वलसाड :-
वलसाड हा गुजरातच्या सीमेवरील जिल्हा आहे.या नावाची उत्पती 'वड-साल' वरुन झाली. याचा अर्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वडाचे वृक्ष आहेत असा होतो. वलसाड जवळील संजान येथे सर्वप्रथम पारशी लोकांचे आगमन झाले होते. वलसाड जिल्ह्याच्या भोवती अरबी समुद्र, नवसारी, डांग जिल्हा आणि एका बाजुला महाराष्ट्र राज्य आहे. वलसाड परिसरातील पर्यटनस्थळात तिथल इथला समुद्रकिनारा, स्वामी नारायण मंदीर्,साईबाबा मंदीर, शांतिधाम मंदीर, पारनेर किल्ला आणि ताडकेश्वर मंदीर यांचा समावेश होतो.
दांडी बीचः-
गुजरातमध्ये नवसारीजवळ दांडी हे छोटेसे गाव आहे. गांधीजीनी इथे सत्याग्रह केल्यामुळे या छोट्या गावाला एतिहासिक महत्व प्राप्त झाले. मीठासारख्या गरजेच्या वस्तुवर जाचक कर लावल्याने सन १९३० मध्ये गांधीजींनी साबरमती आश्रमापासून पायी यात्रा करुन दांडी गावाच्या किनार्यावर मीठ उचलून देशातील नागरिकांना सत्याग्रहाची प्रेरणा दिली.
यातील ताडकेश्वर मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदीराला छत नाही.इथे सुर्याचे किरण थेट शिवलिंगावरती पडतात. तसेच इथे मोठ्या संख्येने शिवलिंग आहेत.
पारनेरा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारला असे मानले जाते.
पारनेराजवळ असलेल्या टेकडीवर दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जाते.
तिथलच्या समुद्र किनार्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथली वाळु काळ्या रंगाची आहे. वलसाडच्या पोलिस मुख्यालयात एतिहासिक महत्व असणारे कारागृह देखील आहे.
साईबाबा मंदीर
स्वामीनारायण मंदीर
संजान हे वलसाड जिल्ह्यातील छोटे गाव आहे. पारशी लोक भारतात सर्वप्रथम इथेच उतरले. इराण सोडून समुद्रात जहाजातून प्रवास सुरु केल्यावर पारशी लोकांचे जहाज किनार्यावर लागले ते या संजानला. संजानमध्ये या घटनेचा स्मृतीस्तंभ आपण पाहु शकतो. हा स्तंभ १९१७ मध्ये उभारला गेला.
वलसाड परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा भाग आंब्यांच्या बागांसाठी प्रसिध्द आहे. इथे हापुस आंब्याच्या बागा आहेत.
वलसाडला जाण्यासाठी मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्ग सोयीचा आहे.
उदवाडा :-
वलसाड जिल्ह्यातील उदवाडा पारसी धर्मीय लोकांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. उदवाडा या शब्दाचा अर्थ उंट चरण्याचे ठिकाण असा होतो. इथे पारशी लोकांनी येउन हे गाव वसवले,मात्र गाव वसवण्यापुर्वी इथे उंट चारले जात असल्यामुळे हे नाव पडले. उदवाडाचे प्रमुख आकर्षण आहे अताश बेहरामचा पवित्र अग्नी. हा अग्नी पारशी लोकांनी इराणवरुन आणला होता आणि तो अतिशय पवित्र आहे अशी पारशी लोकांची श्रध्दा आहे. पारशी सुरवातीला जरी संजाण बंदरात उतरले होते तरी मुहमद बीन तुघलकाच्या आक्रमणामुळे त्यांना संजाण सोडून उदवाड्याला यावे लागले.
उदवाड्यातील अ ताश बेहरामचा अग्नी हा जगातील प्राचीन अग्नीपैकी एक आहे. या इमारतीचे बरेच वेळा पुर्निर्माण झाले आहे. अताश बेहरामचा अग्नी हा सतत तेवत असतो.त्याला ईराणशहा असे देखील म्हणले जाते. अताश बेहरामचा स्थापना दिवस आणि शहंशाही या पारसी कॅलेंडरप्रमाणे नवव्या महिन्याचा नववा दिवस मोठ्या उत्साहात सण म्हणून साजरा केला जातो.
उदवाड्याचा समुद्रकिनारा देखील प्रेक्षणीय आहे.पारशी भोजनाचा आनंद घेण्यासाठी उदवाड्याला पर्यटक येतात.
आणंद :-
मुल ( आनंद मिल्क यूनियन लिमिटेड) यांनी दुधसंकलन क्षेत्रात म्हणजे डेअरी व्यवसायात सहकार चळवळ आणल्याने आणंद शहर प्रसिध्दीच्या झोतात आले. याच श्वेतक्रांतीमुळे भारत दुध उत्पाद्नात आघाडीच्या स्थानी जाउ शकला. आणंद गुजरातची राजधानी गांधीनगरपासून १०१ कि.मी. दुर आहे. वडोदरा-अहमदाबाद या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आणंद आहे. आणंदजवळ श्री रोकडीया हनुमान्,सरदार वल्लभभाई पटेल व वीर विठ्ठलभाई पटेल मेमोरीयल आणि स्वामी नारायण मंदीर अशी पर्यटनस्थळ आहेत.
