( खनिज मिठाच्या अश्याच ढेपा आजही आफ्रिकेत वापरात आहेत.)
चिमणी... हिच्या आधाराने पुर्वी गावे वसली
प्रत्येक ठिकाणी सविस्तर माहिती आहे
हे काय असेल बरं ?
मेल बॉक्स
त्या काळातली प्रयोगशाळा
साखर, साखर, साखर
आणि तिची वेगवेगळ्या तपमानातील रुपे
जरा नीट बघा बरं... साखर आपली, चिन्यांची नाही
त्या गलबतातला आतला भाग
कधी काळी उसाची वाहतूक तिथे रेल्वेतून होत असे
उसाचे पण चित्र काढता येते ?
हा प्रकार मला माहीत नव्हता. उसाची लागवड पेरं लावून करतात एवढेच माहीत होते. पण अशी लागवड सातापेक्षा जास्त वेळा करता येत नाही. नवीन लागवडीसाठी अश्या तर्हेने निवडक वाण निवडून संकरीत "बियाणे" तयार करतात.
तिथल्या खास जास्वंदी
मागे वळून बघताना
२६ क्रमांकाच्या फोटोतला बोर्ड नीट वाचता येत नाही, तो इथे मोठा करून देतोय.
या देशाचे आकारमान जरी लहान असले तरी तिथे वेगवेगळ्या प्रकारची माती सापडते आणि अर्थातच त्यानुसार उसाचा वाण निवडतात.
साखरेचे स्फटीक वेगळे करणारी यंत्रणा... ( शशांकने माहिती दिलीय प्रतिसादात.. )
तिकडे सहकारी साखर कारखाने आणि त्यांचे राजकारण आहे की प्रायवेट की स्टेट रन्ड?
शेतात कुठेही बांध दिसले नाहीत त्यावरून अंदाज केला कि ती सरकारी किंवा किमान कंपन्यांच्या मालकीची असावी. तसेही त्यांचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आमच्यासारख्या परक्या पर्यटकांशी त्याची चर्चा न करण्याचा संकेत सर्वच टूअर ऑपरेटर्स पाळतात.. तिथेही.
अनन्या... तिथे या प्रोसेसच्या क्लीप्स दाखवल्या जात होत्या. एखाद्या चालू कारखान्याला भेट दिली तर तो मळीचा वास ( आपल्यासारख्या, सवय नसलेल्यांना ) असह्य होतो. तिथे तो नव्हता. सध्या तरी तिथे बहुतेक सर्व प्रक्रिया यंत्रांनेच केली जाते.
तिकडचे सगळे साखर कारखाने आणि उसाची शेती ही खासगी आहे. तसेच युरोपात फक्त इथलीच साखर जाणार असा काहीतरी करारच होता आता आतापर्यंत. म्हणजेच मॉरिशससाठी युरोप ही हक्काची मोनोपलीस्टिक बाजारपेठ होती. त्या कराराची मुदत संपल्यानंतर मॉरिशसने पर्यटनासारख्या इतर क्षेत्राकडेही लक्ष द्यायला सुरुवात केल्ये.
उसाला सरसकट सगळीकडेच तुरे येत नाहीत. एका विशिष्ट हवामानाची गरज असते. भारतात फक्त कोईमतूरला असे वातावरण असल्याने तिथे आपले राष्ट्र्रीय उस संशोधन केंद्र आहे. संकरीत बियाणे निर्मितीकरता याचा उपयोग केला जातो.
त्या २२ क्र. च्या प्र चि त मॅस्कट ( massecuite) म्हणून जे दाखवले आहे त्यात उसाचा रस गरम होत होत साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात - यात अल्कोहोलमधे विरघळलेली साखर सीड करतात - या साखरेच्या रेणूच्या आसपास साखर क्रिस्टलाईज होते. (जसे तिळाभोवती साखर क्रिस्टलाईज होते आणि हलवा तयार होतो सेम तसेच...) या प्रक्रियेत तो साखरेचा पाक सतत ढवळत रहाणे फार गरजेचे असते. भारतात (जिथे वीजेचा अजिबात भरवसा नसतो) कुठल्याही साखर कारखान्यात या मॅस्कटकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देतात. समजा वीज गेलीच तर मॅन्युअली तो पाक फिरवावा लागतोच - अन्यथा तो पूर्ण मॅस्कट फेकून द्यावा लागतो - कारण मग तो दगडापेक्षा कठीण होऊन बसतो...
एकंदरीत साखर कारखाना हे माझ्या दृष्टीने तरी अतिशय प्रेक्षणीय स्थान आहे. खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असते - या साखरेमागे ....
बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden
तिथे इंद्रधनुष्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, हा नमुना बघा
हॉटेलच्या लॉनवर दिसलेली देखणी चिमणी
"वडगावाच्या" आत
हॉटेलच्या बाजूला एक देवालयही होते. भाविकांची ये जा होती ( सोमवार होता ) तरीही किती सुंदर राखले होते बघा.
बिक्सा अनोटा म्हणजेच आपले कुंकवाचे झाड.. या फळातील बियांपासून सुरक्षित खाद्यरंग तयार करतात.
मला आवडलेली एक फ्रेम
हे झाडासमोरचे चौथरे दिसताहेत त्यावर प्रत्येक झाडाचे नाव आणि माहिती होती
Brownea Grandiceps, Rose de Venezulela, Scarlet Flame Bean
या ब्राऊनिया ग्रँडीसेप्स ची शेंग पण खुप सुंदर होती ( तर फुल किती सुंदर असेल !! )
एक अजूबा बघितला
जवळ जाऊन बघितले तर असे होते
वॉटर लिलीचे खुप फोटो टाकले आजवर... तरी हे दोन टाकतोच
खर्या कमळाचे हे कोवळे पान
ही जून पाने ( सहज अर्धा मीटर व्यासाची )
हा कळा
दुसर्या दिवशी असे
Le Château de Mon Plaisir, पण आत जायला वेळ नव्हता
जीव गुंतला...
ती कमळाची पानं ही खर्या कमळाची नाही आहेत. ही एक कमळाची वेगळी जात आहे जी फक्त मॉरिशसलाच दिसते. ते वडगाव मलाही खूप आवडलं होतं. त्याच्या समोरच एक भेटवस्तुंचं दुकान आहे त्यामुळे आम्ही दोन तीनदा तिथे थांबलो होतो.
या ठिकाणची माझ्या पोतडीतून काही :
ही ती सुप्रसिद्ध कासवं :
पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront
हा किल्ला अजूनही चांगल्या अवस्थेत आहे
मागच्या डोंगररांगा
फा कश्या रोखलेल्याच हव्यात, नाही का ?
Champ de mars racecourse
बंदरातला समुद्रही निळाशारच आहे
वासू सपना इल्ले
सर अब्दुल रझाक यांच्या नावाची कमान ( शहरात उतरल्यानंतर )
चालत्या गाडीतून टिपलेला एक मॉरिशियन चेहरा
तिथले एक फाइव्ह स्टार हॉटेल
इथून पुढचे फोटो Le Caudan Waterfront या भागातले.
तिथे नमस्ते नावाचे इंडीयन रेस्टॉरंट आहे. पदार्थाची चव खास नाही, दर मात्र भरपूर महाग.
लाल पाटी दिसतेय, ती नमस्ते ची
पण बाकी खायला प्यायला भरपूर आहे. फळांचे ताजे रसही छान मिळतात.
बंदरातले सायलोज
तिथलाच कॅसिनो
या इमारतीत दोन्ही बाजूला कपड्यांची दुकाने आहेत
हा सबवे ओलांडून तूम्ही स्ट्रीट बजार मधे पोहोचता
दुबईच्या मॉल्सच्या मानाने पिटुकले मॉल्स आहेत तिथे ( दुबईला पण जायचे आहे आपल्याला )
हा पूल (म्हणे) "कुछ कुछ होता है" चित्रपटात आहे
तिथे दिसलेल्या काही जास्वंदी
ही कमान "गरम मसाला" चित्रपटात आहे.. पण त्यावेळी हा भाग मोकळा होता.