अमुल आईसक्रीम
आणंद येथील अमुलचा प्लँट
बनास डेअरी
चोरवाड :-
चोरवाड हे एक मासेमारीचा व्यवसाय करणार्या लोकांचे एक छोटेसे गाव होते.मात्र या ठिकाणाचे महत्व जुनागडचे नवाब मुहमद्खान तृतीय यांना लक्षात आले.त्यांनी सन १९३० मध्ये इथे आपला उन्हाळी राजवाडा उभारला.हे ठिकाण मुहमदखान याच्या ताब्यात भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत होते. या महालाला दरिया महाल असेही म्हणतात.
पोशिना महालाचे दृष्य
कुंभरीया जैन मंदीर
हर्षनाथ मंदीर, सिकर
दंताचा राजपरिवार आजही इथे रहातो.आणि नवरात्रीची पुजा दंताच्या महाराणाच्या हस्ते होते. दंताचा राजपरिवार माउंट अबुजवळ 'भवानी विला विरासत होम स्टे' चालवतात. दंताजवळ अंबाजी जैन मंदीर, खंडीत जैन मंदीर, कोटेश्वर मंदीर, तरंगा आणि कुंभारीया आणि धारोय बांध अशी ठिकाणे आहेत. दंताला आपण पितळी दागिने, चित्र, पश्मीना ओढणी अशी खरेदी करु शकतो. इथून जवळच बलराम अंबाजी वन्यजीव अभयारण्य आहे.इथे नीलगाय, रानकोंबडी, तीतर्,लावा, रानडुक्कर,कोल्हा, लांडगा, तरस, बिबट्या,अस्वल असे वन्य प्राणी पाहु शकतो.
खुप वर्षांपुर्वी खेडाला हिंडींबा वन म्हणले जात असे.महाभारतानुसार भीमाने हिंडींब राक्षसाचा वध याच जागी केला होता असे मानले जाते. खेडा परिसरावर सुरवातीला बाबी वंशाची राजवट होती. पुढे हा परिसर मराठ्यांच्या अखत्यारीत आला.पुढे याचा ताबा ब्रिटीशांकडे गेला. खेडा परिसराला एतिहासिक महत्व आहे.इथेच गांधीजीनी सत्याग्रहाला सुरवात केली. याचे कारण खेडा परिसरात दुष्काळ पडला होता, तरीही ब्रिटीश सरकार कर माफ करायला तयार नव्हते. यामुळे गांधीजीनी सत्याग्रह करुन करमाफीची मागणी केली. गावकर्यांच्या दबावापुढे इंग्रज सरकारला झुकावे लागले आणि पुढील दोन वर्षासाठी कर माफ करण्यात आला.
स्वामी नारायण मंदीर, वडतळ
खेडा परिसरात असलेल्या खेडीया हनुमान मंदीर, श्री.महालक्ष्मी मंदीर, श्री. मनकामेश्वर मंदीर, श्री. बहुकाहराजी मंदीर, नडियादचे संतराम मंदीर हि मंदीरे आहेत. मंदीरांच्या भिंतीवर असलेल्या दीडशे वर्ष जुन्या भित्तीचित्रासाठी खेडा प्रसिध्द आहे.
परमार राजपुत वंशाच्या राजा प्रहलादन याने स्थापन केलेले पालनपुर आज गुजरातच्या बनासकांटा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. इंग्रजांच्या काळात इथे लोहानी अफगाण लोकांचे वर्चस्व होते. त्याकाळात सध्याच्या गुजरात-राजस्थान सीमेवरचा काही प्रदेश पालनपुर राज्यात समाविष्ट झाला होता. या प्रदेशाच्या एका बाजुला अरवली पर्वताच्या रांगा आहेत तर दुसर्या बाजुला साबरमती नदी आहे. पालनपुर शहरात एक भुईकोट किल्ला होता,ज्याला सात दरवाजे होते.त्याचे अवशेष आजही बघायला मिळतात. या सात दरवाज्यापैकी काही दरवाजांना सिमला गेट, दिल्ली गेट, मीरा गेट्,गथामन दरवाजा अशी नावे होती. पालनपुरच्या इतिहासाच्या खुणा म्हणून कीर्तिस्तंभ, जोरावर महाल, बलराम मंदीर अशी ठिकाणे इथे आहेत. पालनपुर परिसरात बरीच हिंदु आणि जैन मंदीरे आहेत.राजा प्रहलादनने उभारलेले पल्लविय पार्श्वनाथ मंदीर हे इथले महत्वाचे जैन मंदीर आहे. याला मोटू देरासर तर दुसर्या मंदीराला नानु देरासर म्हणतात. कीर्तिस्तंभाजवळ पाताळेश्वर मंदीर आणि मोटारामजी मंदीर आहे.
बलराम मंदीर
जेसोर अस्वल अभयारण्य
बलराम पॅलेस