वेगळ्या आकाराची तगर
Blue Penny Museum आतून बघायला वेळ नव्हता
ही पण चिमणीच
तिथल्या मॉल्समधे सुव्हेनीयर्स् ची रेलचेल होती. पण मला खास मॉरिशियन काहीतरी हवे होते. भरतकाम केलेले टेबलक्लॉथ घेतले. त्यावरचे भरतकाम खासच आहे. ( अवल आणि शिष्या प्लीजच नोट) याचे नाव विचारले तर स्लेव्ह्ज असे सांगितले. साधे टाके वापरून फारसे डीटेलिंग न करता छान परिणाम साधला आहे.
बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island)
दुसर्या दिवशी समुद्रकिनार्यावरची सहल होती...
मला तिथे खुप घराच्या आवारात अशी नैसर्गिक झाडूची झाडे दिसली
नेहमीप्रमाणेच मस्त नाश्ता
मग "ज्योतिबा" दर्शन
मला तिथे मस्त करवंद पण दिसलं, मी ते अर्थातच तोडून खाल्लं.. पण त्यापुर्वी फोटो काढायचे भान होते
मग आम्ही एके ठिकाणी अंडर सी वॉकला गेलो. ( माझा कॅमेरा वॉटर प्रूफ नसल्याने ते फोटो नाहीत ) ३ ते ४ मीटर पाण्यात, डोक्याभोवती हवेची हंडी बाधून चालायचे असते. पोहणे यायची गरज नसते. एक दोन मिनिटातच आपण तोल संभाळायला शिकतो. मग आजूबाजूला मस्त प्रवाळ आणि रंगीबेरंगी मासे दिसतात.
मार्गदर्शक आपल्याला अगदी संभाळून चालवतो.
त्या ठिकाणचा बीच पण सुरेख होता.
या फोटोत तुमच्या अगदी डाव्या हाताला जो छोटासा प्लॅटफॉर्म दिसतोय तिथून पाण्यात शिरलो आम्ही
डोंगरी शेत माझं गं
या ठिकाणाहून आम्ही स्पीड बोटीने Ile Aux Cerf Island (deer island) ला गेलो. इथून पाच मिनिटावरच हे सुरेख बेट आहे.
पाण्याची खोली, आकाशातले ढग, सूर्याची दिशा यावर अवलंबून पाण्याच्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या.
ते बेट म्हणजे भन्नाट जागा आहे. कुणालाही पाण्यात उतरायचा मोह होईल तिथे. कॅमेरासकट सर्व सामान तसेच उघड्यावर टाकून सर्वच जण पाण्यात उतरत होते. नितळ पाणी होते.
तिथेच दोन रेस्टॉरंट्स आहेत. एकात भारतीय जेवण मिळते. ३७५ मॉ. रुपयांना चांगले जेवण मिळाले.
तिथेच अनेक वॉटर स्पोर्ट खेळायला वाव आहे. आम्ही ग्लास बॉटम बोटीने एक फेरी मारली. पण ग्लासपेक्षाही पाणी नितळ होते त्यामूळे ग्लासमधून काढलेले फोटो तेवढे खास नाहीत.
परत त्या बेटावर भटकत राहिलो
मी पण कधी कधी रसिक होऊन मासे पकडतो बरं
मन आम्ही दुसर्या स्पीड बोटीने एका अनोख्या जागेकडे निघालो.
आम्ही एका नदीच्या गॉर्जमधे शिरलो.. पाण्याच्या रंग गहीरा हिरवा झाला
इथे आम्हाला जायचे होते
पण तिथे जेमतेम एक बोट मावण्याएवढी जागा असल्याने थोडी वाट बघावी लागली
२८) मग या धबधब्याच्या अगदी जवळ गेलो
तिथला थरार मला ना शब्दात पकडता येत ना फोटोत !
परत फिरायला कुणीच तयार नव्हते पण आमच्यामागे पण काही बोटी वाट बघत थांबल्या होत्या
परत परत मागे वळून बघत होतो.
परत समुद्राकडे
आणि मग भन्नाट वेगाने परत किनार्याकडे
शिप मॉडेल फॅक्टरी
शिप मॉडेल्स हा मॉरिशियसचा एक महत्वाचा निर्यात उद्योग आहे. मोठ्या बोटींची टु द स्केल अशी मॉडेल्स, लाकडापासून केली जातात. तश्या एका फॅक्टरीला भेट दिली.. ती मॉडेल्स सुंदर होती पण किमतीही तश्याच होत्या. आजची सकाळ वेगळेच रंग घेऊन आली होती
लॉबीमधूनच हे असे दिसत होते
आजचे दर्शनही वेगळे
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेती
इंद्रधनुष्याचे वेगळेच प्रकार दिसले मला तिथे..
पोर्ट लुई मधे थोडा खोळंबा होतो खरा, पण एकदा ते पार केले कि रस्ते लहान असले तरी छान आहेत.
परत इंद्रधनुष्य . असा प्रकार मी यापुर्वी फक्त झीन्नत अमान च्या " सत्यम शिवम सुंदरम" मधे बघितला होता.. अर्थात त्यावेळी ते खरे वाटले नव्हते. ( नव्हतेही पण तसे असू शकते हे आता कळले )
सोलर पॉवर्ड बिल्डींग
चिंब पावसानं रान झालं आबादानी
भूभू असा शहाणा असेल तर मी पण श्वानप्रेमी.. याच्या पाठीवरचे केस मीच विस्कटलेत
शिप मॉडेल्स
फॅक्टरी
पूर्वतयारी
छान मॉडेल आणि छानच किंमत
पुढच्या भागात ज्वालामुखी बघू... चला निघू या
निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater
तिथला रस्ता आणि सभोवतालचे दृष्य
ढाल तेरडा
आपल्यापेक्षा थोडा वेगळा सोनटक्का
साद घालणार्या पायवाटा
अधून मधून विवरात डोकावत होतोच
विवराचा तळ
तिथेही इंद्रधनुष्य
२५)
टिपीकल मॉरिशन थाली... किम्मत १,३०० भारतीय रुपये.. आग्रहही फारसा नव्हता
देवदर्शनाच्या वाटेवर
गोड्या पाण्याचे सरोवर
पुढील भागात देवदर्शन करु ...
हां! याची आहेत प्रचि माझ्याकडे :
अगदी नॅस्टरशियम सकट!
गंगा तलाव
गंगा तलाव हि मॉरिशियस मधील हिंदूंसाठी अत्यंत पवित्र जागा आहे. समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर हा तलाव आहे आणि याचा उगम भारतातील जान्हवी पासून झालेला आहे, असे ते लोक मानतात. महाशिवरात्रीला पाच ते सात दिवस इथे मोठा उत्सव असतो. देशातील अनेक भागातून लोक पायी इथे येतात. या तलावाचे पाणी पवित्र मानतात आणि इथून कावड भरून घरी न्यायची प्रथा आहे.
तर चला.
रस्त्यातील जंगल
गंगा तलावाच्या आधीपासूनच पायी चालत येणार्यांसाठी अशी कायमस्वरुपी व्यवस्था केलेली आहे.
प्रत्यक्ष संकुल तर फारच छान आहे
पावसाळी हवामान असल्याने फोटो तितकेसे स्पष्ट नाहीत
तिथे कुठलेही दुकान नाही कि कुणी पैसे मागत नाही. पुजारी प्रत्येकाला गंध लावतात. हिंदूंना आवर्जून गाभ्यार्यात जाऊन दर्शन घ्या, असे सांगतात.
त्या तलावातला मासा, १ मीटरपेक्षा जास्त लांब होता
या फोटोतली टेकडी आहे त्यावर जाता येते.
तलावाच्या कडेने असा सुंदर रस्ता आहे
भक्तांना बसण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था
भरपूर स्वच्छतागृहे
टेकडीवर जायचा सुबक मार्ग
वाटेवर
टेकडीवरून
संकुलाच्या बाहेर शिवाची भव्य मूर्ती आहे ( सध्या डागडूजी चालली आहे. )
दूर्गेची पण मोठी मूर्ती उभारली जातेय.. ही तिची प्रतिकृती
तिथेच पार्किंग लॉट मधे मला ही सुंदर फुले दिसली
त्या फुलांचे झाड
आता पुढे..
शमारेल धबधबा, Le Cascade de Chamarel
पुढचे ठिकाण होते, शमारेल चा धबधबा.. हा एका खाजगी जागेत आहे. तिथे जायचा रस्ता सुंदर आहे. परीसरात कॉफी, अननस वगैरेची शेती आहे.
१०० मिटर्स कोसळणारा हा धबधबा दोन टप्प्यात आहे आणि तो बघायलाही सुंदर सोय केलेली आहे.
रस्ता
झोकदार वळण
मधूनच प्रखर उनही पडायचे
अननसाचे शेत
इथेही इंद्रधनुष्य आहेच ( धबधब्याचा वरचा भाग )
तिथेच जरा वर एका टेकाडावर चढूनही हा धबधबा बघता येतो.
ही खालच्या टप्प्यावरची जागा
माहितीफलक
सप्तरंगी माती, Seven Colored Earth
३०) निळी मुंगी ?????
पुढच्या भागात समारोप.
क्रोकोडाईल पार्क. भारी सुरेख, दाट हिरव्या झाडीनं भरलेलं आणि टुमदार होतं हे. ते फिरताफिरता मस्त नेचर वॉक झाला. :
प्रवेशद्वार :
झोपा काढतायत :
गेटर किंडर गार्डन :
जायंट टॉर्टॉईजः
बालपणीचे जायंट टॉर्टॉईज :
अॅक्वेरियम देखिल अतिशय सुरेख :
सांताक्लॉ़ज :
पावडर-कुंकू चाललंय:
घरात जातोय की बाहेर येतोय?:
तू जा तुझ्या वाटेनं, मी जातो माझ्या वाटेनं (घरासकट):
कोरल :
मॉरिशसच्या समुद्रकिनार्यावर कोरल्सचीच बनलेली वाळू आहे. आणि कोरल्सचे अगणित तुकडेही वाळूत असतात. पायाला बोचत राहतात. मऊ, मुलायम वाळू निदान ल मेरिडियनच्या समुद्रकिनार्यावर नव्हती.
हे दगड नाहीयेत. वाळून स्वतःला लपवलेले दगडोबा मासे आहेत :
सी-टर्टल :
मॉरिशियस - समारोप
शमारेल हून बाहेर पडल्यावर एका अत्यंत उंचावरच्या जागी आपण येतो. तिथला नजारा ( सूर्याची पोझिशन मात्र योग्य नव्हती )
"माझा" फोटो
तिथला "तिकोना "
बहाव्याची झाडे फार हेल्दी दिसत होती.. फुलल्यावर किती मस्त दिसत असतील
तिथली " वानरलिंगी "
हॉटेलच्या माझ्या विंग मधून दिसणारा समुद्र
बीचवर हा स्टॉल होता. मी २ अननस खाल्ले तिथे. इथून मी काही चटण्या घेतल्या ( काही मायबोलीकरांनी चाखल्या त्या )
निवांत विमानतळ
ए ३८० ( आता मुंबईत पण येते एमिरेट्स चे ३८०. इके ५०१ / ५०२ .. गेल्याच महिन्यात सुरु झाले )
विमानतळावर पोहोचलो तर पाऊस सुरु झालाच
आता दुबई / अबु धाबीला जाऊ आपण !
हे असेच थोडे सटरफटर. व्यासपीठ मिळालंय त्याचा फायदा घेते. :
पाऊस भरून आला:
संदर्भ :-
१) https://marathi.hindustantimes.com/maharashtra/chatrapati-shivaji-maharaj-equestrian-statue-unveiling-in-mauritius-141682703444590.html
२) https://www.godigit.com/mr-in/international-travel-insurance/country/mauritius/mauritius-visa-for-indians
३) https://www.maayboli.com/node/50140
४) https://www.lokmat.com/maharashtra/marathi-bhasha-din-maharastrian-culture-mauritius/
५) https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-nilesh-gaikwad-article-on-traveltime-4981484-NOR.html
६) https://www.loksatta.com/viva/lekhaa/information-article-about-mauritius-1685291/
वा! मी थोडे माझ्या पोतडीतले फोटो टाकतेय बरं का.
लॉबी :